तळा तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्याचा एक तालुका आहे.तळा तालुका हा रायगड जिल्ह्यातील नवीन तालुका आहे. हा भाग डोंगराळ असून येथे पुरातन कुडे लेणी आहेत, तसेच तळगड किंवा तळागड नावाचा किल्ला आहे. येथे सन १८२६ मधे बांधलेले रामेश्वर हे शिव मंदिर आहे. तसे हे थंड हवेचे ठिकाण आहे आणि पर्यटन स्थळ आहे. तळे शहराच्या शेजारी १२ वाडया असून ६४ खेडेगाव आहेत.

  ?तळा तालुका
महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• २० मी
मोठे शहर तळा
जवळचे शहर तळा, माणगांव
भाषा मराठी
संसदीय मतदारसंघ रायगड
विधानसभा मतदारसंघ श्रीवर्धन
तहसील तळा तालुका
पंचायत समिती तळा तालुका
कोड
पिन कोड
आरटीओ कोड

• ४०२१११
• MH06


तळा हे जिल्हा मुख्यालय अलिबागच्या दक्षिणेला ५८ किमीच्या अंतरावर व मुंबईपासून १०१ किमी अंतरावर आहे. तसेच मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूरपासून सुमारे १६ किमी अंतरावर आहं.

तळा तालुक्याची चतुःसीमा याप्रमाणे -

पूर्वेस माणगाव तालुका, उत्तरेस रोहा तालुका, दक्षिणेस म्हसळा तालुका व पश्चिमेस मुरुड तालुका.

इतिहाससंपादन करा

तळा गावास मुघलपूर्वकाळी महत्त्व होते हे तेथील एका हेमाडपंती देवळाच्या अवशेषांवरून व तळागडावरील दगडांवरून दिसून येते. पूर्वी पाणीपुरवठ्यासाठी येथे पुश्ती, मोदी, महादेव, ब्रह्माळी, नंद व रामेश्वरी नावाची तळी होती. त्यांपैकी पुश्ती हे तळे सर्वात जुने आहे. सन १८३४ मध्ये ठाणा जिल्हाधिकाऱ्याच्या हुकूमावरून तळे बांधले होते.[१] तळा गावाच्या मुख्य बाजारपेठेत मध्यभागी १.६७ मीटर उंच व ०.४५ मीटर रुंद शिलालेखाचा दगड असून त्यास ध्वजाचा दगड म्हणतात. मात्र त्यावरील मजकूर अस्पष्ट आहे. [२]


संदर्भसंपादन करा


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
रायगड जिल्ह्यातील तालुके
पनवेल | पेण | कर्जत | खालापूर | उरण | अलिबाग | सुधागड | माणगाव | रोहा | मुरूड | श्रीवर्धन | म्हसळा | महाड | पोलादपूर | तळा
  1. ^ कुलाबा गॅझेटिअर.
  2. ^ चौधरी, डॉ. कि. का. रायगड जिल्हा (PDF). ३०.०१.२०२० रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)