विकिपीडिया:अशुद्धलेखन
- मुख्य प्रकल्प पान
- सदस्य
- सूचना फलक
- प्रकल्प चर्चा
- वगळण्याकरिता नामांकन झालेले लेख
- नित्योपयोगी
- प्रकल्प वृत्त
- प्रश्नमंजुषा
- नवी आवृत्ती
- विकिमिडिया इंडिया
- याहूग्रूप मेलिंग लिस्ट mr-wiki
अशुद्धलेखना बद्दल काय करावे? अशुद्ध लेखन कसे टाळावे?
मला मराठी विकिपीडियात अशुद्ध लेखन आढळते काय करावे?
संपादनमराठी विकिपीडियात अशुद्धलेखन का आढळते?(किंवा अशुद्धलेखन मीच का दुरूस्त करावे?) या प्रश्नाचे उत्तर 'नेहमी विचारले जाणारे प्रश्न' या सदरात बघावे.
एखाद्या विशिष्ट अशुद्धते बद्दल त्या पानात नोंद {{अपूर्ण वाक्य}}|| किंवा {{शुलेचि}} साचा लावून करता येते.
जर आपण लेखनात दुरूस्ती करून शुद्ध करून देणारे उत्साही मराठी बांधव असाल तर विकिपीडिया:शुद्धलेखन प्रकल्पात आपला सहभाग अवश्य नोंदवा.
खालीलपैकी कोणत्याही प्रकारे होणाऱ्या मदतीचे स्वागतच आहे. शीर्षकलेखनात अशुद्धता तपासण्याच्या दृष्टीने शीर्षक लेखन संकेतांचा आणि नामविश्वांचाअभ्यास करावा व शीर्षकातील अशुद्धता वगळण्याची विनंती प्रबंधकांना करावी. शीर्षक लेखन संकेतांबद्दलचे विचार सहमती आणि मतभेद [[चर्चा:विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत]] या चर्चापानावर नोंदवावेत.विकिपीडियातील शुद्धलेखन तपासताना कोणती काळजी घ्यावी?ते आधी अवश्य वाचून घ्यावे.
- प्राथमिकता पुढच्या महिन्याच्या नामांकित मुखपृष्ठ असलेल्या लेखाच्या शुद्धीकरणास द्यावी.
- विकिपीडियातील अधिक लांबीच्या पानातील अशुद्धलेखन स्केड्यूलिंग करून विभागवार तपासावे.
- आपण अलीकडे बदललेली पाने पाहून किंवा अविशिष्ट पाने पाहून शुद्धलेखन दुरुस्त्या करू शकता.
- आपण अशुद्ध लेखन लिहिणाऱ्या ठराविक व्यक्तींच्या योगदानावर लक्ष ठेवून त्यांचे लिखाण शुद्ध करू शकता.
- आपण स्वतःच्याच किंवा ज्यांच्या हातून अशुद्ध लेखन घडते अशा व्यक्तीच्यां चर्चापानावर त्यांच्या सहमतीने आजची '{{विकिपीडिया:शुद्धलेखनाचे नियम/आमाआका}} शुद्धलेखन टीप' अशा स्वरूपाचे सदर चालवू शकता.
- मुख्य विकिसॉफ्टवेअरमधील मराठी शुद्ध रहावे म्हणून मीडिया विकि फाइल्स व टेम्प्लेट्सच्या चर्चापानावर अशुद्ध लेखनाबद्दल नोंद लिहू शकता. साचे आणि विकिमीडिया फाइल्समधील दुरूस्त्या शक्यतो पुरेसा विकिसंपादन अनुभव येईपर्यंत टाळाव्यात.
- विक्शनरी सहप्रकल्पात शब्दाचे शक्य त्या सर्व रूपांमध्ये शुद्धलेखन कसे व्हावे याची सविस्तर उदाहरणे देऊ शकता.
- आपल्याला स्वतःला काही कारणाने अशुद्धलेखन दूर करणे शक्य नसल्यास संबधित पानाच्या चर्चापानावर नोंद करावी किंवा सर्व संपादकांचे लक्ष वेधण्याकरिता या पानावरील 'हे अशुद्ध लेखन दुरुस्त करावे' अशी विनंती, अशुद्धलेखन आढळलेल्या लेखाचे व त्यातील विभागाचे नाव, संबधित अशुद्ध अक्षरांना ठळक करून करावी व शक्य झाल्यास शुद्ध लेखनाचे उदाहरण द्यावे.
- शुद्ध स्वरूपाबाबत निश्चित माहिती नसल्यास किंवा व्याकरणदृष्ट्या मुद्दा विवाद्य असल्यास इतर तज्ञांशी चर्चा करण्याच्या दृष्टीने शुद्ध स्वरूपाबाबत इतर तज्ञांशी चर्चाविभागात नोंद करावी.
- सांगकाम्यांनी केलेली शुद्धीकरणाची कामांचे काही नमूने अधूनमधून तपासावीत.
- आपल्याकडे शुद्धिचिकित्सेचे तंत्रज्ञान व तांत्रिक कौशल्य असल्यास त्याचा उपयोग करावा .
- आपल्याकडे तांत्रिक कौशल्य तसेच पुरेसा विकिशुद्धीकरणाचा अनुभव असल्यास स्वतःचा सांगकाम्या बनवण्याचा प्रयत्न करावा.
साचे
संपादनअशुद्धलेखन सुधारण्यासाठी उपयुक्त ठरू शकणारे सर्वसाधारण साचे :
साचा | असे दिसेल | ||
{{अशुद्धलेखन}} | येथे पाहा | ||
{{मीसशुलेचि}} | |||
{{टीपमीसशुलेचि}} |
| ||
{{सअले|{{मीसशुलेचि}}|प्रमाण मराठी|'''मराठी'''}}
|
लेखनावर लक्ष ठेवा
संपादनएखाद्या लेखातील एकंदरीत लिखाणात अशुद्धता आढळयास {{<nowiki>[[साचा:अशुद्धलेखन|अशुद्धलेखन]]}}</nowiki> या साच्यास त्याच्या महिरपी कंसासह संबंधित लेखाच्या पानावर जतन करून अन्य सदस्यांकडून भावी सहकार्यासाठी लक्ष वेधून घेऊ शकता. इतर सदस्यांची संपादने तपासताना आपणास कुणा सदस्याचे लेखनात अशुद्धता आढळल्यास {{शुद्धलेखन}} या साच्यास त्याच्या महिरपी कंसासहीत संबधीत सदस्याच्या चर्चा पानावर जतन करून भावी सहकार्याची विनंती करू शकता, विनंती करताना कृपया हे लक्षात घ्या की विकिपीडिया प्रत्येक व्यक्तीस संपादनास मुक्त आहे,त्या मुळे फक्त अशुद्धलेखनाच्या कारणावरून लेखन न करण्याची सूचना करणे अथवा लेखनास प्रतिबंध करणे विकिसंहीतेस धरून नाही हेही लक्षात घ्यावे.
माझे लेखन अशुद्ध असेल तर मी काय करावे ?
संपादन- खालील पैकी सुयोग्य साचा आपल्या सदस्य पानावर लावावा म्हणजे शुद्धलेखन तज्ञ सदस्यांना आपल्या लेखनावर लेक्ष ठेवणे सोपे जाईल
साचा | असे दिसेल | ||
{{सशुलेचि}} | |||
{{टीपसशुलेचि}} |
| ||
{{सअले|{{सशुलेचि}}|मराठी|'''मराठी'''}} असे दिसेल
|
आपले स्वतःचे लेखन अशुद्ध वर्गात मोडण्याची शक्यता वाटत असेल तर 'माझ्या लेखनावर लक्ष ठेवा' विभागात आपल्या योगदानपानाचा दुवा खालील उदाहरणात दिल्याप्रमाणे द्या. असे केल्याने इतर मराठी भाषाविदांना आपले लेखन सुधारण्यात मदत करता येईल.
- उदाहरण:
**[[विशेष:योगदान/विजय|विजय]]
वारंवार होणार्या अशुद्ध लेखनाच्या चुका टाळण्यासाठी मराठी शुद्धलेखन व मराठी व्याकरण या लेखांचा आधार घ्यावा.
माझ्या लेखनावर लक्ष ठेवा
संपादन- या यादीतील सदस्यांच्या लेखनात शुद्धलेखनाच्या चुका विशेषत्वाने आढळतात. या चुका
सांगकामे (Bots)
संपादनसांगकाम्या हा काय असतो ते सांगकाम्या लेख वाचून समजावून घ्या. सांगकाम्यांनी केलेल्या दुरुस्त्या सहसा बरोबरच असतात. परंतु खात्री करून घेण्याच्या दृष्टीने खाली दिलेल्या यादीतील सांगकाम्यांनी केलेले लेखन हे तुम्हाला त्यांच्या योगदानपानांवर सँपल स्वरूपात तपासून पडताळणी करून घेण्यास हरकत नाही
हे अशुद्ध लेखन दुरुस्त करा
संपादनमिडियाविकि सॉफ्टवेअर भाषांतरण
संपादनप्रिय विकिपीडियन मीत्रहो,
आपणास बहूधा कल्पना असेल विकिपीडिया तसेच तिचे सहप्रकल्प विक्शनरी,विकिबुक्स,विकिक्वोट इत्यादी मिडियाविकि सॉफ्टवेअर वापरून चालतात,त्याच प्रमाणे मिडियाविकि मुक्त सॉफ्टवेअर वापरून कुणीही व्यक्तिगत पातळीवरसुद्धा स्वत:चे अथवा एखाद्या संस्थेकरता संकेतस्थळ बनवू शकते.
असे मिडियाविकिवर अवलंबून संकेतस्थळ संकेतस्थळ निर्माते, संपादक तसेच सदस्यांना वाचकांना संपूर्ण मराठी सॉफ्टवेअर सूचनांसहीत उपलब्ध व्हावे असा Translating:Language_project चा प्रयत्न चालू आहे. यात सध्या श्री कौस्तूभ आणि मी माहीतगार योगदान करत आहोत .यातील योगदान सार्वत्रीक प्रभावकारी ठरणारे असल्यामुळे आम्ही करत असलेली भाषांतरणे अधिकाधीक चपखल मराठी शब्दांनी संपन्न होण्या करिता तसेच अशुद्धलेखन विरहीत होण्याकरिता आपल्या सक्रीय सहयोगाची प्राथमीकतेने आवश्यकता आहे.योगदान करण्याकरिता कृपया येथे सदस्य पान तयार करा.येथे संपादनास आणि भाषांतरणास परवानगी घ्या आणि मराठी भाषा वापरून येथे संपादने करा आणि तपासा खासकरून मराठी विकिपीडियाच्या प्रबंधकांनी त्यांच्या पाशी मिडियाविकि नामविश्वात बदल करण्याचा अनुभव असल्यामुळे यात वेळात वेळ काढून हे कार्य पूर्णत्वास नेण्यात मदत करावी ही नम्र विनंती
आपला नम्र Mahitgar १७:१४, १ फेब्रुवारी २००८ (UTC)
फायरफॉक्समध्ये शुद्धलेखन चिकित्सा
संपादनफायरफॉक्समध्ये शुद्धलेखन कसे तपासायचे ते पाहूया. फायरफॉक्स वापरत असाल तर खालील पानावर जाऊन मराठी डिक्शनरीचे एड-ओन जोडून घ्या. इंटरनेट एक्स्पोअर वापरणाऱ्यांसाठी अशी सुविधा आहे की नाही ते मला माहीत नाही. https://addons.mozilla.org/en-US/firefox/addon/12797/
फायरफॉक्स पुन्हा सुरू करा. आता चुकीचे मराठी शब्द लाल रंगात दिसू लागतील. त्या शब्दांवर राईट क्लिक करून योग्य शब्द निवडता येईल. उजवी क्लिक करून "चेक स्पेलिंग" च्या पुढ्यात बरोबरची खूण दिसते आहे याची खात्री करून घ्या. तसेच लॅग्वेजेस या पर्यायात आता मराठी दिसू लागले पाहिजे आणि त्या पर्यायावर क्लिक केली की त्याच्यापुढे बरोबरची खूण येईल.
एखादा शब्द बरोबर असून लाल रंगात अधोरेखित होत असेल तर तो शब्द आपण आपल्या व्यक्तिगत संग्रहात "ऍड टू डिक्शनरी" हा पर्याय वापरून जमा करून ठेवू शकता. डिक्शनरीने चुकीचा शब्द सुचविला तर त्याचा अर्थ मूळ स्रोत सुधारायला हवा.या दुव्यावर कोणता शब्द डिक्शनरीत नको ते नोंदवा म्हणजे पुढील आवृत्तीत सुधारणा करता येईल.सध्याच्या आवृत्तीत सुधारणेस बराच वाव आहे याची नोंद घ्यावी. (वरील मजकुराची शुद्धलेखन चिकित्सा फायरफॉक्स मधील हेच एक्श्टिंशन वापरून केलेली आहे.)[१]
नेहमी होणाऱ्या चुका
संपादनविकिपीडिया:मराठीतील सदोष अक्षरलेखन या लेखात मराठी लिहिताना व टंकताना सहसा होणाऱ्या चुकांचे विवरण आणि मीमांसा दिलेली आहे.