विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे/जुने प्रस्ताव

दीर्घकाल अकार्यरत प्रचालक/प्रशासक आपोआप पदमुक्ती कालावधी प्रस्तावसंपादन करा

हा प्रस्ताव स्वीकृत झाला आहे. याची नोंद विकिपीडिया:प्रचालक आणि विकिपीडिया:प्रशासक या पानांवर केलेली आहे. या प्रस्तावाची [[विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे/जुने प्रस्ताव/दीर्घकाल अकार्यरत प्रचालक/प्रशासक आपोआप पदमुक्ती कालावधी प्रस्ताव|नोंद]] येथे ठेवली आहे.

नमस्कार,

प्रस्तावनासंपादन करा

धोरण प्रस्तावसंपादन करा

अ)या धोरण प्रस्तावाच्या कार्यकक्षेच्या मर्यादा: कार्यरत प्रचालकांचा कार्यावधी (पर्याप्त अतीदीर्घता जपून) एकुण कार्यावधी किती असावा याची वेगळी चर्चा मराठी विकिपीडियावर भविष्यात होऊ शकते.परंतु मूळ विकिपरंपरेने कार्यरत प्रचालकांचा कार्यावधी हा सध्या नेहमी करताचा आहे. या विशीष्ट प्रस्तावात कार्यरत प्रचालकांचा संबंध नाही.

 • तर्क (लॉजीक): धोरणात नेमकेपणा ठेवणे.

१) दीर्घकाल अकार्यरत प्रचालक/प्रशासक स्वयमेव(आपोआप) पदमुक्ती कालावधी: सलग सहा(६) वर्षे एकही संपादन अथवा एकही प्रचालकीय कार्य या दोन्ही पैकी एकही गोष्ट नाही असे प्रचालक/प्रशासक जबाबदारीतून पदमुक्ततेस आपोआप पात्र समजावेत. (माझे व्यक्तीगत मत हि अनावश्यक गोष्ट आहे,तर्कपूर्ण नाही, पण वर प्रस्तावनेत म्हटल्या प्रमाणे मी इतरांच्या भावनिक आग्रहाचा आदर करू इच्छितो)

 • तर्क (लॉजीक):आपोआप पदमुक्तीचे मुख्य तर्क, ज्या अर्थी एखाद्या सदस्याने प्रचालक पदाची जबाबदारी घेतली, त्या अर्थी त्याने किमान स्वरूपाची उपस्थिती दाखवली पाहीजे.
 • विरूद्धतर्क (लॉजीक):जर एखाद्या सदस्याने संपादनच केले नाही तरी सदस्यता रहाते.असे न वापरलेले सदस्य खाते पडीक राहील्यास योगदान मिळत नसले तरी काही नुकसानही नाही म्हणून सदस्य खाते (काही अपवाद सोडल्यास) नेहमी करता असते.तद्वतच प्रचालक/प्रशासकाने इतर प्रचालक कार्यरत असताना अधिकार वापरले नाहीत तर फायदा नसला तरी वस्तुत: खाते पडीक राहील्यास सरळ स्वरूपाचे कोणते नुकसानही नाही.
 • विरूद्धतर्क (लॉजीक): उलटपक्षी विवीध क्षेत्रातील अनुभवी प्रचालकांनी आत्मसात केलेल्या कौशल्या पासून विकिपीडियाच वंचीत होऊ शकतो.जसे मिडियाविकि नामविश्वातील .jsपाने आतापर्यंत सहसा प्रचालक सदस्य कोल्हापुरींनी केली. सुभाष राऊतांना मुखपृष्ठावरील छायाचित्रे बदलती ठेवता येतात इतर सदस्य त्यात फारसा रस दाखवत नाहीत. सदस्य संतोष दहिवळांना विवीध सुविधात रस आहे. सदस्य श्रीहरी मराठे आणि अभय नातू यांना कालगणना हा किचकट विषय व्यवस्थीत माहिती आहे. संकल्प द्रविडाम्ची स्वत:ची कौशल्ये आहेत.नरसिकरांप्रमाणे रिटायरमेंटनंतर किंवा इतर कामा नंतर प्रचालक सदस्य वापस येऊ शकतात त्यांच्या कौशल्याचा सुयोग्य फायदा मराठी विकिपीडियास होत रहावा म्हणून ६ वर्षांच्या अनुपस्थितीचा मध्यम कालावधी निवडला आहे.

२) असे दीर्घकाल अकार्यरत प्रचालक/प्रशासक स्वयमेव(आपोआप) पदमुक्ती कालावधीस अनुसरून पदमुक्त झालेले प्रचालक/प्रशासक अथवा स्वत:हून राजीनामा दिलेले सदस्य पुन्हा कार्यरत होऊन प्रचालक/प्रशासक पद विनंती केल्यास त्यांची विनंती प्रचालक मंडळाने ग्राह्य धरल्यास आणि स्वीकृती अधिकाऱ्यांना(प्रशासक) स्विकार्ह झाल्यास त्यांची प्रचालक पदावर सरळ फेर नियूक्ती करतील.

 • तर्क (लॉजीक):परत कौल टाळण्याचा उद्देश लोकशाहीकरण टाळणे हा होय.
 • विरूद्ध तर्क: इंग्रजी विकिपीडियात प्रशासक स्वत:च फेर नियूक्ती करतात.प्रचालक मंडळ विशीष्ट मताकडे कललेले असेल तर इतर कारणांनी नकार देऊ शकते.

३) कोणत्याही मराठी विकि(मिडिया)प्रकल्पावर कोणत्याही कारणाने प्रचालक संख्या भविष्यात फार घटली तरी किमान एक मराठी भाषी प्रचालक सदैव शिल्लक राहीलाच पाहीजे, नवीन प्रचालक नियुक्ती नंतर अथवा एखादा जुना प्रचालक वापस आल्या नंतरच अशा प्रकल्पावरचा प्रचालक दूर केला जाऊ शकेल.

 • तर्क (लॉजीक):मराठी विकिप्रकल्पांवर अमराठी लोकांचे नियंत्रण टाळणे
 • विरूद्धतर्क:सूचवा

४) सर्व निवृत्त प्रचालक/प्रशासक ( कोणत्याही विशेषाधिकारा शिवाय,) निमंत्रित सदस्य समजले जातील आणि त्यांच्या मतांचा सुयोग्य आदर विकिपीडिया जाणत्यांसदस्यां प्रमाणे राखला जाईल.

 • तर्क (लॉजीक): निवृत्त प्रचालक/प्रशासकांच्या अनुभवाचा मराठी विकिपीडियास फायदा होत रहावा
 • विरूद्धतर्क:सूचवा

सामर्थ्य,दुर्बलता,संधी आणि जोखीम विश्लेषण (स्वॉट ॲनालिसीस) सिनॉप्सीससंपादन करा

 • खालील मजकुरास {{स्वॉट |मजकूर =............... ............. |लिहिणारा =Mahitgar }} दाखवा-लपवा साचा लावण्यात काही तांत्रीक अडचण आली.तांत्रीक त्रुटी दुर करून साचा पुन्हा लावून देण्यास साहाय्य हवे आहे ही नम्र विनंती.
क्रमांक प्रस्ताव सामर्थ्य दुर्बलता संधी जोखीम
दीर्घकाल अकार्यरत प्रचालक/प्रशासक स्वयमेव(आपोआप) पदमुक्ती कालावधी: सलग सहा(६) वर्षे एकही संपादन अथवा एकही प्रचालकीय कार्य या दोन्ही पैकी एकही गोष्ट नाही असे प्रचालक/प्रशासक जबाबदारीतून पदमुक्ततेस आपोआप पात्र समजावेत. प्रचालक कार्यरत होतील आणि आपल्या अनुभवाचा विकिपीडियास उपयोग करून देतील असा सकारात्मक दृष्तीकोण,कालावधी पुरेसा दीर्घ ठेवल्यामुळे अप्रत्यक्ष लोकशाहीकरणाच्या प्रक्रीयेस सुयोग्य खीळ बसते प्रचालक पदाच्या काटेरी मुकूटाचा एकदा अनुभव घेऊन चुकलेला चांगला निवृत्त प्रचालकही पुन्हा ही जबाबदारी नको म्हणून विनंती करणारच नाही अशी शक्यता अकार्यरत प्रचालक नवीन प्रचालक होणाऱ्यास अडकाठी आहेत असे नाही त्यामुळे दृश्य संधी दिसत नाहीत नव्या संधी नसल्यामुळे तत्संबंधी जोखीमही दिसत नाही.भविष्यात माहीत नसलेल्या काळात प्रचालक पदातील रस पुर्णत: कमी होत गेल्यास प्रचालक संख्या कमी होत जाऊन मराठी प्रकल्पांवर अमराठी लोकांचे अप्रत्यक्ष नियंत्रण येण्याची शक्यता खासकरून कमी कामचालू असलेल्या विकिक्वोट अथवा विकिव्हॉयेज इत्यादी प्रकल्पातून संभवू शकते.जसे कोकणी प्रकल्पाकरता कन्नड लिपीचा अथवा रोमन लिपीचा आग्रह धरला जातो आहे
प्रचालक मंडळाने ग्राह्य धरल्यास आणि स्वीकृती अधिकाऱ्यांना(प्रशासक) स्विकार्ह झाल्यास त्यांची प्रचालक पदावर सरळ फेर नियूक्ती प्रचालक कार्यरत होतील आणि आपल्या अनुभवाचा कौशल्याचा विकिपीडियास उपयोग करून देतील असा सकारात्मक दृष्तीकोण,कालावधी पुरेसा दीर्घ ठेवल्यामुळे अप्रत्यक्ष लोकशाहीकरणाच्या प्रक्रीयेस सुयोग्य खीळ बसते १)प्रचालक मंडळ एका विशीष्ट विचारगटाकडे कललेले असेल तर नको असलेले जुने प्रचालक टाळू शकते २) जुने प्रचालक मोठ्या गॅप नंतर वापस येत असतील तर मध्यंतरीच्या काळातील निती आणी तंत्रज्ञानातील चर्चातील बदलांशी अवगत नसण्याची शक्यता जुन्या प्रचालकास अवगत अनुभव आणि कौशल्याचा सहज उपयोग जुना प्रचालक हि सर्व प्रक्रीया आणि जबाबदारी नको म्हणून विनंती करणारच नाही अशी शक्यता
किमान एक मराठी भाषी प्रचालक सदैव शिल्लक राहीलाच पाहीजे मराठी विकिप्रकल्पांवर अमराठी लोकांचे नियंत्रण टाळणे मेटावरील अमराठी मंडळी सहजपणे हस्तक्षेप करू शकणार नाहीत मराठी विकिप्रकल्पांवर अमराठी लोकांचे नियंत्रण टळते सूचवा
सर्व निवृत्त प्रचालक/प्रशासक ( कोणत्याही विशेषाधिकारा शिवाय,) निमंत्रित सदस्य समजले जातील जुन्या प्रचालकास अवगत अनुभव आणि कौशल्याचा सहज उपयोग सदस्यांत भेदाभेद करणारा अजून एक ॲडीशनल स्तर तयार होण्याची शक्यता जुन्या प्रचालकास अवगत अनुभव आणि कौशल्याचा सहज उपयोग नाराज जुन्या प्रचालकांकडून अप्रस्तुत भूमिका जाणीवपुर्वक पुढे केल्या जाण्याची दुर्मीळ शक्यता

प्रस्ताव कालावधीसंपादन करा

 • प्रस्ताव मांडणी ६ ऑगस्ट
 • स्वयंशाबीत नसलेल्या नवागत सदस्यांशिवाय चर्चेचा एक दिवस ७ ऑगस्ट
 • तर्क आणि उद्देश (१, नवागत सदस्यांना विकिपीडिया नितीचा परीचय होण्यास किमान दिवसाचा कालावधी लागेल, २ चर्चेच्या किमान सुरवातीस जाणीव पुर्वक उत्पाताचे प्रकार टळावेत.)
 • ८ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट सर्व सदस्यांचा चर्चा सहभाग आणि सर्वसहभागाची चर्चा समाप्ती
 • १९ ऑगस्ट तार्कीक उणीवा अभ्यास आणि जाणत्यांकडून तर्कसंगत भूमिकांचा स्विकार
 • २० ऑगस्ट प्रशासकांची अंतीम भूमिका मांडणी आणि प्रस्तावाचे अंतीम प्रारूप कौल पानांकरीता उपलब्ध
 • २० ऑगस्ट ते २४ ऑगस्ट सर्व मराठी विकिप्रीकल्पांवर कौल
 • कौलास प्रशासकीय स्वीकृती आणि मेटा प्रतिपालकांना प्रशासकांचा अभिप्रेत कालावधीच्या आत मराठी विकि धोरणाचा निरोप.
 • चर्चेत सहभागास थोडी उशीरा सुरवात झाल्यामुळे प्रस्तावचर्चा कालावधी ४ दिवसांनी वाढवला

पूर्व पक्ष विरोधी दृष्टीकोणसंपादन करा

 • (भारतीय ऐतिहासीक वैचारीक चर्चा परंपरेत विरोधी पक्षाची भूमिका पूर्वपक्षात मांडली जाई आणि त्या नंतर तर्कपुर्ण चिकित्सक चर्चा केली जाई त्या परंपारेचे निर्वहन करण्याच्या दृष्टीने हा छोटासा प्रयत्न)

तटस्थ दृष्टीकोणसंपादन करा

प्रस्ताव समर्थन पक्षसंपादन करा

मला हा प्रस्ताव समर्थनीय वाटतो. जरी माझ्या मते सहा वर्षांचा कालावधी अतिदीर्घ असला तरीही माहितगारांनी म्हणल्याप्रमाणे मध्यममार्ग म्हणून उत्तम आहे.

अभय नातू (चर्चा) १९:४२, १४ ऑगस्ट २०१३ (IST)

अभय नातू यांच्या मताशी मी सहमत आहे. तरीही सहा वर्षांच्या ऐवजी पाच वर्षे कालावधी पुरेसा आहे असे वाटते.

नितीन (चर्चा) २०:५५, १५ ऑगस्ट २०१३ (IST)

जाणत्या सदस्यांनी स्विकृत केलेल्या तर्कसंगत भूमिका , तर्कसंगत नसल्या मुळे जाणत्या सदस्यांनी अस्विकृत केलेल्या भूमिकासंपादन करा

प्रशासक अंतिम भूमिकासंपादन करा

नोंदीसंपादन करा

या प्रस्तावाचे काय झाले? एक प्रस्तावक आणि दोन कंडिशनल हो मतांच्या पुढे न गेल्यामुळे हा प्रस्ताव रद्द समजावा का?

अभय नातू (चर्चा) १९:११, ४ ऑक्टोबर २०१४ (IST)


प्रस्ताव पूर्णत: तर्कसूसंगत पद्धतीने मांडलेला आहे. आणि निर्णय तर्क सुसंगततेच्या आधारावर व्हावयास हवेल लोकशाही हा येथे आधार नाही. तुम्ही सुद्धा सहमत असल्यामुळे एक प्रशासक या नात्याने मी हा प्रस्ताव पुर्वीच स्वीकृत गृहीत धरलेला आहे. जर रद्द करावाच वाटला तर अनंत काळ पर्यंत चालू ही मूळ पूर्व स्थिती मी गृहीत धरेन.
फारतर नितीन यांच्या मताचा आदर म्हणून ५ वर्षे सहा महीने करून घ्या परंतु तसे करणे मला मुळीच श्रेयस्कर वाटत नाही ६ वर्षेच ठिक आहेत. मराठी विकि प्रकल्पांच स्वातंत्र्य केव्हा गायब होईल हे समजणार पण नाही. तुम्हाला या क्षणी अतीरंजीत वाटेल परंतु सतर्क न राहणाऱ्यांसाठी पारतंत्र्य ही दूरची गोष्ट नसते.
उदाहरणार्थ श्रीहरी मराठेंचा मराठी विक्शनरीवर ६ पेक्षा अधिक वर्षे झाली तरी तेथील रचनेची सर्व प्रॅक्टीकली कल्पना असलेला प्लानिंग केलेला अनुभवी सिसॉप मुळीच घालवत नाही. तुम्ही विषय काढलाच आहेत तर तुम्हाला त्यांच्या बद्दल काही कल्पना असून संपर्क साधून किमान स्वरुपाच्या संपादनांची विनंती करून पहावी असे वाटते. तरीही रिस्पॉन्स न आल्यास मग पुढील कारवाई करू. मराठी विकिपीडियावर उदाहरणार्थ कौस्तुभ/कोल्हापुरी सध्या कार्यरत नाहीत परंतु अनुभवी हात आहेत फिल्ड मध्ये दोन चार परिचीतांना जरी मराठी विकिपीडियाची ओळख त्यांच्या कडून करून देणे होत असेल एखाद्या गावात होणाऱ्या विकि ॲकेडमीला त्यांच्या उपस्थीतीने कधी मधी प्रोत्साहन मिळत असेल त्यांच्या ओळखी मुळे मिडीया विकि फाऊंडेशनला एखादा डोनर मिळाला. एखादा प्रचालक प्रशासक पडीक असेल झाले तर अप्रत्यक्ष फायदे आहेत नुकसान काहीच नाही. उलटपक्षी प्रचालकांचा कार्यकाळ कमी करण्याने डेमॉक्रॅटायझेशन होते ते विकिपीडियाच्या न्यूट्रॅलिटीच्या महत्वाच्या ज्ञानकोशीय तत्वाला तडा देणारे आहे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:१४, ४ ऑक्टोबर २०१४ (IST)

माहितगार,

१. माझे मत कंडिशनल हो आहे. २. मी फक्त प्रश्न विचारला. या प्रस्तावाबद्दल एकूण उदासीनताच दिसली आहे. ३. हा प्रस्ताव स्वीकृत धरला गेला असल्यास तसे लिहावे व हा प्रस्ताव इतर नियमांसोबत हलवावा.

आपण दिलेली उदाहरणांबद्दल मी आत्ता चर्चा करू इच्छित नाही. माझा रोख कोणा एका सिसऑपला ठेवण्याचा किंवा घालवण्याचा नाही. उद्देश या प्रस्तावाचा (तरी) पाठपुरावा करावा इतकाच (सध्या तरी) आहे.

अभय नातू (चर्चा) २०:२५, ४ ऑक्टोबर २०१४ (IST)


होय, प्रस्ताव स्वीकृत धरला गेला आहे. सवडी नुसार नियमांमध्ये हलवणार होतोच आपणही हलवत असल्यास हरकत नाही.
बाकी सध्या चर्चांमध्ये उदासीनता आहे पण वेगळ्या अंगाने ते ठिकही आहेत, वातावरण एकूण कमीत कमी व्यत्ययांचे आहे हा सकारात्मक भाग आहे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:३४, ४ ऑक्टोबर २०१४ (IST)
आपण सुचवल्या प्रमाणे विकिपीडिया:प्रचालक आणि विकिपीडिया:प्रशासक या पानांवर नोंदी केल्या.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:४४, ४ ऑक्टोबर २०१४ (IST)

व्यक्ती नांवांबद्दलचे शीर्षकलेखन संकेतांत प्रस्तावित बदलसंपादन करा

हा प्रस्ताव स्वीकृत झाला आहे. या प्रस्तावाची नोंद येथे ठेवली आहे.

९ ऑक्टोबरला चर्चेस घेतलेल्या या विषयावरील दोन आठवड्यांची मुदत होउन गेलेली आहे. तदनुसार येथील चर्चा बंद करण्यात येत आहे. आता हा प्रस्ताव मतदानासाठी घेतला जाईल.

अभय नातू (चर्चा) ०८:५३, २५ ऑक्टोबर २०१४ (IST)


प्रस्तावसंपादन करा

व्यक्तींबद्दलच्या लेखांच्या शीर्षकांसाठी मराठी विकिपीडियावरचे सध्याचे संकेत या प्रमाणे आहेत.

===व्यक्ती नांवांबद्दलचे शीर्षक संकेत===

व्यक्तीबद्दलचा लेख तयार करताना त्याच्या संपूर्ण नावाने मूळ पान ठेवावे. उपनामे, उपाख्य, पदवीसह लिहिलेले शीर्षक असू नये.[अक्षरानुरूप वर्गीकरणात अडचण येते(alphabetical categorisation)]. प्रचलित नाव मूळ नावापासून वेगळे असल्यास प्रचलित नाव नि:संदग्धीकरण पानांवर नमूद करावे व त्या नावावर टिचकी मारल्यास ते मूळ नावाकडे जाण्याची व्यवस्था करावी.

जर आवश्यकता भासली तर उपनामे, उपाख्य, पदवीसकट नाव, इ.चे पुनर्निर्देशन या पानाकडे करावे. उदा. भीमराव रामजी आंबेडकर हे मूळ पान राहील व बाबासाहेब आंबेडकर, डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बी.आर. आंबेडकर इ. चे पुनर्निर्देशन भीमराव रामजी आंबेडकरकडे करावे.

अशुद्ध लेखन असलेली शीर्षके शुद्धलेखन असलेल्या शीर्षकाकडे स्थानांतरित करावीत आणि अशुद्ध लेखन असलेले शीर्षक वगळावे. परंतु लोक अशुद्धलेखन असलेले शीर्षक पुन्हा पुन्हा निर्माण करत राहिले, तर मात्र ते पान तसेच ठेवून शुद्धलेखन असलेल्या व्यवस्थित शीर्षकाकडे पुनःर्निदेशित करावे.


येथे झालेल्या मोठ्या चर्चेनंतर मी यात खालील बदल सुचवित आहे. १, २, ४ व ५ अबाधित आहेत. ३ मध्ये बदल आहेत.

१. व्यक्तीबद्दलचा लेख तयार करताना त्याच्या संपूर्ण नावाने मूळ पान ठेवावे.

२. उपनामे, उपाख्य, पदवीसह लिहिलेले शीर्षक असू नये.

३. प्रचलित नाव मूळ नावापासून वेगळे असल्यास लेखाच्या चर्चा पानावर प्रचलित नाव नमूद करावे व लेख त्या नावाने ठेवण्याबद्दल सदस्यांची मते मागवावी.

३.१ जर चार दिवसांत मत आले नाही तर एक तरी प्रचालकास व इतर जाणत्या सदस्यांस साद घालून त्यांचे लक्ष वेधून घ्यावे ({{साद|अभय नातू}} किंवा {{साद|Mahitgar}} ही उदाहरणादाखल).
३.२ साद घातल्यावर २ दिवसांत उत्तर न आल्यास लेखाचे प्रचलित नावाकडे स्थानांतरण करावे. यावेळी पूर्ण नावापासून प्रचलित नावाकडे पुनर्निर्देशन असू द्यावे.
३.३ इतर अप्रचलित परंतु कागदोपत्री असलेल्या नावांपासून लेखाकडे पुनर्निर्देशने ठेवावी.

४. जर आवश्यकता भासली तर उपनामे, उपाख्य, पदवीसकट नाव, इ.चे पुनर्निर्देशन या पानाकडे करावे. उदा. भीमराव रामजी आंबेडकर हे मूळ पान राहील व बाबासाहेब आंबेडकर, डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बी.आर. आंबेडकर इ. चे पुनर्निर्देशन भीमराव रामजी आंबेडकरकडे करावे.

५. अशुद्ध लेखन असलेली शीर्षके शुद्धलेखन असलेल्या शीर्षकाकडे स्थानांतरित करावीत आणि अशुद्ध लेखन असलेले शीर्षक वगळावे. परंतु लोक अशुद्धलेखन असलेले शीर्षक पुन्हा पुन्हा निर्माण करत राहिले, तर मात्र ते पान तसेच ठेवून शुद्धलेखन असलेल्या व्यवस्थित शीर्षकाकडे पुनःर्निदेशित करावे.


वरील प्रस्तावावर येथे चर्चा करावी तसेच इतर सदस्यांचे लक्ष याकडे वेधून घ्यावे ही विनंती.

दोन आठवड्यांनी हा प्रस्ताव मतदानासाठी घेण्यात येईल.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) ०२:०६, ९ ऑक्टोबर २०१४ (IST)

चर्चासंपादन करा

  पाठिंबा- माझे येथील अनधिकृत मत मतदानाचे वेळी ग्राह्य धरावे.. - अभय नातू
संकेतातील या खुलाशाने अनेक लेख सापडणे सोपे होईल तसेच वादही टळतील.


अशा पद्धतीने चर्चा करण्याचे मनमोकळे स्वागत करतो. जिथ पर्यंत मराठी लोक निर्णय घेतात मला न व्यक्तीश: पटणारी निती असेल तरीही हरकत नाही पण शक्य तेवढी तर्कसुसंगत ठेवण्याचा प्रयास करावा. माझी मते खालील प्रमाणे
१) वाद आहे म्हणून नितीची पुन्हा चर्चा करणे वेगळे आणि वाद टाळावयाचे म्हणून ज्ञानकोशाने नितींचा स्विकार करावयास चालू केल्यास वस्तुनिष्ठतेची ऐसी तैसी होण्यास वेळ लागणार नाही हे ही लक्षात घ्यावे.
मुद्दा शोधाचा तर्कावर टिकत नाही, माझे विश्लेषण खालील प्रमाणे :


शोध १) Default Sort मध्ये प्रॉपर सॉर्टींग आहे व्यवस्थीत नि:संदीग्धीकरण पाने आहेत, पुर्ननिर्देशने व्यवस्थीत आहेत वरून मराठी विकिपीडियन मोठ्या उत्साहाने कॅटेगरायझेशन करतात. तो पर्यंत तांत्रीक दृष्ट्या मराठी विकिपीडियातून लेख शोधण्याचा कोणत्याही केस मध्ये कसलाही प्रॉब्लेम नाहीच आहे. फार फारतर नि:संदिग्धीकरण हा शब्द नवीन माणसाला समजत नाही म्हणून अबकडव्यक्तीनाम (सर्व व्यक्ती यादी) असे सुस्पष्ट लेखन आणि ज्या लेखाच्या बाबतीत त्या नावाच्या फारच व्यक्ती असतील आणि नि:संदीग्धीकरण पान वरच्या बाजूस दिसत नसेल तर नि:संदीग्धीकरण पानाचे शीर्षक अबकडव्यक्तीनाम

एवढेच केले तर ते आपोआप पहिल्या क्रमांकाच्या शोधावर जाते.

शोध २) डिफॉल्ट सर्च मुख्य लेख नामविश्वावरच होतो. शोध घेताना लेखनात चूक जरी झाली तरी एकतर Default Sort मुळे ते शोधात यावयास हवे. Default Sort टर्म्स समजा प्रॉपरली भरलेल्या नाहीत तरीही विकिपीडियाचे शोध यंत्रही अलिकडे अद्ययावत झाले आहे. त्याने आपोआप बेस्ट पॉसीबल सदृश्य शोध दाखवणे अभिप्रेत आहे. तसे काही केस मध्ये होत नसेल असे निदर्शनास आणून दिल्यास १) संबंधीत बाब बगझीला मध्ये नोंदवावी.
  • हे लिहिताना मी विकिपॉडीया असा सर्च दिला शोध यंत्राने तुम्हाला विकिपीडिया म्हणायचे आहे का? हे बरोबर विचारले
  • एखाद्या व्यक्तीला अनुस्वार कसा टाईप करावयाचा माहीत नाही विवेकानद टाईप झाले अथवा टायपींग मिसटेक मुळे विचेकानंद वर शोध दिला तरीही तुम्हाला विवेकानंद म्हणायचे आहे का? हे शोध सॉफ्टवेअर बऱ्यापैकी बरोबर विचारते आहे.
शोध ७) माझ्या दृष्टीने शोधाचा मुद्दा मी यथा सांग खोडलेला आहे. तरीही शोधा संबंधीने मी विचारात न घेतलेले तर्क असतील तर ते मांडावेत खोडायचाच आहे म्हणून पहाणार्र नाही. या चर्चेशी खरेच किती रिलीव्हंट आहे तेवढाच अभ्यासेन.


पूर्णनाव विरुद्ध प्रचलित नाव


पूर्णनाव नाव का असावे ह्या मागची भूमिका समजून न घेतलेल्या व्यक्ती प्रचलित नावाकरता दबाव देतच राहतील. किती आणि कुणा कुणा समोर वाकावे ? तुम्ही वाकता हे सिद्ध झाल्यानंतर तत्वांशी तडजोड करणाऱ्यांचा ज्ञानकोश विश्वासार्ह कसा राहू शकेल ? रूढ संकेत पूर्ण नावाचा पण चर्चा पानावर चर्चा घेऊन प्रचलीत नावे वापरता येतील
शोध घेता येत नाही हा तर्क मी खोडून वर काढला आहेच, प्रश्न उरतो माझ्या डोळ्यांना/ मनाला पूर्ण नाव चांगले वाटत नाही. विकिपीडिया वस्तुनिष्ठतेची जागा आहे माझ्या डोळ्यांना/ मनाला पूर्ण नाव चांगले वाटत नाही याचीच जागा लेखातही घेणार की अमूक हा मजकूर माझ्या डोळ्यांना/ मनाला चांगला वाटत नाही म्हणून तो नको आणि हि मंडळी लेखातील मजकुरातही असेच वाकवत राहतील पुन्हा एकदा तोच प्रश्न; तुम्ही वाकता हे सिद्ध झाल्यानंतर तत्वांशी तडजोड करणाऱ्यांचा ज्ञानकोश विश्वासार्ह कसा राहू शकेल ?
अ) यात अप्रत्यक्ष डेमोक्रॅटायझेशन होतेच , वस्तुनिष्ठ पणे विरोध करणारे किती चर्चा पानांवर जाऊन विरोध नोंदवत राहतील म्हणजे एकुण प्रचलीत नाव मागणाऱ्यांची संख्या अधिक असणार केवळ प्रचलीत कोणते याच्या चर्चा होणार आणि अपवाद हाच नियम सिद्ध होईल केवळ जे मायनॉरिटी आहेत आपले म्हणणे रेटू शकत नाहीत तेवढीच शीर्षके पूर्ण नावाची राहतील. मेजॉरिटीच्या दबावाखाली जे तयार होते त्याला पुराण लोकरंजक कथा संग्रह म्हणता येऊ शकते वस्तुनिष्ठतेची संस्कृती असलेला ज्ञानकोश म्हणता येत नाही.
आ) ज्या लोकांच म्हणण स्विकारल जाणार नाही ती मंडळी स्वाभाविक पणे अनफेअर ट्रीटमेंटचा क्लेम अधून मधून टाकत राहणार आणि त्यांचा तो क्लेम बरोबर असेल पण मेजॉरिटी तो स्विकारणार नाही म्हणजे अनफेअर ट्रिटमेंट मूळे असलेला असंतोष खदखदतच राहणार.
इ) पूर्ण नावाच्या भूमीके मागचा मागच्या चर्चांचा कोणताही गोषवारा या चर्चे सोबत दिला गेलेला नाही त्या मुळे एका अर्थाने हा घाई घाईत हाफझार्डली मांडलेला प्रस्ताव ठरतो आहे.
ई) तुम्ही यावर कौल घेण्याचा प्रस्ताव आहे. पण तत्पुर्वी किती जणांनी पूर्ण नाव असण्याच्या गरजे मागची तार्कीक भूमीका समजून घेतलेली असणार आहे ? म्हणजे असा पर्याय देणेही सयूक्तीक नसलेले डेमोक्रॅटायझेशन आहे.
तरीही आठेक दिवसात सवडीनुसार मी जुन्या चर्चा शोधून येथे पूर्ण नावाच्या मागची भूमीका पुन्हा एकदा सविस्तार नोंदवण्याचे काम करेन.


संन्यासोत्तर संन्यासी नाव प्रचलीत झालेल्या व्यक्ती, विवाहपूर्व किंवा विवाहोत्तर पैकी एक नाव प्रचलीत असलेल्या स्त्रीयांच्या पूर्ण नावांचे लेखन कसे करावे, संभाजी शिवाजी भोसले या नावाच्या व्यक्ती संभाजी महाराजांच्या नंतरच्याही काळात दिसून येतात त्यातील कुणाला ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असल्यास काय करावे ह्या वेळी कुठे अपवाद द्यावयाचा असल्यास अशा स्वरूपाची चर्चा मननीय होऊ शकेल
परंतु मराठी विकिपीडिया तत्व चिंतनात पुढे जाण्या एवजी मागे जाईल दुसऱ्यांची नक्कल करण्यात समाधान मानेल ज्याच्या भविष्यात जे लिहिल आहे ते काही वेळा टळत नाही इत:पर काय म्हणावे


जाता जाता >>माझे येथील अनधिकृत मत मतदानाचे वेळी ग्राह्य धरावे<< हे वाक्य जरासे विनोदी आहे :)


'लेखन चालू' पूर्ण नावाच्या गरजेचा गोषवारा सदस्यांच्या माहिती साठी पुन्हा एकदा नमूद करे पर्यंत हे लेखन पूर्ण होऊ शकत नाही.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:१९, ९ ऑक्टोबर २०१४ (IST)वर माहितगारांचे लेखन चालू असले तरी मी येथे खुलासा करू इच्छितो की वाद टळणे आणि शोध लवकर लागणे हे दोनच मुद्दे नाहीत. हे सहज सुचले म्हणून लिहिले. पुनर्निर्देशनाने शोध लागू शकतो हे सत्य आहे.
एक मोठा मुद्दा असाही आहे की सदस्यांना प्रमाणीकरणाच्या एकसंध साच्यातून वेगळे शीर्षक द्यायचे असल्यास त्यातही सुसूत्रता असावी.
वाद झाला याचे कारण संकेतात त्रुटी होती. संकेतात खुलासा यावा आणि संदिग्धता राहू नये म्हणून हा प्रस्ताव.
माहितगारांचे लिहून होण्याची वाट पहात आहे.
अभय नातू (चर्चा) ०९:२०, ९ ऑक्टोबर २०१४ (IST)
ता.क. माहितगार, प्रस्तावाला धरून फक्त लिहावे. वर अनेक उतारे असंबद्ध आणि भरकटलेले आहेत ( आणि हे दोन उदाहरणे.) तसेच व्यक्तिगत ताशेरे ओढल्यास तुमचे लेखन गाळले जाईल (किंवा तुमच्या लेखनातील सगळ्या गमती आणि गमजा स्पष्ट करण्यात येतील) याची नोंद घ्यावी.
अभय नातू (चर्चा) ०९:२५, ९ ऑक्टोबर २०१४ (IST)
माझे मत सरळ आहे. विकिपीडियाने शीर्षकांसाठी संकेत ठरवले आहेत, जे हिंदी (विकिपीडिया:लेख_का_नाम_कैसे_रखें), संस्कृत, बंगाली, तामिळ, तेलुगू इत्यादी अनेक भारतीय भाषांसह एकूण ८२ विकिपीडियांवर वापरले जात आहेत. असे असताना केवळ एकाच सदस्याच्या आग्रहासाठी मराठी विकिपीडियाने अकारण वेगळे संकेत का वापरावेत ह्याचे संक्षिप्त व मुद्देसुद उत्तर मला अजूनही मिळालेले नाही. मला पुन्हा वाद सुरू करायचा नाही म्हणून मी ह्या चर्चेमधून अंग काढून घेत आहे. - अभिजीत साठे (चर्चा) १०:०५, ९ ऑक्टोबर २०१४ (IST)


>>:ता.क. माहितगार, प्रस्तावाला धरून फक्त लिहावे. वर अनेक उतारे असंबद्ध आणि भरकटलेले आहेत<< हे सरसकटीकरण आणि एखादी नाकारावयाची गोष्ट नाकारण्यासाठी दिलीले थातुरमातूर कारण आहे. मी प्रत्येक शब्द प्रस्तावावर टिका करण्यासाठी आणि माझ्या दृष्टीने सुसंबद्धच लिहिला आहे. प्रत्येक शब्द अथवा वाक्यातला कोणता भाग आपणास लक्षात आला नाही हे स्पष्ट करावे म्हणजे मलाही माझी भूमिका स्पष्ट करता येईल.
>>ई) किती जणांनी पूर्ण नाव असण्याच्या गरजे मागची तार्कीक भूमीका समजून घेतलेली असणार आहे ? << हे वर अभिजीत साठेंच्या मुद्देसुद उत्तर मला अजूनही मिळालेले नाही." याच्या शी संबंधीत आहे आणि इतरही अनेकांची अभिजीत साठेंसारखी स्थिती असू शकते. पूर्ण नावा मागच्या संकल्पने बद्दल मागच्या चर्चा उधृत करून गोषवारा देण्या पूर्वीच धोरण चर्चेला टाकणे त्याही पुढे जाऊन कौल घेणे म्हणजे ज्या गोष्टीची महत्वपुर्ण बाजू इतरांपूढे मांडलेलीच नाही त्यावर मत मत मागवणे हाफझार्ड आहेच (हि प्रस्तावावरची टिका आहे व्यक्तीगत नव्हे). तसेही अभिजीत साठे स्वत: थांबण्यास तयार असताना पूर्ण नावा मागच्या आणि जुन्या चर्चांचा गोषवारा न देता चर्चा आणि कौलाची घाई कशा साठी ? महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका चालू आहेत त्या पुर्वी राजकीय नेत्यांना बघा सुटसुटीत नावाच्या निमीत्ताने हा विवाद जिंकून दाखवतो आणि मग नंतर इतरही माहिती तुमच्या सोईची भरतो असा काही संदेश राजकीय कार्यकर्त्यांना देण्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष उद्देश या घाई मागे नसावा असे गृहीत धरून चालतो आहे.
तुमच्यावर कोणताही व्यक्तीगत ताशेरा ओढलेला नाही. कोणत्याही चर्चे मध्ये इव्हन प्रस्तावात सहमतीच्या दृष्टीने बदल करावे लागू शकतात. त्यापुर्वी कौलाचे मत स्वत: अनधिकृत असल्याचे सांगत देण्याची घाई माझ्या समर्थकांनो तुम्ही पण असेच घाई घाईने समर्थन करा असा संदेश देत नाही काय ? ताशेरा या घाईवर आहे व्यक्तीगत नव्हे.
जिथ पर्यंत अभिजीत साठेंच्या दुसऱ्या मुद्दाचा परामर्ष आहे. १) मला कुणाचे तरी प्रचलीत नाव सोन्या आहे असे वाटते अथवा गाढव आहे असे वाटते म्हणून किंवा २) संबंधीत व्यक्ती स्वत:चे खरे नाव लपवून समाजात स्वत:चे नाव सोन्या अथवा गाढव आहे असे पसरवते म्हणून किंवा ३) त्या व्यक्तीचे इतर चाहते/विरोधक त्या व्यक्तीला सोन्या अथवा गाढव या पैकी एक नाव प्रचलीत करतात म्हणून किंवा ४) इतर अनेक अथवा सर्व विकिपीडिया आधीच्या तीन पैकी एक अथवा दोन अथा तीन्ही पर्याय आवडले म्हणून एखाद्या व्यक्तीचे प्रचलीत नाव सोन्या अथवा गाढव आहे असे ठेवावे म्हणतात म्हणून मराठी विकिपीडियाने सुद्धा जुन्या चर्चांचा पूर्ण नावा मागच्या भूमीकांचा कोणताही विचार बाजूस ठेऊन, वस्तुनिष्ठतेशी तडजोड करून सोन्या अथवा गाढव अशा प्रकारची लेख शीर्षके लोकानुनयाच्या आणि लोकप्रीयतेच्या आधारावर स्विकारली पाहीजेत !! ज्या लोकांच्या अमूक नावाला लोकप्रियता आणि लोकानुनय लाभला आहे ते शीर्षक ठेवले म्हणजे सर्व कसे आनंदी आनंद असेल समाधान असेल. ज्ञानकोशाच्या दृष्टीने आदर्श भूमीका दिसते आहे. संक्षीप्त आणि उत्तराची घाई असलेल्यांकरता हि माझी तात्कालीक प्रतिक्रीया आहे व्यक्तीगत ताशेरा नव्हे.
ज्यांना अभ्यासपूर्ण तर्क हवा असेल त्यांच्या साठी अभिजीत साठे हिंदी विकिपीडिया आणि अजून कोणता पिडीया म्हणतात त्यांच्या भूमीकांचा अभ्यास करून सविस्तार उत्तर आठवडाभरात देईन आणि उत्तरांची लांबी माझ्या पद्धतीनेच असेल केवळ सोई साठी जरूरी प्रमाणे विस्तृत उत्तर हा साचा वापरेन.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १०:५९, ९ ऑक्टोबर २०१४ (IST)
हे सरसकटीकरण आणि एखादी नाकारावयाची गोष्ट नाकारण्यासाठी दिलीले थातुरमातूर कारण आहे.
चूक. वर लिहिलेल्या अत्यंत मोठ्या उताऱ्यातील माझ्या अंदाजो २५% भाग प्रस्तावावर आणि इतर भाग प्रस्तावेतर गोष्टींबद्दल आहे, उदा. लोकांची मनःस्थिती, त्यांचे भविष्यातील उत्तर, इ.
मोठ्या लांबीचा उतारा लिहिल्याने कोर्टात वेळकाढूपणा करून केस जिंकलेले वकील अनेक पाहिलेले आहेत. हे कोर्ट नव्हे. शेवटी हो किंवा नाही हे तुमचे एक मत विरुद्ध हो किंवा नाही हे प्रत्येक सदस्याचे एक मत यानेच निर्णय ठरणार आहे. तुम्ही तुमच्या मते तर्क लढवलेत तरी सगळ्यांना ते पटतीलच किंवा पटायलाच पाहिजे असे होत नाही.
गरजा लिहिलेल्या आहेत. किंबहुना लिहण्याची सक्त गरज आहे असे वाटतही नाही. प्रस्ताव मांडला. सदस्यांनी हो म्हणले तर हो, नाही म्हणले तर नाही.
येथे तुमचे मत मांडा आणि इतरांचे मत वाचा. त्यानंतर निर्णय होईलच.
अभय नातू (चर्चा) ०७:४१, १० ऑक्टोबर २०१४ (IST)
अभयने सुचवल्याप्रमाणे मी माझे मत देत आहे. संपूर्ण नाव शीर्षकासाठी वापरण्याला माझा पूर्ण विरोध आहे. माझ्या मते शीर्षके रोजच्या वापरातील नावांचीच असावीत. शेवटी मराठी विकिपीडिया is not an isolated project. It is a part of Wikipedia family and should use rules and policies used by majority of other Wikis. थातूरमातूर कारणे सांगून मराठी विकिपीडियाने कशी स्वत:ची पॉलिसी वापरली पाहिजे ही वरील कारणीमीमांसा मला अजिबात मान्य नाही. - अभिजीत साठे (चर्चा) ०८:४६, १० ऑक्टोबर २०१४ (IST)
ज्या नावाने व्यक्ती प्रसिद्ध असेल त्या नावानेच लेख असला पाहिजे . त्या व्यक्तीची प्रसिद्धी त्या नावाशी जोडली गेलेली असते उदा (With due respect to our Prime Minister) नरेंद्र मोदी या ऐवजी नरेंद्र दामोदरदास मोदी असे म्हटले तर कोपऱ्यावरच्या किराणा दुकानाचे नाव वाटेल.
उगाचच काहीतरी प्रथा चालू करू नयेत. एखाद-दुसऱ्या माणसाच्या मनमानीखातर तर नक्कीच नाही. माहितगार साहेबांनी जरा साधकबाधक विचार करावा. उगीच निबंध (तेही अपुर्ण) लिहून सगळ्यांचा वेळ आणि श्रम वाया घालवू नयेत. Sudhanwa (चर्चा) ०१:०४, ११ ऑक्टोबर २०१४ (IST)

शीर्षक लेखनासंबंधीत प्रस्तावित बदलांचा प्रस्ताव कौल (मतदान) घेण्यासाठी टाकतेवेळी हा प्रस्ताव मराठी विकिपीडीया व त्यावरील संपादनांशी संबंधित असल्याने या प्रस्तावावर मत देण्यासाठी मत देणार्या सदस्याने हा प्रस्ताव कौलाला टाकण्यापूर्वी सहा महिने किमान ५० संपादने मराठी विकिपीडिया किंवा मराठीच्या कोणत्याही सहप्रकल्पांवर केलेली असली पाहिजेत अशी अट प्रस्ताव मतदानाला टाकतेवेळी असावी असे माझे मत आहे. जुन्या जाणत्या सर्व सदस्यांसाठी मागील सहा महिन्यात संपादने नसतील तर कौल टाकेपर्यंत मराठीचे सर्व सहप्रकल्प मिळून मत देेणार्या सदस्याची किमान ५०० संपादने झालेली असली पाहिजेत अशी अट प्रस्ताव मतदानाला टाकतेवेळी असावी असे माझे मत आहे. -- संतोष दहिवळ (चर्चा) १३:०३, ११ ऑक्टोबर २०१४ (IST)

संतोष, तुम्ही ह्या सर्व अटींमध्ये पास आहात. मतदानामध्ये तुमचा कौल काय आहे? - अभिजीत साठे (चर्चा) १८:३०, ११ ऑक्टोबर २०१४ (IST)
 Abhijitsathe: या अटी माझ्यासाठी नसून सर्वांसाठी असाव्यात.
माझ्या अंदाजाने प्रस्तावाचा मसूदा ठरविण्यासाठी प्रस्तावावर अजून चर्चा चालू आहे.
एक उदाहरण म्हणून सोडवण्यासाठी ठेवतो. हे फक्त उदाहरण आहे.......
समजा ८०० वर्षांपूर्वी कुणा माहितीकार नावाच्या व्यक्तीने एखादे उल्लेखनीय कार्य केले. त्यानंतर ४०० वर्षांनी त्याने केलेल्या कार्याचा उदोउदो होऊन माहितीकार वाघ या नावाने त्याला प्रचलित केला. त्यानंतर आणखी ४०० वर्षांनी म्हणजे आजच्या काळात त्याने केलेले कार्य कालबाह्य ठरविण्यात येऊन तो माहितीकार कुत्रा या नावाने प्रचलित झाला. तीनही वेळी त्याची नावे प्रचलित असलेलीच आहेत. मग ज्ञानकोशीय वस्तुनिष्ठतेचा विचार करुन या व्यक्तीविषयीचा विकिपीडिया ज्ञानकोशातील लेख कोणत्या नावाने असावा ? -- संतोष दहिवळ (चर्चा) १९:४९, ११ ऑक्टोबर २०१४ (IST)

माझे मतसंपादन करा

शीर्षक नाव हे शक्यतो पूर्ण नाव असावे या ठरावाला माझा अंशतः पाठिंबा आहे.

  पाठिंबा- माझे येथील अधिकृत मत मतदानाचे वेळी ग्राह्य धरावे.. - J
 • अबकडव्यक्तीनाम (सर्व व्यक्ती यादी) : या शब्दप्रयोगाला माझा पाठिंबा नाही. ’सर्व व्यक्ती यादी हा धेडगुजरी समास आहे. त्यापेक्षा "अबकड (या नावाच्या अन्य व्यक्ती)" हे सुटसुटीत होईल.
 • मराठी शोध करताना ’आणि’ हा शब्द टाकला की फक्त मराठी साइट्‌स सापडतात.
 • नुकताच मी विकिपीडियावर मन्नू भंडारी हा लेख लिहिला. या बाईंचे लग्नापूर्वीचे पूर्ण नाव महेंद्रकुमारी सुखसंपतराय भंडारी. लग्नानंतरचे नाव महेंद्रकुमारी राजेंद्र यादव. या शेवटी उल्लेखिलेल्या दोन्ही नावांनी या बाईंची ओळख पटण्य़ासारखी नाही. यांतले पहिले नाव फार तर जन्माच्या दाखल्यावर आले असेल. दुसरे तर कधीच व्यवहारात नव्हते. जनमानसात आणि साहित्यिक जगतात बाई "मन्नू भंडारी" या एकमेव नावाने परिचित आहेत. त्यांच्या तथाकथित "खऱ्या नावा"ने त्यांचा शोध घेण्याचा कुणीही, अगदी पोलीसही प्रयत्‍न करणार नाहीत! अशा व्यक्तींच्या बाबतीत कोणतेही पुनर्निर्देशन करू नये असे मला वाटते......J (चर्चा) १०:४६, १० ऑक्टोबर २०१४ (IST)
अहो J, तुम्ही संपूर्ण नावाला पाठिंबा देत आहात की रोजच्या वापरातील नावाला? नीट कळाले नाही. - अभिजीत साठे (चर्चा) ११:२७, १० ऑक्टोबर २०१४ (IST)

कौलसंपादन करा

वरील चर्चेनंतर आता सदस्यांनी आपले मत नोंदवावे अशी मी विनंती करतो. खालील दोनपैकी एक पॉलिसी मराठी विकिपीडियाने स्वीकारावी असे वरील चर्चेमधून निष्पन्न झाले आहे. - अभिजीत साठे (चर्चा) १७:३८, २८ ऑक्टोबर २०१४ (IST)

शीर्षकासाठी प्रचलित नावसंपादन करा

व्यक्तींवरील लेखाचे शीर्षक संक्षिप्त व रोजच्या वापरातील नावाचेच असावे. उदा. नरेंद्र मोदी, शरद पवार इत्यादी.

  पाठिंबा - अभिजीत साठे
  पाठिंबा - अभय नातू
  पाठिंबा - J
  पाठिंबा - सुधन्वा जोगळेकर
  पाठिंबा - अभिषेक सुर्यवंशी
  पाठिंबा - शंतनू
  पाठिंबा - Pushkar Pande
  पाठिंबा - ओम देशपांडे


शीर्षकासाठी संपूर्ण नावसंपादन करा

व्यक्तींवरील लेखाचे शीर्षक संपूर्ण नावाचेच असावे. उदा. नरेंद्र दामोदरदास मोदी, शरद गोविंद पवार इत्यादी.

nasta honari viditata

निकालसंपादन करा

२८ ऑक्टोबर ते ३ डिसेंबर अशा अदमासे सव्वा महिन्यांच्या कालखंडात शीर्षकासाठी प्रचलित नाव वापरावे या प्रस्तावास ७-० असा कौल मिळाला असल्याने हा प्रस्ताव आता नियम/संकेत झाला आहे.

हा प्रस्ताव आता अधिक एक आठवडा येथे नोंदी/टिप्पण्यांसाठी ठेवून नंतर हलविला जाईल.

चर्चेत आणि मतदानात भाग घेतल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) ०७:२५, ४ डिसेंबर २०१४ (IST)

विकिपीडियावर अमराठी संदेशसंपादन करा

नमस्कार,

मला वाटते पुन्हा एकदा या विषयाच्या एका पैलूबद्दल बोलणे आवश्यक झाले आहे.

मराठी विकिपीडियावर कोणत्याही प्रकारचे अमराठी संदेश नकोत असे धोरण आपण राबवतो. माझ्या मते यामुळे अमराठी विकिमीडियन्सशी संवाद साधण्यापासून आपण वंचित राहत आहोत. जगात असे लाखो अमराठी विकिमीडियन आहेत आणि त्यांच्याशी मेळ साधणे हे सगळ्यांनाच हितावह आहे.

तरी वरील धोरण किंचित बदलण्यासाठीचा प्रस्ताव मी मांडत आहे.

१. मराठी विकिपीडियावर काही पानांवर तरी अमराठी मजकूर चालेल.

अ. यात मुख्यत्वे दूतावास (Embassy) पान व त्याच्या उपपानांचा समावेश व्हाIवा.
ब. दूतावास सोडून इतर ठिकाणी अमराठी संदेश आला असता (उदा. चावडी, इ.) तो दूतावासावर हलवावा व तेथे येथील संदेश दूतावास पानावर हलविला आहे (किंवा तत्सम) संदेशाचा साचा तसेच दुवा लावावा.
क. सदस्यांना त्यांच्या चर्चापानावर अमराठी संदेशांची देवाणघेवाण करण्यास मुभा असावी. एखाद्या सदस्यास जर अमराठी संदेश नको असतील तर त्यांनी त्या अर्थाचा संदेश किंवा संदेश देणारा साचा लावावा,

आपण माझ्या या प्रस्तावास अनुमोदन द्यावे ही विनंती. काही प्रश्न असल्यास जरूर कळवावे.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) १८:५१, २९ ऑक्टोबर २०१७ (IST)

कौलसंपादन करा

  विरोध- I disagree with the proposal . - Balajee
  विरोध- नको नको .... नियम बदलायला नको ...! . - Sumit
  पाठिंबा- माझे पूर्ण समर्थन आहे जर सदस्य चर्चा पान सुद्धा प्रस्तावात जोडले तर खूप बरे होईल. - Tiven2240
हा मुद्दा ठीक वाटतो. प्रस्तावात घातला आहे.
अभय नातू (चर्चा) ०८:०२, ३० ऑक्टोबर २०१७ (IST)
  पाठिंबा- समर्थन. - Shivashree
  विरोध- विरोध आहे . - Hari.hari
  पाठिंबा- बर्याच व्यक्तींना मराठी टाईप करता येत नाही. अशा वेळेस इंग्रजी अक्शरांमघे मराठी लीहिता यायला पाहीजे. - Usernamekiran
  पाठिंबा- समर्थन On all talk pages English should be allowed.. - Abhijeet Safai
  पाठिंबा- इतर कोणत्याही विकीमीडिया विकीमध्ये रोमन लिपीला आणि इंग्रजी भाषेला आडकाठी करण्याचा नियम अस्तित्वात असल्याचे मला ज्ञात नाही. चर्चा पानावर कुणी इंग्रजीत लिहिल्याने २,००० वर्ष जुन्या आणि "अमृतातेही पैजा जिंके" अशा भाषेचे मूल्य आणि महत्त्व कमी होत नाही, असे माझे मत आहे. इंग्रजी भाषेतले विषया व्यतिरिक्त केलेले, विश्वकोशीय नसलेले, स्पॅम, किंवा अप्रासंगिक पोस्ट हटविली जाऊ शकतात. लेख मात्र मराठीतच हवेत यात शंका नाही. - Rohini
लेख इंग्रजीत हवेत?
Oops, -- Rohini (चर्चा) ०९:३१, ४ नोव्हेंबर २०१७ (IST)
  पाठिंबा- माझे समर्थन आहे!. - Koolkrazy
  विरोध- समर्थन नाही . - Nankjee
  पाठिंबा- माझे मत थोडे सविस्तर मांडण्याची संधी घेते आहे.कौल देत असताना वेगवेगळ्या मुद्द्यांचा विचार करणे मला स्वागतार्ह वाटते.हा माझा व्यक्तिगत आरोप नसून सर्वांनाच माझे हे आवाहन आहे असे याकडे कृपया पहावे ही विनंती.आपण सर्वजण जागतिक स्तरावर चांगले काम करीत आहोत.तसे करीत असताना समाजासाठी आणि समाजासोबत राहणे आणि त्याचवेळी सर्व समाजाला सोबत घेवून जाणे हे आपले प्राथमिक कर्तव्य आहे. भाषाभिमान ही एक महत्वाची गोष्टच आहे, परंतु जेव्हा आपण एक ज्ञानकोश समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत तेंव्हा या सर्वच्या पलीकडे जावून अन्य भाषिक संपादकांशी आपले संपर्क,चर्चा असणे उपयुक्त ठरेलच.त्यामुळे ज्यांना मराठी येत नाही अशाच सदस्यांशी बोलताना आपण इंग्रजी वापरावे.आणि त्यातही व्यक्तिगत चर्चा टाळून केवळ विकिपीडिया संदर्भातच संवाद करावा . मराठी विकिपिडीयाच्या सदस्यांशी मात्र आपण मराठीतच संपर्क करावा असे माझे मत आहे. या सर्व एकत्र कार्यात सहभागी असताना एक मुद्दा कटाक्षाने पाळावा असे जाणवते व ते म्हणजे आपण व्यक्तिगत हितसंबंध,टीका टाळून एक ज्ञानकोश समृद्ध करण्याच्या कामी प्रगल्भतेने सहभागी व्हावे असे वाटते. मी गली पंधरा वर्षे भाषाविषयक संशोधन करण्यात कार्यरत आहे. त्यामुळे हे अनुभवले आहे की एखादी गोष्ट चांगली व समाजाच्या हितार्थ व्हायची असेल तर सर्वांचा मनापासून सहभाग आणि मोकळेपणे अभ्यासू वृत्ते जोपासत काम करणे उपयुक्त ठरते. सर्वाना शुभेच्छा! धन्यवाद !. - आर्या जोशी


  विरोध- एखाद्या सदस्याला जमतच नसेल तर हरकत नाही, म्हणून असे मर्यादित प्रमाणात असावे. अन्यथा काही सदस्य निव्वळ त्यांच्या बोलीभाषेत मांडत असतील तर इतरांना ते समजण्यात अडचण होईल. किंवा दोन अमराठी सदस्य त्यांच्या बोलीभाषेतून दिर्घ चर्चा करत असतील तर इतरांना ते काय व कशाबद्दल बोलत आहेत हे पूर्णपणे कळणार नाही. व या निर्णयाच्या निमित्ताने त्यांना अमर्याद मोकळीक ही मिळेल व चूकीचा पायंडा पडेल म्हणून माझा विरोध आहे. . - प्रसाद साळवे
अमराठी चर्चा जर सदस्य चर्चा पानावर सुरू असेल तर ती किती का दिर्घ असेना, त्यात तिसऱ्याने पडू नए; आणि निव्वळ मराठीत बोला हे सांगण्यासाठी तर मुळीच नाही. हा, त्यात जर तुमच्या लक्षात आला की काही चर्चा विकिपीडियाच्या विरोधात चालु आहे किंवा असभ्य आहे तर तुम्ही ते प्रचालकांना सांगा. धर्माध्यक्ष (चर्चा) १४:५१, १० नोव्हेंबर २०१७ (IST)
  पाठिंबा- थोडक्यात, माझे समर्थन आहे. पण येथील संदेश दूतावास पानावर हलविला आहे हे फक्त मराठीत लिहु नए. जर कोणाला मराठी येतच नसेल तक त्याला काय कळणार हे तरी.. - Dharmadhyaksha


  विरोध- गंभीर आणि वरिष्ठ सदस्यांच्या चर्चे शिवाय कोणतेही धोरण मराठी विकिपीडियावर बदलू नये . - क्रमश
कोणा एका ठराविक गंभीर सदस्या बद्दल बोलत असाल तर त्यांना ping करा. वरिष्ठ कनिष्ठतेचा भेदभाव विकि वर होऊ नये. -धर्माध्यक्ष (चर्चा) ००:४२, १३ नोव्हेंबर २०१७ (IST)
  पाठिंबा- पण, मराठी विकिपीडियावर काही पानांवर अमराठी मजकूर चालणार असला तरी तोही केवळ अमराठी सदस्यांसाठीच असावा. अमराठी सदस्यांना सदस्यांशी चर्चा करतांनाच इंग्रजी/अमराठी भाषा वापरावी. येथे मराठी येत असताना उगाच अमराठीत (इंग्रजी) बोलण्याचे कारण नाही. मराठी विकिपीडियावर जर अमराठी बाबीं किंवा चर्चा जर महत्त्वाचाच असतील त्यांचे मराठी भाषांतरही तेथे उपलब्ध करावे, जेणेकरून इंग्रजी न (किंवा कमी) जाणणाऱ्या आपल्या मराठी सदस्यांना ते काय म्हणताहेत ते कळू शकेल. आज किंवा भविष्यात जर माझ्या वरील बाबीं जर विचारात घेतल्या जाणार नसतील तर आज व पुढेही या प्रस्थावाला पूर्णत विरोध आहे. धन्यवाद.. - संदेश हिवाळे


  विरोध- तथापी, विविध सदस्यांनी सुचविलेले समर्पक मुद्देपण, हा प्रस्ताव मंजूर करण्यापूर्वी विचारात घ्यावेत ही विनंती. - V.narsikar

--वि. नरसीकर , (चर्चा) १६:०६, १४ नोव्हेंबर २०१७ (IST)

  विरोध- तीव्र विरोध. - संतोष दहिवळ
  विरोध - Lucky
  विरोध- विरोध . - Dr sane
  विरोध- विरोध . - Jayram
  पाठिंबा- इतर भाषांतील लोकांना मराठीत बोलणं का अनिवार्य असाव?. - Abhilash Mhaisne


मतदान मुदतसंपादन करा

प्रस्ताव मांडल्यावर १० १७ दिवसांनंतर उद्या ( १४ नोव्हेंबर, २०१७ ११:५९ २३:५९ भाप्रवे) या प्रस्तावावरील मतदान थांबविले जाईल. अभय नातू (चर्चा) २१:०७, ८ नोव्हेंबर २०१७ (IST)

कृपया यात वेळ टाकावी ही विनंती.(९ नोव्हेंबर, २०१७ ला किती वाजेपर्यंत)--वि. नरसीकर , (चर्चा) २१:४७, ८ नोव्हेंबर २०१७ (IST)

मतप्रदर्शनसंपादन करा

सर्वप्रथम याच्या मतदानाची वेळ नक्की करण्याबाबतच्या माझ्या विनंतीचा आदर केल्याबद्दल मन:पूर्वक आभार.
दुसरे असे कि, येथे या वेळेपर्यंत मतदान करणारे सर्व सदस्य एकतर नवीन दिसतात किंवा त्यांनी बरेच आधी सदस्यत्व घेतले असले तरी त्यांचे मराठी विकित बरेच कमी योगदान आहे.तसेच, त्यांना मराठी योग्य रितीने येत नसावी असेही वाटते. त्यामुळे येथील ध्येय व धोरणांचा त्यांना कितपत समज आहे याबद्दल साशंकता आहे.(मला त्यांचे ज्ञानी असण्याबद्दल आदरच आहे, यात शंका नाही, कृ.गैरसमज क.न.)तसेच, काही कारणांमुळे पूर्वी अक्रिय असलेले व येथे सध्या नुकतेच सक्रिय झालेल्या सदस्यांपैकी कोणीही यावर मतप्रदर्शन/मतदान केलेले नाही. एखादेवेळेस कदाचित, वेळ नक्की केल्यामुळे ते मतदान करण्याची घाईही करतील, असे शक्य आहे.
यानंतर,मराठी विकिपीडियावर कोणत्याही प्रकारचे अमराठी संदेश नकोत असे धोरण तयार करतेवेळी, तो जुना निर्णय कोणत्या परिस्थितीत घेतला होता, त्यावर येथील सदस्यांचे भाष्य काय होते याचा उहापोह करणे महत्त्वाचे ठरते.कारण हा एक महत्त्वाचा निर्णय असून त्याचे येथील समाजावर दुरगामी परिणाम होऊ शकतात.मी ते शोधण्याचा बराच प्रयत्न केला पण ते धोरण सापडले नाही.माझे प्रयत्न सुरू आहेतच. अथवा मी येथे नवागत सदस्य असतांनाही ते नक्की केल्या गेले असावे किंवा माझे त्यावेळेस दुर्लक्ष झाले असावे असा माझा कयास आहे.पूर्णपणे नवीन धोरण तयार करणे सोपे आहे पण एखादे जुने धोरण रद्द करून नवीन करतेवेळी, जुन्या धोरणावरही लक्ष केंद्रित करावयास हवे असे मला वाटते.तरच ते सर्वसमावेशक धोरण ठरेल.
जरी, सदस्यांनी चावडीस भेट देणे अपेक्षित आहे व तेथे काही प्रक्रिया चालू असेल तर त्यात सहभाग घेणे आवश्यक वाटते, तरीही,जुन्या अथवा जाणत्या सदस्यांचा या धोरणाचे मतदानासाठी निरुत्साह कशामुळे उत्पन्न झाला याचाही विचार करणे आवश्यक ठरते. असेही असू शकते कि, येथे योगदान करण्याचे नादात या बाबीकडे त्यांचे दुर्लक्ष झाले असावे.किंवा असेही शक्य आहे कि ही बाब त्यांचे निदर्शनास आली नसावी. या धोरणाबद्दल 'अलीकडील बदल' मध्ये फलक (बॅनर) टाकणे शक्य असल्यास ते बघावे, पण आता वेळ बराच कमी उरला आहे.
या धोरणावर एकतर्फी अथवा एककल्ली निर्णय घेतल्याचा ठपका अथवा कलंक आपणावर लागू नये असे मनाला वाटले म्हणून हा इतका लेखन प्रपंच.
हे धोरण आवाजी मतदानाचे मंजूर होईल असे मला ते वाचल्यावर व तेथील मतदान पाहून, कां कोणजाणे, वाटले म्हणून आपल्या तेथील प्रस्तावातील एखाद्या सदस्यास जर अमराठी संदेश नको असतील तर त्यांनी त्या अर्थाचा संदेश किंवा संदेश देणारा साचा लावावा, याची तजवीज म्हणून मी माझे चर्चापानावर तशी सूचना पूर्वीच लावली आहे.
जर आपणांस मी वर नमूद केलेले मुद्दे पटत असतील तर, कृपया त्यावर अंमल करावा व शक्य असेल तर,व काहीच घाई नसेल तर मतदानाची वेळ वाढवावी असे सुचवावेसे वाटते. हा 'व्हीप' वाटावयास नको.आपल्या पुढील कार्यवाहीवर माझे मतदान अवलंबून आहेच. धन्यवाद--वि. नरसीकर , (चर्चा) ०८:५०, ९ नोव्हेंबर २०१७ (IST)
 V.narsikar: नरसीकरजी,
आपल्या (छोट्या) इतिहासात आपण एखादा मुद्दा घेउन तो अनेक आठवडे/महिने कुटत बसल्याची अनेक उदाहरणे आहेत. यात मूळ प्रस्ताव बाजूलाच राहिले आणि चर्चा भरकटत गेली....त्यात व्यक्तिगत मुद्दामुद्दी, गुद्दागुद्दी सुद्धा झाली....आणि मग भिजत घोंगडे तसेच पडले. शेवटी कोणी तरी उचलून ते (घोंगडेवजा कौल) बाजूला केले.
असे होऊ नये व मराठी विकिपीडियावरील धोरणे पारदर्शक, स्पष्ट आणि क्रिस्प[मराठी शब्द सुचवा] असावीत म्हणून मतदानाला मुदत दिली.
आपण पाहिजे तर अजून ४-५ दिवस वाट पाहू पण त्याहून जास्त थांबू नये असे माझे ठाम मत आहे.
पुढे जाता आपल्या धोरण आणि संकेतांतील बदल किंवा भर ही शक्य तितक्या छोट्या आवाक्याची आणि मुद्द्यास हात घालणारी असावी असा माझा आग्रह असेल. अर्थात, ही माझी मते आहेत आणि संकेतांमधील कोणत्याही बदलांना मराठी विकिसमाजाची संमती अत्यावश्यक आहेच.
अभय नातू (चर्चा) १०:००, ९ नोव्हेंबर २०१७ (IST)
ता.क. sitenotice वर संदेश टाकला आहे. तो जर कोणाला सुशोभित करता आले तर उत्तम.  Rahuldeshmukh101: अभय नातू (चर्चा) ११:११, ९ नोव्हेंबर २०१७ (IST)
वाचले व सहमत.माझा हेतू या प्रस्तावास फाटे फोडण्याचा नाही, हे कृपया ध्यानात घ्यावे. पण,माझ्या अथवा कोणाच्याही मनात आलेले मुद्दे (भलेही ते काळाच्या ओघात किंवा चर्चेमध्ये चूक अथवा अस्वीकारणीय ठरू शकतील) ते मांडणे व त्यावर विस्तृत चर्चा, ते चूक असल्यास खंडन व बरोबर असल्यास स्वीकृती हे सर्व आवश्यक आहे व तो अनेक ठिकाणी व संस्थांमध्ये एक महत्त्वाचा पायंडा आहे असे माझे वैयक्तिक मत आहे.पुढे कोणी एकाधिकारशाही केल्याचा वृथा आरोप होऊ नये म्हणून. तो सर्व मजकूर समोर असेलच. धन्यवाद --वि. नरसीकर , (चर्चा) १०:३८, ९ नोव्हेंबर २०१७ (IST)

ता.क. - या विकिवर होणाऱ्या कोणत्याही चांगल्या कामांना माझे प्रगट अथवा मुक समर्थन अथवा त्यात सहभाग असतोच हे आपण अनुभवलेच असेल.--वि. नरसीकर , (चर्चा) १०:४३, ९ नोव्हेंबर २०१७ (IST)

निकालसंपादन करा

हा कौल ९-११ अशा मतांनी नामंजूर झाला आहे.

मराठी विकिपीडियावर कोणालाही अमराठी संदेश सुद्धा देता येणार नाही हे धोरण पुढे चालूच राहील.

तुम्ही दिलेल्या कौलाबद्दल धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) ०१:३३, १५ नोव्हेंबर २०१७ (IST)

मेजोरीटी असून सुद्धा नामंजूर? नोंद घ्यावी विरोध करणारी सदस्य असे योगदान करणारे फक्त ३ सदस्य आहेत बाकी फक्त कौल घेण्यास काही वर्षानंतर मराठी विकिपीडिया वर आले आहे. (योगदान पहा). कौल प्रक्रियात काही छेडछाड झाली तर नाही? (वरिष्ठ ऍक्टिव्ह सदस्य कौल साचा बरोबर वापरात नाही परंतु विरोध करणारे काही अपरिचित सदस्य बरोबर वापरतात)  अभय नातू: यावर उपाय काय? --टायवीन२२४०माझ्याशी बोला ०७:४०, १५ नोव्हेंबर २०१७ (IST)

 Tiven2240:,
तुमच्या म्हणण्यात तथ्य आहे परंतु कौल घेताना योगदानांचा नव्हे तर सदस्यसंख्येचा आधार घेण्याचा संकेत आहे.
असे असता या निकालास सध्या तरी उपाय नाही. हा प्रस्ताव आत्ता नामंजूर झाला असला तरी भविष्यात पुन्हा मांडता येईल.
अभय नातू (चर्चा) ०४:३०, १६ नोव्हेंबर २०१७ (IST)
धोरण न पाळणाऱ्या सदस्यास कायमचे प्रतिबंधित करावे का काय याचा पण कौल होऊन जाऊ द्या आता. विकिपीडिया:एकमत (en:Wikipedia:Consensus) आणि विकिपीडिया:मतदान हे चर्चेसाठी पर्याय नाही (en:Wikipedia:Polling is not a substitute for discussion) हे मार्गदर्शकतत्त्वे पण कोणीतरी लिहावी आता. धर्माध्यक्ष (चर्चा) १३:१८, १६ नोव्हेंबर २०१७ (IST)
I do not find any logic in the demand that one is not allowed to write in other languages even on talk pages. Let individual members decide their way of functioning. Lets not dictate them. These kinds of restrictions (to not edit in any other language even on talk pages) is a way of harassment of editors. Once the external help is cut off, any level of harassment is possible. I hope experienced editors, admins and other senior people in Wiki movement will take cognizance of it. I was not able to edit even this page sometime back. I was blocked I guess without giving any reason. One can imagine what can happen if this logic-less policy of not allowing any other language even on talk pages is continued here. Thank you. -- आभिजीत १४:२९, १६ नोव्हेंबर २०१७ (IST)

प्रशासकांच्या (स्वीकृती अधिकारी) अधिकारांत बदलसंपादन करा

प्रस्ताव - मराठी विकिपीडियावरील प्रशासक तथा स्वीकृती अधिकाऱ्यांना इतर सदस्यांना तात्पुरते खाते विकसक (अकाउंट क्रिएटर)चा दर्जा देण्याचे अधिकार दिले जावे

मीडियाविकी प्रणालीच्या धोरणानुसार एका अंकपत्यावरुन (आयपी)एका दिवशी फक्त सहा नवीन खाती तयार करता येतात. कोणी खोडसाळपणे एकगठ्ठा खाती तयार करू नयेत यासाठी ही योजना आहे. मराठी विकिपीडियन अनेक ठिकाणी कार्यशाळा घेतात. अशा ठिकाणी आलेल्या नवीन विकिपीडियन्सना आपले खाते तयार करण्याची नोंद करावी लागते. पूर्वी उल्लेखिलेल्या नियमामुळे यात अडचण येऊ शकते. तेथे उपस्थित असलेल्यांपैकी कोणी प्रचालक (अॅडमिन) असेल तर ते इतरांसाठी खाती विनारोकटोक तयार करुन देऊ शकतात. याशिवाय ज्या सदस्याकडे खाते विकसक हा अधिकार असेल त्यालाही हा नियम लागू पडत नाही. सध्या तात्पुरता खाते विकसक अधिकार घेण्यासाठी स्ट्युअर्डना विनंती करावी लागते. त्याऐवजी जर मराठी विकिपीडियावरील प्रशासकांना हा अधिकार मिळाला तर असे करणे खूप सोपे होईल. तरी या प्रस्तावावर तुमचा सकारात्मक कौल येथे नोंदवावा ही विनंती.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) ०२:१७, १० जानेवारी २०१८ (IST)

मतदान मुदतसंपादन करा

हा प्रस्ताव सात दिवस (१७ जानेवारी, २०१८, २३:५९:५९ भाप्रवे पर्यंत) कौलाच्या प्रतीक्षेत असेल.

कौलसंपादन करा

  पाठिंबा- समर्थन. - अभय नातू
  पाठिंबा- माझे समर्थन आहे. - josedsouza
  पाठिंबा- समर्थन. - Sachinvenga
  पाठिंबा- समर्थन. - V.narsikar
  पाठिंबा- समर्थन. - ज्ञानदा गद्रे-फडके
  पाठिंबा- समर्थन. - Harish satpute
  पाठिंबा- समर्थन. - Tasmita33
  पाठिंबा- समर्थन. - rahuldeshmukh101
  पाठिंबा- समर्थन. - Shrinivaskulkarni1388
  पाठिंबा- पूर्ण समर्थन. - Tiven2240


चर्चासंपादन करा

अभय नातू सर त्याऐवजी जर मराठी विकिपीडियावरील प्रशासकांना हा अधिकार मिळाला तर असे करणे खूप सोपे होईल यावर माहिती द्या.
सद्या हा हक प्रचालकांकडे आहे.दुवा व मराठी विकिपीडियावर २ आणि विकिस्रोत वर मी एक सक्रिय अॅडमिन आहे.
अकाउंट क्रिएटरची आवश्यकता काय आहे याची माहिती द्यावी, हा सदस्यगट चे नियम इंग्लिश विकिपीडियासारखाच आहे? (Wikipedia:Account creator) कृपा काही वरील असलेली शंका दूर करा. --Tiven gonsalves🎄🎉🎅🍻 ०६:४३, १० जानेवारी २०१८ (IST)

 Tiven2240:,:
तुमच्या दोन प्रश्नांचे उत्तर -
प्रशासकांना अकाउंट क्रिएटरचा अधिकार देण्याची विनंती केलेली नाही, तर प्रशासकांना त्यांच्या विकिप्रकल्पावरील इतर सदस्यांना हा अधिकार (तात्पुरता) देण्याचा अधिकार मागितला आहे.
अकाउंट क्रिएटर का पाहिजे ते वर लिहिलेच आहे. अधिक विस्ताराने -- काही वेळेस विकि कार्यशाळा घेताना तेथे प्रचालक (अॅडमिन) उपस्थित असेलच असे नाही. जर नसेल तर एका-आयपीवरुन-ताशी दरदिवशी-फक्त-६-नवीन-सदस्य या नियमामुळे मोठी अडचण होईल. जर असे कळले तर तेथील सदस्याला स्ट्युअर्डकडे ही मागणी करावी लागेल. स्ट्युअर्ड जरी लक्ष ठेवून असले तरी त्यांच्याकडून टाकोटाक उत्तर मिळण्याची अपेक्षा ठेवणे रास्त नाही. तसेच, स्ट्युअर्डना मराठी विकिपीडियावरील नेहमीचे सदस्य कोण, त्यांची वागणूक काय याची माहिती असेलच असे नाही (नसणारच).
जर मराठी विकिपीडियावरील प्रशासकाकडे हा अधिकार (तात्पुरता) देण्याची सोय असेल तर वरील दोन्ही अडचणी दूर होउन विकि कार्यशाळा आणि तत्सम कार्यक्रमात बाधा येणार नाही.
असे होण्याकरता प्रशासकाला हा अधिकार द्यावा असा मी प्रस्ताव मांडला आहे. तो पारित झाल्यावर फॅब्रिकेटरवरुन हा बदल करुन घेता येईल.
अभय नातू (चर्चा) १०:२३, १० जानेवारी २०१८ (IST)

१)परंतु मराठी विकिपीडियावर हा अधिकार कुणाला भेटेल? का मराठी विकिपीडियावर कार्यशाळा आयोजित करणारे सदस्य तेच असतात?
२)सद्या माझी विनंती आहे की हा अधिकार (for organizer) फक्त तात्पुरता दिला जाईल.(कार्यशाळा समाप्तीपर्यंत) व प्रचालक आणि प्रशाशक नवीन बनवलेले सदस्य खाते पुतळी (sock puppet) साठी नाही उपयोगी पडतील याची काळजी घ्यावी
३) कार्यशाळा चालू आहेत व हा प्रस्ताव नंतर मंजूर होणार. विनंती आहे की प्रस्ताव जलद मंजूर केला पाहिजे wrt. IAR

--Tiven gonsalves🎄🎉🎅🍻 १६:०८, १० जानेवारी २०१८ (IST)

१. सगळ्या प्रशासकांना अधिकार देण्याचा अधिकार मिळेल. थोड्या काळात अनंत खाती तयार करण्याचा अधिकार आपोआप कोणालाही मिळणार नाही.
२. याचा उद्देश तात्पुरता अधिकार देण्याचाच आहे. यासाठी विनंती करणाऱ्याने मुदत देणे आवश्यक आहे. अनंत काळासाठी हा अधिकार कोणालाही देण्यात येणार नाही.
३. या कार्यशाळेसाठी लागणारे अधिकार मी स्ट्युअर्डकडून मंजरू करुन घेतले आहेत.
अभय नातू (चर्चा) २१:४०, १० जानेवारी २०१८ (IST)
गेल्या सहा महिन्यात घेतल्या गेलेल्या सर्व कार्यशाळांमध्ये मी मोबाईलवर खाती उघडण्यासाठी सूचना दिल्या. आणि जवळपास २०० खाती या पद्धतीने उघडली गेली.एका व्यक्तीला ३-४ मिनिटात खाते उघडता येते असा अनुभव आहे. अगदी पाबळ,वेल्हे,सोलापूर,औरंगाबाद व कोल्हापूर येथील विद्यापीठे , जिथे इंटरनेट मंद आहे अशा ठिकाणीही. धडपडत,चुका करत खाते उघडण्याचा अनुभव व्यक्तीसाठी आनंददायक असतो हे मी अनुभवले आहे. शिवाय सदस्य नाव ठरविणे ही पूर्णपणे व्यक्तिगत बाब आहे. हे स्वातंत्र्य प्रत्येकाला मिळाले पाहिजे. ज्यांना मोबाईलवर रेंज नाही त्यांना इतर सह्कार्य करतात आणि खाती पटापट उघडली जातात असा माझा अनुभव आहे. हा अनुभव त्यांना इतर लोकांना विकिपीडियाशी जोडण्यासाठी उपयोगी पडतो. तसेच भविष्यात मोबाईलवर संपादने वाढत जाणार आहेत. त्यांना ही ओळख झाल्याचा फायदा जास्त आहे.

--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ११:३६, १८ जानेवारी २०१८ (IST)

सदस्य नाव ठरविणे ही पूर्णपणे व्यक्तिगत बाब आहे. हे स्वातंत्र्य प्रत्येकाला मिळाले पाहिजे. आणि हा अनुभव त्यांना इतर लोकांना विकिपीडियाशी जोडण्यासाठी उपयोगी पडतो.
हे महत्वाचे आहे.
अभय नातू (चर्चा) २१:२२, १८ जानेवारी २०१८ (IST)
 •   झाले. उचित बदल झाले आहे. मराठी विकिपीडियावरील प्रशासकांना हा अधिकार मिळाला आहे. --टायवीन२२४०माझ्याशी बोला २०:०७, २२ जानेवारी २०१८ (IST)

मुखपृष्ठ सदर लेख निकषसंपादन करा

हा प्रस्ताव स्वीकृत झाला आहे. या प्रस्तावाची नोंद येथे ठेवली आहे.

नमस्कार,

मराठी विकिपीडियावर मुखपृष्ठ सदर लेख म्हणून निवड होण्यासाठी किमान निकष लावावे असा माझा प्रस्ताव आहे. हे निकष सर्वसंमतीने (किमान बहुमताने तरी) निवडावे. खाली मी काही निकष प्रस्तावित करीत आहे. यावर आपले मत द्यावे तसेच इतरही निकष सुचवावे ही विनंती.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) ००:४९, २४ फेब्रुवारी २०१५ (IST)

निकषसंपादन करा

१. आकार - किमान ८,१९२* बाइट.

२. साचे - किमान एक साचा. शक्यतो माहितीचौकट स्वरूपातील.

३. चित्रे - माहितीचौकट साच्यातील चित्राखेरीज किमान १ चित्र.

४. संदर्भ - किमान ३* संदर्भ. हे संदर्भ ब्लॉग किंवा सोशल मीडियांवरील नसावेत.

५. वर्गीकरण - किमान १* वर्ग.

६. लाल दुवे - ५* पेक्षा जास्त नसावेत.

७. व्यक्तिगत दृष्टिकोन - नसावा.

८. आंतरविकि दुवे - शक्यतो विकिडेटा कलम असावे. क्वचित हे दुवे नसले तरी चालतील.

 • - आकडे सुचवलेले आहेत. चर्चेनंतर ते बदलता येतील.
  पाठिंबा- माझे समर्थन आहे. - अभिजीत साठे
  पाठिंबा- माझे समर्थन आहे, मात्र माझ्या मते किमान एक जरी संदर्भ असला तरी चालेल.. - Pushkar Pande
  पाठिंबा- माझे समर्थन आहे, माझ्या मते फक्त ३ संदर्भ हे एखाद्या लिखाणाची विश्वासार्हता सिद्ध करण्यासाठी फारच कमी आहेत. तरी सुरुवातीसाठी ठीक आहे.. - Nitin.kunjir
 Chaitnyags, Mahitgar, Nitin.kunjir, Cherishsantosh:
 Czeror, Girishkedare, Nemo bis, Sumedh Tayade, Priya Hiregange:
 श्वेता कोकाटे, J, संतोष दहिवळ:
कृपया आपलेही मत नोंदवा.
अभय नातू (चर्चा) ११:११, ३ मार्च २०१५ (IST)


यात 'नेमो बीस' कशास हवेत त्यांना मराठीचा गंधही असेल का या बद्दल साशंक आहे, असो (त्यांच्या वतीने :) ) लेख साक्षेपी तटस्थ समतोल दृष्टीने लिहिलेले असावेत, लेखात प्रताधिकाराचे उल्लंघन खासकरून शक्यतो प्रताधिकारीत छायाचित्रे असू नयेत, नकाशांमध्ये भारताची सीमा भारतीय दृष्टीकोणातून नसेल तरी कमीत कमी तटस्थ म्हणजे किमान पाकिस्तानी अथवा चिनी दृष्टीकोणाची नसावी असे सूचवतो.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११
४६, ३ मार्च २०१५ (IST)
मी गेल्या ३० दिवसांत २०पेक्षा अधिक संपादने (लेखांमध्ये) केलेले संपादक निवडले. :-)
अभय नातू (चर्चा) १२:००, ३ मार्च २०१५ (IST)
त्या हिरेगंगे मॅडम राहील्याना :) बहुधा त्यांनापण मराठी अवघडच जाते. त्यांनी पण चित्रनामविश्वात २० पेक्षा अधिक चित्रे चढवलीत की ! (असो हिरेगंगे मॅडमच्या वतीने महिलांच्या दृष्टीकोणाचांही मराठी विकिपीडियाच्या मुखपृष्ठ लेखात वेळोवेळी विचार करावा असे सुचवतो :) ) ( आणि नेमोबीसाहेबांचे कामही चित्र नामविश्वातच आहे लेख नाम विश्वात आम्हाला त्यांचे काम काही आढळले नाही. बाकी 'जे' सुट्टीवर का काय ? :) (ह्. घ्या)
अरेच्या. मला वाटले मी त्यांना आधीच घातले होते! लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. जे (आणि संतोष० यांचे गेल्या काही महिन्यांतील काम पाहता अपवाद म्हणून घातले आहे.
अभय नातू (चर्चा) १९:३६, ३ मार्च २०१५ (IST)
  पाठिंबा- माझे समर्थन आहे. - Nitin.kunjir
संदर्भांची संख्या वाढविण्यात यावी. यामुळे लेखाच्या विश्वासार्हतेमध्ये वाढ होण्यास मदत होईल.

नितीन कुंजीर (चर्चा) १२:०४, ३ मार्च २०१५ (IST)

  पाठिंबा- माझे समर्थन आहे. - Czeror
लेखाचा आकार किमान ८,१९२ बाइट ऐवजी किमान १५,००० बाइट असावा.

    दिनांक व वेळ : १९:१६, २० मार्च २०१५ (IST)

  पाठिंबा- माझे समर्थन आहे. - josedsouza