Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


नागराज पोपटराव मंजुळे हे मराठी कवी आणि चित्रपट दिग्दर्शक आहेत. "उन्हाच्या कटाविरुद्ध" हा त्यांचा काव्य संग्रह आहे. "पिस्तुल्या" या लघुपटाचे आणि फँड्रीसैराट या चित्रपटांचे ते दिग्दर्शक आहेत. सैराट हा मराठीतील पाहिला 100 कोटी कमाई केलेला सिनेमा आहे.

नागराज मंजुळे
जन्म जेऊर, सोलापूर, महाराष्ट्र, भारत
संकेतस्थळ www.nagrajmanjule.net


व्यक्तिगत जीवनसंपादन करा

हे सोलापूर जिल्हयातील, करमाळा तालुक्यातील जेऊर गावचे आहेत. त्यांचा जन्म वडार समाजात झाला.

शिक्षणसंपादन करा

वडार समाजात शिक्षणाचे प्रमाण अत्यंत कमी, तरीही नागराज यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण जेऊर येथे झाले. पुढील शिक्षणासाठी ते पुणे विद्यापीठात शिकायला आले. मराठी विषयात एम.ए. आणि पुढे एम.फिल केले. नगरच्या महाविद्यालयात मास कम्युनिकेशनचा दोन वर्षाचा कोर्स पूर्ण केला. आणि तिथेच प्रोजेक्टचा एक भाग म्हणून 'पिस्तुल्या' ही पहिला लघुपट निर्माण केला.[ संदर्भ हवा ]


करिअर [संपादन]संपादन करा

नागराजच्या 'पिस्तुल्या' या पहिल्या लघुपटाला आणि त्यातील बालकलाकार सुरज पवार यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. [१] शाळेत जाण्यासाठी दलित मुलांची इच्छा तसेच कुटुंबाच्या गरिबीमुळे तसेच त्याच्या जमातीसाठी ह्या समाजात खोलवर रुजलेले द्वेष आणि तिरस्कार या कारणांमुळे मुलांना औपचारिक शिक्षण मिळण्यासाठीची असमर्थता हा लघुपट दर्शवितो.प्रथम चित्रपट फँड्री फेब्रुवारी २०१४ मध्ये प्रदर्शित झाला. फँड्री (शब्द म्हणजे कैकाडी भाषेतील डुक्कर. [ संदर्भ हवा ] त्यांचा दुसरा चित्रपट 'सैराट' सर्वाधिक कमाईचा चित्रपट ठरला.[ संदर्भ हवा ] त्यांचा 'उन्हाच्या कटाविरूद्ध' हा कवितासंग्रहही प्रकाशित आहे.

कारकीर्दसंपादन करा

  • पिस्तुल्या(लघुपट)
  • फँड्री (मराठी चित्रपट)
  • सैराट (मराठी चित्रपट) : या चित्रपटाची ६६व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपटमेळ्यासाठी निवड झाली [२].

पुरस्कारसंपादन करा

  • त्याच्या 'उन्हाच्या कटाविरुद्ध' या कवितासंग्रहाला दमाणी साहित्य पुरस्कार मिळाला [ संदर्भ हवा ]
  • पुण्याच्या मुक्तांगण परिवारातर्फे देण्यात येणारा डॉ. अनिल अवचट संघर्ष पुरस्कार.[ संदर्भ हवा ]
  • साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचा वाग्‌यज्ञ पुरस्कार (२६-१२-२०१५)[ संदर्भ हवा ]

पुरस्कारसंपादन करा

संदर्भसंपादन करा