जुन्या पण चालू चर्चा

संपादन

"उचित वापर" (फेअर यूझ) उचित आहे काय ? साचा:प्रताधिकारित संचिका या साच्याने वर्गीकृत केलेल्या सर्व संचिका आणि तो साचा वगळणे आणि यापुढे Fair Use हे तत्त्व मराठी विकिपीडियातून अस्वीकार्ह ठरवणे: प्रस्ताव. विकिपीडिया:चावडी/चालू चर्चा १#विषय १

लेख संख्या नियंत्रण आणि आशयघनता वाढवणे: प्रस्ताव (लेख दर्जा) लेखसंख्या वाढवण्याकडेच लक्ष देण्यापेक्षा थोडेसे माहिती वाढवण्याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. विकिपीडिया:चावडी/चालू चर्चा १#विषय २

युनिकोडविषयी चर्चा प्रमाण युनिकोड अक्षरांबद्दल सयुक्तिक चर्चा केली जात आहे. विकिपीडिया:चावडी/चालू चर्चा १#विषय ३

परिभाषिक शब्द आणि प्रतिशब्द या संबंधी सूचना विकिपीडिया:चावडी/चालू चर्चा १#विषय ४

श्रेयस तळपदे असे शीर्षक बदलावे काय ? श्रेयस तळपडे त्याच्या नावाचा हिंदीत योग्य उच्चार करत नाही त्या विषयीची चर्चा विकिपीडिया:चावडी/चालू चर्चा १#विषय ५

मराठी भाषेतील अक्षरे इतर भाषात नसणे किंवा न वापरली जाणे एका भाषेतील शब्द दुसर्‍या भाषेत योग्य तर्‍हेने लिहिला किंवा बोलला जात नाही या विषयी चर्चा विकिपीडिया:चावडी/चालू चर्चा १#विषय ६

भारतातील विद्यापीठांची यादी भारतातील विद्यापीठांची कोणती नावे योग्य आणि विकिपीडियावर काय ठेवावीत या विषयीची चर्चा विकिपीडिया:चावडी/चालू चर्चा १#विषय ७

साचे बदल मराठी विकिपीडियातील बर्‍याच साच्यात बदल हवा आहे, त्याविषयीची चर्चा विकिपीडिया:चावडी/चालू चर्चा १#विषय ८

लेखाविषयी अधिक माहिती इंग्रजी विकिपीडियाप्रमाणे अधिक माहिती मराठी विकिपीडियावरील लेखांत हवी आहे. विकिपीडिया:चावडी/चालू चर्चा १#विषय ९

विकिपत्रिका जून, इ.स. २०११ विकिमीडिया इंडिया अध्यायाच्या वृत्तपत्रिकेचा - अर्थात विकिपत्रिकेचा - जून, इ.स. २०११मधील अंक प्रकाशित. या विषयी चर्चा विकिपीडिया:चावडी/चालू चर्चा १#विषय १०

"उचित वापर" (फेअर यूझ) उचित आहे काय ?

संपादन

साचा:प्रताधिकारित संचिका या साच्याने वर्गीकृत सर्व संचिका आणि तो साचा वगळणे आणि व यापुढे Fair Use हे तत्त्व मराठी विकिपीडियातून अस्वीकार्ह ठरवणे: प्रस्ताव

मराठी विकिपीडियन मित्रांनो हा गंभीर पण महत्त्वाचा विषय आहे. आज पुन्हा एक छायाचित्र एका लेखात "उचित वापर" (फेअर यूझ) या तत्त्वाखाली जोडलेले पाहिले. प्रत्यक्षात ते सरळ सरळ प्रताधिकार कायद्याचे उल्लंघन ठरते. माझ्या खालील विवेचनाबद्दल आपले काय मत आहे ?

खरेतर हा आक्षेप नोंदवण्यात अंमळ उशीर आधीच झालेला आहे. अपेक्षा ही होती की मराठी जनांपैकी कुणी कायदेतज्ज्ञ उगवेल आणि मार्गदर्शन करेल. कारण लंगड्या गायीने मार्गदर्शन करण्यापेक्षा सोनाराने कान टोचणे बरे असते, पण न पेक्षा दुधाची तहान ताकावर भागवण्याशिवाय मराठी विकिपीड़ियन्सना अद्याप तरी पर्याय दिसत नाही.

काय असावे आणि काय आहे यात बर्‍याचदा तफावत असते, तशीच तफावत "योग्य उपयोग" या धारणेसंदर्भात आहे.

माझ्या ज्ञानाची मर्यादा इंटरनेटवर उपलब्ध भारतीय प्रताधिकार कायद्याची जी काही बेअर अ‍ॅक्ट आवृत्ती आणि थोडेफार ढोबळ विश्लेषण, भारतातील कडी-कपारीत रहात असणार्‍यांना व भारतीय मातीवर कधी काळी पाऊल ठेवावे लागेल अशा सर्व व्यक्तींनी भारतातील कायद्याच्या चष्म्यातून पहावयास हवे याची जाणीव असते, येथपर्यंत आहे. (इंटरनेटवरील उपलब्ध आवृत्ती जुनी असू शकते, शिवाय भारतीय न्यायसंस्थेचे कायदेविषयक विश्लेषण अंतिम असते आणि असे विश्लेषण माझ्या वाचनात नाही याची मी प्रांजळ कबुली देतो.)

आपण जेव्हा एखादी गोष्ट भारतीय मातीवरून आकाशात(आंतरजालावर) पाठवतो, किंवा भारताबाहेरून पण भारतीय आकाश/मातीवर काही करतो तेव्हा भारतीय कायद्यांच्या परिघात येतो.सर्व्हर अमेरिकेत आहे का भारतात याने फरक पडत नाही, भारतीय कायदा लागू होतोच.

मला इंटरनेटवर उपलब्ध झालेल्या बेअर अ‍ॅक्ट मध्ये प्रताधिकाराविषयक दिलेल्या मर्यादा पुन्हा पुन्हा चाळून(वाचून) पाहिल्या पण भारतीय कायद्दास Fair Dealing हा शब्दप्रयोग आहे Fair Use शब्दप्रयोग नाही,समजा दोन्हीचा अर्थ "योग्य उपयोग" असा जरी धरला तरी भारतीय कायद्दास परवानगी दिलेले "योग्य उपयोगांची' परवानगीचा परिघ मर्यादीत आहे., आपण विकिपीडियावर वापरताना ज्या पद्धतीने "योग्य उपयोग' या शब्द प्रयोग वापरू तो भारतीय प्रताधिकार कायद्या नुसार उपलब्ध मर्यादेत बसत नाही असे माझे साधार मत आहे.[]

भारतीय कायद्याने मुख्यत्वे खासगी उपयोगाकरिता काही मर्यादित परवानग्या दिलेल्या दिसतात, तर विकिपीडिया ही खासगी उपयोगाची जागा नाही. ना-नफा सांस्कृतिक कार्यक्रम/समारंभात आणि शैक्षणिक संस्थांना मर्यादित प्रमाणात मोकळीक असावी इथपर्यंतच मर्यादित आहे असे दिसते. त्यात आंतरजालाचा समावेश होत नाही. विकिपीडिया शैक्षणिक उपयोगाकरता वापला जात असेल पण शैक्षणिक उपयोगाच्या पलीकडे वापरला जात नाही असे नाही.

(एखादे संकेतस्थळ पासवर्ड प्रोटेक्टेड स्वरूपात केवळ शिक्षक आणि विद्यार्थ्यांशिवाय इतर कुणासाठी उघडत नसेल तर काही बंधने शिथिल होण्याची शक्यता असू शकेल, पण विकिपीडिया या परिघात येणार नाही. विकिपीडियाची कुणी केवळ शैक्षणिक उपयोगाकरिता ऑफलाइन आवृत्ती काढली तर अशा आवृत्तीत मर्यादा कुठे कुठे शिथिल होऊ शकतील हा वेगळ्या अभ्यासाचा विषय आहे)

एकतर विकिपीडिया व्यक्तिगत टीका अथवा समीक्षण ओरिजिनल रिसर्च स्वरूपात, तसेच बातम्या स्वीकारत नाही. तसे केले तरी लिखित मजकुराबद्दल अंधुक स्वातंत्र्य लाभू शकते(कारण असे समीक्षण तेवढ्या मर्यादित लेख/परिच्छेदापुरते मर्यादित असेल) पण छायाचित्रे आणि इतर माध्यम संचिका (media files)करिता या परिघात स्वातंत्र्य मिळते का याबद्दल मला दाट शंका आहे. कारण विकिपीडियावर चढवलेली संचिका कुणी "विशिष्ट लेख/परिच्छेदापलीकडे वापरणार नाही याची खात्री देता येत नाही. त्यामुळे तर कायद्याने उपलब्ध केलेल्या मर्यादेचा लाभही घेता येत नाही.

इंग्रजी विकिपीडिया अमेरिकी कायद्याचा लाभ घेत "योग्य उपयोग" मर्यादित स्वरूपात स्वीकारते. विकिमीडिया कॉमन्सपण वर उल्लेख केल्याप्रमाणे "सर्व देशांत सर्व परिस्थितीत" "योग्य उपयोग" लागू होत नाही म्हणून "योग्य उपयोग" हे तत्त्व, संचिका स्वीकारताना मुळीच ग्राह्य धरत नाही. मराठी विकिपीडियावरील बहुसंख्य सदस्य ज्या अर्थी भारतात रहाणार आहेत त्या अर्थी त्यांना भारतीय कायदे लागू होणार आहेत. जरी कायदेशीर जबाबदारी सदस्यांची व्यक्तिगत असली तरी अनभिज्ञतेने/अनवधानाने सदस्यांकडून होणे शक्य असलेल्या चुका टाळण्याच्या दृष्टीने त्यांनी विकिमीडिया कॉमन्स प्रमाणे मराठी विकिपीडियाने देखील "योग्य उपयोग" हे तत्त्व अग्राह्य ठरवत या तत्त्वाखाली नवीन संचिका टाकू नयेत, टाकल्यास वगळाव्यात, तसेच या तत्वातील उपयोग केलेल्या सार्‍याच जुन्या संचिका वगळाव्यात असे माझे आग्रहाचे मत आहे.

माझ्या आक्षेपाची शहानिशा विचारविमर्श करून मते मांडावीत. त्यानंतर सुयोग्य अंमलबजावणी करावी ही सादर विनंती

माहितगार ०७०५, १३ फेब्रुवारी २०११ (UTC)

  1. ^ बौद्धिक संपत्तीच्या मालकीबद्दलचे नियम#Limitations as per Indian Copyright act


विकिमीडिया कम्युनिटी मेलिंगलिस्ट मधील संबधित चर्चेचा संक्षेप

संपादन

Today's Topics

1. Re Copyright problems (Achal Prabhala)


Message 1 Date Wed, 11 May 2011 092120 +0530 From Achal Prabhala <aprabhala@gmail.com> Subject Re [Wikimediaindia-l] Copyright problems To Wikimedia India Community list <wikimediaindia-l@lists.wikimedia.org> Message-ID <4DCA07B8.8010702@gmail.com> Content-Type text/plain; charset=ISO-8859-1; format=flowed

In India, and in many countries outside the US, the concept of fair use is referred to as 'fair dealing' - the terms are analogous, but not exactly similar. In India, the copyright act outlines fair dealing principles in Sec 52, and if you would like to see the old and new provisions under this section, refer to

Current Indian copyright law (with suggested amendments from government and civil society) http//www.altlawforum.org/intellectual-property/advocacy/proposed-amendment-to-the-copyright-act-1957


  • [http//www.cis-india.org/advocacy/ipr/upload/amended-copyright-act Proposed amended copyright law (soon to be tabled in parliament)]


While under fair dealing it is possible to 'use' an image without permission under prescribed circumstances, this naturally does not mean that a user is free to change the licensing terms of the image. My understanding is that to upload an image on to Wikimedia Commons, the image licensing terms are fairly strict and clear; either it has to be out of copyright (i.e. its copyright term is verifiably over) or it has to be licensed CC BY SA, GFDL or Public Domain. So, in short, the concept of fair use/ fair dealing is inapplicable to Wikimedia Commons and doesn't help there in any way.

English Wikipedia allows for non-Wikimedia Commons images to be used in articles under fair use/ fair dealing, so that is an option that is option that is open to you as well when working there. Furthermore, all Indic language Wikipedias can also set a similar policy (i.e. allow for image use on the language Wikipedia through fair dealing) - so that is something that you and others might want to consider - I don't know what the current policies across Indic language Wikipedias are. This is one way to bypass both (a) the copyright policies set by Wikimedia Commons and (b) the difficulty in establishing copyright provenance in images of Indian religious iconography.

Fair dealing provisions in India are quite wide, and would allow you to use a wide set of commonly available images for illustrative purposes only - though you could seek specialised legal help if you want full clarity.

Cheers, Achal

On Wednesday 11 May 2011 0902 AM, Mahitgar from Marathi Wikipedia wrote Dear All, Thanks for beginning discussion on this important topic,Pandarpur and God Viththal is very old and very central to Marathi and Maharashtra culture, I still remember few years back I failed to upload an image of God Vitthala of Pandharpur on commons, subsequently some one succeeded to upload an image under proper license.

While it is true that we need to believe in people, I have very closely observed quite a few people selecting some license for the sake of it or just to retain the image. While it is true that now that Vithathal image is there on wikipedia pages,still I am not sure how far legal it is ?

while god is one or many, for Indian Legal system idols in temples are treated as person and those are public places but not necessarily in public domain per say, many temples across India you will notice having notice boards which strictly prohibit taking a photo graph of the idol and temple; I dont know why this system exist in the temple but when it is there we are supposed to comply the law.

Why we need to be concerned ?

So an image coming without permission from temple authority is anyway illegal.What we need to understand is not that we are concerned about copy right for the sake of it, we ( commons/wikipedia) are concerned of the issue because we just do not want to do a collection of information and knowledge, but we share, and we do not want just share through wikipedia site but we want wikipedias to be a vehicle of knowledge sharing where other medias of communication can come forward to take this info and knowledge to masses. When we share info knowledge with other media people, they will do so only if they are assured that material available at wikipedias is legal enough.

There is total lack of awareness , concern and sensitivity and above all Law is a complex subject. Given that, the funny thing is you go to a person with a request to make otherwise an unimportant thing copy right free he may not co-operate ask you thousand frustrating questions, but the same fellow you may find,floating copy-right of others happily every now and then


At Wikipedia for many Indians, it is there first time in life time that some one is asking them about copy right, they are simply surprised in disbelief and usually they are so passionate about their subject at their hand at least until they receive several requests/warnings they happily tend to ignore such communications .

And why not so ? just few years back,to write copyright related help pages (on marathi wikipedia), I thought to procure few Copyright related books from the market, In Pune I went from shop to shop what I could get just a bare act copy.Only one shop was carrying book with detail commentary and the price he told me for the same was just Rs 12000!.Then at least for few months I tried to get an appointment with a law college principal and simply all that effort turned out to be futile without getting an appointment ever.

Servers are in USA! So can I bypass the Indian laws ? Again I see a huge number of people using fair use clause for uploading images on Wikipedia, and that too under provisions of non-Indian laws ! Whether servers are in USA and some thing is legal under their law suffice the requirements of Indian Laws ? When a kite is floating from Indian soil to out of India border or a kite is floating in Indian sky from out side India,is it not an Indian law, at least to all Indian subjects, is supposed to get applied ?

Accepted that intellectual property acts in most countries are similar now a days but those simply can not be the same because laws are subject to final definition by supreme judiciary of each country independently.

How fair is the fair use under Indian Laws?

While I dont have a detail commentary of Indian Copy right law , what I read until now is bare copyright law .My understanding is while Indian Copy Right act has provisions of fair dealing but those concessions are largely for educational and restricted community performances. While Wikipedia has educational component and non profit but we are not a website that restricts other making profit from the info available on it so in perfect sense we are not supposed to get concessions on account of fair use/deal under present Indian Copy right act; unless owner of the copyright himself permits such usage.

Similar to commons,unlike to english wikipedia, I have kept a proposal on Marathi Wikipedia to bar usage of fair use provision since according to me we (wikipedia and indic wikipedians) are not supposed to benefit any concession under Indian Copyright fair use clause. We do lack enough legal expertise at mr-wiki community,so inputs on this issue from other indic wikipedians are most welcome ,imporant and will be valuable to us all.

Look forward to read more opinions on above issues and continued discussion of copyright subject on this forum

Thanks

Mahitgar from Marathi Wikipedia

लेख संख्या नियंत्रण आणि आशयघनता प्रस्ताव

संपादन

मराठी विकिपीडियावर आपण अनेकदा लेखसंख्या वि गुणवत्ता ही चर्चा केलेली आहे. आपल्यात या दोन्हीपैकी कोणता निकष जास्त महत्त्वाचा याबद्दल मतभेद असले तरीही दोन्ही महत्त्वाचे असल्याचे एकमत आहे.

  • साधारणतः ९०% लेखांमध्ये किमान एक परिच्छेदभर तरी लेखनाची गरज आहे.
  • ५% लेख एका वाक्यावर केवळ
  • २% काहीही न लिहिता नवनिर्मिती
  • २% भाषांतरांच्या प्रतीक्षेत अशी स्थिती असावी
  • लेखनाच्या बाबतीत फारच पिछाडीवर पडणे सयूक्तीक नाही या दृष्टीने मी माझा प्रस्ताव आहे की केवळ मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या संदर्भाने जी लेख निर्मीती कोणत्याही लेखना शिवाय होते ती होऊ द्यावी केवळ वर्गीकरण आणि इंग्रजी विकिशी आंतर विकिदूवा हे आवश्यक ठरवावेत.
  • विश्वकोशीय आणि शुद्ध लेखनात बसणारी नवशिक्यांकडून होणारी पहिली लेख निर्मिती एका दिवसात अधिकतम २० लेख ही बंधनातून वगळावी २० लेखांची निर्मितीपेक्षा अधिक झाल्यास नवलेख निर्मितीची क्षमता ७२ तासाकरिता आपोआप बंद होण्याची व ७२ तासा नंतर आपोआप सुरू होण्याची विकिसॉफ्टवेअर प्रणालीतच व्यवस्था असावी या प्रस्तावास सहमती नंतर कौलास ठेऊन नंतर तशी विनंती बगझीलावर करावी,
  • प्रचालकांनीपण वरील नियमांचे पालन करावे पण अपवादात्मक परिस्थितींच्या दृष्टीने (जसे प्रताधिकारमुक्त साहीत्याची मोठ्याप्रमाणावर उपलब्धता, विद्द्यालयील महाविद्द्यालयीन कार्यशाळेच्या द्वारे मोठ्या प्रमाणे लेखन होणार असल्याबद्दल खात्रीशीर विनंती आल्यास इत्यादी) दृष्टीने प्रचालंकाना या बंधनातून मुक्त ठेवावे.
  • इतर सर्व लेख नवनिर्मितीकरिता किमान एक परिच्छेद लेखनाचा नियम आवश्यक संकेत म्हणून मराठी विकिपीडियाने या पुढे स्विकारण्याची गरज आहे असे माझे मत आहे.

माहितगार २२:४४, ७ जानेवारी २०११ (UTC)

माहितगार यांच्या वरील मताशी सहमत. वाढदिवसाच्या माहोलनंतर गेल्या २-४ दिवसांत अनेक नवे सदस्य दाखल होताना दिसताहेत. त्यांना शिकवण्याचे,शिस्तीत बसवण्याचे काम होण्याआधी लेखनिर्मितीत प्रोत्साहन देणे येथे लेखन कसे करावे याच्या वाटा दाखवणे गरजेचे आहे. आशयघनता आली नाही तर नुसती लेखपानांची संख्या वाढवून उपयोग नाही, असे वाटते. - Manoj ०३:०६, १७ जानेवारी २०११ (UTC)

पुन्हा एकदा दर्जा!!!!!

संपादन

नमस्कार मंडळी!

गेल्या दोनेक दिवसांत बरेच नवीन आणि कोरे (एकही वाक्य नाही !) लेख बनवल्याचे दिसते. मराठी विकिपीडियावर आधीच वाचनीय आशयाच्या नावाने बोंब आहे, त्यात अश्या कोर्याख लेखांची भर घालण्याचे प्रयोजन कळले नाही. नवे लेख बनवताना त्यात कृपया दोन-तीन वाचनीय, माहितीपूर्ण वाक्ये लिहावीत. नाहीतर आपण लिहीत असलेल्या माहितीचे, करत असलेल्या श्रमाची किंमत शून्य ठरते, हे ध्यानात घ्यावे.

मराठी विकिपीडियाची लेखसंख्येबाबत कुणाशी स्पर्धा आहे काय ? असल्यास, असली स्पर्धा करण्यात काहीही हशील नाही, कारण पन्नास-साठ भाषांतले विकिपीडिया दर्जा आणि संख्या या दोन्ही पौलूंत मराठीच्या पुढे आहेत. सगळ्यांना गाठत ऊर धपापून घेण्यापेक्षा, मराठी विकिपीडियाने अगोदर स्वतःशी स्पर्धा करत स्वतःचा दर्जा अधिकाधिक उंचावावा, "मराठी भाषकांच्या कामी पडणारा, समृद्ध आणि आशयघन ज्ञानकोश' असा लौकीक कमवावा. अन्यथा मराठी विकिपीडिया 'फुसक्या लेखांचा ढिगारा' म्हणून कुख्यात होईल, यात शंका नाही. :)

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १२:०८, ३ मे २०११ (UTC)

मी काय करू शकतो?

संपादन

मराठी विकिपीडियावरील दर्जा वाढवण्यासाठी अनेक उपाय आहेत आणि ते वेळोवेळी आपल्यातील जुन्या मंडळींनी ध्यानात आणूनही दिलेले आहेत. त्यात एक भर --

विशेष:छोटी पाने येथे सगळ्यात छोट्या पानांची यादी आहे. पहिल्या (शेवटच्या?) ५,००० लेखांचा आकार बघता संकल्पने वर म्हणल्याची खात्री पटेल. आपले ५,००० लेख २३४० बाइट पेक्षा कमी आकाराचे आहेत!! म्हणजे नुसतेच शीर्षक आणि असल्यास एखादा वर्ग आणि/किंवा इंग्लिश आंतरविकी दुवा. यातील बरेच लेख टाइमपास म्हणून तयार केले गेले असल्याचीही शक्यता आहे कारण यात काहीही मजकूर तर नाहीच आणि त्याला किंवा तेथून एकही दुवा नाही.

मी गेले अनेक महिने या यादीवर लक्ष केन्द्रित करुन हे लेख मोठे करण्याचा प्रयत्न करीत आहे पण छोट्याछोट्या नवीन लेखांचा वेग माझ्या आवाक्याबाहेर चाललेला आहे. तरी आपल्यापैकी निदान काही संपादकांनी तरी येथे लक्ष घालावे. जरी लेखाबद्दल काहीही माहिती नसेल तरी येथली बहुसंख्य लोकांना वर्गवारी आणि आंतरविकी दुवे घालण्याइतके नक्कीच ज्ञान असेल ही माझी खात्री आहे. आणि अगदीच तरंगी शीर्षक असेल तर गूगलमहाराज आहेतच मदतीला.

तरी लेखसंख्या वाढवण्याकडेच लक्ष देण्यापेक्षा थोडेसे माहिती वाढवण्याकडेही लक्ष देऊ या...

अभय नातू १२:३१, ३ मे २०११ (UTC)


Unless we work out official policy it can not be included in appropriate help and guidance pages templates and messages that is why I did put up a proposal up there , still I feel all the people need to consider it seriously माहितगार २०:४५, ३ मे २०११ (UTC)

Your proposal has my support, however, such things can not be "legislated" or enforced unless and until we have a buy-off from users. This being an open forum for crowd-sourced content, no amount of rules and regulations will stop people from doing what they're doing. Polite (and sometimes a bit stern) requests will hopefully make our editors realize the point we're trying to make.

अभय नातू ००:२०, ४ मे २०११ (UTC)

actually to solve this problem of दर्जा vs लेखसंख्या i have an idea. But i m not sure this idea will definetly work as expected but atleast it will help to simplify the problem.

Ashish Gaikwad ११:४९, १० मे २०११ (UTC)

अॅस,र्यG,र्हa

संपादन

अॅ, ऍ, चौकोनी आयत, इ.

संपादन

मराठी विकिपीडियावर देवनागरीतून लिहिताना अॅ चार-पाच प्रकारे लिहिता येतो. अॅ, ऍ, अॅरिस्टोटलच्या चर्चापानावर उद्धृत केलेला चौकोनी आयत, बराहात लिहिलेला अॅ आणि "नवीन" शैलीतील अॅ (जो मला या संगणकावर काढता येत नाही पण इतर संगणकावर काढता येतो).

या सगळ्यांपैकी एकच मूळाक्षर प्रमाणित असावे. त्यासाठी युनिकोडवरील कोणत्या कोडचा वापर करावा याबद्दल चावडीवर चर्चा करावी. मला आत्तातरी खालील कोड आठवत आहेत --

  • 0904
  • 0972 - हा खास मराठीसाठी असल्याचा उल्लेख आहे आणि हाच जास्त सयुक्तिक वाटतो.
  • 090D
  • 090E

यातील सगळीच अक्षरे सगळ्याच संगणकांवर, फाँटांत किंवा ऑपरेटिंग सिस्टममध्ये नीट दिसतीलच असे नाही, तरी मला दिसते हेच बरोबर हा खाक्या सोडून प्रमाणित अक्षर वापरावे.

जे अॅ बद्दल, तेच काही अंशी ऑ बद्दल.

हा विषय धसाला लागेपर्यंत कोणतेही बदल करू नयेत, विशेषतः लेखांचे स्थानांतर करू नये, ही विनंती.

अभय नातू १९:५६, १० मे २०११ (UTC)

यावरील सदस्य आशिष गायकवाड, अभय नातू आणि माहितगार यांच्यातील संदेश

संपादन
अलिकडे युनिकोड हा लेख नवीन सदस्य Ashish Gaikwad यांनी अद्दयावत केला. त्यांच्या संपादनांवरून ते या विषयातील जाणते आहेत हे लक्षात येते. त्यांनी अॅk,र्यद,र्ह) चे सध्याचे मराठी विकिपीडियावरील लेखन चुकीचे होत असल्याचे नोंदवले आहे. मला या क्षेत्रातील अधीक ज्ञान नसल्यामुळे नेमका फरक लक्षात आला नाही पण कुणी जाणकार व्यक्ति तसे नोंदवते आहे म्हणजे दखल घेण्याची आवश्यकता आहे असे वाटते माहितगार ०५:४४, ६ एप्रिल २०११ (UTC)

गायकवाडांनी त्यांचे मत कोठे नोंदवले आहे? युनिकोड लेखचर्चेत किंवा चावडीवर सापडले नाही. अॅय,र्य ,र्हत हे शब्द "चुकीचे" लिहिले जात असण्यासाठी लिहिणार्यां ची संगणकप्रणाली, फाँट तसेच या दोन्हीनी युनिकोडशी कसे जुळवून घेतले आहे ही कारणे आहेत. लिनक्स/विन एक्सपी वर लिहिलेले अॅ अक्षर विन सेव्हेनवर नीट दिसत नाही आणि उलटेही खरे आहे. नेमके युनिकोड कोणते बरोबर याचे स्पष्टीकरण मिळावे.

अभय नातू १२:१३, ६ एप्रिल २०११ (UTC)

ओ सॉरी, मला वाटले तुम्ही लेख तपासाल असेल, Ashishरावांनी सरळ लेखातच कॉमेंट टाकली आहे.मला वाटते इतर सिसॉप्सपैकी सुद्धा कुणाचे लेखातील बदलांकडे लक्ष गेलेले दिसत नाही. माहितगार १९:०९, ६ एप्रिल २०११ (UTC)

नमस्कार , खरेतर हे पान आणि मराठी wiki core team/group मधील सदस्यांना शोधायला माझा खूप वेळ गेला. so according to me अभय नातू and Mahitgar are core team members. i have checked list of admins for marathi ( total 9 ). as mentioned above ॲ | ऱ्ह | ऱ्य these letters and some other issues are there in mr:wiki = मराठी विकिपीडिया . i can help you in these issues, to know about me you can visit

http://aag2011.blogspot.com also http://facebook.com/ashish.gaikwad007 ...

please contact me after 12 मे २०११ कारण १२ तारखेला माझी CETची परीक्ष आहे. Ashish Gaikwad ११:१७, १० मे २०११ (UTC)

नमस्कार , अभय नातू | हा विषय तुमच्या चर्चा या पानावर आहे. कृपया तेथे भेट द्या. मुळात अॅत हे अक्षर चुकीचे आहे. ते ॲ असे पाहिजे. कृपया पुढिल चर्चा कोणत्यातरी एकाच पानावर करा. ! धन्यवाद !!

Ashish Gaikwad ११:२७, १० मे २०११ (UTC)

नमस्कार , खरेतर हे पान आणि मराठी wiki core team/group मधील सदस्यांना शोधायला माझा खूप वेळ गेला. so according to me अभय नातू and Mahitgar are core team members. i have checked list of admins for marathi ( total 9 ). as mentioned above ॲ | ऱ्ह | ऱ्य these letters and some other issues are there in mr:wiki = मराठी विकिपीडिया . i can help you in these issues, to know about me you can visit

http://aag2011.blogspot.com also http://facebook.com/ashish.gaikwad007 ...

please contact me after 12 मे २०११ कारण १२ तारखेला माझी CETची परीक्ष आहे. Ashish Gaikwad ११:१७, १० मे २०११ (UTC)

माहितगार,
हे संदेश येथे डकवल्याबद्दल धन्यवाद.
येथे प्रमाण युनिकोड अक्षरांबद्दल सयुक्तिक चर्चा व्हावी ही अपेक्षा आहे.
अभय नातू २०:५८, १० मे २०११ (UTC)

अॅस,र्यू,र्हर इत्यादी, चर्चा कशी करणार?

संपादन

>मला दिसते हेच बरोबर हा खाक्या सोडून प्रमाणित अक्षर वापरावे. येथे प्रमाण युनिकोड अक्षरांबद्दल सयुक्तिक चर्चा व्हावी ही अपेक्षा आहे.<

चर्चा कशी करणार? मला जसे दिसते आहे जर तसे इतरांना दिसत नसेल तर युनिकोड प्रमाणित अक्षर कोणते हे कसे समजावे? मी एखादे अक्षर टंकित केले आणि ते दुसर्यारला वेगळेच दिसले तर चर्चा कशी होईल? आता गुळगुळीत झालेल्या ठकीसारखे आयताकृती अक्षर हेच मराठी अक्षर आहे असा आग्रह जर एखाद्याने धरला तर त्याची लेखणी कोण थोपवणार? एकच मार्ग आहे. प्रत्यक्ष अक्षर न लिहिता अक्षराच्या रूपाचे वर्णन करणे. ते मी आता करीत आहे. इंग्रजीतल्या cat सारख्या शब्दांत येणार्‍या a चा जो उच्चार सामान्य इंग्रजी शब्दकोशांत ă असा, किंवा IPA पद्धतीत æ असा दाखवतात त्या उच्चारासाठी मराठी बाळबोध लिपीत डोक्यावर आडवा चंद्र असलेले अ हे अक्षर लिहावे असा आदेश, कंपनी सरकारच्या लष्कराचे पुण्यातील तत्कालीन अधिकारी कॅप्टन थॉमस कॅन्डी यांनी, त्यांच्या कारकीर्दीत काढला, आणि त्याची तंतोतंत अंमलबजावणी होईल याच्याकडे लक्ष पुरवले. दुर्दैवाने (१)हिंदी प्रांतांत असला अधिकारी नव्हता (२) संस्कृतमधून घेतलेला अर्धअनुनासिक उच्चार दाखवणारा चंद्रबिंदू हिंदीने आधीच स्वीकारलेला होता आणि (३) हिंदीत cat चा उच्चार केट किंवा कैट आणि hall चा उच्चार होल होत असल्याने त्यांना या लिपीसुधारणेची गरज भासली नाही.

तोच प्रकार ह आणि य यांच्याआधी (जोडाक्षराचा मृदु उच्चार व्हावा म्हणून) जोडायला आवश्यक अशा आडव्या चंद्रकोरीच्या आकाराचा अर्ध्या र चा. हाही हिंदीने घेतला नाही. कारण तसले जोडाक्षर हिंदी भाषेत नाही. (हिंदीत ह ला, य-र-ल-व-म-ण ही अक्षरे जोडता येतात, पण उलट करता येत नाही. म्हशीतला म्ह, आणि ण्ह, ल्ह असणारे शब्द हिंदीत नाहीत. (न्ह आहे!)

म्हणूनच युनिकोडमध्ये तथाकथित देवनागरी लिपी भरताना, मराठीची काडीमात्र माहिती ज्यांना नाही अशा युनिकोड तज्ज्ञां नी अगोदरच्या आवृत्त्यांत हा æ व ǒ, आणि ही ’र‘ची जोडाक्षरे लिहायची सोय केली नव्हती. आणि अगदी याच कारणासाठी त्यांनी आजकालपर्यंत मराठी लिहायला आवश्यक त्या ख, श , पाऊण य, श्रतला श आणि ल या अक्षरांसाठी कोड ठेवलेले नव्हते. आता कोड आहे असे ऐकून आहे, नक्की माहीत नाही.

महाराष्ट्र सरकारने ह्या हिंदी धाटणीच्या अक्षरांना आधी दिलेली मान्यता, आता काढून घेतली आहे. तरीसुद्धा ही अक्षरे विकीवर उमटवता येत नाहीत. त्यामुळे युनिकोड फक्त हिंदीच्या देवनागरी लिपीसाठी आहे, ते अजूनतरी मराठीच्या बाळबोध लिपीसाठी नाही, असे माझे दृढ मत आहे. ...J ०९:५८, ११ मे २०११ (UTC)


पुन्हा एकदा त्याच चर्चेसाठी नमस्कार !!
" ... त्यामुळे युनिकोड फक्त हिंदीच्या देवनागरी लिपीसाठी आहे, ते अजूनतरी मराठीच्या बाळबोध लिपीसाठी नाही, असे माझे दृढ मत आहे ... " हे तुमचे दृढ मत अयोग्य आहे . युनिकोडच्या ५व्या आवृत्ती पर्यंत तुमचे मत योग्य होते, परंतु युनिकोडच्या ५.१ आवृत्तीत मोठ्याप्रमाणात बदल केल्यामुळे " मराठी " मधून उत्तम लिखान करता येते . तुम्ही युनिकोडच्या ६व्या आवृत्तीची पुस्तके वाचली तर तुमचे गैरसमज लगेच दूर होतील.
Ashish Gaikwad १०:११, ११ मे २०११ (UTC)
चर्चा करताना आपला मुद्दा व इतरांचे लिखाण हे वेगवेगळे दिसतील असे लिहावे म्हणजे संवादात सुसूत्रता येईल व विनाकारण गैरसमज होणार नाहीत.
आशिष (आणि इतरही मंडळी), तुमचे मत अयोग्य आहे, तुम्हाला कळत नाही, इ. विधाने निरर्थक कटुता निर्माण करतात. मत का अयोग्य आहे याची कारणे दिल्याशिवाय असे लिहू नये. पुस्तके वाचल्यावर नक्की काय कळेल? येथे मुद्द्याला सुसंगत अशा दोन-चार ओळी लिहिल्या तर त्याची मोठी मदत होईल. सदस्य जे किंवा इतर कोणाच्याही मुद्द्यांचे मंडन/खंडन करण्यास विरोध नाही पण नुसतीच assertions करुन चर्चा पुढे जात नाही यावर कोणाचेच दुमत नसावे.
तरी सर्व मंडळी सुज्ञच आहात. तार्किक चर्चेतून मतभेद दूर होतील आणि येथील लिपीचे प्रमाणीकरण होण्यास मदत होईल ही आशा/अपेक्षा.
अभय नातू १४:२१, ११ मे २०११ (UTC)
येथे होणार्या चर्चेतून लिपीचे प्रमाणीकरण होण्यास मदत होईल ही अपेक्षा रास्त असली तरी प्रत्येकाचे मत हे वेगळेच असणार यात शंका नाही. म्हणून येथील मतांचे जाणकार भाषातज्ञांकडून लवकरात लवकर सुसूत्रीकरण करवून घेऊन विकीपिडियाने यावर उपाय योजल्यास सदस्यांमध्ये संभाव्य कटुता निर्माण होणार नाहि.
संतोष दहिवळ १४:५४, ११ मे २०११ (UTC)
येथील सदस्यांच्या ज्ञानाचा उपयोग करुन घेउन एकवाक्यता करुन घेणे हा या प्रक्रियेतील पहिला टप्पा आहे. जरी सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत तरी प्रश्न नेमके काय आहेत आणि त्यातील कोणत्या प्रश्नांवर तज्ञांची मदत जरुरी आहे हे स्पष्ट झाल्यास प्रश्न तज्ञांपुढे मांडण्यात आणि त्यांच्याकडून नेमकी माहिती काढून घेण्यास मदत होईल.
अभय नातू १४:५९, ११ मे २०११ (UTC)

"युनिकोड फक्त हिंदीच्या देवनागरी लिपीसाठी आहे, ते मराठीच्या बाळबोध लिपीसाठी नाही असे तुमचे दृढ मत युनिकोडच्या ५व्या आवृत्ती पर्यंत योग्य होते" हे वाचून बरे वाटले. मी तरी दुसरे काय म्हटले होते? मी वर म्हटले होते की "युनिकोडवाल्यांनी अगदी आजकालपर्यंत, मराठी लिहायला आवश्यक त्या अक्षरांसाठी कोड ठेवलेले नव्हते. आता ठेवले आहे असे ऐकून आहे, नक्की माहीत नाही." माझे दृढ मत उचलून घेऊन योग्य ठरवल्याबद्दल आभारी आहे....J १८:२३, ११ मे २०११ (UTC)

केवळ वर्णनाने भागणार नाही जरूर तेथे पेंटब्रशच्या सहाय्याने चित्रे काढून नमूद करावे लागेल तसेच यूनिकोड क्रमांकन नमूद करावे लागतील तरच आणि मुद्दे तर्कशुद्ध आणि स्प्ष्ट मांडलेतरच सॉफ्टवेअर डेव्हेलपर्सना समजतील प्रणालीत सुधारणा होऊ शकतील. ज्याप्रमाणे आंधळ्यांच्या पाठीवर लंगडा बसला की लंगडा वाट दाखवितो व आंधळा त्याला पाठुंगळीस घेऊन वाटचाल करतो त्याप्रमाणे संगणकतज्ज्ञ व भाषातज्ज्ञ यांच्यात समन्वय हवा.कुणीही कुणालाही कमी लेखण्याचे टाळावे. माहितगार ०५:२७, १२ मे २०११ (UTC)

परिभाषिक शब्द आणि प्रतिशब्द संबंधी सूचना

संपादन

अ) परिभाषिक शब्द आणि प्रतिशब्द संबंधी सूचना
१) आपण मराठी विकीपेडियावर परिभाषिक शब्दांसाठी पाने तयार केली पाहिजेत. आणि संबंधित लेखांखाली "हे सुद्धा पाहा" ह्या विभागाखाली संबंधित परिभाषिक शब्दांचे पान जोडावे. उदा. परिभाषिक पान - गणितातील परिभाषिक शब्दे, आणि गणित ह्या लेखामध्ये "गणितातील परिभाषिक शब्दे" ह्या पानाचा दुवा "हे सुद्धा पाहा" ह्या मथळ्याखाली टाकावे. म्ह्णजे एखाद्या अननुभवी/इंग्लिशची जास्त सवय (आजकाल बरेचसे शिक्षण इंग्लिश मधून होते, त्यामूळे बऱ्याच इंग्लिशमधल्या परिभाषिक शब्दांची मराठी वाचकास सवय असते) असलेला मराठी वाचकास उपयोगी पडेल. सुरवातीलाच त्याची भंबेरी उडणार नाही.
२) गरज पडल्यास त्याकरता परिभाषिक शब्दांचे दालन बनवावे.
३) मदत आणि मार्गदर्शन ह्या दालनात परिभाषिक शब्दांच्या दालनाचा दुवा जोडावा. जेणेकरून नवीन संपादकांना नवीन लेख तयार करताना मराठी प्रतिशब्दाची गरज पडली तर ते ह्या दालनामार्फत संदर्भ घेउ शकतील.
४) काहीवेळा मराठीत प्रतिशब्द नसतात त्यासाठी ते तयार करावे लागतात. परंतु ते तयार करताना ते असंबद्ध होउ नये याची काळजी घ्यावी लागते. त्यासाठी एखादा प्रकल्प किंवा पान बनवता येइल का? जेथे प्रस्तावित प्रतिशब्द आणि त्याची व्युत्पत्ती किंवा स्पष्टीकरण (justification) दिले जावे आणि विकी सदस्यांची चर्चा करून दे वापरले जाईल, अशा पद्धतीचे काही करता येईल का? इंग्लिश मध्ये Radian ह शब्द Radius वरून Radi(us) + -an ह्या पद्धतीने तयार झाला आहे. पहा विक्शनरी दुवा.
४.१) बऱ्याचदा नवे शब्द हे संस्कृत मधल्या धातू आणि उपसर्गा पासून तयार केले जाते. त्या संदर्भात धातू, उपसर्ग (prefix and postfix) आणि त्यांचे अर्थ असे पान तयार करता येइल का? उदा. गणित ह शब्द गण् ह्या धातू पासून बनला आहे. त्वरण (acceleration) हा शब्द त्वरा(घाई) ह्या शब्दापासून साधित आहे. अशी काही यादी मिळल्यास नवीन होतकरू संपादकांस सोयीचे जाईल.
५) त्याचप्रमाणे एखादा नवीन शास्त्रासंबंधी लेख लिहीला की लगेच मराठी विक्शनरी वर संबंधित परिभाषिक शब्द तपासावे आणि असे शब्द नसल्यास ते तेथे add करावे.

आपल्या सूचना क्र अ १ ,२,३ नेमकेपणाने विकिपीडियाच्या परिघात बसत नाहीत,दीर्घ काळाकरिता विक्शनरी हा सहप्रकल्प आहेच पण मराठी विकिपीडियाचा विकास होण्याची शक्यता असलेला ०.००१ टक्के शक्यतेवर सुद्धा प्रयोग करून पहाण्यास मी तरी पाठींबा देतो "परिभाषिक शब्दांसाठी पाने/दालने" करावयाची असतील तर प्रयोग करून पहावा केव्हा कोणत्या प्रयोगास यश येईल ते सांगता येत नाही त्या दृष्टीने मीतरी या सूचने बद्दल फ्लेक्झीबल आहे.
अर्थात तांत्रीक/संगणकीय पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींनी यात अधीक रस दाखवल्यास कोणत्याही शब्दावर राईट क्लिक केल्यास विक्शनरीवरून शब्दाचा अर्थ देण्याची व्यवस्था करता येऊ शकते.पण विक्शनरीवर काम करण्याकरिता स्वयंसेवक कुठून आणायचे याच उत्तर माझ्याकडेही नाही त्यामुळेच मी तुमच्या सुचनेस हरकत घेतली नाही.
सूचना क्रमांक ४ च्या निमीत्ताने आवश्यक पाने जरूर बनवावीत.
आपल्या वरील सूचनांचा सारखे विचार मागे माझ्या मनात आले असता भाषांतर प्रकल्पांतर्गत मी काही साचे आणि पानांची निर्मिती मागे केलेली आहे ती पाने आपल्या सवडीने पहावीत.

माहितगार १९:२२, १८ मे २०११ (UTC)

माहितगार, तुमची हरकत नाही हे बघून आनंद वाटला. तरिही माझा मुद्दा मी अधिक स्पष्ट करतो. कबूल आहे की सूचना क्र अ १ ,२,३ विकिपीडियाच्या परिघात बसत नाही. परंतु मराठी भाषा अनेक परिभाषिक शब्दांसाठी अजून बाल्यावस्थेत आहे. तिचा अजून पुरेपुर विकास झाला नाहीये. जरा हिंदी कडे बघितल्यावर हे लक्षात येते की त्यांनी ruthless पणे नवे परिभाषिक शब्द तयार केले. त्याचप्रमाणे आपल्या व्यवहारात वापरले. मराठीचे तसे नाही, परंतु विकिपीडिया आणि काही छोट्या साइट्स मुळे नाचे एक भंडार खुले झाले आहे. त्यातल्यात्यात विकिपीडियाचे योगदान मोठेच आहे. (इतर साइट्स छोट्या प्रमाणावर आणि विशिष्ट शाखेसंदर्भातच माहिती पुरवतात...) अशावेळी एक अपवाद म्हणून अशी पाने बनवायला हरक्त नाही. केवळ परिघात बसत नाही म्हणून इतर पर्यायांचा विचार केला तर आपल्या पुढे एक पर्याय आहे तो म्हण्जे नवीन website बनविणे जिथे सगळ्या परिभाषिक शब्दांची यादी असेल, आनि असे खटाटोप करणे वेळ, खर्च इ. संदर्भात मूळीच परवडणारे नाही. विक्शनरी संदर्भात आपल्या सूचनेची मी सहमत आहे. पण ते generalize होइपर्यंत आणि विक्शनरीवर असे परिभाषिक शब्द वाढल्यावर विकिपीडियावर परिभाषिक शब्दांचे पान काढून टाकणे, आणि विक्शनरी वरील परिभाषिक शब्दांचे दुवे helpdesk वर जोडणे अश्या कृती करता येतील. त्याकरता मी सूचना क्र ५ केली आहे, नवे लेख बनविल्यावर जर ते परिभाषिक शब्दांची related असतील तर लगेच विक्शनरी वर अश्या शब्दांची भर घालावी, त्यासाठी फार वेळ लागत नाही...

अनिरुद्ध परांजपे ०३:२६, १९ मे २०११ (UTC)

आ) चित्रे
१) बहुधा मराठी विकीपेडिया वरील चित्रे, विषेशत: नकाशे, आकृत्या ही इंग्लिश मजकूरातील असतात. ती डाउनलोड करून त्यात बदल करून म्हणजेच इंग्लिश मजकूराच्या ठिकाणी मराठी मजकूर टाकण्यास काय हरकत आहे. असे काम सुरू करायला काय हरकत आहे? मला म्ह्णायचेय की असे काम सुरू करता येईल का? त्या साठी एखादा प्रकल्प सुरू करता येईल का?

विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे या प्रकल्पा अंतर्गतच वेगळे पान बनवता आले तर पहावे असे वाटते.माहितगार ०५:५४, १९ मे २०११ (UTC)

इ) मराठी व्यक्ती
१) मुळातच बऱ्याच मराठी गोष्टींचे digitalization झालेले नाहीये. विषेशत: मराठी व्यक्ती, चित्रपट, पुस्तके इ. त्यामुळे आपल्याला बऱ्याच लेखांचा माहिती अभावी विस्तार करता येत नाही. ह्यासंदर्भात मासिके, वृत्तपत्रे ह्यातील संदर्भ (citation) वापरायला काय हरकत आहे? असे काम करण्यास कोणी स्वयंसेवक होतील का?

नेमके लक्षात नाही आले माहितगार ०५:५४, १९ मे २०११ (UTC)

ई) शास्त्रीय लेख
१) ज्ञानशाखांचा विस्तार खूपच मोठा असल्याने, प्रत्येक जण आपापल्या ओळखीतले जे संबंधीत ज्ञानशाखेत प्रवीण आहेत त्यांना संबंधीत लेख लिहिण्यास प्रवृत्त करू शकतात किंवा त्यांच्या कडून एखादा लेख बनवून घेउन विकीपेडिया वर टाकू शकतात. प्रत्येक महिन्यामागे २ लेख झाले तरी खूप होईल.

ह्या करिता फिल्डवर्कची आवश्यकता आहे मराठी विकिपीडियाचे सध्याचे बहूतांश संपादक नौकरी कुटूंब वाली मंडळी आहेत.महाविद्यालयीन विद्द्यार्थी आणि शिक्षक प्राध्यापकांची संख्या वाढल्यास हे शक्य होईल माहितगार ०५:५४, १९ मे २०११ (UTC)

उ) गणित विकीकोड
१) इंग्लिश विकीपेडिया वर गणितासंबंधित कोड्स आहेत. आणि ते कोड्स आतमध्ये define केलेले चले घेउन त्यांचे चित्रात रुपांतर करते, तसेच संबंधित गणिती चिन्हे घेउन ते चित्र एकसंध बनविते. त्यामुळे गणिती सूत्रांना चांगला appearance मिळतो. परंतु ह्याचा एक मुख्य तोटा असा आहे की ते इंग्लिश मूळाक्षरे सोडून इतर मूळाक्षरे घेत नाहीत. आपण त्यासाठी विकीपेडीया मुख्यालयात/मुख्य सद्स्यांकडे विनंती करू शकतो का? त्यासाठी प्रथम आपणांस चित्रे, त्यात येउ शकणारा मजकूर इ. चे design करावे लागेल... तर ते करता येईल का? शक्यतो गणितातील चले इ सगळे मातृभाषेतून मांडण्याचा प्रयत्न व्हावा...

Aniruddha22Paranjpye १३:५२, १८ मे २०११ (UTC)

>>उ) गणित विकीकोड १

आपल्या या प्रश्नास मराठी विकिपीडिया सदस्य किती तांत्रीक सहाय्य पुरवू शकतील या बद्दल साशंक आहे. इंग्रजी विकिपीडियाची तांत्रीक प्रश्नाकरिता चावडी आहे तेथे प्रश्न विचारून पहावा इतर भाषी विकिपीडियातून असे काही आधीच उपलब्ध असण्याची शक्यता नाकाअरता येत नाही. आणि इंग्रजी विकिपीडिया चावडीवरून मिळालेल्या माहितीच्या आधारावर आपल्याला जसा विकि सॉफ्टवेअर बदल बनवून हवा आहे त्याची विनंती बगझीला येथे करता येते.माहितगार

श्रेयस तलपडे असे शीर्षक बदलावे काय ?

संपादन

गेले काही महिने, मी या लेखाचा विषय असलेल्या अभिनेत्याच्या तोंडून विविध वाहिन्यांवर बोलताना त्याचे स्वतःचे नाव "श्रेयस तलपडे" असे ऐकत आहे. तसे असेल, आणि त्या अभिनेत्याने "श्रेयस तलपडे" हेच नाव धारण केले असेल, तर या लेखाचे नाव बदलून श्रेयस तलपडे असे लिहावे लागेल. कुणाला काही खात्रीशीर माहिती आहे का ?

संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:५९, २० मे २०११ (UTC)
श्रेयस हा त्याचे आडनाव जर 'तलपडे' असे सांगत असेल तर (मी हिंदी वाहिनी संदर्भात बोलत आहे) तर ते फारसे योग्य नाही. हिंदी मध्ये "ळ" हे अक्षरच नाही म्हणून आपण ह्यातून काही मार्ग काढू शकतो का? आपण हिंदी बोलताना किंवा लिहिताना "ळ" असेच वापरले तर काय होईल? भाषा तज्ञांचे या बाबतीत काय मत आहे? 'लोकमान्य तिलक' हे लहानपणा पासून वाचताना मला फार त्रास होतो. जी गोष्ट हिंदी ची तीच इंग्रजीची. तेथे पण "ळ" नाहीच. मग "ळ" आणि "ल" मधला फरक कसा ओळखायचा? काही वर्षांपूर्वी एका वर्तमानपत्रात मी या विषयावर लेख लिहिला होता. या बाबतीत आपण काही करू शकतो का? आपण "L" च्या मध्ये एक टिंब दिला अमी त्याचा "ळ" म्हणून वापर करायचा ठरवला तर चालणार नाही का? तसेच "श" आणि "ष" हा फरक इतर भाषात कसा दाखवायचा? "ण" साठी पण असे काही करता येईल काय? (माझे आडनाव 'कुलकर्णी' असल्याने मला हा प्रश्न जन्मापासूनच आहे !!!
मला असे वाटते की, आपली मराठी भाषा आणि संस्कृत भाषा या इतक्या अतोनात समृद्ध आहेत की जगातील कोणत्याही भाषेतील कोणतेही शब्द वा उच्चार आपल्याला या दोन भाषांमध्ये करता येतात (हे 'सामान्यतः' मी म्हणत आहे). पण इतर भाषांमध्ये जर अशी काही अक्षरे नसतील तर ते आणण्यासाठी आपण प्रयंत्न करू शकतो का? मला या विषयावर "चांगली चर्चा" करायला आवडेल.....
मंदार कुलकर्णी

हिंदी आणि मराठी

संपादन
हिंदी बोलताना आणि हिंदी चित्रपटांत काम करताना तो तलपडे असतो, मराठीत तळपदे. मराठीतली भक्ती बर्वे हिंदी-गुजराथीत भक्ति बर्वे असायची. कनिमोळी ही हिंदी-मराठीत कन्निमोझी किंवा कनिमोड़ी आहे. इंग्रजीत श्रेयस तळपदे हा श्रेयअॅ.ज़्‌ टॅल्पेऽड्‌ होणारच. ...J १८:१०, २० मे २०११ (UTC)
कळ्हिमोनिचा कझिमोनी हा फक्त इंग्रजीवरच विसंबलेल्या मराठी माध्यमांतल्या मंडळींनी केला आहे, तो त्या स्पेलिंगमधल्या झेडचा झ असा उच्चार करून. वास्तविक त्यांच्या पूर्वसूरींनी कळ्हघम या पक्षाच्या नावाच्या शब्दातल्या स्पेलिंगमध्ये झेड असतानाही त्याचा योग्य मराठी उच्चार लिहीलेला आहे. - Manoj ०६:०५, २१ मे २०११ (UTC)

[संपादन] मराठी उच्चार योग्य?

मराठी उच्चार योग्य आहे असे म्हणणे धार्ष्ट्याचे आहे. तमिऴमधल्या ऴ चा उच्चार मराठीत लिहिणे कठीण आहे. इंग्रजीत तर अशक्य आहे. केवळ त्याला पर्याय म्हणून इंग्रजीने zh असे लिहिले, तर काही चुकीचे नाही. जे अक्षर त्यांच्या लिपीत नाही त्यासाठी त्यांना काहीतरी लिहिणे भाग आहे. ऴ साठी λ लिहिले असते तरी कुणीतरी विरोध केलाच असता. मराठीभाषकांनी zh चा उच्चार झ केला हा त्यांचा दोष, हे आपले म्हणणे पटले.

तमिऴमध्ये दोन ण आहेत, आपण वेगळे लिहू शकू? त्यामुळे इतर भाषेतले शब्द मराठी लिपीत आणताना त्यांचे मराठीकरण करावे आणि या उलट, हाच एकमेव मार्ग.

एकूण काय? तर, मराठी विकिपीडियावर श्रेयस तळपदे, हिंदीवर तलपदे आणि इंग्रजीवर टॅल्पेऽड असे लिहिल्याशिवाय गत्यंतर नाही.‌.J १०:४७, २१ मे २०११ (UTC)

पण हिंदीत मुळातला प्रॉब्लेम "ळ" नसण्याचा आहे, त्यांच्याकडे "द" तर आहे ना ? मग प्रस्तुत अभिनेत्याला हिंदी भाषेच्या उच्चारमर्यादांमध्ये अडकूनही स्वतःचे आडनाव "तलपदे" असे सांगावेसे वाटायला हवे. पण "तलपदे" असे न सांगता प्रस्तुत अभिनेता जर "तलपडे" असे आडनाव सांगत हिंडत असेल, तर त्याचे अधिकृत नाव बदलले गेले आहे किंवा कसे, याबद्दल शंका वाटायला लागते. म्हणूनच या चर्चेच्या सुरुवातीला मी याबद्दल काही विश्वसनीय माहिती आहे काय, असे विचारले.

संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:२६, २१ मे २०११ (UTC)

या विषयावर अजून काही तज्ञांची मते हवी आहेत. म्हणूनच हि चर्चा चावडीवर टाकली आहे.....

--मंदार कुलकर्णी
वृत्तनिवेदकाने एखाद्या व्यक्तीच्या नावाचे उच्चारण नेमके कसे करावे ? हा बीबीसी वर्ल्डसर्वीस सारख्या वृत्तवाहिनीवर चिरंतन चर्चेचा मुद्दा आहे, पण वृत्तवाहिनीची अधिकृत भूमिका/उच्चारण संकेत पटणारा आहे कि व्यक्ती स्वतःचे नाव स्वतः नेमके कसे उच्चारते/लिहिते हे कल्पना असल्यास तेच उच्चारण प्रमाण मानावे, उच्चारण लेखन माहिती नसल्यास त्याच्या मातृभाषेशी शक्यतो प्रमाण असावे , मार्गदर्शनास मातृभाषी न मिळाल्यास तो ज्या प्रदेशातून आहे त्या प्रदेशातील उच्चारणांशी प्रमाण असावे अशी उतरती भाजणी आहे.
यशवंतराव चव्हाणांचे यशवंतराव चौहान आणि माधवराव सिंदीयांचे माधवराव शिंदे करू नये

>>माधवराव सिंदीयांचे माधवराव शिंदे करू नये<< याला थोडासा विरोध आहे. शिंदे या शब्दाचे इंग्रजी स्पेलिंग Shinde असे केले तर त्याचा उच्चार शाइन्ड असा आणि असाच होतो. शिंदे या शब्दाचे प्रत्ययापूर्वीचे सामान्यरूप शिंद्या असे होते. शिंद्यांची छत्री वगैरेवरून हे लक्षात येईल. साहजिकच शिंद्या हेच नाव असावे असे इंग्रजांना वाटणे साहजिकच होते. त्यामुळे त्यांनी केलेले शिंदे या मराठी शब्दाचे Scindia हे सर्वात योग्य स्पेलिंग आहे. त्यामुळे हिंदीत आणि अन्य जागतिक भाषांत ते जरी सिन्दिया असले तरी मराठीत ते शिंदेच आहेत, आणि तसेच लिखाण करावे, आणि केले जातेही. महाराष्ट्रीय चव्हाणचे मात्र चौहान करू नये तसेच, हिंदीभाषक चौहानचे चव्हाणही करू नये. ...J १०:३२, ३० मे २०११ (UTC)


अर्थात विकिपीडिया हे लिखीत माध्यम असल्याने ती व्य्क्ती नाव कसे लिहिते त्यास प्रमाण मानावे.परदेशात गेल्यानंतर बर्यामच व्यक्ती स्वतःच्या नाम उच्चारणाचे इतरांनी लक्तरे करण्या पेक्षा उच्चारण स्वत:हूनही वेगळे करतात असे आढळून येते.
गूगल शोधात तळपदे हे आडनाव इतरही महाराष्ट्रीय व्यक्तीचे आहे इतर मराठी माध्यमेही तळपदे असे लेखन करताना आढळतात तेव्हा तळपदे राहू द्यावे असे वाटते माहितगार १७:३०, २२ मे २०११ (UTC)


स्वत: तळपदे जरी हिंदी बोलताना किंवा अन्य काही प्रसंगी तल्पदे असे म्हणत असतील तरी ते प्रमाण मानू नये. त्यांच्या माध्यमिक शालान्त परीक्षा प्रमाणपत्रावर जे नाव असेल आणि त्यांनी जर ते अधिकृतरीत्या नंतरच्या काळात बदलले नसेल, तर तेच नाव( म्हणजे बहुधा तळपदे) प्रमाण समजावे. एखाद्याचे दात पडल्यामुळे किंवा अन्य काही कारणाने त्याला आपले नाव नीट उच्चारता आले नाही तरी मूळ लिखाणात असलेले कायमच प्रमाण असते. प्रतिभा पाटील हिंदीत ‘पाटिल’ असतात, आणि पाटिल असेच उच्चारतात, पण मराठी लिहिताना तसे चालणार नाही..... J १७:५१, २२ मे २०११ (UTC)


>>एखाद्याचे दात पडल्यामुळे किंवा अन्य काही कारणाने त्याला आपले नाव नीट उच्चारता आले नाही तरी.....

:) माहितगार २०:०२, २२ मे २०११ (UTC)
>>स्वत: तळपदे जरी हिंदी बोलताना किंवा अन्य काही प्रसंगी तल्पदे असे म्हणत असतील तरी ते प्रमाण मानू नये. <<
जे, तुम्ही तपशील चुकताय बहुधा ... तो अभिनेता हिंदीत "तलपडे" असे नाव सांगत आहे (हिंदीत ळ नसल्यामुळे त्याने "तलपदे" असे सांगणे अधिक तार्किक ठरले असते). त्यातला "डे" कुठून आला, हे मला उमजत नाही. म्हणूनच त्याचे नाव "श्रेयस तलपडे" आहे किंवा कसे ही चर्चा उद्भवली. चर्चा हिंदीतल्या उच्चारमर्यादांवर केंद्रित नव्हतीच मुळी!
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०१:१७, २३ मे २०११ (UTC)
परंतु तो स्वत: मराठीत काय उच्चारतो/लिहीतो ते महत्त्वाचे. जर तो मराठीत तळपदे म्हणत असेल तर तेच राहू द्यावे. त्यासाठी कुठल्यातरी मार्गाने खात्री करून घ्यावी..
अनिरुद्ध परांजपे ०१:५४, २३ मे २०११ (UTC)


मराठी भाषेतील अक्षरे इतर भाषात वापरणे

संपादन

"ळ", "ण", "श" आणि "ष"

संपादन

या विषयावर योग्य व्याकरण संदर्भात चर्चा हवी आहे म्हणून परत एकदा चावडीवर टाकत आहे....

हिंदी मध्ये "ळ" हे अक्षरच नाही म्हणून ळ असलेले शब्द हिंदी मधे कसे लिहायचे? आपण ह्यातून काही मार्ग काढू शकतो का? आपण हिंदी बोलताना किंवा लिहिताना "ळ" असेच वापरले तर काय होईल? भाषा तज्ञांचे या बाबतीत काय मत आहे? 'लोकमान्य तिलक' हे लहानपणा पासून वाचताना मला फार त्रास होतो. जी गोष्ट हिंदी ची तीच इंग्रजीची. तेथे पण "ळ" नाहीच. मग "ळ" आणि "ल" मधला फरक कसा ओळखायचा? काही वर्षांपूर्वी एका वर्तमानपत्रात मी या विषयावर लेख लिहिला होता. या बाबतीत आपण काही करू शकतो का? आपण "L" च्या मध्ये एक टिंब दिला आणि त्याचा "ळ" म्हणून वापर करायचा ठरवला तर चालणार नाही का? तसेच "श" आणि "ष" हा फरक इतर भाषात कसा दाखवायचा? "ण" साठी पण असे काही करता येईल काय? (माझे आडनाव 'कुलकर्णी' असल्याने मला हा प्रश्न जन्मापासूनच आहे !!! मला असे वाटते की, आपली मराठी भाषा आणि संस्कृत भाषा या इतक्या अतोनात समृद्ध आहेत की जगातील कोणत्याही भाषेतील कोणतेही शब्द वा उच्चार आपल्याला या दोन भाषांमध्ये करता येतात (हे 'सामान्यतः' मी म्हणत आहे). पण इतर भाषांमध्ये जर अशी काही अक्षरे नसतील तर ते आणण्यासाठी आपण प्रयंत्न करू शकतो का? मला या विषयावर "चांगली चर्चा" करायला आवडेल.....

धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव: मंदार कुलकर्णी
मंदार कुलकर्णी ०९:२४, २४ मे २०११ (UTC)

इतर भाषेतली अक्षरे

संपादन

>>पण इतर भाषांमध्ये जर अशी काही अक्षरे नसतील तर ते आणण्यासाठी आपण प्रयंत्न करू शकतो का?<< फारसी म्हणजे उर्दू लिपीत ५ ज, ३ स, २ त , २ ह, २ अ आणि २ क-ख-ग-ड-फ आहेत. आपण आपल्या लिपीत तसले उच्चार नसणारे शब्द नसले तरी, ही अक्षरे लिहिण्याची सोय करावी का? हे फक्त एका भाषेचे झाले. जगातल्या प्रत्येक भाषेत मराठीपेक्षा वेगळ्या उच्चाराचे एक तरी अक्षर असतेच...J १०:३९, ३० मे २०११ (UTC)

मराठी भाषेतून रोमन लिपीत लिहिण्यासाठी अनेक कन्व्हेन्शन[मराठी शब्द सुचवा] आहेत. माझ्या आवडत्या प्रकारात --
१. स्वर पूर्णपणे उच्चारित होतील असे लिहावे, स्वरांसाठी एकच रोमन स्वर निवडावा - उ = u, ऊ = uu; इ=i, ई=ii; आ=aa
२. शब्दांती अकार अध्याह्रत मानावा - अभय = abhay; abhaya नव्हे. शब्दांती आकार स्पष्ट करावा - कर्ता = kartaa
३. अनुस्वार वेगळा स्पष्ट करावा, त्यासाठी योग्य तोच अनुनासिक वर्ण वापरावा - कंस = ka.nsa; पंप = pa.mp
४. कठोर व्यंजनांसाठी कॅपिटल अक्षरे वापरावी - टट्टू = TaTTuu
५. अतिकठोर व्यंजनांसाठी कॅपिटल अक्षरांना ह् लावावा - ढेकर = Dhekar; माठ = maaTh;
६. वाक्याची सुरुवात कॅपिटल अक्षराने करू नये.
७. इतर
याशिवाय इतरही पद्धती प्रचलित आहेत.
आपली मराठी भाषा आणि संस्कृत भाषा या इतक्या अतोनात समृद्ध आहेत की जगातील कोणत्याही भाषेतील कोणतेही शब्द वा उच्चार आपल्याला या दोन भाषांमध्ये करता येतात
हे चूक आहे. अनेक भाषांत अनेक उच्चार आहेत जे आत्ताच्या प्रमाण देवनागरी लिपीत लिहिता येत नाहीत. काही उच्चार मराठी किंवा संस्कृतमध्ये नाहीतच. यावर अनेकदा चर्चा झालेली आहे. मासला म्हणून - इंग्लिश get, gate, gait, gatt यांना देवनागरीत वेगवेगळे लिहता येत नाही. xhosa भाषेचे नाव सुद्धा जगातील बहुतांश लिप्यांमध्ये बिनचूक लिहिता येत नाही. प्रमाण मराठीत (आणि पर्यायाने त्या फ्लेवरच्या लिपीत) नुक्ता नाही म्हणून जरा (थोडेसे) आणि जरा (वार्धक्य) यांत फरक करता येत नाही. अशी अनेक उदाहरणे आहेत.

अभय नातू १४:०८, २४ मे २०११ (UTC)


उ, ऊ वगैरे.

संपादन

>स्वरांसाठी एकच रोमन स्वर निवडावा - उ = u, ऊ = uu; इ=i, ई=ii; आ=aa<<

मला जर उउ, इइ किंवा अ‍अ लिहायचे असेल तर कसे लिहायचे?

>>अनुस्वार वेगळा स्पष्ट करावा, त्यासाठी योग्य तोच अनुनासिक वर्ण वापरावा - कंस = ka.nsa; पंप = pa.mp<<

कंक, चिंच रोमन लिपीत कसे लिहायचे? kaŋk आणि chiɲch ?त्यासाठी लागणारी ŋ आणि ɲ ही अक्षरे कुठून आणायची? ...J ०९:५१, ३० मे २०११ (UTC)

अभय, तुम्ही सांगितलेले 'मराठी भाषेतून रोमन लिपीत लिहिण्यासाठी कन्व्हेन्शन' आवडले. प्रश्न हाच आहे की असे कन्व्हेन्शन 'सर्वमान्य' असायला हवेत. म्हणजेच ते सर्वांनी वापरायला हवेत. जसे, कमळ हे इंग्रजीतून लिहिताना 'kamaL' असा लिहिला तर समजायला सोपा जातो. मराठी विकिपीडिया तर्फे काही करू शकतो का? माहितगार म्हणतात तसे हिंदीत 'ळ' लिहिता येईल का? हिंदी पाठ्यपुस्तकात तसा बदल करता येऊ शकतो का? हिंदीत/ इंग्रजीत 'ळ'आणि 'ण' उच्चार करण्यासाठी काय करावे लागेल? 'टिळक' हे उदाहरण सोडून दिले तरी असे अनंत शब्द आहेत की ज्याचे सर्व भाषांमध्ये सुयोग्य उच्चारण व्हायला हवे.

जरा (थोडेसे) आणि जरा (वार्धक्य) यांत फरक कसा करायचा याचाही विचार व्हायला हवा कारण मराठी न जाणणाऱ्या मंडळींना त्याचा खूपच त्रास होतो. हा प्रश्न मराठीतील च, ज, झ या तीनही अक्षरांसाठी येतो.

मंदार कुलकर्णी , २९ मे २०११ (UTC)

च आणि च़, ज आणि ज़, झ आणि झ़, फ आणि फ़ ही अक्षरे नुक्ता देऊन वेगवेगळी लिहिता येतात. मराठीच्या चांगल्या उच्चारकोशांत असे लिहिलेले सापडावे. युनिकोड देवनागरीत मराठ्येतर लिप्यांना आवश्यक अशी य़, ऴ आणि ऱ ही अक्षरे आहेत, नाहीत ती फक्त अॅ , च़ आणि झ़.,,J ०९:५१, ३० मे २०११ (UTC)


>>>मराठी विकिपीडिया तर्फे काही करू शकतो का? <<< मंदार, मराठी विकिपीडियावर विकिपीडिया:Marathi language support tools असे एक प्रकल्प पान आहे ,त्याचा उद्देश Lingustic Resources for Non Marathi and People with Marathi as Second language असा आहे .दुसरे विकिमीडिया कॉमन्सच्या माध्यमातून प्रत्येक अक्षर आणि शब्दाच्या उच्चारणांच्या ऑडीओ फाईल्स चढवून त्या विक्शनरीतील शब्द लेखांना जोडता येतील.
जसे इंग्रजी आणि इतर श्रीमंत देशातील बर्या्च भाषात लिखीत मजकूर सॉफ्टवेअरच्या सहाय्याने वाचूनदाखवण्याची सुविधा आजकाल उपलब्ध असते (मुख्यत्वे अंधव्यक्तींच्या दॄष्टीने तसेच अलिकडे दुरध्वनीवरून आणि इतर अनाऊन्समेंटच्या क्षेत्रात यास सोयीचे समजले जाते) अशा सुविधेचा विकासाची तांत्रीक पायरी मराठी भाषेने चढावयास हवी.अशी सुविधा भविष्यात उपलब्ध झाल्यास मराठी विकिपीडियाने गरजे नुसार सहयोग द्यावा पण तांत्रीक संशोधन आणि विकास मराठी विकिपीडियाच्या परिघात येणार नाही.
माहितगार २१:४१, २९ मे २०११ (UTC)


रोमन लिपीत देवनागरी अक्षरे(उच्चार) कशी लिहावीत या संदर्भात en:Devanagari_transliteration आणि en:International Phonetic Alphabet हे लेख पहावेत त्या शिवाय अशा प्रणाली अस्तीत्वात असल्याची कल्पना नसल्यामुळे मध्यंतरी कुणी गोगटे नावाचे गृहस्थही या विषयात स्वतःची काही पद्धती प्रचलीत करण्याच्या प्रयत्नात होते असे आठवते.

गोगटे

संपादन

गोगटे नावाचे गृहस्थही या विषयात स्वतःची काही पद्धती प्रचलित करण्याच्या प्रयत्नात होते असे आठवते. अशा प्रणाली अस्तित्वात असल्याची कल्पना नसल्यामुळे गोगटे प्रयत्न करत आहेत? श्री. म.ना.गोगटे गेली सुमारे ३० वर्षे रोमन मराठीचा प्रसार करीत आहेत. त्यांचे संकेतस्थळ www.mngogate,com हे आहे. ते आज अनेक वर्षे या विषयावर व्याख्याने देतात, लेख लिहितात आणि दर महिन्याला रोमनलिपीतले एक मराठी पत्र सभासदांना पाठवतात, ....J ०९:५१, ३० मे २०११ (UTC)


या वाक्याबद्दल क्षमा असावी पण; हिंदीत ळ कसा लिहिता येईल याचे उत्तर अत्यंत सोपे आहे ते ळ हे अक्षर ळ असे लिहावे कारण ळ हे अक्षर देवनागरीच आहे आणि हिंदी भाषा देवनागरी लिपीतच लिहिली जाते. देवनागरीत ळ आहे कि नाही असा प्रश्न नाही ळ आणि ण हे उच्चारण हिंदी भाषी करत नाहीत आणि ज्ञ चे उच्चारण ग्य असे करतात.बरेच उत्तर आणि पूर्व भारतीय लोक वचे उच्चारण ब असे करतात पण तीच मंडळी संस्कृत वापरताना उच्चारणे शुद्ध स्वरूपातच करताना आढळतात.
टिळक या विशीष्ट शब्दातील ळच्या उच्चारणा बद्दल म्हणावयाचे झाले तर "तीलक" या मूळ शब्दातील त चा ट करणे आणि ल चा ळ करणे हा गुन्हा मराठी भाषीकांचा आहे. हिंदी लोकांनी त्याचे 'तीलक' केले तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही केवळ तुमच्या स्वतःच्या सवयीमुळे टिळक हे उच्चारण तुम्हाला अधिक बरोबर वाटते एवढेच माहितगार १८:३४, २४ मे २०११ (UTC)

गुन्हा मराठीभाषकांचा नाही

संपादन

भारतातलेच नाही तर जगातले सर्व भाषा बोलणारे लोक मराठी नावे इंग्रजीतून वाचतात. आपणही बंगाली, तामीळ, फ़्रेन्च वगैरे नावे इंग्रजीतून वाचतो आणि तसाच उच्चार करतो. इंग्रजी ही बहुधा एकमेव सर्वात लोकप्रिय अशी जागतिक भाषा आहे, त्यामुळे असे होणारच. टिळक हे इंग्रजीत Tilak असेच लिहिले जाणार साहजिकच त्याचा उच्चार आणि त्याचे लिखाण अन्यभाषक तिलक असेच करणार. (तीलक असे लिखाण मी अजून पाहिले नाही, जर असेलच तर तसा शब्द त्यांच्या भाषेत असावा!) शुभलक्ष्मीचे चे स्पेलिंग Subbalaxmi होते म्हणून आपण शुभलक्ष्मींना सुब्बलक्ष्मी म्हणतो. तमीळमध्ये स-श ब-भ हा भेद नाही त्याला इंग्रजांनी काय करावे? गोवे या राज्याला आपण गोवा म्हणतो, कारण इंग्रजी स्पेलिंग Goa हे आहे. त्यामुळे हिंदीत तिलक म्हणतात त्याला विरोध करायचे कारण नाही. आपणही त्यांची शुक्ल, मिश्र, गोविंद(हिंदी चित्रपट-अभिनेता) यांना शुक्ला, मिश्रा, गोविंदा म्हणून ओळखतो, जया भादुड़ीला जया भादुरी म्हणतो. कारण मूळ नावातल्या ड़ी चे स्पेलिंग री होते हे आपल्याला माहीतच नसते...J १०:२०, ३० मे २०११ (UTC)

भारतातील विद्यापीठांची यादी

संपादन

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ:अमरावती विद्यापीठ अशा देन नावानी एकाच विद्यापीठाची नोंद भारतातील विद्यापीठांची यादी मध्ये घेतलीली दिसते, तसेच संबंधित नोंदीचे दुवेपण दिले असून त्यांचे लेखपण आहेत. यातील संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती या नावाचा लेख विकसित करावा व अमरावती विद्यापीठ ह्या नावाचा लेख वगळावा असे वाटते.

राहुल देशमुख ०४:४४, ४ जून २०११ (UTC)


या उलट, अमरावती विद्यापीठ या नावाचा लेख ठेवावा आणि लेखात संत गाडगेबाबा(एक शब्द)विद्यापीठ हा दुवा ठेवावा. असेच कोल्हापूर आणि अन्य विद्यापीठांचे करावे. शीर्षक नाव कोल्हापूर(किंवा जे गावाचे नाव असेल ते)ठेवून लेखात व्यक्तिनावाचा दुवा ठेवावा. एकाच शहरात दोन विद्यापीठे असतील तर आधी शहराचे नाव देऊन मग त्या शहरातील विद्यापीठांचे दुवे द्यावेत. उदा० शीर्षक: पुणे शहरातील विद्यापीठे (१) पुणे विद्यापीठ (२) टिळक विद्यापीठ(टिळक संस्कृत विद्यापीठ) (३) डीवाय पाटील विद्यापीठ वगैरे. विद्यापीठाला व्यक्तिपूजेप्रीत्यर्थ दिलेल्या नावांपेक्षा शहराचे नाव देण्याने लेख सापडायला मदत होईल. व्यक्तिनावे कदाचित उद्या बदलतील, पण शहराची नावे बदलण्याची शक्यता त्या मानाने कमी. ...59.95.3.28 ०७:५९, ६ जून २०११ (UTC)


सर्व साधारणतः विद्यापीठे हि त्यांचा नावानीच ओळखली जातात, जर विद्यापीठास गावाचे नाव दिलेले असेल तर ते त्यानावानेच प्रसिद्ध आहेत (उदा. दिल्ली विश्वविद्यापीठ) परंतु जर विद्यापीठास स्वतंत्र नाव आहे किवा नामांतर झाले असेल तर त्यास गावाच्या नावाने संबोधने योग्य नाही कारण एकाच गावात अनेक विद्यापीठे असू शकतात तसेच काही विद्यापीठे नावानी प्रसिद्ध आहेत परंतु त्यांची गावे मात्र त्या प्रमाणात प्रसिद्ध नाहीत (उदा. डॉ.बाबासाहेब अंबेडकर तंत्र विद्यापीठ लोनेरे ) लोनेरे, हे अतिशय छोटे गाव आहे (ग्रामपंचायत) पण बाटू हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध तंत्र विद्यापीठ आहे. ह्या ठिकाणी भारतातील विद्यापीठांची यादी संकलित केली आहे त्यामुळे भारतातील विद्यापीठांच्या गावांची यादी देणे योग्य ठरणार नाही. आपण तशा माहितीसाठी एक वेगळा वर्ग तयार करून गावानरूप पण माहिती देऊ शकतो. तेव्हा येथे विद्यापीठाचे नावच भारतातील विद्यापीठांच्या यादीत असावे असे वाटते.

राहुल देशमुख ०५:१६, ८ जून २०११ (UTC)


साचे बदल

संपादन

साचा:माहितीचौकट क्षेपणास्त्र

संपादन

साचा:माहितीचौकट क्षेपणास्त्र हा साचा अग्नी, क्षेपणास्त्र या पानाला लावल्यानंतर अपेक्षित माहिती पटलावर येत नाही, उपाय सुचवा.

साचा:माहितीचौकट मध्ये समाजसेवक यावर काही साचा करुन मिळेल काय?

Dr.sachin23 १५:५६, ५ जून २०११ (UTC)

अपेक्षित माहिती म्हणजे काय अपेक्षित आहे? माहिती त्या साच्यात भरल्यावर दिसायला हवी. समाजसेवक साठी तुम्हाला हव्या असलेल्या साच्यासदृष साचा शोधा आणि त्यातील माहिती हवी तशी बदलून घ्या. बदललेला साचा नवीन नावाने सेव्ह करा. निनाद ०१:१९, ९ जून २०११ (UTC)
असा प्रयत्न साचा:माहितीचौकट समाजसेवक येथे केला आहे. हा साचा लेखक साच्यावरून घेतला आहे. त्यामुळे यात अजून समाजसेवा विषयातील माहिती असायला हवी असे वाटते. कळावे निनाद ०१:२८, ९ जून २०११ (UTC)
  • त्या साच्यात भरलेले चित्र, चाचणी दिनांक, पल्ला, मार्गदर्शक यंत्रणा, उड्डाण यंत्रणा या लेखात माहिती पटलावर उमटत नाहीत. साच्यातील बदल मला अवगत नाहीत म्हणून मी मदत मागवली होती. सचिन


साचे हा बहुतेक लेखांचा  अनिवार्य भाग होत चालला आहे. आपणास विषयानरुप वेगवेगळे साचे नेहमीच लागत असतात किंवा असलेल्या साच्यान  मध्ये काही जुजबी बदल करावे लागतात.
   साचे बनवनण्याचे/ बदलवण्याचे मर्गदर्शक (ट्युटर) जर आपण विपी वर उपलब्ध करून दिलेत तर असंख्य विपी संपादक  त्याचा लाभ घेऊ शकतील. 

राहुल देशमुख ०५:१२, ९ जून २०११ (UTC)

साचा:माहितीचौकट व्यक्ती हा साचा बराचसा अष्टपैलू साचा आहे. त्यामुळे समाजसेवकांवरील लेखांत त्याचा वापर करून काम भागत असेल, तर बघा. नाहीतर विशिष्ट चळवळ उभारणार्या' व्यक्तींसाठी साचा:माहितीचौकट चळवळ चरित्र देखील आहे. तोही उपयोगी पडत आहे का, ते तपासावे. याहून काही वेगळ्या आवश्यकता असतील, तर त्यानुसार सध्याच्या साच्यांत बदल करता येतील किंवा नवीन साचा बनवता येईल. (हे लिहिण्यामागे प्रयोजन असे, की विद्यमान साच्यांमध्ये काम भागत असल्यास, वेगळे साचे बनवण्याचे व त्यांची देखभाल करण्याचे कष्ट वाचतील.)
राहुल, तुमची सूचना चांगली आहे. साचे बनवणे किंवा तत्सम अनेक विषयांवर सहाय्य पाने बनवणे हे उद्दिष्ट डोळ्यांपुढे आहेच; आणि तशी सहाय्य पाने बनवण्याबद्दल काही संपादक अधूनमधून काम करतच असतात. पण आपण जेवढे काही मोजके लोक नियमित येतो, त्यांना पुरून उरतील, एवढी कामे शिल्लक आहेत. किम्बहुना काही वेळा असलेल्या संपादकांवर ताण येण्याइतपत कामे व बॅकलॉग शिल्लक आहे. त्यामुळे वास्तविक पातळीवर हे काम मंदगतीने चालणार हे उघड आहे.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०६:२४, ९ जून २०११ (UTC)

केंदीय अन्वेषण विभाग शीर्षकात बदल करता येईल काय? त्या बद्दल काय करणे आवश्यक आहे?

Dr.sachin23 १७:१७, ५ जून २०११ (UTC)


लेखाविषयी अधिक माहिती

संपादन

इंग्रजी विकिपीडिया मध्ये "View History " या पानावर खालील माहिती उपलब्ध आहे

For any version listed below, click on its date to view it. For more help, see Help:Page history and Help:Edit summary. External tools: Revision history statistics • Contributors • Revision history search • Number of watchers • Page view statistics

तशी मराठी वर पण आणता येईल का? यातील "Revision history statistics " आणि "Page view statistics " हे तर फारच छान आणि उपयोगी आहे.

धन्यवाद!
मंदार कुलकर्णी १४:२२, ६ जून २०११ (UTC)


विकिपत्रिका जून, इ.स. २०११

संपादन

नमस्कार मंडळी!

विकिमीडिया इंडिया अध्यायाच्या वृत्तपत्रिकेचा - अर्थात विकिपत्रिकेचा - जून, इ.स. २०११मधील अंक प्रकाशित झाला आहे. संपूर्ण अंक ऑनलाइन उपलब्ध येथे उपलब्ध आहे : http://wiki.wikimedia.in/WikiPatrika

अन्य भारतीय भाषांमध्ईल विकिपीडिया, विक्शनरी, विकिस्रोत वगैरे प्रकल्पांवर काय काय घडामोडी घडत आहेत, आपापल्या भाषांमधील विकिउपक्रम वाढीस लागण्यासाठी कार्यशाळा, विकिअकादम्या इत्यादी उपक्रम अन्य विकिसमुदाय असे आयोजित करत आहेत, यांबद्दल (विचार करण्याजोगे) वार्तांकन या ताज्या अंकात आहे.

या अंकातील मुद्द्यांच्या/बातम्यांच्या अनुषंगाने मराठी विकिपीडियावर चर्चा घडावी, अशी आशा आहे.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:३३, ९ जून २०११ (UTC)


संकल्प धन्यवाद ..!

विकिपत्रिकेचा आढावा घेतला असता प्रथम दर्शनी असे निदर्शनास येते की बरेचशे उपक्रम हे संघटनात्मक धर्तीचे आहेत. मराठी विपी संघटनात्मक पातळीवर कितपत व कोठे आकारास येत आहे हे जर समजले तर विधायक कार्यासाठी त्यांना योग्य दिशादेणे बाबत योजना आखता येतील.

ज्याप्रमाणे गावा गावात LUG (Linux User Group) आणि JUG (Java User Group) तयार झाले आहेत त्याच धर्तीवर मराठी विपीचे पण गट तयार व्हावेत. विपी गटाला ज्यास्त मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळू शकतो कारण जावा अथवा लिनक्स प्रमणे हा गट केवळ तांत्रिक क्षेत्राशी निगडीत व्यक्तीन पुरताच मर्यादित नराहता तो जनसामान्याचा होऊ शकतो.

ह्यासंबंधी घटनात्मक रूपरेषा तयार असेलच, नसेल तर इतर विपी कडून ती घेउन त्यात योग्य ते बदल करून आपण मराठी विपी वरून व इतरही प्रसार माधमातून आवाहन केले तर चांगला प्रतिसाद मिळेल असे वाटते. मराठी विपी वरील इतरही जेष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी आपले विचार व अनुभव मांडून ह्या कार्यास दिशा देण्यास मदत करतीलच.

राहुल देशमुख ०४:३५, १० जून २०११ (UTC)