आपल्याला माहित आहे का की

लेखनात पात्राच्या किंवा वक्त्याच्या तोंडी बोलण्याची भाषा घालावी लागते.त्या वेळी तिचे स्वरूप बोलण्यातील उच्चाराप्रमाणे अनुस्वारयुक्त असावे.
  • उदाहरणार्थ: 'असं केलं , मी म्हटलं;त्यांनी सांगितलं
अन्य प्रसंगी ही रूपे ए-कारान्त लिहावीत.
हे सदर खालीलपैकी कुठलीही एक माहिती दर्शविते:


विकिपीडिया:शुद्धलेखनाचे नियम/आमाआका/1

कवीला र्‍हस्व-दीर्घाच्या बाबतीत पद्यात वृत्ताचे बंधन पाळताना शुद्धलेखनाचे नियम काटेकोरपणे पाळणे शक्य नसल्यास तेवढ्यापुरती मोकळीक असते.

विकिपीडिया:शुद्धलेखनाचे नियम/आमाआका/2

'इत्यादी' व 'ही' हे शब्द दीर्घांन्त लिहावेत . 'अन्' हा शब्द व्यंजनान्त लिहावा.पहा शुद्धलेखनाचे नियम .

विकिपीडिया:शुद्धलेखनाचे नियम/आमाआका/3

* 'राहणे', 'पाहणे', 'वाहणे' अशी रूपे वापरावीत 'रहाणे, राहाणे, पहाणे, वहाणे, वाहाणे, अशी रूपे वापरू नयेत.

विकिपीडिया:शुद्धलेखनाचे नियम/आमाआका/4

**इंग्रजी शब्द ,पदव्या किंवा त्यांचे संक्षेप यांच्या शेवटचे अक्षर आता व्यंजनान्त म्हणजे पाय मोडके लिहू नये.

विकिपीडिया:शुद्धलेखनाचे नियम/आमाआका/5

*कोणत्याही अन्य भाषेतील शब्द लिहिण्याची गरज पडेल तेव्हा त्या भाषेतल्या उच्चाराप्रमाणे लेखन करावे.
  • उदाहरणार्थ : 'डिक्शनरी,ब्रिटिश,हाऊस. .

विकिपीडिया:शुद्धलेखनाचे नियम/आमाआका/6

*'क्वचित्, कदाचित्,अर्थात्,अकस्मात्,विद्वान्,' यांसारखे मराठीत रूढ झालेले तत्सम शब्द अ-कारान्त लिहावेत.

विकिपीडिया:शुद्धलेखनाचे नियम/आमाआका/7

लेखनात पात्राच्या किंवा वक्त्याच्या तोंडी बोलण्याची भाषा घालावी लागते.त्या वेळी तिचे स्वरूप बोलण्यातील उच्चाराप्रमाणे अनुस्वारयुक्त असावे.
  • उदाहरणार्थ: 'असं केलं , मी म्हटलं;त्यांनी सांगितलं
अन्य प्रसंगी ही रूपे ए-कारान्त लिहावीत.

विकिपीडिया:शुद्धलेखनाचे नियम/आमाआका/8

एकारान्त नामाचे सामान्यरूप या-कारान्त करावे.ए-कारान्त करू नये.