विकिपीडिया:चावडी/विकिपीडियात कळपट हवा

(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा)
चावडी विभागवार:

चर्चा
(विपी इतर चर्चा)

इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा

वादनिवारण
वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा

साहाय्य | मदतकेंद्र
नवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा

दूतावास
(Embassy)

नवी चर्चा जोडा
(Start new discussion)

प्रचालकांना निवेदन
प्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा


प्रचालकांचे मूल्यांकन
प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा


तांत्रिक
तांत्रिक मुद्दयांवर चर्चा.
विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा.
नवीचर्चा जोडा | वाचा

ध्येय आणि धोरणे
सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा

प्रगती
मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा
नवीचर्चा जोडा | वाचा


सोशल मीडिया
मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा
चावडी (सुचालन)

स्थापना
___

स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चा








Click on the 'cc to change the subtitle language

विकिपीडिया विशेष धूळपाटी पानांवर इनपुट मेथड्स "मराठी लेखन आपोआप चालू होणे (डिफॉल्ट)"स्वरूपात उपलब्धते करता सहमती विनंती

नमस्कार,

४ जून २०१३ पासून मिडियाविकिकडून दिल्या जाणाऱ्या भाषासुविधांकरीता मराठी विकिपीडिया सहीत युनिव्हर्सल लॅंग्वेज सलेक्टर हा मिडियाविकि विस्तार उपलब्ध झाला आहे. यात मराठी भाषेकरीता सध्या अक्षरांतरण (ट्रांसलिटरेशन), इनस्क्रिप्ट आणि फोनेटीक असे तीन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.मराठी विकिपीडियात (आणि इतर भारतीय भाषा विकिपीडियातही ) सर्वाधिक वापरकर्ते अक्षरांतरण (ट्रान्सलिटरेशन) पद्धती वापरतात हे उपलब्ध हिट्सच्या आकडेवारी वरून दिसून येते. [१]

लेखनामविश्वात रोमनलिपी चा वापर कमी होण्या करता ज्या वेगवेगळ्या गोष्टींचा फायदा झाला त्यात युनिव्हर्सल लॅंग्वेज सलेक्टरनेही मोलाचा हातभार लावला असल्याचे मुख्यनामविश्वातील आकडेवारीवरून दिसून येत आहे.पण विकिपीडिया:मराठी भाषेच्या वापराबद्दल धोरण/अभ्यास#स्थिती इथे मांडलेल्या आकडेवारीचा अभ्यास केला असता,विकिपीडीया:धूळपाटी/केवळ मराठी वर सराव करणाऱ्या व्यक्तींना खुपशा सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केल्या नंतरही जवळपास ६० टक्के एवढे जास्त प्रमाणात उपयोगकर्ते युनिव्हर्सल लॅंग्वेज सलेक्टरचे उपलब्ध कार्यान्वित करण्यात अयशस्वी होत असल्याचे दिसून येत आहे. अगदी विकिपीडीया:धूळपाटी/केवळ मराठी वरील मागची पाच संपादनात ४ रोमन लिपीत मराठी आणि एक इंग्रजी भाषेतील संपादन आहे.बरे हि सर्व मंडळी मराठी लेखन करण्याचे धूळपाटीवर शिकण्याचा पर्याय स्वत:हून निवडून तेथे पोहोचत असतात.तर निदान धूळपाटीवर सराव करताना त्यांना युनिव्हर्सल लॅंग्वेज सलेक्टरच्या मराठी लेखन प्रणाली "मराठी लेखन आपोआप चालू होणे (डिफॉल्ट)"स्वरूपात उपलब्ध व्हाव्यात असा प्रस्ताव ठेवत आहे.

अक्षरांतरण (ट्रांसलिटरेशन), इनस्क्रिप्ट आणि फोनेटीक आपण वेगवेगळ्या धूळपाट्या सरावाकरीता युनिव्हर्सल लॅंग्वेज सलेक्टर "मराठी लेखन आपोआप चालू होणे (डिफॉल्ट)"स्वरूपात उपलब्ध करून देऊ म्हणजे या किंवा त्या प्रकारच्या प्रणालीचाच पुरस्कार होतो आहे असे वाटण्याचाही संबंध नाही.

बराच मागे असाच प्रस्ताव पूर्ण विकिपीडिया साठी ठेवला होता पण त्यात एकाच अक्षरांतरण (ट्रांसलिटरेशन)प्रणालीचा पुरस्कार होतो आहे असे इनस्क्रिप्ट वापरकर्त्यांना वाटल्या मुळे बारगळला होता. या वेळी सर्वच प्रणालींकरता आणि केवळ विशीष्ट धूळपाटी पानाकरता प्रस्ताव ठेवत आहे, सोबतच यावेळी सर्व आकडेवारीही सोबतीस आहे.त्यामुळे मराठी विकिपीडिया समुदाय प्रस्तावास सकारात्मक अनुमोदन आणि सहमती देऊन आपल्या मराठीत लिहीणे अद्याप अवघड जाणाऱ्या बांधवांकरता सहाय्यभूत ठरेल अशी आपणा सर्वांकडून आशा करतो.