हेमाडपंती स्थापत्यशैली
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हेमाडपंती स्थापत्यशैली हिचा भारतीय स्थापत्यशैलींपैकी एक प्रमुख शैली म्हणून हेमाडपंती शैलीचा उल्लेख केला जातो. देवगिरीच्या यादवांच्या राज्याचे सन १२५९ ते १२७४ याकाळात मुख्य प्रधान राहिलेल्या हेमाद्री पंडित किंवा हेमाडपंत यांनी या प्रकारच्या इमारतबांधणीचा महाराष्ट्र आणि दख्खन पठारावर अनेक ठिकाणी उपयोग केल्याने ही बांधणीपद्धत त्यांच्या नावावरून हेमाडपंती म्हणून ओळखली जाऊ लागली.
रचना
संपादनमंदिरांचे हेमाडपंती पद्धतीने झालेले बांधकाम टिकून राहिले आणि त्यामुळे ते आजही अभ्यासकांना उपलब्ध आहे. सामान्यतः इमारत बांधणीत घडवलेल्या दगडांमध्ये चुना किंवा त्याप्रकारचा दर्जा न भरता दगडच वेगवेगळ्या कोनातून कापून, त्यांनाच खुंट्या आणि खाचा पाडून ते एकमेकांत घट्ट बसू शकतील अशी रचना केली जाते. याला शुष्कसांधी स्थापत्यशैली असे देखील म्हणतात. मंदिरांसारख्या वास्तूत पायापासून शिखरापर्यंत ही दगड एकमेकांत गुंफून केलेली रचना एकसंध उभी राहाते आणि टिकाऊही बनते. वेरूळचे घृष्णेश्वर मंदिर, औंढा नागनाथ येथील मंदिर ही हेमाडपंती स्थापत्यशैलीची काही उदाहरणे होत.
या शैलीत बांधण्यात आलेली काही मंदिरे
संपादन- श्री मल्लिकार्जुन मंदिर, दहिटणे, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर
- . श्री मल्लिकार्जुन मंदिर, चपळगाव तालुका, अक्कलकोट जिल्हा सोलापूर
- सिद्धेश्वर नागनाथ मंदिर, झरी बु, ता. चाकुर, जिल्हा लातूर
- हेमाडपंथी महादेव मंदिर, साकेगाव, ता. चिखली, जिल्हा. बुलढाणा.
- कुमारेश्वर महादेव मंदिर, केलसुल,ता.सेनगाव जि.हिंगोली
- हेमाडपंथी महादेव मंदिर, बाराहाळी, ता. मुखेड, जि. नांदेड
- कोपेश्वर मंदिर खिद्रापूर,शिरोळ, कोल्हापूर
- भुलेश्वर मंदिर माळशिरस, यवत, पुणे.
- महारनाथ पंढरपूर जि. सोलापूर
- जगदंबामाता मदिंर, टाहाकरी, अकोले तालुका
- अमृतेश्वर मंदिर, रतनवाडी, अकोले तालुका
- अंबरनाथ येथील शिवमंदिर
- केदारेश्वर मंदिर परळी, सज्जनगड, सातारा
- भैरवनाथ मंदिर किकली, सातारा
- काशीविश्वेश्वर मंदिर क्षेत्र माहुली सातारा
- आदासा - गणेश मंदिर
- औंढा नागनाथ येथील मंदिर
- कमळगड - धोमचे हेमाडपंती शिवमंदिर
- करमाळा येथील कमालादेवीचे मंदिर
- किल्ले पुरंदर रामेश्वर मंदिर : पुरंदेश्वर
- चाळीसगाव येथील पाटणादेवी मंदिर
- त्र्यंबकेश्वर - शिव मंदिर
- माणकेश्वर शिवालय- झोडगे (मालेगाव)
- रतनगड येथील अमृतेश्वर मंदिर
- अर्धनारीनटेश्वर मंदिर, वेळापूर
- गोंदेश्वर मंदिर - सिन्नर
- नरसिंह मंदिर,मोगरा ता माजलगाव जि. बीड
- महादेव मंदिर, रहिमाबाद ता सिल्लोड जि. औरंगाबाद
- महादेव मंदिर, मळोली, ता माळशिरस जि सोलापूर
- अंबाजोगाई येथील योगेश्वरी मंदिर, खोलेश्वर मंदिर,सकलेश्वर (१२ खांबी मंदिर), अमलेश्वर महादेव मंदिर, चौभारा गणेश मंदिर
- मंडपेश्वर महादेव मंदिर, मांडवड, ता. नांदगाव, जि. नाशिक
- वेल्हाळा, ता. भुसावळ, जि. जळगाव येथिल कपिलेश्वर महादेव मंदिर.
- गारखेडा, ता. जामनेर, जि. जळगाव येथील हेमाडपंथी शिवमंदिर.
- लोहारा, ता. पाचोरा, जि.जळगांव येथील हेमाडपंथी तपेश्वर महादेव मंदिर
- लोहरा, ता मानवत, जि. परभणी येथील तपेश्वर महादेव मंदिर. (हेमाडपंथी बांधणीचे) [१]
- श्री पुरुषोत्तम भगवान मंदिर पुरुषोत्तमपुरी ता.माजलगाव जि.बीड
- श्री खोलेश्वर महादेव मंदिर आणि श्री कालंका देवी मंदिर, बार्शी टाकळी, ता. बार्शी टाकळी, जि. अकोला