डीझेल इंजिन
डिझेल इंजिन हे अंतर्गत ज्वलन ह्या तत्त्वावर चालणारे एक प्रकारचे इंजिन आहे. डीझेल हे इंधन पेट्रोल या इंधनाच्या अतिज्वलनशीलतेला पर्याय म्हणून हे वापरतात. रुडॉल्फ कार्ल डिझेल यांनी कोळश्याच्या भुकटीचा इंधन म्हणून वापर करण्यासाठी म्हणून या इंजिनाची रचना केली. त्याच वेळी त्यांनी त्यावर इतर द्रवरूप इंधने जसे भुईमुगाचे तेल ही यशस्वीरीत्या वापरून पाहिली. हे इंजिन त्यांनी इ.स. १९००च्या पॅरिस प्रदर्शनात प्रदर्शित केले.
डिझेल इंजिनाचे कार्य
संपादनपेट्रोल इंजिनमध्ये वापरल्या जाणाऱ्या उच्चदाबाच्या स्पार्क प्लगचा उपयोग डिझेल इंजिनात केला जात नाही. त्या ऐवजी डिझेल आणि हवेच्या मिश्रणावर अति उच्च दाब जास्त तापमानावर आणला जातो. दाबाचा अनुपात (रेशिओ) १५:१ ते २१:१ असा सर्वसाधारणतः असतो.डिझेल हे कॉंप्रेशन स्ट्रोकच्या शेवटी सिलिंडर मध्ये हवेसोबत सोडले (इंजेक्ट केल्या) जाते. आतील उच्च तपमानामुळे डिझेल व प्राणवायुच्या दरम्यान क्रियेला सुरुवात होते. यामुळे दाब तयार होवून यांत्रिक प्रक्रियेला सुरुवात होते. म्हणजे दाबाने पिस्टन ढकलल्या जातो व तो क्रॅंकला गोल फिरवतो.अत्याधुनिक तंत्रज्ञानानुसार, हे इंजिन चालू करण्यासाठी ग्लो प्लगचा उपयोग होतो. हे प्लग सिलिंडरच्या आतील तापमान वाढवतात. व इंजिन सुरू करणे त्यामुळे सोपे होते.
उपयोग
संपादनउच्च तापमानात ते सहजतेने जळत नसल्याने, डिझेलचा उपयोग चिलखती वाहने, लष्करी वाहने तसेच रणगाडे यात होतो. डिझेल इंजिने ही जास्त ताकदीचा टोला (टॉर्क) देवू शकतात. त्यामुळे मालवाहतूकीचे ट्रक व ट्रॅक्टर मध्ये ही त्याचा वापर होतो.
मोटारींमध्ये ही डिझेलचा उपयोग होतो. यामुळे पेट्रोल इतके प्रदुषण होत नाही. तसेच एका लिटर मध्ये या गाड्या जास्त धाव देतात.
मर्यादा
संपादनडिझेल थंडीत लवकर घट्ट होते. त्यामुळे इंजिन सुरू करणे अवघड बनते. विशिष्ट रसायने मिसळून यासाठी कमी तापमानात घट्ट न होणारे डिझेल बनवले जाते. तसेच जर डिझेल इंजिनाला डिझेल पुरवणारा पंप उघड्या अवस्थेत बंद पडला तर इंजिन चालूच राहते. इंग्रजी मध्ये याला रनअवे असे म्हणतात. अशा स्थितीत अडकलेले इंजिन बंद करणे अवघड होते. व शेवटी अनियंत्रित अतिवेगात फिरल्याने हे इंजिन झिज होऊन बंद पडते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |