"मीडियाविकि" या प्रणाली मध्ये अनेक तांत्रिक कामे अशी आहेत की सर्वांना करता येत नाहीत. साधारणपणे ही कामे करण्याचे अधिकार प्रचालकांना दिलेले असतात.

हे पान प्रचालकांना करता येण्यासारख्या सर्व कामांची यादी व माहिती देते.

अधिकारांची यादीसंपादन करा

सुरक्षित पानेसंपादन करा

 • मुखपृष्ठ तसेच अन्य सुरक्षित पाने संपादित करणे. इतर सदस्य त्या त्या पॄष्ठाच्या चर्चा पानावर बदल करायच्या विनंत्या लिहू शकतात.
 • एखाद्या पानाची सुरक्षा-पातळी बदलणे.

लेख वगळणे व पुनर्स्थापित करणेसंपादन करा

 • एखादा लेख अथवा संचिका वगळणे
 • वगळलेले लेख तसेच संचिका पाहणे व पुनर्स्थापित करणे

ब्लॉक व अनब्लॉकसंपादन करा

 • आयपी अंकपत्ते, तसेच सदस्यांना संपादन अधिकार नाकारणे
 • ब्लॉक केलेले आयपी अंकपत्ते तसेच सदस्यनाव पाहणे व संपादन अधिकार देणे
 • सध्या अस्तित्वात असणार्‍या ब्लॉकची यादी पाहण्यासाठी इथे जा.

पूर्वपदास नेणेसंपादन करा

 • लवकर पूर्वपदास नेणे - प्रबंधकांना फक्त एका टिचकी मध्ये शेवटचे संपादन पूर्वपदास नेता येते. हे मुख्यत: उत्पात रोखण्यासाठी वापरण्यात येणारे उपकरण आहे.

उत्पात संपादने अलीकडील बदलांमधून लपविणेसंपादन करा

 • प्रचालक उत्पात संपादने अलीकडील बदलांमधून लपवू शकतात. हे करण्यासाठी लक्ष्य संपादनांच्या URL मध्ये &bot=1 हे वाढवा. याने आधी झालेली संपादने तसेच तुम्ही पूर्वपदास नेलेली संपादने अलीकडील बदलांमधून लपविली जातील.

विकिपीडियामध्ये बदल करणेसंपादन करा

 • प्रबंधक मीडियाविकि नामविश्वातील पाने बदलून विकिपीडिया मध्ये सर्वांना दिसणारे दुवे बदलू शकतात
 • CSS संचिकेत बदल करून विकिपीडियाचे स्वरूप बदलू शकतात
 • काही विशिष्ट उपकरणे जावास्क्रीप्टच्या माध्यमातून सर्वांना उपलब्ध करून देऊ शकतात

अन्यसंपादन करा

या व्यतिरिक्त प्रबंधक

 • सुरक्षित पानांचे स्थानांतरण करू शकतात
 • वगळलेल्या पानांचा इतिहास पाहू शकतात
 • सध्या अस्तित्वात असलेल्या खात्यांशी साधर्म्य असणारी खाती उघडू शकतात
 • इतर सदस्यांना एका संपादनात पूर्वपदास नेण्याचे अधिकार देऊ शकतात


हे सुद्धा पहासंपादन करा