विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन

सुयोग्य चित्र वापरा प्रकल्प
सर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)

हे पान मराठी विकिपीडियावर एखाद्या लेखाचे मुखपृष्ठ सदर लेख म्हणून नामनिर्देशन करण्यासाठी वापरण्यात यावे.

  • मे २००८ चे मुखपृष्ठ सदर पासूनचे कौल इथे हलविले आहेत. तत्पूर्वीचे कौल विकिपीडिया : कौल या मुख्य कौल पानावर घेण्यात आले होते.
Cscr-candidate.svg

लेखरांग

पुढील काही महिन्यात मुखपृष्ठ सदर होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या लेखांची यादी पहा.

सध्याची नामनिर्देशने

कुर्ला

  पाठिंबा- as nominator. - Tiven2240

बाबासाहेब अांबेडकर

  पाठिंबा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून हा लेख मुखपृष्ठ सदर होण्याइतपत चांगला झालेला आहे. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक व्यक्तीमत्त्व व त्यांचा जन्मोत्सव हा जागतिक महोत्सव आहे. अनेक विकि सहकार्यांच्या योगदानातून हा लेख सुधारला गेला आहे. हा मुखपृष्ठ सदरासाठी उत्तम लेख आहे. - संदेश हिवाळे
  पाठिंबा- लेख खूप छान व अभ्यासपूर्ण मांडणी केलेली आहे.. - LAXMANSALVE
  पाठिंबा- या महिन्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. सबब हा लेख मुखपृष्ठ सदर म्हणून केला जावा. - प्रसाद साळवे
  विरोध- येथे दिलेल्या सर्व सुधारणांनतरच हा लेख मुखपृष्ठ सदर केला जावा, प्रस्तुत लेखात मोठ्या प्रमाणात संदर्भहिन, जाहिराबाजीकरणारा,अतिशयोक्तीपुर्ण मजकूर आहे, वारंवार सुचना देऊनही तो मजकूर काढला जात नाहीये, मी प्रत्येक ठिकाणी संदर्भासह प्रस्तूत मजकूर खोटा असल्याचे आणि चुकीचा असल्याचे चर्चापानावर दाखवले आहे, युटूब आणि इतर ठिकाणचे व्हीडीयो किंवा बातम्या ऐतिहासिक घटनांना संदर्भ म्हणून वापरले आहेत, शिवाय दिलेले संदर्भ आणि मजकूर याचा संब्ंधही लागत नाहीये, त्यामुळे सुमारे 150 संदर्भ लेखाला असूनही त्यातील अर्ध्याच्यावर संदर्भ आणि मजकूर यांचा संब्ंध लागत नाहीये. मी लेखात प्रत्येक ठिकाणी संदर्भ तपासत आहे आहे शिवाय, जेथे जमेल तेथे नवे संदर्भ जोडत आहे, परंतू जो पर्यंत सर्व संदर्भ आणि अक्षेप यांचे निरसन केले जात नाही तोपर्यंत माझा विरोध राहिल. कॉपीव्हायो नावाच्या अवजाराने तपासणी केल्यावर आलेल्या निकालानूसार ह्या लेखातील मजकूराचा मोठा भाग(जवळपास ९२%) संबंधीत संकेतस्थळांवरून चक्क नकल करून डकवलेला आहे असे लक्षात येते, ही परिस्थीती लक्षात घेता माझा लेखाला सदर म्हणून घेण्यास स्पष्ट नकार आहे.. - sureshkhole
  टिप्पणी - चांगला लेख व मुखपृष्ठ सदर असण्यास समर्थन. लेखाचे विकिकरण करण्याची गरज वाटते आहे.. - Tiven2240
  विरोध- मी येथे माझे मत नोंदविले आहे. या लेखाचे अविश्वकोषीय स्वरूप बदलले तर माझा पाठींबा आहे. उचित संदर्भ नसलेले, विधाने/मते यांनी युक्त असे अनेक परिच्छेद लेखात आहेत. संपादक प्रयत्न करत आहेत. तरी वारंवार अविश्वकोषीय माहिती भरली जात आहे.. - सुबोध कुलकर्णी
  पाठिंबा- मुखपृष्ठ सदर असण्यास समर्थन. - Nitin.kunjir
  विरोध- अविश्वकोशीय स्वरूप बदलावे.विकिकरण करण्याची गरज वाटते आहे.. - आर्या जोशी
  पाठिंबा- हा लेख मुखपृष्ठ सदर असण्यास समर्थन. - विनायक कटक
  विरोध- नकल-डकव केलेला (लेखाचे चर्चापान पहा) मजकूर बदलला जाई पर्यंत किंवा वगळला जाईपर्यंत नकार. - अभय नातू

गुढीपाडवा

  पाठिंबा- महाराष्ट संंस्कृृतीचा महत्वाचा सण.या लेखातील आशय चांंगला असून विविध संंपादकांंचे योगदान या लेखाला मिळाले आहे.औचित्य साधून लेख विशेष लेख म्हणूनही ठेवता यावा.लोक आवर्जून अशावेळी लेख वाचत असतात.. - आर्या जोशी
  पाठिंबा- मराठी विकिपीडियाने अद्ययावत असायला हवे असेल तर वेळोवेळी प्रासंगिक संदर्भ असणारे लेख मुखपृष्ठावर प्रसिद्ध केले पाहिजेत.. - सुबोध पाठक
  पाठिंबा- या लेखात योग्य असे भारतीय व जागतिक संदर्भ दिलेले आहेत. लेखाची रचनाही चांगली आहे. हा लेख पुष्कळ लोक काही दिवसात वाचतील.ही माहिती समाजापर्यंत पोचली पाहिजे. या निमित्ताने आणखी संदर्भ व फोटोंची भर घालता येईल.. - सुबोध कुलकर्णी
  पाठिंबा- चांगला लेख आहे.. - ज्ञानदा गद्रे-फडके
  पाठिंबा- लेख नेमकी आणि सविस्तर माहिती देणारा आहे.. - सुवर्णा गोखले
  पाठिंबा- चांगला लेख. - Tiven2240

बौद्ध धर्म

  पाठिंबा- उत्तम लेख. नामनिर्देशक म्हणून समर्थन. - Tiven2240
  पाठिंबा - संदेश हिवाळे
  विरोध- लेख चांंगला आहे.तथापि बौद्ध साहित्याबद्दल उत्तमोत्तम पुस्तके उपलब्ध असताना केवळ संंकेतस्थळांंवरून घेतलेली माहिती संंदर्भासाठी पुरेशी वाटत नाही. संंबंंधित संंपादकांंनी असे संंदर्भ शोधून तशी भर घालावी म्हणजे परिपूर्णता येईल, तो अद्ययावत केल्यास बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून मुखष्ठासाठी घेता येईल. - आर्या जोशी
  पाठिंबा- छान माहिती आहे.नामनिर्देशक म्हणून समर्थन. - LAXMANSALVE
  विरोध- लेख चांंगला आहे. परंतू बुद्ध व बौद्ध धर्माविषयी विचारवंताची मते ह्या विभागात अति भरती केलेली दिसते. सदर विभागाची लेखात गरज नाही. इंग्रजी विकिपीडियावर सदर लेखासंदर्भात पुष्कळ माहिती असताना, मराठी लेखातील माहिती खूपच कमी वाटते. तसेच उत्तम लेखासाठी अनेक संदर्भ लेखात असणे गरजेचे आहे. अन्यथा लेख वैयक्तिक मत लिहील्यासारखा वाटण्याची शक्यता. कोणत्याही मुखपृष्ठ लेखासाठी ह्या गोष्टीची पुर्तता होणे गरजेचे आहे.. - Nitin.kunjir

महाराष्ट्र

  पाठिंबा- महराष्ट्र दिनानिमित्त. लेखात संदर्भदुवे टाकण्याची गरज आहे.. - Prabodh1987
  विरोध- संंदर्भांंचा अभाव आहे.ते घालणे आवश्यक आहेत.. - आर्या जोशी

ऑपरेशन चॅस्टाइझ

  पाठिंबा - अभय नातू

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ

  पाठिंबा- महाराष्ट्रतील शेतकऱ्यांसाठी कार्य करणारे महामंडळ, शेवटी मराठी लोकच मराठी विपी वाचतील. - रविकुमार बोडखे

उसाचा गवताळवाढ रोग

माजे समर्तन संकेत ०७:०६, ७ ऑगस्ट २०११ (UTC)

  विरोध- मुखपृष्ठ होण्यासाठी खूपच कमी माहिती. माहिती वाढवून लेख सादर करावा.. - Pushkar Pande
  विरोध- मुखपृष्ठ होण्यासाठी खूपच कमी माहिती.. - Nitin.kunjir

झाशीची राणी लक्ष्मीबाई

  पाठिंबा - अभय नातू
  विरोध- लेख रुक्ष आहे. फोटोंची संख्या वाढवणे गरजेचे आहे.. - Karan Kamath
  पाठिंबा- लेख अतिशय उत्तम असून वाचण्यायोग्य आहे.. - Pushkar Pande
  विरोध- तसा लेख चांगला आहे पण लेखात एकही संदर्भ नाही आणि वर म्हटल्याप्रमाणे फोटोंची संख्या कमी आहे.. - प्रथमेश ताम्हाणे
  विरोध- मुखपृष्ठ होण्यासाठी फारच तोकडी माहिती. - Nitin.kunjir
  पाठिंबा- विकिकरण आवश्यक. नंतर विचार करावा. - V.narsikar

मराठा साम्राज्य

  पाठिंबा - abhijitsathe
  विरोध- लेखात अजून सुधारणा व वाढ झाल्यावर मग मुखपृष्ठ सदर करावे.. - अभय नातू
  पाठिंबा - AbhiSuryawanshi
  पाठिंबा - vinod rakte
  विरोध- लेखात अजून खूप सुधारणा होणे आवश्यक आहे. मुखपृष्ठ होण्यासाठी खूपच तोकडी माहिती. - Nitin.kunjir
  विरोध- सदरात वाढ करावी.. - Pushkar Pande
  विरोध- लेखामध्ये उपलब्ध ऐतिहासीक साधनांच्या आधारे अजून भर घालावी.. - LAXMANSALVE

अमेरिकेची राज्ये

  विरोध- लेखात सध्या प्रामुख्याने सूचीपर माहिती आहे. या लेखात निरनिराळी संस्थाने अमेरिकेच्या संघात टप्प्याटप्प्याने कशी सामील झाली, त्याचाही इतिहास मांडल्यास लेख घसघशीत होईल. खेरीज लेखात सध्या काही तपशील रोमन लिपीत/इंग्रजीत आहेत; व काही आकडेवारी मराठी अंकांत नाही. तूर्तास मराठीकरणासाठी आवश्यक बदल करून हा लेख उदयोन्मुख लेखासाठी नामांकनास ठेवणे अधिक इष्ट ठरेल.. - Sankalpdravid
  विरोध- लेखात सध्या प्रामुख्याने सूचीपर माहिती आहे. राज्यांबद्दल काही विशेष माहिती मिळत नाही. अजून खूप सुधारणा होणे गरजेचे आहे.. - Nitin.kunjir

बाळ गंगाधर टिळक

  पाठिंबा- महितीपूर्ण लेख. - Nitin.kunjir
  पाठिंबा- तुषार भांबरे (चर्चा) १६:११, ६ ऑक्टोबर २०१३ (IST). - महितीपूर्ण लेख,अजून अधिक लोकांपर्यंत माहिती पोहचणे आवश्यक
  विरोध- साळवे रामप्रसाद (चर्चा) 18:38, 7 ऑक्टोबर 2013 (IST). - चूकीची माहीती,चर्चा पानावरील माहीतीचा समावेश करावा.
  पाठिंबा - Czeror
  विरोध- काही माहिती चुकीची आहे.. - Pushkar Pande
  पाठिंबा - Sagarmarkal

पु.ल.देशपांडे

  पाठिंबा - Pushkar Pande
  विरोध- लेखात लाल खुणा पुष्कळच आहेत,त्यावर अधी काम करायला हवे असे वाटते.लेख चांंगला आहे.. - आर्या जोशी
  पाठिंबा- लेख विस्ताराने लिहिलेला आहे. लाल दुवे विषयवस्तूशी थेट निगडीत नसल्याने तसेच प्रकाशित करण्यास हरकत नाही. कालांतराने ते भरले जातील.. - अभय नातू

रामकृष्ण परमहंस

  पाठिंबा - Pushkar Pande

जयंत साळगांवकर

  पाठिंबा - shreemarkal
  पाठिंबा - jigneshshirke
  पाठिंबा- अतिशय सोप्या भाषेत लेख. - sagarmarkal
  विरोध- मुखपृष्ठ सदरासाठी माहिती कमी वाटत आहे. त्यामुळे प्रथम उदयोन्मुख लेख सादर करावा.. - Pushkar Pande
  पाठिंबा - sulabhapatil
  पाठिंबा - Pratham0613
  विरोध- Pushkar Pande यांच्या मताशी सहमत. - Nitin.kunjir

कोहिमाची लढाई

  पाठिंबा- विस्तृत आणि माहितीपूर्ण लेख.. - अभय नातू
  पाठिंबा- उत्तम व विस्तृत लेख पण लेखात लाल दुवे बरेच आहेत.संदर्भ क्र. १६ व ४४ मधील त्रुटीही हटवावयास हव्यात.. - V.narsikar
  पाठिंबा- उत्तम लेख.. - Nitin.kunjir
  पाठिंबा - Czeror

पौगंडावस्था

  पाठिंबा- उत्तमप्रकारे लिहिलेला व विषयाची हाताळणी असलेला लेख.. - अभय नातू
  पाठिंबा- मुखपृष्ठ होण्यासाठी उत्तम लेख. - Nitin.kunjir
  विरोध- लेखात काही स्रोत इंग्लिश विकिपीडिया वरून घेतले आहे. परंतु विकिपीडिया विश्वसनीय स्रोत नाही. जर याचे इंटरलिंकिंग केले जाणार जर चालते परंतु स्रोत म्हणून असणे आवश्यक वाटत नाही. - Tiven2240

किशोरवय

  पाठिंबा- उत्तमप्रकारे लिहिलेला व विषयाची हाताळणी असलेला लेख.. - अभय नातू

पूर्वीची नामनिर्देशने

करावयाच्या गोष्टींची यादी

 तुम्ही काय करू शकता

हेही पाहा