सुयोग्य चित्र वापरा प्रकल्प
सर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)

हे पान विकिपीडिया:प्रचालक , यांच्या नामनिर्देशन विनंती बद्दलचे कौल सर्व सदस्यांकडून घेण्याकरिता आहे.

सदस्य:आर्या जोशी यांना प्रचालक अधिकारासाठीचे नामांकन

 • मला आर्या जोशी यांना प्रचालक पदासाठी नामांकित करताना अतिशय आनंद होत आहे. त्याला अनेक कारणे आहेत.
  • त्या पहिल्या महिला प्रचालक असतील. मराठी विकिवर प्रचालक अधिकार असलेले सर्व सक्रिय सदस्य पुरुष होते/आहेत. त्यामुळे त्या जर प्रचालक झाल्या तर विकिवरील लिंगभाव दरी कमी करण्यास सुरुवात होईल.
  • संदर्भ देऊन, व्यवस्थित सातत्याने लेखन करणाऱ्या त्या मोजक्या सदस्यांपैंकी एक आहेत.
  • त्यांचे जागतिक संपादने [जोशी 13,927] आहेत. त्यांना मराठी विकिबरोबरच कॊमन्स, डाटा आणि हिंदी विकिवरही संपादनाचा अनुभव आहे.
  • त्यांना प्रताधिकार, संदर्भ साधने, लेखाची गुणवत्ता, सदस्यांशी एकमेकांशी जुळवून घेऊन एकत्र काम करणे याचा अनुभव आहे तसेच या सर्वाचे सखोल ज्ञानही आहे. त्यामुळेच त्यांना प्रोजेक्ट टायगर सारख्या स्पर्धेचे ज्युरीम्हणून काम करण्याची जबाबदारी दिली जाते.
  • अनेक तांत्रिक बाबींचे ज्ञान त्यांना आहे, व त्या नवनविन गोष्टी ज्या संपादनास आवश्यक आहेत अशा शिकतही असतात. हे त्यांच्या संपादन इतिहासावरून आपल्याला स्पष्ट दिसून येते.
  • त्यांचा विकिवरील संपादनाबरोबरच, प्रत्यक्ष समुदायाबरोबर काम करण्याचा अनुभवही दांडगा आहे, अनेक कार्यशाळांमध्ये प्रशिक्षक म्हणून, अनेक स्पर्धा, मोहिमांमध्ये त्यांचा आघाडीचा सक्रिय सहभाग असतो. म्हणूनच त्यांचा गौरव फिचर्ड विकिपीडयन म्हणून २०१९ च्या महिला अंकामध्ये केला गेला आहे.
  • त्यांनी माझ्याकडे कधी कधी अधिकारां अभावी काम अडून पडते अशी तक्रारही केलेली आहे. मला अशी आशा आहे की, त्यांना अशी तक्रार करण्याची गरज पडू नये,
  • उत्पात नियंत्रण, प्रताधिकार भंगावरील काम पुढे नेणे, मराठीवर आधुनिक उपकरणे आणि अवजारे आणणे, तसेच वेळोवेळी लागणारे साचे आणणे इ. कामे. सक्रिय प्रचालकांच्या अभावी आडून पडतात ती पुढे नेण्याचे काम त्या नक्कीच करू शकतील. किंबहुना ते करण्यासाठीच त्यांना प्रचालकीय अधिकार खूप उपयोगाचे ठरतील. आपण आपले प्रश्न व मते मांडून आपल्या या मैत्रिणीला तीच्या कामात नक्कीच मदत होईल असे पाहूयात. आर्या जोशी हे नामांकन त्यांना मान्य आहे असे औपचारीकरित्या या नामांकनाखाली कळवतीलच. धन्यवाद. QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!![they/them/their] १४:५७, १६ फेब्रुवारी २०२० (IST)

कौल

Symbol strong support vote.svg पाठिंबा- या नामांकनाचा कर्ता म्हणून मी आर्या जोशी यांना प्रचालक अधिकारांसाठी पाठींबा देतो. - QueerEcofeminist
Symbol oppose vote oversat.svg विरोध- आर्या जोशी या एक उत्तम व अनुभवी सदस्या आहेत मात्र (परीक्षक तसेच) "प्रचालक" पदाची जबाबदारी सांभाळण्याइतपत त्या अद्यापतरी सक्षम नाहीत. त्यांच्यात "तटस्थ व न्याय्य दृष्टीकोन यांचा कमालिचा अभाव" आहे, हे माझे प्रामाणिक मत आहे. विकिपीडिया:प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धा २०१९/Submissions#परीक्षकांच्या लेखांचे परीक्षकांद्वारे मुल्यांकन(!) येथे सदस्यांनी पाहिले तर लक्षात येईल की जोशींनी परिक्षक म्हणून तटस्थ व न्याय्य दृष्टीकोन बाळगलेला नाही (व असंख्य चूकीची मूल्यांकने करुन ठेवलीत). किंवा तेवढी त्यांची बौद्धिक व नैतिक क्षमता नसावी. जर परीक्षक म्हणूनच जोशी असक्षम वा असमर्थ ठरत असतील; तर उद्या प्रचालक बनल्यावर त्या अशी कामे करणार नाहीत, याची शक्यता नाकारता येत नाही. सध्यातरी प्रचालक पदासाठी आवश्यक असणारा तटस्ट दृष्टीकोन तसेच बौद्धिक व नैतिक क्षमता जोशींत नाही, मात्र पुढे भविष्यात त्या जेव्हा या गोष्टींत सुधारणा करतील तेव्हा त्यांच्या प्रचालक पदाबाबत विचार होऊ शकतो. - Sandesh9822
Symbol strong support vote.svg पाठिंबा- या नामांकनाचा कर्ता म्हणून मी आर्या जोशी यांना प्रचालक अधिकारांसाठी पाठींबा देते. - कल्याणी कोतकर
Symbol strong support vote.svg पाठिंबा- आर्या जोशी यांचे मराठी विकिपीडियावरील काम वाखाणण्याजोगे आहे. यासोबतच त्यांचे तंत्रज्ञान विषयक कौशल्य आणि मराठी विकिपीडिया समृद्ध करण्याची प्रामाणिक तळमळ निर्विवाद आहे. सातत्याने मराठी विकिपीडियासाठी काम करणाऱ्या फार थोड्या लोकांमधील त्या एक आहेत. एक विशिष्ट विषय निवडून त्यावरील माहिती संदर्भासहित शोधून लेख तयार करणे अशा पद्धतीने त्यांनी अनेक उत्तम दर्जाचे लेख तयार केले आहेत. भारतीय संस्कृतीसंबंधीत त्यांच्या अनेक लेखातील अभ्यासपूर्ण माहिती प्रसारमाध्यमांनी देखील वापरली आहे.

इतर सदस्यांना विकिपीडियावर कोणत्याही वेळी कोणतीही समस्या/शंका असेल अथवा मदत लागत असेल तर ती करण्यास त्या सदैव तत्पर असतात. तसेच विकिपीडियावरील लेखांची गुणवत्ता सुधारण्याचे अत्यंत गुंतागुंतीचे काम त्यांनी लीलया हाताळले आहे. विकिपीडियाच्या नितिनियमांची त्यांची जाण उत्तम आहे.हे सर्व गुण एक उत्तम प्रचालक होण्यासाठी अत्यावश्यक आहेत. त्या नक्कीच प्रचालक पदाची धुरा समर्थपणे वाहतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही.

याबरोबरच मराठी विकिपीडियाला एक स्त्री-प्रचालक मिळेल याबद्दल मला अतीव आनंद होत आहे.

त्या प्रचालक होण्यास माझा पूर्ण पाठिंबा आहे.

आर्या जोशी यांना शुभेच्छा. - Pushkar_Ekbote

Symbol oppose vote oversat.svg विरोध- संतोष दहिवळ (चर्चा) २२:२१, १८ फेब्रुवारी २०२० (IST). - संतोष दहिवळ
Symbol strong support vote.svg पाठिंबा- आर्या जोशी मराठी विकिपीडियावर सातत्यपूर्ण आणि गुणवत्तापूर्ण योगदान देत आहेत. त्यांनी संदर्भासहित लेखन करून अनेक चांगल्या लेखांची भर घातली आहे. तसेच त्यांनी अनेक विकिपीडिया कार्यशाळांमध्ये प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे. विकिपीडियाच्या संपादकांची संख्या वाढवणे, लेखांची गुणवत्ता वाढवणे, नवोदितांना मार्गदर्शन करणे ही कामे त्या करत आहेतच. याबरोबरच प्रचालक झाल्यावर त्या अनेक तांत्रिक गोष्टी समजून घेऊन सध्या सक्रिय प्रचालकांची संख्या कमी असल्यामुळे मागे पडणारी कामे पुढे नेतील, असा विश्वास वाटतो. त्यांच्या रूपाने विकिपीडियावर काम करणाऱ्या महिलांना एक प्रतिनिधीत्व मिळेल आणि अधिकाधिक चांगले काम करण्यासाठी महिला संपादकांना प्रोत्साहन मिळेल. या नामांकनाबद्दल त्यांचे अभिनंदन आणि पुढील प्रक्रियेसाठी त्यांना शुभेच्छा! प्रचालक होण्यासाठी आर्या जोशी यांना माझा पाठींबा आहे. - ज्ञानदा गद्रे-फडके
Symbol oppose vote oversat.svg विरोध- सदस्य:Sachinvenga (चर्चा) --Sachinvenga (चर्चा) ०९:३५, १२ एप्रिल २०२० (IST). - Sachinvenga

चर्चा

धन्यवाद सुरेश. मी हे नामांकन स्वीकार करीत आहे.--आर्या जोशी (चर्चा) ०७:००, १७ फेब्रुवारी २०२० (IST)

प्रश्नोत्तरे

आर्या जोशी (चर्चा · योगदान) यांच्या प्रचालकपदासाठीच्या नामांकनाबद्दलचे प्रश्न येथे विचारावे. उमेदवाराने त्यांची उत्तरे देणे अपेक्षित आहे.

१.  आर्या जोशी:, प्रोजेक्ट टायगर स्पर्धेत परीक्षक म्हणून तुमच्या मुल्यांकनाविषयी परीक्षकांच्या लेखांचे परीक्षकांद्वारे मुल्यांकन(!) प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत, तेथे मी तुमची दुजाभाव करणारी (तटस्थ व न्याय्य दृष्टीकोन नसलेली) काही मुल्यांकने सविस्तर नोंदवली आहेत, परंतु तुम्ही त्याविषयी विचारलेल्या कोणत्याच प्रश्नाचे उत्तर दिले नाही. [ आंबेडकर जयंती हा लेख अस्वीकार करण्याचे कारण तुम्ही "५% प्रताधिकार भंग" सांगिलेय; केवळ "चार-पाच शब्दच" copyvios साचात डिटेक्ट झाले म्हणजे प्रतिधिकार भंग होत नाही. मात्र याउलट तुम्ही स्वतःचे २०%+, ३०+% पेक्षा जास्त प्रताधिकार भंग असलेले लेख स्वीकारले!!!] येथे कोणताही कौल देण्यापूर्वी मला त्या प्रश्नांची जाणने अपेक्षित आहे. --संदेश हिवाळेचर्चा ०८:५३, १७ फेब्रुवारी २०२० (IST)

 Sandesh9822: नमस्कार !

सर्वप्रथम मी जे मांडणार आहे ते तुम्हाला स्वीकार्य असेलच अशी माझी अपेक्षा नाही. जेंव्हा एखादी व्यक्ती परीक्षण करीत असते तेंव्हा ती स्पर्धेचे निकष पाळले जात आहेत कि नाही याबाबत सजग असते. हे स्वाभाविकच असते कि अशा मताला विरोध होतो आणि त्यावर स्पर्धक सतत आपले मत नोंदवीत राहतात. आपण दीर्घकाळ विकिवर संपादने करीत आहात त्यामुळे लेखांचे निकष आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे तसेच माझे सहकारी परीक्षक सुरेश खोले यांनी याविषयी विवेचन केले आहे. स्पर्धेतील लेखांनी हे व्यासपीठ अधिक समृद्ध कसे होईल हे पाहण्यापेक्षा विषय वाढवत राहून आणि चर्चा करत राहून वेळ दवडणे मला अपेक्षित नाही त्यामुळे आपल्या प्रश्नांची उत्तरे दिलेली नाहीत आणि मला यावर यापुढे चर्चा अपेक्षित नाही. आपण प्रगल्भ आणि अनुभवी संपादक आहात त्यामुळे प्रचालक म्हणून संधी मिळाल्यास मी काय करू इच्छित आहे असे काहीतरी भरीव आणि कार्यसंमुख प्रश्न आपण यापुढे विचाराल अशी मी आपल्याकडून अपेक्षा करीत आहे. धन्यवाद--आर्या जोशी (चर्चा) १०:३८, १७ फेब्रुवारी २०२० (IST)

(माझा वरील प्रश्न पुनश्च वाचावा) तटस्थ व न्याय्य दृष्टीकोन नसलेल्या तुमच्या मुल्यांकनाबद्दल विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देणे म्हणजे वेळ दवडणे असे तुम्हास वाटू शकते, मात्र इतर सदस्यांना कारणे जाणायची आहेत. प्रचालक म्हणून पुढे तुम्ही काय कामे करू इच्छिता हा प्रश्न महत्त्वाचा आहेच मात्र मागे तुम्ही विकिनितीहीन, तटस्थ दृष्टीचा अभाव, व निकषहीन कामे का केली त्याबाबत प्रश्न विचारणेही महत्त्वाचे वाटते.--संदेश हिवाळेचर्चा १२:१०, १७ फेब्रुवारी २०२० (IST)
 Sandesh9822: आपण मला विकी नीतीहीन असे संबोधन वापरले आहे याची फक्त सुजाण महिला संपादक म्हणून जाणीव करून देत आहे याची नोंद घ्यावी. आपला येथील पूर्वानुभव लक्षात घेता आपल्याशी अधिक न बोलणे उचित राहील, प्रश्न राहिला प्रचालक पदाचा तर माझा असा विश्वास आहे कि प्रामाणिक काम करीत असलेल्या व्यक्तीला कधीतरी न्याय मिळतोच आणि तो त्याचे कामच त्याला मिळवून देते.असो. आपणाकडून प्रगल्भ प्रतिसादाची केवळ मी अपेक्षाच करू शकते. मला अधिक गुणवत्तीने काम करण्यात अधिक रस आहे. तुम्हाला जे नोंदवायची ते नोंदवीत रहा. माझया विवेकी बुद्धीला जे पटेल त्यावरच मी उत्तर देईन याची नोंद आपणासही अन्य सर्वानीच घ्यावी. या व्यासपीठाचे प्रचालक पद हे देखावी नसून ते कार्यक्षम पणे करणे हे अधिक महत्वाचे आहे असे मला वाटते. आणि त्यापेक्षाही अधिक कामे माझया लेखी आहेत. विकी म्हणजे केवळ जगाचे व्यासपीठ नाही हे आपणही लक्षात घेतलेत तर बरे होईल.--आर्या जोशी (चर्चा) १९:०२, १७ फेब्रुवारी २०२० (IST)
अभिप्रायासाठी धन्यवाद, माझया विवेकी बुद्धीला जे पटेल त्यावरच मी उत्तर देईन याची नोंद आपणासही अन्य सर्वानीच घ्यावी. या तुमच्या विधानावरुन हे स्पष्ट होते की तुम्ही उद्या प्रचालक म्हणून काहीही कामे केली तरी त्यांचे स्पष्टीकरण द्यायला तुम्ही अजिबात बांधिल असणार नाहीत, कारण उत्तर/स्पष्टीकरण द्यायचे की नाही हे सर्वस्वी तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुमच्या विवेकी बुद्धीवर अवलंबून असेल. याची सर्व सदस्यांनी नोंद घ्यावी. (आधीही परीक्षक म्हणून त्यांनी आपल्या विवेकी बुद्धीचा वापर करत त्यांच्या चूकीच्या मूल्याकनांवर उपस्थित केलेल्या कोणत्याच प्रश्नावर उत्तर दिलेले नाही.) परिक्षक म्हणून तुम्ही ज्या त्रुटी/चूका केल्या त्याचे स्पष्टीकरण देण्याचे टाळत वा त्यात दुरुस्ती न करता चूकांवर काहीही उत्तर/कारण न देणे हा १००% बचावात्मक मार्ग स्वीकारला. स्वतः चूका करायच्या व त्या न सुधारता त्याची केवळ व्याच्यता होऊ नये म्हणून त्यावर कसलेही भाष्य करण्याचे टाळायचे, असे वागणे विकिपीडियामध्ये समर्थनीय नाही. (जर-तर) असाच मार्ग आपण प्रचालक बनल्यावर स्वीकारु नये, हीच माफक अपेक्षा. --संदेश हिवाळेचर्चा २०:२१, १७ फेब्रुवारी २०२० (IST)

प्रिय  आर्या जोशी:,

वेळोवेळी अशी अपेक्षा केली जात होती की आपले नाव नामनिर्देशनासाठी येईल आणि शेवटी ते आले आहे. मला हे जाणून घ्यायला आवडेल की, आपण या विकीवरील आपल्या कामांची काही उदाहरणे मला द्या ज्यात प्रशासकांच्या विशेषाधिकारांची आवश्यकता आहे?

धन्यवाद --Tiven2240 (चर्चा) ०८:४६, १९ फेब्रुवारी २०२० (IST)

 Tiven2240: नमस्कार! सक्रिय असल्याने मला जाणवते आहे की समूहाची बरीच कामे ही प्रचालकांना वेळ देता येउ शकत नसल्याने वेळेअभावी मागे पडत आहेत.उदा.साचे अद्यतन करणे किंवा साईट नोटीस बदलणे इ.स्वरूपाची. त्याजोडीने मी जे लेख सुधारण्याचे प्रयत्न करते त्यात अनेकदा मला प्रचालकांना साद द्यावी लागते मदतीसाठी पण ते काम तत्परतेने केले जाते असे नाही.त्यामुळे सक्रिय असल्याने मी विशेषाधिकार वापरून ही कामे जलद गतीने कार्यान्वित करून व्यासपीठाची गुणवत्ता वाढवू इच्छिते.धन्यवाद!आर्या जोशी (चर्चा) ११:०७, १९ फेब्रुवारी २०२० (IST)

नोंद - कोणती कामे अडतात यांवर भाष्य न करता हे लिहीत आहे.
१. साचे अद्यतन करण्यासाठी प्रचालक असणे गरजेचे नाही. येथील बव्हंश साचे कोणत्याही संपादकाला बदलता येतात. काही क्लिष्ट आणि/किंवा बहुवापरातील साचे सुरक्षित केले गेलेले आहेत. त्यांत बदल करण्यासाठी प्रचालकपद लागते. तरीही असे साचे धूळपाटीवर किंवा इतर नावाने (साचा सुरक्षित असला तरीही मजकूर कोणालाही वाचता येतो) तयार करुन त्यावर प्रयोग करता येतात. मनाप्रमाणे बदल झाल्यावर प्रचालकांना साद दिल्यास काही मिनिटांत साचा बदलता येतो. साच्यातील अपेक्षित बदल प्रचालकांनी करणे (अ) वेळखाऊ आहे आणि (ब) नक्की काय हवे आहे हे कळण्यातच काही वेळ जातो.
२. साईटनोटिस हा सुरक्षित साचा आहे आणि त्यासाठी वरील पद्धत अवलंबिता येते.  सुबोध कुलकर्णी: यांनी पूर्वी असा साइटनोटिस साच्यात बदल करुन दिल्यावर लगेचच तो बदल प्रकाशित केला गेला होता.
असो, पुन्हा एकदा - येथे कामे अडतात कि नाही हा माझा मुद्दा नसून प्रचालकपद नसतानाही ही विशिष्ट कामे कशी करता येतील हे नमूद केले आहे. इतर कामे असल्यास ती ही कळवावी म्हणजे (असल्यास) तोडगा सुचविता येईल आणि तुमच्याकडे प्रचालकपद नसतानाही तोडगा असलेली तरी कामे खोळंबून राहणार नाहीत.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) ०६:४४, २७ फेब्रुवारी २०२० (IST)

 आर्या जोशी: त्याजोडीने मी जे लेख सुधारण्याचे प्रयत्न करते त्यात अनेकदा मला प्रचालकांना साद द्यावी लागते मदतीसाठी कृपया याला स्पष्ठ करा. --Tiven2240 (चर्चा) ११:२६, १९ फेब्रुवारी २०२० (IST)

 आर्या जोशी: सौम्य स्मरण --Tiven2240 (चर्चा) १२:५०, २२ फेब्रुवारी २०२० (IST)

 Tiven2240: नमस्कार! पुढील लिंक पहा. आपणही या व्यासपीठाचे प्रचालक आहात त्यामुळे मी अभय नातू सरांना जे नोंदविले आहे ते आणि या लेखाची आधीची चर्चा वाचल्यावर आपल्याला लक्षात येईल कि मला केवळ संपादक म्हणून लेखावर काम करणे याच्या पलीकडे विशेष अधिकार कोणते व का हवे आहेत. धन्यवाद https://mr.wikipedia.org/s/15n9 --आर्या जोशी (चर्चा) १२:३६, २४ फेब्रुवारी २०२० (IST)

 आर्या जोशी: आपण दिलेला दुवा पाहिला. पुन्हा एकदा आपण खोटे उल्लंघन नोंद केले आहे असे दिसते. अश्या वेळी जर प्रचालकपद उमेदवार याना कॉपीराईट उल्लंघन काय असते आणि काय नसते याची माहिती नाही तर कसे चालेल. मराठी विकिपीडियावर आपण विकिपीडिया:प्रचालक तर वाचले असतील अशी अपेक्षा होती. जर नसले तर वाचा व मराठी विकिपीडिया समुदायाला इथे आपले कामाचे अहवाल द्या. आपले अहवाल पाहण्यासाठी मी व इतर सर्व सदस्य उत्साहित आहोत. मराठी विकिपीडियावर प्रचालक झाल्यावर आपण काय कामे करण्यास इच्छुक आहेत याची यादी सुद्धा जाहीर करा. आशा आहे की आपण ते लवकर मराठी विकिपीडिया समुदायाला जाहीर कराल. धन्यवाद --Tiven2240 (चर्चा) २०:२८, २५ फेब्रुवारी २०२० (IST)

 आर्या जोशी: सौम्य स्मरण--Tiven2240 (चर्चा) ०८:१८, २९ फेब्रुवारी २०२० (IST)