विकिपीडिया:लेखनभाषा संकेत
सध्या चर्चा याच पानावर करा आपण नंतर ती चर्चा पानावर हलवू.
मराठी विकिपीडियातील लेखनशैली तसेच त्यातील मराठी भाषेच्या उपयोगासंदर्भातील काही संकेतांबद्दल थोड्या चर्चा झाल्या आहेत. विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत सर्वसाधारणतः मान्य होऊ लागले आहेत. तर भाषेच्या उपयोगाच्या स्वरूपाबद्दल मराठी विकिपीडियाचे स्वतःचे संकेत कळत नकळत बनत आहेत. मराठी विकिपीडियाच्या आतापर्यंतच्या प्रवासात अनेकदा, विविध मतमतांतरे ध्यानात घेऊन, अशा बनत चाललेल्या संकेतांचा आढावा घेणार्या चर्चा झाल्या आहेत. आणि त्यानंतर, काही संकेत सर्वसाधारणपणे मान्य किंवा रूढ होऊ लागलेले आहेत. अशा काही संकेतांची नोंद घेणे असा या प्रकल्प पानाचा उद्देश आहे. विकिपीडियाच्या बाहेरच्या जगातदेखील, मराठी भाषेच्या वापराचे स्वरूप कसे असावे याबद्दल मराठी संकेतस्थळाद्वारे व इतर माध्यमांतून समाजातील विविध घटक आणि भाषातज्ज्ञ वेळोवेळी आपले विचार प्रकट करत आले आहेत. त्यांच्यातही विविध मतमतांतरे आहेतच.
मराठी विकिपीडियाच्या अनुषंगाने मागे झालेल्या चर्चांचा गोषवारा
संपादनया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
- नमस्कार अभय,मी आपणांस मुद्दाम त्रास देत आहे,त्याचे कारण माझ्यात आणि नरसीकर ह्यांच्यात काही पत्रव्यवहार (संदेश)झाला त्याच्या अनुषंगाने मी काही सूचना त्यांना केल्या होत्या,त्या आपल्या दृष्टीस आणून देत आहे,कृपया ह्यात काही चूका असतील किंवा खटकण्यासारखे असेल तर आपण त्यात योग्य त्या सूचना करून कुणाचाही गैरसमज न होता,आवश्यक ते बदल होतील हे पहावे.बाकी सर्व ठिक,माझ्या काही विकिपीडियाविषयी कल्पना आहेत ज्या मी सविस्तर पणे मुद्देसूद लिहून पाठवेन..செ.प्रसन्नकुमार ०५:०२, २३ जुलै २०१० (UTC)
- माझा पत्रव्यवहार खालीलप्रमाणे =
नमस्कार व्ही.(किंवा तुमच्या लिखाणानुसार वी.)नरसीकर,मला एक नविनच शोध लागलाय तो म्हणजे विदर्भातील लोक बटाट्याला आलु असे म्हणतात, नंतर मला असं लक्षात आलं (इथे तुम्ही आल्याला-अदरक वगैरे म्हणत असाल पण तो हा शब्द नाहिये) कि ह्या लेखात कुणीतरी आलु ह्या हिंदी शब्दास (आता तो हिंदी कि मराठी माहित नाही पण हिंदीच/उत्तरभारतातील असावा असे वाटते) पुनर्निर्देशीत करून मराठीतील सर्वसाधारण वापरातील (प्रमाण शब्द)" बटाटा" कडे वळविले आहे.माझ्या माहितीनुसार मला इतके दिवस वाटत होते कि "बटाटा" हाच मराठी शब्द आहे पण त्यास मराठीत आलु (?) म्हणतात हे आपल्यामुळे कळले त्याबद्दल धन्यवाद .(माझा आणि विदर्भाचा फारसा संब्ंध नाही किंवा तिकडे जाणे येणे नाही, मी आपला पुण्यामुंबईत राहणारा मराठी माणूस त्यामुळे शेव बटाटा पुरी,बटाटा वडा,कांदे-बटाटे पोहे,अळूभजी,अळुवडी इ.(आलुभजी नाही) शब्दांशी परिचीत असणारा तसेच दक्षिणेकडे काही दिवस राहिल्याने हिंदी शब्दांची माझी ओळख तशी कमीच,असो.).कदाचीत काही दिवसांनी आणखी नवनविन शब्दांची त्यात भर पडेलही पण एक प्रमाण शब्द म्हणून आणि विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी आपण सोपा आणि सुटसूटीत ज्ञानकोश निर्माण करू शकलो तर सर्व मराठी भाषकांस ते उपयुक्त होईल पर्यायाने सर्व मराठी जनमाणसात एकसारखीच प्रमाण बोलीभाषा निर्माण होण्यास मदत होईल असे मला वाटते.जसे इंग्रजी विकिपीडिया किंवा इंग्रजी भाषेत जो शब्द योग्य असतो तोच बहूदा उल्लेखीत असतो इतर जर्मॅनीक किंवा रोमान्स (हे दोन मुख्य भाषांचे गट/प्रकार आहेत) भाषेतील शब्दप्रयोगांचा उल्लेख नसतो तसेच काहीसे मराठी (भाषा आणि विकिपीडिया) बद्दल करता आले तर बरे होईल नाहीतर मराठी शब्दकोशा ऐवजी तो सर्वभाषांचा (बहूदा भारतातील) सामाईक शब्दकोश/ज्ञानकोश व्हायचा.माझ्यामते विकिपीडियावर फक्त प्रमाण भाषा असावी आणि जिथे जिथे आवश्यक असेल तिथे त्या त्या भागातील शब्दप्रयोगाविषयी टिपा त्याही लेखात कुठेतरी समाविष्ट केलेल्या असाव्यात.माझ्या पहाणीत मराठी विकिपीडियावर हिंदी (किंवा इतर देवनागरी भाषांतील शब्दप्रयोग) शब्दांची रेलचेल अधिक प्रमाणात आढळते ते कदाचीत लिपीसाधर्म्यामुळे असावे किंवा मग रोजच्या व्यवहारात लुप्त होत जाणार्या मराठी शब्दांविषयी अनास्था असल्यामुळे होत असावे.आपण विकिपीडियन्स ने ह्याविषयी जागरूकता दाखवून (लेखांविषयी,शब्दप्रयोग,भाषाप्रयोग इ.) एक उत्तम दर्जाचा मराठी भाषेतील ज्ञानकोश निर्माण करून मराठी शब्दांचे स्थान अबाधीत राखले पाहिजे आणि जमेल तसे माध्यमांना सूचना करून योग्य शब्दांची आठवण करून द्यायला हवी त्याने इतर भाषांतील शब्द तर त्यांच्या ठिकाणी राहतीलच शिवाय मराठी राज्यात मराठी शब्द आणि भाषेचे वैशिष्ट्य टिकून राहिल.(आपण एक जबाबदार नागरीक आणि विकिपीडियावरील संपादक ह्यानात्याने प्रमाण मराठी शब्दांचा प्रसार करू शकतो आणि त्याद्वारे भाषेची सेवाच होईल असे मला वाटते,भविष्यात हळूहळू अनेक बोली नाहिशा होऊन (जे आता होतच आहे) एक सामाईक प्रमाण बोली आस्तित्त्वात येण्यास त्याद्वारे मदतच होईल.विशेषत: मराठीचे महाराष्ट्रातील स्थान पाहता,तीला ह्या गोष्टींची अधिक आवश्यकता आहे.) (मी एवढे उपदेशात्मक सांगतोय ह्याचा अर्थ मी काही कुणी मोठा मराठीभाषातज्ञ आहे किंवा कोणत्याही राजकीय पक्षांच्या विचाराने प्रेरीत होऊन सांगतोय असे नाही,मी एक सामान्य मराठीचा कळवळा असणारा अस्सल मराठी भाषक होण्याचा प्रयत्न करणारा विकिपीडियाचा संपादक आहे. ) आपण कोणत्याही गोष्टीचा गैरसमज न करता.मोकळेपणाने माझ्याशी बोलून आपल्या सूचना मला कळवा.क.लो.अ.செ.प्रसन्नकुमार ०५:०२, २३ जुलै २०१० (UTC)
- चर्चा संदेश तुमच्या पानावरील असल्यामुळे तो अधीक व्यापक चर्चेकरिता विकिपीडिया:लेखनभाषा संकेत#परभाषी शब्दांचे लेखन/भाषांतर विवाद मुख्य गट कौल येथे नेता आला तर बरे अशी विनंती आहे.
- मला इथे विवक्षीत 'आलु' या शब्दा बद्दलची चर्चा करावयाची नाहीतर माझे सर्व साधारण मत मांडावयाचे आहे. व्यक्तीशः "मी मराठी शब्द जमेल तेथे बनवा आणि वापरा पण संस्कृत हिंदी इंग्रजी अशी कोणताही वरचष्मा नको." या गटात मोडतो. प्रमाण भाषेच्या आग्रहा स्वरूपाबाबत मी नेहमी साशंक रहात आलो आहे. प्रमाण भाषेची व्याख्या व्यासपिठीय मराठी अशी करून व्यासपिठावरील सद्य मराठी खरोखर पडताळणी आणि जोखून तिचा स्विकार करावयास हरकत नाही.
- पण कुणा अनोळखी इंग्रज साहेबाने लादलेली सदाशिव शनिवारातील कोकनस्थ ब्राह्मणांची मराठीच प्रमाण भाषा हि व्याख्या आपल्याला मान्य नाही,बरे तसे करणे बिचार्या कोकणस्थ ब्राह्मणांवरही विनाकारण अन्याय आहे.बिचार्या कोकणस्थ ब्राह्मणांची मूळबोली ते विसरून गेले पण ती काही वेगळीच होती.ज्यांची स्वतःची मराठी हि मूळ बोली नव्हती त्यांनी बोललेली मराठी हि प्रमाण भाषा असे म्हणणे कोकणस्थ ब्राह्मणांवर त्यांनी न मागता केलेला विनाकारणचा अन्याय आहे,त्या शिवाय ती मराठी समस्त मराठी लोकांची मराठी कसे म्हणायचे हा प्रश्न जातीयतेतून नाही तर शिक्षणशास्त्र विषयक आहे.विकिपीडिया ज्ञानक्षेत्रात आहे आणि विकिपीडियाने विकिपीडियातील ज्ञान महाराष्ट्रातील सामान्य लोकांना कळेल रूचेल अशा शब्दात द्यावयास हवे. खानदेशी,वर्हाडी,मराठवाडी,कोकणी बोलींनी दिलेले शब्द स्विकारून मराठीस समृद्ध करावयास हवे. जीथे एखाद्या बोली ने अर्थबोध होतो ती वाक्ये केवळ प्रमाण मराठीत बसत नाहीत म्हणून त्यांना अशुद्ध मानणे हे सर्वांना सोबत घेऊन न जाणारे,संस्कृतीवर एखाद्याच गटाची मक्तेदारी सांगणारे म्हणून असांस्कृतीक पणाचे आहे असेच माझे व्यक्तिगत मत आहे.
- भाषाशास्त्रानुसार भाषा प्रवाही असते बदलती असते. लोकसंभाषणात जे शब्द येतात ते न स्विकारण्यात प्रमाण भाषा लोकांपासून दूर जाते आणि ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्यात अक्षम होण्याचे कारण बनते.विकिपीडियातिल भाषा सामान्य मराठी बांधवांना समजणारी हवी इतर बोलीतून शब्द घेतले गेले तर घ्यावेत आणि ज्यांना हे शब्द माहित नाहीत त्यांच्याकरिता शब्दाच्या जवळ सुयोग्य सुचना लावून तळटिपेत विवक्षीत अर्थ नमुद करणे आणि पहाणे विकिपीडियात सहज शक्य आहे.
- माझे हिन्दीवर प्रेम नाही, मी हिन्दी चित्रपट आणि गाणि पण पहात नाही.तरीपण हिन्दी भाषेशी नाते मिळणार्या किंवा गनमावलेल्या नौकर्र्यांच्या पलिकडे जाऊन भाषा शास्त्राच्या चष्म्तातून पहाणे गरजेचे आहे. कोणत्या हिन्दी शब्दांना कुठे पर्यंत स्विकारायचे हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तो केवळ पश्चिम महाराष्ट्रीय चष्म्याने पाहून सूटणारा नाही.विदर्भातील मुख्य शहर नागपूर मोठा काळ पर्यंत हिन्दी भाषी मध्यप्रदेशाच्या राजधानीचे शहर होते.त्यांचे व्यापारनिमीत्ताने हिन्दी भाषी भागांशी संपर्क मोठे आणि पुरातन असणे आणि म्हणून हिन्दी शब्द वैदर्भीय लोकांच्या , कन्नाड शब्द बेळगावींच्या आणि गुजराथी शब्द धुळे नंदुरबारच्या मराठी लोकांच्या वापरात आपसुक पणे होणे स्वाभाविकच आहे.या दृष्टीने हिन्दी शब्द कुठेपर्यंत आणि किती स्विकारावेत न स्विकारावेत याची चर्चा भावनिक अंगाने न होता भाषाशास्त्रीय दृष्टीने होणे गरजेचे आहे.आणि अशा चर्चा होणे निश्चित गरजेचे आहे.
- हिन्दीस विरोधाचे स्वरूप येथे पर्यंत आहेकी आपण पाकिस्तानी भाषी विकिपीडिया पेक्षा आपला विकिपीडिया चांगला कसा यात आभिमान न बाळगता हिन्दीच्या भाषेच्या आपण किती पुढे किंवा मागे आहोत यात गुंतुन रहाणे किमान मराठी विकिपीडियन्सनी गुंतवुन घेणे मला सयूक्तीक वाटत नाही. हिन्दी भाषेतील वाक्ये मराठीत भाषांतर करणे इंग्रजी भाषेतून भाषांतरेकरण्यापेक्षा तांत्रीक दृष्ट्या जास्त सोपे आहे,त्यामुळे आपला भाषातरांचा वेळ काही अंशी वाचू शकतो आणि विकिपीडियन्सनी हिन्दी विकिपीडियाकडे या दृष्टीकोणातून बघावे त्या शिवाय महाराष्ट्रीय दृष्टीकोण केवळ मराठीतून मांडून भागण्या सारखे नाही तर .हिन्दी विकिपीडियातून हिन्दीतून आपले येथील लेख भाषांतरीत करून उपलब्ध केले तर त्यांना महाराष्टीय आणि मराठी चळवळी संकुचीत नाहीत हे अधीक चांगले लक्षात येईल असे माझे मत आहे.
- दोन्ही भाषांचा ५०%पेक्षा जास्त शब्द संग्रह सारखाच असताना, मराठीतील कॉमन शब्द वापरणार्या हिन्दी भाषकांना आपल्याला जाऊन अहो आमच्या भाषेतील शब्द वापरू नका असे सांगण्याची वेळ येणार नाही हे पहावे म्हणजे झाले :)
प्रतिसाद
संपादनमाहितगार ह्यांनी मांडलेल्या मुद्द्यांची चर्चा मी शेवटापासून सुरू करतो.सर्वप्रथम शेवटचा मुद्दा.
- दोन्ही भाषांचा ५०%पेक्षा जास्त शब्द संग्रह सारखाच असताना, मराठीतील कॉमन शब्द वापरणार्या हिन्दी भाषकांना आपल्याला जाऊन अहो आमच्या भाषेतील शब्द वापरू नका असे सांगण्याची वेळ येणार नाही हे पहावे म्हणजे झाले :)
=> आपल्या ह्या मताशी मी अजिबात सहमत नाही. आपण जो दावा करत आहात कि दोन्ही भाषांचा ५०% जास्त शब्दसंग्रह सारखाच आहे तो मला मान्य नाही कारण माझ्याकडे मराठी शब्दसंग्रह आहे आणि त्यातील शब्द पाहिल्यानंतर अगदी लहान मुलगाही सांगू शकतो कि अगदीच कमी शब्द हूबेहूबपणे सारखे आहेत,(मी म्हणतो २५% देखील समानता नाही) आपल्याप्रमाणेच इतर मराठी बांधवांना लिपीसाधर्म्यामुळे असे वाटणे स्वाभाविक आहे. आज तुम्ही ५०% म्हणत आहात ,साधारण पणे ५० वर्षापूर्वी जी मराठी बोलली जात होती (नाटकातून-साहित्यातून) त्यातील शब्दांचा बोध आजच्या सामान्य मराठी माणसाला होत नाही, हि सद्यस्थिती (वस्तूस्थिती) आहे. (<-आपल्याला विकिपीडियातच ते पहावयास मिळेल) काही शतके मागे गेलो (शिवाजी महाराजांचा काळ)तर असे वाटेल हा शब्द मराठी आहे?? आणि त्याही मागे गेलो ज्ञानेश्वरांच्या काळात (७०० वर्ष)तर म्हणाल आहो हि कोणची मराठी ??इतका बदल (फरक) मराठी भाषेत झपाट्याने होत आहे,भविष्यात तर कुणी हा दावा करेन कि मराठी हि हिंदीचीच एक बोली आहे, कारण जवळपास ९०% हून अधिक शब्द सारखे आहेत, हेच कशाला मराठीच्या व्याकरणात्मक वाक्यरचना ह्या हिंदीपेक्षा कितीतरी भिन्न असूनसुद्धा आज जी मराठी बोलली जाते ती निव्वळ हिंदी वाक्यात मराठी शब्द कोंबून तयार केलेले मराठी वाक्य वाटते.उदा. तूम आराम करो. हेच आजकाल मराठीत तुम्ही आराम करा (not do rest-take rest).हेच काही काळापूर्वी तुम्ही विश्रांती घ्या (घेणे to take, not to do).असे होते. अजून एक प्रकार.आप बहोत मेहनत करते हो. (सध्या) तुम्ही खूप मेहनत करतात. (पूर्वी) तुम्ही खूप परिश्रम/कष्ट घेतात.असे होते..अशी असंख्य उदाहरणे मी देऊ शकतो ज्यात असे सिद्ध होते कि काळानुरूप मराठी भाषकांनी स्वत:ला हिंदी भाषेनुसार बदलून घेतले आहे.प्रसारमाध्यमांतून (सर्वच स्तरावर,रेडिओ,दूरचित्रवाणी,संभाषण,जाहिराती,शिक्षण,पत्रव्यवहार इ.) होणारी भाषेची झीज आणि जनमाणसांत असणारी अनास्था ह्या कारणांमुळे जगातील कोणतीही भाषा लयास जाते किंवा स्वतंत्र आस्तित्त्व गमावून इतर भाषेत विलीन होते असे भाषाशास्त्र सांगते (Read=Erosion Of Language/Extinct Langugae).त्याउलट तुम्हाला अधिक माहिती म्हणून सांगतो कि तमिळनाडुत तंजावूरमध्ये राहणार्या मराठी लोकांची आजही शब्दसंपत्ती १६ व्या शतकातील आहे,तीथे लिपीसाधर्म्यनसल्याने स्थानिक भाषेचा परिणाम तितकासा झाला नाही,(कदाचित आजच्या पिढीत हळू हळू झालेला जाणवेलही कारण जागतीकिकरणाच्या प्रवाहात भाषेविषयीची जागरूकता अभावानेच आढळते.) जितका महाराष्ट्रातील बोलीवर होतो,म्हणजे आजही तिथे कवाड, ताटी (ज्याला आपण दार,किंवा दरवाजा असे शब्द वापरतो) ,मूल झाले कि बाळ,बाल,बालक असे न संबोधता लेकरू असे संबोधतात,आजही त्यांच्यात किंमत,किमत,असे शब्दप्रयोग न होता मोल हा शब्दप्रयोग आस्तित्वात आहे,सुरुवात,शुरुआत च्या ऐवजी आरंभ हाच शब्द प्रचलीत आहे.त्यांच्या मते महाराष्ट्रातील मराठी खरी नसून त्यांची भाषा खरी आहे असे सांगण्यात येते. ह्या माहितीच्या अनुषंगाने मी वरील मुद्द्यांवर अधिक चर्चा करतांना स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करेन.
- ह्या चर्चेबाहेरचे परंतु एक वेगळीच माहिती आपल्यासाठी = अर्थात हिचा योग्य तो संदर्भ पुढे देण्यात येईलच.सर्वांनी अवश्य वाचावी अशी.
भारतेंदू हरिश्चंद्र (आधुनिक हिंदी साहित्याचे जनक)(साहित्य हरिश्चंद्र ),1885 ह्या विद्वान साहित्यीकाने आपल्या मातृभाषेविषयी काय म्हटले आहे ते अवश्य वाचावे.अधिक माहितीकरिता इंग्रजी विकिपीडीयावर भारतेंदू हरिश्चंद्र ह्या लेखाचा शोध घ्यावा.
The following two rhyming couplets are taken from his famous poem, मातृ-भाषा के प्रति (For the Sake of Mother-Tongue or Towards Mother-Tongue). The poem has ten couplets in total. The poet asserts the importance of using mother tongue as a medium of instruction – conversational and educational.
निज भाषा उन्नति अहै, सब उन्नति को मूल ।
बिन निज भाषा-ज्ञान के, मिटत न हिय को सूल ।।
विविध कला शिक्षा अमित, ज्ञान अनेक प्रकार।
सब देसन से लै करहू, भाषा माहि प्रचार ।।
Translation:
Progress is made in one's own language (the mother tongue), as it the foundation of all progress.
Without the knowledge of the mother tongue, there is no cure for the pain of heart.
Many arts and education infinite, knowledge of various kinds.
Should be taken from all countries, but propagated in own mother tongue.
इतर मराठी संकेतस्थळांवर झालेल्या चर्चांचा गोषवारा
संपादनइतर माध्यमांत झालेल्या चर्चांचा गोषवारा
संपादनमराठी विकिपीडियास स्वीकारार्ह असा संकेत कौल
संपादन- लेखन मराठी विकिपीडियाच्या परिघात आणि लेख/लेखन कसे असू नये बद्दलच्या संकेतांस अनुसरून असावे.
- लेखन विश्वकोश संकल्पनेची विश्वासार्हता जपणारे , संक्षिप्त(मोजके) साक्षेपी(संदर्भ असलेली काही विरूद्ध मते असल्यास, त्यांच्यासह) शक्य तिथे संदर्भ असलेली वस्तुनिष्ठ(Facts) आणि तटस्थपणे (impartial) दिलेली माहिती असावी.
- शब्दांचा(स्वतः जोडलेल्या विशेषणांचा) फुलोरा, स्वतःच दिलेला व्यक्तिगत दुजोरा, इत्यादी ललित लेखनाच्या किंवा ब्लॉग या स्वरूपातील लेखन टाळणे अपेक्षित.
- वाचकाचे मत प्रभावित करण्याकरिता तुमच्या स्वतःचे मत त्यात मिसळू नका.
- असे करा ,असे असावे ,सल्ले, असे होईल वगैरे भविष्यार्थता टाळावी.
- शुद्धलेखन मराठी साहित्य महामंडळ पुरस्कृत शासनमान्य शुद्धलेखनाचे नियमास अनुसरून असावे.
- लिखाण तृतीय पुरूषी अकाल्पनिक व वस्तुनिष्ठ असावे.
- लेखन अलंकारिक नसावे आणि विशेषणे, व्यक्तिगत तर्क/मते, कथाकथने, वर्णने, वार्तांकने वा स्तुती-प्रौढी विरहित असावे.
- प्रथमपुरूषी मी-आम्ही-आपले-आपण, द्वितीय पुरूषी तू-तुम्ही-आपण-तुमचे इत्यादी सर्वनामे आणि त्या अनुषंगाने निर्माण होणारी वाक्यरचना लेखांच्या पानातून असू नयेत.(सदस्य चर्चा पानावर इतर संकेतांच्या अधीन राहून प्रथमपुरूषी आणि द्वितीयपुरूषी रचना करण्यास हरकत नाही.
परभाषीय शब्दांचे लेखन आणि भाषांतर-भाषाशैली संकेत कौल
संपादन- परभाषीय शब्दांना मराठी शब्द प्रयोग योजताना परिभाषेच्या निर्मितीसाठी निर्देशक तत्त्वे प्राधान्याने विचारात घ्यावी.
- कधीकधी दुसर्या भाषेतून म्हणजेच इंग्रजीतूनही तांत्रिक शब्द उसने घेण्यात येतात. दुसर्या भाषेतील शब्द त्यातील कल्पनेसह आपल्या भाषेशी जुळते करून घेण्यात येतात. म्हणजेच इंग्रजी शब्दांना मराठीची प्रत्यय प्रक्रिया लावून नवीन मराठी रूपे बनविली जातात. उदा० mercurization मर्क्यूरन pastrurization पाश्चरण, decarbonization विकार्बनन, voltage व्होल्टता, electroni इलेक्ट्रॉनी, इत्यादी. असे करायला हरकत नाही.
- पारिभाषिक शब्दांच्या बाबतीत शक्यतो एक शब्द – एक अर्थ असेच व्हावयास हवे. तसेच पारिभाषिक शब्दांमध्ये स्पष्टार्थता हा गुण हवा. त्यात एकरूपता हवी. पारिभाषिक शब्द अल्पाक्षरयुक्त असावेत, म्हणजेच अशा शब्दांच्या निर्मितीमध्ये कमीत कमी अक्षरांचा वापर असावा. (उदा० crystallisation ‘स्फटिकीकरण’ ऐवजी ‘स्फटन’, magnetization ‘चुंबकीकरण’ ऐवजी ‘चुंबकन’ polarization ‘ध्रुवीकरण’ ऐवजी ‘ध्रुवण’)
- प्रत्येक इंग्रजी शब्दातील गर्भितार्थ, त्याची छटा, त्याचे अनेकविध संभाव्य वापर ह्यांसारख्या अनेक बाबी लक्षात घेऊन परिभाषा निर्मितीचे काम प्रयत्नपूर्वक करावे
परभाषी शब्दांचे लेखन/भाषांतर विवाद मुख्य गट कौल
संपादन- भाषाशुद्धी तसेच संस्कृतोद्भव शब्दांवर अवलंबून असलेच पाहिजे , आदेशात्मक व्याकरण आणि आदेशात्मक शुद्धलेखन प्रणालींचा स्वीकार झालाच पाहिजे असे आग्रहाने प्रतिपादन करणारा गट.
- मराठी शब्द जमेल तेथे बनवा आणि वापरा पण संस्कृत हिंदी इंग्रजी अशी कोणताही वरचष्मा नको.
- अजिबात भाषाशुद्धी नको इंग्रजी किंवा जे काही शब्द उपयोगिले जातात त्यांचा तसाच्या तसा स्वीकार करा.