वेरूळ
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
वेरूळ हे महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गाव आहे. वेरूळ लेणी येथून जवळ आहेत. वेरूळ हे छत्रपती संभाजीनगरहून २५ कि.मी. अंतरावर आहे. घृष्णेश्वर हे १२वे ज्योतिर्लिंग मंदिर येथे आहे. वेरूळ हे गाव जैन राजा एलापुरा यांच्या नावापासून एलोरा हे नाव पडले आहे.[ संदर्भ हवा ]
वेरूळ ही राष्ट्रकूट मराठा राजवंशाची राजधानी होती राष्ट्रकूट मराठा राजवंशाचे मूळ वेरूळ हे होते इथेच राष्ट्रकुट मराठा सम्राट कृष्णराज प्रथम यांनी कैलास मंदिर पैठणच्या कोकस नावाच्या शिल्पकार कडून बनवून घेतले. राष्ट्रकूट मराठा सम्राट दंतिदुर्ग यांनी नंतर महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील मान्यखेट ला राष्ट्रकूट साम्राज्याची दुसरी राजधानी बनवली. आजच्या मराठ्यांच्या 96 कुळातील राष्ट्रकूट, राठोड, शंखपाळ, आंग्रे, माने, घाटगे यात 6 कुळातील मराठा हे राष्ट्रकुटांचे वंशज आहेत.[१]
छत्रपती शिवाजी महाराजांचं मूळ गाव, अशीही याची ओळख सांगितली जाते. शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांच्या वेरूळच्या गढीबद्दलची ही गोष्ट. वेरूळ हे शहाजीराजे भोसले यांचं मूळ गाव. आजही वेरूळात शहाजी राजांचे वडील आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्या गढीचे अवशेष पाहायला मिळतात.
दरवर्षी १८ मार्चला वेरूळ इथे शहाजीराजांच्या जयंतीचा कार्यक्रम केला जातो. २३ जानेवारी १६६४ रोजी बंगळूरजवळील होदेगिरीच्या जंगलात शहाजीराजे शिकारीसाठी गेले असता घोड्यावरून पडून त्यांचा मृत्यू झाला, असे दाखले इतिहासात दिले जातात.
हे सुद्धा पहा
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
- ^ कुमार तिवारी, डॉ. प्रवीण (2024). "राष्ट्रकूट स्थापत्य शैली : कैलाशनाथ मंदिर के विशेष सन्दर्भ में". International Journal of All Research Education and Scientific Methods. 12 (02): 1962–1967. doi:10.56025/ijaresm.2023.1202241962 Check
|doi=
value (सहाय्य). ISSN 2455-6211.