वृत्त

वृत्त हे कविता रचनेचे प्रमाण आहे

वृत्त हे कवितारचनेचे एक प्रमाण आहे. वृत्तास छंद असेही म्हणतात. वृत्तांचे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत.

घोष होता ग्यानबा तुकाराम
राऊळीची ही वाट सखाराम
देत होते मला आशिर्वाद
मी नमस्कार केला

गण संपादन

पद्यातील ओळीमधील अक्षरांचे तीन-तीन अक्षरांचा एक असे गट पाडले जातात. शेवटी एक किंवा दोन २ अक्षरे शिल्लक उरू शकतात..एका गटातल्या तीन अक्षरांपैकी प्रत्येक अक्षर हे लघु किंवा गुरू असू शकते. लघु अक्षराच्या उच्चाराला गुरू अक्षराच्या उच्चारापेक्षा निम्मा वेळ लागतो.

अक्षरांतले अकार, इकार, उकार, ऋकार, अंकार, अःकार हे लघु; आणि आ-कार, ईकार, ऊकार, ॠकार, ए-ऐ-ओ-औ-कार हे गुरू समजले जातात.

अनुस्वारयुक्त अक्षर आणि विसर्गयुक्त अक्षर गुरू समजले जाते.

जोडाक्षर लघु(=ल) पण जोडाक्षराच्या आधीचे अक्षर त्यावर उच्चार करताना आघात येत असेल तर गुरू(=ग) समजले जाते. क्ष, ज्ञ ही जोडाक्षरे असल्याने त्यांच्या आधीचे अक्षर गुरू.

ओळीतले शेवटचे अक्षर नेहमीच गुरू(=ग) समजतात.

या तीन अक्षरी शब्दातील फक्त पहिले लघु(उदा० यमाचा), फक्त दुसरे लघु(उदा० राधिका), फक्त तिसरे लघु(उदा० ताराप) किंवा तीनही लघु(उदा० नमन) असे चार प्रकार संभवतात. त्यानुसार त्या तीन अक्षरी शब्दाचे य, र, त, न यांपैकी एक गण ठरतो.

किंवा या तीन अक्षरांमधले फक्त पहिले गुरू(उदा० भास्कर), फक्त दुसरे गुरू(उदा० जनास), फक्त तिसरे गुरू(उदा० समरा) किंवा तीनही गुरू(उदा० मानावा) असे चार प्रकार संभवतात. त्यानुसार त्या शब्दाचे भ, ज, स, म यांपैकी एक गण ठरतो.

हे सर्व लक्षात ठेवण्यासाठी अनेक क्‍ऌप्‍त्या आहेत. त्या अश्या :-

१. पहिली पद्धत: श्लोक -
य-यमाचा, न-नमन । त-ताराप, र-राधिका । म-मानावा, स-समरा । ज-जनास, भ-भास्कर ॥

२.दुसरी पद्धत: हे गणांचे प्रकार यमाचा, राधिका, ताराप, नमन, भास्कर, जनास, समरा, मानावा या क्रमानेही लिहिले जातात. क्रम लक्षात ठेवण्यासाठी यरतनभजसम हा शब्द योजतात.

३. तिसरी पद्धत - यमाता, मातारा, ताराज, राजभा, जभान, भानस, नसल, सलगा किंवा यमाताराजभानसलगा.

४. चौथी पद्धत - पद्यात प्रत्येक अक्षर हे लघु (०) किंवा गुरू (१) असते. तीन अक्षरांचा एक गण होतो. पुनरावृत्ती होऊ शकते. त्यामुळे गणांचे २ = ८ प्रकार होतात. ते प्रकार म्हणजे, न स ज य भ र त म.

००० नमन
००१ समरा
०१० जनास
०११ यमाचा
१०० भास्कर
१०१ राधिका
११० ताराप
१११ मारावा

अर्थात मात्रावृत्तांत लघुसाठी १ आणि गुरूसाठी २ मात्रा मोजल्या जातात. गण-पद्धतीचा उपयोग अक्षरगणवृत्ते बांधण्यासाठी होतो.
उदा०
रामदासांनी भरपूर वापरलेले भुजंगप्रयात वृत्त -

'य'या चार येती भुजंगप्रयाती.
यमाचा यमाचा यमाचा यमाचा
० १ १. ० १ १. ० १ १. ० १ १.
सदा सर्वदा भक्तिपंथेचि जावे.
० १ १.०१ १.० ११.० १ १.

यती संपादन

पद्य चालीत म्हणताना जे अक्षर उच्चारल्यानंतर किंचित थांबावे लागते त्या थांबण्याला यती म्हणतात. उदा० भुजंगप्रयात वृत्तातली ही ओळ :

क्रमानेच येती (यती) य चारी जयात ।
या ओळीत सहाव्या अक्षरानंतर थांबावे लागते, म्हणजे तेथे यती आहे.

यतिभंग संपादन

कधी कधी नको असताना केवळ यती आल्याने शब्द दुभंगतो. अशा वेळी यतिभंग झाला असे म्हणतात.
उदा० -
पुढे माझा नारा (यती) यण तरुण तो (यती) पुत्र तिसरा ।
शिखरिणी वृत्तातल्या या ओळीत नारायण हा शब्द मध्येच तोडला गेला आहे.
चांगल्या काव्यात यतिभंग कमीत कमी असतात.

हे सुद्धा पाहा संपादन

  1. अक्षरगणवृत्त
  2. आर्या
  3. भुजंगप्रयात

बाह्य दुवे संपादन

http://www.manogat.com/node/383 Archived 2005-05-23 at the Wayback Machine.