मराठी विकिपीडियामधील सध्याच्या मराठी लेखन प्रणालीची विस्तारीत अंमलबजावणी प्रस्ताव

विकिपीडिया:सुलभीकरण प्रस्ताव:

खालील सबंध प्रस्तावावर चर्चा झाल्यानंतर त्याचे अंतीम प्रारूप प्रणाली विकसकांकरिता इंग्रजीत भाषांतरीत करून ह्वे आहे.

१) मराठी विकिपीडियाची मराठी विकिपीडियाची मराठी सध्याची लेखन प्रणाली मराठी विकिपीडियाची अविचल (by Default) लेखनप्रणाली असावी म्हणजे मराठी विकिपीडियात येणाऱ्या साऱ्यांची सुरूवात आपोआप मराठीतून होईल.

१ अ. सध्या ज्यांना देवनागरी हवी त्यांना ती निवडावी लागते त्या एवजी तीने आपोआप सुरूवात होईल ज्यांना नको आहे त्यांना त्यातून स्वतः बाहेर पडावे लागेल.

बाहेर पडण्याची प्रक्रीया नेमकी कशी असेल ? ती आंतरविकि दुवे देण्या करिता आलेल्या अमराठी संपादकास कशी समजेल ? ते इंग्रजीत नोंदवा.

२) आपोआप कायम न झालेले नवागत अनामिक तसेच सदस्य खाती आणि आपोआप कायम झालेले अनामिक तसेच सदस्य खाती या सर्वांचा समावेश अविचल (by Default) लेखनप्रणालीत करावा.

३) प्रणाली व्हेक्टरसहित सर्व त्वचांना(skins) लागू असावी

३)मुख्य संपादन खिडकी,त्याच्या साधनपेटीतील संदर्भ आणि दुवा देण्यास सहाय्य करणारे संवाद गवाक्ष, आढावा, शोध खिडक्या,सर्व इनपुट बॉक्स विशेषतः त्यातील "type=create" गट ,सदस्य नोंदणी आणि सदस्य प्रवेश.या सर्व ठिकाणी मराठी विकिपीडियाची मराठी सध्याची लेखनप्रणाली अविचल (by Default) असावी.

४)मुख्य संपादन खिडकीच्या साधनपेटीतील विशेषवर्ण विभागातून अनावश्यक थाई,खमेर,आणि लाओ ह्यांची वर्णमाला हटवून त्या एवजी निम्न लिखीत मराठी देवनागरी वर्णमालेचा समावेश करावा

अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ अ अः अ‍ॅ ऑ ऋ ॠ ऌ ॡ क ख ग घ ङ च छ ज झ ञ ट ठ ड ढ ण त थ द ध न प फ ब भ म य र ल व श ष स ह ळ क्ष त्र ज्ञ ा ि ी ु ू े ै ो ौ ं ः ॅ ॉ ँ ् ृ ॄ ॢ ॣ ० १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ र्‍य र्‍ह ॐ
my suggesion ( just correction to your text Ashish Gaikwad १६:५७, ७ मे २०११ (UTC) )
अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ अ अः ॲ ऑ ऋ ॠ ऌ ॡ क ख ग घ ङ च छ ज झ ञ ट ठ ड ढ ण त थ द ध न प फ ब भ म य र ल व श ष स ह ळ क्ष त्र ज्ञ ा ि ी ु ू े ै ो ौ ं ः ॅ ॉ ँ ् ृ ॄ ॢ ॣ ० १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ ऱ्य ऱ्ह ॐ


''''अंमल बजावणीच्या दृष्टीने वरच्या दोन पैकी फायनल ड्राफट कंचा ?? ते कृपया लवकरात लवकर कळवा''''

५)मुख्य संपादन खिडकीच्या साधनपेटीत विशेषवर्ण विभागातून व्हर्च्यूअल किबोर्ड सध्याची फोनेटीक तसेच विंडोज आयएमई इन्स्क्रीप्ट हे दोन्ही पर्याय उपलब्ध ठेवावेत.व्हर्च्यूअल किबोर्ड सदस्य नोंदणी आणि सदस्य प्रवेश येथेही दिसावा.

व्हर्च्यूअल किबोर्ड मला महाराष्ट्र टाईम्सच्या संकेतस्थळावर उअपलब्धा आहे तसा अभिप्रेत आहे. तुम्हाला अजून काही चांगली उदाहरणे माहित असल्यास ती नोंदवा.

६)मराठी प्रणाली विकसकांनी ऑनलाईन मराठी शब्द सुचवणी डिक्शनरी सोबतच पारिभाषिक शब्द सुचवणी आणि शुद्धलेखन तपासणी हि एक्स्टेंशन्स उपलब्धकरून योग्य तपासणी नंतर मराठी विकिपीडियास जोडावीत. हा प्रस्ताव भाषांतरीतकरून चर्चे नंतर कौल पानावर हलवावा. कौलास सहमती मिळाल्यानंतर बगझिलावर विनंती करावी.

व्हर्च्युअल कळफलक

व्हर्च्युअल कळफलकावर जी अक्षरे क्वेर्टी कळफलकावर टंकित करता येणार नाहीत, तीच फक्त असावीत. उदा० * काना नसलेला अ. * पाय मोडका अ. शिवाय पायमोडके अ आ बे कॉ इत्यादी अक्षरे लिहिता येतील अशी सोय हवी. क्‌प‌, सि्प, बे्ड, कॉ्ट्‌ वगैरे शब्दांचे योग्य र्‍हस्व उच्चार लिहून दाखवताना पाय मोडावे लागतात.* वर चंद्र असलेला अ(हा चंद्र आडवा असावा, उगाच तुर्कस्थानातून दिसणार्‍या चंद्रासारखा तिरपा नसावा. * र्‍हस्व आणि दीर्घ वेलांटीवाले अ. * अ वर एक मात्रा असलेला ए, आणि दोन मात्रा असलेला ऐ * वरती रफार असलेली अ, आ, ऋ, ऐ वगैरे(ही अक्षरे हविर्‌अन्न, कुर्‌आन, नैर्‌ऋत्य, जातिर्‌ऐक्य सारखे शब्द टंकताना लागतात. थोडक्यात कुठल्याही अक्षराला रफार लावता आला पाहिजे.) * कोणत्याही अक्षराला लावलेला रफार आणि व दिलेला चंद्रबिंदू स्पष्ट दिसले पाहिजेत. म्हणजे नॉर्दॅंप्टन(नॉर्‍दॅम्प्टन) ’द’वर रफार आणि चंद्रबिंदू देऊन लिहिता येतील. त्यासाठी एका छोट्या वर्तुळाला रफार आणि चंद्रबिंदू असलेले मात्राचिन्ह व्हर्च्युअल कळफलकावर हवे. * व्यंजनाला खालच्या बाजूला जोडलेली ऋ, ॠ, ऌ, ॡ ही अक्षरे नीट दिसत नाहीत. त्यासाठी त्या कळफलकावर ृ ॄ ॢ ॣ ही अक्षरे स्पष्ट दिसतील असे पहावे. * ’द’चा पाय मोडताना नीट उमटत नाही, म्हणून व्यवस्थित पाय मोडलेला द्‌ व्हर्च्युअल कळफलकावर हवा. हा द्‌ उद्‌घाटन वगैरे शब्द लिहिताना लागतो. * संस्कृत लिहिताना लागणारा र आणि व शेजारीशेजारी ठेवून लिहिलेला ’ख’ हा कळफलकावर अवश्य हवा. खिस्त हा शब्द लिहिताना तसला ख लागतो. * महाराष्ट्र सरकारने फक्त ज्या श ला मान्यता दिली आहे तो मराठी शेंडीफोड्या श मूळ कळफलकावर पाहिजे. हा हिंदीतला टकलू श व्हर्च्युअल कळफलकावर असावा. * मराठीचे च आणि झ हे उच्चार लिहिताना त्या अक्षरांना नुक्ता लावायला लागतो. तेव्हा व्हर्च्युअल कळफलकावर नुक्ता लावलेली क, ख, ग, च, छ, ज़, ञ, य़, र्‍, ड, ढ, फ़, ळ ‍ही अक्षरे आणि शिवाय नुक्ता हे मात्रा चिन्ह हवे. * ट, ठ, ड, ह आणि क्वचित द ला जोडायसाठी लागणारे ’पाऊण य’ हे मात्रा चिन्ह कळफलकावर हवे. * बुटक्या ट-डंना खाली कोणतेही व्यंजन जोडता आले पाहिजे म्हणजे ट्क, ट्व, ट्स, ड्ग ड्स ही अक्षरे लिहिता येतील. सध्या ही अक्षरे ट-ड्चे पाय मोडून लिहावी लागतात त्यामुळे लेखन अशुद्ध आणि कुवाच्य होते. (हलन्त या चिन्हाला मराठी सोडून संस्कृतसकट अन्य भारतीय भाषांत विरामचिन्ह म्हणतात; अर्थ स्पष्ट आहे असले पाय मोडलेले व्यंजन दिसले की क्षणभर विराम घेऊन पुढचे व्यंजन वाचायचे. त्यामुळे बालोद्‌यान(बालोद्यान) हा शब्द बालोद्‌+यान असाच वाचला जातो.) * कोणतेही जोडाक्षर उभ्या आणि आडव्या जोडणीने लिहिता आले पाहिजे. विशेषतः क्त, न्न, क्र वगैरे.क्र हे जोडाक्षर तीन प्रकारे लिहिता येते, अर्ध्या क ला र, क च्या पोटात खुपसलेला तिरपा र, आणि ’त्र’ला क ची वाटी जोडून काढलेला क्र. * स्वरांचा अनुक्रम अ् ‌‌अ आ अ‍ॅ ऑ इ ई ऋ ॠ ऌ ॡ ए ऐ असा असावा. टीप: वर सांगितली बहुतेक अक्षरे मनोगतावर लिहिता येतात. त्यांना जे शक्य आहे ते विकिपीडियाला का नाही?..J ०९:०२, ८ मे २०११ (UTC)

मंडळी प्रस्ताव कौलास टाकल्यानंतर चर्चा चालू झाली आहे तीही विखूरलेल्या ठिकाणी चर्चा:युनिकोड , विकिपीडिया:चावडी तेही जे सध्या युनिकोडाच्या परिघात तांत्रिक दृष्ट्या सध्या जे उपलब्ध आहे ते सुटसुटीतपणे वेगळे मांडल्यास उपलब्ध गोष्टींच्या अमलबजावणीस वेग येऊ शकतो आणि तसे करून देण्यात कृपया सहकार्य करावे हि नम्र विनंती. (युनिकोडात भविष्यात काय असावयास हव याचा वेगळा विभाग चर्चा:युनिकोड,विकिपीडिया:चावडी/विकिपीडियात कळपट हवा येथे ठेवावा .
त्या शिवाय शक्यतो चर्चा संबधित पानावरकरून सहमती झालेला भाग तेवढाच कौल पानावर ठेवावा म्हणजे समर्थन देणे आणि अंमलबजावणी सोपी होते.कृपया लवकरात लवकर सहकार्य देऊ करावे.

माहितगार ०९:३१, १० ऑगस्ट २०११ (UTC)

संबंधीत दुवे

दुवा प्रकार कृपया या तक्त्यात शुद्धलेखाच्या दुरुस्त्या करू नयेत महत्वपूर्ण दुवे तुटण्याची शक्यता मराठी विकिपीडियावरील संस्कृत विकिपीडियावरील पाली विकिपीडियावरील हिंदी विकिपीडियावरील mw:Extension:Narayam
मिडियाविकी:Translit.js मिडियाविकी:Translit.js sa:मिडीयाविकी:Translit.js pi:MediaWiki:Translit.js hi:मीडियाविकि:Translit.js उदाहरण
मिडियाविकी:Vector.js मिडियाविकी:Vector.js sa:मिडीयाविकी:Vector.js pi:MediaWiki:Vector.js hi:मीडियाविकि:Vector.js
मिडियाविकी:Monobook.js मिडियाविकी:Monobook.js sa:मिडीयाविकी:Monobook.js pi:MediaWiki:Monobook.js hi:मीडियाविकि:Monobook.js उदाहरण
गॅजेट्स उदाहरण sa:विशेष:सुविधा_(गॅजेट) :
sa:मिडीयाविकी:Gadget-MicrosoftTransliteration.js
sa:मिडीयाविकी:Gadget-MicrosoftTransliteration.js,
sa:मिडीयाविकी:Gadget-scriptname.js
उदाहरण उदाहरण उदाहरण
Contrubution page links of main contributors उदाहरण sa:विशेष:योगदानम्/Junaidpv
sa:विशेष:योगदानम्/MikeLynch
sa:विशेष:योगदानम्/Vibhijain
sa:विशेष:योगदानम्/Bhawani Gautam
sa:विशेष:योगदानम्/Mayur
sa:विशेष:योगदानम्/Eukesh
sa:विशेष:योगदानम्/
उदाहरण उदाहरण उदाहरण
मेलिंग लिस्टवरील चर्चा उदाहरण संस्कृत मेलिंग लिस्ट उदाहरण उदाहरण उदाहरण
इतर सदस्य:Vibhijain कृत सदस्य:Vibhijain/vector.js उदाहरण उदाहरण उदाहरण
बग विनंत्या जुनी बगझीला 32669 , 32670, चालू 35107 35109 35111 35112 28900



  पाठिंबा- माझे समर्थन आहे. - Mahitgar
  पाठिंबा- माझे समर्थन आहे. - Katyare
  पाठिंबा- माझे समर्थन आहे. - Gypsypkd
  पाठिंबा- माझे समर्थन आहे. - Czeror
  विरोध- माझे अंशतः समर्थन आहे . - J
  पाठिंबा- माझे समर्थन आहे. - Mvkulkarni23
  पाठिंबा- माझे समर्थन आहे. - Prabodh1987

नारायम मराठी फाँट एक्स्टेंशन

मराठी विकि मित्रांनो तुम्हा सर्वांना कळवण्यास आनंद होत आहेकी आज दिनांक १९/११/२०११ रोजी मुंबईत भरलेल्या भारतीय विकिपीडियन समेंलनास संलग्न चालू हॅकेथॉन मध्ये मिडियाविकिफॉऊंडेशनचे तज्ञ मंडळींच्या मार्गदर्शना खाली, मराठी विकिपीडिया तर्फे मी स्वतः व मराठी विकिपीडियाचे सर्वात जुनेजाणते संपादक तसेच मराठी विकास परिषदेचे अधिकृत प्रतिनिधी आणि मराठी फाँट क्षेत्रातील तज्ञ सुशांत देवळेकर सोबतच आयाआयटी पवईतील मराठी सॉफ्टवेअर क्षेत्रातील तंत्रज्ञांच्या उपस्थितीत; संस्कृत आणि इतर बहुसंख्य भारतीय विकिपीडियावर वापरल्या जात असलेल्या नारायम एक्सटेंशनचे मराठी भाषेच्या आवश्यकतेच्या दृष्टीने लोकलायझेशन यशस्वीपणे पार पडले असून या एक्स्टेंशन मध्ये वरील कौलातील शक्य त्या सर्व गोष्टी आंतर्भूत करण्याचा प्रयत्न केला गेला असून नारायम एक्सटेंशनमुळे लेखन अधिक वेगाने होणार असून अक्षरांची हलंतरूपे वापरणे अधिक सुलभ होणार आहे. कृपया सर्वांनी यास तातडीने अनुमोदन द्यावे म्हणजे शक्यतो २० तारखेस विकिमीडिया आणि इतर सर्व तज्ञांच्या उपस्थितीतच ते चालू करून काही त्रूटी आढळल्यास त्यांचे निराकरण वेगाने होईल तसेच विकिमीडिया फाऊंडेशनची हि मंडळी पुढच्या आठवड्या पुण्यात आणि भारतात इतरत्र उपलब्ध आहेत या कालावधीत सर्व गोष्टी समाधान कारक पणे करून शक्य होणार आहे.

  पाठिंबा- माझे समर्थन आहे. - Mahitgar
  पाठिंबा- माझे समर्थन आहे. - Mvkulkarni23
  पाठिंबा- माझे समर्थन आहे. - संतोष दहिवळ
  पाठिंबा- माझे समर्थन आहे. - निनाद
  पाठिंबा- माझे समर्थन आहे. - sudhanwa
  विरोध - अभय नातू
  विरोध कौल देताना कृपया आपले सदस्य नाव द्यावे कृपया {{कौल}} पहा.

Dear All

Sorry fot delay from side in replying this discussion thread since my schedules on field work are going to tight.While I do not blame inscript users and supporters for going beyond the given scope and focus of the discussion since may of them are not aware of earlier discussions we had on Marathi Wikipedia or missing on some of the finer points,still it is my responsibility to reply the same.

For inscript supporters I earnestly request to trust in me for my neutral POV, that I have studied their set of arguments in great detail , I have tried myself to promote and teach inscript personally in field .I have been involved in co-ordinating a yahoogroup called Devnagari and had been studying all aspects of the issues involved since long.That I have studied patterns of mistakes committed by new comers on Marathi Wikipedia in great details. Please do trust in me that every step I intend to take will be in best favour of Marathi Language and marathi language Wikipedia.

1)Why do we need to have Marathi Typing as default system Over the years I have been studying patterns of difficulties encountered by newcomers and anonymous users on Marathi Wikipedia .I have also conducted field surveys during Wikipedia training sessions and the first hurdle encountered availabilty of Marathi Font .Huge number of trail and error edits are happening in roman script Marathi and not because they are trying to type in roman but actually majority thinks that if they start typing it automatically comes in to marathi by phonetic transliteration.A visit to history of Marathi Wikipedia trail and error Sandbox page विकिपीडिया:धूळपाटी speaks for itself

The current situation is not only their edits are getting deleted as spam , by not providing the requisite user friendly support levels we are discouraging great numbers from using marathi typing at all and as marketing background person I know it creats it only helps in creating a negative image and negative publicity To me this amounts to great disservice to Marathi language. (I will be replying some related FAQs ahead in this mail)

2) Default OK but why phonetic and why not inscript

a) inscript needs considerable user practice and special time involvement and effort before using it. Still the majority of users come from Shared computers of offices , educational institutions or Cybercafes or shared computers which to provide facility to enable Marathi Unicode typing support from authorities does not come easily Second aspect shared computing does not provide for required time besides they usually are not authorised to paste any stickers of Marathi alphabates on computer keyboards they are using.

b) When people are trying to write on Marathi Wikipedia they are already in a thought process which demands immidiate expression i.e.result so compelling them for a long inscript training time at that moment is not worth a trying option .Besides in the field I have personally obsrved that compelling people to use inscript only is found to be discouraging the majority. The simmiller view is shared by many who work in field for promotion of marathi unicode typing including Mr.Tushar Pawar of Marathi abhyas Kendra shared similler view point.

c)During Wikipedia editing trainings too as a trainer in field time available for training on how to type is too short .We need least number of processess and hurdels during these sessions.And for atleast coming two years numbers of hands on filed training sessions are going to increase phenomenally.

d)Actual field surveys have shown that 46% people are using google transliterator 40% using local phonetic transliteration of each of Marathi Website whichever site they go ten percent are using rest of phonetic typing. most of phonetic typing skill is coming to people from their freinds and peers through word of mouth.less than 4%are using inscript.Acually 2-4% usage of inscript also needs to be taken as good news

e) In one of my very recent discussions one of earstwhile GIST inscript expert himself claimed to me that now inscript is older than google transliterator and now a days google transliterator and phonetic transliterators are more intelligent,advance and supportive.

f) It is not for Wikipedia to promote this or that but make those uitilities available and every body can participate easily without hurdels

By taking all sides in to account I hae come to the conclusion that we will use phonetic Narayam as default , if technically possible we will try to limit it for certan popular categories of article pages or we will limit it with Name space and if that also not possible we will try to agree to a time limit for Narayam as default on Marathi Wikipedia .

With technical people we will try to find out if we can provide inscript as default on certain trial and error Sandbox page on Marathi Wikipedia.


Beyond Marathi Wikipedia I have been advocating for Some Unicode typing competions to build public confidance I have spoken with Marathi Abhyas Kendras Mr.Deepak Pawar and Tech Marathii Group also Some organisation need to take lead on this.

I have discussed ceratin ideas with Mr.Rahul Deshmukh fort online typing tutorials for beginners of phonetics as well as inscript .For inscript I have requested Sushant for developing more UTube presentation about exactly where to place the fingures while typing inscript and he has agreed to it.Once these things are ready we can request various medias and educational bodies to incorporate more aspects of Marathi Computer typing in their programmes.

Thanks again in participating in the dscussion Warm Regards माहितगार ०१:५२, ५ जानेवारी २०१२ (UTC)


All,

First off, I must declare that I have immense respect for Mahitgar, his views and his research as it pertains to w:mr. There are very few others in this group that have done more than he. That said, I must step in and express my views here. I have tried to address each point, so the post may be lengthy. My apologies in advance.

For inscript supporters I earnestly request to trust in me for my neutral POV, that I have studied their set of arguments in great detail , I have tried myself to promote and teach inscript personally in field .I have been involved in co-ordinating a yahoogroup called Devnagari and had been studying all aspects of the issues involved since long.That I have studied patterns of mistakes committed by new comers on Marathi Wikipedia in great details. Please do trust in me that every step I intend to take will be in best favour of Marathi Language and marathi language Wikipedia.

AN -- While presenting the case for installing Narayam as the default tool/plug-in, I'd love to see a list of positives that Inscript brings. As a counter-balance to your argument, can you please give us that?

1)Why do we need to have Marathi Typing as default system Over the years I have been studying patterns of difficulties encountered by newcomers and anonymous users on Marathi Wikipedia .I have also conducted field surveys during Wikipedia training sessions and the first hurdle encountered availabilty of Marathi Font .Huge number of trail and error edits are happening in roman script Marathi and not because they are trying to type in roman but actually majority thinks that if they start typing it automatically comes in to marathi by phonetic transliteration.A visit to history of Marathi Wikipedia trail and error Sandbox page विकिपीडिया:धूळपाटी speaks for itself The current situation is not only their edits are getting deleted as spam , by not providing the requisite user friendly support levels we are discouraging great numbers from using marathi typing at all and as marketing background person I know it creats it only helps in creating a negative image and negative publicity To me this amounts to great disservice to Marathi language. (I will be replying some related FAQs ahead in this mail)

AN -- What we have/propose is phonetic typing as an option that can be EASILY enabled. It is not being eliminated. The above argument holds true only if we're making Inscript the only available choice.

2) Default OK but why phonetic and why not inscript a) inscript needs considerable user practice and special time involvement and effort before using it. Still the majority of users come from Shared computers of offices , educational institutions or Cybercafes or shared computers which to provide facility to enable Marathi Unicode typing support from authorities does not come easily Second aspect shared computing does not provide for required time besides they usually are not authorised to paste any stickers of Marathi alphabates on computer keyboards they are using.

AN -- See #1 above.

b) When people are trying to write on Marathi Wikipedia they are already in a thought process which demands immidiate expression i.e.result so compelling them for a long inscript training time at that moment is not worth a trying option .Besides in the field I have personally obsrved that compelling people to use inscript only is found to be discouraging the majority. The simmiller view is shared by many who work in field for promotion of marathi unicode typing including Mr.Tushar Pawar of Marathi abhyas Kendra shared similler view point.

AN -- See #1 above. The thought process is not hindered by the input method. The QWERTY keyboard takes a long time to master as well. Even so, there have been no credible efforts to introduce easier/phonetic keyboards. Humankind is a slave to habit. If we cultivate the Inscript habit, it will stick. If we don't, it won't. Simple as that.

c)During Wikipedia editing trainings too as a trainer in field time available for training on how to type is too short .We need least number of processess and hurdels during these sessions.And for atleast coming two years numbers of hands on filed training sessions are going to increase phenomenally. AN -- See #1 above. If the demonstrators themselves use Inscript, it will increase curiosity and perhaps even convert. There's no compulsion to use Inscript ONLY. d)Actual field surveys have shown that 46% people are using google transliterator 40% using local phonetic transliteration of each of Marathi Website whichever site they go ten percent are using rest of phonetic typing. most of phonetic typing skill is coming to people from their freinds and peers through word of mouth.less than 4%are using inscript.Acually 2-4% usage of inscript also needs to be taken as good news

AN -- See #1 above. This argument does not seem relevant. Google transliterator is/will still be a valid input method (via phonetic typing)

e) In one of my very recent discussions one of earstwhile GIST inscript expert himself claimed to me that now inscript is older than google transliterator and now a days google transliterator and phonetic transliterators are more intelligent,advance and supportive.

AN -- With all due respect that's a self-defeating argument. If more people use Inscript, there will be more development and/or better innovations. The comparison is between Narayam/phonetic typing and Inscript, not Google. Google's innovations are irrelevant unless they are clear and present in the tool (viz Narayam).

f) It is not for Wikipedia to promote this or that but make those uitilities available and every body can participate easily without hurdels

AN -- See #1 above. Inscript deserves its fair chance. There are many positives of Inscript which you have not listed here. Since you have done the research, I request, nigh, urge you to present them here.

By taking all sides in to account I hae come to the conclusion that we will use phonetic Narayam as default , if technically possible we will try to limit it for certan popular categories of article pages or we will limit it with Name space and if that also not possible we will try to agree to a time limit for Narayam as default on Marathi Wikipedia .

AN -- With due respect, I'm in full, clear and vocal opposition of this proposal. Narayam, while an excellent tool, needs to be added as an additional option, not as the default choice. I have not heard a compelling argument above as to why it is better than Inscript. One of the arguments was that हलंत syllables will be easier to write. Devnagari script as used in standardized Marathi usees हलंत syllables very rarely, so that does not apply at all. I have no personal animosity towards Narayam or its developers. I am not being paid by Govt of India (or anyone else) to promote Inscript (read previous allegations against me regarding Microsoft...LOL...:-}) I am looking at the issue completely objectively and I do not agree with Mahitgar's proposal/arguments

Once again, thanks for the continued discussion.

अभय नातू ०२:४३, ५ जानेवारी २०१२ (UTC)

व्यक्तिगत आरोप वगळावेत

विकिपीडिया संस्कृती परस्परांवर विश्वास ठेवण्याकरता सांगते. विकिपीडिया संस्कृतीत न रूळलेल्या संपादकांकडून मेहनतीने काम करणार्‍या इतर सदस्यांचे चारीत्र्यहननाच्या प्रयत्नांना आवर घालण्याच्या दृष्टीने कोणत्या विवाद्य मुद्दा सुद्धा व्यक्तिगत टिकेपासून दूरठेवणे गरजेचे आहे.त्याकरिता व्यक्तिगत स्वरूपाच्या आरोप/टिकेचा चारित्र्य हननाचा भाग वगळला जावा.

विकिपीडिया ज्ञानकोश सामूहीक लेखन योगदानाचे स्थान आहे.विकिपीडिया संस्कृतीत प्रत्येक सदस्याने इतर सदस्यांच्याबद्दल विश्वास आणि आदर ठेवणे अभिप्रेत आहे. इतर सदस्यांवर कोणत्याही कारणाने व्यक्तिगत,भाषिक,प्रांतीय, जातीय, धार्मिक स्वरूपांचे आरोप करू नयेत. असा मजकूर आढळल्यास तो काढून टाकण्यात येईल.

असा व्यक्तिगत टिकेचा भाग संबधीत सदस्याच्या चर्चा पानावर सुचित केल्या नंतर सुद्धा पुर्नस्थापित करण्याचे दोन पेक्षा अधिक प्रयत्न झाल्यास अशा सदस्यखात्यामागील इतर सदस्यनामे व अंकपत्ते सदस्यत्व तपासनिसास (check user) शोधण्यास सांगून संबधी सदस्यखाती आणि अंकपत्ते प्रचालक सात दिवस ते एकवर्षेपर्यंत आवश्यकतेनुसार प्रतिबंधित करण्यास सांगितले जाऊ शकेल अथवा अपवादात्मक परिस्थितीत प्रचालक असा निर्णय स्वतः घेऊन संबधीत सदस्याचे खाते प्रतिबंधीत करू शकतील, मराठी विकिपीडिया समुदायाच्या सहमतीने असे प्रतिबंधनाचा कालावधी कमी केला जाऊ शकेल.

  पाठिंबा- माझे समर्थन आहे. - Mahitgar
  पाठिंबा- व्यक्तीगत आरोप करणारी सदस्य खाती आणि अंकपत्ते विकिपीडिया च्या धोरणानुसार अनंत काळ पर्यन्त प्रतिपंधित करण्यात येतील. तसा अधिकार प्रचालकांना देण्यात आलेला आहे.. - Mvkulkarni23
  पाठिंबा- माझे समर्थन आहे. - अभय नातू
  पाठिंबा- माझे समर्थन आहे. - Prabodh1987
  पाठिंबा- माझे समर्थन आहे. - Maihudon
  पाठिंबा- माझे समर्थन आहे. - Abhijeet Safai
  विरोध कौल देताना कृपया आपले सदस्य नाव द्यावे कृपया {{कौल}} पहा.


Bureaucrat

विकिमीडिया पदावलीतील Bureaucrat या शब्दाचे सध्याचे प्रशासक हे भाषांतर विकिप्रणालीशी अपरिचीत व्यक्तिंच्या मनात पदाच्या आधिकारांबाबत विनाकारण चुकीची समजूत निर्माण करून देणारे आणि गैरसमजांना वाव देणारे ठरत आहे.

ह्या पदनामाचा अधिक न्याय्य अनुवाद व्हावा म्हणून मी दिर्घकाळ विचार विमर्श करत आलो आहे. Bureaucrat या पदाच्या प्रत्यक्ष अधिकारांचे स्वरूप आणि मर्यादांना (प्रचालक बॉट्स तसेच खाते एकत्रिकरण विनंत्यांना स्विकृत करणे ह्या कार्यास ) अनुसरून त्याचा अनुवादात "स्विकृती अधिकारी" असा बदल करतो आहे. आपल्या समर्थनाची विनंती आहे माहितगार ०४:००, १ डिसेंबर २०११ (UTC)

मी आणि अभय नातू यांच्यातील चर्चा

मिडिया विकित Bureaucrat हा शब्द आहे. कार्पोरेट वेबसाईटमध्ये Bureaucrat हा शब्द सयूक्तीकही ठरला असता पण एका मुक्त प्रकल्पात प्रत्यक्षात काहीच ब्यूरोक्रसी नाही आणि तरीही Bureaucrat शब्द वापरला जाणे सयूक्तीक वाटत नाही शिवाय Bureaucrat शब्दाचे शब्दशः भाषांतर प्रशासक करणे प्रशस्त वाटत असेल पण मी वर म्हटल्या प्रमाणे प्रत्यक्षात acceptance देण्याच्या कृती हा मुख्य कार्यभाग आहे निर्णय हे विकिपीडियन्सच्या सहमतीने होतात. प्रशासक शब्द तसाच ठेऊ देण्यासही हरकत नव्हती पण तुमचे पदनाम प्रशासक असल्यामुळे तुम्हाला जी न केलेल्या पापाची शिक्षा अनेक चाहते देताना दिसतात या बद्दल चिंतीत तर आहेच , पण व्यक्तिशः मला ते काम हवे असून सुद्धा जी जबाबदारी माझी नाही त्याचे खापर नको आहे, ज्या शेंगाची टरपले मी टाकलीच नाहीत ती उचलण्याची तयारी असणे आणि त्याची जबाबदारि घेणे या भीन्न बाबी आहेत. तुमचे टोपण नाव फक्त प्रशासक आहे म्हणून न खालेल्ल्या शेंगाची टरपले खाल्ल्याचे (किंवा शेंगा खाल्ल्याचे) आरोप झेलणे आपल्या प्रमाणे प्रत्येक भावी ब्यूरोक्रॅटला जमेलच असे नाही त्यामुळे प्रशासक ह्या शब्दात बदल आवर्जून करावा असा माझा आग्रह आहे. माहितगार ०५:५८, २ डिसेंबर २०११ (UTC)
सदस्य मनोज यांनी आपल्या दोघांतील चर्चा वाचून "कारभारी या शब्दाचा विचार करा. एकच सुटसुटीत नामाभिधान आहे, अस्सल मराठी शब्द आहे आणि ओनरशीपचा सेन्स त्यातून अजिबात येत नाही. शिवाय आधुनिक मराठीत एका शब्दाची पुनर्स्थापना केल्याचं श्रेयही मिळेल" अशी सुचवणी केली आहे.त्यावरून मला कार्यासन (en:Chair) हा सुद्धा शब्द चांगला वाटतो आहे. माहितगार ०७:५६, २ डिसेंबर २०११ (UTC)

मी आणि अभय नातू दोघातील २००७ मधील चर्चा खालील प्रमाणे होती.

यूजर- सदस्य

सिसॉप(सिस्टीम ऑपरेटर):प्रबंधक,समन्वयक,प्रचालक,हुद्देदार

ब्यूरोक्रॅटःवरिष्ठ प्रबंधक,विशिष्ट प्रबंधक,प्रामान्य,अनुभाव,व्यवस्थापक,अधिकारी,विशिष्टहुद्देदार

स्टूवर्डःप्रतिपालक,मुख्य प्रबंधक,अतिविशिष्ट प्रबंधक,अतिविशिष्ट हुद्देदार

From among these choices, I like --
  • Admin - प्रबंधक
  • Sysop - प्रचालक
  • Bureaucrat - अधिकारी
  • Steward - प्रतिपालक
Abhay Natu १५:३२, ३१ ऑक्टोबर २००७ (UTC)
  पाठिंबा- माझे समर्थन आहे. - Mahitgar
  पाठिंबा कौल देताना कृपया आपले सदस्य नाव द्यावे कृपया {{कौल}} पहा.
  विरोध- Bureaucratचे प्रशासक हे भाषांतर ठीक वाटते. बदलायचेच असल्यास स्विकृती अधिकारी (स्वीकृती?) हे बोजड आणि कृत्रिम वाटते. एका शब्दाचे सुटसुटीत नामाभिधान निवडावे.. - अभय नातू
  विरोध- शब्द बदलण्याची गरज. पण स्वीकृती अधिकारी हे खरोखरच बोजड आणि कृत्रिम वाटते. कारभारी या शब्दाचा विचार करा. एकच सुटसुटीत नामाभिधान आहे, अस्सल मराठी शब्द आहे आणि ओनरशीपचा सेन्स त्यातून अजिबात येत नाही.. - मनोज

-

  विरोध- शब्द बदलण्याची गरज असेलही. पण स्वीकृती अधिकारी हे बोजड आणि कृत्रिम वाटते या शी सहमत. दिवाणजी शब्दाचा विचार व्हावा :) .. - निनाद



माहिती आदान प्रदानासाठी फोर्म्स सुविधा कौल

मराठी विकिपिडीयावर माहितीच्या आदान प्रदानासाठी सर्वसाधारण पणे एडिट विंडो चा वापर केल्या जातो. नेमकी माहिती, योग्य रकान्यात आणि वैकल्पिक माहितीचे आदान प्रदान करण्या साठी फॉर्म हा प्रकार बहुतेक सांकेतिक स्थळांवर वापरल्या जातो. Extension:Semantic Forms ह्या पुरवणीने अशा तर्हेची सुविधा आपणास मराठी विकिपिडीयावर देता येवू शकेल.

  • Semantic Forms allows you to have forms for adding, editing and querying data on your wiki, without any programming. Forms can be created and edited not just by administrators, but by users themselves.
  • प्रात्यक्षिक येथे पाहता येईल


त्या दृष्टीने सर्व सदस्यांनी आपले विचार, सूचना आणि कौल येथे द्यावा. धन्यवाद ...! - राहुल देशमुख १४:१०, ११ मार्च २०१२ (IST)[reply]

  पाठिंबा- माझे समर्थन आहे. - rahuldeshmukh101
  विरोध कौल देताना कृपया आपले सदस्य नाव द्यावे कृपया {{कौल}} पहा.


चावडी मध्यवर्ती चर्चा पानाचे संदर्भाने कौल

  • खालील कौल प्रस्तावात केवळ मतदान करावे मी मांडलेल्या कलमांमध्ये परस्पर बदल करू नयेत हि विन्ंती

सध्या विवाद्द विषय सरसकटपणे चावडी/वाद निवारण पानावर हलवले जात आहेत. या हलवण्याचे स्वरूप आणि उद्देश वादनिवारणापेक्षा प्रचालकांच्या सोईनुसार विषय थंड्या बस्त्यात हलवणे असा आहे काय अशी स्वाभाविक शंका काही बऱ्याच सदस्यांना वाटते आहे.अशा माहितीच्या स्थानांतरणाकरता यात अलिकडे बॉट खात्याचा वापर केला गेल्याचे आढळून आले आणि आपल्या कृतीने संबधीत सदस्य दुखावले गेल्याचे लक्षात येऊन सुद्धा संबंधीत बॉट खात्याने विकिपीडिया समुदायाची संमती न घेता सदस्यांना दुखावणारी कृती पुन्हा आमलात आणल्याचे दिसून आले.

व्यक्तिगत आरोप आणि चारीत्र्यहनन करण्याकरीता विकिपीडिया चर्चा पानांचा उपयोग होऊ नये या बाबत मी स्वत: सजग राहिलो आहे.मराठी विकिपीडियाचे प्रचालक मराठी विकिपीडिया समुदायाने निश्चित केलेल्या विशीष्ट निर्देशांनुसार काम करण्याकरीता समुदायाकडूनच निवडले जातात.त्यांचे मराठी विकिपीडिया समाजास उत्तरदायीत्व आहे.व्यक्तिगत आरोप आणि चारीत्र्यहनन होऊ नये आणि प्रचालकांच्या संवादांचे, कार्यांचे कृतींचे मुल्यांकन ह्या भिन्न बाबी आहेत. दुर्दैवाने कोणतीही व्यक्तिगत टिका नसलेल्या, प्रचालकांच्या संवादांचे, कार्यांचे कृतींचे मुल्यांकनाच्या प्रयत्नांना सुद्धा थंड्या बस्त्यात टाकण्याचे प्रयत्न जाणीव पूर्वक वाटत आहेत.

मराठी विकिपीडियावर आजतागायत झालेल्या दहा लाख संपादनांपैकी सातलाख संपादने हि छोट्या छोट्या संपादकांकडून झालेली आहेत, ह्या सर्व समुदायाच्या अडी अडचणी मध्यवर्ती चावडीवर येत असतात एखाद्दा चुकार अनामिक संपादकामुळे सर्व नवागत आणि अनामिक संपादकांना चावदीवर मत प्रकट करण्या पासून वंचीत करणे अयोग्य आहे.विकिपीडिया मुक्त असणे हा विकिपीडियाचा गाभा आहे.

त्यामुळे प्रचालकांना धोरणात्मक निर्देश देणारा खालील कौल प्रस्ताव मांडत आहे. या कौलाची प्रस्तावना मी चावडीच्या प्रस्तावना पानावर लावत आहे. ती तिथून सात दिवसांचे आत हलविण्याचा प्रयास झाल्यास अशा सदस्याचे/प्रचालकाचे खाते आणि संभाव्य आयपी आणि निस्चित झालेली तोतया खाती याच प्रस्ताव कौलाने सहा महिने पर्यंत मराठी विकिपीडियावरून संपादनांकरीता प्रतिबंधीत होतील.

  • प्रचालकांशी अपमानास्पद वर्तन अथवा चारीत्र्य हनन न करता त्यांच्या कार्य कृती आणि संवादाचे समीक्षण मुल्यांकन करणे हा सर्व सदस्यांचा मुलभूत अधिकार आहे. ह्या मूलभूत अधिकार वापरू न देणे सदस्यांचा हक्कभंग समजून सदस्यांना चावडी मुख्य पानावर हक्कभंग ठराव मांडता येईल आणि असा हक्कभंग प्रस्ताव चावडीवर सात दिवस पर्यंत राहील नंतर तो मुख्य कौल पानावर हलविला जाईल.

हक्कभंग प्रस्तावाच्या बाजूने पाच पेक्षा अधिक मते आल्यास अशा सदस्य अथवा प्रचालकाने बिनशर्त माफी मागावी. सात दिवसाचे आत माफी न मागणारा प्रचालकाचे प्रचालक पद रद्द समजण्याचा प्रस्ताव मेटा कडे पाठवावा.हक्कभंग करून सात दिवसाच्या आत माफी नम् मागणाऱ्या सदस्यास सहा महिने पर्यंत संपादना पासून प्रतिबंधीत करावे.

  • सदस्य आणि प्रचालकांशी तीन अपमानास्पद वर्तन अथवा चारीत्र्य हननाचे प्रयत्नास करणाऱ्यास पहिल्या दोन प्रयत्नास समज नंतरच्या वेळी सात दिवसांच्या प्रतिबंधनाचे तीन वेळा त्याने नियमाचे उल्लंघन दहा पेक्षा अधिक वेळा केल्यास सहा महिन्यांकरिता प्रतिबंधीत करण्याचे अधिकार प्रचालकांना दिले जात आहेत.

१)चावडी आणि चर्चा पाने अनामीक आणि नवागतांना सुद्धा मुक्त असावीत. २)चावडी आणि चर्चा पानाववरून चारीत्र्यहनन करणारे शब्द/वाक्य आरोप तेवढेच वगळावेत . ३) रागाच्या भरात नावांच्या एकेरी केलेल्या उल्लेखांचे आदरार्थी बहुवचनात रूपांतरण करावे ४)चावडीवरील सर्व लेखन मराठी भाषेत असावे. इंग्रजी अथवा इतर भाषी लेखनास सहसा परवानगी नसावी , इतर भाषिक लेख काही कारणाने घ्यावयाचे झाल्यास त्याला दाखवा लपवा साचात ठेऊन त्याचा मराठी संक्षेप तेवढा खाली द्दावा. ५)मजकुराचे (अगदी मुद्दे विवाद्द असलेतरी) किमान चार दिवस पर्यंत अर्काईव्हींग आणि स्थानांतरण करू नये. ६)चावडी पानांच्या अर्काईव्हींग/स्थानांतरणा करीता बॉट्सना परवानगी नसावी.विवाद शमवण्याचे दृष्टीने अपवादात्मक स्थिती करिता केवळ प्रशासकांना तेही वर्षातून प्रत्येकी अधिकाधीक पाच वेळांपर्यंत आणि सर्व प्रशासंकाचे मिळून अधिकाधीक वीसवेळा वेगळे विशेष बॉट खाते बनवून मजकुर थंड्याबस्त्यात तेही केवळ चार दिवसांनतर हलवण्यास परवानगी असावी.

सध्या यावर कमित कमि उहापोह करून निती स्विकारवी या नितीचे येत्या सहा महिन्यानंतर अवलोकन करून सर्व सहमतीने दिर्घ मुदतीचा कौल घ्यावा -रायबा

  • रायबा शतशहा धन्यवाद !

परमहंस , भीमराव पाटील ह्या जेष्ठ लोकांनी केलेल्या उत्तम मध्यस्थीचे आणि सुचानन कडे कानाडोळा करत सरसकट वाटण्याचा अक्षदा लावणे म्हणजे काय म्हणायचे आणि त्यावरही चावडीच कुलूप बंद करणे म्हणजे कहर. त्यामुळे चावडीची प्रकरणे चर्चा पानाकडे वळता आहेत आणि परिस्थिती अधिक अनियंत्रीत होतांना दिसते. मराठी विकिपिडीयावर साद्य परिस्थितीत काही प्रचालकांची भूमिका हि बालिश आणि स्वकेंद्री थोडी आरोग्नट असल्याचा चुकून गैरसमज होवू नये हीच माफक अपेक्षा. माझ्या सारख्या नवख्या आणि वृद्ध सदस्याने काय बोलावे, पण ह्यातून एक वाईट संदेश समाजास जातो हे मात्र खरे. सामान्य सदस्यान प्रमाणेच प्रचालाकांनाही बंधने असावीत हे आपण मांडलेत ते उत्तम. माझा आपणास सामुर्ण पाठींबा. -Osho (चर्चा) १५:५५, २३ मार्च २०१२ (IST)[reply]

"चावडीची प्रकरणे चर्चा पानाकडे वळता आहेत आणि परिस्थिती अधिक अनियंत्रीत होतांना दिसते. मराठी विकिपिडीयावर साद्य परिस्थितीत काही प्रचालकांची भूमिका हि बालिश आणि स्वकेंद्री थोडी आरोग्नट असल्याचा चुकून गैरसमज होवू नये हीच माफक अपेक्षा." सहमत आहे Osho. अनेक प्रचालकांशी अनेक नवीन-जुन्या सदस्यांचे सतत वाद का होत आहेत, हा ही एक प्रश्न मला भेडसावतो. अनेकांसाठी ही आत्मनिरिक्षणाची वेळ असावी. काही कामे आपल्याला सुसंवादाने करणे झेपत नसल्यास सोडून देता येतात. तसेच खास सदस्यांसाठी आणि प्रचालक मनमानीवर प्रचालक काहीही भूमिका घेत नाहीयेत, असा गैरसमज व्हायला वेळ लागणार नाही... ही सगळे प्रकार पाहून मी गेले काही दिवस, मराठी विकीपासून दूर राहणेच बरे की काय अशा विचारा पर्यंत आलो होतो! निनाद ०५:३७, २७ मार्च २०१२ (IST)[reply]
माननीय ओशो, आपण माझ्या प्रस्तावाचा कार्यकारण भाव अगदी बरोबर ओळखलात. आपण मांडलेल्याच भुमीकेतून हा कौल प्रस्ताव मांडला. आपल्या समर्थनार्थ आभारी आहे -रायबा
  पाठिंबा- माझे समर्थन आहे. - रायबा
  पाठिंबा- माझे समर्थन आहे. - Sachinvenga
  पाठिंबा- माझे समर्थन आहे. - vinod rakte
  पाठिंबा- माझे समर्थन आहे. - Czeror
  पाठिंबा- माझे समर्थन आहे. - निनाद
  विरोध कौल देताना कृपया आपले सदस्य नाव द्यावे कृपया {{कौल}} पहा.


दीर्घकाल अकार्यरत प्रचालक/प्रशासक आपोआप पदमुक्ती कालावधी प्रस्ताव

कौल प्रक्रिया मुदत

पार्श्वभूमी

सध्या मराठी विकिपीडियावर कौल घेण्यासाठी खालील संकेत आहेत -

०. चर्चा पानांवर किंवा इतरत्र सदस्यांमध्ये चर्चा होते, त्यातून असलेल्या धोरण किंवा संकेतांपेक्षा वेगळे धोरण/संकेत करण्याची कल्पना पुढे येते.

  1. ध्येय आणि धोरणे चावडीवर (या पानावर) अधिकृतरीत्या चर्चा सुरू होते.
  2. या पानावर, याच्या उपपानावर किंवा कौलपानावर रीतसर प्रस्ताव मांडला जातो.
  3. तेथे चर्चा चालू राहते त्याचबरोबर कौल देणेही सुरू होते.
  4. चर्चेचा ओघ कमी झाल्यावर प्रचालक कौलासाठी मुदत देतात.
  5. मुदत संपल्यावर कौलमोजणी होऊन त्यातील अवैध कौल वगळले जाताता.
  6. निकाल जाहीर होतो.

यातील ० आणि १ हे नेहमी होतेच असे नाही.

या प्रक्रियेत अनेकदा कौल घेण्यास उशीर होतो वर कौल नेमका कधी संपेल हे वरकरणी लक्षात येत नाही. पूर्वी मराठी विकिपीडियावरील संपादकांची संख्या कमी असताना असे असणे योग्य होते, किंबहुना स्वागतार्ह होते कारण अशा दीर्घ मुदतीमुळे क्वचित काम करणाऱ्या सदस्यांनाही त्यांचा कौल देण्याची संधी मिळत असे. आता सुदैवाने येथील संपादकसंख्या वाढली आहे व धोरणे ठरविणे तसेच इतर कौल घेणे शक्य तितक्या लवकर (पण निष्पक्षपातीपणे) पार पडणे मराठी विकिपीडियाच्या दृष्टीने अधिक योग्य आहे.

असे असता वरील प्रक्रिया किंचित बदलली जावी व त्याला ठाम मुदत मिळावी यासाठी मी खालील प्रस्ताव मांडत आहे.

प्रस्तावित प्रक्रियेनुसार कोणताही कौल कमीतकमी २१ दिवस चालू राहील. असे केल्याने १-२ आठवड्यांतून येथे संपादन करणाऱ्या सदस्यांनाही आपले मत नोंदविण्याची संधी मिळेल. याच बरोबर कोणताही कौल जास्तीतजास्त ३५ दिवस चालू राहील.

अभय नातू (चर्चा) ०२:१९, २८ एप्रिल २०१८ (IST)[reply]

प्रस्ताव

विकिपीडियावर कौल घेण्यासाठी खालील संकेत पाळले जातील -

१ कोणताही कौल घेण्यासाठी विकिपीडिया:कौल येथे प्रस्ताव मांडला जावा.

१.१ उत्पात आणि खोडसाळ प्रस्ताव प्रचालक काढून टाकतील. इतर सदस्यांनी येथे फेरफार करू नये.

२ अपूर्ण, असंबद्ध किंवा अर्थबोध न होणारे प्रस्ताव विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा येथे हलविले जातील.

२.१ इतर सदस्यांनी प्रस्तावात फेरफार करू नये.

३ विकिपीडियावरील धोरणांशी थेट संबंध असलेल्या प्रस्तावांकडे विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे येथून दुवा असेल.
४ कौल प्रस्ताव मांडला गेल्यानंतर पुढील १४ दिवस (प्रस्ताव मांडलेला दिवस वगळून) त्यावर चर्चा करण्यात येईल. ही मुदत शेवटच्या दिवशी २३:५९:५९ वाजता संपेल. या दरम्यान सदस्य आपला कौलही नोंदवू शकतील.

४.१ १४ दिवसांची चर्चा मुदत संपायच्या आत प्रस्ताव मांडणारा सदस्य ७ अधिक दिवसांची मुदत एक वेळा मागू शकतो.
४.२ १४ किंवा २१ दिवसांच्या मुदतीअखेर चर्चेत खंड पडला नसेल आणि नवनवीन मुद्दे समोर येत असतील (असे होत आहे कि नाही यासाठी प्रचालकांचे मत अंतिम राहील) तर प्रचालक आपणहून एक वेळा ७ अधिक दिवस चर्चा पुढे चालू ठेवू शकतील.

५ चर्चाकाळ संपल्यावर पुढील ७ दिवस सदस्य कौल देतील. ही मुदत सातव्या दिवशी २३:५९:५९ वाजता संपेल. या दरम्यान शक्यतो चर्चा करू नये. पूर्वी न मांडलेले आणि मूलभूत मुद्दे असतील तर ते मांडावे परंतु मी सहमत, मी ही सहमत इ. मते किंवा मांडलेल्या मुद्द्याला अधिक बळ देणे शक्य तितके टाळावे.
६ कौल देण्याची मुदत संपल्यावर प्रचालक मते मोजून निकाल जाहीर करतील.

६.१ कौलमोजणीमधून मुदतीनंतर दिले गेलेले कौल आणि इतर अवैध कौल वगळले जातील.

चर्चा

असे केल्याने १-२ आठवड्यांतून येथे संपादन करणाऱ्या सदस्यांनाही आपले मत नोंदविण्याची संधी मिळेल कृपा याला स्पष्ट करा.

प्रत्येक कौल कमीतकमी ३ आठवडे चालू राहणार असल्याने १५ दिवसांनी येथे संपादन करणाऱ्या सदस्यास हा कौल दिसेल व आपले मत नोंदविण्याची संधी मिळेल.
जर कौल ८ दिवसांत संपला तर अशा सदस्यांना १५ दिवसांनी आल्यावर कौल सुरू होउन संपलेलाच दिसेल.
अभय नातू (चर्चा) ०७:३९, २८ एप्रिल २०१८ (IST)[reply]

कौल प्रक्रियेत पाळीव खातीविकिपीडिया:स्लीपर अकाउंट याबाबत जर या प्रस्तावात काही संकेत भेटले तर उत्तम. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ०७:०६, २८ एप्रिल २०१८ (IST)[reply]

होय, यासाठीही चर्चा होणे आणि धोरण ठरविणे आवश्यक आहे.
तुमचे मत ध्येय आणि धोरणे चावडीवर मांडून चर्चेची सुरुवात केल्यास इतर सदस्यही आपले मत देतील.
अभय नातू (चर्चा) ०७:३९, २८ एप्रिल २०१८ (IST)[reply]


निदान मला तरी, तीन आठवड्याचा वेळ खुप जास्त आहे असे वाटते, शिवाय
# अनेक ध्येय धोरणे आत्तापर्यंत ठरवलीच गेलेली नाहीत, येत्या काळात ती(लेखांची प्रतवारी, पहारा गस्तीच्या शिस्तबध्द पध्दती, अनेक अवजारे, GUI चे भाषांतर सुधारणे, नकल-डकव सारखे इतर अनेक मुद्दे आहेत.) ठरवली जावीत असे वाटणाऱ्या अनेक सदस्यांपैंकी मी असल्याने मला हा काळ जास्त वाटत आहे.
# 15 दिवसांनी येणारे सदस्य असे कारण सर्वांना जोडून घेणारे वाटत असले तरीही व्यवहार्य कितपत आहे हे मला चाचपडता येत नाहीये.
# शिवाय, टायवीन म्हणत आहेत तसे, कौल प्रक्रियेमध्ये, फ़क्त कौल देण्यासाठी खाती उघडून य़ेणारे सदस्य, हितसंबंधांच्या रक्षणासाठी चर्चा चालवून कौलात खिळ घालणारे सदस्य(पाळीव खातीविकिपीडिया:स्लीपर अकाउंट) यांवर आळा बसावा अशीही काहीतरी व्यवस्था असावी असे वाटते. त्यासाठी कौल देणारे सदस्य थोडा काळ घालवलेले आणि काही संपादने केलेले असे असावेत असे मला वाटते जेणेकरुन, फ़क्त त्या कौलासाठी अचानक समोर येऊन, दीर्घकालीन परिणामाला कारण बनणे थांबवता येईल.
# म्हणून मी 8/10 दिवसांचा कालावधी धोरणे ठरविण्यासाठी पुरेसा असावा असा अंदाज करत आहे, त्यातही दिवस वाढवून घेणे जोडून पहाता ते 15/17 दिवस होतीलच ज्यांत 15 दिवसांनी येणारे लोक सहभागी होतीलच किंवा कधी-कधी नाही होऊ शकणार पण आपण तसेही सर्व सक्रिय सदस्यांचा सहभाग अपेक्षित धरतच नाही काही सदस्यच ध्येय धोरणांच्या चर्चेत आणि जडण-घडणीत सहभागी होतात. फ़ारतर प्रत्येक चर्चेचे मुद्दे मांडणाऱ्या व्यक्तिने आपल्याला वाटत असलेल्या त्या धोरणांशी संब्ंधीत असणाऱ्या/मते असणाऱ्या सदस्यांना साद देणे हा एक रस्ता हातात आहेच. इतरांची मते ऐकायला आवडेल!!!
# दिवस कमी करुन, बाकी प्रक्रिया मला पुर्णपणे मान्य आहे. --Sureshkhole (चर्चा) ०९:०२, २८ एप्रिल २०१८ (IST)[reply]

@सुबोध कुलकर्णी:@आर्या जोशी:@Pushkar Ekbote:@:@Pooja Jadhav:@सुबोध पाठक: आपले बहुमोल मत ध्येय धोरणांच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर नक्की नोदवा. --WikiSuresh (चर्चा) ०९:०७, २९ एप्रिल २०१८ (IST)[reply]

नमस्कार! कौल प्रक्रियेत येणारे विविध मुद्दे अद्याप चर्चिले गेलेले नाहीत आणि त्यावर काम तर करायला हवे आहे. विकीवर अनेक जुने संपादकही आहेत, पण माझा अनुभव असा आहे की असे संपादक सक्रिय नसून केवळ ध्येय धोरणे याबद्दल मते मांडतात आणि स्वतः:ची व्यक्तिगत कुरघोडीही यानिमित्ताने पूर्ण करून घेतात. महिला दिनाच्या निमित्ताने मी टाकलेल्या विनंतीला गृहीत धरून असे काही संपादक मंडळींमध्ये दिसून आले आहे ज्याचे वाईटच वाटले त्यामुळे नियमित काम करणारे-या व्यक्ती या प्राधान्यक्रमात असाव्यात आणि त्यासाठी आठवडाभर पुरेसा आहे. जे प्रत्यक्ष काम करीत आहेत त्यांचा कौल हा अनुभवजन्य असेल. तसेच सर्व चर्च या प्रगल्भतेने व्हाव्या, त्यात वैयक्तिक आकस असू नये. धन्यवाद !आर्या जोशी (चर्चा) १२:१८, २९ एप्रिल २०१८ (IST)[reply]

कौल साठीची मुदत कमीतकमी २१ दिवस व जास्तीतजास्त ३५ दिवस असावी, यावर मी सहमत आहे. कारण विकिपीडियामध्ये केवळ सक्रिय सदस्यांचाच विचार केला जाऊ नये तर आठवड्यातून वा महिन्यातून विकिवर काहीवेळा येणाऱ्या सदस्यांचाही विचार व्हायला हवा. कौल प्रकिया ही कुठे मर्यादित नसून सर्वसमावेशक असावी, त्यासाठी २१-३५ दिवसाचाच कालावधी असणे योग्य आहे.--संदेश हिवाळेचर्चा १६:१७, २९ एप्रिल २०१८ (IST)[reply]

माझे मते कौल मुदत प्रस्तुत प्रकार असावी.

क्रिया चर्चा कौल एकूण
तांत्रिक (विकीवर नवीन गॅजेट/फीचर) N.A
धोरण १०/१७* +७ १७
प्रचालक २१ २१ २१
पान काढण्याची चर्चा/कौल
आपत्कालीन प्रस्ताव (कार्यशाळा/सुरक्षा)
_________________________ ____ ____ ____
*परिस्थितीनुसार बदला
यात दिवस वाढवू जाऊ शकतात

याच बरोबर {{कौल}} साच्यात नवीन परामीटर W (withdraw nomination) ND (not done) आणि D (done) असे सुद्धा असावी. मुदत असणे आवश्यक वाटते परंतु कौल देणारे फक्त विकिपीडियावर भर टाकणारे सदस्य असावे. यासाठी ३० दिवसात ५० संपादने व एकूण मराठी विकिपीडियावर ५०० संपादन केलेले सदस्य फक्त कौल देतील अशी व्यवस्था असावी. चर्चा/मत देण्यात काहीही अडथळा/पबंदी नसावी, यांनी नवीन सदस्यांना कौल प्रक्रियेत शामिल होण्यास संधी मिळेल. प्रचालकांना अपात्र असलेली कौल strikeout करण्यास अधिकार असावा. @अभय नातू: यांनी यावर सुद्धा सोचावे व इतर सदस्यांचे मत सुद्धा विचारात घेऊन पुन्हा या प्रस्तावाची रचना करावी. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १०:३४, ३० एप्रिल २०१८ (IST) @अभय नातू: यावर अंतिम निर्णय घ्या --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १०:२३, २५ मे २०१८ (IST)[reply]

या प्रस्तावावर फक्त दोन मते पडली आहेत. मला वाटते की हा प्रस्ताव साइटनोटिसवर घालून अधिक मते मागावी.
अभय नातू (चर्चा) १९:३३, २५ मे २०१८ (IST)[reply]
@अभय नातू: या प्रस्तावाला अंतिम निर्णय घ्यावा अशी पुन्हा मागणी --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १९:१७, २२ जुलै २०१८ (IST)[reply]

@आर्या जोशी, Pooja Jadhav, आणि :@करिश्मा गायकवाड, Aditya tamhankar, आणि नरेश सावे: पुन्हा आवाहन:या प्रस्तावावर कृपया आपले मत व कौल द्यावे--टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १५:४८, १ ऑगस्ट २०१८ (IST)[reply]

कौल

निकाल

प्राथमिक पाहणीनुसार हा प्रस्ताव ५-० अशा मतदानाने मंजूर झाला आहे. -- अभय नातू (चर्चा) ०५:०६, २ ऑगस्ट २०१८ (IST)[reply]

@अभय नातू: प्रस्ताव मंजूर केल्याबद्दल धन्यवाद. कृपया एक वेगळे पान तयार करून नवीन कौल प्रक्रिया बदल माहिती द्यावे अशी विनंती. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ०५:४७, २ ऑगस्ट २०१८ (IST)[reply]

हे धोरण येथे लिहिलेले आहे. -- अभय नातू (चर्चा) ०८:०५, २ ऑगस्ट २०१८ (IST)[reply]