(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा)
चावडी विभागवार:

चर्चा
(विपी इतर चर्चा)

इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा

वादनिवारण
वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा

साहाय्य | मदतकेंद्र
नवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा

दूतावास
(Embassy)

नवी चर्चा जोडा
(Start new discussion)

प्रचालकांना निवेदन
प्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा


प्रचालकांचे मूल्यांकन
प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा


तांत्रिक
तांत्रिक मुद्दयांवर चर्चा.
विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा.
नवीचर्चा जोडा | वाचा

ध्येय आणि धोरणे
सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा

प्रगती
मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा
नवीचर्चा जोडा | वाचा


सोशल मीडिया
मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा
चावडी (सुचालन)

स्थापना
___

स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चा







मराठी विकिपीडिया सोशल मीडिया

संपादन

मराठी विकिपीडियाचा सोशल मीडियासाठी आपले मत इथे द्यावे...

प्रस्ताव

संपादन

मराठी विकिपीडियाचे दिशात एक पाहुल पुढे लोकांना विकिपीडियापासून अधिक लाभ घ्यावा म्हणून मराठी विकिपीडियाचे अधिकृत सोशल मीडिया करीता मी phabricator वर प्रस्ताव टाकला आहे. नवीन मुखपुष्ठात याचे आगमन करण्यास असा द्याय आहे. याचे रचना, मत आणि अन्य प्रस्ताव खाली नोंदवे

Phabricator प्रस्ताव https://phabricator.wikimedia.org/T163415

--टायवीन२२४०माझ्याशी बोला १९:५६, २० एप्रिल २०१७ (IST)Reply

माहितगारांचा मत

संपादन
डिअर टायवीन,
आपल्या तारुण्यसुलभ उत्साहा बद्दल आदर आहे. तरीपण मराठी विकिपीडिया एक खूप सावकाश निर्णय घेणारी कम्यूनिटी आहे. सोशल मिडीया बद्दल अद्याप कसलाही निर्णय झालेला नाही आणि प्रचालक किंवा ब्यूरोक्रॅटनी कोणताही निर्णय अद्याप घेतलेला नाही.
प्रत्येकजण आपापल्या जबाबदारीवर मराठी विकिपीडिया लेखाचे दुवे सोशल मिडीयावर देण्यास मुक्त आहेच. महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतीक बाजूंच्या संवेदनशीलता विरूद्ध बाजूस विकिपीडियचे स्वरूप इत्यादी बाबींचे बारकावे बघता मराठी विकिपीडियावरील लेख सोशल मिडीयावर डायरेक्ट कनेक्ट करणे मागच्या वेळी नाकारले होते. याही वेळी मी डायरेक्ट सोशल मिडीया कनेक्टीव्हीटीच्या बाजूने नाही.
मराठी विकिपीडियाच्या प्रसारार्थ राज्य मराठी विकास संस्था आणि CIS A2k चे फिल्डवर्क चालू असताना सोशलमिडीयाच्या माध्यमातून/कारणान्वये मराठी विकिपीडियाबद्दल गंभीर राजकीय सामाजिक किंवा सांस्कृतिक वाद उपस्थित होणे फिल्डवर काम करणाऱ्यांसाठी त्रास दायक ठरू शकते. किमान असे कोणतेही काम मराठी विकिपीडियाचा अनुभव नसलेल्या इंपल्सीव्ह व्यक्तिंच्या हाती असू नये.
इन एनी केस सोशल मिडीयाची ॲडमिनिस्ट्रेटरशीप ही एखाद्या जाणत्या अनुभवी मराठी विकिपीडियन ने करावयास हवी, आपण म्हणजे टायवेन गोंसाल्वीस यासाठी सुयोग्य उमेदवार ठरता असे वाटत नाही; कारण माझ्या व्यक्तिगत मतानुसार आपला स्वभाव इंपल्सीव्ह आहे आणि सामाजिक सांस्कृतीक आणि राजकीय बारकाव्यांबद्दल आपण पुरेसे अद्याप परिपक्व नाही आहात, काही सामाजिक सांस्कृतिक अथवा राजकीय वाद झाल्यास आपण सामोरे जाण्यास कितपत सक्षम आहात या बद्दल मला व्यक्तिश: शंका वाटते; त्या शिवाय विकिपीडियावर लिहिण्याचा अनुभव काही महिने किंवा वर्षांभरापेक्षा अधिक नाही त्यामुळे मराठी विकिपीडियाच्या अधिकृत सोशल मिडीयाची जबाबदारी आपण घेऊ नये आणि इतरांनी आपणास देऊ नये असे माझे व्यक्तिगत आणि स्पष्ट मत आहे.
आपण व्यक्तिगत पातळीवर सोशल मिडीयावर जे चांगले काम करु इच्छिता त्यासाठी आमच्या सदिच्छा सदैव आपल्या पाठीशी आहेत.
मराठी विकिपीडियावरून डायरेक्ट कनेक्टीव्हीटी देण्याचे माझे मन नाही तरीपण आपण अभय नातूंशी स्वतंत्र चर्चा करू शकता.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:२२, २० एप्रिल २०१७ (IST)Reply

अभय नातू यांचे मत

संपादन

१. मराठी विकिपीडियास अधिकृत सोशल मीडिया खाते असणे लाभदायक आहे. याचे फायदे अनेक आहेत. सविस्तर विवरण करणे आवश्यक नाही पण लागल्यास येथील अनेक सदस्य ते देऊ शकतील.

१.१ अधिकृत मुद्दाम तिरके लिहिले आहे. कोणतीही संस्था (विकिमीडिया फाउंडेशन, भारतातील चॅप्टर, इ.) किंवा सरकार (महाराष्ट्र शासन, भाषा संचालनालय), इ. अशा खात्यास अधिकृत करणार नाहीत. त्यांनी तसे करूही नये असे माझे मत. हा अधिकार मराठी विकिपीडिया समाजाने द्यावा

२. असे खाते मराठी विकिपीडिया समाजाचे असावे. एका व्यक्तीचे असू नये.

२.२ असे करण्यासाठी अनेक उपाय आहेत, सोशल मीडिया कंपनीशी संपर्क साधून अशा खात्याचा पासवर्ड दुहेरी करता येतो. एकापेक्षा अधिक व्यक्तींना हा कंट्रोल द्या. इतर प्रकल्पांनी हे कसे राबवले आहे याचाही अभ्यास करावा.

३. अशा खात्यातून काय प्रकाशित व्हावे याचे संकेत लिखित पाहिजेत. हे संकेत कटाक्षाने पाळले जावे (उदा. राजकीय टीका/टिप्पणी करू नये, जातीयवादी मजकूर लिहू नये, दिवसातून अधिकतम १ (किंवा २, किंवा ५...एक विवक्षित संख्या) वेळा मजकूर प्रकाशित व्हावा, इ.)

४. हे खाते २-३ पेक्षा अधिक व्यक्तींनी चालवू नये (मजकूर घालण्यासाठी) म्हणजे गोंधळ निर्माण होत नाही.

आशा आहे इतरही सदस्य यावर त्यांचेी मते देतील. यासाठी हा मुद्दा चावडीवर न्यावा.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) १९:२०, २० एप्रिल २०१७ (IST)Reply

संदेश हिवाळे यांचे मत

संपादन

टायवीन, तुम्ही माझ्यासारखेच फेसबुक या सोशल मिडियाशी जोडलेले आहात. मराठी विकिपीडियाचे अधिकृत पान फेसबुक वर असावे असे तुमचे म्हणणे आहे. मात्र याचे फायदे तोटे दोन्ही लक्षात घेणं आवश्यक आहे. माहितगार सरांनी तुमचे लक्ष काही तोट्याकडे केंद्रित केले व अभय नातू सरांनी काही फायद्याकडेही केंद्रित केले. हे फेसबुक पेज प्रभावी ठरू शकते जर ते पाच पेक्षा अधिक व्यक्तींनी चालवले (नियंत्रणाखाली) तर आणि त्यातही ते सर्व मराठी विकिचे मोठे अनुभवी असावेत. त्यांना केवळ नवीन सदस्यांना विकिकडे आकर्षितच करणे जमायला नको तर इतरांच्या सामाजिक, राजकिय, धार्मिक इत्यादी भावना दुखवणार नाही याचीही ते काळजी घेणारे असावेत. माझ्यामते वरीलप्रमाणे नसले तर, सोशलमिडियावरील विकि पेज तोट्याचेच ठरेल. वरील प्रमाणे गोष्टी असल्या तर माझे समर्थन आहे.

हिंदी विकि प्रमाणे मराठी विकि सदस्यांचाही एक व्हॉट्सएप ग्रुप असणे महत्त्वाचे आहे, हे मी नेहमीच म्हणतोय. येथून सुरूवात केली तर चर्चा व फायदा जास्त वेगाने होईल. तुम्ही याबाबतही विचार करावा. संदेश हिवाळे २३:२४, २१ एप्रिल २०१७ (IST)Reply

@संदेश हिवाळे: फेसबुकवर असे आहे की एक पान एक पेक्षा अधिक लोक चालवू शकतील. अन्य पान जसे @अभय नातू: यांनी सांगितले तसे कंपनी याना बोलून आपण जास्त लोग एक खाता चालू शकते. परंतु @माहितगार: यांनी आपले विरोध phabricator पर्यंत पोचवले ज्यांनी आपल्याला सोसिअल मीडिया करीता ई-मेल नाही भेटू शकते. जर आपण आपले समर्थन phabricator वर दिले की मग आपण पुढची पायरी म्हणजे खातेचा प्रस्ताव तयार करून शकतो.@सुबोध कुलकर्णी: जर आपण ई-मेल भेटले की मग आपण ई-मेल लिस्ट suscribe करून एका अधिकृत तरिकेने संवाद साधू शकतो.आपण आपले समर्थन https://phabricator.wikimedia.org/T163415 घ्यावे --टायवीन२२४०माझ्याशी बोला ११:१४, २२ एप्रिल २०१७ (IST)Reply
@टायवीन,
मराठी विकिपीडिया बाबतचे निर्णय मराठी विकिपीडिया घेते फॅब्रीकेटर नव्हे. प्रत्येकाने जाऊन फॅब्रीकेटरवर मते नोंदंवण्यासाठी ते मराठी विकिपीडियाची चावडी पान नाही. विकिपीडिया लोकशाही सुद्धा नाही सहमती ज्या गोष्टीवर होईल त्या बाबत फॅब्रीकेटरवर प्रचालक संवाद साधतील यापुढे आपण किंवा इतर सदस्यांनी सहमती न झालेले गोष्टी फॅब्रीकेटर अथवा इतर ठिकाणी परस्पर नेण्याचे कृपया टाळावे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १८:०३, २२ एप्रिल २०१७ (IST)Reply

@Mahitgar: आतापर्यंत झालेल्या चर्चेत ५/४ लोकांचे मत आहे की मराठी विकिपीडिया एक पाहुल पुढे जाऊन सोशल मीडियाची खाते बनवता येईल. तुम्ही याचे विरोध केला मुले मी खूप आभारी आहे यांनी आपल्याला त्याचे negative पार्ट दिसले.यामुळे तुम्ही सोशल मिडीयावर काय लिहावे काय लिहू नये याच्या संकेतांची सुस्पष्ट यादीचा निर्माण लवकर करा आणि आपलेही समर्थ देऊन phabricator वर मराठी विकिपीडियाचे प्रचालकांच्या नात्याने मेलिंग लिस्ट पास करण्यास परवानगी द्या --टायवीन२२४०माझ्याशी बोला १९:११, २२ एप्रिल २०१७ (IST)Reply

माझा अभिप्राय

संपादन

विकिपीडिया व सध्याचे विविध सोशल मिडिया यांच्या उद्दिष्टांमध्ये व प्रक्रियेमध्येही खूप मुलभूत फरक आहे. तशा कोणत्याही विरुद्ध गोष्टी अपवादाने एकमेकांना उपकारक ठरतात.हे अपवाद तपासून पाहण्यासाठी आपण स्वत: तसे प्रयोग करून पहाणे आवश्यक आहे. अनेक लोकांनी काही काळ हा अनुभव घ्यावा व सर्वांना शेअर करावा. यातून या चर्चेला एक आधार मिळेल. ब्लॉग, फेसबुक इ.वर लिहिणाऱ्या लोकांना विकिपीडियाकडे वळविणे, त्यांचे लक्ष वेधणे हे स्वयंप्रेरणेने व सतत पाठपुराव्यानेच साध्य होईल. जाहिरात,लाईक्स,हिट्स यातून अल्पजीवी समाधान मिळेल.
संदेश यांच्या मताशी मी सहमत आहे, पण व्हॉट्सएप ग्रुपच्या ऐवजी ईमेल गट व्हावा. ईमेलवर गांभीर्याने, विस्ताराने चर्चा होते व त्याचे दस्तऐवजीकरण सुसूत्रपणे होते. मराठी विकी समाज संघटीत होणे, देवाणघेवाणीतून परिपक्व होणे ही प्राधान्याची गोष्ट आहे असे मला वाटते.
-सुबोध कुलकर्णी (चर्चा) १०:२६, २२ एप्रिल २०१७ (IST)Reply

प्रथमेश ताम्हाणे यांचे मत

संपादन

मी सुद्धा सुबोध कुलकर्णी, अभय नातू आणि संदेश हिवाळे यांच्या मताशी सहमत आहे. अनुभवी विकिपीडियन्सनी मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया खाते उघडून काही दिवस ते चालवून बघण्यास हरकत नाही. त्यावरील पोस्टींचे स्वरूप कसे असावे, काय लिहावे, काय लिहू नये याचे निकष ठरवून हा प्रयोग करून पहावा असे माझे मत आहे.
मराठी विकिपीडिया समुदायाच्या गटाबद्दल व्हॉट्सॲप ऐवजी ईमेल गट व्हावा या सुबोध कुलकर्णी यांच्या मताशी मी सहमत आहे. https://lists.wikimedia.org/mailman/listinfo/wikimedia-mr इथे मराठी विकिमीडियाची मेलिंग लिस्ट आहे. त्याच लिस्टमध्ये सदस्यांना ॲड करता येईल किंवा तत्सम नवी मेलिंग लिस्ट तयार करता येईल.
--प्रथमेश ताम्हाणे (चर्चा) ०१:०९, २३ एप्रिल २०१७ (IST)Reply

प्रबोधचे मत

संपादन

फक्त मराठी विपिचे सोशल मिडिया खाते असावे एव्हढाच प्रस्ताव अपूर्ण वाटतो. यावर काही निर्णय घेण्याआधी त्याची रुपरेषा तयार करण्यात यावी. व त्यावर कौल घेण्यात यावा. ही चर्चा म्हणजे consent ठरत नाही, phabricator वरचा दावा चुकीचा आहे. @अभय नातू: यांनी काही गोष्टी मांडल्या आहेत. यावर अधिक चर्चा व्हावी.

सर्वात महत्वाची बाब अशी की, सोशल मिडिया खाते (फेसबुक, ट्विटर इ.) हे मराठी विपिच्या कक्षेबाहेर आहेत. त्याचे अधिकार manage करणे हे तेव्हढे सोपे जाणार नाही. तेथे विपि सारखी लोकशाही प्रक्रिया नाही. कुठलेही अधिकार आले की, इगो, भांडणे, आरोप-प्रत्यारोप आले. मराठी विपिच्या जुन्या-जाणत्या सदस्यांना याचा चांगलाच अनुभव आहे. जर कोणास उत्सुक्ता असेल तर् जुन्या चर्चा बघाव्या.

ही संकल्पना वाचल्यावर माझी पहिली प्रतिक्रीया खाते असावे हिच होती. परंतु आता सर्व बाबींचा विचार करता मी या प्रस्तावाचा सध्यातरी विरोध करतो. यावर अधीक चर्चा करण्यास मी तयार आहे. परंतु आपण हे काम अनाधिकृतपणे पण चालू करू शकतो. फेसबुकवर मरठी विपिचा फेसबुक ग्रुप आहे. याचा वापर करावा. @सुबोध कुलकर्णी:@प्रथमेश ताम्हाणे: यांनी सुचवल्याप्रमाणे प्रायोगीकतत्त्वावर एक पेज तयार करून पाहू शकतो. - प्रबोध (चर्चा) ०२:२७, ३ मे २०१७ (IST)Reply

ता.क. मी फेसबुक वर पाने बघत असताना मराठी विकिपीडिया हे पान तयार झाले. प्रयोगासाठी हे वापरायचे असल्यास कळवावे. अथवा मी हे पान डिलीट करतो. - प्रबोध (चर्चा) ०२:४१, ३ मे २०१७ (IST)Reply
@Prabodh1987: तुम्ही याची सुरुवात केली आहे ते पहिले. जसे अभय नातू यांनी सांगितले ""एका व्यक्तीचे असू नये"" यावर उपाय काय?. माझी माहितीनुसार फेसबुक दुसर्यांना देऊ शकते परंतु ट्विटर इन्स्टाग्राम याचे काय?. पण बनवले यावर माहिती टाकायची कुठली? पहिल्यांदा दुसऱ्या विकिपीडिया खाते कसे चालवतात याची माहिती घ्या उधारण मी केलेली विनंती स्वीकार झाली याची माहिती मी विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा#मराठी विकिपीडियाला अभिनंदन इथे दिली आहे. अभय नातूच्या प्रश्नांचा व इतर लोकांचे मार्गदर्शन घेऊन मी phabricator वर प्रस्ताव टाकला होता. परंतु जेव्हा @Mahitgar: म्हणाले की ""hence forth only mr-wiki sysops will communicate community decesion and no one else"" यावर पुढे आपण काय करू शकते का? त्यांचे बोलण्याने असे सिद्ध होते की मी जे करत आहेत ते सर्व माझ्या स्वार्थ करिता आहे. हे सर्वांनी मला काय व इतर संपादकांना भेटणार काय याची माहिती नाही मला. जेव्हा अधिकारी यावर तयार नाही तर मी दुसऱ्यांना (वर उपाय देणारे) लोकांचे लक्ष केंद्रित करून फायदाच नाही. १ मे मराठी विकिपीडियाची स्थापना झाली असे सोसिअल मीडिया सुद्धा १ मे च्या दिवशी झाले असते परंतु सर्व व्यर्थ झाले असे दिसते. आज पुन्हा एकदा या विषयावर चर्चा सुरू झाली आहे यांनी समजून येते की याची गरज आहे कुठे तरी. जेव्हा आपण एक दुसऱ्याला आपले मनुया तेव्हाच काम होणार. साहेब म्हणतात ""Things are getting misrepresented"" परंतु दुनियेचा १७वे विकिपीडियाचे २५५ पेक्षा १९वा सक्रिय सदस्य आहे. इतकी तर माहिती आहे की कुठे पुढारीपण गेयाचे. परंतु अजून खूप बोलण्यास इच्छितो परंतु तुमचा मान ठेवतो.परंतु मराठी विकिपीडियाचा प्रगती आपला ध्येय. तुम्हीही तेच मार्गात आम्हीही त्याच मार्गावर याचे खूप काही फायदे आहेत परंतु 👇 आपले सदस्य नाव नोंदवून काय कार्य करणार हे जरूर नोंदवे करण लिमिटेड सीट्स अवलेबल 😂😂 --टायवीन२२४०माझ्याशी बोला ०८:२९, ३ मे २०१७ (IST)Reply


सोशल मीडियावर लिखाणाचे संकेत

संपादन

काय लिहावे

संपादन
  • नवीन मुखपृष्ठ सदर प्रकाशित झाल्यावर मुखपृष्ठाचा दुवा आणि सदराच्या विषयाबद्दल एक-दोन ओळी.
  • नवीन उदयोन्मुख लेख प्रकाशित झाल्यावर मुखपृष्ठाचा दुवा आणि लेखाच्या विषयाबद्दल एक-दोन ओळी.
  • आपणास हे माहिती आहे का? सदरातील एक ओळ आणि त्यातील विषयाचा दुवा.
  • दिनविशेषातील एका विषयाचा दुवा आणि एक-दोन ओळी.
  • इतर विकिपीडिया किंवा प्रकल्पांकडे दुवा, उदा. मलयालम/हिंदी/इतर विकिपीडियाने ५०,०००/१,००,००० लेख पार केल्यावर त्यांचे अभिनंदन व दुवा.
  • मराठी विकिपीडिया किंवा जोडीदार संस्था (ए२के, इ.) यांच्यातर्फे भरणाऱ्या कार्यशाळांबद्दल थोडक्यात माहिती व दुवा.

काय लिहू नये

संपादन

काय करू नये

संपादन
  • इतरांच्या पोस्टवर लाइक किंवा तत्सम प्रतिक्रिया
  • इतरांच्या पोस्टवर प्रतिक्रिया/कॉमेंट
  • स्वतःच्या पोस्टवर विषयास सोडून प्रतिक्रिया/कॉमेंट, किवा वाद घालणे
  • जातीयवादी, धर्मविषयक किंवा अपमानास्पद लिखाण

@अभय नातू: काही गोष्टीवर असहमत आहात

  1. लाईक कार्यास म्हणजे काय? सोसिअल मीडियावर पेज कधी लाईक करू शकत नाही याची नोंद घ्यावी.तत्सम प्रतिक्रिया जर इंग्लिश विकिपीडिया म्हणाले की त्यांना खुशी आहे की मराठी विकिपीडियाला १०००००० आर्टिकल पूर्ण झाली यावर तत्सम प्रतिक्रिया देऊ शकत नाही?
येथे विकिपीडियावरील पेज नव्हे तर पोस्ट/ट्वीटला लाइक करणे गृहित धरले आहे. इतर ठिकाणी आपल्या खाजगी खात्यातून नक्की लाइक करावे. हे खाते मराठी विकिपीडियाचे प्रतिनिधित्व करते तरी लाइक करताना येथील सगळे सदस्य एकमताने लाइक करतील का? हा प्रश्न स्वतःस विचारणे गरजेचे आहे. आपले उदाहरण चांगले आहे आणि अशा पोस्टसाठी अपवाद करता येईल

@अभय नातू: सर तुम्हाला माझे बोलणे समजले नसेल! मराठी विकिपीडिया असा खाता नव्हे परंतु एक पेज असते. ते पेज खाली कंमेंट पोस्ट इत्यादी करू शकते परंतु लाईक करू शकत नाही. ""In case of the page u are the giver not the taker"" म्हणून लाईक करणे असे गोस्ट येणार नाही यामुळे मी १ल्या गोष्टीवर सहमत नाही कारण ते होणारच नाही तर त्याला कायद्यात टाकणे शक्यस नाही. --टायवीन२२४०माझ्याशी बोला ०९:१०, ३ मे २०१७ (IST)Reply

नाही, पुन्हा वाचा - इतरांच्या पोस्टवर लाइक किंवा तत्सम प्रतिक्रिया मराठी विकिपीडियाच्या खात्याद्वारे प्रवेश केला असेल (उदा. फेसबूकवर) तर सोमेश्वरराव बुधवारे यांनी पोस्ट केलेल्या मांजरांच्या चित्राला लाइक करू नये.(सोमेश्वरराव बुधवारे ही काल्पनिक व्यक्ती आहे...शोध घेऊ नये :-) )

@अभय नातू:तुमचे उधारण समजते परंतु तुमाला माझे बोलणे समजत नाही. सोप्प करणे असे घ्या की सोमेश्वरराव बुधवारे पर्सनल अकाउंट नी मराठी विकिपीडियाला लाईक करू शकाल परंतु मराठी विकिपीडिया सोमेश्वरराव बुधवारेला किव्हा इतर लोकांचे पोस्ट लाईक करू शकत नाही कारण ते पेज आहे त्यांनी लाईक होत नाही. जेव्हा पेज लाईक करू शकत नाही तर मग कायदा का? हेच समाजाचे होते तुमाला --टायवीन२२४०माझ्याशी बोला ०९:५०, ३ मे २०१७ (IST)Reply

अहो, पेजला लाइक करण्याचे कुठे म्हणले मी??!! इतरांच्या पोस्टवर लाइक किंवा तत्सम प्रतिक्रिया -- यात पेज कुठे आले? पेजचा संबंधच येत नाही ना?!
  1. जर कोण विचारले की मराठी विकिपीडियाला कशी भेट घ्यावी या इतर प्रसन्न विचारले तर प्रतिक्रिया देण्याची नाही? असे असले तर मग सोसिअल मीडियाचे काय फायदा?
स्वतःच्या पोस्टवर विषयास सोडून प्रतिक्रिया/कॉमेंट, किवा वाद घालणे. हे करू नये. कशी भेट द्यावी या थेट प्रश्नांना प्रतिक्रिया देण्यास हरकत नाही पण ही माहिती जागोजागी असणारच (दुव्यांच्या स्वरुपात) तरी असा प्रसंग ओढवू नये.
  1. ३रा काही सहमत आहे परंतु जर कोण म्हणाले की तुम्ही विकिपीडिया आशियाई महिना २०१७ साजरा कराल यावर आपण वादा देऊ शकत नाही का की नक्की करूया?
पुन्हा एकदा (१) मधील प्रश्न स्वतःस विचारावा (येथील सगळे सदस्य एकमुखाने होय किंवा नाही म्हणतील का?)
  1. ४था पूर्ण सहमत आहे --टायवीन२२४०माझ्याशी बोला ०८:२९, ३ मे २०१७ (IST)Reply
उत्तरे ओळींच्या मध्ये. अभय नातू (चर्चा) ०८:३७, ३ मे २०१७ (IST)Reply

सोशल मिडिया खाते चालव्ण्यास द्यावयाच्या (आणि आधीकार वापस घेण्याचे), मराठी विकिपीडियन बद्दल निकष

संपादन
  • सोशल मिडिया खाते चालव्ण्यास एका पेक्षा जास्त लोग असतील यामुळे जे व्यक्ती पोस्ट करणार ते आपले पोस्ट व सदस्य नाव नोंद करतील यांनी मराठी विकिपिडियावर एक रेकॉर्ड असेल की काय तयार झाले होते व कोनी पोस्ट कले याचे रेकॉर्ड असेल.
  • खातेचा गैरवापर केल्यावर त्या व्यक्तीबद्दल मराठी विकिपीडियावर चर्चा होऊन त्याला काढण्यास येणार (चर्चा चालू असलेले समयी अधिकार असणार नाही).
  • खातेचे मलिक एका व्यक्ती किव्हा कुठला दुसऱ्या विकिपीडिया नाही परंतु मराठी विकिपीडियाचे खातेचा मालिक webmaster-mr.wikipedia म्हणजे विकिमीडिया फौंडेशन असेल परंतु चालवणारे लोक मराठी विकिपीडियन सोशल मिडिया कंमिटी असेल.
  • जर व्यक्ती गैरवापर करताना दिसतात तर त्यांना त्वरित चारच्यांत आणून अधिकार घेण्यात येणार. ती व्यक्ती मराठी विकिपीडियावर सुद्धा ब्लॉक करण्यात येणार.
  • मराठी विकिपीडिया हुकूमशाही सरकार नाही त्यावर एका व्यक्तीचे राज्य नाही चालणार परंतु फक्त सोशल-मिडिया कंमिटी यावर लक्ष देणार.

सोशल-मिडिया कंमिटी करिता सदस्य नावे नोंदवा

संपादन

(मराठी विकिपीडिया स्वयंसेवक चालवतात यामुळे प्रत्येक स्वयंसेवक आपले स्वयंसेवा नोंदवे)

  1. Tiven2240 - खाते बनवणे, सत्यापित करणे व देखभाल.