* मराठी विकिपीडियावर स्वागत असो !* |
सुस्वागतम:थोडक्यात माझ्याविषयी
• मी एक मराठी विकिपीडियावरील संपादक सदस्य आहे, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि विद्येचे माहेर असणार्या पुण्यात मी राहतो. वाचन आणि लिखाण हे माझे आवडते छंद आहेत, तसेच माझ्याकडे जी काही जुजबी किंवा सखोल माहिती असते ती मी समर्थ रामदासस्वामींच्या "आपणासी जे जे ठावें, ते दुसर्यांसी सांगावे, शहाणे करूनी सोडावे, सकलजन." ह्या उक्तीप्रमाणे, इतरांना सांगत असतो. माझ्या ह्याच वृत्तीमुळे मी मराठी विकिपीडिया कडे वळलो आणि मला जे काही ठाऊक आहे ते लिखाण स्वरूपात मांडू लागलो. मराठी विकिपीडिया हे मराठी लेखनाची (अर्थात टंकलेखन)आवड असणार्या रसिकांसाठी खरोखरच एक उत्तम व्यासपीठ आहे. इथे कुणीही मुक्तपणे नवीन लेखांद्वारे विविध विषयांची भर घालू शकतो आणि त्याद्वारे मराठी भाषेतील ज्ञानकोश वृद्धींगत करण्यास मदत करू शकतो. मी ह्यास भाषेची एक प्रकारे सेवाच मानतो. इतर भाषांतील लेख आणि माहिती मराठीत आणणे हा माझा सध्याचा उद्योग किंवा कार्य म्हणा, हे म्हणजे माहितीच्या महाजालातील एका खारूताईच्या (Squirrel) कार्यासमान आहे असे मी मानतो. सध्या मराठी विकिपीडियाला अशा अनेक खारीचा वाटा उचलणार्यांची गरज आहे,तेव्हा जर आपणांस लिखाण आणि वाचनाची आवड असेल तर आपले अनमोल सहकार्य आपण नवीन लेखांची निर्मिती तसेच जुन्या लेखांत अधिक माहिती भरून करु शकता. त्यासाठी आपण खाली नमूद कोणत्याही दुव्याद्वारे अधिक माहिती मिळवू शकतात. विकिपीडियावरील सदस्य आणि प्रबंधक आपणास हवे ते सहकार्य करतीलच ह्याची खात्री बाळगा. तर मग चला आजच, आत्ताच आपल्या लिखाणास आरंभ करा.
"कसे करायचे" माहित नाही? सांगतो, |
•विकिपीडिया वर नवीन लेख निर्माण करण्यासाठी खालील चौकटीचा (बॉक्स) वापर करा. •माझ्यासोबत चर्चा करा किंवा मला संदेश पाठविण्यासाठी वरती चर्चा ह्या सदरात + वर टिचकी (क्लिक) मारा |
विकिपीडिया: माझे योगदान
• माझ्या योगदानाचे आवडते विषय.(Contribution)
|
विकिपीडिया: महत्वाचे दुवे
• विकिपीडिया संबंधित दुवे (Wikipedia Links)
• ह्या दुव्यां (Links) व्यतिरिक्त विकिपीडियाविषयी इतर सर्व माहिती मुखपृष्ठावर दिलेल्या दुव्यांवर उपलब्ध आहे. |
. |
मराठी विकिपीडियावर बौद्ध धर्म विषयक लेखन केल्याबद्दल हे विकिनिशाण सदस्य:Prasannakumar यांना प्रदान करण्यात येत आहे. |