सैराट

२०१६ मधली नागराज मंजुळेद्वारा निर्देशित मराठी फिल्म

सैराट हा नागराज मंजुळे दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे. नागराज मंजुळे, नितिन केणी आणि निखिल साने यांनी आटपाट प्रोडक्शन, एस्सेल व्हिजन प्रोडक्शन्स आणि झी स्टुडिओ या बॅनर अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती केली.[ संदर्भ हवा ] या चित्रपटाला अजय-अतुल यांनी संगीत दिले असून यामध्ये रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर या नवोदित कलाकारांची प्रमुख भूमिका आहे. २९ एप्रिल २०१६ रोजी हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला.[ संदर्भ हवा ]

सैराट
दिग्दर्शन नागराज मंजुळे
निर्मिती नागराज मंजुळे
नितिन केणी
निखिल साने
कथा नागराज मंजुळे
प्रमुख कलाकार आकाश ठोसर
रिंकू राजगुरू
संकलन कुतुब इनामदार
छाया सुधाकर रेड्डी
संगीत अजय - अतुल
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित २९ एप्रिल २०१६
अवधी १७० मिनिटे
एकूण उत्पन्न ११० करोड (US$२४.४२ मिलियन)[१]


विशेष संपादन

सैराट हा शब्द मराठीत पहिल्यांदा रा.ग. जाधव यांनी दादा कोंडके यांचा संदर्भात वापरला.[ संदर्भ हवा ] सैराट ह्या शब्दाचा उगम अर्थातच "स्वैर" म्हणजे स्वच्छंदी असा होतो. "मोकळा" ह्या शब्दापासून जसा "मोकाट" हा शब्द तयार झाला आहे, त्याचप्रमाणे, स्वैर शब्दापासून सैराट हा गावठी शब्द तयार झाला असला पाहिजे. उच्चभ्रू समाजात हा शब्द विशेष वापरला जातत नसल्याचे दिसून येते.[ संदर्भ हवा ]

कथानक संपादन

एका दलित जातीत जन्मलेला नायक, प्रशांत काळे (उर्फ परश्या) हा गावचा धनाढ्य आणि राजकारणात अतिशय सक्रिय असलेल्या पाटलाचा मुलीचा प्रेमात पडतो. त्यांचे प्रेम फुलविण्यामध्ये परश्याचे दोन मित्र, लंगड्या आणि सलीम शेख उर्फ सल्या, हे त्याला वेळोवेळी मदत करत असतात. घरच्यांचा विरोध पत्करून दोघेजण हैदराबादला पळून जाऊन लग्न करतात परंतु शेवटी सुडाने जळफळत असलेला आर्चीचा भाऊ त्यांना शोधून त्यांना ठार मारतो.[ संदर्भ हवा ]

कलाकार संपादन

संगीत संपादन

सैराट चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन अजय-अतुल यांचे आहे.[२] चित्रपटातील बहुतेक सर्व गाणी अजय-अतुल यांनीच लिहिली असून पार्श्वसंगीतही त्यांनीच दिले आहे. ज्याच्या पार्श्वसंगीताचे ध्वनिमुद्रण हॉलीवूड, कॅलिफोर्निया मधील 'सोनी स्कोरिंग स्टेज' या स्टुडिओत 'सिंफनी ऑर्केस्ट्रा'मध्ये झाले असा सैराट हा भारतातील पहिलाच चित्रपट आहे. या स्टुडिओमध्ये त्यांनी ४५ जणांच्या वाद्यवृंदासोबत या चित्रपटाच्या संगीताचे ध्वनिमुद्रण केले आहे. संगीतात सेलो, व्हायोलीन, हार्प, हॉर्न, ब्रास या वाद्यांचा वापर केला आहे.[३]

क्र. शीर्षकगीतकारगायक अवधी
१. Untitled  अजय - अतुलअजय गोगावले ०५:१४
२. Untitled  अजय - अतुलश्रेया घोषाल ०५:३४
३. Untitled  अजय - अतुल, नागराज मंजुळेचिन्मया श्रीपदा, अजय गोगावले ०६:०९
४. Untitled  अजय - अतुलअजय-अतुल ०३:४६
एकूण अवधी:
१९:४५

निर्मिती संपादन

नागराज मंजुळे यांनी या चित्रपटाची कहाणी सौम्य प्रेमकथा म्हणून लिहिली होती. त्यांचा उद्देश असाच़ होता की ह्या चित्रपटाने मागच्या काही चित्रपटांपेक्षा जास्त व्यवसाय करावा. चित्रपटाची कथाही त्यांचा स्वतःचा आयुष्याशी संबंधित आहे. त्यामुळेच चित्रीकरणासाठी सोलापूर जिल्ह्यातील जेऊर ह्या त्यांचा स्वतःचा मूळ गावाची निवड करण्यात आली.[४]

प्रदर्शन संपादन

हा चित्रपट महाराष्ट्र, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, कोलकाता, भिलाई, रायपूर, कर्नाटक, तेलंगण या ठिकाणी इंग्रजी उपशीर्षकांसहित प्रदर्शित करण्यात आला.[५]

बॉक्स ऑफिस संपादन

सैराट मराठी चित्रपट सृष्टीत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने आजपर्यंतच़े सर्व विक्रम मोडीत काढत आत्तापर्यंत ११० कोटींची कमाई केली आहे.[१]

पुरस्कार संपादन

या चित्रपटाची ६६व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झाली.[६][७] रिंकू राजगुरू हिला "एका चैतन्यशील मुलीचे प्रभावी चित्र रंगवण्यासाठी" २०१५ मध्ये ६३व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात स्पेशल जुरी पुरस्कार / विशेष उल्लेख पुरस्काराने (चित्रपट) गौरवण्यात आले.[८][९] 'महाराष्टाचा फेव्हरेट कोण ' यातील वेगवेगळ्या पंधरा पुरस्कारापैकी चौदा पुरस्कार मिळाले.[ संदर्भ हवा ] सैराट चित्रपटावरून हिंदीत 'धडक' निघाला आहे. श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर 'धडक'ची नायिका आहे.[ संदर्भ हवा ]

संदर्भ संपादन

  1. ^ a b "Sairat Worldwide Box Office Collection Crosses "110 CR"" (इंग्रजी भाषेत).
  2. ^ "अजय-अतुल मराठीत परतले!".
  3. ^ "'सैराट'च्या संगीताचं रेकॉर्डिंग हॉलिवूडमध्ये".
  4. ^ "डिस्क्रिमिनेशन एक्झिस्ट्स एव्हरिव्हेअर इन इंडिया: नागराज मंजुळे". 27 April 2016 रोजी पाहिले.
  5. ^ http://www.huffingtonpost.in/2016/04/29/sairat-review-interview_n_9803798.html%7Caccessdate=1
  6. ^ "प्रोग्रॅम: जनरेशन १४प्लस: सैराट [वाईल्ड]" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2016-04-15. 2 April 2016 रोजी पाहिले.
  7. ^ "वॉच : टीझर्स ऑफ 'फँड्री' डायरेक्टर नागराज मंजुळेज् नेक्स्ट, 'सैराट', सिलेक्टेड टु कॉम्पीट ॲट बर्लिन फिल्म फेस्टिव्हल" (इंग्रजी भाषेत). 2 April 2016 रोजी पाहिले.
  8. ^ "६३वी नॅशनल फिल्म ॲवॉर्ड्‌स" (PDF) (इंग्रजी भाषेत). 28 March 2016 रोजी पाहिले.
  9. ^ "आय ॲम एंजॉयिंग धिस मोमेंट टु द फुलेस्ट: रिंकू राजगुरू" (इंग्रजी भाषेत). 27 April 2016 रोजी पाहिले.