पेट्रोल इंजिन हे पेट्रोल हे द्रवरूप इंधन वापरून चालणारे यंत्र आहे. हे सर्वसाधारणपणे 'आंतरस्फोट' करून चालणारे इंजिन असते.यातील इंधनाचे ज्वलन होण्यासाठी, स्पार्कप्लगचा उपयोग केला जातो.

बुगाटी या गाडीचे पेट्रोल इंजिन

प्रकार

संपादन

पेट्रोलचलित इंजिनाचे दोन प्रकार आहेत:

यात आणखी एक सिलेंडर (सिंगल सिलेंडर) आणि अनेक सिलेंडर (मल्टी सिलेंडर) असेही प्रकार आहेत. जेव्हा जास्त उर्जा हवी असते(उदा.-कार) तेंव्हा मल्टी सिलेंडर इंजिन वापरतात.

कार्य(४ स्ट्रोक)

संपादन
 
4-Takt Petrol engine

...

शेजारची आकृती कृपया बघा.ती,एक सिलेंडर असलेले, ४ स्ट्रोक पेट्रोल इंजिन कसे कार्य करते हे दर्शविणारी आहे.आकृती शेजारील डाव्या बाजुस, बदलणारे इंग्रजी आकडेही बघा. ते स्ट्रोकची स्थिती दर्शवितात.

स्ट्रोक 1 (इनलेट स्ट्रोक): दट्टया(पिस्टन) खाली जाते. पोकळीत निर्वात प्रदेश निर्माण होतो. त्याच सुमारास पेट्रोल व हवेचे मिश्रण (निळा रंग) उजवीकडील झडप (व्हाल्व) उघडल्यामुळे आत येते.

स्ट्रोक 2 (कॉम्प्रेशन स्ट्रोक): दोन्ही व्हाल्व बंद असतात.पिस्टन वर येते.पोकळीतील मिश्रण दाबल्या जाते.तेथे उच्च दाब निर्माण होतो.

स्ट्रोक 3 (पॉवर स्ट्रोक): ते पूर्ण दाबले जाताच स्पार्क प्लग मधुन ठिणगी पडते.उच्च दाबावर असलेल्या त्या मिश्रणाचा स्फोट होतो. त्याने दट्टया (पिस्टन) पूर्ण जोराने खाली ढकलल्या जाते(लाल रंग).या स्थितीत इंजिनाला उर्जा मिळते.

स्ट्रोक 4 (एक्झॉस्ट स्ट्रोक): डावीकडील निकास(एक्झॉस्ट) व्हॉल्व उघडल्या जातो. जळलेल्या मिश्रणाचा धुर त्यातुन बाहेर पडतो.(पिवळसर- कथ्था रंग)

ही क्रिया सतत, लागोपाठ आणि वारंवार होते. याने इंजिनास उर्जा मिळत जाते. इंजिनमध्ये या क्रिया बरोबर वेळेनुसार घडाव्या यासाठी आवश्यक ती रचना केली असते. हे इंजिन प्रत्येक चवथ्या स्ट्रोकला उर्जा देते.


4 स्ट्रोक इंजिन वंगण कसे केले जाते?


4 स्ट्रोक इंजिन ऑइल संपमध्ये ठेवलेल्या तेलाने वंगण घालतात. 2 स्ट्रोक इंजिननुसार इंजिनला वंगण घालण्यासाठी 4 स्ट्रोक इंजिन तेल इंधनासह जळत नाही. जाळण्याऐवजी ते इंजिनभोवती पुनर्वापर केले जाते. 4 स्ट्रोक इंजिन ऑइल इंजिनभोवती रिक्रिक्युलेट केल्यामुळे ते वंगण घालते, उष्णता पसरवते, स्वच्छ करते आणि तेल बदलेपर्यंत सस्पेंशनमध्ये अशुद्धता ठेवते.

कार्य (२ स्ट्रोक)

संपादन

याचे कार्य वरील ४ स्ट्रोक इंजिनप्रमाणेच असते.फक्त यात दोनच स्ट्रोक असतात.यात वरील स्ट्रोक १ व ४ची क्रिया एकत्र घडते,तसेच २ व ३ची एकत्रपणे घडते. हे इंजिन प्रत्येक दुसऱ्या स्ट्रोकला उर्जा देते.{सविस्तर माहतीसाठी}

साधारणतः मोटरसायकल, स्कुटर मध्ये २ स्ट्रोक पेट्रोल इंजिन वापरतात.(अपवाद- रॉयल एनफिल्ड आणि हीरो होंडा मोटरसायकल) कोणत्या प्रकारचे इंजिन वापरायचे हे आवश्यकता बघुन उत्पादक ठरवितो.