मराठी विकिपीडियारील लेखांची प्रतवारीचे निकष ठरविण्याच्या प्रस्तावावर चर्चा येथे होईल.

शून्य प्रतीचे लेख

संपादन

मराठी विकिपीडियावरील सगळे लेख जोपर्यंत तपासले जात नाहीत तोपर्यंत ते आपोआप शून्य पातळीवर असतील. ही पातळी/प्रत प्रारंभिक पातळीच्या पेक्षा खालच्या दर्जाची समजली जाईल. निकषांची पारख झाल्यावर (विशेषतः उल्लेखनीयता) त्यांचे उन्नतीकरण केले जाईल. मुख्य नामविश्वात तयार झालेल्या प्रत्येक लेखावर खालील प्रक्रिया आपोआप होतील

  1. चर्चा पानावर तो लेख शून्य प्रतीचा असल्याचा साचा लागेल
  2. लेखावर शून्य प्रतीचे अदृष्य वर्गीकरण लावले जाईल (पहा - स्त्री चरित्रलेख वर्ग)

यासाठी खालील तांत्रिक गोष्टी लगेचच आवश्यक आहेत.

  1. प्रतींचे वर्गवृक्ष तयार करणे
  2. सांगकाम्याकरवे सगळ्या पानांना शून्य प्रतीचा वर्ग लावला जाणे
  3. लेखाची प्रत जाहीर करणारे साचे तयार करणे (शून्य प्रत, पहिली, दुसरी, तिसरी प्रत)
  4. नवीन पानांना आपोआप शून्य प्रतीचा वर्ग आणि चर्चा पानावर साचा लावले जाणे (पहा - स्वागत साचा)

उल्लेखनीयता

संपादन

पहिल्याच प्रतीवर उल्लेखनीयता आवश्यक आहे. यासाठी मराठी विश्वकोशाच्या संदर्भात विश्वकोशीय उल्लेखनीयता कशी ठरेल याची रूपरेषा असणे आवश्यक आहे. सगळ्याच प्रकारच्या लेखांची उल्लेखनीयता आधीपासूनच ठरविणे शक्य नाही परंतु नेहमीच्या प्रकारांची (व्यक्ती, लेखक, गाव, पुस्तक, इ.) उल्लेखनीयता काय असेल याची चर्चा या प्रस्तावाला समांतर व्हावी. -- अभय नातू (चर्चा) १०:०३, २२ जुलै २०१८ (IST)Reply

ता.क. शून्य प्रतीचा लेख तयार करण्यासाठी उल्लेखनीयता आवश्यक नाही परंतु शून्य प्रतीचे लेख काही काळाने वगळले जाण्याची शक्यता आहे. तरी लेख तयार करणाऱ्या लेखकांनी आपला लेख लवकरात लवकर पहिल्या (तरी) प्रतीचे निकषांना उतरतो असे लिहिणे (किंवा बदलणे) हितावह आहे.

(यावरील लेखन सदस्य:अभय नातू यांचेद्वारे केले गेले आहे)

पुढील टिप्पणी, चर्चा व शेरे

संपादन
वाचले. प्रथमदर्शनी तर सुरेश व आपले म्हणणे ठिक वाटत आहे. प्रत्यक्ष लागू केल्यावर काय काय अडचणी येतात, त्यानंतर ते पण बघावे लागेल. याआधी तयार झालेल्या लेखांना असे साचे लावणे, त्याची योग्य वर्गवारी करणे, त्यात उद्भवणारे हेवेदावे हे एक जटिल काम न होवो म्हणजे झाले. नक्की ठरले तर करुयातच, यात वादच नाही. योग्य सक्षम मनुष्यबळाचा प्रश्न तर समोर आहेच.
मागे लेखांना त्यांचे दर्जानुसार रंगीत चांदण्या लावण्यात येत होत्या, त्यावरून त्यांचा दर्जा ठरत होता.त्या योजनेचे काय झाले ते स्मरत नाही. बघावे लागेल.

--वि. नरसीकर , (चर्चा) १७:३५, २२ जुलै २०१८ (IST)Reply

माझा प्रस्ताव शून्यापासून सुरू करीत टप्प्याटप्प्याने लेखांना प्रमोट करणे असा आहे. स्पष्ट निकष ठरल्यावर हे काम स्वयंचलित करुन घेता येईल. -- अभय नातू (चर्चा) १९:०१, २२ जुलै २०१८ (IST)Reply

वाचले.मग मनुष्यबळाचा काही प्रश्नच उद्भवत नाही.--वि. नरसीकर , (चर्चा) १९:१८, २२ जुलै २०१८ (IST)Reply

जर इंग्लिश विकिपीडिया पाहिले तर हे काय आहे? Quality scale की FA/GA --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १९:२७, २२ जुलै २०१८ (IST)Reply

Quality Scale सारखे - अभय नातू (चर्चा) १६:००, २३ जुलै २०१८ (IST)Reply

काय आहे/असावे हे धोरण?- माझे मत

संपादन
  • मी ह्या धोरणाची कल्पना करित असताना, "उल्लेखनीयता सिध्द करण्यापासून ते गुणवत्तापूर्ण लेख तयार होण्यापर्यंतची प्रक्रिया" एकाच धोरणात कशी सोप्या पध्दतीने आणता येईल याचा विचार करुन आखलेले आहे. शक्यतो, क्लिष्टता टाळून सोप्या मार्गाने गुणवत्ता साधण्याचा हा मार्ग असेल, शिवाय "प्रारंभिक पातळीचा लेख" ही पायरी गाठण्यामध्येच अनेक प्रकारच्या गाळण्या लावल्याने अनेक जुने रिकामे, दुर्बोध, संदर्भहीन, वादग्रस्त, यांत्रिक भाषांतरीत, उल्लेखनीता प्रश्नांकित लेख आपसूकच एकतर सुधारले जातील किंवा काढून टाकले जातील असा विचार केलेला आहे.
  • त्यामूळे, लेख टिकविण्यासाठी आपसूकच विकितत्त्वांचे पालन केले जाईल व एकूणच मजकूराचा दर्जा सध्याच्या दर्जापेक्षा कित्येक पटीने सुधारेल.
  • वैयक्तिक हेवेदावे, वाद आणि इतर तत्सम बाबींना येथे थारा नाही, तत्त्वांचे पालन नाहीतर मजकूर/लेख काढून टाकणे इतका सोपे गणित ध्येय धोरणांच्या चौकटीतच होईल.
  • लेखांच्या संख्येपेक्षा लेखांच्या गुणवत्तेवर भर देणे आणि संपादक सदस्यांच्या कुरघोडीं/वाद/हेवेदावे यांपेक्षा विहित प्रक्रिया आणि धोरणांप्रमाणे काम करुन जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण मजकूर/लेख मराठीत आणणे हा शुध्द हेतू ह्या धोरणामागे आहे.

(काय आहे/असावे हे धोरण?- माझे मत:वरील लेखन सदस्य:QueerEcofeminist द्वारे केले गेले आहे.)

गुणवत्ता धोरण जाहीर करावे

संपादन

@अभय नातू, V.narsikar, आणि Sureshkhole:,
लेखाची पातळी ठरविण्याचे निकष सुरेश यांनी पुरेसे स्पष्ट असे मांडले आहेत. नवनवीन अभियाने,कार्यशाळा आणि स्वयंप्रेरणेतून मराठी भाषकांचा वाढता सहभाग पहाता हे धोरण लवकर ठरविणे आवश्यक आहे. सुरुवात शून्य आणि प्रारंभिक हे साचे लावण्यापासून करूया. पुढील पातळ्या ठरविण्याची जबाबदारी त्या त्या सक्षम संपादकांनी हळूहळू घेत जावी असे मला सुचवावेसे वाटते. काही नमुना लेख घेवून सुरुवात केल्याशिवाय अडचणी, वेळ, मनुष्यबळ इ. चा अंदाज बांधणे अवघड आहे. रचना चर्चा, संवाद होतच आकाराला येईल. सीमोल्लंघनाचे निमित्त साधून धोरण जाहीर करावे आणि ही महत्वाची प्रक्रिया सुरु करावी अशी विनंती मी समस्त विकी समुदायाच्या वतीने प्रचालकांना करीत आहे.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १०:५७, १७ ऑक्टोबर २०१८ (IST)Reply

@अभय नातू आणि V.narsikar:,
नमस्कार. यावरील आपले मत जाणून घेण्यास आवडेल. वाट पहात आहे. -सुबोध कुलकर्णी (चर्चा) १०:४४, २० नोव्हेंबर २०१८ (IST)Reply

@सुबोध कुलकर्णी:,
माझी काही मते वर मांडलेली आहेत. पुरेशी साधकबाधक चर्चा झाल्यावर इतर मते मांडेन. वर तुमचे मत दिसले नाही, ते ही द्यावे. धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) १०:५०, २० नोव्हेंबर २०१८ (IST)Reply

माझे मत

संपादन

प्रस्तावित धोरण पाहिले व त्यात काही प्रश्न निर्माण झाले. प्रस्तावित करणारे सदस्य जर याचे जवाब देतील तर चांगले होईल.

  1. प्रस्तावनेत (लेखांची प्रतवारी ठरवण्यासाठी सदस्यांना त्यांनी किती लेख कोणत्या स्तरावरील केलेले आहेत त्यानूसार त्यांचेही वर्गिकरण आणि प्रतवारी आवश्यक असेल) असे लिहिले आहे ते काही स्पष्ट झाले नाही.
  2. प्रारंभिक पातळीवरचा लेख मध्ये (योग्य, वैध, स्पष्टपणे सिद्ध होत असणारे संदर्भ (किमान 3) वादग्रस्त, अतिशयोक्त विधानांना प्रत्येकी एक संदर्भ असावा) असे लिहिले आहे. जर लेखात एकही संदर्भ नसले तर? वर वाचले त्यात लिहिले आहे की सर्व लेख या पातळीवर असतील परंतु हे विधान लागू होत आहे का?
  3. पहिल्या पातळीवरचा लेख मध्ये (किमान प्रत्येक परिच्छेदाला एक संदर्भ असावा) असे इंग्लिश विकिपीडियावर नक्की विधान आहे? कृपया त्याचे दुवा द्यावे.
  4. पहिला पातळी व दुसऱ्या पातळीत काय फरक आहे याची माहिती द्यावे. नक्की जेव्हा (NPOV, प्रताधिकार भंग, पाल्हाळीक मजकूर नसावा) नसेल तर साचा असणारच नाही.
  5. (मजकूराला नेमकेपणा पैंकी कोणताही साचा नसावा. (नेमकेपणाचा तारखेचा साचा मी बनवला आहे तसे आणखीन इतर साचेही बनवावे लागतील)) याची यादी/माहिती कुठे आहे?
  6. (इतर विकिप्रकल्पांमध्ये लेखातील विषयावरील संचिका, माहिती, पाने यांना दुवे.) संचिका फक्त कॉमन्सवर आहे इतर प्रकल्पात सुद्धा भेटेल? कुठली माहिती? कुठले दुवे? कृपया स्पष्ट उदाहरण द्यावे.
  7. (navigation box, side box जोडलेले असावेत.(इंग्रजीचे मराठी भाषांतर सुचवा आणि)) यासाठी आपल्याकडे त्याचे विकिप्रकल्प आहेत? इतर विकिपीडियावर खूप विकिप्रलकप आहेत मराठी वर किती आहेत व कुठले सक्रिय आहेत याची माहिती काढा.
  8. (लेखातील विषयाला अनूसरून आवश्यक तेथे चित्रे, चलचित्रे, ध्वनीमुद्रणे, नकाशे, आकृत्या, इत्यादी जोडलेले असावेत) किमान किती? इत्यादी काय? आवश्यक म्हणजे किती प्रत्येक परिच्छेदात?
  9. (लेखात शुद्धलेखन आणि वाक्यरचनेच्या चुका नसाव्यात.) प्रत्येक संपादकांचे वेगळे वाक्यरचना आहेत तर योग्य कोणाचे?
  10. (नाहीतर उल्लेखनीयता सिद्ध न झाल्याने तो लेख साचा लावून मुदत देऊन मुदतीनंतर काढून टाकला जाईल.) याचे धोरण कुठे आहे व मुदत कोण निश्चित करणार? सद्या १८९+ लेखात उल्लेखनीयता साचे आहे त्याबद्दल काय?
  11. (लेखांची गुणवत्ता सुधारण्यासाठी ह्या प्रकारचे गुणवत्ता निर्धारण आवश्यक असेल) याला स्पष्ट करा.
  12. (लेखांच्या गुणवत्ता निर्धारण करणारे सदस्य आणि त्यांचे वर्गिकरण करण्याची व्यवस्था, मानांकनाची व्यवस्था करावी लागेल. लेखांच्या गुणवत्ता निर्धारण करण्याच्या प्रक्रियेत आवश्यक साचेही तयार करावे लागतील), याबाबत चर्चा कधी होणार. त्याला तयार कोण करणार? यासाठी सुद्धा कार्यशाळा आयोजित कराल??
  13. (दुसऱ्या पातळीवरचे तीन लेख सुधारणारे/लिहिणारे तीन सदस्य मिळून लेखाला तीसऱ्या पातळीसाठी नामांकित केलेला लेख तपासून त्याला तीसऱ्या पातळीचा उत्तम लेख म्हणून मान्यता देतील). ते तीन सदस्यांना त्या विषयी माहिती असेल? असे झाले तर अ. ब आणि क तिघे मिळून कुठलेही लेख पुढे टाकतील. आताच विकिपीडियावर उत्पात कमी नाही हे झाल्यावर भ्रष्टाचार/स्वार्थ/इतर गुण सुद्धा विकिपीडियावर दुसून येईल.
  14. बाकी सर्व तर काही कळत नाही डोक्याच्या वर गेले
  15. प्रचालकांना सर्व पातळी ठरवण्याचे अधिकार आहे? असे का? हे जे मनात आपण प्रचालक हे मुकुट घातलेले सदस्य आहे असे तयार केले आहे त्याला काढून टाका. ते सुद्धा मनुष्य आहे आणि सद्या इतर काही पसारा साफ करण्याची आवश्यकता अधिक आहे, २ प्रचालक जर सक्रिय नसले तर काय?.

निष्कर्ष:

  1. मराठी विकिपीडियावर पातळी असण्याची शक्यता खूप कमी आहे कारण त्या विषयी धोरण स्पष्ट काही प्रमाणात उपलब्ध करू शकत नाही.
  2. मराठी विकिपीडियावर मनुष्यबळ नाही
  3. या साच्यात जर इतर पाळीव खाते/उत्पात करणारे सदस्य/बोट/स्क्रिप्ट तयार झाले तर ती क्रिया उलटवन्यास मनुष्यबळ नाही
  4. प्रचालक या प्रकल्पावर अधिक वेळ सक्रिय नाही
  5. त्यात होणारे स्वार्थपणा/प्रभाव/व्यक्तिगत हल्ला/ईर्ष्या कोण जबाबदार असेल?
  6. यात काही प्रश्न नाही की यामुळे विकिपीडियावर पसारा वाढेल परंतु हा पसारा ५०००० लेखाचा असेल ज्याचे जबाबदार कोण नाही.
  7. असेस काही ठिकाणी इतर लोकांना एक मुद्धा भेटेल मराठी विकिपीडियाला बदनाम करायचा. नक्की चित्र विषयी व कॉपीराईट उल्लंघन बाबत काही कमी नखरे दिसले नाही.
  8. त्यामुळे जेव्हपर्यंत याचा उपाय भेटत नाही तोपर्यंत हा प्रस्ताव तसास ठेवावा अशी विनंती.

--Tiven2240 (चर्चा) १९:३७, २० नोव्हेंबर २०१८ (IST)Reply

उत्तर - सुरेश

संपादन
  • @Tiven2240: आपल्या मुद्यांवरून आणि निष्कर्षावरून आपण मी लिहिलेले धोरण आणि त्याची पूर्वपीठिका निट अभ्यासलेलेली नाही असेच लक्षात येते, तेव्हा आपण परत एकदा धोरण आणि त्याची पूर्वपिठीका अभ्यासावी आणि मग मत द्यावे.
  • मराठी विकि सुरू झालं तेव्हा चार टाळकी पण धड नव्हती, जर तेव्हाच ते माणसं नाही म्हणून रडत बसले असते तर आत्तापर्यंत आपण आलोच नसतो.
  • शिवाय उत्पात करणारे प्रचालकांना सांभांळता येत नसतील तर सर्व प्रचालकांनी त्यांच्याकडून उत्पाती सदस्यांवर कारवाई करणे शक्य नाही असे जाहिर करावे, समुदाय बघेल पुढे काय करायचे ते. उत्पात करणारे आहेत म्हणून काम करणे सोडायचे नसते.
  • हा धोरणाचा प्रस्ताव आहे त्यामुळे त्यात सुधारणांना वाव आहे, शिवाय हे नाही ते नाही असं रडत बसून गुणवत्तेशी प्रतारणा करण्ं जर आता मराठी विकिवर थांबवले गेले नाही तर, पुढे आणखीन विस्तारल्यावर खुप् अशक्य होईल. QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! २३:३५, २० नोव्हेंबर २०१८ (IST)Reply
आपल्या जवाबत मी विचारलेले प्रश्नांची उत्तरे सापडली नाही. कृपया प्रस्ताव करणारे सदस्य म्हणून आपले कर्तव्य पूर्ण करा. आशा आहे की आपण माझे मनात असलेली प्रश्न जे वर दिसत आहेत त्याचे जवाब द्याल. धन्यवाद. --Tiven2240 (चर्चा) ००:०६, २१ नोव्हेंबर २०१८ (IST)Reply

माझे मत - टायवीन

संपादन

@Tiven2240 आणि QueerEcofeminist:, वरील उताऱ्यातील तुमच्या चर्चेत कोण काय म्हणले आणि कोणी काय उत्तर दिले हे स्पष्ट होत नाही आहे. हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न मी करुन पाहिला परंतु अधिक गोंधळ होण्याची शक्यता दिसल्याने ते बदल परतवले आहेत. कृपया दोघांनीही आपआपल्या उताऱ्यांना अधिक स्पष्ट करावे. धन्यवाद. -- अभय नातू (चर्चा) ०९:४५, २१ नोव्हेंबर २०१८ (IST)Reply

@अभय नातू: मी वर या धोरणाचे विश्लेषण केले आहे व काही प्रश्न निर्माण झाले होते ते वर दिले आहेत. प्रस्ताव करणारे सदस्य ती शंका दूर करतील अशी अपेक्षा आहे. धोरण जितके स्पष्ट असले तितके चांगले, असे माझे मत आहे. किरइकोफेमिनिस्ट ते समुदायाला हे धोरण स्पष्ट करतील अशी अपेक्षा आहे धन्यवाद --Tiven2240 (चर्चा) १०:०९, २१ नोव्हेंबर २०१८ (IST)Reply

माझे मत - उत्तर सुरेश

संपादन
  1. ह्या मुद्यांना उत्तरे धोरणात आहेत, आपण धोरण तपासावे म्हणजे कळेल = १ - प्रतवारीची व्यवस्था धोरणाच्या शेवटी दिली आहे.
  2. प्रश्न २ साठी टायवीन यांनी स्पष्टिकरण द्यावे कारण त्यांचा प्रश्न मला समजलेला नाही.
  3. प्रश्न ३ साठी, प्रत्येक विधानाला संदर्भ असावा हे प्रत्येक ज्ञानकोशाचे अध्याऋत तत्व आहे, कारण त्यालाच ज्ञानकोष म्हणतात. आत हीच बाब इंग्रजीवर आणि मराठीवर येथे आहे. वास्तविक जर आपण गांभिर्याने कधी मुख्यनामविश्वात लिहिले असते तर ही बाब आपल्याला माहित असणे अपेक्षित आहे.
  4. प्रश्न ३ साठी, आपण धोरण परत वाचावे आपली शंका दुर होईल. माहिती धोरणात स्पश्ट लिहिलेली आहे.
  5. प्रश्न ५ साठी, विकिपीडिया नेमकेपणा हे साचे आहेत, त्यात आणखीन भर घातली जात आहे, माझ्या संपादनांवर एवढे लक्ष ठेऊनही आपल्याला माझ्या उपपानांवर ह्या साच्यांची मी केलेली यादी दिसली नाही ह्यातच आश्चर्य आपण साचे पाहू शकता. यांची माहिती मी गोळा करत आहे.
  6. प्रश्न ४ साठी, आपण दोन्हींही पातळ्यांच्या पुर्ततेच्या अपेक्षा निट पाहिलेल्या नाहीत त्या पाहून घ्याव्यात त्यात फ़रक उघड उघड दिसत आहे.
  7. प्रश्न ६ साठी, आपला प्रश्न कळलेला नाही. स्पष्टीकरण द्या.
  8. प्रश्न ७ साठी, एकेक लेख त्या त्या पातळीवर आणताना आपोआपच आपल्याला त्या त्या विकि-प्रकल्पाला उजाळा द्यावा लागेल आणि तेच अपेक्षित आहे, जेणेकरुन आपसूकच व्यवस्थात्मक सुधारणांना मार्ग उभा रहातो. हे मी आधीच माझ्या प्रस्तावनेत मांडलेले आहे.
  9. प्रश्न ८ साठी, ह्याचे धोरण वेगळे ठरवावे लागेल, जे ठरवता येईल.
  10. प्रश्न ९ साठी, लिखाण अर्थवाही असावे आणि निदान तेव्हढे व्याकरणशुद्ध केलेले असावे हीच किमान अपेक्षा आहे. आता तुम्ही विचारलेल्या प्रश्नाची वाक्यरचना पुर्णपणे चुकीची आहे, मी त्यातला अर्थ समजून/गृहित धरुन घेऊन उत्तरे देत असतो. तुमचा प्रश्न प्रत्येक संपादकांचे वेगळे वाक्यरचना आहेत तर योग्य कोणाचे? असा न लिहिता प्रत्येक संपादक वेगळी वाक्यरचना पद्धत वापरतात तेव्हा त्यातील योग्य कोणती? किंवा प्रत्येक संपादक वेगवेगळ्या भाषाशैली वापरतात तेव्हा त्यातील योग्य कोणती?. असे लिहिणे अपेक्षित आहे. तुमच्या वाक्यात नेहमीच लिंग आणि व्याकरणाच्या चुका असतात.
  11. प्रश्न १० साठी, विकिपीडिया:उल्लेखनीयता येथे हे धोरण आहे. आधीच्या लोकांनी धोरणे निश्चित केलीच नाहीत, त्यामुळे आता तरी ती करावीच लागतील त्यामुळे उल्लेखनीयता नसलेले लेख किती दिवस ठेवायचे ह्याचे धोरण वेगळे ठरवावे लागेल, जे ठरवता येईल.
  12. प्रश्न ११ साठी, प्रश्न मला तरी समजला नाही.
  13. प्रश्न १२ साठी, प्रश्न मला तरी समजला नाही.
  14. प्रश्न १३ साठी, मग आताच विकिपीडियावर उत्पात कमी नाही हे झाल्यावर भ्रष्टाचार/स्वार्थ/इतर गुण सुद्धा विकिपीडियावर दुसून येईल. मला कळले नाही, तुम्ही उत्पाताविषयी तक्रार करत आहात की, लेखांना गुणवत्ता नसावीच असे तुमचे म्हणणे आहे?
  15. प्रश्न १४ साठी, गुगल ट्रान्सलेटर वापरा तुम्हांला कळण्यासाठी हे धोरण मी इंग्रजीत भाषांतरीत करु शकत नाही.
  • माझी अशी अपेक्षा आहे की, टायविन यांचे प्रश्न संपले असतील तर आपण मुळ धोरणाकडे येऊयात आणि धोरणातल्या प्रत्यक्षात आणण्यात जर काही अडचणीं असतील तर त्याबद्दल बोलूयात.
  • आतापर्यंतच्या चर्चेवरून मला इतके तर लक्षात आलेले आहे की, सर्वसाधारणपणे धोरण आणण्याकडेच सर्वांचा कल आहे. अर्थतच लेखांना प्रतवारी असायलाच हवी ह्याची सर्व सूज्ञ सदस्यांना जाणीव आहे ह्याचे हे लक्षण आहे.
  • @Pooja Jadhav:@Pushkar Ekbote:@Usernamekiran:@Vikrantkorde:@संजीव कुमार:@सौदामिनी कल्लप्पा:@Aditya tamhankar: यांनीही आपले मत याबाबत मांडावे ही विनंती. आपण मला सक्रिय सदस्यांच्या यादीत दिसल्यामुळे आपल्या सर्वांना ह्या धोरणाच्या चर्चेत भाग घेण्यासाठी मी आमंत्रित केले आहे.
  • @Abhijitsathe: @Kaustubh:@Rahuldeshmukh101:@Sankalpdravid:@कोल्हापुरी:@सुभाष राऊत: शिवाय जवळपास निष्क्रिय प्रचालकांना नेहमी प्रमाणे मी प्रत्येक धोरणाच्या चर्चेत आठवण करून देतो ती आत्ताही करून देत आहे, आपले मत मांडा. QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! १३:०३, २१ नोव्हेंबर २०१८ (IST)Reply

उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद.
  1. प्रश्न २ अधिक स्पस्ट होण्यासाठी कृपया इटीसी पंजाबी, गणेश पेठ, पुणे, युरिया खत, चार्ल्स डार्विन पहावे. त्यात एकही संदर्भ नाही. आपल्या पातळीत त्याचे कुठले स्थान असेल?. आपले धोरणानुसार एका लेखात ३ संदर्भ असणे आवश्यक आहे तर असे लेखाचे काय?
  2. प्रश्न ३ मध्ये जर आपण धोरण पाहिले असेल त्यात असे कुठेही नमूद नाही की किमान प्रत्येक परिच्छेदाला एक संदर्भ असावा इंग्लिश भाषेत (At least every paragraph should have a reference) असे धोरण कुठल्याही विकिपीडियावर नाही. अभय नातू याना जास्त माहिती असेल. कृपया आपल्या माहिती असेल तर सांगा. माझे मते हे शक्य पण नाही आणि योग्य पण नाही.
  3. प्रश्न ४ मध्ये मी आपल्याला काय फरक आहे हे विचारले. नक्की जर मला भेटले असते तर मी विचारले नसते. तर कृपया फरक सांगा. फक्त शेवटची ओळीत आहे की साचे नसावे. परंतु जर NPOV इत्यादी असले तर पहिली पातळी सुद्धा पार नाही होणार. जर NPOV pass झाले तर साचा कुठून येणार?. त्यामुळे यावर चर्चा होणे आवश्यक आहे.
  4. प्रश्न ५ मध्ये साचे आपण तयार केले आहेत. छान यादी तयार केली आहे परंतु ती दुवे जे पानावर जात आहे त्यात हा मजकुर सुधारण्यासाठी उपाय आहे का? हे साचे कुठले पानावर वापरले आहे इत्यादी माहिती उपलब्ध आहे की? कृपया एकदा तपासा आणि todo lister मध्ये अशी पाने जोधा नक्की आपण हे सर्व मार्गदर्शन पानात भर घालू घालण्यास मदत करू शकता.
  5. प्रश्न ६ मध्ये आपन कुठली माहिती टाकण्यास प्रस्ताव करत आहेत? संचिका/चलचित्र तर फक्त कॉमन्स वर उपलब्ध आहेत इतर प्रकल्पात असलेले प्रताधिकार चित्र आपण कशे जोडू शकता. एकदा सैराट लेख पहा. यात तर चित्र/पोस्टर सुद्धा नाही तर असे लेख कुठले पातळीवर असतील याची माहिती द्यावे.
  6. प्रश्न ७ साठी नाताळ हा लेख २००८ व ख्रिश्चन धर्म हे २००७ मध्ये लिहिले/तयार केले गेले. परंतु विकिपीडिया:विकिप्रकल्प ख्रिश्चन धर्म हे २०१७ मध्ये मी सुरू केले. तर आपल्या धोरण मध्ये असे लेख पदोन्नत केले जाणार नाही का? उदाहरण जपान पहा याचे विकिप्रलकप विकिपीडिया:विकिप्रकल्प जपान आहे त्याला कुठले पातळी भेटेल?.
  7. प्रश्न ८ साठी आपण एकदा विकिपीडिया:शैली मार्गदर्शक पहा. हे धोरण त्यासाठी लागू होते. त्याची माहिती आपल्याला नसेल हे तर माहीत होते पाहूया कुठले नवीन धोरण आपण यासाठी प्रस्तावित कराल.
  8. प्रश्न ९ चे उत्तर द्यावे, त्यात लिंग इत्यादी गोष्टी नंतर चर्चा करू, त्या अवसतेत काय होणार याची कल्पना करावे. SWOT analysis त्याला म्हणतात. आणि प्रत्येक धोरण निश्चित करण्यात ते बहू उपयोगी आहे. अभय नातू आपल्याला त्याची माहिती मराठीत देतील.
  9. प्रश्न १० , पूर्वी धोरण निश्चित करा त्यानंतर काम करूया.
  10. प्रश्न ११,१२,१३ मध्ये मी आपल्याला स्पष्टीकरणे विचारत आहे आणि त्यात तुम्ही मला प्रश्न करत आहे? जे धोरणात आपण लिहिले आहे तेच विचारले आहे की ते काय आहे. आपले प्रस्तावित धोरणात हे बोल्ड केलेले शब्द आहेत त्याचे स्पष्टीकरण अपेक्षित आहे.

प्रश्न तर संपले आहेत परंतु जवाब काही भेटला नाही. उद्या एका संपादक ही प्रश्न विचारण्यापेक्षा आजच यावर उपाय भेटेल तर चांगले. पुन्हा एकदा विनंती करत आहे की धोरण प्रस्ताव SWOT analysis करून पुन्हा प्रयत्न करा. इतरांना प्रश्न नाही निर्माण होतील असे धोरण मराठी विकिपीडियावर असले पाहिजे असे माझे मत आहे. आशा आहे की आपण त्यात हातभर लावून सहकार्य कराल. इथे आपण संदर्भ घेऊन भांडण्यापेक्षा चर्चा करून उपाय काढुया असे सदस्यांची गरज मराठी विकिपीडियाला आहे. धन्यवाद --Tiven2240 (चर्चा) १४:२४, २१ नोव्हेंबर २०१८ (IST)Reply

  • @Tiven2240 आणि QueerEcofeminist: इंग्रजी विकिपीडियावर उल्लेखनीयता सिद्ध होण्यासाठी ढोबळमानाने लेखाचा उल्लेख किमान तीन विश्वासाहार्य, लेखाशी असंबधीत स्रोतांमध्ये असणे गरजेचे आहे. किती मजकुराला संदर्भ हवा ह्याबद्दल काहीच धोरण नाही. पण एक धोरण स्पष्टपणे सांगते कि लेखामधील सगळ्या मजकूराची स्रोतांमार्फत पडताळणी व्हायला पाहिजे (व्हेरीफिकेशन en:WP:V). उदा: जर एखाद्या शहराचा इतिहास चार परिच्छेदात असेल, आणि हे चारही परिच्छेद एकाच स्रोतात नमूद असतील तर प्रत्येक परिच्छेदानंतर तोच स्रोत/संदर्भ वापरण्यात येतो, पण परिच्छेद बिना संदर्भाचा ठेवता येत नाही. —usernamekiran(talk) ०९:२४, २२ नोव्हेंबर २०१८ (IST)Reply
जवाब अपेक्षित.--Tiven2240 (चर्चा) १६:३२, २३ नोव्हेंबर २०१८ (IST)Reply

@Tiven2240:
  1. प्रश्न २ साठी आपण ह्याच पानावरील चर्चा निट पहावी येथे नातू यांनी आपल्या शंकेचे निरसन आधीच केलेले आहे.
  2. प्रश्न ३ साठी आपले नक्की काय म्हणणे आहे की, संदर्भ नसावेत की असावे? आपण इंग्रजी धोरणाचा संदर्भ मागितला त्यात स्पष्ट उल्लेख आहे की, प्रत्येक वादग्रस्त विधानाला संदर्भ हवेत, प्रत्येक विधान हे तपासण्याजोगे असावे, तोच विकीच्या प्रमुख स्तंभापैंकी एक आहे. तेच मी वेगळ्या शब्दांत म्हणत आहे की, प्रत्येक विधानाला संदर्भ हवा, शिवाय इंग्रजीवर किंवा मराठीत जर याचे धोरण आधी असेल किंवा नसेल, आपल्याला आता ते हवे आहे की नाही हा इथे प्रश्न असणे अपेक्षित आहे.
  3. प्रश्न ४ साठी मजकूराला नेमकेपणा पैंकी कोणताही साचा नसावा. ह्या एकाच अपेक्षेत लेखामध्ये सुटसुटीत आणि पूर्ण शब्दांत लिहिलेला मजकूर असेल. हाच दोन पातळ्यातला मुलभूत फरक आहे, भाषेवर आणि मजकूराच्या स्पष्टतेवर काम होणे अपेक्षित आहे.
  4. प्रश्न ५ साठी अनेक बाबीं अजुन व्हायच्या आहेत पण त्या अर्धवट आहेत म्हणून लेखांच्या प्रतवारीला खो देणे मला योग्य वाटत नाही, हळूहळू जसे जसे लेख सुधारले जातील तसे तसे इतर बाबीही त्या लेखांना वरच्या पातळीवर नेण्यासाठी आपोआपच तयार केल्या जातीलच की. शिवाय मी साचे आणि त्यांची माहिती कारणमिमांसा याची पाने करितच आहे.
  5. प्रश्न ६ साठी, हा प्रश्न आपणच उत्तर द्यावे, ज्यात चित्र नसते त्याची पातळी खालचीच राहिल, चित्र जोडले की चित्र असलेली पातळी, अत्यंत सोपे आहे, आणि ते चित्र उपलब्ध करून घेणे हे तो लेख ज्याला वरच्या पातळीवर न्यायचा त्याचा उद्योग असेल.
  6. प्रश्न ७ साठी, साधा मुद्दा आहे जर त्या लेखाचे संदर्भातील प्रकल्प नसतील तर ते सुरू करावे, आणि लेखाला वरच्या पातळीवर न्यावे, प्रकल्प सुरू होईपर्यंत तो लेख त्याच पातळीवर राहील.
  7. इतर प्रश्नांची आणि ह्या वैयक्तिक ताशेऱ्यांमूळे मी आपल्या प्रश्नांची उत्तरे देणे नाकारात आहे, जर इतर कोणत्या सदस्याला टायवीनयांच्या प्रश्नांची उत्तरे देणे जमत असल्यास त्यांनी खूशाल द्यावीत.
    1. याबाबत चर्चा कधी होणार. त्याला तयार कोण करणार? यासाठी सुद्धा कार्यशाळा आयोजित कराल??- ह्या वाक्याचे कारण मला कळलेले नाही!
    2. असे झाले तर अ. ब आणि क तिघे मिळून कुठलेही लेख पुढे टाकतील. आताच विकिपीडियावर उत्पात कमी नाही हे झाल्यावर भ्रष्टाचार/स्वार्थ/इतर गुण सुद्धा विकिपीडियावर दुसून येईल. - मग आपल्या लेखांची पातळी कधीच ठरवायची नाही का? की, अधिक कार्यक्षम लोकांना जबाबदाऱ्या देऊन मनुष्यबळ वाढवण्याचा विचार करायचा, प्रत्येक विकिवर हे होतच असते पण गुणात्मक दर्जा वाढवायचा असेल तर धोरणे आणि त्याची अंमलबजावणी करणारे लोक आणावेच लागतील.
    3. बाकी सर्व तर काही कळत नाही डोक्याच्या वर गेले - आपल्याला माझी भाषा कळत नसेल तर मी नक्की काय करावे अशी अपेक्षा आहे आपली?
    4. असेस काही ठिकाणी इतर लोकांना एक मुद्धा भेटेल मराठी विकिपीडियाला बदनाम करायचा. नक्की चित्र विषयी व कॉपीराईट उल्लंघन बाबत काही कमी नखरे दिसले नाही. - कोणाचे नखरे आणि त्याचा आता इथे काय संबंध आपण प्रतवारीच्या धोरणाविषयी बोलत आहोत.
    5. कृपया एकदा तपासा आणि todo lister मध्ये अशी पाने जोधा नक्की आपण हे सर्व मार्गदर्शन पानात भर घालू घालण्यास मदत करू शकता. - माझ्या टूडू लिस्टवर टायवीन यांचे लक्ष का? हा माझ्या खाजगी बाबींवर केलेला आणखीन एक आक्रमणाचा प्रयत्न आहे.
    6. हे धोरण त्यासाठी लागू होते. त्याची माहिती आपल्याला नसेल हे तर माहीत होते पाहूया कुठले नवीन धोरण आपण यासाठी प्रस्तावित कराल. - मला काय माहित आहे आणि नाही याचा इथे का मुद्दा येतो?
    7. SWOT analysis त्याला म्हणतात. आणि प्रत्येक धोरण निश्चित करण्यात ते बहू उपयोगी आहे. अभय नातू आपल्याला त्याची माहिती मराठीत देतील. - अभय नातू ना माझे नोकर आहेत ना आपले त्यामुळे त्यांनी असल्या अनावश्यक संकल्पनांची माहिती मला का द्यावी?

@अभय नातू, V.narsikar, आणि सुबोध कुलकर्णी:

  • आपण आता मुळ चर्चेकडे येऊयात, फक्त नोंद म्हणून टायवीन यांच्या वैयक्तिक शेरेबाजीची नोंद मी येथे केलेली आहे.
  • धोरण असावे की नसावे हा माझ्यामते आता मुद्दा नाहीये, @Usernamekiran: ते सोपे कसे आणता येईल हा मुद्दा आहे, त्यामुळे असेसमेंट स्केल आणि इतर वेगवेगळ्या पद्धतींना एकत्र करून खूप विचारपूर्वक अनेक बाबी कमी मुद्यांत आणि तीनच पायऱ्यांमधे ह्या धोरणात बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे धोरणात अनेक बाबीं गोंधळ वाटण्याची शक्यता आहे.
  • आता खरेतर, लेखांना प्रतवारी देण्याची पद्धत काय असावी हे तपासणे आणि ठरवणे आवश्यक आहे, त्यासाठी मी प्रस्तावित केलेल्या धोरणांमधील मुद्दे चर्चेला सुरूवात करण्यासाठी वापरता येतील.
  • त्यामुळे मी येथे टायवीन यांचे प्रश्न संपलेले आहेत असे गृहित धरुन पुढील मुद्यांकडे जाण्याची विनंती इतरांना करित आहे. QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! ०१:४१, २४ नोव्हेंबर २०१८ (IST)Reply

माझे मत — usernamekiran

संपादन

प्रस्तावित प्रकल्प en:Wikipedia:Content assessment ह्या प्रकल्पासारखाच आहे. वरील मुद्दे वाचल्यानंतर खालील बाबी विचारात येतात:

  1. "शून्य पातळी" ही en:Category:Unassessed articles प्रमाणे असावी.
  2. "शून्य पातळी" आणि "उल्लेखनीयता" ह्या पूर्णपणे वेगळ्या असाव्या.
  3. "शून्य प्रत, पहिली, दुसरी, तिसरी प्रत" ह्या ऐवजी "अमूल्यांकीत", "क दर्जा", "ब दर्जा", आणि "अ दर्जा" अशी वर्गवारी असावी.
    • इंग्रजी विकीपेडिया वर जे लेख अतिशय छोटे आहेत, त्यांची वर्गवारी "stub" (en:Category:Stub-Class articles) करण्यात येते. ह्या वर्गवारीचा उल्लेखनीयतेशी काहीही संबंध नसतो.

वरीलप्रमाणे वर्गवारी करण्याचे ठरले तर त्यानंतर दर्जा कसा ठरवायचा हा वेगळा मुद्दा आहे. —usernamekiran(talk) ०८:५७, नोव्हेंबर २२, २०१८

@Usernamekiran: your given information is very beneficial for us. Can you please even say us the process of article grading on enwp. Is that too same like in the proposed policy? --Tiven2240 (चर्चा) ०९:३०, २२ नोव्हेंबर २०१८ (IST)Reply
@Tiven2240: इंग्रजी विकिपीडियावर FA > GA > B > C > stub/unassessed असे वर्ग आहेत. C आणि खालील वर्गाला चौकटीची गरज नाही. फक्त एक महत्वाचा फरक आहे: इंग्रजी विकीपेडियावर लेखाच्या विषयाची किती माहिती आहे, आणि किती माहितीला संदर्भ आहे ह्यावरून C आणि stub वर्गवारी होते. विकिलिंक्स, विकिडाटा, navigation box, side box, लेखातील विषयाला अनूसरून आवश्यक तेथे चित्रे, चलचित्रे, ध्वनीमुद्रणे, नकाशे, आकृत्या, इत्यादी गोष्टी केवळ GA, आणि FA दर्जासाठी गरजेच्या आहेत. त्याशिवाय सुद्धा लेख B दर्जापर्यंत जाऊ शकतो. सोप्प्या भाषेत/ढोबळमानाने लेख वाचल्यानंतर वाचकाचे किती समाधान होते, त्याला लेखाच्या विषयाची किती माहिती मिळते/उरते, आणि लेखामधील किती मजकुराला संदर्भ/स्रोत आहे, ह्यावर लेखाची गुणवत्ता/वर्ग ठरतो. —usernamekiran(talk) १०:०२, २२ नोव्हेंबर २०१८ (IST)Reply
@Usernamekiran: Can anyone do the assessment of the article? Or there is some other user group/assigned people/criteria as we see in this proposal --Tiven2240 (चर्चा) १०:०९, २२ नोव्हेंबर २०१८ (IST)Reply
@Tiven2240: anyone can do the assessment, but it is suggested that the editors with significant contributions to that particular article shouldn't assess it; and an uninvolved editor should do it. —usernamekiran(talk) १०:२६, २२ नोव्हेंबर २०१८ (IST)Reply

एक आठवण आणि माझे उत्तर

संपादन

@Usernamekiran: आणि @Tiven2240: आपण मराठी विकिपीडीयाच्या एका धोरणावर सर्वांना वाचण्यास आवश्यक पानावर आणि धोरणाच्या चर्चेत लिहित आहोत हे लक्षात ठेवून कृपया मराठीत लिहावे. आपल्या दोघांनीही आपली वरील पूर्ण चर्चा मराठीत लिहावी ही विनंती, अनेकदा सांगूनही आपल्या दोघांनाही हे लक्षात येत नाहीये की, आपण मराठी विकिवर सर्वांना कळेल अशा भाषेत लिहिणे अपेक्षित आहे, शिवाय आपण धोरणावर चर्चा करत आहात, हा तुमच्या दोघांमधला खाजगी संवाद नाही. आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद ! QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! १४:३६, २३ नोव्हेंबर २०१८ (IST)Reply

वरील लेखनावर टिप्पणी

संपादन

@Tiven2240 आणि QueerEcofeminist: खाली काही उदाहरणे दिली आहेत, त्याव्यतिरिक्त अजूनही आहेत:

  • "असेस काही ठिकाणी इतर लोकांना एक मुद्धा भेटेल मराठी विकिपीडियाला बदनाम करायचा. नक्की चित्र विषयी व कॉपीराईट उल्लंघन बाबत काही कमी नखरे दिसले नाही."
  • "आधीच्या लोकांनी धोरणे निश्चित केलीच नाहीत, त्यामुळे आता तरी ती करावीच लागतील त्यामुळे उल्लेखनीयता नसलेले लेख किती दिवस ठेवायचे ह्याचे धोरण वेगळे ठरवावे लागेल"
  • "शिवाय जवळपास निष्क्रिय प्रचालकांना नेहमी प्रमाणे मी प्रत्येक धोरणाच्या चर्चेत आठवण करून देतो ती आत्ताही करून देत आहे,"


येथे वैयक्तिक टिका टिप्पणी, शेरेबाजी, कोणावर दोषारोप करणे कृपया चर्चेत टाळावे.चर्चेशी संबंधीत नसलेली उदाहरणे देऊ नयेत.कोणी पूर्वी काय केले व ते चूक होते कि बरोबर याची चर्चा करण्यासाठी हा मंच नाही. असा उल्लेख कटाक्षाने टाळावा.चर्चा सुलभ रितीने व निकोप व्हावी व हेत्वारोप होऊ नये यासाठी विनाकारण चर्चेशी संबंधीत नसलेले मुद्दे येथे आणू नये. यात मग चर्चा भलतीकडे भरकटते. इतर सदस्यही मग प्रत्येकाचे उणे-दुणे काढू लागतील व फलित काहीच राहणार नाही.सर्व संबंधीत व चर्चेत यापुढेही भाग घेणारे सर्व सदस्य याची नोंद घेतील अशी आशा आहे. धन्यवाद.

--वि. नरसीकर , (चर्चा) १५:३२, २१ नोव्हेंबर २०१८ (IST)Reply

@V.narsikar: धन्यवाद. नोंद घेतली. --Tiven2240 (चर्चा) १६:१८, २१ नोव्हेंबर २०१८ (IST)Reply

@V.narsikar आणि अभय नातू:, बरे वाटले, तुम्ही या गोष्टीची वेळेत दाखल घेतली. धोरणात्मक चर्चा ही विधायक अंगाने व परिपक्वतेने व्हावी अशी जबाबदार सदस्यांकडून अपेक्षा आहे. चर्चेत असंबद्ध मुद्दे उगीच आणून चर्चा भरकटत नेणे, सदस्यांवर विनाकारण आरोप करणे, चुकीच्या गोष्टींचा आधार घेऊन लक्ष्य करणे हे थांबले पाहिजे. मी खर तर अशा असभ्य, शिवराळ, तथ्यहीन, खोट्या आरोपांना उत्तर देण्यात वेळ घालवत नाही. जे मी मागील वर्षी झालेल्या प्रकाराबद्दल केले. तथापि वर अशा (असेस काही...) व्यक्तिगत हल्ल्याचा दुवा देणे सर्वथा अनुचित आहे. संबंधित सदस्य उपरोक्त विधानात सुधारणा करतील अशी अपेक्षा आहे.प्रचालकांनी याची दखल घ्यावी ही विनंती. धोरण चर्चा व्यवस्थित सुरु आहे, त्यात खंड न पडता ती पूर्णत्वास नेण्यासाठी सर्व अनुभवी व सक्रीय सदस्यांनी योगदान नक्की मिळेल अशी माझी खात्री आहे. मी लवकरच सविस्तर मत नोंदवत आहे.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १०:४९, २२ नोव्हेंबर २०१८ (IST)Reply

माझे मत : सुबोध कुलकर्णी

संपादन

खालीलप्रमाणे लेखांची प्रतवारी असावी असे वाटते -

  1. न तपासलेले –सध्या असलेले सर्वच लेख सर्वप्रथम या वर्गात जोडले जावेत.
  2. शून्य दर्जा – त्रोटक (२०० शब्दांपेक्षा कमी), उल्लेखनीयता/प्रताधिकार/शैली/शुद्धलेखन/योग्य संदर्भ/npov यांची पूर्तता न करणारे, मशिन भाषांतर
  3. सामान्य दर्जा – वरील सर्व बाबींची पूर्तता करणारे + योग्य वर्गीकरण असलेले
  4. चांगला दर्जा - वरील सर्व बाबींची पूर्तता करणारे + माहितीचौकट, चित्र, विकिडाटा कलम जोडलेले, सर्व मजकुराला योग्य व वैध संदर्भ, बाह्य दुवे व हे ही पहा हे विभाग जोडलेले
  5. उत्तम दर्जा – विकी आधारस्तंभ व शैली मार्गदर्शक तत्वे यांचे संपूर्णत: पालन, उपलब्ध इतर विकी प्रकल्पांना जोड, आवश्यक चित्रे/नकाशे/ध्वनी

या निमित्ताने आपण सर्वच सक्रीय संपादकांनी आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. आपण अमुक एका दर्जाचे ५ नवीन लेख केले असतील तरच त्या दर्जाचे आणि त्याच्या खालील दर्जाचे लेख तपासण्यास आपण पात्र ठरु. आधी आपल्या अशा लेखांसाठी नामांकन करून चर्चा झाल्यावर प्रचालक असा संपादक गट जाहीर करतील आणि प्रत्यक्ष परीक्षणाचे काम सुरु होऊ शकेल. असे माझे मत आहे.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १४:२४, ९ डिसेंबर २०१८ (IST)Reply

आढावा

संपादन
१) सदस्य:सुबोध कुलकर्णी यांनी वर नमूद केल्यानुसार, त्यांचे सविस्तर मत अद्याप प्राप्त झाले नाही.
२) या चर्चेसोबतच उल्लेखनीयता यावरही चर्चा करून ते धोरण निश्चित करणे आवश्यक आहे व त्यावर अभय नातूंनी 'समांतर चर्चा करावी' असे नमूदही केले आहे.कारण, ते निकष ठरले नाहीत तर (किंवा सध्या असणाऱ्या निकषांची निश्चिती करेपर्यंत) पुढे जाता येणार नाही.पहिल्या पायरीवरच याची आवस्यकता पडेल. यावरही सर्वांनी विचार करावा/मत नोंदवावे.
३)सदस्य:QueerEcofeminist यांनी आवाहन करूनही सदस्य:usernamekiran व सदस्य:Tiven2240 याव्यतिरिक्त अन्य कोणाही सक्रीय सदस्यांनी आपले मत/विचार प्रगट केले नाहीत.येथे 'मला साद दिली नाही' या सबबीपोटी अन्य कोणीही सुजाण सदस्यांनी आपले विचार प्रगट करणे थांबवू नये असे मी पुन्हा एकदा आवाहन करतो. धन्यवाद.--वि. नरसीकर , (चर्चा) ०८:२२, २४ नोव्हेंबर २०१८ (IST)Reply
या धोरणावरील चर्चेचा थोडक्यात गोषवारा (हवा असल्यास) येथे बघता येईल. तो अद्याप अपूर्णावस्थेतच आहे.--वि. नरसीकर , (चर्चा) ०९:१८, १५ डिसेंबर २०१८ (IST)Reply

माझे मत

संपादन

नमस्कार! सर्वांची फार चांगली चर्चा वाचायला मिळाली ज्यातून बराच ऊहापोह झाला आहे.त्यात बर्‍यापैकी मुद्दे आलेले आहेतच ज्याबद्दल मला नोंदवावेसे वाटत होते. त्यामुळे पुनरूक्ती टाळून माझे मत नोंदविते. लेखात काय असावे? संदर्भ,चित्र याबद्दल चर्चा झाली आहेच त्यामुळे गुणवत्तेचे निकष याद्वारे निश्चित करता येतील. मला जाणवणारा महत्वाचा मुद्दा हा आशयाचा आहे प्रामुख्याने. नवे किंवा जुने, संपादक कुणीही असो, त्या लेखाचे शीर्षक हे समर्पक असलेच पाहिजे आणि त्या अनुषंगाने योग्य ते "ज्ञान" त्यात असावे. माहितीच्या जंजाळात संपादकांनी नेमका आणि अचूक आशय सांभाळत केलेले लेख हे प्रतवारीत अग्रक्रमात असावेत. संदर्भ हे त्याचे मूल्य वाढवतीलच आणि छायाचित्रे त्याचे सौंदर्य. एक मुद्दा चर्चिला गेला आहेच पण मलाही वाटते की रंगांचे निकषही निश्चित करावेत जे दृश्यपणे लेखाची प्रत चटकन् सांगून जातील आणि कमी प्रतीच्या लेखांना आधी न्याय देण्यासाठी ते चटकन् नजरेसही येतील. इंग्रजी विकीचे निकष पाळायला हवेतच आपणही संदर्भ म्हणून.पण मराठीतील संपादक अद्याप तयार होत आहेत.त्यामुळे इंग्रजीचे लेखांचे निकष तंतोतंत आपल्याकडे वापरता येतील लगेचच असे नाही. धन्यवाद!आर्या जोशी (चर्चा) १२:५८, १३ डिसेंबर २०१८ (IST)Reply

@आर्या जोशी:>>पण मलाही वाटते की रंगांचे निकषही निश्चित करावेत जे दृश्यपणे लेखाची प्रत चटकन् सांगून जातील<< या आपल्या मुद्द्याचा कृपया विस्तृतपणे खुलासा करावा. आपले नेमके म्हणणे काय आहे ते समजले नाही. धन्यवाद.--वि. नरसीकर , (चर्चा) ०९:१३, १५ डिसेंबर २०१८ (IST)Reply

@V.narsikar: नमस्कार! मला असे नोंदवायचे आहे की आशय,संदर्भ,छायाचित्र,विकीकरण यादृष्टीने तयार लेखांना "चांगला" लेख अशा अर्थी विशिष्ट रंगाची चांदणी लावावी. ज्यावर हे सर्व निकष आहेत पण तरीही अजून सुधारणा करण्याची गरज आहे त्यांना हिरवी चांदणी, भारंभार नुसतीच माहिती भरलेले पण विकीकरणाची आवश्यकता असलेले लेख "लाल" चांदणी लावलेले असावे. या मधला टप्पा म्हणून नव्याने तयार होणारे नव्या संपादकांचे किंवा जुन्याही संपादकांचे लेख "केशरी" रंगात असावेत म्हणजे नव्या सपादकांना त्या लेखांसाठी जुने सपादक मदत करतील. रंगांची नावे मी पटकन् सुचली ती लिहीली आहेत.आपण सर्वानुमते ती अंतिम करू. जे लेख होणे आवश्यक वाटते ते लेख सुरु करुन त्यालाही विशिष्ट रंग चांदणी लावू म्हणजे संपादक To Do यादीत ते नोंदवतील. मनात आले आणि विषय उचलून लेख केला असे न होता जरा वाचकवर्गाची गरज पाहून विषय निवडता येतील. धन्यवाद!आर्या जोशी (चर्चा) १०:२०, १५ डिसेंबर २०१८ (IST)Reply

हं. समजले . ताबडतोब उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद. आवश्यक बदल करतो. :) --वि. नरसीकर , (चर्चा) १०:५७, १५ डिसेंबर २०१८ (IST)Reply


हे धोरण आता पारित म्हणून ग्राह्य धरण्यास हरकत नसावी?

संपादन

@V.narsikar:@आर्या जोशी: @सुबोध कुलकर्णी: @Pushkar Ekbote:@Usernamekiran:

Return to the project page "लेखांची प्रतवारी".