(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा)
चावडी विभागवार:

चर्चा
(विपी इतर चर्चा)

इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा

वादनिवारण
वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा

साहाय्य | मदतकेंद्र
नवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा

दूतावास
(Embassy)

नवी चर्चा जोडा
(Start new discussion)

प्रचालकांना निवेदन
प्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा


प्रचालकांचे मूल्यांकन
प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा


तांत्रिक
तांत्रिक मुद्दयांवर चर्चा.
विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा.
नवीचर्चा जोडा | वाचा

ध्येय आणि धोरणे
सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा

प्रगती
मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा
नवीचर्चा जोडा | वाचा


सोशल मीडिया
मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा
चावडी (सुचालन)

स्थापना
___

स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चा








या पानाचा उद्देश चावड्यांचे स्वरूप विदागारांचे व्यवस्थापन या बद्दल माहिती संकलीत करणे व संबधीत चर्चेचे विदागारीकरण (अर्काईव्हींग) करणे असा आहे.


अडगळीची खोली

संपादन

येथील बराच मजकूर ज्यावर चर्चा संपलेली वाटली तो विकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा ३४ येथे हलवला आहे. गरज वाटल्यास येथे परत आणावा.

अभय नातू १३:४६, २३ जून २०११ (UTC)

अभय, मी काम योग्य केले कि नाही का तुम्ही परत तेच काम केले हे मला कळेल काय?......मंदार कुलकर्णी ०६:२४, २४ जून २०११ (UTC)
मंदार,
तुझे काम अगदी बरोबर होते. तुझ्या कामानंतरचा भाग मी पूर्ण केला (नको असलेला मजकूर हलवायचा).
सकाळी अडगळीतील दुवे येथे देण्याचे राहिले. ते लवकरच पूर्ण करतो.
अभय नातू ०७:१८, २४ जून २०११ (UTC)
मराठी विकिपीडियाला नवीन दिशा आणि बळ
नमस्कार अभय,
मी अशा आशयाचे पान करण्यास आणि सांभाळण्यास तयार आहे. काय करायचे ते सुचवा. राहुल देशमुख १४:२७, २३ जून २०११ (UTC)
राहुल,
विकिपीडिया:चावडी/धोरण चर्चा किंवा तत्सम नावाचे पान तयार करणे.
येथील प्रत्येक सूचना/मुद्दा घेउन त्यासाठी नवीन पानावर एक विभाग तयार करणे.
तेथे चर्चा सुरू असताना लक्ष ठेवून तेथील अडगळ काढणे, सदस्यांना मार्गदर्शन करणे.
या पानाबद्दल चावडीवर वरचेवर आठवण करुन देणे.
इतके मला आठवते आहे. इतरांनीही यात भर घालावी.
अभय नातू १४:३९, २३ जून २०११ (UTC)
  • नव्या चावडीस विकिपीडिया:चावडी (ध्येय आणि धोरणे) असे नामकरण करावे का?
  • येथील प्रत्येक सूचना/मुद्दा घेउन त्यासाठी नवीन पानावर एक विभाग तयार करणे. -अभय नातू , हे थोडे अधिक विशारद करा (म्हणजे सूचना/मुद्दा आल्या नंतर नवीन पान करायचे किंवा कसे?)
विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे असे करावे म्हणजे ते उपपान होईल. प्रत्येक मुद्द्यासाठी नवीन पान अपेक्षित नाही. पण पान खूप मोठे झाले तर मग त्याची दोन-तीन पाने नंतर करू.
अभय नातू ०५:२७, २४ जून २०११ (UTC)
>>>>>>> स्ल्याश (/) च्या ऐवजी दुसरे काही चिन्ह वापरता येईलका ? जसे (-), (:-) वैगरे . स्ल्याश थोडा तांत्रिक होतो. राहुल देशमुख ०५:४७, २४ जून २०११ (UTC)


इतरांच्याही सूचना/प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत राहुल देशमुख १७:५१, २३ जून २०११ (UTC)


  • 'सूचना संकेत '
नवीन होऊ घातलेल्या चावडीवर (विकिपीडिया:चावडी (ध्येय आणि धोरणे))वाचकांना सुलभ जावे म्हणून काही सूचक साचे वापरावेत असे वाटते. सूचक साच्यांच्या मालिकेतील पहिला साचा, साचा:सूचना संकेत बनवला आहे. जर हि कल्पना ग्राह्य असेल तर इतरही साचे त्वरित बनून उपलब्ध करता येतील
  सूचना  
चावडी (ध्येय आणि धोरणे)
- प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत राहुल देशमुख १९:४५, २३ जून २०११ (UTC)

विकिपीडिया:चावडी (ध्येय आणि धोरणे)

संपादन
  • लोगो (स्मुती चिन्ह -चावडी (ध्येय आणि धोरणे))
विकिपीडिया:चावडी (ध्येय आणि धोरणे) ह्या नवीन होऊ घातलेल्या चावडी साठी लोगो तयार केला आहे. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत राहुल देशमुख ०४:४०, २४ जून २०११ (UTC)

लोगोतील अक्षरे

संपादन

या लोगोत रंगीत जिगसॉ तुकड्यांवरची "एलजीबीटी" ही अक्षरे नेमकी कुठल्या कारणाने मराठी विकिपीडियाशी संबंधित आहेत, ते कळले नाही. किंबहुना हे चित्र जर कॉमन्स किंवा अन्य ठिकाणाहून उचलले असेल, तर "एलजीबीटी" = "लेस्बियन गे बायस्क्शुअल ट्रान्सजेंडर" अर्थात "लेस्बियन गे उभयलैंगिक लिंगांतरित" माणसांच्या गटांना उल्लेखण्यासाठी इंग्लिश भाषेत वापरण्यात येणारे लघुरूप असायची शक्यता अधिक दिसते. शिवाय, या तुकड्यांवर सप्तरंग दाखवले आहेत; ते मानवी समाजातील अभिरुचि-वैविध्य अधोरेखित करण्यासाठी लेस्बियन-गे-उभयलैंगिक-लिंगांतरित व्यक्तींच्या सामाजिक व कायदेशीर हक्कांसाठीच्या चळवळीत वापरले जातात. मराठी विकिपीडियाचा या चळवळींशी थेट संबंध येत नसल्याने, सध्याचा लोगोप्रस्ताव संदिग्ध वाटतो.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०२:२७, २५ जून २०११ (UTC)


संकल्प, सूचना/प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद. लोगो विकसित होतो आहे. हो मूळ विकी ग्लोब हा कॉमन्स वरूनच घेऊन पुढे विकसित करीत आहो. क्रिएटीव कॉमन्स डेरिव्हेटिव अंतर्गत आपण तो विकसित करण्यास नियमानुसार अडचण नसावी असे वाटते.

  • संकल्पना :- लोगो मध्ये चावडी (ध्येय आणि धोरणे) प्रतिबिंबित करण्याचा दृष्टीने विपी चा ग्लोब दाखवला आहे आणि त्यास दोन रंगारी शिडीवरून सप्तरंग रंगवतांना दाखवले आहे.
  • अर्थबोध :-
  1. मूळतः विपी हा कृष्ण धवल दाखवला आहे
  2. विपीला रंगवणे हे नूतनीकरन/बदलावाचे प्रतिक आहे
  3. रंगकाम वरील भागापासून सुरवात करून अपूर्ण अवस्थेत हे दर्शवते कि ध्येय ठरवण्याचे उद्दिष्ट आहे.
  4. सप्तरंग हे सर्वतर्हेच्या नवीन विचारांचे प्रतिनिधित्व करतात
  5. तर शिडी हि प्रगती आणि धोरण/दिशा दाखवते
  6. देन रंगारी हे सामुदाईक प्रयत्नांचे निरुपण करतात

लोगोत रंगीत जिगसॉ तुकड्यांवरची अक्षरे बदलवायची आहेत. चार अक्षरे द्यावी लागतील पण ती काय असावी येथे काम अडले आहे समर्पक अक्षरावर मी विचार करतो आहे ( चावडी, ध्येय -धोरणे , मराठी आदी. पर्याय बाद झाले कारण चारच अक्षरे हवी ) आपणास काही सुचले तर कळवा. स्लोगन सर्वानुमते मान्य झाला तर तोहि तळाशी लिहावा असे वाटते.- राहुल देशमुख १९:५८, २५ जून २०११ (UTC)

अक्षरे

संपादन

काही उमेदवार

  • अ, क किंवा ग - पहिले अक्षर/वर्ण
  • म - मराठी
  • ज्ञ - ज्ञान, शेवटचे अक्षर/वर्ण

अभय नातू २१:२२, २५ जून २०११ (UTC)

लोगोतील अक्षरे

संपादन

गमभन ही चार अक्षरे मराठी लेखनाचे प्रतीक आहेत. देवनागरी लिपी जरी इतर काही भाषा वापरत असल्या तरी गमभन ही संकल्पना त्यांच्यात असल्याचे ऐकिवात नाही. हीच चार अक्षरे लोगोवर असावीत....J १४:२६, २६ जून २०११ (UTC)

  • सूचकवचन (नारा/ स्लोगन)
विकिपीडिया:चावडी (ध्येय आणि धोरणे) ह्या नवीन होऊ घातलेल्या चावडी साठी सूचकवचन (नारा/ स्लोगन) सुचवीत आहे. इतरही सदस्यांच्या सूचनांचे स्वागत आहे. राहुल देशमुख ०५:३६, २४ जून २०११ (UTC)
.                                                          "मराठी पाऊल पडते पुढे..."
आत्तापर्यंत समर्थ रामदासांचे आपणासी जे जे ठावें, ते दुसर्‍यांसी सांगावे, शहाणे करूनी सोडावे, सकलजन. हे बोधवाक्य म्हणून वापरलेले आहे. हे विकिपीडियाच्या तत्त्वाला अगदी १००% जुळून आहे. आता यालाच आपले ऑफिशियल बोधवाक्य करावे हा माझा प्रस्ताव.
अभय नातू २१:२६, २५ जून २०११ (UTC)
छान. त्यातही शहाणे करूनी सोडावे सकलजन ही अर्धी ओळ गाळावी असा माझा प्रस्ताव. कारण शहाणे करून सोडायची जबाबदारी विकिपीडिया घेत नाही. पहिल्या दोन चरणांचेच काम येथे चालते (हलकेच घ्यावे) -मनोज ०६:३८, २० जुलै २०११ (UTC)
छान आहे.नवीन चावडी उपपानाचे मी स्वागतच करतो, पण आपल्याकडे विकिपीडिया:चावडी/प्रगती असे एक पान आधी पासून तत्सम चर्चेकरिता वापरले गेले आहे त्या पानाचे भविष्य काय असेल. दुसरे असे की विकिपीडिया:चावडी (ध्येय आणि धोरणे) करिता स्ट्रॅटेजी विकि वर जशी थ्रेड डिस्कशनची सोय आहे तसे तेवढ्या एका पाना करिता करणे जमण्या सारखे आहे का ? माहितगार ०५:५५, २४ जून २०११ (UTC)


माहितगार,
कॉमन्स सारख्या काही विकिंवर खूप सार्‍या सूचना स्वागत साचात दिल्या आहेत , तसा प्रयत्न करून पहावयास माझी ना नाही पण फळाबद्दल मला साशंकता वाटते.या पेक्श्ःआ भर सदस्य विकिपीडियावर येण्या पूर्वीच साप्ताहिके दृक्श्राव्य माध्यमे आणि पॉवरपाँईट प्रेझेंटेश आणि कार्यशाळातून सजग करता आले तर येथे येणार्‍या अडचणींचे प्रमाण कमी राहील.
>>माझ्या मते असे केल्यास एकाच ठिकाणाहून बर्‍याच माहितींकडे जाणारे दुवे मिळाल्याने नवीन सदस्यास बरे वाटेल. एका दुव्यावर जाउन मग आणखीन दुसर्‍या दुव्यावर जा, जर हवी ती माहिती मिळाली नाही तर तिसर्‍या ठिकाणी जा, असे करायला सामान्यत: नवा सदस्य नाखूष असतो. अशा वेळी खूप सूचना स्वागत साच्यात दिल्याने सदस्य खूष होण्याची शक्यता आहे. परंतु अति सूचना देण्याने सदस्य घाबरून न वाचण्याचीही शक्यता आहे.
संपादन संख्येवर आधारीत आपोआप पाठविल्या जाणार्‍या सहाय्यता संदेशांची सोय विकि सॉफ्टवेअर मध्येच असावी असा मुद्दा मी बगझीलावर मांडलेला आहे अर्थात ते काम होईल का नाही आणि झालेतर केव्हा हा लांबचा प्रवास आहे.
>>हा मुद्दा आपण बगझीलावर कधी मांडला आणि त्यावर काम होईळ की नाही किंवा झाले की नाही हे इतर सदस्यांस (उदा. मला) कसे समजू शकेल? त्यासाठी बगझीलावर एखादे पान आहे काय?
पण स्वागत प्रकल्पात संपादन संख्येवर आधारीत काही संदेश मी उपलब्ध केले आहेत त्यात सुधारणा आणि वापर करण्यास स्वयंसेवकांची आवश्यकता आहे.
>>हे संदेश मला कुठे पहावयास मिळतील आणि त्यात कायकाय सुधारणा अपेक्षित आहेत?
हा मुद्दा स्ट्रॅटेजी विकिवर आधीच मांडला गेला असल्यास पहावा नसल्यास तेथे मांडावा सोबतच बगझीलावरही हि बाब मांडता येईल पण बगझीला वर मांडण्यापूर्वी मराठी विकिसदस्यांची सहमती असल्याचे कौल घेऊन सिद्ध करून द्यावे लागेल.
>>स्ट्रॅटेजी विकि हा काय प्रकार आहे? मला त्याचा दुवा मिळेल का? आणि बगझीलावर विनंती कशी मांडता येईल? सध्या चावडीअंतर्गत ध्येयधोरणाचे नवे पान त्यार झाल्यावर आपण कौल घेउ.
या संबधाने मी आणि संकल्पने दोन वेगवेगळे प्रकल्प निर्माण केले आहेत पण त्यात सध्यातरी आमच्या आमच्या प्रकल्पात आम्ही दोघेच काम करतो :). इमेलच्या तळाशी माहिती देणारे साचे मागील काही वर्षांपासन उपलब्ध आहेत.वापरणारी मंडळी हवीत.
>>मला त्या प्रकल्पांचे दुवे द्या. मला वाटते की मीही सामील होऊ शकेन.
रिच टेक्स्ट एडिटर बनवण्याचे स्वागतच आहे त्या करता स्वयंसेवक हवेतच पण त्याही पेक्षा असे काम करणार्‍या व्यक्तीस त्या आंतर्भूत केलेल्या सहाय्य मजकुरात काय बदल हवेत हे मराठी विकिपीडियाची वाचक मंडळी मोकळे पणाने सांगत नाहीत असा आजवरचा अनुभव आहे
>>परत रिच टेक्स्ट एडिटर साठी कायकाय करता येईल?
>>इतर लोक मोकळेपणाने अनुभव सांगत नाहीत ह्यावर एक उपाय म्हणजे एखादी मोहीम हाती घेऊन अलीकडील कार्यरत सदस्यांच्या चर्चापानांवर भेटी देऊन त्याबद्दल विशद करणे. त्यांना मते/अनुभव मांडण्यास प्रोत्साहन देणे.
त्या शिवाय विशीष्ट पान.विशीष्ट वर्गातील पान संपादन करतानाही विशेष सूचना देण्याची व्यवस्था इंग्रजी विकिपीडियात काही ठिकाणी दिसते तशी मराठी विकिपीडियात करणे अशक्य नाही पण तीथे ही स्वयंसेवक हवेत हा मुद्दा येतोच.
>>आपण मला त्याबद्दल माहिती द्यावी. आवाका पाहून ते आपल्याकडे आणण्याचा मी प्रयत्न करेन किंवा इतर स्वयंसेवक जमवून पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. पण त्याबद्दल स्पष्ट माहिती हवी आहे.


राहुल,

नव्या चावडीस विकिपीडिया:चावडी (ध्येय आणि धोरणे) असे नामकरण करावे का?
येथील प्रत्येक सूचना/मुद्दा घेउन त्यासाठी नवीन पानावर एक विभाग तयार करणे. -अभय नातू , हे थोडे अधिक विशारद करा (म्हणजे सूचना/मुद्दा आल्या नंतर नवीन पान करायचे किंवा कसे?)
>>हे चावडीप्रमाणे वापरायचे आहे. पण त्या पानांवर फक्त धोरणे आदींसंदर्भात चर्चा व्हाव्यात.
स्ल्याश (/) च्या ऐवजी दुसरे काही चिन्ह वापरता येईलका ? जसे (-), (:-) वैगरे . स्ल्याश थोडा तांत्रिक होतो.
>>तांत्रिक होतोच, पण ते संगणंकीय आ/द्न्यआ/वलींच्या दृष्टीने योग्य आहे. ह्याचा अर्थ "/" चिन्हानंतरचे पान हे "/" चिन्हाच्या आधी दाखविलेल्या पानांतर्गत आहे अशा होतो. तांत्रिक क्लिष्टता घालविण्याच्या दृष्टीने एखादा सुलभ साचा तयार करावा, ज्यात चावडी, चावडी/प्रगती, चावडी/ध्येयधोरणे आदी दुवे बसवावे आणि त्यात "/"चे चिन्ह काढून टाकावे म्हणजे उदा. [[चावडी/धेयधोरणे|ध्येयधोरणॆ]]इ.
लोगो, नारा इ.
>>सध्या लोगो नारा आदी विषयांवर तटस्थ पण वेगळे पान असावे ह्याला माझा पाठिंबा आहे.
>>नार्‍यासाठी अभय नातूंनी जो नारा दिलाय - आपणासी जे जे ठावें, ते दुसर्‍यांसी सांगावे, शहाणे करूनी सोडावे, सकलजन. - त्याच माझा पाठिंबा आहे.
>>काही अक्षरे:- म - मराठी, वि - विकिपीडिया, ब - बदल आणि, ध्ये - ध्येयधोरणे. ही अक्षरे लोगोसाठी वापरता येईल.

माहितगार,

छान आहे.नवीन चावडी उपपानाचे मी स्वागतच करतो, पण आपल्याकडे विकिपीडिया:चावडी/प्रगती असे एक पान आधी पासून तत्सम चर्चेकरिता वापरले गेले आहे त्या पानाचे भविष्य काय असेल. दुसरे असे की विकिपीडिया:चावडी (ध्येय आणि धोरणे) करिता स्ट्रॅटेजी विकि वर जशी थ्रेड डिस्कशनची सोय आहे तसे तेवढ्या एका पाना करिता करणे जमण्या सारखे आहे का?
>>चावडी/प्रगती म्हणून जे पान आधीच आहे त्याचा वापर फक्त विकिपीडियावर होणारी प्रगती, लेखसंख्या विस्तार, आणि त्यासाठी काही बेत वगैरे तेथे मांडावेत. ह्या नव्या (धेयधोरणे) पानावर फक्त धेयधोरणांची चर्चा व्हावी.
>>थ्रेड डिस्कशनबद्दल अधिक माहिती मिळेल का?
अनिरुद्ध परांजपे १३:२९, २६ जून २०११ (UTC)

बोधवाक्य आणि चावडी

संपादन

"आपणासी जे जे ठावें, ते दुसर्‍यांसी सांगावे, शहाणे करूनी सोडावे, सकलजन" हे बोधवाक्य उत्कृष्ट आहे ते कायम करावे.

चावडी हे नाव बदलायची काय गरज आहे? गावाच्या चावडीवर गावकर्‍यांच्या गप्पा होतात आणि कधीकधी त्या गप्पांमधूनच गावाच्या प्रगतीसाठीची ध्येय धोरणे निश्चित होतात. हे सर्व चावडी या नावाने साध्य होते....J १४:२०, २६ जून २०११ (UTC)


प्रारूप आराखडा

संपादन
  • मराठी विकिपीडिया: चावडी (ध्येय आणि धोरणे ) ह्याचा प्रारूप आराखडा बनवणे बाबत.

माझ्या मते २३ जून पासून सदर विषयावर चावडीत बरीच चर्चा सुरु आहे. आता चर्चेला कृतीत प्रवर्तित करण्याची मोहीम त्वरित सुरु करायला हवी. मी प्रचालक श्री अभय नातू ह्यांना विनंती करू इच्छितो कि त्यांनी एक अथवा दोन जेष्ठ अनुभवी सदस्यांना आतपर्यंत झालेल्या चर्चेचा अनुषंगाने तसेच विपीच्या चाकोरींत बसेल असा "चावडी (ध्येय आणि धोरणे )" याचा प्रारूप आराखडा तयार करायची जबाबदारी द्यावी.

  • कालबद्ध कार्यक्रम पत्रिका ( उदाहरणा दाखल, बंधनकारक नाही )
  1. ३ जूलै पर्यंत चावडीतील चर्चा ग्राह्य धरवी
  2. ७ जूलै पर्यत प्रारूप आराखडा- प्रथम मसौदा प्रसिद्ध करावा
  3. १० जूलै पर्यंत त्यावर चावडीत चर्चा व्हावी
  4. १२ जूलै पर्यंत एक मताचे मुद्दे जाहीर करावे आणि विवादाच्या मुद्द्यांवर कौल ध्यावे (असल्यास)
  5. १४ जूलैला अंतिम आराखडा मान्य व्हावा
  6. १५ जूलैला गुरुपोर्णिमा , "चावडी (ध्येय आणि धोरणे )" अस्तित्वात यावी
  • एक अंदाज :- गेल्या महिन्यात पाचाहून अधिक संपादने करणारे (सांगकामे नसलेले) २५ सदस्य होते. त्यातील अनुभवी सदस्य ५०% म्हणजे १२ आणि त्यातून ह्या विषयात रस असलेले ५०% म्हणजे ६. थोडक्यात माझ्यामते ५-६ पेक्षा जास्त सदस्य ह्या प्रक्रियेत सहभागी होण्याची अपेक्षा नाही, तरी आपण सदर प्रक्रिया योग्य प्रकारे शक्य तितक्या लवकर पूर्ण करावी.

राहुल देशमुख ०५:४४, २८ जून २०११ (UTC)

केवळ माहितीसाठी विचारतो -सदर प्रक्रिया योग्य प्रकारे शक्य तितक्या लवकर - हा शब्दप्रयोग कशासाठी? - मनोज १९:३४, १० जुलै २०११ (UTC)

ध्येय आणि धोरणे

संपादन

ज्याप्रमाणे पार्लमेंट म्हटले की कंसात चर्चा आणि हाणामारी लिहावे लागत नाही. कारण तो अर्थ पार्लमेंट या शब्दात गृहीतच असतो. तद्वतच चावडी म्हटले की, गप्पा-टप्पा आणि ध्येय-धोरणे आपोआपच येतात. त्यामुळे चावडीपुढच्या ध्येय-धोरणे या अनावश्यक शब्दांना फाटा द्यावा....J १७:१८, १ जुलै २०११ (UTC)

संकीर्ण माहिती आणि नम्र आवाहन...!

संपादन

चावडी (ध्येय आणि धोरणे) ह्यावर आत्तापर्यंतची चर्चा थोडीशी विस्कळीत आणि अनेक कल्पनांचा ठाव घेणारी झाली आहे. ह्या चर्चेचा संक्षीप्त आणि मुद्देसूद गोषवारा संकीर्ण माहितीच्या निमित्याने येथे देत आहोत. सर्व सदस्यांना ह्या बाबतची आपली मते शक्य तितक्या लवकर चावडीवर मांडण्याचे नम्र आवाहन. ..!


 
चावडी (ध्येय आणि धोरणे)
  • १. हे पान का पाहिजे. आत्ता असलेली पाने (चावडी, चावडी/प्रगती, विविध कौलपाने, इ) का पुरेशी नाहीत.

विपी वर बरीच चर्चा पाने आहेत. बहुतेक पाने हि विशिष्ट उद्देशाने तयार करण्यात आलेली आहेत. आज पावेतो ध्येय आणि धोरणे ह्या बाबत आपण इतर पानांवर चर्चा करत आलो आहेत परंतु असे निदर्शनास आले आहे कि इतर विषयांच्या भाऊ गर्दीत ह्या महत्वाच्या विषयांस सातत्य, सामजस्य आणि गांभीर्याने हाताळण्यात आम्ही कोठे तरी कमी पडतो आहोत. तेव्हा यासाठी एक वेगळे पान करता येईल का? तेथे प्रत्येक सूचना/मुद्द्यावर विस्तारित चर्चा केल्यास त्याला योग्य तर्हेने संरचित करता येईल आणि त्वरित निर्णय घेणे सोपे जाईल.

  • २. या पानावर कोणकोणत्या विषयांवर चर्चा केली जाईल.
  1. ह्या ठिकाणी मराठी विपिच्या भविष्यातील ध्येय आणि धोरणे बाबत सर्व विषयांवर व्यापक स्तरावर धोरणात्मक ( High level Statergy ) चर्चा केली जाईल.
  2. ठरवलेल्या ध्येय आणि धोरण बाबत काही काळाने समीक्षाकारणाने पण चर्चा करता येईल.
  3. गरज पडल्यास धोरणांवरील पुनर्विलोकना साठी पण येथे चर्चा करता येईल
  4. वेग वेगळ्या चर्चा पानावर आलेल्या सूचनांचे सामाईक समालोचन येथे करता येईल
  • ३. या पानावर कोणत्या विषयांवर चर्चा करू नये.
  1. व्यक्तिगत समस्या
  2. मदतीसाठी
  3. दुरुस्तीसाठी सूचना
  4. सूक्ष्म सूचना
  5. गप्पा-टप्पा
  • ४. यात कोण भाग घेऊ शकेल.

ह्या मध्ये मराठी विपी वरील कोणताही सदस्य भाग घेऊ शकेल. सर्वाचे ह्या चावडीत स्वागतच असेल.

  • ५. या पानाच उद्दिष्ट काय.

ह्या पानाचे मुख्य उद्दिष्ट असे आहेत

  1. भविष्यातील मराठी विपी बाबत गंभीरतेने विचार करून योग्य ध्येय आणि धोरणे ठरविणे.
  2. ध्येयाची आखणी करणे
  3. ध्येय गाठण्यासाठी लागणारी धोरणे ठरवणे
  4. ठरवलेल्या धोरणांची योग्य अंमलबजावणी
  5. ध्येय आणि धोरणांचा नेमाने आढावा घेणे समीक्षा करणे
  6. गरज पडल्यास धोरणांवरील पुनर्विलोकन करून त्यांमध्ये परिवर्तन करणे
  • ६. इतर

सदर चावडी हि गंभीर विषयास धरून असल्याने सदस्यांना त्याकडे आकर्षित करण्यासाठी आणि चावडीवरील अनुभव अधिक सहज आणि सुखकर करण्यासाठी काही योजना - सदर चावाडीस वेगळे स्मरण चिन्ह वापरावे. ह्या चावडीस बोध वाक्य असावे तसेच चावडी वरील सहज अनुभवासाठी आकर्षक सूचना/संकेत साचे असावेत. ह्या गोष्टी जरी थोड्या व्यावसाईक स्वरूपाच्या वाटत असल्या तरी गंभीर विषयाकडे सदस्यांना आकर्षित करण्यासाठी आणि चावडीची लोकप्रियता वाढवण्यासाठी असे करण्यास हरकत नसावी. सदर चावडीचे संबंधित टिपणे मुख्य चावडीत प्रदर्शित करावे.

  • ७. पुरोगामी मराठी विपी

मराठी विपी हा पुरोगामी असावा म्हणजे प्रयोगशील असावा. सुरक्षीत जोखीम घेऊन काही प्रयोग जरूर केले पाहिजे. प्रयोग म्हणजे १००% यश अशी हमी कधीच देता येणार नाही. पण जोपर्यंत नवीन प्रयोग करणार नाही तोपर्यंत नवीन क्षितिजे सर करता येणार नाही, "प्रयोगांती परमेश्वर". कोंबडा कोणाचाही आरवो आम्हाला तर सकाळ होण्यात आस्था आहे.

धन्यवाद !

राहुल देशमुख १९:५८, ४ जुलै २०११ (UTC)

I fully agree with this. This is a important issue which Marathi Wikipedia community should discuss and think upon. Vibhijain ०९:३४, ८ जुलै २०११ (UTC)
माझा ह्याला पाठिंबा आहे. राहुल ह्यांनी पुढाकार घेउन सगळे महत्त्वाचे मुद्दे मांडून जो पाठपुरावा केलाय त्याबद्दल त्यांचे नक्कीच आभार मानायला पाहिजे. माझ्या मते, चावडी (ध्येय आणि धोरणे) ह्या पानामुळे बर्‍याच गोष्टी सुकर होतील.
अनिरुद्ध परांजपे ०३:१८, ९ जुलै २०११ (UTC)
या चर्चा पानाच्या निर्मितीला सार्‍यांचाच पाठींबा दिसतो आहे. चावडी शब्दास आक्षेप आहे. त्या आक्षेपाची चर्चा आणि निराकरण कालौघात होईल पण तोअ पर्यंत विकिपीडियाया:धूळपाटीचे उपपान वापरून चर्चापानाच्या निर्मितीस प्रारंभ करावयास हरकत नाही.
माझा या कल्पनेला पाठिंबा नाही, हे येथे नमूद करतो. -मनोज २२:१५, ९ जुलै २०११ (UTC)

चावडी कशाला हवा?

संपादन

चावडी(ध्येय आणि धोरणे) ह्यात चावडी हा शब्द कशाला हवा? चावडी म्हणजे शिळोप्याच्या गप्पा मारण्याचे ठिकाण. इथल्या गप्पांत एखादे धोरण ठरेल, पण गप्पांना काही ध्येय असते असे मला वाटत नाही. त्यापेक्षा चर्चापीठ असे नाव ठेवावे. पानाच्या सुरुवातीलाच कोणत्या प्रकारच्या चर्चा अभिप्रेत याचा एक नमुना यादी असावी. विपीसमोर सध्या कोणती ध्येये आहेत तेही सांगावे. चर्चापीठाचे पहिले पान संपून नवीन सुरू झाले तरी त्या पानाच्या सुरुवातीला हा मजकूर सुधारित स्वरूपात द्यावा....J १०:५२, ९ जुलै २०११ (UTC)

नमस्कार,
जे, आपणास चावडीवरील कोणत्या गप्पा शिळोप्याच्या वाटल्या?Namskar ११:०९, ९ जुलै २०११ (UTC)
एकतर मराठी विकिपीडिया हे शिळोप्याच्या गप्पा मारण्याचे ठिकाण नाही व्हिलेज पंप या इंग्रजी विकिपीडियावरील समकक्ष संकल्पना म्हणून हिंदी विकिने चौपाल शब्द निवडला तर मराठी विकिपीडियाने चावडी शब्द निवडला ज्या वेळी या शब्दाची योजना त्यांनंतर अग्दी बरीच वर्षेतरी त्यावर कोणताही आक्ःअ‍ॅप आला नाही हा असा आक्षेप प्रथमच येत आहे पण त्या पेक्षा महत्वाचे बहुतांश लोकांनी सवयीने हा शब्द स्विकारल्या सारखे वाटते.
त्याही पेक्षा महत्वाचा मुद्दा मध्यवर्ती चर्चा पानांचे अर्काईव्हींग करणे हे केवळ तारखांनुसारच जमू शकले आहे, आणि त्यामुळे जुन्या मध्यवर्तीचर्चा शोधणे(शोधताना) तसेच जिकिरीचे काम ठरते त्यात मी कसे बसे इंग्रजी विकिप्रमाणे वर शोधयंत्रात सुविधा जोडली आहे चावडी शब्द काढून टाकल्यास जून्या चर्चा शोधणे अजून बिक्ट ठरेल
मराठी शाब्दबंध संकेतस्थळतरी त्याची पुढील [प्रमाणे व्यख्या देते (R)(H)(E) पंचायत, ग्रामपंचायत, चावडी - पंचायतीचे काम जिथे चालते ती जागा "रामराव पंचायतीत गेले आहेत"
(R)(H)(E) चावडी - चारी बाजूंनी खुली असणारी बैठकीची जागा "चावडीवर लोक सभेकरिता जमले."
  • नावात काय आहे ?
शेक्सपियर म्हणतो नावात काय आहे ? कोणी गोविंद म्हणा कुणी गोपाल .... जो पावतो तो देव. आम्हाला तर सकाळ होण्यात आस्था आहे.

शेक्सपियरचे नाव

संपादन

१. या पानाला असलेली चावडी या संज्ञेबद्दल कोणालाच आक्षेप नाही. J यांचा नवीन पानाला चावडी म्हणण्याबद्दल आक्षेप आहे. तरी या पानाचे नाव बदलण्याचा बेत सध्यातरी मुळीच नाही.

२. नवीन पानाला देण्यासाठी आत्तापर्यंत तीन ठोस options पुढे आलेली आहेत.

  1. विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे
  2. विकिपीडिया:चावडी (ध्येय आणि धोरणे)
  3. विकिपीडिया:चर्चापीठ

माझा पाठिंबा १ आणि ३ला आहे. चावडी (ध्येय आणि धोरणे) हे विकिपीडियावरील इतर प्रकल्प पानांच्या नामकरणाशी सुसंगत नाही.

३. रामगोपाल वर्मा म्हणतो आणि माहितगार सुचवतात त्याप्रमाणे नावात काय आहे? राहुल आणि/किंवा इतर स्वयंसेवकांनी विकिपीडिया:धूळपाटी/चावडी-चर्चापीठ अशा मथळ्याखाली या पानाची रचना सुरू करावी. नावाबद्दलचा खल संपल्यावर मजकूर तेथे हलवता येईल.

अभय नातू १४:४१, ९ जुलै २०११ (UTC)


>>> रामगोपाल वर्मा म्हणतो ≈ माहितगार सुचवतात

:) मराठी विकिच्या संपादक मंडळींच्या घरी फिल्ड सर्वे घेतलातर मराठी विकिपीडियावरची मंडळी परिवारातील नवीन बालकाच्या नावा पेक्षा मराठी विकिपीडियातील शब्दाच्या सुयोग्यतेबद्दलची चर्चा दिर्घ काळ करतात असा घरचा आहेर मिळाला नाही म्हणजे झाले (मंडळी ह. घ्या.) त्यामुळे रामगोपाल वर्मा आणि माहितगार मध्ये = एवजी ≈ चिन्ह वापरले ; किमान धूळपाटीच्यातरी नावात काहीनाही हे निश्चीत त्यामुळे राहुलने निर्माणकेलेली धूळपाटी विकिपीडिया:धूळपाटी चावडी (ध्येय आणि धोरणे) मुख्य नावा बद्दल निर्णय होईल तोवर गोड मानून घ्यावी.नाहीतर राहुलचा इच्छित गुरूपौर्णिमेचा मुहूर्त अवघड !
माझा पाठींबा क्रमांक १ लाच आहे त्या शिवाय इतर नावे घेतलीतर चावडीतील जुने लिखाण शोधणे कर्मकठीण असेल आणि त्याचा सर्वात जास्त त्रास सहाय्यपाने लिहिणार्‍या व्यक्तींना होईल तसेच जुन्या चर्चा-निर्णयांचे दाखले देणे अवघड पडेल. क्रमांक १चा पर्याय न निवडल्यास हा त्रास आजना उद्दा जाणवून मंडळी पुन्हा ऑब्लीक वाल्यापर्यायाकडे निश्चीतच येतील असे वाटते . एखादा विषय वेगवेगळ्यावेळी वेगवेगळ्या लोकांकडून वेगवेगळ्याचावडीवर चर्चा होऊन परस्पर विरोधी निर्णय सहमती होणारच नाहीत याची खात्री देणे अवघड असेल ऑब्लीकमुळे विषय शोधावयास घेतल्यास चर्चा वेग्वेगळ्या चावडीवर झाल्यातरी ते लवकर लक्षात येणे सहाय्यकारक असेल माहितगार १६:४९, ९ जुलै २०११ (UTC)

>>>अपरिहार्य

ह्या चर्चा पानाच्या (मी चावडी शब्द टाळतो आहे !!) प्रमुख उद्देष्टान पैकी एक म्हणजे सुयोग्य प्रबंधन. जर तांत्रिक प्रबंधनाच्या दृष्टीने विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे हे उत्तम/अपरिहार्य आहे तर त्यावर अधिक चर्चा कशाला ? माझा पाठींबा क्रमांक १ ला आहे. राहुल देशमुख १७:२७, ९ जुलै २०११ (UTC)

फक्त ध्येयधोरणांसाठी नवी चावडी कशाला. नव्या चावडीत काही तांत्रिक युक्त्यांचा समावेश होऊन काम सोपे होणार आहे काय? तसे नसेल तर नवी चावडी करून उपयोग काय? गांभीर्याने चर्चा आतापर्यंतच्या चावडीवरही होऊ शकते. आणि गमतीजमतींची चर्चा कुणी करूच म्हटले, तर नव्या चावडीवर रोखता येणार आहे थोडीच? विकिपीडियाच्या जार्गनने भरलेली साईट व्यवस्थापनाशी संबंधित भरपूर निरुपयोगी पाने सध्या आहेतच. त्यात भर पडण्याशिवाय दुसरे काही होणार नाही असे वाटते. नव्या चावडीत पुढाकार घेणारे नवे सदस्य तांत्रिक दृष्ट्या पुढारलेले दिसतात. विकिपीडियाची आहेत तीच पाने अधिक नेत्रसुखद, संपादनसुलभ,सोपी आणि समकालिन ठेवण्यासाठी त्यांच्या या ज्ञानाची गरज आहे. उगाच म्यानेजमेंटचे जडजंबाल शब्द घेऊन नवी पाने रचण्यापेक्षा त्यांनी हे केल्यास मराठी विकिपीडियावर उपकार होतील. काहीतरी नवे होते आहे म्हणून मी तरी पाठिंबा देऊ शकत नाही याला, पहा बुवा. - मनोज २२:०२, ९ जुलै २०११ (UTC)

मनोज चर्चेत थोडेसे उशीराने उतरले आहेत , नवीन चावडी पान/विभाग असावा असे सर्वसाधारण एकमत दिसते आहे केवळ पानाचे नाव काय आहे यावर चर्चा चालू आहे.सध्याच्या या मध्यवर्ती चावडीवर सर्व विषय एकाच ठिकाणी चर्चीले जातात लोकप्रीय विषयांच्या भाऊ गर्दीत प्रतिसाद मिळावयास वेळ लागणारे गंभीर विषय मागे पडू शक्तात(मागे पडतात) या दृष्टीने चावडीस प्रयोजन आहे नाही असे नाही.(इंग्रजी विकिपीडीयावरही या करिता वेगळी चावडी आहे त्या शिवाय अशा चर्चांना न्याय देण्या करता मेटाने स्ट्रॅटेजी विकि या वेगळ्या बंधूप्रकल्पाची सुद्धा स्थापना केलेली आहे.
केवळ एका नवीन चर्चा पानाच्या निर्मितीस फारसा वेळ लागत नाही. वेळेचा अपव्याय असे पान असावे का नसावे असेल तर नाव काय असावे अशा चर्चातूनतर होत नाहीना हे मात्र पहाणे गरजेचे आहे. त्यामूले पान असावे का नसावे असण्याबद्दल संअती दिसते आहे नाव काय असावे या बद्दलचा निर्णय लवकर झाल्यास भवीष्यात नाव बदलल्यामुळे पुन्हा दुवे बदलण्यात होणारा वेळेचा अपव्यय टाळता येईल.माहितगार ०९:२३, १० जुलै २०११ (UTC)
इंग्रजीचा लेखसंख्येचा स्केल वेगळा, कार्यकर्त्यांची संख्या प्रचंड मोठी, कार्यकर्त्यांच्या मनोभूमिकेतही बहुसांस्कृतिकने आलेले प्रचंड वैविध्य. साहजिकच त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी केलेले उपायही खास त्यांचे. मराठी विकिपीडियाचा लेखसंख्येचा स्केल, कार्यकर्त्यांचे बळ, मराठी विकिपुढचे प्रश्न आदी गोष्टी इंग्रजीपेक्षा अगदीच भिन्न. तरीही म्यानेजमेंटची ही महागडी, वेळखाऊ-बळखाऊ इंग्रजी दवा गरीब मराठी विकिपीडियाला देण्याचा कुणाचा आग्रहच असेल तर मर्जी आपली सर्वांची. If the problems are not identical, why should be the solution? आणि दुसरी गोष्ट मतांच्या निव्वळ संख्येवर निर्णय घेणे मराठी विकिपीडियाने सुरु केले आहे का? तसे असेल तर या लोकशाहीसाठी केवळ प्रार्थनाच करणे हाती उरले म्हणायचे. आणि ट्रीटमेंटच्या सुरवातीलाच जी काय सेकंड, थर्ड, फोर्थ ओपीनियन्स त्यांची डिफरन्सेस असे सगळे मंथन, वेळेचा अपव्यय होत असेल तरी, होऊ देण्यातच शहाणपण आहे. -मनोज १९:३१, १० जुलै २०११ (UTC)
If the problems are not identical, why should be the solution? या मताचा मी सुद्धा आग्रही आहे.इथे मी इंग्रजी विकिपीडियाचा दाखला दिला पण तो मुख्य मुद्दा नाही. राहुल आणि अनिरुद्ध यांनी हा जो प्रस्ताव मांडला यात त्यांचे स्वतःचे विचार प्रतिबिंबीत आहेत इंग्रजी विकिपीडिया त्यांचे इन्स्पीरेशन नव्हते आणि नाही. (त्यामुळेच मी म्हणालो कि तुम्ही चर्चेत येण्यात थोडा उशीर झाला आहे.) भाग डेमॉक्रसीचाही नाही. उत्साही कार्यकर्त्यांचा उत्साहही समजून घेण्याची गोष्ट असते एखादी गोष्ट एखादी व्यक्ती मनःपुर्वक करू इच्छिते तेव्हा ते काम चांगले आणि व्यवस्थीत होते, आणि स्वयंसेवी गोष्टीत कोण कशात पुढाकार घेईल हि सहज बांधता येणारी गोष्ट नाही,उत्साहाला पूर्ण मोडता न घालता प्रवाहाला योग्य दिशा द्दावी.त्यात खूप जास्त वेळ खर्च होऊ नये हे तुमचे मत समजण्या सारखे आहे.पण मोडता न घालता त्यात थोडा थोडा आणि मर्यादीत वेळ द्यावा हे सांगितले की झाले. माहितगार २२:०१, १० जुलै २०११ (UTC)

चावडी, चौपाल, चावळणे, व्हिलेज पंप

संपादन

मराठीत चावडी हा शब्द हिंदीतून आला. मराठीतले प्रचलित अर्थ : कोतवाल कचेरी; गावातली सार्वजनिक जागा; संध्याकाळच्या वेळी इकडच्या तिकडच्या गप्पा मारण्याचे ठिकाण. चावळणे म्हणजे गप्पा मारणे. हा शब्द डांग जिल्ह्यातले आणि नाशिक जिल्ह्यातले आदिवासी रोजच्या जीवनात वापरतात. व्हिलेज पंप म्हणजे गावाचा पाणवठा.

हिंदीत चावडी म्हणजे धर्मशाळा आणि चौपाल म्हणजे ओसरी; पालखी; बैठक; वर छप्पर असलेली पण चारी बाजूने मोकळी असलेली जागा. ..J १०:२०, १० जुलै २०११ (UTC).

बाकी, मराठीत हिंदीतून शब्द येणे अवघड वाटते. हिंदी ही काही दशकांपूर्वी घडवलेली भाषा आहे (भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या काही काळ आधीपासून). त्याआधी हिंदुस्तानी या नावाने ओळखल्या जाणार्‍या बृहद्भाषेत अनेक भाषा येत. त्यामुळे वरील विधानाचा/ निष्कर्षाचा तपशील संशयास्पद वाटतो.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:२८, १० जुलै २०११ (UTC)

मूळ शब्द

संपादन

चावडी हा शब्द मूळ हिंदुस्थानीतून, पक्षी हिंदी भाषेतून मराठीत आला याची खात्री करून घेण्यासाठी मोल्सवर्थच्या कोशातले पान २७९ पहावे. तिथला मजकूर असा : चावडी (p. 279) [ cāvaḍī ] f (H) The Kotwál's hall, court, or tribunal in the market. 2 The place of business in a village; the village-hall. Used by travelers &c. 3 fig. Any place of resort for scamps and gossips; answering to alehouse, barber's shop &c. 4 (Because given at the चा0) Tax or money to be paid in to Government, esp. the land-tax....J १५:५४, १० जुलै २०११ (UTC)


नवीन चावडी

संपादन

नमस्कार,

चावडीचा नवीन अवतार प्रकट झाला आहे. याच बरोबर विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे हे नवीन पानही अवतरले आहे. या पानावर विकिपीडियाची धोरणे, ध्येय आणि संबंधित विषयांवर चर्चा अपेक्षित आहे.

गेले काही आठवडे यावर काम करुन गुरुपौर्णिमेचा मुहूर्त साधल्या बद्दल राहुल, माहितगार आणि इतर असंख्य संपादकांना धन्यवाद.

तुमच्या प्रतिक्रिया कळवालच.

अभय नातू १६:०७, १३ जुलै २०११ (UTC)