अंतर्गत ज्वलन इंजिन (इंग्लिश: internal combustion engine, संक्षेप: आयसी इंजिन) हे एक अशा प्रकारचे इंजिन आहे ज्यामध्ये हवेसोबत प्रक्रियेमुळे इंधनाचे ज्वलन होते. ह्या प्रक्रियेदरम्यान निर्माण झालेला अतिदाबाचा व अतिउष्ण वायू प्रसरण पावतो व रासायनिक उर्जेचे रूपांतर यांत्रिकी उर्जेमध्ये होते.

आंतर्गत ज्वलन इंजिन

आधुनिक मोटारवाहने आयसी इंजिनवरच चालतात. टू स्ट्रोक इंजिनफोर स्ट्रोक इंजिन हे आयसी इंजिनाचे सर्वात लोकप्रिय प्रकार आहेत. पेट्रोल इंजिन हे पेट्रोल ह्या इंधनावर चालते व त्यामध्ये पेट्रोलच्या ज्वलनाची सुरुवात एक ठिणगी पाडून केली जाते (Spark ignition) तर डीझेल इंजिन हे डिझेल ह्या इंधनावर चालते. यात डीझेलच्या ज्वलनासाठी डीझेल-हवा मिश्रणाचा दाब वाढवला जातो (Compression ignition). वँकेल इंजिन हे कमी लोकप्रिय चक्रीय इंजिन देखील काही मोटारींमध्ये वापरले जाते.

विमानांमध्ये वापरले जाणारे गॅस टर्बाइन हे देखील एक प्रकारचे आयसी इंजिनच आहे.

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ संपादन