विकिपीडिया:कौल/प्रचालक/जुने कौल
माहितगार १५:३७, ९ डिसेंबर २००९ (UTC)
- सुलभीकरण आणि अतीतातडीची वगळण्याजोगी पाने नजरेस पडल्यास ती तातडीने हटवता यावीत या साठी हि प्रचालकपदास समर्थन मिळावे हि विनंती .माझे मराठी विकिपीडियावरील योगदान माहितगार १५:३८, ९ डिसेंबर २००९ (UTC)
|
|
|
|
विरोध किंवा चर्चेसाठी प्रस्ताव न आल्यास माहितगार यांना जानेवारी १, २०१०नंतर प्रचालपद देण्यात येईल.
अभय नातू २२:२४, २८ डिसेंबर २००९ (UTC)
माहितगार हे आता मराठी विकिपीडियावरील प्रचालक आहेत.
माहितगार, अभिनंदन आणि वाढीव जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळण्यासाठी शुभेच्छा.
अभय नातू २०:३५, १ जानेवारी २०१० (UTC)
செ.प्रसन्नकुमार ०७:३६, ११ जुलै २०१० (UTC)
- प्रचालकपदासाठी अर्ज :नमस्कार विकिपीडियन मंडळी,
मी प्रसन्नकुमार आपणास ह्याद्वारे विनंतीअर्ज करतो कि मला मराठी विकिपीडियावरील प्रचालकपदाचे अधिकार मिळावेत,आपण याठिकाणी आपली प्रतीक्रिया/प्रतीसाद खाली ह्या अर्जाच्या शेवटी मांडून आपले मत कळवावे.तत्पूर्वी माझा लहानसा परिचय, मी गेल्या वर्षी १ सप्टेंबर २००९ रोजी मराठी विकिपीडियावर नाव नोंदवून संपादनास आरंभ केला.जवळपास ११ महिन्यांच्या अनुभवानंतर मी मराठी विकिपीडियावर चांगलाच रूळलो आहे, मला असे वाटते कि मी प्रचालकपदाची जबाबदारी घेऊन मराठी विकिपीडियावरील माझे योगदान अधिक चांगले करू शकेन,आत्तापर्यंत आपले सहकार्य लाभले आहेच ,इथून पुढे ते वृद्धिंगत होईल अशी आशा करतो.माझ्या योगदानाविषयी अधिक माहितीसाठी माझे सदस्यपृष्ठ पहावे :
सदस्य:Prasannakumar
- माझे योगदानः विशेष:योगदान/Prasannakumar
,कळावे लोभ असावा.धन्यवाद.செ.प्रसन्नकुमार ०७:३६, ११ जुलै २०१० (UTC)
तुमचे मत खालील तक्त्यात मांडा.
- येथील कौलाचा निकाल मला साधारणपणे कधी कळू शकेल आणि कुठे? Che Prasannakumar ०७:५३, १५ जुलै २०१० (UTC)
|
|
|
वि. नरसीकर (चर्चा) ०७:३१, १८ ऑगस्ट २०१० (UTC)
नमस्कार ! विकिवरील वाढलेला कामाचा व्याप लक्षात घेता, रेंगाळलेली महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचे दृष्टीकोनातुन, माहितगार यांचेशी माझेचर्चापानावर व चावडीवर झालेल्या चर्चेनुसार मी प्रचालकपदासाठी अर्ज करीत आहे.आपले समर्थन द्यावे ही नम्र विनंती.
- माझे योगदान येथे बघता येईल.
|
|
|
|
|
|
वि. नरसीकर (चर्चा) ०७:३१, १८ ऑगस्ट २०१० (UTC)
नरसीकर हे आता मराठी विकिपीडियावरील प्रचालक आहेत.
नरसीकर, अभिनंदन आणि वाढीव जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळण्यासाठी शुभेच्छा.
नमस्कार,
मला स्वत:ला विकि खूप efficient system वाटते व हि system समजुन घेण्यात मला खूप interest आहे. कदाचित प्रचालक झाल्यानंतर मला हि system समजण्यास मदत होइल व सध्या साच्यामध्ये येणार्या अडचणी तसेच विविध ब्राउजर्स मध्ये येणारे formating errors मी कदाचीत योग्य रितीने सोडवू शकेल. ह्या कारणासाठी मी प्रचालक होउ इच्छितो.
मी प्रचालकपदासाठी अर्ज करीत आहे.आपले समर्थन द्यावे ही नम्र विनंती.
- माझे योगदान येथे बघता येईल.
|
|
|
|
|
Maihudon ०७:५७, १८ ऑगस्ट २०१० (UTC)
डॉन हे आता मराठी विकिपीडियावरील प्रचालक आहेत.
डॉन, अभिनंदन आणि वाढीव जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळण्यासाठी शुभेच्छा.
मराठी विकिपीडियावर २,१००+ संपादने (१० नोव्हेंबर, इ.स. २०११ रोजी) असलेले सदस्य Mvkulkarni23 यांनी मराठी विकिपीडियावर आजवर उत्साहवर्धक योगदान केले असून विकिमीडिया इंडिया प्रतिष्ठानाच्या उपक्रमांमार्फत मराठी विकिसमुदायासाठी उपयुक्त ऑफलाइन उपक्रम राबवण्याच्या कामांतही पुढाकार घेतला आहे. त्यांनी ऑनलाइन व ऑफलाइन पातळ्यांवर मराठी विकिसमुदायातील सदस्यांना अनेक प्रकारे साह्य पुरवले आहे. मुंबई, महाराष्ट्र येथे होणार्या आगामी विकिसंमेलन भारत २०११ उपक्रमांतर्गत "मराठी ट्रॅक" या कार्यक्रमासाठी ते समन्वयकाची भूमिका पार पाडत आहेत. प्रशासकीय कामे करण्यासाठी त्यांना सोयीस्कर जावे म्हणून त्यांना मराठी विकिपीडियावर प्रचालकपद देण्यात यावे, असा प्रस्ताव मी मांडत आहे. सदस्यांनी या प्रस्तावावर आपला कौल कृपया येथे नोंदवावा.
- मंदार कुलकर्णी यांचे योगदान येथे बघता येईल.
|
|
|
|
|
|
|
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:४१, १० नोव्हेंबर २०११ (UTC)
मंदार कुलकर्णी हे आता मराठी विकिपीडियावरील प्रचालक आहेत.
मंदार, अभिनंदन आणि वाढीव जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळण्यासाठी शुभेच्छा.
अभय नातू ०५:४२, १२ नोव्हेंबर २०११ (UTC)
मराठी विकिपीडियावर २,७००+ संपादने (१० नोव्हेंबर, इ.स. २०११ रोजी) असलेले सदस्य Rahuldeshmukh101 यांनी मराठी विकिपीडियावर आजवर उत्साहवर्धक योगदान केले असून विकिमीडिया इंडिया प्रतिष्ठानाच्या उपक्रमांमार्फत मराठी विकिसमुदायासाठी उपयुक्त ऑफलाइन उपक्रम राबवण्याच्या कामांतही पुढाकार घेतला आहे. त्यांनी ऑनलाइन व ऑफलाइन पातळ्यांवर मराठी विकिसमुदायातील सदस्यांना अनेक प्रकारे साह्य पुरवले आहे. मुंबई, महाराष्ट्र येथे होणार्या आगामी विकिसंमेलन भारत २०११ उपक्रमांतर्गत "मराठी ट्रॅक" या कार्यक्रमासाठी ते समन्वयकाची भूमिका पार पाडत आहेत. प्रशासकीय कामे करण्यासाठी त्यांना सोयीस्कर जावे म्हणून त्यांना मराठी विकिपीडियावर प्रचालकपद देण्यात यावे, असा प्रस्ताव मी मांडत आहे. सदस्यांनी या प्रस्तावावर आपला कौल कृपया येथे नोंदवावा.
- राहुल देशमुखांचे योगदान येथे बघता येईल.
|
|
|
|
|
|
|
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:४१, १० नोव्हेंबर २०११ (UTC)
राहुल देशमुख हे आता मराठी विकिपीडियावरील प्रचालक आहेत.
राहुल, अभिनंदन आणि वाढीव जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळण्यासाठी शुभेच्छा.
अभय नातू ०५:४३, १२ नोव्हेंबर २०११ (UTC)
मराठी विकिपीडियावर ११,५००+ संपादने (१२ नोव्हेंबर, इ.स. २०११ रोजी) असलेले सदस्य Abhijitsathe यांनी मराठी विकिपीडियावर आजवर उत्साहवर्धक योगदान केले असून विकिपीडियावरील पायाभूत तांत्रिक सुविधांसाठी (साचे वगैरे) त्यांनी मराठी विकिसमुदायाला अनेक प्रसंगी साह्य पुरवले आहे. मराठी विकिपीडियाच्या आशयसमृद्धीसाठी त्यांनी केलेल्या घसघशीत योगदानाची माहिती बहुसंख्य सदस्यांना आहेच. त्यांच्या आजवरच्या योगदानाचा परिणामकारक व अधिकाधिक लाभ मराठी विकिपीडियास व्हावा, म्हणून त्यांना प्रचालकपद देण्यात यावे, असा प्रस्ताव मी मांडत आहे. सदस्यांनी या प्रस्तावावर आपला कौल कृपया येथे नोंदवावा.
- अभिजित साठे यांचे योगदान येथे बघता येईल.
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०३:१७, १२ नोव्हेंबर २०११ (UTC)
Wow, this is truly amazing... I did not ask for this role in the first place. तरीही नमूद करावेसे वाटते की १० ऑक्टोबर २०११ पासून येथे १७ संपादने केलेल्या Bhimraopatil ह्यांना मी भांडखोर वाटतो तर ३ नोव्हेंबर २०११ पासून २८ संपादने पार पाडलेल्या हिंदी भाषिक Lucky ह्यांना मी immature वाटतो!! ह्या दोघांव्यतिरिक्त इतर जुन्या सर्व सदस्यांनी पाठिंबा व्यक्त केला आहे. मजेशीरच आहे एकूण!! - Abhijitsathe १७:५०, १८ नोव्हेंबर २०११ (UTC)
- ये बड़े दुःख की बात है की अब मराठी विकिपीडिया सदस्य साठे अपनी राजनितिक स्वार्थ केलिए हिंदी भाषिक सदश्योंको पॉइंट आउट कर रहे है | यहा विरोधी मतप्रदर्शन करने वाले सदस्योके बायोडेटा देकर सठेजी आपने अद्ध्ऊपर दी गई टिप्पणिया शत प्रतिशत सही है ये सिद्ध करनेमे सहय्त्ता तो नहीं कररहे है ? किसीभी निर्वाचन प्रक्रिया में निष्पक्ष चुनाव होना चाहिए, यहा दबाव बनानेकी कोशिश लोकशाही के खिलाफ है | प्रचालाकजी साठे को दंडित किया जाना चाहिए और चयन प्रक्रियामे गड़बड़ी और धान्द्ली के चलते उनका नामांकन रद्द करनेकी कृपा करे | लकी ०१:३१, १९ नोव्हेंबर २०११ (UTC)
- लकी,
- आपल्याच सल्ल्यानुसार भडक वक्तव्ये करुन चर्चेला नको वळण लावू नका.
- तुमच्या मताविरुद्ध सूचना केल्याबद्दल आता मलाच राजनीतीज्ञ ठरवू नका म्हणजे झाले.
- अभय नातू ०१:४२, १९ नोव्हेंबर २०११ (UTC)
तसे बघता ८ विरुद्ध २ मते म्हणजे बहुमतच कि!८० टक्के होय म्हणतात तर २० टक्के नाही.जुन्या ८० टक्क्यांच्या मताचा आदर करावयास हवा असे माझे मत आहे. वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १३:३५, २० नोव्हेंबर २०११ (UTC)
- सदस्य मेश्राम (सदस्य:meshram) आपण जातीपातींचे निकष न लावता कामाचे मुद्दे लिहावेत, अशी विनंती. जातीपातींवरून आपण याआधीही टिप्पण्या केल्या आहेत, तश्या येथून पुढे करू नयेत. अन्यथा अशी कृती विकिपीडियाच्या धोरणांनुसार कारवाई करण्याचे आमंत्रण ठरेल, याची नोंद घ्यावी. --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १०:१६, २४ नोव्हेंबर २०११ (UTC)
- आताही बहुमत ७२.७२% आहेच कि.
वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १३:४२, २४ नोव्हेंबर २०११ (UTC)
- अनेक दिवस/आठवडे रेंगाळलेला हा कौल पुढील २४ तासांत निकालात काढण्यात येईल. त्यावेळी होय/नाही कौलाच्या बाजूने ठोस (आणि compelling[मराठी शब्द सुचवा]) कारणे नसल्यास बहुमत काय आहे हे पाहून प्रचालकपद देण्यात (किंवा न देण्यात) येईल.
- अभय नातू १९:२६, २४ नोव्हेंबर २०११ (UTC)
वरील कौलाप्रमाणे अभिजित आता प्रचालक आहेत. अभिजित, वाढीव जबाबदारीसाठी शुभेच्छा. नेहमीप्रमाणे मदत लागल्यास कळवालच.
अभय नातू ०२:११, २ डिसेंबर २०११ (UTC)
माहितगार mahitgar resquest support poll for CheckUser and Oversight
- विकिपीडिया:कौल/सदस्यत्व तपासनिस येथे स्थानांतरीत
मराठी विकिपीडियावर कार्यरत असलेले सदस्य संतोष दहिवळ यांनी मराठी विकिपीडियावर आजवर उत्साहवर्धक योगदान केले असून विकिपीडियावरील पायाभूत तांत्रिक सुविधांसाठी (साचे वगैरे) त्यांनी मराठी विकिसमुदायाला अनेक प्रसंगी साह्य पुरवले आहे. मराठी विकिपीडियाच्या आशयसमृद्धीसाठी त्यांनी केलेल्या घसघशीत योगदानाची माहिती बहुसंख्य सदस्यांना आहेच. त्यांच्या आजवरच्या योगदानाचा परिणामकारक व अधिकाधिक लाभ मराठी विकिपीडियास व्हावा, म्हणून त्यांना प्रचालकपद देण्यात यावे, असा प्रस्ताव मी मांडत आहे. सदस्यांनी या प्रस्तावावर आपला कौल कृपया येथे नोंदवावा.
- संतोष दहिवळ यांचे योगदान येथे बघता येईल.
|
|
|
|
|
|
संतोष दहिवळ हे आता मराठी विकिपीडियावरील प्रचालक आहेत. Mrwiki reforms (चर्चा) १७:०५, १० फेब्रुवारी २०१३ (IST)
- Sorry, my fault. Mahitgar should have made this announcement. - अभिजीत साठे (चर्चा) २३:३८, १० फेब्रुवारी २०१३ (IST)
- The perfect politics is ON here. Irrespective of the opposition of many members noted since last 3-4 months, Santosh Dahiwal is been made admin.
Reasons -
- 1. Internal setting of Mahitgar and Santosh,
- 2. Mahitgar came on back foot due to pressure from Santosh. check विकिपीडिया:चावडी/अधोगती
- 3. Mahitgar could not push his XXXX सदस्य:Czeror, so now pushed another one - Santosh Dahiwal.
- 4. Teri bhi tuch meri bhi chup
Santosh Dahiwal and Manitgar, Better resign now itself before it takes more deep drilled..... Polkhol (चर्चा) १०:२५, ११ फेब्रुवारी २०१३ (IST)
- वा वा, कालच संतोष दहिवळ प्रचालक झाले व आज राजीनाम्याची मागणी देखील आली!!! - अभिजीत साठे (चर्चा) ११:१९, ११ फेब्रुवारी २०१३ (IST)
Primary contribution is towards building tools and bots specific to Marathi language wikis. Currently running User:निनावी bot for spell check and URL redirection updates. Tools for helping administrative tasks like mediawiki extension configuration and basic testing, fixing pages according to new UNICODE standards, and other gardening tasks are planned in future. Hence request for sysop privilege.
|
|
|
|
|
|
शंतनुच्या लहान मुला प्रमाणे वागण्याचे नमुने,
- विकिसोर्स वर सदस्य नितिन कडूला बॅन केले कारण preventive measure. refer block on enwiki. copyright violator. posted content already available on http://shivdharmaprakatan.blogspot.in/ and http://shivadharma.wordpress.com/bhumika/
- आता सदस्य नितिन कडूने केलेली संपादने १३ (संपादन माहिती)
- त्यात त्यांची सर्वात मोठी चुक म्हणजे त्यांनी मंदार कुलकर्णीला प्रचालक होण्यासाठी विरोध दर्शवीला Sysop. महत्वाची गोष्ट म्हणजे विकि चौकटी बाहेरील विचारवंत नेहमी प्रमाणे आपल्या कंपूतील सवंगड्य्यांना मदत करण्यासाठी आले होते.
- ह्या कारणामुळे नितिन कडूंना जन्म भरासाठी विकि सोर्स वरून बॅन करण्यात आले.
- नात्या गोत्यातुन मराठी विकिला सोडवण्यासाठी अश्या सदस्यांना विकि पासुन दुर ठेवलेलेच बरे.
Mrwiki reforms (चर्चा) २२:१५, २३ ऑक्टोबर २०१२ (IST)
सर्व समावेशकत्वाचा अभाव असलेल्या मराठी विकिपीडियाला सर्वांचा समावेश असलेला ज्ञानकोश बनवण्यासाठी तसेच सर्व समावेशकत्वाचा विचार करणारी प्रचालकांची नवी पिढी तयार करण्यासाठी नात्या गोत्यात न गुंतलेल्या व स्वतंत्र विचार असणाऱ्या प्रचालकांची आवश्यकता मराठी विकिपीडियाला आहे.
वरिल कारणांमुळे मी भीमरावमहावीरजोशीपाटील यांचे नाव प्रचालक पदासाठी सुचवत आहे. आपले समर्थन देउन मराठी विकि सर्व समावेशक करण्यासाठी ह्या पहिल्या पावलात आपण योगदान द्यावे हि नम्र विनंती.
Mrwiki reforms (चर्चा) २१:२०, २ ऑक्टोबर २०१२ (IST)
|
|
|
सदस्य:Czeror
मराठी विकिपीडिया प्रशासकांशी प्रचालकांशी इतर सदस्यांशी विकिपीडिया बाहेर परिचय नसलेल्या व्यक्तिंचा सुद्धा ऑन मेरीट प्रचालक पदी निवड करण्याची मराठी विकिपीडियाची परंपरा राहीली आहे.या परंपरेची विशेष आठवण देत मी सदस्य:Czeror यांचे प्रचालक पदाकरिता नामांकन करीत आहे. त्यांनी प्रचालक पद स्विकारण्यास स्विकृती दिल्यास आणि इतर सदस्यांची सहमती असल्यास त्यांची प्रचालक पदी नेमणूक केली जाईल. माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:२३, २३ नोव्हेंबर २०१२ (IST)
- सदस्य:Czeror
- विशेष:योगदान/Czeror
- सदस्य चर्चा नामविश्वातील योगदान
- विकिपीडिया नामविश्वातील योगदान
- विकिपीडिया:जाणते
- सदस्य:संतोष दहिवळ/List of Wikipedians by number of edits
|
|
|
|
Tiven2240 (चर्चा · संपादने · वगळलेली सदस्य संपादने · अलीकडील क्रियाकलाप · नोंदी · रोध नोंदी · वैश्विक संपादने · एसप्रमाहिती)
मी टायवीन (सदस्य:Tiven2240), मराठी विकिपीडियाच्या 'प्रचालक' पदासाठी नामनिर्देशित करू इच्छितो. मी काही वर्षांपूर्वी विकिपीडियामध्ये सामील झालो आहे आणि जागतिक स्तरावर २०,००० पेक्षा अधिक संपादनांचे योगदान दिले आहे. मी मराठी विकिपीडियाचे संपादन करत असून प्रशासकीय सूचना मंडळासह तसेच मदत डेस्कवर सक्रिय आढळतो. मी मराठी विकिपीडिया, विकिस्रोत आणि विक्शनरी सुधारित मुख्य पानाच्या मागील एक व्यक्ती आहेत. माझ्याकडे विकीमिडिया कॉमन्स आणि अन्य विकिपीडिया यावरील बऱ्याच उपयोगकर्त्यांचे व मराठी विकिस्रोतवर प्रचालक हक्क आहेत. मी मराठी विकिपीडिया कार्यशाळा आणि इव्हेंट्ससाठीही सक्रिय आहे. मराठी भाषा गौरव दिवस, महिला edit-a-thon, मंत्रालयाच्या कार्यशाळेत मी पूर्ण भरीव योगदान दिले आहे. गेल्या दोन वर्षांपासून विकिपीडिया आशियाई महिन्याचे मराठी विकिपीडियावरील मी एकमेव संयोजक आहे. उपभोक्ता चित्रे राखणे, इतर सदस्यांना मदत करणे आणि गॅझेटवर काम करणे हे माझे आवडते क्षेत्र आहे. मी मराठी विकिपीडियासाठी बॉट खात्यावरही कार्यरत आहे. असाप्रकारे माझ्या कामाचा तपशील आहे. प्रचालक उमेदवार म्हणून मला मत देण्यासाठी मराठी विकिपीडिया समुदायापुढे प्रस्ताव मांडतो. --टायवीन२२४०माझ्याशी बोला ०८:५९, १४ फेब्रुवारी २०१८ (IST)
चर्चा
@अभय नातू: कृपया हे कौल समाप्त करण्यासाठी अंतिम तारीख द्या --टायवीन२२४०माझ्याशी बोला १६:००, २ एप्रिल २०१८ (IST)
- या कौलासाठी १० दिवसांची मुदत देत आहे. १४ एप्रिल, २०१८ला २३:५९:५९ पर्यंतचे कौल ग्राह्य धरण्यात येतील.
- अभय नातू (चर्चा) ०८:४०, ४ एप्रिल २०१८ (IST)
नमस्कार, @Tiven2240:
आपल्या प्रचालकाच्या प्रस्तावात एका मुख्य मुद्यावरून विरोध आले आहेत. हा मुद्दा आपल्या मराठी भाषेबद्दल व तिच्या परिपक्वतेबद्दलचा आहे. याबद्दल आपण काय टिप्पणी द्याल ?--संदेश हिवाळेचर्चा १४:०१, १० एप्रिल २०१८ (IST)
- @संदेश हिवाळे: मी स्वत: अगदी स्पष्ट केले आहे की मी एक व्यक्ती आहे जो मुंबईचा निवासी आहे. मी ईस्ट-इंडियन भाषा बोलते जी मराठीची बोलीभाषा आहे. मी १४ वर्ष इंग्लिश माध्यमातून शिकलो. त्यामुळे काही वेळा मला भाषा समजणे व बोलणे कठीण वाटते.
- सदस्यांनी विरोध केली कारण की, विकी मध्ये काही भले योगदान नाही जसे नवीन धोरण तयार करणे, नवीन सदस्यांचे मार्गदर्शन करणे, चर्चेत सहभागी होणे, इत्यादी. हे खरेच नाही कारण मी चॅवडीवर सतत योगदान करत आहे, मी सदस्यांशी चर्चा करतो आणि मी अनेक लोकांना मदत केंद्रात मदत केली आहे
- मी डिसेंबर २०१७ पासून मराठी विकिस्रोतवर प्रचालक आहे आणि माझ्याजवळ पुरेसे प्रचालकीय कौशल्य आहे. मी विकिपीडियावर केवळ गप्पा मारण्यासाठी नव्हे तर विकिपीडियावर काम करण्यासाठी स्वत: नामनिर्देशित केले आहे. यासाठी भाषा असे विरोध आले अशी अपेक्षा नोहती. माझ्यासाठी ही भाषा प्रेम आहे. पूर्वीपासून मी भाषेबद्दल फारशी बदल केली आहे व मराठी लोक, समाज व भाषा सोबत घेऊन विकिपीडियाला एक नवीन दिशा देऊ अशी आशा आहे.अखेर बायबल पासून एक वाक्यांश नोंदविण्यास इच्छितो "माणूस त्याला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्याबद्दलच्या योजना करु शकतो. पण काय घडेल ते मात्र परमेश्वरच ठरवतो." --नीतिसूत्रे १६:९ --टायवीन२२४०माझ्याशी बोला २३:३८, १० एप्रिल २०१८ (IST)
आपल्या अभिप्रायासाठी धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा १३:३४, ११ एप्रिल २०१८ (IST)
कौल
- विरोध- विरोध . - Nankjee
- पाठिंबा- माझे समर्थन आहे. - संदेश हिवाळे
- विरोध- विरोध . - Kamble
- विरोध - संतोष दहिवळ
- विरोध- टायवीन यांंचे योगदान मला माहिती आहे त्याबद्दल माझ्या मनात अजिबातच शंंका नाही.काही लेखांंचे कामही आम्ही एकत्र केले आहे.परस्परांंशी आमच्या चर्चाही होतात. तथापि मराठी भाषेसंंदर्भातील त्यांंचे व्याकरणदृृष्ट्या काम हे काहीसे कमी प्रतीचे आहे.क्षमस्व! पण अनुभवातून हे जाणवले आहे. ज्या भाषेच्या व्यासपीठासाठी आपण महत्वाची व्यक्ती म्हणून काम करू इच्छितो त्या भाषेची गुणवत्ता पाळणेही प्रचालकासाठी आवश्यक आहे आणि ह्याकडे गौण मुद्दा म्हणून दुर्लक्ष करून चालणार नाही असे मला वाटते.तथापि त्यांंना सुधारणेला नक्की वाव आहे आणि ते प्रयत्नही करतीलच.मी येथे विरोध नोंदवते आहे.. - आर्या जोशी
- पाठिंबा - Rohini
- विरोध- विरोध आहे . - Priya Hiregange
- पाठिंबा- माझे समर्थन आहे, सायटोईडचे काम करताना ओळख झाली, नक्कीच आपण जर प्रचालक पदावर आलात तर पुढील विकास सहज केले जाऊ शकतील.. - sureshkhole
- पाठिंबा- नवख्या सदस्यांतूनही प्रचालक हवेत. टायविन यांना अनुभव आहे आणि टेक्निकली देखील ज्ञान आहे. मराठी विकिपीडियावरील प्रचालकांची संख्या वाढायला हवी.. - प्रसाद साळवे
- विरोध- प्रचालक म्हणून केवळ तांत्रिक ज्ञान पुरेसे नाही.त्याशिवाय -संवाद घडविणे, चर्चांना हाताळणे,नवीन दिशा देणे,विकीतत्वे अंमलात आणणे,लेखनावर लक्ष ठेवणे अशा अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात असे वाटते. त्यांस टायविन हे न्याय देऊ शकणार नाहीत हे माझे मत आहे. त्यांना तांत्रिक योगदान करण्यासाठी मी आवाहन करत आहे.पूर्वी अनेक सदस्यांनी तांत्रिक कामे केली आहेत, पण सध्या असे मनुष्यबळ कमी दिसत आहे.. - सुबोध कुलकर्णी
- पाठिंबा - विनायक कटक
- विरोध- टायविन यांनी तांत्रिक कामात चांगले योगदान केलेले दिसते. पण मराठी विकिपीडियावर प्रचालक म्हणून काम करण्यासाठी आवश्यक तितके मराठी भाषेवरील प्रभुत्व त्यांच्याकडे दिसत नाही. तसेच प्रचालकपदाची जबाबदारी पार पाडण्यासाठी लागणारी पुरेशी परिपक्वता त्यांच्याकडे नाही, असे वाटते. . - ज्ञानदा गद्रे-फडके
- विरोध- सुबोध कुलकर्णी आणि ज्ञानदा गद्रे यांच्या मताशी मी सहमत आहे.. - प्रथमेश ताम्हाणे
- पाठिंबा- माझे समर्थन आहे. तांत्रिक कामांची गती आपणांस प्रचालक पद मिळाल्यास वाढेल. याशिवाय आपल्यामुळे अनेक तांत्रिक साधने मराठी विकिपीडियावर येतील याबद्दल विश्वास आहे. त्याबद्दलची आपली कुवत आपण आपल्या सायटॉईड वरील कामातून सिद्ध केली आहे असे मला वाटते.. - Pushkar Ekbote
- पाठिंबा - Dagduba lokhande
- विरोध- विरोध . - Jayram
- विरोध- विरोध आहे . - Lucky
- पाठिंबा- sureshkhole आणि प्रसाद यांच्या मताशी मी सहमत आहे. माझे समर्थन आहे. - Hrithik2908
- विरोध- श्री टायविन यांनी केलेले तांत्रिक काम महत्वाचे आहे आणि उपयुक्त पण तरीही मला असे वाटते कि तांत्रिक बाबींपेक्षा हे भाषेचे व्यासपीठ म्हणून जास्ती महत्वाचे आहे. भाषेवर प्रभुत्व हा प्रचालक पदासाठी आवश्यक गुण आहे. केवळ तांत्रिक बाबींसाठी काही पद असेल ते श्री टायविन यांना जरूर द्यावे कारण हा माणूस प्रचंड उत्साही आहे.. - सुबोध पाठक
- पाठिंबा- माझे समर्थन आहे. येथे सध्या कुशल व तांत्रिक माहिती असणाऱ्या सक्रीय प्रचालकांची वानवा आहे.तांत्रिक कामासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ हवे. भाषाशुद्धी व व्याकरण हे मुद्दे तांत्रिक कार्यापुढे जरा गौणच ठरतात.ते (भाषाशुद्धी व व्याकरण) हवे असल्यास दुरुस्तही करता येतात.तसे आढळल्यास कोणी इतर ते काम करू शकतो. तांत्रिक काम सर्वांना जमण्यासारखे नाही.टायविन यांचे तांत्रिक योगदान बघता त्यांच्या इतर बाबींकडे काणाडोळा करुन त्यांना हे पद बहाल करावे असे माझे मत आहे. सध्या सक्रीय प्रचालक नाहीत. अस्वास्थ्यामुळे मी देखील पुढे कितपत योगदान करू शकेन याबद्दल साशंकता आहे.मग कामाचा वाढलेला ताण बघता,(जो सध्या अभय यशस्वीपणे हाताळत आहेच), अजून कोणीतरी तांत्रिकदृष्ट्या सक्षम माणूस सहाय्यासाठी हवा.या कारणासाठी टायवेन यांना माझे समर्थन आहे. ते, हे पद योग्य जबाबदारीने हाताळतील असे वाटते.यासाठी वाटल्यास,काही कालावधीसाठी त्यांना हे पद बहाल करावे, त्याचा आढावा घेत रहावा व त्या ठरविलेल्या कालावधीनंतर (सहसा ३-६ महिने), त्यानंतर पुढे त्यांचे प्रचालकपद सुरू ठेवायचे अथवा काढायचे याचा पुनर्विचार करता येईल. त्यांनी प्रचालक म्हणून केलेल्या योगदानाचे एक वेगळे पान तयार करावे म्हणजे आढावा घेण्यास कोणासही सोपे जाईल.--वि. नरसीकर , (चर्चा) १५:४४, १४ एप्रिल २०१८ (IST). - V.narsikar
- पाठिंबा- मराठी विकिला प्रचालकांची गरज आहे, आणि मला टायवेन या पदासाठी योग्य वाटतात. मराठी भाषेवर जास्त प्रभुत्व नसतानी ते मराठी विकिपीडियाला पुढे नेऊ शकतात.. - Vijay bramhane
- पाठिंबा- माझे सुद्धा पूर्ण समर्थन आहे. - Ravindraphule
निकाल
प्राथमिक पाहणीनुसार ११-११ असे मतदान झालेले आहे. -- अभय नातू (चर्चा) ०३:३९, १५ एप्रिल २०१८ (IST)
- @अभय नातू: नमस्कार, ११-९ असे मतदान झालेले असून मी आपल्या निकालाशी सहमत नाही. कारण मतदानाचा वेळ १४ एप्रिल पर्यंत होता, मात्र २ सदस्यांची ( @Jayram आणि Kamble: ) मते १५ एप्रिल रोजीची आहे, कृपया याची नोंद घ्यावी. धन्यवाद.--संदेश हिवाळेचर्चा ०६:५५, १५ एप्रिल २०१८ (IST)
- @Tiven2240: यांचेसाठी ११-९ असे मतदान झालेले आहे असे दिसते म्हणून टायविन यांना प्रचालक पद बहाल करण्यास @अभय नातू: यांनी द्वितीय पाहणी करून आपले मत नोंदवावे. प्रसाद साळवे (चर्चा) १९:५५, १५ एप्रिल २०१८ (IST)
- आदरणीय सदस्य, जर आपण सध्या मतदानास पाहिल्यास ते २२ मते दाखवते. विकिपीडिया कौल प्रक्रियात प्रचालक कौल मध्ये ही सर्वात मोठे कौल आहे कारण असे मत पूर्वी कधीही दिसत नाही. जर आपण या मतांचा स्पष्टपणे अभ्यास केला तर आम्हाला असे वाटेल की मतदान काळात केवळ २० मते तयार करण्यात आली आहेत. बाकी दोन निर्धारित वेळेनंतर आहेत. या २० मतांमध्ये ११ समर्थन आहेत आणि ९ विरोध आहेत. जे ५५% समर्थन आहे. विरोध करणारे सदस्य जसे jayram Lucky kamble Nankjee हे सर्व स्लीपर अकाउंट आहेत. जर यांचे मत सुद्धा काढले की ६८% समर्थ येते. सद्या स्लीपर अकाउंट यांच्यासाठी काहीही धोरण निश्चित करण्यात आले नाही पण हे दुसरे मत आहे ज्यात यांच्या उपयोग केले आहे. प्रचालकांचा इतिहास पाहिले की कळते २०१३ नंतर कोण्ही नवीन प्रचालक झाले नाही. काही नवीन व जुने सदस्यांनी माझ्यासाठी विरोधात भाषेबद्दल टिपणी केली आहे त्यांचा मी आभारी आहे मी जरूर त्यावर काम करेल. सद्या आदरणीय प्रचालक V.narsikar यांच्या मते नुसार मी ६ महिन्याच्या तात्पुरता प्रचालकपद स्वीकार करतो आणि या मतदान प्रक्रियेत व्यत्यय आणण्याचे वेगवेगळे मार्ग वापरण्याचा प्रयत्नही करणार्या लोकांसाठी मला फार वाईट वाटते, ते अयशस्वी झाले. शेवटचे पण किमान नाही, मी बायबल शब्द उद्धृत करू इच्छितो कोणीही वाईटाची फेड वाईटाने करु नये म्हणून लक्षात ठेवा. परंतु नेहमी एकमेकांचे आणि सर्व लोकांचे चांगले करण्याचा प्रयत्न करा.-१ थेस्सलनीकाकरांस - अध्याय ५:१५. या शब्दांसह मी माझे विधान निष्कर्ष काढतो. २० मते = २० माझी वय. १६ दिनांक प्रचालक पदाचा = १६वी लोकसभा कार्यकाळ. ५ पक्के विरोध = ५ वर्ष कोण्ही प्रचालक झाले नाही. चला आपण सर्व मिळून विकिपीडियाला एक नवीन वेग देऊया विषणकोष वाढूया. आपणांसी जे जे ठावे, ते इतरांसी सांगावे; शहाणे करोनी सोडावे, सकलजन. --टायवीन२२४०माझ्याशी बोला ०७:२६, १६ एप्रिल २०१८ (IST)
- १. या पानाचा इतिहास बारकाईने न्याहाळला असता लक्षात येते की सदस्य Jayram आणि सदस्य Kamble यांची मते पूर्वी जाहीर केलेल्या मुदती नंतर (१४ एप्रिल, २०१८ - २३:५९:५९) नंतर पडलेली आहेत (उजवीकडील चित्र पहा.) असे असता ही मते ग्राह्य धरली जाऊ शकत नाहीत.
- १.१ परिणामी कौल ११-९ असा Tiven2240 यांच्या पदरात पडला आहे.
- २. सदस्य Tiven2240 यांनी सदस्य-प्रचालक V.Narsikar यांनी सुचविल्यानुसार सुरुवातीस सहा महिने प्रचालकपद घेण्याचे मंजूर केले आहे.
- ३. यावरुन सदस्य Tiven2240 यांना १६ एप्रिल, २०१८ रोजी सहा महिन्याकरिता मराठी विकिपीडियावर प्रचालकपद देण्यात येत आहे.
- ४. साधारण १५ सप्टेंबर, २०१८च्या सुमारास येथील प्रचालक Tiven2240 यांच्या प्रचालकपदी कायमीकरण करण्यासाठी कौल घेण्याची प्रक्रिया सुरू करतील.
- ४.१ सदस्य Tiven2240 हे स्वतःसुद्धा ही प्रक्रिया तेव्हा सुरू करू शकतात.
- मराठी विकिसमाजाचा कौल मिळाल्याबद्दल सदस्य Tiven2240 यांचे अभिनंदन आणि त्यांना पुढील कामासाठी सदिच्छा.
- Tiven2240 यांच्याकडून मराठी विकिपीडियाच्या विकासासाठी भरीव कामगिरी होवो या आशे आणि अपेक्षेसह.
- अभय नातू (चर्चा) ०९:१०, १६ एप्रिल २०१८ (IST)
- प्रचालक, प्रशासक
- ता.क. येथील चित्रातील वेळा माउंटन डेलाइटसेव्हिंग टाइम (MDT) मध्ये आहेत. MDT मध्ये ११:३० ही वेळ भाप्रवे नुसार पुढील दिवसाची मध्यरात्र (००:००) होते.
पुढील कौल
@V.narsikar: Tiven2240 यांच्या प्रचालकपदावरील कामगिरीचे स्वयंपरीक्षण येथे पहा आणि प्रश्न, सूचना नोंदवा. -- अभय नातू (चर्चा) ००:३८, २ ऑक्टोबर २०१८ (IST)
संतोष दहिवळ (चर्चा · संपादने · वगळलेली सदस्य संपादने · अलीकडील क्रियाकलाप · नोंदी · रोध नोंदी · वैश्विक संपादने · एसप्रमाहिती)
संतोष दहिवळ (चर्चा) १२:५५, १४ एप्रिल २०१८ (IST)
चर्चा
- @संतोष दहिवळ: आपण मराठी विकिपीडियाचे १५वे प्रचालक म्हणून निवडून आले होते. प्रचालक अधिकारासाठी आपण पुन्हा एकदा नामांकन केले आहे व हा एक स्वयं-नामांकन असल्यामुळे कृपा वर आपले योगदान व भविष्यात करणारे बदलांची माहिती थोडक्यात द्यावे. यांनी कौल करणारे सदस्यांना आपली ओळख होते. व आपण या विनंतीचे कारण थोडे चर्चेत थोडक्यात सांगितले तर आनंद होईल --टायवीन२२४०माझ्याशी बोला २१:२२, १५ एप्रिल २०१८ (IST)
- वर संपादने नावाचा निळ्या रंगाचा दुव्यावर गेले की योगदान दिसेल.
- भविष्यात आवश्यक वाटणारे बदल करणार.
- या विनंतीमागचे थोडक्यात कारण त्यावेळी माझी तयारी नव्हती. -- संतोष दहिवळ (चर्चा) २३:४७, १६ एप्रिल २०१८ (IST)
@अभय नातू आणि Tiven2240:
कृपया, हे कौल समाप्त करण्यासाठी अंतिम तारीख द्या.--संदेश हिवाळेचर्चा १८:०८, ८ मे २०१८ (IST)
@संतोष दहिवळ: सर, आपण माझ्या वरील मताशी सहमत आहात का? कृपया, सांगा. --संदेश हिवाळेचर्चा २३:१७, ८ मे २०१८ (IST)
- @संदेश हिवाळे: तुमच्या वरील मताशी मी सहमत आहे. -- संतोष दहिवळ (चर्चा) २०:१०, १० मे २०१८ (IST)
- प्रशासक @अभय नातू:,
- सदस्य:संतोष दहिवळ (म्हणजे मी) येथे प्रचालकपदासाठी दि. १४ एप्रिल २०१८ रोजी विनंती टाकलेली आहे. परंतु आपले लक्ष त्याकडे गेले नसावे असे दिसते. तरी येथील आणि येथील धोरणातील मुद्दा क्रमांक २ नुसार आपला निर्णय कळवावा. मी विनंती टाकेपर्यंत किंवा आजपर्यंतही हे धोरण बदलण्यात आल्याचे मला कुठे आढळून आले नाही तरी हे मुद्दा क्रमांक २ विषयीचे धोरण बदलले गेले असल्यास त्याचा दुवा मला कळवावा म्हणजे @संदेश हिवाळे: यांना त्यांच्या मताशी सहमतीविषयी मला सांगता येईल. -- संतोष दहिवळ (चर्चा) २०:५३, ९ मे २०१८ (IST)
- @संतोष दहिवळ:,
- माझे याकडे लक्ष आहे. तुम्ही येथे प्रस्ताव मांडून प्रचालकपदाचा कौल घेण्याचा मार्ग निवडला आहे असे गृहित धरुन त्यात मी ढवळाढवळ केली नाही. तुम्हाला जर प्रचालक मंडळाच्या निर्णयाद्वारे पुन्हा प्रचालकपद हवे असेल तर हा कौल रद्द करावा. आणि वरील मजकूर वेगळ्या विभागात मांडून प्रचालकांकडून कौल मागावा.
- हे झाल्यावर सध्या कार्यरत नसलेल्या प्रचालकांना एकदा साद देउन त्यांनी उत्तर न दिल्यास कार्यरत असलेल्या प्रचालकांची मते घेउन निर्णय घेण्यात येईल.
- अभय नातू (चर्चा) ०८:४६, १० मे २०१८ (IST)
- @अभय नातू: होय प्रचालक पदासाठी कौल घेण्याचाच मार्ग मी निवडला हे तुमचे गृहितक अगदी बरोबर आहे त्यामुळे पुन्हा नव्याने कौलासाठी प्रस्ताव मांडता येतो की नाही याविषयी असलेली संदिग्धता तुमच्या खुलाशाने दूर झाली आहे. -- संतोष दहिवळ (चर्चा) २०:१०, १० मे २०१८ (IST)
- @अभय नातू: मला प्रचालक मंडळाच्या निर्णयाने कौल नकोय नव्याने हवाय म्हणून मी हा प्रस्ताव कायम ठेवलाय तरी @संदेश हिवाळे: यांच्याशी सहमती दर्शवत मी आपणास या प्रस्तावाला अंतिम मुदत देण्याची पुन्हा विनंती करतो. -- संतोष दहिवळ (चर्चा) १६:२६, १७ मे २०१८ (IST)
- @अभय नातू: होय प्रचालक पदासाठी कौल घेण्याचाच मार्ग मी निवडला हे तुमचे गृहितक अगदी बरोबर आहे त्यामुळे पुन्हा नव्याने कौलासाठी प्रस्ताव मांडता येतो की नाही याविषयी असलेली संदिग्धता तुमच्या खुलाशाने दूर झाली आहे. -- संतोष दहिवळ (चर्चा) २०:१०, १० मे २०१८ (IST)
अभय यांच्या मातीशी सहमत. हा कौल रद्द करून नवीन कौल द्या. त्यात प्रचालक आपल्यासाठी कौल/मत देतील. आपण दुसऱ्या प्रचालकांना सुद्धा कौल देण्यास विनंती करा. सद्या हा कौल बंद करण्यास काहीही नोंद आपण केली नाही. लवकर ते कळावे. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १३:५१, ११ मे २०१८ (IST)
ह्या मुद्यांचा विचार व्हावा आणि दहिवळ यांनी आपली बाजू मांडावी ही विनंती
आपण केलेल्या प्रचालक पदाच्या अर्जाकडे पाहून मला मी पाहिलेल्या आपल्या संपादनांमधील काही बाजू समोर् आल्या आणि त्यापैंकी काही शंकांची यादी मी खाली मांडित आहे.
- अनेक ठिकाणी झालेला संवाद ज्यामध्ये आपण वैयक्तिक आरोप केले आहेत. (अश्या प्रकारची वैयक्तिक आरोपाची भाषा वापरणे)
- दुसरा प्रसंग येथे झाला, ज्या ठिकाणी आपण पुरावे न बघता अभिनिवेशीपणे फ़क्त वैयक्तिक आरोप करत संगणकीय करामती दाखवल्या. ज्या मध्ये मला नविन शिकायला मिळाले पण आपण अजुनही तो ब्लॉग काढलेला नाहीये. शिवाय माझ्या प्रश्नांची उत्तरे दिलेली नाहीत. (न ऐकणे आणि संवादाची जबाबदारी नाही.)
- आपण 2017 साला मध्ये सुरू केलेल्या आणि फ़क्त आपलीच संपादने असलेल्या अनेक लेखांमध्ये प्रताधिकार भंग सापडला आहे, उदाहरणादाखल आपण घोंगडी, विशाखा मार्गदर्शक तत्त्वे, चौसष्ट योगिनी मंदिर अर्थातच हे नकल-डकव आपणच केलेले असल्याचे त्या लेखांच्या इतिहासात स्पष्ट दिसत आहे. शिवाय स्वत:च्याच लेखाचा संदर्भ अनेक ठिकाणी दिल्याचेही समोर आलेले आहे जसे की होट्टळ हा लेख. (वारंवार केलेला प्रताधिकार भंग)
- आपण संदर्भांचे साचे बनवले होते ही काही वर्षांपुर्वीची बाब असली तरीही त्या साच्यांना स्वत:चे नाव देऊन ते वापरात आणावे असा आपला आग्रह होता. (असे स्वत:चे नाव देणे. मुक्तस्त्रोताची जाण नसणे)
- या शिवाय हेकेखोरपणे आपले म्हणणे रेटून धरणे, चर्चेतील इतरांची मते आजिबात न ऐकणे आणि प्रचालकांसकट सगळ्यांना उडवून लावणे हे अनेकदा आपण केलेले आहे.
- एकूणच प्रचालकीय कामे, अधिकारासाठी आवश्यक गांभिर्य, परिपक्वता, विकी धोरणांची आणि मुक्तस्त्रोत विचारांची समज, मला आपल्या संपादनामधून कधी दिसलेली नाहीये. संदर्भ साधने विकसीत करण्याची तयारी दाखवली असली तरीही आपण संदर्भ न देता अनेकदा मोठा मजकूर डकवल्याचेही संपादनांमध्ये दिसते.
आणखीनही अनेक मुद्दे आहेत सध्या यांचा विचार पुरेसा आहे. प्रत्येकवेळा इतिहासातून मी शिकलो आहे, आपण मला दोन-तीनदा माझ्या संपादनातल्या चुकाही दाखवल्या आहेत त्याबद्दल मी आपले आभारही मानले आहेत. परंतु प्रचालक पदाची जबाबदारीचा विचार करता उपरोक्त मुद्यांचा विचार व्हावा असे मला वाटते. WikiSuresh (चर्चा) १३:५५, १८ मे २०१८ (IST)
कौल
- पाठिंबा- संतोष सर यांना विकिपीडिया वरील तांत्रिक ज्ञान आहे.माझा पाठींबा. - प्रसाद साळवे
- पाठिंबा- विविध चर्चा सहभाग,प्रचालकीय कामाचा अनुभव व तांत्रिक गोष्टींचा अनुभव/कौशल्य हे संतोष यांच्याकडे आहे असे वाटते.त्यांची नेमणूक उपयुक्त ठरेल.. - सुबोध कुलकर्णी
- पाठिंबा- दहिवळ हे अनुभवी व तांत्रिक ज्ञान असलेले सदस्य आहे, प्रचालकपदी त्यांची निवड झाल्यास मराठी विकिला नक्कीच फायदा होईल. - संदेश हिवाळे
- विरोध- दहिवळ यांच्या संपादनांचा इतिहास पहाता माझा पुर्ण विरोध आहे.. - Sureshkhole
- विरोध- संतोष यांच्यात प्रचालकपदासाठी आवश्यक कौशल्य नाही. उपरोक्त चर्चेत स्पष्टपणे दिसून येते की त्याना नियम माहीत असूनही तो त्याचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करत नाही. हे सर्व पाहता व त्यांचा संपादनांचा इतिहास पहाता माझा पुर्ण विरोध आहे.. - Tiven2240
- विरोध- माझा विरोध आहे. - Ravindraphule
- विरोध- माझा विरोध आहे. - vikrantkorde
- विरोध- माझा विरोध आहे. - [[सदस्य:आर्या जोशी (चर्चा)|आर्या जोशी (चर्चा)]]
- विरोध- माझा विरोध आहे. खरे पाहता नकल-डकव धोरण आधीच लागू झाले असते तर संतोष हे आज मराठी विकिपीडियावर कायमस्वरूपी अवरुद्ध असते. मीच त्यांच्या संपादनातील बरेच प्रताधिकार भंग शोधलेले आहेत. त्यामुळे प्रचालक पद द्यायचं का नाही असले मुद्दे सोडाच, त्यांना मराठी विकिपीडियावर ठेवायचं का नाही हा गंभीर चर्चेचा मुद्दा असू शकतो.. - Pushkar_Ekbote
समारोप
@अभय नातू: पुन्हा एकदा लक्ष वेधले.
- @अभय नातू: पुन्हा पुन्हा एकदा लक्ष वेधले.
- नोंद घेतली. पुढील पावलासाठी एकदा संकेत वाचून घेत आहे. -- अभय नातू (चर्चा) २१:४७, ७ जून २०१८ (IST)
- @अभय नातू: सद्या हा कौल ५०-५० दिसत आहे. सदस्यांना आपले मत व्यक्त करण्यासाठी अधिक तीन दिवस द्या.
@आर्या जोशी, ज, वियानी विन्सेंट डिसिल्वा, Aditya tamhankar, आणि Vikrantkorde: कृपा मत व्यक्त करा --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ०८:५७, ८ जून २०१८ (IST)
- तीन+ दिवसांची मुदत वाढवून हा कौल ६/११/२०१८ रोजी भा.प्र.वे.नुसार २३:५९:५९ या वेळेस समाप्त होईल.
- अभय नातू (चर्चा) ०९:०३, ८ जून २०१८ (IST)
@संतोष दहिवळ: आपण प्रचालक बनण्यासाठी उताविळ आहात, पण एखाद्या सदस्याने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायला अजुनही जमलेले नाही? प्रत्येक विकीवर प्रचालकपदाच्या अर्जावर अर्जकर्त्याची उलटतपासणी होते. आणि त्यातून त्याला पार व्हावे लागते. अनेकदा सक्रिय असूनही आपण मी समोर आणलेल्या मुद्यांवर काहीही उत्तर दिलेले नाही. ह्याला बेजबाबदारपणा म्हणावे की नजरचुक हे आपणच सांगा? WikiSuresh (चर्चा) १३:५४, ८ जून २०१८ (IST)
निकाल
संतोष देहिवळ यांचेसाठी ६-३ ३-६ असे मतदान झालेले आहे असे दिसते. @अभय नातू: कृपया अंतिम निर्णय द्यावे --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ००:०१, १२ जून २०१८ (IST)
- हा प्रस्ताव ३-६ अशा मतांनी असफल झाला आहे.
- यावर @संतोष दहिवळ: यांना नोंद करण्यासाठी दोन दिवसांचा वेळ देउन हा निकाल कायम केला जाईल.
- अभय नातू (चर्चा) ०३:२६, १२ जून २०१८ (IST)
नोंद
कौल दिलेल्या सदस्यांचे आभार.
माजी प्रचालकांना पुन्हा प्रचालक अधिकारासाठी सदस्यांकडे परत कौल मागता येतो हे या कौलातून अधोरेखित होत आहे तसेच प्रचालक मंडळाच्या निर्णयाद्वारे पुन्हा प्रचालक अधिकार हवे असतील तर तसाही प्रस्ताव मांडता येतो हे तर स्पष्टच आहे.
@अभय नातू: धोरणात किंवा जिथे जिथे याविषयी कुणाला संदिग्धता दिसत असेल तिथे याची नोंद करण्यात यावी / करण्यात येईल. माजी प्रचालकांना प्रचालक मंडळाकडे प्रस्ताव मांडण्यासाठी विकिपीडिया:कौल/माजी प्रचालक हे वेगळे उपपान बनवून मी तिथे नव्याने प्रचालक मंडळाच्या निर्णयासाठी प्रस्ताव मांडत आहे.
@प्रसाद साळवे:, @सुबोध कुलकर्णी:, @संदेश हिवाळे: आपण माझ्या प्रस्तावावर कौल दिल्यानंतर तो बदलवण्यासाठी तुमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न होऊनही त्या दबावाला बळी न पडता तुम्ही तुमच्या मतावर ठाम राहिलात त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा आभार आणि धन्यवाद. -- संतोष दहिवळ (चर्चा) २३:२३, १३ जून २०१८ (IST)
- @संतोष दहिवळ:
- संकेत आणि नियमांचे पुन्हा एकदा समीक्षण करुन त्यातील संदिग्धता काढली जाईल.
- प्रचालक कौल पानावर तुम्ही लिहिलेत - मला प्रचालक मंडळाच्या निर्णयाने कौल नकोय नव्याने हवाय म्हणून मी हा प्रस्ताव कायम ठेवलाय
- हा कौल पूर्ण झाल्यावर आता प्रचालक मंडळाचा कौल मागणे म्हणजे मराठी विकिसमाजाचा निर्णय मान्य न करुन त्याच्याभोवती पळवाट काढण्यासारखे वाटते.
- तरी तुम्ही हा कौल मागे घ्यावा अशी मी विनंती करतो आणि ६०-९० दिवसांमध्ये तुमच्या कामाने विकिसमाजाचे मन नव्याने वळवून घेउन मग पुन्हा एकदा कौल मागावा असे सुचवतो.
- अजून एक दिवसांने, १५/६/२०१८ २३:५९:५९ नंतर हा कौल दप्तरदाखल केला जाईल.
- धन्यवाद.
- अभय नातू (चर्चा) २२:२१, १४ जून २०१८ (IST)
- @अभय नातू: तुमच्या विनंतीचा मान ठेवून आशा करतो संकेत आणि नियमांचे समीक्षण करुन त्यातील संदिग्धता ६०-९० दिवसांनी मी पुन्हा प्रस्ताव मांडेपर्यंत काढली जाईल. -- संतोष दहिवळ (चर्चा) २३:४३, १४ जून २०१८ (IST)
- @संतोष दहिवळ:,
- अशी संदिग्धता सापडल्यास ती कळवावी म्हणजे त्याबद्दल उपाय करता येईल.
- धन्यवाद.
- अभय नातू (चर्चा) ०४:४४, १५ जून २०१८ (IST)
- @अभय नातू: सदस्य:संतोष दहिवळ यांना नियमानुसार विकिसमाजाकडे कौलप्रस्ताव टाकताच येणार नाही असे सदस्य:Tiven2240ने म्हणणे ही झाली संदिग्धता.
- नियमानुसार कौलप्रस्ताव प्रचालक मंडळाकडे सदस्य:संतोष दहिवळ यांनी टाकला तर त्याला सदस्य:Tiven2240ने नियमाचे उल्लंघन ठरवून निराधार नामनिर्देशन म्हणणे ही झाली संदिग्धता.
- प्रचालक माजी असला तरी त्याला पुन्हा प्रचालक अधिकार विकिसमाजाकडून मते घेऊनच देण्यात यावेत असे माझे ठाम मत आहे.
- तसेच एखाद्या प्रचालकाला काही ठराविक कालावधीसाठी प्रचालक अधिकार दिले असल्यास त्यालाही पुन्हा प्रचालक अधिकार विकिसमाजाकडून मते घेऊनच दिले जावेत. -- संतोष दहिवळ (चर्चा) २२:५४, १५ जून २०१८ (IST)
It is a very sad remark that a Candidate for administrator has made above. Although even after an unsuccessful nomination he still doesn't respects the community consensus. सदस्य:संतोष दहिवळ please stop this baseless discussion here. We are not here to discuss who is to vote whether the community or administrator community nor it will change after the discussion here. You know what is the procedure. You are framing your own rules and procedures of voting for which I warn you thereby. We respect the community vote and term this Nomination as Unsuccessful. @अभय नातू:, It looks like dehiwal's nomination clearly satisfies the conditions on Hat collecting a pure greed for power and I think we must not entertain such nominations hereby in future.
Some points I would like to highlight
- सदस्य:संतोष दहिवळ is not familiar with the policies and guidelines of Marathi Wikipedia.
- सदस्य:संतोष दहिवळ hasn't responded on the questions raised/inqured on his nominations.
- irrespective of knowing the rules that former admin must have a admins vote yet Dehiwal does for a community vote.
- सदस्य:संतोष दहिवळ is given a chance for community vote by beaureacrat after been asked whether he wants a community vote of admin vote. For which he chooses community vote.
- Community votes Unsuccessful for सदस्य:संतोष दहिवळ with 75% votes against the candidate.
- Inspite of such सदस्य:संतोष दहिवळ moves on for Admin vote for his nomination. Which clearly shows the supreme quality of a Hatcollector.
- Yet सदस्य:संतोष दहिवळ makes a statement that he wants community vote for temporary administrators and former admins to get back into adminship. Which is clearly baseless as it cannot be decided on a nomination page.
- This statements shows that सदस्य:संतोष दहिवळ will use his own rules while making maintainance stuff on wiki, which is a supreme threat.
मराठी रूपांतर सुबोध यांच्या विनंती प्रमाणे मला खालील काही मुद्यांवर सर्वांचे लक्ष वेधावेसे वाटते.
- सदस्य:संतोष दहिवळ हे मराठी विकीच्या ध्येय-धोरणे आणि मार्गदर्शक तत्वांशी पुर्णत अवगत नाहीत.
- सदस्य:संतोष दहिवळ ह्यांनी त्यांना त्यांच्या प्रचालकपदाच्या विनंतीबद्दल विचारल्या गेलेल्या प्रश्नांचे उत्तर अजुनही दिलेले नाहीये.
- जुन्या प्रचालकांना प्रचालक मंडळाकडून प्रचालकत्व मिळवता येते हे धोरण माहित असतानाही त्यांनी विकी समाजाकडून मत मागविले.
- सदस्य:संतोष दहिवळ यांना तरिही प्रचालकांनी पुन्हा एकदा विकी समाजाकडून मत हवे आहे की प्रचालक मंडळाकडून हवे आहे असे स्पष्ट आणि शेवटचे विचारले, त्यावर दहिवळ यांनी समुदायाचे मत मागवले.
- समुदायाने सदस्य:संतोष दहिवळ एकूण ७५% मते विरुध्द बाजुने देऊन असहमती प्रचालक पद नामंजूर केले.
- असे असतानाही सदस्य:संतोष दहिवळ यांनी आता विकी समाजाचा निर्णय अमान्य करुन पुन्हा एकदा प्रचालक मंडळाकडून प्रचालक पदासाठी मत मागवले आहे. ज्यातून त्यांची सत्ता-लालसा दिसून येते.
- आता सदस्य:संतोष दहिवळ यांनी यापुढे जाऊन माजी प्रचालक आणि तात्पुरत्या प्रचालकांचे प्रचालकत्वही समाजाच्या मतांनेच पुढे कायम करण्यात यावे असा प्रस्ताव मांडला, जो पुर्णत: चुकीचा आहे, कारण प्रचालक पदाच्या मतांच्या पानांवर असले धोरणात्मक निर्णय घेतले जात नाहीत.
- या त्यांच्या विधानावरुन आपल्याला असे स्पष्ट दिसते की, सदस्य:संतोष दहिवळ हे त्यांना जर प्रचालकपद दिले गेले तर त्याचा पुर्ण गैरवापरच करतील, त्यामुळे मी सदस्य:संतोष दहिवळ यांना पुन्हा एकदा समज देत आहे. जर त्यांनी विकी समाजाच्या नियमांचे/धोरणांचे/कार्यप्रणालीचे उल्लघंन करणे थांबवले नाही तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.
Thereby I again warn सदस्य:संतोष दहिवळ as he acts against the working/policies/guidelines of Marathi Wikipedia and Wikimedia projects. Continuing so strict actions can be taken there after.
Thanking you, --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ०१:०१, १६ जून २०१८ (IST)
- @Tiven2240:, मराठी विपीवर धोरणात्मक चर्चा ही मराठी भाषेतून व्हावी हा संकेत आहे, आणि औचित्याचे आहे असे माझे स्पष्ट मत आहे. प्रचालक म्हणून तुम्ही नवीन चुकीचा पायंडा पाडू नये ही विनंती. आपला प्रतिसाद मराठीतून पुन्हा नोंदवावा म्हणजे सर्व सदस्यांना आपले नेमके म्हणणे कळू शकेल. अभय नातू आणि नरसीकर यांनी यावर आपले मत द्यावे.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १०:२०, १६ जून २०१८ (IST)
- @सुबोध कुलकर्णी: असे संकेत कुठे आहे कृपया त्याचे दुवे सदर करा. नोंद घ्यावी ही धोरणाची चर्चा नाही तर एक प्रचालकाकीय नामांकन बाबत चर्चा आहे. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १०:२४, १६ जून २०१८ (IST)
आपण घाईने तातडीचा प्रतिसाद देऊ नये.प्रचालक कौल ही सर्व मराठी सदस्यांशी संबधीत बाब आहे असे आपल्याला वाटत नाही काय? ज्याला इंगजी येते त्यानेच चर्चा समजून घ्याव्यात हे अन्यायकारक नाही का? तुम्ही यावर पूर्वी झालेली चर्चा जाणता. प्रचालक या नात्याने विचार करून मत व्यक्त करा, व्यक्तिगत पातळीवर घेऊ नये ही पुन्हा विनंती.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १०:३०, १६ जून २०१८ (IST)
- @सुबोध कुलकर्णी: जे चर्चा वर झालेली आहे मी तेच इंग्लिश मध्ये लिहिले आहे. जर भाषा समजण्यासाठी काहीही त्रास होत असेल तर आपण गूगल ट्रान्सल्ट हा यंत्र वापरून मराठीत अनुवाद करू शकता. काहीही व्यक्तिगत पातळीवर चर्चा झालेली नाही. कृपा ही चर्चा दुसऱ्या दिशेत नेऊ नये अशी विनंती. धन्यवाद --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १०:३८, १६ जून २०१८ (IST)
@अभय नातू आणि V.narsikar:, मराठी विपीवर प्रचालकच सदस्यांना चर्चा समजून घ्यायची असेल तर इंग्रजीतला मजकूर अनुवाद करून घ्या असा अभिनेवेशाने सल्ला देत आहेत आणि चर्चा दुसरीकडे नेऊ नका असा इशाराही देत आहेत. हे योग्य आहे का याचा निवाडा अनुभवी प्रचालक म्हणून आपण करावा आणि उचित ते करावे ही विनंती.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १०:५०, १६ जून २०१८ (IST)
@सुबोध कुलकर्णी: रूपांतर दिले आहे. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १६:४३, १६ जून २०१८ (IST)
संदिग्धता, इ.
- @संतोष दहिवळ:
- १. टायवीन यांनी विकिसमाजाकडे कौल मागता येणार नाही असे लिहिले त्यात धोरण स्पष्ट करणे हा त्यांचा हेतू असू शकतो. त्यांनी लिहिणे ही संदिग्धता नव्हे. यात टायवीन यांना व्यक्तिशः ओढण्याचे कारण नव्हते.
- २. पुढील वाक्यात पुन्हा एकदा तुम्ही टायवीन यांच्यावर ताशेरे ओढलेत.
- ३. जर तुमचे मत विकिसमाजाकडूनच कौल हवा असे ठाम असेल तर मग प्रचालकांकडून कौल मागण्याची पळवाट तुम्ही पत्करायला नको होती.
- ४. तात्पुरत्या प्रचालकांचे कायमीकरण कसे करावे हे मराठी विकिसमाजाने ठरवलेले नाही. यापुढे हे कसे करावे, याबद्दल तुम्हाला प्रस्ताव मांडायचा असल्यास जरुर मांडावा.
- @Tiven2240:
- सदस्य सुबोध कुलकर्णी यांनी सुचविल्याप्रमाणे घाईने प्रतिसाद देऊ नये. असे केल्याने अनेकदा मुद्द्यात अजून गोंधळ होण्याची शक्यता असते. जरी व्यक्तिगत आरोप/हल्ले झाले असले तरीही थोडा वेळ जाउन मग उत्तर दिल्यास माझ्या स्वतःच्या प्रतिसादातील अभिनिवेश कमी होउन वस्तुनिष्ठता वाढते असे मी अनुभवलेले आहे. अर्थात, हा माझा अनुभव.
- अनेकदा आपल्या मनातील विचार आणि भाव आपल्या रोजच्या व्यवहारभाषेत व्यक्त करणे सोपे वाटते, मग ती इंग्लिश असो, गुजराती, हिंदी किंवा या सगळ्यांचे मिश्रण. आपल्या रोजच्या व्यवहारभाषेतून आपले विचार अधिक स्पष्टपणे लिहिता येतात हे ही खरे. परंतु आपण येथे मराठीभाषक लोकांसाठी काम करीत आहोत. जरी त्यांतील बव्हंश लोकांना इंग्लिश आणि इतर अनेक भाषा येत असल्या तरी मराठी विकिपीडियावरील ध्येय, धोरणे व मराठी विकिसमाजाच्या मोठ्या भागावर ज्याचा प्रभाव पडेल अशी वक्तव्ये शक्यतो मराठीतूनच व्हावीत. येथे मुद्दाम लिहू इच्छितो की - इतर विकिपीडियावरील सदस्य किंवा छोट्या समूहातील वक्तव्यांवर मराठीच पाहिजे हा माझा (तरी) आग्रह नाही आणि कधीच नव्हता.
- गूगल ट्रान्सलेट वरील भाषांतर बरेचसे ठीक असले तरी त्यातून अनेकदा अर्थाचा अनर्थ होतो. गंभीर आणि प्रक्षोभक चर्चांमध्ये हे वापरू नये असे माझे मत आहे. ध चा मा झाल्यास ते निस्तरणे महाकठीण होते. तुम्हाला इंग्लिश (किंवा इतर कोणत्या भाषेतून) भाषांतर करण्यास मदत लागली तर ती मागावी. फक्त भाषा १००% येत नाही म्हणून चांगले काम, मुद्दे आणि विचार नाकारले जाऊ नयेत हा त्यामागचा हेतू.
- @सुबोध कुलकर्णी:
- अशी वक्तव्ये जरी इंग्लिशमध्ये असली तरी त्यात अन्यायकारक काही आहे असे मला वाटत नाही. उचित नाही हे खरे, मराठीत पाहिजे हे ही खरे, परंतु अन्यायकारक हा प्रक्षोभक शब्द आहे. या शब्दावरुन वादंग होऊ शकतात (पूर्वी झालेलेही आहेत.) तसेच मोघम आरोप (सदृश विधाने) करणेही टाळावे - (येथील प्रचालकच अमुक करीत आहेत) येथे टायवीनने काही वक्तव्ये केली असली तरी नरसीकरजींचा यात काय दोष?! अनेक दिवस, महिने, वर्षांनी असे वाचले असता मराठी विकिपीडियावरील सगळे प्रचालक हे करीत आहेत असा ग्रह होऊ शकतो. या व्यासपीठाबाहेरील व्यक्तींच्या हातात कोलीत कशाला द्यावे? असो, माझा मुद्दा कळला असेलच, शंका असल्यास निःसंकोच कळवावे.
- सगळ्यांनाच उद्देशून लिहितो की समक्ष चर्चा चाललेली नसताना शब्द तोलून-मापून वापरावेत. थंड डोक्याने प्रतिसाद द्यावेत. डोके थंड नसेल तर थोडा वेळ जाउन देउन प्रतिसाद द्यावेत. तुम्ही सगळेच येथील अनुभवी आणि जाणते सदस्य आहात. तुम्हा सगळ्यांचीच मराठी विकिपीडियाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे गरज आहे. तरी आपापसातील मतभेद सामंजस्याने सोडवावे ही विनंती. सगळे मतभेद सुटतीलच असे नाही पण अशा वेळी आपण येथे काय करीत आहोत व कोणासाठी करीत आहोत ही नेहमी लक्षात ठेवावे आणि तडजोड स्वीकारीवी.
- धन्यवाद.
- अभय नातू (चर्चा) २२:५२, १६ जून २०१८ (IST)
- @अभय नातू: तुमचे वरील विधान - १. टायवीन यांनी विकिसमाजाकडे कौल मागता येणार नाहीअसे लिहिले त्यात धोरण स्पष्ट करणे हा त्यांचा हेतू असू शकतो. - यालाही संदिग्धता म्हणतात. -- संतोष दहिवळ (चर्चा) १०:५२, १७ जून २०१८ (IST)
- संदिग्धता म्हणजे एखाद्या विधानातून दोन अर्थ निघतात आणि ते दोन्ही प्राप्त परिस्थितीत योग्य असतात. तुम्हाला काहीतरी वेगळेच म्हणायचे आहे पण त्याला तुम्ही संदिग्धता म्हणत आहात. तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे हे कळले की पुढे काही तरी करता येईल. --अभय नातू (चर्चा) २२:०५, १७ जून २०१८ (IST)
हा इथला प्रस्ताव आणि चर्चा मोडीत काढण्यात आल्याने दप्तरदाखल करण्यात यावी. --संतोष दहिवळ (चर्चा) १२:०८, ३ ऑगस्ट २०१८ (IST)
सदस्य:आर्या जोशी यांना प्रचालक अधिकारासाठीचे नामांकन
- मला आर्या जोशी यांना प्रचालक पदासाठी नामांकित करताना अतिशय आनंद होत आहे. त्याला अनेक कारणे आहेत.
- त्या पहिल्या महिला प्रचालक असतील. मराठी विकिवर प्रचालक अधिकार असलेले सर्व सक्रिय सदस्य पुरुष होते/आहेत. त्यामुळे त्या जर प्रचालक झाल्या तर विकिवरील लिंगभाव दरी कमी करण्यास सुरुवात होईल.
- संदर्भ देऊन, व्यवस्थित सातत्याने लेखन करणाऱ्या त्या मोजक्या सदस्यांपैंकी एक आहेत.
- त्यांचे जागतिक संपादने [जोशी 13,927] आहेत. त्यांना मराठी विकिबरोबरच कॊमन्स, डाटा आणि हिंदी विकिवरही संपादनाचा अनुभव आहे.
- त्यांना प्रताधिकार, संदर्भ साधने, लेखाची गुणवत्ता, सदस्यांशी एकमेकांशी जुळवून घेऊन एकत्र काम करणे याचा अनुभव आहे तसेच या सर्वाचे सखोल ज्ञानही आहे. त्यामुळेच त्यांना प्रोजेक्ट टायगर सारख्या स्पर्धेचे ज्युरीम्हणून काम करण्याची जबाबदारी दिली जाते.
- अनेक तांत्रिक बाबींचे ज्ञान त्यांना आहे, व त्या नवनविन गोष्टी ज्या संपादनास आवश्यक आहेत अशा शिकतही असतात. हे त्यांच्या संपादन इतिहासावरून आपल्याला स्पष्ट दिसून येते.
- त्यांचा विकिवरील संपादनाबरोबरच, प्रत्यक्ष समुदायाबरोबर काम करण्याचा अनुभवही दांडगा आहे, अनेक कार्यशाळांमध्ये प्रशिक्षक म्हणून, अनेक स्पर्धा, मोहिमांमध्ये त्यांचा आघाडीचा सक्रिय सहभाग असतो. म्हणूनच त्यांचा गौरव फिचर्ड विकिपीडयन म्हणून २०१९ च्या महिला अंकामध्ये केला गेला आहे.
- त्यांनी माझ्याकडे कधी कधी अधिकारां अभावी काम अडून पडते अशी तक्रारही केलेली आहे. मला अशी आशा आहे की, त्यांना अशी तक्रार करण्याची गरज पडू नये,
- उत्पात नियंत्रण, प्रताधिकार भंगावरील काम पुढे नेणे, मराठीवर आधुनिक उपकरणे आणि अवजारे आणणे, तसेच वेळोवेळी लागणारे साचे आणणे इ. कामे. सक्रिय प्रचालकांच्या अभावी आडून पडतात ती पुढे नेण्याचे काम त्या नक्कीच करू शकतील. किंबहुना ते करण्यासाठीच त्यांना प्रचालकीय अधिकार खूप उपयोगाचे ठरतील. आपण आपले प्रश्न व मते मांडून आपल्या या मैत्रिणीला तीच्या कामात नक्कीच मदत होईल असे पाहूयात. आर्या जोशी हे नामांकन त्यांना मान्य आहे असे औपचारीकरित्या या नामांकनाखाली कळवतीलच. धन्यवाद. QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!![they/them/their] १४:५७, १६ फेब्रुवारी २०२० (IST)
कौल
|
|
|
हे सर्व गुण एक उत्तम प्रचालक होण्यासाठी अत्यावश्यक आहेत. त्या नक्कीच प्रचालक पदाची धुरा समर्थपणे वाहतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही. याबरोबरच मराठी विकिपीडियाला एक स्त्री-प्रचालक मिळेल याबद्दल मला अतीव आनंद होत आहे. त्या प्रचालक होण्यास माझा पूर्ण पाठिंबा आहे. आर्या जोशी यांना शुभेच्छा. - Pushkar_Ekbote |
|
|
|
चर्चा
धन्यवाद सुरेश. मी हे नामांकन स्वीकार करीत आहे.--आर्या जोशी (चर्चा) ०७:००, १७ फेब्रुवारी २०२० (IST)
प्रश्नोत्तरे
आर्या जोशी (चर्चा · योगदान) यांच्या प्रचालकपदासाठीच्या नामांकनाबद्दलचे प्रश्न येथे विचारावे. उमेदवाराने त्यांची उत्तरे देणे अपेक्षित आहे.
१. @आर्या जोशी:, प्रोजेक्ट टायगर स्पर्धेत परीक्षक म्हणून तुमच्या मुल्यांकनाविषयी परीक्षकांच्या लेखांचे परीक्षकांद्वारे मुल्यांकन(!) प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत, तेथे मी तुमची दुजाभाव करणारी (तटस्थ व न्याय्य दृष्टीकोन नसलेली) काही मुल्यांकने सविस्तर नोंदवली आहेत, परंतु तुम्ही त्याविषयी विचारलेल्या कोणत्याच प्रश्नाचे उत्तर दिले नाही. [ आंबेडकर जयंती हा लेख अस्वीकार करण्याचे कारण तुम्ही "५% प्रताधिकार भंग" सांगिलेय; केवळ "चार-पाच शब्दच" copyvios साचात डिटेक्ट झाले म्हणजे प्रतिधिकार भंग होत नाही. मात्र याउलट तुम्ही स्वतःचे २०%+, ३०+% पेक्षा जास्त प्रताधिकार भंग असलेले लेख स्वीकारले!!!] येथे कोणताही कौल देण्यापूर्वी मला त्या प्रश्नांची जाणने अपेक्षित आहे. --संदेश हिवाळेचर्चा ०८:५३, १७ फेब्रुवारी २०२० (IST)
- @Sandesh9822: नमस्कार !
सर्वप्रथम मी जे मांडणार आहे ते तुम्हाला स्वीकार्य असेलच अशी माझी अपेक्षा नाही. जेंव्हा एखादी व्यक्ती परीक्षण करीत असते तेंव्हा ती स्पर्धेचे निकष पाळले जात आहेत कि नाही याबाबत सजग असते. हे स्वाभाविकच असते कि अशा मताला विरोध होतो आणि त्यावर स्पर्धक सतत आपले मत नोंदवीत राहतात. आपण दीर्घकाळ विकिवर संपादने करीत आहात त्यामुळे लेखांचे निकष आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे तसेच माझे सहकारी परीक्षक सुरेश खोले यांनी याविषयी विवेचन केले आहे. स्पर्धेतील लेखांनी हे व्यासपीठ अधिक समृद्ध कसे होईल हे पाहण्यापेक्षा विषय वाढवत राहून आणि चर्चा करत राहून वेळ दवडणे मला अपेक्षित नाही त्यामुळे आपल्या प्रश्नांची उत्तरे दिलेली नाहीत आणि मला यावर यापुढे चर्चा अपेक्षित नाही. आपण प्रगल्भ आणि अनुभवी संपादक आहात त्यामुळे प्रचालक म्हणून संधी मिळाल्यास मी काय करू इच्छित आहे असे काहीतरी भरीव आणि कार्यसंमुख प्रश्न आपण यापुढे विचाराल अशी मी आपल्याकडून अपेक्षा करीत आहे. धन्यवाद--आर्या जोशी (चर्चा) १०:३८, १७ फेब्रुवारी २०२० (IST)
- (माझा वरील प्रश्न पुनश्च वाचावा) तटस्थ व न्याय्य दृष्टीकोन नसलेल्या तुमच्या मुल्यांकनाबद्दल विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देणे म्हणजे वेळ दवडणे असे तुम्हास वाटू शकते, मात्र इतर सदस्यांना कारणे जाणायची आहेत. प्रचालक म्हणून पुढे तुम्ही काय कामे करू इच्छिता हा प्रश्न महत्त्वाचा आहेच मात्र मागे तुम्ही विकिनितीहीन, तटस्थ दृष्टीचा अभाव, व निकषहीन कामे का केली त्याबाबत प्रश्न विचारणेही महत्त्वाचे वाटते.--संदेश हिवाळेचर्चा १२:१०, १७ फेब्रुवारी २०२० (IST)
- @Sandesh9822: आपण मला विकी नीतीहीन असे संबोधन वापरले आहे याची फक्त सुजाण महिला संपादक म्हणून जाणीव करून देत आहे याची नोंद घ्यावी. आपला येथील पूर्वानुभव लक्षात घेता आपल्याशी अधिक न बोलणे उचित राहील, प्रश्न राहिला प्रचालक पदाचा तर माझा असा विश्वास आहे कि प्रामाणिक काम करीत असलेल्या व्यक्तीला कधीतरी न्याय मिळतोच आणि तो त्याचे कामच त्याला मिळवून देते.असो. आपणाकडून प्रगल्भ प्रतिसादाची केवळ मी अपेक्षाच करू शकते. मला अधिक गुणवत्तीने काम करण्यात अधिक रस आहे. तुम्हाला जे नोंदवायची ते नोंदवीत रहा. माझया विवेकी बुद्धीला जे पटेल त्यावरच मी उत्तर देईन याची नोंद आपणासही अन्य सर्वानीच घ्यावी. या व्यासपीठाचे प्रचालक पद हे देखावी नसून ते कार्यक्षम पणे करणे हे अधिक महत्वाचे आहे असे मला वाटते. आणि त्यापेक्षाही अधिक कामे माझया लेखी आहेत. विकी म्हणजे केवळ जगाचे व्यासपीठ नाही हे आपणही लक्षात घेतलेत तर बरे होईल.--आर्या जोशी (चर्चा) १९:०२, १७ फेब्रुवारी २०२० (IST)
- अभिप्रायासाठी धन्यवाद, माझया विवेकी बुद्धीला जे पटेल त्यावरच मी उत्तर देईन याची नोंद आपणासही अन्य सर्वानीच घ्यावी. या तुमच्या विधानावरुन हे स्पष्ट होते की तुम्ही उद्या प्रचालक म्हणून काहीही कामे केली तरी त्यांचे स्पष्टीकरण द्यायला तुम्ही अजिबात बांधिल असणार नाहीत, कारण उत्तर/स्पष्टीकरण द्यायचे की नाही हे सर्वस्वी तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुमच्या विवेकी बुद्धीवर अवलंबून असेल. याची सर्व सदस्यांनी नोंद घ्यावी. (आधीही परीक्षक म्हणून त्यांनी आपल्या विवेकी बुद्धीचा वापर करत त्यांच्या चूकीच्या मूल्याकनांवर उपस्थित केलेल्या कोणत्याच प्रश्नावर उत्तर दिलेले नाही.) परिक्षक म्हणून तुम्ही ज्या त्रुटी/चूका केल्या त्याचे स्पष्टीकरण देण्याचे टाळत वा त्यात दुरुस्ती न करता चूकांवर काहीही उत्तर/कारण न देणे हा १००% बचावात्मक मार्ग स्वीकारला. स्वतः चूका करायच्या व त्या न सुधारता त्याची केवळ व्याच्यता होऊ नये म्हणून त्यावर कसलेही भाष्य करण्याचे टाळायचे, असे वागणे विकिपीडियामध्ये समर्थनीय नाही. (जर-तर) असाच मार्ग आपण प्रचालक बनल्यावर स्वीकारु नये, हीच माफक अपेक्षा. --संदेश हिवाळेचर्चा २०:२१, १७ फेब्रुवारी २०२० (IST)
प्रिय @आर्या जोशी:,
वेळोवेळी अशी अपेक्षा केली जात होती की आपले नाव नामनिर्देशनासाठी येईल आणि शेवटी ते आले आहे. मला हे जाणून घ्यायला आवडेल की, आपण या विकीवरील आपल्या कामांची काही उदाहरणे मला द्या ज्यात प्रशासकांच्या विशेषाधिकारांची आवश्यकता आहे?
धन्यवाद --Tiven2240 (चर्चा) ०८:४६, १९ फेब्रुवारी २०२० (IST)
@Tiven2240: नमस्कार! सक्रिय असल्याने मला जाणवते आहे की समूहाची बरीच कामे ही प्रचालकांना वेळ देता येउ शकत नसल्याने वेळेअभावी मागे पडत आहेत.उदा.साचे अद्यतन करणे किंवा साईट नोटीस बदलणे इ.स्वरूपाची. त्याजोडीने मी जे लेख सुधारण्याचे प्रयत्न करते त्यात अनेकदा मला प्रचालकांना साद द्यावी लागते मदतीसाठी पण ते काम तत्परतेने केले जाते असे नाही.त्यामुळे सक्रिय असल्याने मी विशेषाधिकार वापरून ही कामे जलद गतीने कार्यान्वित करून व्यासपीठाची गुणवत्ता वाढवू इच्छिते.धन्यवाद!आर्या जोशी (चर्चा) ११:०७, १९ फेब्रुवारी २०२० (IST)
- नोंद - कोणती कामे अडतात यांवर भाष्य न करता हे लिहीत आहे.
- १. साचे अद्यतन करण्यासाठी प्रचालक असणे गरजेचे नाही. येथील बव्हंश साचे कोणत्याही संपादकाला बदलता येतात. काही क्लिष्ट आणि/किंवा बहुवापरातील साचे सुरक्षित केले गेलेले आहेत. त्यांत बदल करण्यासाठी प्रचालकपद लागते. तरीही असे साचे धूळपाटीवर किंवा इतर नावाने (साचा सुरक्षित असला तरीही मजकूर कोणालाही वाचता येतो) तयार करुन त्यावर प्रयोग करता येतात. मनाप्रमाणे बदल झाल्यावर प्रचालकांना साद दिल्यास काही मिनिटांत साचा बदलता येतो. साच्यातील अपेक्षित बदल प्रचालकांनी करणे (अ) वेळखाऊ आहे आणि (ब) नक्की काय हवे आहे हे कळण्यातच काही वेळ जातो.
- २. साईटनोटिस हा सुरक्षित साचा आहे आणि त्यासाठी वरील पद्धत अवलंबिता येते. @सुबोध कुलकर्णी: यांनी पूर्वी असा साइटनोटिस साच्यात बदल करुन दिल्यावर लगेचच तो बदल प्रकाशित केला गेला होता.
- असो, पुन्हा एकदा - येथे कामे अडतात कि नाही हा माझा मुद्दा नसून प्रचालकपद नसतानाही ही विशिष्ट कामे कशी करता येतील हे नमूद केले आहे. इतर कामे असल्यास ती ही कळवावी म्हणजे (असल्यास) तोडगा सुचविता येईल आणि तुमच्याकडे प्रचालकपद नसतानाही तोडगा असलेली तरी कामे खोळंबून राहणार नाहीत.
- धन्यवाद.
- अभय नातू (चर्चा) ०६:४४, २७ फेब्रुवारी २०२० (IST)
@आर्या जोशी: त्याजोडीने मी जे लेख सुधारण्याचे प्रयत्न करते त्यात अनेकदा मला प्रचालकांना साद द्यावी लागते मदतीसाठी कृपया याला स्पष्ठ करा. --Tiven2240 (चर्चा) ११:२६, १९ फेब्रुवारी २०२० (IST)
- @आर्या जोशी: सौम्य स्मरण --Tiven2240 (चर्चा) १२:५०, २२ फेब्रुवारी २०२० (IST)
@Tiven2240: नमस्कार! पुढील लिंक पहा. आपणही या व्यासपीठाचे प्रचालक आहात त्यामुळे मी अभय नातू सरांना जे नोंदविले आहे ते आणि या लेखाची आधीची चर्चा वाचल्यावर आपल्याला लक्षात येईल कि मला केवळ संपादक म्हणून लेखावर काम करणे याच्या पलीकडे विशेष अधिकार कोणते व का हवे आहेत. धन्यवाद https://mr.wikipedia.org/s/15n9 --आर्या जोशी (चर्चा) १२:३६, २४ फेब्रुवारी २०२० (IST)
@आर्या जोशी: आपण दिलेला दुवा पाहिला. पुन्हा एकदा आपण खोटे उल्लंघन नोंद केले आहे असे दिसते. अश्या वेळी जर प्रचालकपद उमेदवार याना कॉपीराईट उल्लंघन काय असते आणि काय नसते याची माहिती नाही तर कसे चालेल. मराठी विकिपीडियावर आपण विकिपीडिया:प्रचालक तर वाचले असतील अशी अपेक्षा होती. जर नसले तर वाचा व मराठी विकिपीडिया समुदायाला इथे आपले कामाचे अहवाल द्या. आपले अहवाल पाहण्यासाठी मी व इतर सर्व सदस्य उत्साहित आहोत. मराठी विकिपीडियावर प्रचालक झाल्यावर आपण काय कामे करण्यास इच्छुक आहेत याची यादी सुद्धा जाहीर करा. आशा आहे की आपण ते लवकर मराठी विकिपीडिया समुदायाला जाहीर कराल. धन्यवाद --Tiven2240 (चर्चा) २०:२८, २५ फेब्रुवारी २०२० (IST)
- @आर्या जोशी: सौम्य स्मरण--Tiven2240 (चर्चा) ०८:१८, २९ फेब्रुवारी २०२० (IST)
Tiven2240 - मार्च २०२१
- Tiven2240 (चर्चा • योगदान • ब्लॉक यादी • संरक्षण • हटवलेले योगदान • स्थानांतराची नोंद • अधिकार • अधिकार बदल)
नामांकन
नमस्कार, मी विकिपीडियावर २०१६ पासून काम करत आहे. मराठी विकिपीडियावर तांत्रिक व प्रचालकीय कामात माझे फार मोठे योगदान आहे. २०१८ मध्ये मी या विकिपीडियावर १६वा प्रचालक म्हणून निवडून आलो होतो आणि २०२० मध्ये बॅकलॉग सफाईसाठी मला येथील प्रशासकांद्वारे प्रचालक पद दिले गेले होते. मला प्रचालकीय कामात रस आहे व त्याचा अनुभव सुद्धा आहे. मला मराठी विकिस्रोतावर सुद्धा अनेकदा प्रतिपालकांद्वारे प्रचालकीय अधिकार दिले गेले होते. मी मराठी विकिपीडियावर द्रूतमाघारकार (रोलबॅकर) सुद्धा आहे. माझ्या मराठी विकिपीडियावरील योगदानाची माहिती आपण येथे पाहू शकता. अधिक सक्रिय प्रचालक या विकिप्रकल्पात नसल्यामुळे मी पुन्हा एकदा येथे प्रचालक अधिकारासाठी विनंती करीत आहेत. आशा आहे की आपण यावर आपले मत व कौल द्याल. धन्यवाद. --Tiven2240 (चर्चा) ०८:४३, ५ मार्च २०२१ (IST)
कौल
- पाठिंबा- माझे समर्थन आहे. - Sandesh9822
- पाठिंबा- माझे समर्थन आहे. - Goresm
- पाठिंबा- माझे समर्थन आहे. - Saudagar abhishek
- पाठिंबा- ते अनुभवी आहे म्हणून मी समर्थन देतो. - Rockpeterson
मत/चर्चा
@ज, Rockpeterson, आणि Aditya tamhankar: आपणही या कौल प्रक्रियेत सामील व्हा. @अभय नातू: येथील कौलासाठी अंतिम कालावधी निश्चित करावा ही विनंती. --संदेश हिवाळेचर्चा २१:०७, १० मार्च २०२१ (IST)
- कृपया जास्तीत जास्त सदस्यांनी आपला कौल द्यावा, तसेच सध्या प्रचालक पदावर असलेल्या सदस्यांनी मराठी विकिपीडियावर आपल्या कामाच्या व्याप वाढवावा ही विनंती.
- संतोष गोरे (💬 ) १४:४६, १४ मार्च २०२१ (IST)
मुदत
४ मार्च, २०२१ रोजी सुरू झालेला हा कौल १४ दिवसांनी म्हणजे १८ मार्च, २०२१ रोजी २३:५९:५९ (भाप्रवे) वाजता पूर्ण होईल. -- अभय नातू (चर्चा) ०१:४४, १५ मार्च २०२१ (IST)
निकाल
Usernamekiran
- Usernamekiran (चर्चा • योगदान • ब्लॉक यादी • संरक्षण • हटवलेले योगदान • स्थानांतराची नोंद • अधिकार • अधिकार बदल)
नामांकन
नमस्कार. गेल्या काही दिवसांत मला लक्षात आले कि सध्या फक्त अभय नातू व Tiven हे दोघंच प्रचालक सक्रिय आहेत. प्रचालकीय कामे जास्त नसली तरी मी त्यांना मदत करू इच्छितो. मला मराठी विकिपीडियावर फक्त ७-८ महिन्यांचा अनुभव असला तरी त्यामध्येच मी भरपूर काही शिकलो आहे. तसेच मला इंग्रजी विकिपीडियावर जवळपास ७ वर्षांचा चांगला अनुभव आहे, आणि तेथील मानके/धोरणे पूर्णपणे इथे लागू होत नाहीत याची मला कल्पना आहे.
जर मला प्रचालकपदाचा कौल मिळाला, तर मी प्रामुख्याने चुकीने तयार झालेले पाने वगळणे, प्रताधिकारीत असलेली संपादने वगळणे (revision deletion), व इतर सदस्यांनी केलेल्या विनंत्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. मला विकिपीडिया वरील लेखांच्या वर्गवारीची चांगली जाण आहे. मी केलेल्या वर्गवारीची माहिती सदस्य:KiranBOT या पानावर आहे. तसेच मला wikimedia/mediawiki सॉफ्टवेअरची चांगल्यापैकी माहिती आहे.
आजतागायत प्रमाणे मला काही शंका असल्यास त्याबद्दल मी चावडीवर किंवा अनुभवी सदस्यांसोबत चर्चा करेल, खात्री नसताना परस्पर एखादे संपादन/काम करणार नाही. जर एखाद्या संपादकाने मला माझ्या कामाविषयी/संपादनांविषयी शंका किंवा मदत विचारल्यास मी त्याला समाधानकारक उत्तर देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल. आशा आहे की आपण या विनंतीवर आपले मत व कौल द्याल. धन्यवाद. —usernamekiran (talk) ११:५५, ५ जून २०२२ (IST)
- योगदान/संपादनांची सविस्तर माहिती
- इतर खाते: KiranBOT, व KiranBOT II.
कौल
- पाठिंबा- माझे समर्थन आहे, मला आशा आहे तुम्ही प्रताधिकार भंग आणि कळसूत्री खात्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महत्वाचे काम कराल. धन्यवाद. - QueerEcofeminist
- पाठिंबा - संतोष गोरे
- पाठिंबा - Khirid Harshad
- पाठिंबा- अधिकाराचा गैरवापर करून हद्दपार करण्यात आलेल्या सदस्याला (Khirid_Harshad) आपली बाजू मांडण्याची संधी मिळावी यासाठी आपण प्रयत्न केलात. यावरून आपण सामान्य सदस्यांचा सन्मान कराल अशी आशा वाटली. म्हणून पाठिंबा . - shantanuo
चर्चा
मुदत
- @अभय नातू: ह्यांना विनंती आहे कि कौल संपण्याची तारीख/मुदत कृपया ठरवून द्यावी. —usernamekiran (talk) २१:२२, ८ जून २०२२ (IST)
निकाल
सदस्य:Usernamekiran याच्या बाजूने चार आणि विरुद्ध शून्य मते मिळाली आहेत.
@Usernamekiran:, अभिनंदन. प्रचालकपदाचा सुज्ञपणे वापर कराल ही खात्री आहेच. इतर प्रचालक व जाणते संपादक यांच्याशी संवाद साधून मराठी विकिपीडियाच्या प्रगतीत तुमचा मोठा हातभार लागो अशा अपेक्षेसह.
संतोष गोरे
- संतोष गोरे (चर्चा • योगदान • ब्लॉक यादी • संरक्षण • हटवलेले योगदान • स्थानांतराची नोंद • अधिकार • अधिकार बदल)
नामांकन
नमस्कार, सध्या मराठी विकिपीडियावर मोजकीच प्रचालक मंडळी सक्रिय असून पैकी काही जुने प्रचालक पदमुक्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मी मराठी विकिपीडियावर ७ वर्षांपासून संपादने करत असून गेल्या तीन वर्षांपासून जरा जास्तच सक्रिय आहे. सध्या मी येथे द्रूतमाघारकार पदावर असून गेल्या सात वर्षात माझ्या जुन्या व नव्या खात्यावरून मी १०,००० पेक्षा जास्त संपादने केली असून ५,००० पेक्षा अधिक पानांवर माझी संपादने झाली आहेत. यात नवीन लेख लिहिताना अनेकदा त्याला पूरक असे इतर लेख पण निर्माण केले आहेत. थोडक्यात एक लेख व्यवस्थित लिहिण्यासाठी त्याला पूरक २, ३ किंवा ४ लेख देखील लिहिले आहेत. ही क्रिया इतरांचे लेख दुरुस्त करताना देखील झालेली आहे. त्याच सोबत समोर येणारा लेख सामान्य संपादकाचा किंवा प्रचालकाचा देखील जरी असला तरी योग्य तो सुचालन साचा लावणे, लेख दुरुस्ती करणे किंवा वर्ग जोडणे हे मी कोणताही भेदभाव न पाळता केले आहे. याशिवाय नवीन वर्ग, साचे, माहितीचौकट इ. तयार करणे, तसेच जुन्यात देखील दुरुस्ती करणे ही कामे सुद्धा मी केलेली आहेत. विविध संपादनेथॉन मध्ये सहभागी होऊन मी पुरस्कार देखील प्राप्त केलेले आहेत. मी गेल्या सात वर्षांत कुणासाठी 'अपशब्द' वापरले असे कधीही झालेले नाही. याउलट माझ्यावर कुणी भडकले असले तरी मी मौन पाळले, त्यांना सांभाळून घेतले किंवा सदरील सदस्यास योग्य तेच मार्गदर्शन केलेले आहे. यात एकही संपादक मराठी विकिपीडियापासून दुरावू नये हाच हेतू होता व आहे.
जर मला प्रचालकपद मिळाले, तर मला अजून सुलभपणे काम करता येईल एवढाच माझा उद्देश आहे. आशा आहे की आपण या विनंतीवर आपले मत व कौल द्याल ही नम्र विनंती. धन्यवाद.- संतोष गोरे ( 💬 ) ११:३४, ४ जुलै २०२२ (IST)
कौल
- पाठिंबा- होय, मी तुमचे मराठी समुदाय आणि विकिपीडियासाठी योगदान देण्याचे छान कार्य आणि समर्पण पाहिले आहे आणि मी पूर्णपणे सहमत आहे की तुमचे कार्य सुलभ करण्यासाठी तुम्हाला प्रचालक अधिकार दिले जावेत. - Rockpeterson
- पाठिंबा- तुमचे आपल्या विकिपीडियावरील योगदान महत्त्वपूर्ण आणि स्वागतार्ह आहे. मराठी विकिपीडियाला तुमच्या रूपाने अजून एक सुसंस्कृत व सक्रिय प्रचालक मिळाल्यास आनंद होईल. - Sandesh9822
- पाठिंबा- मी जेव्हापासून मराठी विकिपीडियावर सक्रिय आहे तेव्हापासून प्रत्येकवेळी तुम्ही विविधप्रकारे मदत, समजावून सांगणे, योग्य माहिती सांगण्याचे काम केले आहे. तसेच तुम्ही प्रचालक झालात तर मराठी विकिपीडियाच्या वाढीस चांगले योगदान द्याल ही खात्री आहे म्हणून माझा तुम्हाला पाठिंबा आहे. - Khirid Harshad
- पाठिंबा- जुने व विश्वसनीय सदस्य. २०:४७, ५ जुलै २०२२ (IST). - Usernamekiran
- पाठिंबा- संतोष गोरे यांना प्रचालक मंडळी मध्ये स्वागत करणास इच्छितो. मराठी विकिपीडियावर आपल्यासारखे सक्रिय व निर्धारित सदस्यांची खूप मोठी गरज आहे. नामांकन करण्यास धन्यवाद. - Tiven2240
.
मुदत
- उमेदवारी जाहीर केल्यानंतर २१ दिवस मुदत असते. त्यानुसार नेमका निकाल ठरेल. दिनांक - २५ जुलै २०२२ --Tiven2240 (चर्चा) १०:४४, ११ जुलै २०२२ (IST)
निकाल
सदस्य:संतोष गोरे याच्या बाजूने पाच आणि विरुद्ध शून्य मते मिळाली आहेत.
@संतोष गोरे:, अभिनंदन. प्रचालकपदाचा सुज्ञपणे वापर कराल ही खात्री आहेच. इतर प्रचालक व जाणते संपादक यांच्याशी संवाद साधून मराठी विकिपीडियाच्या प्रगतीत तुमचा मोठा हातभार लागो अशा अपेक्षेसह.
अभय नातू (चर्चा) ०७:२७, २६ जुलै २०२२ (IST)
- धन्यवाद, मला दिल्या गेलेल्या नवीन अधिकारपदाची मला चांगली जाणीव आहे. निश्चितच मी आपल्या सर्वांच्या अपेक्षांना पात्र ठरण्याचा प्रयत्न करत राहीन. आपल्या सर्वांचे आभार- संतोष गोरे ( 💬 ) ०९:१७, २६ जुलै २०२२ (IST)