(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा)
चावडी विभागवार:

चर्चा
(विपी इतर चर्चा)

इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा

वादनिवारण
वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा

साहाय्य | मदतकेंद्र
नवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा

दूतावास
(Embassy)

नवी चर्चा जोडा
(Start new discussion)

प्रचालकांना निवेदन
प्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा


प्रचालकांचे मूल्यांकन
प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा


तांत्रिक
तांत्रिक मुद्दयांवर चर्चा.
विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा.
नवीचर्चा जोडा | वाचा

ध्येय आणि धोरणे
सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा

प्रगती
मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा
नवीचर्चा जोडा | वाचा


सोशल मीडिया
मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा
चावडी (सुचालन)

स्थापना
___

स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चा







०. खालील मुद्दे फक्त या पानासाठी लागू आहेत. या मुद्दांतील संकेतांनुसार या पानाचे काम चालेल.




मराठी विकिपीडियावर उपलोडर गट प्रस्ताव संपादन

 

मराठी विकिपीडियावरील बरेच लेख असे आहेत ज्यांना ओळखण्यासाठी चित्रांची आवश्यक आहे. मराठी विकिपीडियावरील काही ऐतिहासिक अडचणीमुळे सामान्य वापरकर्त्यांसाठी स्थानिक चढवय्या सुक्षमता-प्रणाली (अपलोड विझार्ड) बंद करण्यात आला होता.

म्हणूनच मी अनुभवाच्या वापरकर्त्यांना (विनंती केल्यावर) अपलोड विझार्डमार्गे मराठी विकिपीडियावर गैर मुक्त वाजवी वापर चित्रे अपलोड करू देण्यासाठी मराठी विकिपीडियावरील वेगळ्या वापरकर्त्याला 'अपलोडर' अधिकार देण्याचा प्रस्ताव मांडतो.

मूलभूत आवश्यकता संपादन

  • फेअर युझ प्रतिमा कसे काम करते याचे एक सभ्य ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • मराठी विकिपीडियावर १००० पेक्षा अधिक संपादने असणे आवश्यक आहे.

पर्यायी आवश्यकता संपादन

  • विकिमीडिया कॉमन्सवर ३० पेक्षा जास्त चित्रे चढवलेली असावी.
  • अन्य विकिपीडियावर १० पेक्षा जास्त फेअर युझ चित्रे चढवलेली असावी.

तांत्रिक आवश्यकता (प्रशासनासाठी) संपादन

  • प्रतिमा विनंतीसाठी स्वतंत्र पृष्ठ
  • नवीन वापरकर्त्या गटाची निर्मिती (अपलोडर)

कोणताही आक्षेप, सूचना, शिफारसी या परिस्थितीत सुधारणा कशी करायची, कृपया खाली नमूद करा.

--टायवीन२२४०माझ्याशी बोला १२:०८, १९ नोव्हेंबर २०१७ (IST)Reply

चर्चा संपादन

वाजवी? संपादन

गैर मुक्त वाजवी वापर चित्रे अपलोड करू देण्यासाठी

वाजवी वापराचे (fair use) नियम, संकेत व इतर कायदेशीर बाबींबद्दल माहिती आधी येथे (मराठीत) घातली पाहिजे आणि असलेली माहिती सुधारुन अद्ययावत असल्याची खात्री करुन घेतली पाहिजे.

असे केल्याने हे नियम/संकेत पाळणे आणि पाळले जात आहेत कि नाही हे तपासणे सुलभ होईल. तसे न केल्यास पुढे अडचणी येऊ शकतात. - अभय नातू (चर्चा) ००:३२, २० नोव्हेंबर २०१७ (IST)Reply

@अभय नातू: मराठी मध्ये त्याचे रूपांतर केले तर ते मान्य होणार नाही असे भारताच्या कायद्यात स्पस्ट दिले आहे. स्त्रोत. मराठी विकिपीडियावर भारताचे कायद्यानुसार लीगल पॉईंट्स असावे की US चे ? --टायवीन२२४०माझ्याशी बोला ०८:५८, २० नोव्हेंबर २०१७ (IST)Reply
मराठी मध्ये त्याचे रूपांतर केले तर ते मान्य होणार नाही
हे नेमके कळले नाही. कोणत्या भारतीय कायद्यात हे लिहिलेले आहे? जरी असले तरीसुद्धा मराठीतून संकेत लिहून इंग्लिश/अधिकृत कायदेशीर मजकूराकडे दुवा द्यावा, ज्यायोगे संकेतांचा ढोबळमानाने लगेच अंदाज येईल व अधिक माहितीसाठी कायदा पाहता येईल. अर्थात, आपल्या नव्यानेच घेतलेल्या कौलानुसार येथे इंग्लिशमध्ये कायदा लिहिता येणार नाही.
माझ्या माहितीनुसार विकिपीडियावरील मजकूरास अमेरिकेतील कायदे लागू होतात. तरीसुद्धा यासाठी विकिमीडिया वरील संकेत वाचून ते ठरवावे. मजकूर (किंवा चित्रे व इतर मीडिया) कोठून घेतला जातो तेथील कायदेही लागू होतात. मी वकील नसल्यामुळे माझी माहिती व मते अंतिम धरू नये ही विनंती.
अभय नातू (चर्चा) १८:५४, २० नोव्हेंबर २०१७ (IST)Reply

@अभय नातू: भारतातील हिंदी, तामिळ, तेलुगू, बंगाली इतर विकिपीडिया इंग्लिश विकिपीडियाचे कायदे वापरतात. जर का आपण सुद्धा असे करू? यांनी आपल्या पोलिसी ला एक ठोस फौंडेशन भेटेल. आपले मत द्या. --टायवीन२२४०माझ्याशी बोला २१:१३, २० नोव्हेंबर २०१७ (IST)Reply

असे करण्यास माझी हरकत नाही परंतु अलीकडेच झालेल्या फक्त मराठी या आग्रहावरुन इतर सदस्यांची भूमिका काय आहे हे कळणे अवघड आहे.
अभय नातू (चर्चा) २१:१४, २० नोव्हेंबर २०१७ (IST)Reply
@अभय नातू:, यावर पुरेशी चर्चा झाली आहे.नवीन कौल प्रक्रिया मुदत धोरण लक्षात घेवून यावर अंतिम निर्णय द्यावा ही विनंती.

--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १६:४४, ९ ऑगस्ट २०१८ (IST)Reply

माझे वैयक्तीक मते, हे काम सध्या कॉमन्सवरच होऊ द्यावे. तेथे पुरेसे मनुष्यबळ आहे. तेथे अनेक तज्ज्ञ आहेत व त्यांना याबाबतच्या नियमांची जाण आहे.इतके सारे नियम येथे (मराठीत) आणणे, त्याचा अभ्यास करणे, त्यातून कुशलता विकसित करणे व हे काम हाती घेणे हे सध्यातरी जिकरीचे वाटत आहे. सध्याचे नवे सदस्य हे कॉमन्सवर चित्रे चढविण्याबाबत बरेचसे सक्षम झाले आहेत असे दिसून आले. जुन्या सदस्यांना याबद्दल काहीच समस्या नाही.कॉमन्सवर चढविलेल्या चित्रांवर त्यांची पूर्ण उलटतपासणी होते. तूर्तास, हा विषय सध्या प्रलंबित राहू द्यावा. वर्ष-सहा महिनांनी यावर हवे असल्यास पुन्हा चर्चा करता येईल.मला वाटत आहे कि, टायवेन यांनाही यात आता अधिक रस राहीला नाही.--वि. नरसीकर , (चर्चा) २२:२१, ९ ऑगस्ट २०१८ (IST)Reply

या कौलावर चर्चा होउन फक्त एक मत पडलेले आहे. १३ ऑगस्ट पर्यंत वाट पाहून हा कौल अनिर्णित म्हणून दप्तरदाखल केला जाईल. -- अभय नातू (चर्चा) २२:३६, १० ऑगस्ट २०१८ (IST)Reply

कौल संपादन

  पाठिंबा- प्रस्ताव चांगला आहे, यातून अनेक लेखांना आवश्यक असलेल्या चित्रांच्या गरजांची पूर्तता होऊ शकेल. आणि हे अधिकार सरसगट सर्वांना न देता काही केवळ अनुभवी सदस्यांसाठी आहे, जेणेकरून चूकिच्या चित्रांचा भरणा होणार नाही. - संदेश हिवाळे


कौल प्रक्रिया मुदत संपादन

मराठी विकिपीडियावरील कौलप्रक्रिया सुरळीत होण्यासाठीचा प्रस्ताव मांडला गेला आहे. तेथे तुमचे मत आणि कौल नोंदवा. -- अभय नातू (चर्चा) ०२:१९, २८ एप्रिल २०१८ (IST)Reply

निष्क्रिय सांगकाम्या/ बॉट कालावधी निश्चित करणे संपादन

मराठी विकिपीडियावर ७३ खात्यांवर बॉट सदस्य अधिकार देण्यात आले आहे. यातील अधिक चालक मराठी व इतर भाषिक विकिपीडियावर निष्क्रिय आहेत. असे खाते ज्यांना सांगकाम्या अधिकार आहे त्यांने मोठ्या प्रमाणात विध्वंस होण्याचे शक्यता असते. Tatyabot यांनी बनवलेली ३०००+ सदस्यपान काढण्यात आली आहे. तरी सुद्धा त्याच्यात बोट अधिकार आहे. स्टॅंडर्ड बॉट पोलिसी/मानक बॉट धोरण नुसार असे खात्यांवर १ वर्ष हा अधिकार ठेवून नंतर त्याचे चालकाला सूचित करून हा अधिकार कढण्यात येते. मराठीवर सुद्धा असे असावे असे वाटते. यामुळे मी प्रस्तुत प्रस्ताव करत आहे.

  • ‎निष्क्रिय सांगकाम्या/ बॉट कालावधी १ वर्ष करणे.
  • अधिकाराचा गैरवापर करणारे खाते अवरोधित केले ज्यावे.

--टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ०८:५४, ७ जून २०१८ (IST)Reply

कौल संपादन

  पाठिंबा- जरी हे प्रचालकीय अधिकारात येते तरी येथे प्रस्ताव मांडलेला मान्य आहे. हा प्रस्ताव २१-३५ दिवसांच्या मानकात निकालात निघावा. - अभय नातू
  पाठिंबा- या निमित्ताने सध्या कोणते बॉट काय काम करत आहेत व कोणते बॉट काढले जाणार आहेत याची सर्व सदस्यांना माहिती द्यावी. - सुबोध कुलकर्णी
  पाठिंबा- एक वर्षाचे सहा महिने करावे. - sureshkhole


चर्चा संपादन

  • अधिकाराचा गैरवापर करणारे खाते (यात सांगकाम्या प्रचालकही अंतर्भूत अाहे. ज्या कामासाठी प्रचालकाला सांगकाम्या अधिकार दिले आहेत त्यापेक्षा वेगळे काम केल्यास तो चालवणार्या प्रचालकाला अवरोधित केले जावे. -- संतोष दहिवळ (चर्चा) २१:४५, ४ जुलै २०१८ (IST)) अवरोधित केले ज्यावे.Reply
  • @Tiven2240:,या निमित्ताने सध्या कोणते बॉट काय काम करत आहेत/निष्क्रिय आहेत व कोणते बॉट अपात्र आहेत याची सर्व सदस्यांना माहिती द्यावी. --सुबोध कुलकर्णी (चर्चा) ०९:१९, ५ जुलै २०१८ (IST)Reply
@सुबोध कुलकर्णी: <कोणते बॉट अपात्र आहेत> याबद्दल स्पष्टीकरण द्यावे. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १९:१८, ५ जुलै २०१८ (IST)Reply
अपात्र बॉट = गैरवापर होणारे, अवरोधित होण्यास पात्र ---सुबोध कुलकर्णी (चर्चा) १९:२३, ५ जुलै २०१८ (IST)Reply
सद्या प्रचालक व प्रशासक प्रत्येक संगकाम्यावर नजर ठेवत आहेत. गैरवापर करणारे संगकाम्याना ताबरतोप अवरोधित केले जाईल. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १९:३२, ५ जुलै २०१८ (IST)Reply
हे मोघम उत्तर झाले. आपण प्रस्ताव ठेवलाय याचा अर्थ निश्चितच काही विश्लेषण केले असणार. आपण Tatyabot हे जसे एक उदाहरण दिले आहे, तशी इतर खात्यांची नेमकी माहिती दिली तर प्रक्रियेत पारदर्शकता येईल.--सुबोध कुलकर्णी (चर्चा) २०:४८, ५ जुलै २०१८ (IST)Reply
सद्या यावर काम चालू आहे--टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला २२:२६, ५ जुलै २०१८ (IST)Reply
@Tiven2240: कृपया उपरोक्त माहिती पूर्ण करून सादर करावी म्हणजे यावर निर्णय घेणे शक्य होईल.धन्यवाद.--वि. नरसीकर , (चर्चा) १७:१३, २२ जुलै २०१८ (IST)Reply
@V.narsikar: सद्या काम चालू आहे आज रात्र पर्यंत ते पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १७:१५, २२ जुलै २०१८ (IST)Reply
@अभय नातू, V.narsikar, आणि सुबोध कुलकर्णी:  झाले. आकडेवारी तयार आहे. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १८:५९, २२ जुलै २०१८ (IST)Reply

@अभय नातू आणि V.narsikar: या प्रस्तावाला अंतिम निर्णय घ्यावा --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १५:१५, ३१ जुलै २०१८ (IST)Reply

@अभय नातू आणि V.narsikar:, पुरेसा काळ गेला आहे. बॉट धारकांनी काहीही प्रतिसाद दिलेला नाही. तरी अंतिम निर्णय घेवून धोरण मांडावे ही विनंती.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १६:४८, ९ ऑगस्ट २०१८ (IST)Reply

अंतिम निर्णय संपादन

  झाले. हा प्रस्ताव ३-० अशा मतांनी मंजूर झाला आहे. -- अभय नातू (चर्चा) २२:३९, १० ऑगस्ट २०१८ (IST)Reply

मराठी विकिपीडियावर चित्रे संपादन

मराठी विकिपीडियावर सद्या किमान ९०% चित्र असे आहेत जे मराठी विकिपीडियावर वापरले नाही. ती चित्र स्वतः काढलेली व इतर संकेतस्थळावरून घेतलेली आहे. प्रत्येक चित्रावर परवाना किव्हा माहिती नाही. २३ मार्च २००७ रोजी विकिमीडिया फौंडेशन यांनी Resolution:Licensing policy स्वीकार केला होता व त्याचे निर्णय असे होते- By March 23, 2008, all existing files under an unacceptable license as per the above must either be accepted under an EDP, or shall be deleted. या संदर्भात मराठी विकिपीडियातील प्रचालक गेल्या १० वर्षांपासून मराठी विकिपीडियावर असलेली १९,०००+ चित्रांवर परवाना नसल्यामुळे लेखकाला त्यात परवाना टाकण्यास विनंती करत आहेत. अनेक संदेश दिले गेले होते व माजी प्रचालक माहितगार यांनी त्याला साईट नोटिसवर सुद्धा नेले. १० वर्ष प्रयत्न करून सुद्धा त्या चित्रांवर परवाना आलेला नाही. यामुळे मी फौंडेशनच्या निर्णयानुसार उचित परवाना , माहिती व लेखात नाही वापरलेले चित्रांना काढण्यास हा प्रस्ताव मांडला आहे.

मराठी विकिपीडियावर असलेले प्रत्येक सदस्य आपले मत या विषयी देतील अशी आशा आहे. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ११:५१, ६ जुलै २०१८ (IST)Reply

  • स्थानिक विकिवरील योग्य परवाने नसलेली सर्व चित्रे काढून टाकण्यात यावीत शिवाय स्थानिक विकिवर चित्रे चढवणे अवरुध्द करण्यात यावे. जेणेकरुन,परवाने आणि इतर तांत्रिक बाबी परस्पर कॉमन्सवर निभावल्या जातील त्यांच्याकडे तशी यंत्रणा तरी उपलब्ध आहे. तसेही प्रताधिकार भंग ही बाब हाताळण्यास आपण अपयशी ठरलो आहोतच. (प्रताधिकार भंग केल्यामुळे कोणावरही कडक कारवाई आज मितीला झालेली नाही. आणि प्रताधिकार भंग सापडण्याची यादी मात्र दिवसेंदिवस वाढतच आहे. अगदी पुर्वीच्या प्रचालकांनी स्वत:च नकल-डकव केलेली आहे.) अजुनही अनेक सदस्य प्रताधिकार भंग करित आहेत आणि ते मराठी विकिच्या दीर्घकालीन भवितव्याचा विचार करता चांगली बाब नाही.
  • त्यामुळे जोवर आपल्याकडे परवाने हाताळणीची आणि प्रताधिकार भंग करणाऱ्यांवर कडक कारवाईची यंत्रणा उभी रहात नाही. (आत्तापर्यंतचा मुळमूळीत इतिहास पहाता ती कधीच उभी होणार नाही. असे वाटते!!!) तो पर्यंत सर्व परवाने आणि मूळ धारिका कॉमन्सवरच हाताळल्या जाव्यात असे मला वाटते.WikiSuresh (चर्चा) १४:३०, ६ जुलै २०१८ (IST)Reply

@Sureshkhole: >>अगदी पुर्वीच्या प्रचालकांनी स्वत:च नकल-डकव केलेली आहे<< याबाबत कृपया नावासहित सुस्पष्ट ऊदाहरण द्यावे. सरसकट सर्व प्रचालकांना यात ओढू नये हि विनंती. --वि. नरसीकर , (चर्चा) १६:४१, ६ जुलै २०१८ (IST)Reply

ही चित्रे काढली जावीत याबद्दल काही संदेह असण्याचे कारण नाही.या बाबतीत पुरेशा दीर्घ चर्चा यापूर्वी झालेल्या आहेत.सर्वांनी विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती,माहितगार यांच्या चर्चापानावरील Some questions raised on narsikars talkpage unanswered , विकिपीडिया:कॉपीराइट क्रांती हे विभाग त्यातील दुव्यांसह अवश्य वाचावेत.हे धोरण बनविण्यासाठी भारतातील एक ज्येष्ठ सल्लागार प्रो. एन. एस. गोपालकृष्णन यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी दिलेले मत विकिपीडिया चर्चा:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम पानावर आहे.आपण संचिका परवाना, लोकल अपलोड याविषयीचे धोरण सुटसुटीत व सुस्पष्ट करायला हवे.यासाठी चर्चा लवकर सुरु करुया.

--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १६:०३, ६ जुलै २०१८ (IST)Reply


"मराठी विकिपीडियावर सद्या किमान ९०% चित्र असे आहेत जे मराठी विकिपीडियावर वापरले नाही." ह्या वाक्याचा अर्थ समजला नाही. ... (चर्चा) २१:४५, ७ जुलै २०१८ (IST)Reply

@V.narsikar: नरसीकर दादा, मी पुराव्या शिवाय बोलत नाही, लेखाच्या इतिहासात माहितगार यांनी प्रताधिकार भंग केला आहे, शिवाय येथे त्यावर[१] चर्चा होऊन टायवीन यांनीच तो मजकूर काढलेला आहे. असो.
आणि सदस्य ज यांनी अनेकदा उत्पात केला आहे, प्रताधिकार भंग तर अगणित वेळा केलेला आहे तरीही त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. मी अनेकदा त्यांनी केलेला उत्पात आणि प्रताधिकार भंग नोंदवला आहे, प्रचालकांच्या नम्र विनंतीपलीकडे ज यांना काहीही मिळालेले नाही. त्यामुळे मी वरील मुद्दा बोलत आहे.
विषयांतर सोडून, प्रत्यक्षात माझा मुद्दा असा आहे की, आपण स्वीकार करुयात की शिस्तभंगावर कडक कारवाई करणे आपल्याला शक्य नाही किंवा आपण करित नाही, त्यामुळे परवाने सांभाळायचे आणि दाखवून द्यायचे सर्व यंत्रणा कॉमन्सवर परस्पर हाताळले जाऊदेत. आणि स्थानिक विकिवर चढवलेल्या सर्व चित्रांना मराठीवरून काढून टाकण्यात यावे. असे माझे मत आहे. WikiSuresh (चर्चा) १८:०७, ६ जुलै २०१८ (IST)Reply

"सदस्य ज यांनी अनेकदा उत्पात केला आहे, प्रताधिकार भंग तर अगणित वेळा केलेला आहे तरीही त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. मी अनेकदा त्यांनी केलेला उत्पात आणि प्रताधिकार भंग नोंदवला आहे, प्रचालकांच्या नम्र विनंतीपलीकडे ज यांना काहीही मिळालेले नाही. त्यामुळे मी वरील मुद्दा बोलत आहे."

मी आजवर विकीवर एकही चित्र चढवलेले नाही. अपवाद एकच - एका विशिष्ट वनस्पतीच्या चित्राऐवजी बंदुकीच्या फुलाच्या गवतवजा रोपाचे (एकदांडीचे) लावलेले चित्र बदलून मी योग्य ते चित्र लावले होते. माहितगार यांनी ते चित्र काढून तेथे एकदांडीचे चित्र लावले. गोष्ट फार फार जुनी असल्याने विगतवार माहिती देता येणार नाही.

तथाकथित प्रतिकारभंग असलेला मजकुराच्या ऐवजी त्याजागी तितक्याच तोलाच्या माहितीने परिप्लुत मजकूर भरण्याची ज्याची ताकद आहे, त्यानेच प्रतिकारभंगित मजकूर पुसावा. ... (चर्चा) २२:०४, ७ जुलै २०१८ (IST)Reply

@V.narsikar, अभय नातू, आणि Tiven2240:

  • सदस्य ज यांनी आपल्या उपरोक्त विधानाने माझ्या मताला (प्रताधिकार भंगाच्या मुद्याला सांभाळणे आजमीतीच्या धोरणांनी आपल्याला शक्य नाही.) आणखीनच पुष्टी दिलेली आहे. ज यांचे उत्पात, प्रताधिकार भंग, स्त्री सदस्यांना लक्ष करणे हे वारंवार नोंदवूनही ज यांच्यावर सुचना देण्यापलीकडे कारवाई झालेली नाही. असे अनेक सदस्य मराठी विकीवर होते आणि परत येण्याची शक्यता आहेच,
  • मुक्तस्त्रोताचा गाभाच असलेले प्रताधिकार मुक्ततेचे विचार, अनेक सदस्यांना कधीच कळले नसल्याचे ज यांच्या आणि इतर अनेक सदस्यांच्या विधानांवरुन लक्षात येते.
  • (ता.क. ज यांची विनोदी विधाने ऐकून अनेकदा हसायला येते. त्यांना विकिमाता बुध्दी देवो अशी मी तीच्याकडे प्रार्थना करित आहे आणि चुकून असे झाल्यास मी 100 विकि दिवसांच व्रत करुन विकिमातेचं पारणं फ़ेडीन असा नवस मी देवा-ब्राह्मणांच्या/विकिमाता-प्रचालकांच्या समोर मी‌ करतो आहे.)
  • शिवाय चित्रांच्या बाबतीतला परवान्यांचा सदस्यांच्या मनातला गोंधळ पहाता, चित्रांचे योग्य परवाने उपलब्ध होणे कठीणच आहे. त्यामुळे ज यांच्याकडे दुर्लक्ष्य करत मुद्याकडे परत येताना सर्व स्थानिक चित्रांना काढून टाकण्यात यावे असे मी मत मांडत आहे. आणि आता नव्याने कॉमन्सवरुन योग्य परवाने असलेली चित्रेच वापरण्यात यावीत अशी विनंती मी करित आहे. WikiSuresh (चर्चा) ०२:१४, ८ जुलै २०१८ (IST)Reply

प्रिय सुरेश,

असे दिसून आले आहे की आपण या चर्चेला विषयाच्या बाहेर नेत आहात. ही चर्चा प्रतिमांची आहे आणि आपण नकल-डवक धोरणाची चर्चा करताय जी आधीच निश्चित आहे.

तुम्ही प्रचालकांवर आरोप करताय की आम्ही सदस्य:ज यांच्या कॉपीराइट उल्लंघनांवर काही कारवाई करत नाही आणि त्याबद्दल चर्चा (येथे) झालेली आहे आणि त्याची सूचना आपल्याला व यांना दिलेली आहे.

मी तुम्हाला सावध करतो की खोटी विधाने करू नका आणि मराठी विकिपीडियाच्या धोरणांवर आणि कामात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करु नका. याला गंभीर पणे घ्यावे, हे सहन केले जाणार नाही. धन्यवाद. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १५:५८, ८ जुलै २०१८ (IST)Reply


@Tiven2240: Let me put it for (you and many others for the reference) bilingually, (I am unable to type in Marathi for technical reasons and I think this discussion should be accessible to non-Marathi readers too.)

  • I am saying सदस्य:ज has been doing copyvio for years now, in addition to that he is been involved in many other destructive edits including following and miss-behaving with women editors. even here in this same discussion he is promoting his copyright violations and challenging all of us who are against copyvio. So, if he can challenge all of us here. he is rather proving my statements true that, administration is not able to control those destructive editors.
  • In the very last line I had suggested that, let's leave issue of J now, and concentrate on the issue of copyright of images, "Deletion of all the images without license and now onward blocking any further local uploading of images." This is what my suggestion is. (These are just translations of what I wrote above.)
  • And instead of J getting such warnings for promotion of his unlawful activities if I am getting warnings for making false statements(which are proven with proofs and I have been stating it again and again.), then I think I need to go for further help.
  • Having said all of that I am requesting you, that let's get back to the discussion and which I have said every time in all the above posts I have written. And Take deletion of locally uploaded images and without any license information as a course of further action. WikiSuresh (चर्चा) १६:४०, ८ जुलै २०१८ (IST)Reply
या विषयावर विकिमीडिया फाउंडेशनचा सल्ला घेण्यात आलेला आहे. सध्या चालू असलेल्या विकिमेनिया मध्ये यांच्याशी संवाद साधून पुढील पावले व कायदेशीर व्यूहरचना ठरत आहे.
सदस्य:rahuldeshmukh101 हे आत्तापर्यंतच्या हालचाली व पुढील टप्पे ३० जुलैपर्यंत येथे सादर करतील.
फाउंडेशन व त्यांच्या कायदेपंडितांचे मत आणि सल्ला मिळाल्यावर पुढील पावले ठरवली जातील.
तुमची मते, मुद्दे आणि सहकार्याबद्दल धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) १९:४४, २२ जुलै २०१८ (IST)Reply

@Rahuldeshmukh101:, लक्ष वेधले. -- अभय नातू (चर्चा) ०१:५१, २ ऑगस्ट २०१८ (IST)Reply

@V.narsikar, अभय नातू, आणि Tiven2240:, ही चित्रे अवैध आहेत हे अनेकवेळा चर्चेतून मान्य झालेले आहे. पुरेशा संधी, सूचना दिल्या गेल्या आहेत. ३० जुलै शेवटची तारीख असे वर लिहिले गेले आहे. आता चालढकल न करता ही चित्रे वगळण्यासाठी अंतिम निर्णय द्यावा ही विनंती.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १६:५४, ९ ऑगस्ट २०१८ (IST)Reply

राहुल देशमुख यात काही आपले मत देतील अशी अपेक्षा आहे. पुन्हा त्यांना साद घालत आहे. @Rahuldeshmukh101: कृपया मत द्यावे. @सुबोध कुलकर्णी: प्रचालकांकडे अनेक उपकरण आहे आणि मी ते ३-४ दिवसात सर्व साफ करू शकतो त्यामुळे एकदा त्यांचे मत घेतले की चांगले होईल कारण एकदा काढले की त्याला पुन्हा पुनर्संचयित करणे कठीण व अवगड आहे. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १७:०१, ९ ऑगस्ट २०१८ (IST)Reply

@सुबोध कुलकर्णी:

टायवेन यांनी राहूल देशमुख यांचे मत मागीतले आहे, त्यांचे मत येईपर्यंत जरा सबूरीने घ्यावे ही विनंती.--वि. नरसीकर , (चर्चा) २२:०३, ९ ऑगस्ट २०१८ (IST)Reply

@V.narsikar, अभय नातू, आणि Tiven2240:, मला घाई नाही आहे. हा विषय अनेक वर्षे प्रलंबित आहे, हे मी वर दिलेल्या दुव्यावरून पाहता येते. अभय नातू यांनी ३० जुलै पर्यंत राहुल यांना वेळ दिला होता, त्यांना आणखी वेळ हवा असता तर त्यांनी प्रतिसाद दिला असता. इतकी गांभीर्याने वारंवार चर्चा होवून पुढील कार्यवाही निश्चित कालावधी ठरवून झाली नाही तर सहभागी लोकांचा (मुळातच कमी सदस्य यात लक्ष घालतात) हुरुप/पुढाकार कमी होतो इतकीच माझी चिंता.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १८:३१, ११ ऑगस्ट २०१८ (IST)Reply

@V.narsikar आणि अभय नातू:, एक आठवण...--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १७:३४, १७ डिसेंबर २०१८ (IST)Reply

लेखांची प्रतवारी ठरवण्या विषयीचे धोरण आणि त्याचा कच्चा आराखडा संपादन

@Tiven2240, V.narsikar, आणि अभय नातू: मराठी विकिवर लेखांची गुणवत्ता सुधारण्यासाठी त्यांची प्रतवारी होणे आवश्यक आहे. आणि त्यासाठीचे धोरण इतर विकिंवर उपलब्ध आहे. इंग्रजी विकिच्या धोरणांचा अभ्यास करुन मी निम्नोक्त धोरण चर्चेस मांडत आहे. सर्वांनी या धोरणाचा अभ्यास करुन त्यामध्ये सुचना कराव्यात आणि आवश्यक बदल सुचावेत. मी लेखांची प्रतवारी खालील तीनच स्तरांमध्ये प्रस्तावीत करित आहे. त्या मागे कारण स्तरीकरण सोपे ठेवणे हेच एक आहे. लेखांची प्रतवारी ठरवण्यासाठी सदस्यांना त्यांनी किती लेख कोणत्या स्तरावरील केलेले आहेत त्यानूसार त्यांचेही वर्गिकरण आणि प्रतवारी आवश्यक असेल त्यामुळे त्याबाबतीत अनुभवी सदस्यांनी आणि प्रचालकांनी आपले मत आणि धोरणांचा कच्चा आराखडा मांडावा अशी मी विनंती करित आहेत.

येथे चर्चा केल्यास हा विभाग किचकट होउन दुर्बोध होऊन बसेल. हे टाळण्यासाठी चर्चा येथे करावी. चर्चेतून निघणारे योग्य ते बदल येथे आणले जातील.

प्रारंभिक पातळीवरचा लेख संपादन

  • उल्लेखनीयता सिद्ध होत असावी.(विश्वकोशीय उल्लेखनीयतेची आवश्यकता)
  • योग्य, वैध, स्पष्टपणे सिद्ध होत असणारे संदर्भ (किमान 3) वादग्रस्त, अतिशयोक्त विधानांना प्रत्येकी एक संदर्भ असावा.

पहिल्या पातळीवरचा लेख संपादन

  • उल्लेखनीयता सिद्ध होत असावी.(विश्वकोशीय उल्लेखनीयतेची आवश्यकता)
  • योग्य, वैध, स्पष्टपणे सिद्ध होत असणारे संदर्भ (किमान प्रत्येक परिच्छेदाला एक संदर्भ असावा, वादग्रस्त विधाने, अतिशयोक्ती, आकडेवारीला स्पष्ट आणि वैध प्रत्येकी एक तरी संदर्भ असावेत.)
  • वर्गिकरण, विकिलिंक्स, विकिडाटा कलम जोडलेले असावे.
  • माहिती चौकट.
  • रचना निटशी करुन, योग्य विभाग केलेले असावेत.
  • NPOV, प्रताधिकार भंग, पाल्हाळीक मजकूर नसावा.

दुसऱ्या पातळीवरचा लेख संपादन

  • उल्लेखनीयता सिद्ध होत असावी.(विश्वकोशीय उल्लेखनीयतेची आवश्यकता)
  • योग्य, वैध, स्पष्टपणे सिद्ध होत असणारे संदर्भ (किमान प्रत्येक परिच्छेदाला एक संदर्भ असावा, वादग्रस्त विधाने, अतिशयोक्ती, आकडेवारीला स्पष्ट आणि वैध प्रत्येकी एक तरी संदर्भ असावेत.)
  • वर्गिकरण, विकिलिंक्स, विकिडाटा कलम जोडलेले असावे.
  • माहिती चौकट,
  • रचना निटशी करुन, योग्य विभाग केलेले असावेत.
  • NPOV, प्रताधिकार भंग, पाल्हाळीक मजकूर नसावा.
  • मजकूराला नेमकेपणा पैंकी कोणताही साचा नसावा.

तिसऱ्या पातळीवरचा लेख उत्तम लेख संपादन

  • उल्लेखनीयता सिद्ध होत असावी.(विश्वकोशीय उल्लेखनीयतेची आवश्यकता)
  • योग्य, वैध, स्पष्टपणे सिद्ध होत असणारे संदर्भ (किमान प्रत्येक परिच्छेदाला एक संदर्भ असावा, वादग्रस्त विधाने, अतिशयोक्ती, आकडेवारीला स्पष्ट आणि वैध प्रत्येकी एक तरी संदर्भ असावेत.)
  • वर्गिकरण, विकिलिंक्स, विकिडाटा कलम जोडलेले असावे.
  • माहिती चौकट भरलेली असावी.
  • रचना निटशी करुन, योग्य विभाग केलेले असावेत. प्रस्तावना, मुख्य भाग, उप विभाग, संदर्भ, नोंदी, हे ही पहा,
  • NPOV, प्रताधिकार भंग, पाल्हाळीक मजकूर नसावा.
  • मजकूराला नेमकेपणा पैंकी कोणताही साचा नसावा. (नेमकेपणाचा तारखेचा साचा मी बनवला आहे तसे आणखीन इतर साचेही बनवावे लागतील)
  • इतर विकिप्रकल्पांमध्ये लेखातील विषयावरील संचिका, माहिती, पाने यांना दुवे.
  • navigation box, side box जोडलेले असावेत.(इंग्रजीचे मराठी भाषांतर सुचवा आणि)
  • लेखातील विषयाला अनूसरून आवश्यक तेथे चित्रे, चलचित्रे, ध्वनीमुद्रणे, नकाशे, आकृत्या, इत्यादी जोडलेले असावेत.
  • लेखात शुद्धलेखन आणि वाक्यरचनेच्या चुका नसाव्यात.

लेखांची प्रतवारी लावताना आवश्यक बाबीं संपादन

  • प्रत्येक नविन लेखाला प्रारंभीक लेखाची पातळी गाठणे आवश्यक राहिल. नाहीतर उल्लेखनीयता सिद्ध न झाल्याने तो लेख साचा लावून मुदत देऊन मुदतीनंतर काढून टाकला जाईल.
  • जुन्या लेखांचे वेगवेगळ्या पातळ्यांवर वर्गिकरण करुन त्यांनाही उल्लेखनीयतेसाठी तपासले जाईल. उल्लेखनीयता सिद्ध न झाल्याने तो लेख साचा लावून मुदत देऊन मुदतीनंतर लेख काढून टाकला जाईल.
  • लेखांची गुणवत्ता सुधारण्यासाठी ह्या प्रकारचे गुणवत्ता निर्धारण आवश्यक असेल.
  • लेखांच्या गुणवत्ता निर्धारण करणारे सदस्य आणि त्यांचे वर्गिकरण करण्याची व्यवस्था, मानांकनाची व्यवस्था करावी लागेल.
  • लेखांच्या गुणवत्ता निर्धारण करण्याच्या प्रक्रियेत आवश्यक साचेही तयार करावे लागतील.

कोण ठरवू शकेल पातळी आणि पातळी मान्यतेची प्रक्रिया काय असेल संपादन

  • दुसऱ्या पातळीवरचे तीन लेख सुधारणारे/लिहिणारे तीन सदस्य मिळून लेखाला तीसऱ्या पातळीसाठी नामांकित केलेला लेख तपासून त्याला तीसऱ्या पातळीचा उत्तम लेख म्हणून मान्यता देतील. ही चर्चा चर्चापानावर लेखाचा प्राथमिक संपादक विनंती नोंदवून करु शकेल.
  • दुसऱ्या पातळीवरचा लेख तीसऱ्या पातळीवरचा एक आणि त्यापेक्षा जास्त लेख केलेला एक व्यक्ती आणि दुसऱ्या पातळीवरील 5 लेख सुधारणारे/लिहिणारे सदस्य दुसऱ्या पाताळीच्या मान्यता देण्यास पात्र ठरतील.
  • प्रारंभीक पातळीवरचा लेख दुसऱ्या पातळीवरचे 5 आणि त्यापेक्षा जास्त लेख केलेल्या एका व्यक्तीकडून तपासून मान्यता देऊ शकतील.
  • ज्यांचे प्रारंभीक पातळीवरचे 5 लेख स्वीकारले गेले आहेत अश्या सदस्यांना प्रचालक प्रारंभीक पातळीवरचे लेख तपासून त्यांना मान्यता देण्याचे अधिकार प्रचालक देतील.
  • प्रचालकांना सर्व लेखांची पातळी ठरवण्याचे अधिकार प्रचालक म्हणून मिळतीलच. तीसऱ्या पातळीवरचा उत्तम लेख ठरवण्यासाठी मात्र किमान दोन प्रचालकांची मान्यता आवश्यक असेल. WikiSuresh (चर्चा) ०५:२४, २२ जुलै २०१८ (IST)Reply


वाचले. सविस्तर टिप्पणी नंतर करतोच.--वि. नरसीकर , (चर्चा) १७:२४, २२ जुलै २०१८ (IST)Reply

नवीन प्रस्ताव संपादन

मराठी विकिपीडियावर पेट्रोलर, ऑटोपेट्रोल, नवीन सॉकपपेट धोरण व कौल मुद्दत प्रकियेत दुरुस्ती या बदल नवीन धोरण मांडला आहे. ते विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे/प्रचंड प्रस्ताववर पाहता येईल. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १०:४१, ९ ऑगस्ट २०१८ (IST)Reply

रोलबॅक राईट संपादन

 

रोलबॅक राईट म्हणजे उत्पाता विरुद्ध लढण्यासाठी एक महत्त्वाचा अधिकार होय. रोलबॅक सर्व विकिपीडिया प्रोजेक्टवर उपलब्ध आहे आणि आम्हाला वाटते की तो मराठी विकिपीडियावर देखील उपलब्ध करुन दिला जावा. मराठी विकिपीडियावर सुमारे ६६,०००+ लेख आहेत आणि कमी प्रशासक सक्रिय दिसत असल्याने अशा काही सदस्यांना रोलबॅक अधिकार दिले गेले पाहिजे, जे सदस्य गेल्या २ वर्षांपासून मराठी विकिपीडियावर कार्यरत आहेत आणि चांगले संपादन करतात (५००+ संपादनाचा अनुभव) तसेच मराठी विकिपीडियावरील उत्पात रोकण्याचा त्यांना अनुभव आहे. हा सदस्य अधिकार मराठी विकिपीडियावरील प्रशासकांद्वारेच दिला आणि काढला गेला पाहिजे. सदस्यांना असे अधिकार प्राप्त झाले तर ते अधिक जबाबदारीने व गतीने योगदान देतील असे मला वाटते. म्हणून मी विकि समाजाला निर्णय घेण्यासाठी मत मागत आहे. आपण मतदान करू आणि ७ दिवसांनंतर आम सहमतीने निर्णयावर येऊ. नंतर आपले सदस्य या अधिकारासाठी विनंती करतील. धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा १५:५८, १६ डिसेंबर २०२० (IST)Reply

कौल संपादन

  पाठिंबा- मी प्रस्ताव मांडलेला असल्याचा नात्याने. - संदेश हिवाळे
  पाठिंबा- महाजनो येन गतः स पन्थाः – आपणा सर्वां सोबत मी पण आहे. - Goresm
  पाठिंबा- होय मी आपल्याशी सहमत आहे, रोलबॅक हक्क मिळाल्याने चुकीचे संपादने पूर्ववत करण्यात आम्हाला खूप मदत होईल. - Rockpeterson
  पाठिंबा- यावर माझे पूर्ण समर्थन आहे. - Tiven2240
  पाठिंबा- माझे समर्थन आहे. - vikrantkorde


मुदत संपादन

या प्रस्तावावर मांडल्यापासून ७ दिवस चर्चा व्हावी. त्याअंती कौल घेउन निर्णय घेतला जावा. पहिल्या ७ दिवसांच्या अंती कौल समतोल असल्यास अधिक ७ दिवस चर्चा व्हावी. त्यानंतर कौल घेतला जावा. तेव्हाही कौल समतोल असल्यास प्रचालकांना कौल घेण्याचा अधिकार देण्यात यावा. -- अभय नातू (चर्चा) ०८:११, १९ डिसेंबर २०२० (IST)Reply

@अभय नातू: सात दिवसांवर झाले आहे. प्रस्तावाचा निर्णय किंवा निर्णयाची तारीख घोषित करावी. धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा ०३:२२, २८ डिसेंबर २०२० (IST)Reply

चर्चा संपादन

@संतोष दहिवळ, Tiven2240, , प्रसाद साळवे, आणि आर्या जोशी: @Goresm, सुबोध कुलकर्णी, अभय नातू, आणि Vikrantkorde: @Rockpeterson, Stt65, Vikramg7969, आणि सुशान्त देवळेकर: @ज्ञानदा गद्रे-फडके, Alexhuff13, नरेश सावे, आणि Manoj.nimbalkaradtbaramati: कृपया आपण सर्वांनी आपला कौल द्यावा.

प्रचालकांनी यासाठी अंतिम मुदत नमूद करावी ही विनंती, धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा २३:०६, १७ डिसेंबर २०२० (IST)Reply

निकाल संपादन

२७ डिसेंबर २०२० पर्यंत या प्रस्तावावर सकारात्मक कौल दिले गेलेले आहेत. त्यानुसार प्रस्ताव मान्य झाल्याचे ठरते.

पुढील पावले संपादन

हा अधिकार मिळण्यासाठीची प्रक्रिया वर नमूद केलेली आहेच. हा अधिकार काढून घेण्यासाठीची नेमकी प्रक्रिया काय आहे यासाठीचा मसुदा -
असा अधिकार असलेल्या सदस्या विरुद्ध मराठी विकिपीडियावर हा अधिकार काढून घेण्याचा प्रस्ताव मान्य झाल्यास त्या सदस्याकडून हा अधिकार काढून घेण्यात येईल.
असा अधिकार असलेल्या सदस्याला मराठी विकिपीडिया किंवा इतर कोणत्याही विकिमीडिया प्रकल्पावर अवरुद्ध (ब्लॉक) केले गेल्यास त्या सदस्याकडील हा अधिकार अवरुद्धीकरण काळाकरता स्थगित करण्यात येईल.
असा अधिकार असलेल्या सदस्याकडून एक वर्षापेक्षा जास्त काळ संपादने न झाल्यास त्या सदस्याकडून हा अधिकार काढून घेण्यात येईल.
अभय नातू (चर्चा) ०९:०९, २८ डिसेंबर २०२० (IST)Reply
@अभय नातू: धन्यवाद, कृपया पात्रता निकष पण सांगावेत.
संतोष गोरे ०९:५५, २८ डिसेंबर २०२० (IST)Reply
@अभय नातू: असा अधिकार असलेल्या सदस्याला मराठी विकिपीडिया किंवा इतर कोणत्याही विकिमीडिया प्रकल्पावर अवरुद्ध (ब्लॉक) केले गेल्यास त्या सदस्याकडील हा अधिकार अवरुद्धीकरण काळाकरता स्थगित करण्यात येईल. कदाचित असा निकष इंग्लिश विकिपीडियावर नाही, आणि आपण इंग्लिश विकिनियमांची जतासतशी नकल करत नाही हेही मी जाणतो. मराठी विकि खेरीज अन्य विकि प्रकल्पांवर काही अधिकार प्राप्त सदस्याला मराठी विकिपीडियावरही तोच अधिकार प्राप्त करण्याची सूट मिळत नसते; त्या त्या प्रकल्पांवर चांगले काम केले तर अधिकार प्राप्त होतात, आणि ज्या प्रकल्पांवर चांगले योगदान नसते त्याला तेथे अधिकार मिळत नाही - हे तुमच्या व सुरेश खोले दरम्यान झालेल्या चर्चेत मी पाहिले आहे. एखादा सदस्य मराठी विकिपीडियावर चांगले/वाईट काम करत असेल तर त्याला त्याच्या त्याच योगदानाबद्दल मराठी विकिपीडियाने जबाबदार ठरवावे, अन्य प्रकल्पांवरील योगदानाबद्दल नाही. माझा मुद्दा तुमच्या लक्षात आला असेलच की मराठी विकिपीडियावरील रोलबॅक अधिकार हा सदस्याच्या मराठी विकि योगदानाबद्दलच असावा, असे माझे मत आहे. या उलट असेही मत आहे की, मराठी विकिपीडिया सोडून अन्य विकि प्रकल्पांवरील योगदानाबद्दल एखादा अधिकार सदस्यास दिला गेला असेल तर केवळ यामुळे त्यास तसा अधिकार मराठी विकिपीडियावर प्राप्त होऊ नये, जोपर्यंत त्याने मराठी विकिपीडियावर अपेक्षित योगदान दिलेले नसेल. तुमच्या वरील निकषावर/मुद्द्यावर मी माझी हरकत स्पष्ट केली आहे, आता बाकी तुम्ही यास स्वीकार केले वा नकार केले तरी त्यावर माझी नाहरकत असेल, धन्यवाद.
--संदेश हिवाळेचर्चा ११:५३, २८ डिसेंबर २०२० (IST)Reply
@Goresm:, मूळ प्रस्तावात १. दोन वर्षे कार्यरत आणि २. ५०० संपादने हे दोन पात्रता निकष आहेत. यांशिवाय तुम्हाला इतर निकष सुचवायचे आहेत का?
@Sandesh9822:, तडीपार/अवरुद्धीकरण आणि रोलबॅक अधिकारांची सांगड ही तडीपार सदस्याला शिक्षा करणे नाही. सहसा इतर प्रकल्पांवर तडीपार होण्यासाठी एखाद्या सदस्याने गंभीर नियमबाह्य वर्तन केलेले असते. अशावेळी तडीपार सदस्य वैतागलेला असतो/असते. अशावेळी त्या सदस्याकडून उद्वेगाच्या भरात रोलबॅक केले गेले तर नसते वाद होण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी हा प्रस्ताव आहे. अशा सदस्याला मराठी विकिपीडियाच्या सदस्यांनी ना-हरकत दिल्यास हा (व इतरही) अधिकार परत करण्यास हरकत नाही.
अभय नातू (चर्चा) १०:२४, २९ डिसेंबर २०२० (IST)Reply
@अभय नातू:, १) धन्यवाद.

संतोष गोरे १६:२७, २९ डिसेंबर २०२० (IST)Reply

  1. ^ "चर्चा:संयुक्त महाराष्ट्र चळवळ". विकिपीडिया. 2018-04-25.