विकिपीडिया:प्रचालक

प्रचालक (Administrator) अथवा प्रबंधक म्हणजे विकिपीडियावरील असे सदस्य ज्यांना विकिपीडियाच्या तांत्रिक कामांसंबंधी इतर सदस्यांपेक्षा जास्तीचे अधिकार दिलेले असतात. विकिपीडियावर प्रचालक अधिकार अशा सदस्यांना मिळतात, जे काही काळ विकिपीडिया वर संपादन करीत आलेले आहेत, जे विकिपीडियाच्या कामासंबंधी माहितगार आहेत तसेच ज्यांना इतर सदस्यांचा पाठिंबा आहे. असे प्रचालक पाने सुरक्षित अथवा असुरक्षित करू शकतात, तसेच काही सदस्यांना संपादन अधिकार नाकारू शकतात (Block user) तसेच ही सर्व कार्ये रद्द करू शकतात. प्रचालक अधिकार हे कायमस्वरूपी दिले जातात व अतिशय कमी वेळा हे परत घेतले जातात. प्रचालक स्वत:हून ही जास्तीची जबाबदारी सांभाळत असतात व ते विकिमीडिया फाऊंडेशनचे कर्मचारी नसतात.

बऱ्याचदा विकिपीडियावरील प्रचालकीय जबाबदारीची तुलना झाडू घेऊन साफसफाई करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांशी (मिस्किलपणे) केली जाते.

विकिपीडियाच्या सुरवातीच्या दिवसांत, सर्व सदस्यांना प्रचालकाचे अधिकार दिले जात होते आणि आत्तासुद्धा ते तसेच असायला हवे होते. सुरवातीपासूनच असा विचार मांडण्यात आला होता की प्रचालक हे इतर सदस्यांप्रमाणेच असावेत. विकिपीडियाचा सर्वसाधारण निर्वाह हा कुणीही (अगदी नोंदणी न केलेला सदस्यसुद्धा) करू शकतो. फक्त अशा काही क्रिया ज्या चुकीच्या पद्धतीने वापरल्यास खूप त्रासदायक ठरू शकतात अशा क्रियांचे अधिकार हे प्रचालकांना दिले जातात. प्रचालकांना दिली जाणारी कार्ये ही तांत्रिक प्रकारची असल्याने कुठल्याही प्रकारे अधिकार देत नाहीत.

प्रचालक हे विकिपीडियाचे जुने संपादक असल्याने, नवीन सदस्यांना मदत करण्याचे काम त्यांच्यावर येऊन पडते. साधारणपणे प्रचालकांनी कुठल्याही चर्चेमध्ये (अथवा वादामध्ये) स्वत: तटस्थ राहून इतरांना मदत करणे अपेक्षित असते.

मराठी विकिपीडियावर १० प्रचालक आहेत. (प्रशासक विशेषाधिकारांसह खात्यांची पूर्ण सूची पहा)

प्रचालकांची कामे - प्रचालकांना निवेदन - प्रचालकांची यादी - प्रचालकपदासाठी विनंती

प्रचालकांचे अधिकार

विकी प्रणाली मध्ये काही विशिष्ट क्रिया अशा आहेत ज्या सर्वांना करता येत नाहीत. या मध्ये पाने वगळणे, पानांची सुरक्षा पातळी बदलणे, सदस्यांना संपादन अधिकार नाकारणे अथवा देणे (ब्लॉक व अनब्लॉक) या क्रियांचा समावेश होतो. तसेच मिडियाविकिचे प्रणाली संदेश बदलणे व विशेष पृष्ठे संपादित करणे ह्या क्रियासुद्धा प्रचालकांनाच करता येतात.

प्रचालकांच्या सर्व कार्यांची यादी विकिपीडिया:प्रचालक/कामे इथे दिलेली आहे.

प्रचालकपद

मोठी गोष्ट नाही

मराठी विकिपीडियावर प्रचालक बनणे ही मोठी गोष्ट नाही आहे. प्रचालकांनी इतर सदस्यांची मदत करणे तसेच विकिपीडियावर स्वच्छतेची (clean-up) कामे करणे अपेक्षित असते. विकिपीडियाची स्थापना करणारे जिमी वेल्स यांचे या संदर्भातील विचार पुढीलप्रमाणे आहेत.

I just wanted to say that becoming a sysop is *not a big deal*.

I think perhaps I'll go through semi-willy-nilly and make a bunch of people who have been around for awhile sysops. I want to dispel the aura of "authority" around the position. It's merely a technical matter that the powers given to sysops are not given out to everyone.

I don't like that there's the apparent feeling here that being granted sysop status is a really special thing.

- Jimbo Wales

प्रचालक बनण्यासाठी

प्रचालक बनण्यासाठी तुम्ही काही काळ विकिपीडियावर योगदान केलेले असणे आवश्यक आहे. जर तुम्ही प्रचालक बनू इच्छित असाल तर प्रचालकपदाची मागणी प्रचालकपदासाठी अर्ज इथे नोंदवू शकता. आपल्या मागणीवर इतर प्रचालक तसेच सदस्य आप‍आपले विचार तसेच कौल मांडतील. जर सर्वानुमते आपणांस प्रचालक पद द्यायचे निश्वित झाले तर एखादा प्रशासक आपणांस प्रचालक अधिकार देईल.

प्रचालकपदासाठी आवश्यक कौशल्ये

  • मराठी विकिपीडियावर बराच काळ (वर्षभर किंवा जास्त) कार्यरत असणे
  • एकंदर विकिपीडिया व मीडियाविकिवरील नियम व कार्यपद्धतीची माहिती असणे
  • क्लिष्ट साचे, वर्गवारी व तत्सम गोष्टींची माहिती असणे व ही माहिती इतरांना देणे
  • तेथील नेहमीच्या सदस्यांशी मेळ घालून अनेक छोटे उपप्रकल्प पार पाडणे
  • येथील लिखित व अलिखित नियमांची जाण असणे व ते लागू करण्यात पक्षपात किंवा भीड/लाज/भीती न बाळगणे
  • स्वतःवर करण्यात आलेली टीका सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे
  • कितीही उद्धट, उर्मट व अविवेकी संदेशांना शांतपणे नियमांनुसार उत्तरे देणे
  • मराठी विकिपीडिया हा मराठीभाषकांची संपत्ती असून त्यांचा निर्णय अंतिम असतो याची जाण असणे
  • वैयक्तिक टिकेचे मुद्दे संयत रितीने हाताळता येणे.
  • सर्व प्रकारच्या संदेशांना, योग्य असेल तेथे उत्तरे देणे. त्यासाठी सभ्य प्रमाणभाषेचा, विकिपिडियावरील नियमांचा आणि पूर्वघटितांचा आधार घेणे
  • मराठी विकिपिडिया ही सर्व मराठी भाषकांची सामायिक संपत्ती आहे, याची येथील वर्तनात सदोदित जाणिव ठेवणे.
हे जरूर वाचा!
जर आपणांस प्रचालक पद मिळाले, तर मिळालेल्या अधिकारांचा सुयोग्य वापर करण्याची जबाबदारी सर्वस्वी तुमच्यावर राहील. तुम्ही कुठलीही कृती करत असताना कायम लक्षात ठेवले पाहिजे की मी करत असलेली कृती ही विकिपीडियाच्या नीतीनुसार आहे की नाही, तसेच ह्या कृतीचे परीणाम जाणून घेतलेले आहेत की नाहीत. तुम्ही तुमच्या अधिकारांचा गैरवापर केल्यास तुमचे प्रचालकपद रद्द होऊ शकते याची नोंद घ्या.

प्रचालक पदासाठी समर्थन देताना सदस्यांनी प्रचालक पदासाठी विनंती करणारे सदस्यांचे योगदान अभ्यासताना खालील गोष्टी लक्षात घ्याव्यात

  1. सदस्यास येथील विकिपीडिया:नामविश्व संकल्पनेचा परिचय झाला आहेका अथवा त्यांची सर्व नामविश्वातून त्यांना त्या नामविश्वातील संकेतांचे आणि उपयोगितेचे आकलन झाले आहे का खास करून:
    1. मुख्य लेख नाविश्वाच्यादृष्टीने शीर्षकलेखन संकेतांचा सर्वसाधारण परिचय झालेला असावा त्या अनुषंगाने पुर्ननिर्देशन , स्थानांतरण, नि:संदीग्धीकरण कार्याचा परिचय झालेला असावा असे काम केलेले असावे.
    2. पुरेशी प्रताधिकार सजगता असावी.
    3. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या परिघाची जाणीव
    4. विकिपीडिया लेखांच्या विकिकरणाचा अनुभव असावा.शुद्धलेखन/शुद्धलेखन विनंत्या,पुर्नलेखन,बदल,पानकाढा, संदर्भ विनंत्या करणे त्या अनुषांगाने चर्चांचा अनुभव असणे
    5. विकिपीडिया:प्रचालक/कामे या संदर्भाने विकिपीडिया:नामविश्व, विकिपीडिया:निर्वाह, विकिपीडिया:चावडी/प्रबंधकांना निवेदन ; विकिपीडिया:कारण ; विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणाऱ्या सर्वसाधारण संपादन त्रुटी, विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा ; विकिपीडिया:पहारा आणि गस्त या गोष्टींशी परिचीत असावे
  2. इतर नामविश्वात वर्ग: साचा: नामविश्वात किमान स्वरूपाचे काम झाले असावे,तसेच साचे कसे काम करतात आणि साचात शुद्धलेखनादी दुरूस्त्या करताना काय काळजी घेणे आवश्यक आहे याचे किमान स्वरूपी आकलन असावे.
    1. इतर मुख्यनामविश्वातील लेखचर्चा सदरातून तसेच सदस्य चर्चा सदरातून नवीन सदस्यांचे शंका निरसन मार्गदर्शन करण्याचा अनुभव असावा.
    2. विकिपीडियाचे इतर सहप्रकल्प खासकरुन कॉमन्स, ट्रान्सलेट विकि यांचा परिचय असावा
    3. मिडियाविकि नामविश्वातील सुधारणा चर्चेत सहभाग घेतला असेल तर चांगले
  3. स्टॅटीक आणि डायनॅमीक अंकपत्त्यातील फरक माहित असणे गरजेचे आहे.

प्रचालकांचा वावर

प्रचालक हे इतर सदस्यांप्रमाणेच आहेत. तरीसुद्धा काही विशिष्ट ठिकाणी प्रचालकांचे अनुकरण इतरांनी करावे अशी अपेक्षा असते. प्रचालकांनी उत्तम संपर्क साधणे आवश्यक असते.

प्रचालकांनी खालील गोष्टी टाळाव्यात:

  • अधिकारांचा गैरवापर (उदा. सूचना न देता - लेख वगळणे, सदस्यांना ब्लॉक / अनब्लॉक करणे, इ.)
  • विकिपीडिया नीतीचे उल्लंघन (उदा. एखाद्या सदस्याला लक्ष्य बनविणे, गोपनियता नीतीचे उल्लंघन, इ.)
  • परत परत चुकीचे निर्णय देणे
  • अधिकारांशी खेळणे (उदा. एखाद्या सदस्याने अथवा प्रचालकाने एखादी कृती उलटविली तर चर्चा न करता पुन्हा ती कृती करणे, इ.)
  • संपर्कात कसूर करणे
  • चुकीच्या उद्देशाने प्रचालन करणे
  • इत्यादी

प्रचालकांची मदत कुठे होऊ शकते

खालील बाबींमध्ये विशेषत: प्रचालकांची मदत होऊ शकते.

प्रचालकपदाचा गैरवापर

जर एखाद्या सदस्याच्या असे निदर्शनास आले की एखाद्या प्रचालकाने त्याच्या पदाचा गैरवापर केलेला आहे, तर त्या सदस्याने ही गोष्ट त्या प्रचालकांशी चर्चा करून सोडविण्याचा प्रयत्न करावा. तरीही जर सहमती मिळाली नाही तर ही बाब प्रशासकांच्या नजरेत आणून द्यावी.

अधिकारांचा गैरवापर

अधिकारांचा गैरवापर करणे ही गोष्ट अतिशय गंभीर आहे. प्रचालनाचे अधिकार हे फक्त काही आदरणीय सदस्यांनाच दिले जातात. त्यामुळे त्यांनी त्यांच्या अधिकारांचा वापर हा योग्य प्रकारे करणे अपेक्षित आहे.

काही बाबी ज्यामध्ये अधिकारांचा वापर टाळावा:

  • विचारांमध्ये मतभेद - जर एखाद्या लेखात दिलेल्या माहितीमध्ये मतभेद असतील, व प्रचालकांनी जर त्या लेखात योगदान दिलेले असेल तर मतभेद टाळण्यासाठी प्रचालकांचे अधिकार वापरण्याचे टाळावे.
  • नीती - जर एखाद्या नीतीनुसार प्रचालकांचे अधिकार वापरण्यास बंदी असेल, तर अधिकार वापरू नयेत
  • रद्द केलेली कृती पुन्हा करणे - अधिक माहितीसाठी खालील परिच्छेद पहा

जर एखाद्या विशिष्ट बाबीमध्ये प्रचालकांचे अधिकार वापरावेत का नाही याची शंका आली तर दुसऱ्या प्रचालकाशी संपर्क करून त्याला ती कृती करण्यास सांगावे.

रद्द केलेली कृती पुन्हा करणे

जर तुम्ही केलेली कृती दुसऱ्या प्रचालकांने रद्द केली तर चर्चा न करता ती कृती पुन्हा करणे कुठल्याही परिस्थितीत टाळावे. तसेच एखाद्या प्रचालकाने केलेली कृती रद्द करतानासुद्धा त्या प्रचालकाशी संपर्क करणे अपेक्षित आहे.

अपवाद

दुसऱ्या प्रचालकांनी केलेल्या क्रिया उलटविण्यासाठी खालील अपवाद आहेत.

  • एखादा लेख अथवा चित्र वगळल्यास, व तो लेख अथवा चित्र योग्य असल्यास
  • वगळलेली वैयक्तिक माहिती दुसऱ्या प्रचालकाने पुन्हा पूर्वस्थितीत आणल्यास
  • एखाद्या विशिष्ट परिस्थितीत ज्यामध्ये एखादी क्रिया केल्याने काही अडचणी उद्भविल्यास
  • एखाद्या लेखाची सुरक्षितता पातळी बदलल्यास व तो लेख उत्पात करणाऱ्यांचे लक्ष्य असल्यास

प्रचालकपद रद्द करणे

जर प्रचालक अधिकारांचा गैरवापर केला तर प्रचालक पद रद्द होऊ शकते. प्रचालक पद रद्द करण्याचे अधिकार फक्त प्रतिपालकांनाच (इं:स्टिवर्ड्सला) असतात.

प्रचालक स्वत:हून आपले अधिकार काढून घेण्याची विनंती करू शकतात.

दीर्घकाल अकार्यरत प्रचालक/प्रशासक आपोआप पदमुक्ती कालावधी

१) दीर्घकाल अकार्यरत प्रचालक/प्रशासक स्वयमेव (आपोआप) पदमुक्ती कालावधी: सलग एक(१) वर्षे एकही संपादन अथवा एकही प्रचालकीय कार्य या दोन्ही पैकी एकही गोष्ट नाही असे प्रचालक/प्रशासक जबाबदारीतून पदमुक्ततेस आपोआप पात्र समजावेत.

२) असे दीर्घकाल अकार्यरत प्रचालक/प्रशासक स्वयमेव (आपोआप) पदमुक्ती कालावधीस अनुसरून पदमुक्त झालेले प्रचालक/प्रशासक अथवा स्वत:हून राजीनामा दिलेले सदस्य पुन्हा कार्यरत होऊन प्रचालक/प्रशासक पद विनंती केल्यास त्यांची विनंती प्रचालक मंडळाने ग्राह्य धरल्यास आणि स्वीकृती अधिकाऱ्यांना (प्रशासक) स्विकार्ह झाल्यास त्यांची प्रचालक पदावर सरळ फेर नियूक्ती करतील.

३) कोणत्याही मराठी विकि(मिडिया) प्रकल्पावर कोणत्याही कारणाने प्रचालक संख्या भविष्यात फार घटली तरी किमान एक मराठी भाषी प्रचालक सदैव शिल्लक राहीलाच पाहीजे, नवीन प्रचालक नियुक्ती नंतर अथवा एखादा जुना प्रचालक वापस आल्या नंतरच अशा प्रकल्पावरचा प्रचालक दूर केला जाऊ शकेल.

४) सर्व निवृत्त प्रचालक/प्रशासक (कोणत्याही विशेषाधिकारा शिवाय,) निमंत्रित सदस्य समजले जातील आणि त्यांच्या मतांचा सुयोग्य आदर विकिपीडिया जाणत्या सदस्यांप्रमाणे राखला जाईल.

सुरक्षितता

प्रचालकांनी आपले परवलीचे शब्द अतिशय गुप्त ठेवणे आवश्यक आहे. कारण त्यांना एका संपादनात संपूर्ण संकेतस्थळावर परीणाम करता येऊ शकतो. याच कारणास्तव प्रचालकांनी आपले परवलीचे शब्द इतरांना सांगणे धोकादायक ठरू शकते.

प्रचालकांना साद

सर्व प्रचालकांना एकदाच एकत्रितपणे साद घालण्यासाठी {{साद प्रचालक}} हा साचा वापरावा.

हे सुद्धा पाहा

विकिपीडिया प्रचालकांच्यापुढे> विकिपीडिया प्रशासक व त्यापुढे> विकिपीडिया प्रतिपालक अशी पदावली असते.