मराठी विकिपीडिया विकिपत्रिका प्रथम खंड अंक दुसरा - (फेब्रुवारी २०१२ ) संपादन

चांदणे शिंपित जा ...!
 
 
मराठी विकिपीडिया गौरव समितीची
मराठी विकिपीडियावर अनेक मंडळी अहोरात्र काम करत आहेत. काही नवीन आहेत तर काही जुनी झाली, काम करणार्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच कामाची कदर करण्यासाठी गौरवासारखे दुसरे साधन नाही. कामाच्या वाढत्या व्यापाबरोबरच त्याची योग्य रीतीने कदर पण करण्याच्या उद्देशाने एक आधारभूत संरचना मराठी विकिपीडियावर असावी ह्या उद्देशाने "मराठी विकिपीडिया गौरव समिती" ची स्थापना करण्यात येत आहे.

सदर समिती तर्फे दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपादन योगदानाचे गौरव जसे - १००० संपादने, २००० , ५००० संपादने आणि काही इतर गौरव (सदस्यांचे काम तपासून) प्रदान करण्यात येतील तसेच इतरांनी शिफारस केलेले अथवा समितीस योग्य वाटलेले/सुचलेले विशेष गौरवही प्रदान करण्यात येतील. अर्थात व्यक्तिगत बार्नस्टार देण्याच्या जुन्या पद्धतीला पूरक म्हणून ही समिती कार्य करेल.

 

"मराठी विकिपीडिया गौरव समितीची " सुरुवात होत असतांना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आम्ही आशा करतो की भविष्यात सदर समिती ही मराठी विकिपीडियाच्या उज्ज्वल भविष्यात मोलाचा वाट उचलण्यात उपयोगी ठरेल. आपणही ह्या उपक्रमात भरीव सहभाग द्यालच ही अपेक्षा.


 
जानेवारी २०१२ मधील सक्रिय सदस्यांचा आलेख
 
२०१२ जानेवारी महिन्यात जवळ जवळ एक हजार नवीन सदस्य नोंदणीकृत झाले त्याचा आलेख
 
जानेवारी २०१२ मध्ये मराठी विकिपीडियाने एक लाख पानांचा टप्पा गाठला त्याचा आलेख
पाने सांख्यिकी
लेख ३४,५४४
पाने

(चर्चा पाने, पुनर्निर्देशने, साचे, इ. सह एकूण पाने)

१,०९,५३४
चढवलेल्या संचिका ३,१९२
संपादन सांख्यिकी
एकूण संपादने ९,६८,६९३
प्रतिपान संपादने ८.८४
सदस्य सांख्यिकी
नोंदणीकृत सदस्य २२,०८४
कार्यरत सदस्य

(गेल्या ३० दिवसांत एक तरी कृती केलेले सदस्य)

१९०
सांगकामे ६०
प्रचालक १२
स्वीकृती अधिकारी
१८:३८ १ फेब्रुवारी २०१२ ची आकडेवारी


कार्यक्षेत्रातील प्रत्यक्ष कार्यक्रम
  • टेक फेस्ट आय. आय. टी बॉम्बे, मुंबई येथे ६ ते ८ जानेवारी दरम्यान मराठी विकिपीडियाचे स्टॉल लावण्यात आले होते, त्यास उत्तम प्रतिसाद लाभला. 'टेक फेस्ट २०१२' ला एक लाखाहून जास्त लोकांनी भेट दिली.
  • १५ जानेवारी २०१२ ला W - 11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि टेक्याथॉन, मुंबई आय. आय. टी बॉम्बे येथे आयोजित करण्यात आली होती.
 
टेक फेस्ट आय. आय. टी बॉम्बे, मुंबई

त्या दरम्यान मराठी विकिपीडिया मोबाइल तसेच टॅबलेट वरून वापरण्यासाठी 'अँड्रॉईड अ‍ॅप' निर्माण करण्यात आल्या.

  • * ८ जानेवारी २०१२ - मराठी विकिपीडिया (एडिट ट्रेनिंग/ प्रशिक्षण/ मार्गदर्शन) शिबिर टेक मराठी महामेळावा, पुणे. १०० प्रशिक्षणार्थीनी ह्यात भाग घेतला.
  • * १५ जानेवारी २०१२ - W11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि विकी शिकवणी, ज्ञान प्रबोधिनी, पुणे येथे आयोजित करण्यात आली.
  • * १३ जानेवारी २०१२ - आबासाहेब अत्रे शाळा, रास्ता पेठ, पुणे येथे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विकी शिकवणी आयोजित करण्यात आली होती. ५० शाळकरी विद्यार्थ्यांनी ह्यात हिरीरीने भाग घेतला.
  • * २९ जानेवारी २०१२ - शाहीर अमर शेख सभागृह, चर्चगेट मुंबई, मराठी अभ्यास केंद्राच्या विद्यार्थी आणि शिक्षक महामेळाव्यात "मराठी विकिपीडिया आणि मराठी भाषेकरिता उपलब्ध होत असलेल्या तंत्रज्ञानाचा परिचय" यावर व्याख्यान तसेच विकिपीडियावर संपादन कसे केले जाते याचे सोदाहरण प्रात्यक्षिक दिले गेले. कार्यक्रमास १२५ मराठीप्रेमींची उपस्थिती होती.

  २०१२ फेब्रुवारी महिन्यातील आयोजित कार्यक्रम

  • ३ फेब्रुवारी - "माहिती तंत्रज्ञान, विकिपीडिया आणि मराठी भाषा" चर्चासत्र, मराठी विभाग पुणे विद्दापीठ.
  • १० फेब्रुवारी २०१२ - विकी शिकवणी, L&T इनस्टीट्युट ऑफ टेक्नोलॉजी, साकीनाका मुंबई.
  • १० ते १२ फेब्रुवारी - हॅक्याथॉन, (Gnunify) SICSR पुणे आणि मराठी विकिपीडिया - परिचय,
  • १७ फेब्रुवारी - मराठी विकिपीडिया - परिचय, COE, Pune
  • १८ फेब्रुवारी - विकी कार्यशाळा, आय आय टी मुंबई.
  • २० ते २७ फेब्रुवारी - फोटोथॉन, मुंबई.
  • २५ फेब्रुवारी - मराठी भाषा दिवस कार्यक्रम, रानडे इन्स्टिट्यूट, पुणे.
.
ठळक घडामोडी आणि आढावा
  • मराठी विकिस्रोतला प्रशासकीय मान्यता

मराठी विकिस्रोत हा बंधू प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव विकी मीडियाकडे बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित होता. विकी संमेलन २०११, मुंबईच्या जाहीरनाम्यात ह्या प्रकल्पास सुरुउ करण्याच्या घोषणेनंतर प्रस्तावाचा पाठपुरावा आणि इतर अनिवार्य गोष्टींची पूर्तता मराठी विकिपीडिया समाजाने केल्याने,. लॅंग्वेज कमिटीने मराठी विकिस्रोत ह्या बंधू प्रकल्पास प्रशासकीय मान्यता दिली आहे. लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित होईल.

विकिस्रोत म्हणजे विकी समुदायाने उभारलेले व देखभाल केले जाणारे, प्रताधिकारमुक्त दस्तऐवजांचे इंटरनेटवरील खुले ग्रंथालय आहे. ऐतिहासिक काळापासूनचे ललितेतर व ललित साहित्य, चित्रे/कलाकॄती यांच्या अस्सल प्रकाशनाबरहुकूम विश्वासार्ह विकिआवॄत्त्या सर्वांसाठी गोळा करून देणे हे विकिस्रोताचे उद्दिष्ट आहे. नवीन पिढीस जुने प्रताधिकारमुक्त मराठी ग्रंथ वाचण्यास इंटरनेटवर युनिकोड फॉर्ममध्ये सहज उपलब्ध करून देणे तसेच संदर्भ देणे आणि पडताळणे सोपे करण्यासाठी सदर प्रकल्प उपयोगात येईल.

मराठी विकिस्रोत' हे एक आंतरजालावर असलेले मुक्त पुस्तकालय आहे. यामध्ये वाचकांसाठी मोफत वाचनाची सोय आहे. आपल्याला या प्रकल्पात भर घालण्यासाठी निमंत्रण आहे. येथे प्राचीन तसेच प्रताधिकार नसलेले लेख आपण आणू शकता. मराठी विकिपेडियावर त्या लेखांची चर्चा होऊ शकते.

 

परंतु ते लेख मूळ स्वरूपात मराठी विकिस्रोत येथे साठवले जातात. उदा० ऐतिहासिक ललितेतर दस्तऐवज - तह/करारनामे, जाहीरनामे, आज्ञापत्रे, फतवे, वैयक्तिक दप्तरे/पत्रे, बखरी, न्यायनिवाड्याची निकालपत्रे, सैनिकी मोहिमांचे अहवाल/जमाखर्च इत्यादी. तसेच ऐतिहासिक ललित साहित्य - संतसाहित्य, अन्य भक्तिपर साहित्य, स्तुतिपर कवने येथे संग्रहित करता येतील.


  • नवीन नियुक्ती
 
माहितगार - विकिसंमेलन भारत २०११, मुंबई

मराठी विकिपीडिया वरील दैनंदिन कामे, नवीन प्रस्ताव, तांत्रिक जबाबदाऱ्या, सुरक्षा, ध्येय धोरणे, प्रगती आदी अनेक आघाड्या अभय नातू हे एकटेच प्रशासक म्हणून कार्यभार सांभाळत होते. वाढत्या व्यापाबरोबरच खांदे वाढवावे जेणे करून कामाचा वैयक्तिक दबाव कमी होईल आणि सेवाही सुरळीत मिळतील या उद्देशाने प्रशासक (ज्याला आता स्वीकृती अधिकारी असे संबोधण्यात येते) या पदासाठी मराठी विकिपीडिया समाजाने एकमताने 'माहितगार' यांना ही जबाबदारी दिली आहे.

माहितगार हे कुशल संघटक आहेत, मराठी विकिपीडियावर ‎प्रचालक म्हणून ७ जून २००६ पासून ते कार्यरत आहेत. तांत्रिक तसेच धोरणात्मक विषयांवर त्यांनी नेहमीच त्याच्या व्यक्तिमत्त्वातील परिपक्वतेचा परिचय दिलेला आहे. प्रेमळ व्यक्तिमत्त्व, प्रत्यक्ष क्षेत्रातील त्यांचे काम आणि कार्यकर्त्यांशी त्यांचा थेट संपर्क हे वाखाणण्याजोगे आहे. तेंव्हा माहितगारांना 'स्वीकृती अधिकारी' (प्रशासक) पदाची जबाबदारी दिल्याने प्रशासकीय पातळीला अधिक बळकटी येईल.

'माहितगार' यांच्या पुढील कार्यास 'विकीपत्रिका' वाचकांतर्फे हार्दिक शुभेच्छा ...!!!

* विकिप्रकल्पांकरीता प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते हवे आहेत..!

  वाचकांच्या प्रतिक्रिया

  • राहुल जी, सादर नमस्कार, मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचा आपल्या उत्कृष्ट संपादनाकरीता आपणांस व संपादक टीमचे हार्दिक अभिनंदन. या पत्रिकेमुळे मराठी विकिपीडिया विकास कार्याकरीता अनेक स्वयंसेवक जोडता येतील.--विजय नगरकर
  • नमस्कार राहुल, विकीचा अंक मस्त झाला आहे. आवडला. त्यात सांख्यिकी देण्याची कल्पना फार आवडली. हा अंक इतर संकेतस्थळांवर सादर केला तर चालेल का? निनाद
  • Superb effort ... Is there any away I can read in English -- Naveenpf
  • मला विकिपत्रिका नको आहे, त्यासंबंधीच्या लिंक किंवा मजकूर माझ्या सदस्य किंवा चर्चापानावर कृपया टाकू नये. धन्यवाद. मनोज
  • नमस्कार राहुल ! विकिपत्रिकेचा पहिला अंक प्रकाशित झाल्याबद्दल आपल्या सर्वांचे, आणि अधिककरून तुमचे, अभिनंदन ! अंक नेटका आणि देखणा (याबद्दल विशेष शाबासकी :) ) झाला आहे. संकल्प द्रविड
विकिपत्रिका प्रकाशक...
 
  मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा...! * विकिपत्रिका संपादन मंडळात सहभागी व्हा !



मराठी विकिपीडिया विकिपत्रिका प्रथम खंड अंक पहिला - (जानेवारी २०१२ ) संपादन

२०१२ नववर्ष अभिष्टचिंतन ...!
 
सर्व मराठी विकिपिडीयंसना नवीन वर्षाच्या अनेक अनेक शुभेच्छा. आम्ही आपल्यासाठी नवीन वर्षाची आगळी वेगळी भेट घेऊन आलो आहोत. हो विकीपात्रिका ...! मराठी विकिपीडियाचा वाढत असलेला व्याप, म्हणजे कामाच्या आघाड्या आणि विपी परिवार यामध्ये उत्तम समन्वय राहावा, वेगवेगळ्या दिशांनी होणार्‍या कामांची सर्वाना माहिती व्हावी ह्या प्रमुख उद्देशाने हा नवीन उपक्रम सुरु करीत आहोत. जेणेकरून, सदस्यांना आपल्या आवडीच्या कामात भाग घेऊन योगदान करता येईल, तसेच कार्यरत सदस्याचे योगदान पण समोर आणता येईल. सांख्यिकी, लक्ष, ध्येय आणि ऑफ लाईन कामे त्यासाठी लागणारा जनाधार आणि नेटवर्क ह्यात सुसंवाद साधण्यात ह्याचा उपयोग होईल.

नववर्षाच्या मुहूर्तावर विकीपात्रिका ह्या मासिकाच्या प्रकाशनाची सुरुवात होत असतांना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आम्ही आशा करतो कि भविष्यात सदर मासिक हे मराठी विकिपीडियाच्या उज्वल भविष्यात मोलाचा वाट उचलण्यात उपयोगी ठरेल. आपणही ह्या उपक्रमात भरीव सहभाग द्यालच ही अपेक्षा.

 
विकिपत्रिका मराठी विकिपीडिया
 
२०११ मधील गुगल वरील मराठी विकिपीडियाबाबतचा लोकांनी घेतलेल्या शोधाचा लेखाजोखा (ट्रेंड)
पाने सांख्यिकी
लेख ३४,७९७
पाने

(चर्चा पाने, पुनर्निर्देशने, साचे, इ. सह एकूण पाने)

९६,२४०
चढवलेल्या संचिका ३,१६८
संपादन सांख्यिकी
एकूण संपादने ९,३२,७५०
प्रतिपान संपादने ९.६९
सदस्य सांख्यिकी
नोंदणीकृत सदस्य २१,१५१
कार्यरत सदस्य

(गेल्या ३० दिवसांत एक तरी कृती केलेले सदस्य)

१९०
सांगकामे ६०
प्रचालक १२
स्विकृती अधिकारी


प्रत्यक्ष क्षेत्रातील कार्यक्रम
  • विकिपीडिया व त्याचे बंधू-प्रकल्प- विकिस्रोत, विक्शनरी इत्यादी यात वापरल्या जाणार्‍या मिडियाविकी सॉफ्टवेअरच्या मिडियाविकी आणि मिडियाविकि विस्ताराच्या संदेशांचे स्थानिकीकरण, अनुवाद, अनुवादांचे प्रमाणिकरण
     
    CMDA IT expo. १५ ते १८ डिसेंबर २०११, पुणे. मराठी विकिपीडिया स्टॉल.

व सर्वसामान्य मराठी माणसास समजण्यास सुलभ भाषेचा उपयोग करण्याच्या उद्देशाने 'ट्रान्सलेशन स्प्रिंट (अनुवाद दौड/भाषांतर कार्यशाळा)' 'शनिवार,दिनांक २६ नोव्हेंबर २०११ रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. ह्या उपक्रमाद्वारे ३२० संदेशांचे स्थानिकीकरण (लोकलायझेशन) पूर्ण करण्यात आले.

  • "CMDA IT Expo 2011, पुणे येथे १५ ते १८ डिसेंबर दरम्यान मराठी विकिपीडियाचे स्टॉल लावण्यात आले होते, त्यास पुणेकरांचा उत्तम प्रतिसाद लाभला. स्टॉलला सुमारे ३००० लोकांनी भेट दिली तर २५० पेक्षा जास्त लोकांनी सक्रीय सहभागासाठी नावे नोंदविली.
  • शनिवार दिनांक २४ डिसेंबरला 'मामासाहेब मोहोळ महाविद्यालय पुणे' येथे विद्यार्थांसाठी विकी शिकवणीचे आयोजन करण्यात आहे होते. शिकवणीत ५० विद्यार्थांनी भाग घेतला ज्यात ४०% विद्यार्थिनी होत्या.

  २०१२ जानेवारी महिन्यातील आयोजित कार्यक्रम

  • ६ ते ८ जानेवारी - टेक फेस्ट आय. आय. टी बॉम्बे, मुंबई
  • ७ - ८ जानेवारी - विकी शिकवणी टेक मराठी मेळावा, पुणे
  • १५ जानेवारी - W -11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि विकी शिकवणी, पुणे
  • १५ जानेवारी - W - 11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि टेक्याथॉन, मुंबई
  • २९ जानेवारी - विद्यार्थी मेळावा विकीशिकवणी , मराठी अभ्यास केंद्र, दादर मुंबई
विकिसंमेलन भारत २०११, मुंबई आढावा
 
मराठी ट्रॅक - विकिसंमेलन भारत २०११, मुंबई

मुंबईमध्ये भरलेल्या विकीसंमेलन २०११ च्या निमित्याने अनेक मराठी भाषाप्रेमी मंडळीना चर्चा करण्यासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले. उपस्थितांमध्ये मराठी विकिपीडिया संपादक, मराठी साहित्यिक, राज्य मराठी विकास संथेचे अधिकारी, उच्य माध्यमिक शिक्षण मंडळाचे प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य विश्वकोश मंडळाचे प्रतिनिधी, महाराष्ट्र शासनाचे माहिती अधिकारी, आय आय टी मुंबईचे संशोधक, पत्रकार, आणि मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी-माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या परिषदेत, इंग्रजी भाषेचे ‘विकिपीडिया’तील वाढते महत्त्व जितके अभ्यासू वृत्तीने मांडण्यात आले तितकेच मराठी भाषा या नव्या ज्ञानकोशात कशा पद्धतीने समाविष्ट होऊ शकते याचाही तज्ज्ञांनी चांगलाच ऊहापोह केला. मराठी माणसाचा तंत्रज्ञानाविषयीचा न्यूनगंड, त्याच्यामध्ये माहिती आणि आत्मविश्वासाचा असलेला आभाव, मराठी युनिकोडची माहिती नसणे किंवा टायपिंग न येणे, मजकूर संपादनाचे कौशल्य नसणे, इंटरनेटच्या सोयींचा आभाव, अगदी मराठी विकिपीडिया अस्तित्वात आहे याची माहिती नसणे, अशा अनेक अडचणींमुळे मराठी समाजाने या तंत्रज्ञानाकडे पाठ फिरवली आहे, असे प्रमुख तज्ज्ञांचे मत होते. मराठी भाषेला ज्ञानभाषेच्या पातळीवर आणून ठेवायचे असेल तर हाताशी असलेल्या तंत्रज्ञानाचा जोरकस वापर करण्याची गरज आली आहे, असेही काहींचे मत होते. सध्याच्या जमान्यात सोशल नेटवर्किंग साइटचा प्रभाव वाढत असताना लोकांमध्ये संवाद वाढत आहे. पण यामध्ये ज्ञानाची देवाणघेवाण कितपत होते हा महत्त्वाचा प्रश्न आहे. या दृष्टीने सोशल नेटवर्किंग साइटवर जास्त वेळ बसणाऱ्या मंडळींनी आपला १० टक्के वेळ वाचवून ‘विकिपीडिया’त योगदान दिले तर त्याने भाषाव्यवहारात भर पडेल, शिवाय ज्ञानशाखेची ओळखही अनेकांना होईल असा विचार मांडण्यात आला, तर काही उपस्थितांनी भाषाशास्त्र, भाषासंवर्धन, मराठीतील नव्या शब्दांचा उपयोग, जुन्या शब्दांना पुनर्जन्म, इंग्रजी शब्दांसाठी नेमका प्रतिशब्द, भाषांतर, मजकुराचे उत्तमरीत्या संपादन अशा विविध पैलूंनाही स्पर्श केला. मराठी फाँट हा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. त्यावर अनेक पर्याय सुचवण्यात आले. संमेलनादरम्यान आय आय टी मुंबईच्या संशोधकांनी 'ह्याक्याथॉन' ह्या तांत्रिक मार्गीकेतून 'नारायम' या फाँटचे मराठीकरण आणि सुलभीकरण पूर्ण केले.

या समस्यांच्या खोलाशी जाताना महाराष्ट्रातील प्रमुख ७ शहरांतील निवडक शाळांमध्ये मराठी ‘विकिअकादमी’ स्थापन करण्याचीही घोषणा मराठी विकिपीडियाने केली आहे. जेणेकरून, शिक्षक आणि विद्यार्थी या चळवळीशी जोडून घेतला तर दोघांच्याही ज्ञानकक्षा अधिक रुंदावत जातील. ‘विकिस्रोत’ ह्या बंधुप्रकल्पाची घोषणा, संस्कृत विकिपीडियाशी सहयोग, इतर माहिती आणि संपर्क माध्यमांचा वापर इत्यादी गोष्टींद्वारे मराठी विकिपीडिया चळवळ अधिक व्यापक करण्याचा उदेश जाहीर करण्यात आला. प्रसिद्धी माध्यमांनी मराठी विकिपीडियास मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिल्याचे संमेलनादरम्यान जाणवले.

* विकिप्रकल्पांकरीता प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते हवे आहेत..!

मराठी विकिपीडिया विकिसंमेलन भारत २०११ जाहीरनामा

  • महाराष्ट्रातील ७ प्रमुख शहरामधील निवडक शाळांमध्ये मराठी विकी अकादमीची आखणी करणे आणि तेथील शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या पर्यंत मराठी विकिपीडियाचे रीतसर प्रशिक्षण पोहोचवणे आणि मराठी विकिपीडियामध्ये भर घालणे.
  • संस्कृत विकिपीडियाशी सहयोग करून त्यांना प्रशिक्षण/ विकी शिकवणी आणि तांत्रिक गोष्टी या मध्ये मदत करणे.
  • मराठी विकिपिडीयावर "विकी स्रोत" ह्या बंधू प्रकल्पास सुरवात करणे.
  • मराठी विकिपीडिया इतर संपर्क माध्यमांद्वारे उपलब्ध करणे जसे मोबाईल, टॅब, सी डी आदी.
  • मराठी विकिपीडिया समविचारी मंडळींनी एकत्र येऊन माहितीचे आदान प्रदान करणे.
विकिपत्रिका प्रकाशक...
 
  मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा...! * विकीपत्रिका संपादन मंडळात सहभागी व्हा !


सयूक्तिकता ? संपादन

नमस्कार, आपण मराठी विकिपीडियावर जे योग्दान करत आहात त्याचे स्वागत आहे. पण आपल्या आर्या आंबेकर लेखात लावलेल्या सूचनेबद्दल मी विकिपीडिया:चावडी#सयूक्तिकता ? येथे काही मुद्दे मांडले आहेत.आपण तेथे चर्चेत सहभागी व्हावे अशी नम्र विनंती आहे.माहितगार ०६:०९, १२ जून २०१० (UTC)

चर्चा:आर्या आंबेकर येथे माझे मत मांडले आहे कृपया पाहून चर्चा पानावर प्रतिसाद नोंदवावा सुचवण्या लगेचच सुधारीत कराव्यात असेही नाही केवळ आपल्या नजरे खालून जावे एवढीच इच्छा आहे.माहितगार १०:४२, १९ सप्टेंबर २०१० (UTC)


खालील प्रस्तावावर तुमचे मत हवे संपादन

mw:Extension:TitleBlacklist हे एक्सटंशन मराठी विकिपीडियावर अलरेडी आहेच त्याच्या अनुषंगाने विकिपीडिया:चावडी/तांत्रिक प्रश्न#Blocking of article titles in roman script by anon and new users हा प्रस्ताव मांडला आहे. प्रस्तावावर तुमचे मत हवे आहे. धन्यवाद माहितगार ०६:०४, २१ ऑगस्ट २०११ (UTC)


Invite to WikiConference India 2011 संपादन

 

Hi Prabodh1987,

The First WikiConference India is being organized in Mumbai and will take place on 18-20 November 2011.
You can see our Official website, the Facebook event and our Scholarship form.

But the activities start now with the 100 day long WikiOutreach.

Call for participation is now open, please submit your entries here. (last date for submission is 30 August 2011)

As you are part of Wikimedia India community we invite you to be there for conference and share your experience. Thank you for your contributions.

We look forward to see you at Mumbai on 18-20 November 2011

आद्याक्षरे/लघुनाम संपादन

नमस्कार,

खरे पाहता दोन्ही प्रकारात फरक काहीच नाही (ग. ह. खरे किंवा ग.ह. खरे) आपण आधीपासून आद्याक्षरांमध्ये जागा न सोडण्याचा आणि आद्याक्षरे आणि आडनावांत एक जागा सोडण्याचा प्रघात ठेवलेला आहे. याने आद्याक्षरे व आडनावांत फरक दृष्टिक्षेपातच कळतो. तसेच नावेही छोटी राहतात. नावांप्रमाणेच लघुनामांच्या अक्षरांमध्ये जागा सोडण्याने काहीच साध्य होत नाही. डब्ल्यु. पी. यु. जे. सी. वास किंवा डब्ल्यु.पी.यु.जे.सी. वास यात दुसरे नाव छोटे/संक्षिप्त दिसते.

अभय नातू १५:४४, १७ सप्टेंबर २०११ (UTC)

ता.क. एका शीर्षकाखाली लेख ठेवून दुसर्‍या शीर्षकाकडून पुनर्निर्देशन केलेले असावे.

नमस्कार प्रबोध,

आपण कदम ह्या लेखाच्या चर्चा पानावर दिलेला संदेश वाचला. प्रबोध, हा लेख जरी विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नसला तरी त्यात काही नवीन माहिती जरूर आहे असे दिसते. नाव रोमन आहे पण ते देवनागरीत बदलवता येईल. त्यामुळे लेख वगळण्या पेक्षा लेख तपासून पुनर्लेखन करावे असे वाटते.

आपण इतक्यातच मराठी विकी वर रोमन नावाचे लेख बनवण्यास अटकाव करणारी प्रणाली (पुरवणी) कार्यान्वित केली आहे. तरी हा लेख कसा बनला ह्या बाबत तपासण्याचे निरोप मी या आधीच संकल्पला दिलेला आहे. होऊ शकतो कि काल आम्ही एकही शब्द नसलेले लेख लिहिण्यास अटकाव करण्यासाठी काम करत असतांना अभयनि गाळणीत केलेल्या बदला दरम्यान काही त्रुटी राहिली असेल. असो आपल्या लिखाणाबद्दल हार्दिक शुभेच्छा आणी आपले कामातील सातत्य कायम राहो ही सदिच्छा. राहुल देशमुख १४:२२, १८ सप्टेंबर २०११ (UTC)

व्यक्तिसंबधित लेख संपादन

नमस्कार !

यासंबंधी अगदी ठामठोक नियम नाहीत. सहसा काही निवडक थोरामोठ्यांसाठी आदरार्थी अनेकवचन वापरले जाऊ शकते, एरवी एकवचनी उल्लेख केला, तरीही ज्ञानकोशाच्या दृष्टीने फरक पडत नाही. व्यक्तिश: माझे मत एकवचन वापरणे अधिक इष्ट, असे बनले आहे - कारण आदरार्थी अनेकवचन वापरण्याच्या हेतूखाली आपल्याकडे खोटे अभिमान/दुराभिमान पोसण्याचे आणि लाळघोटेपणाची भंपकबाजी बोकाळली आहे. कुणीही कुणालाही "जी-जी रं जी-जी रं जी-जी-जी" आणि "माननीय नामदार जीअमुकचंद्रजीरावजीसाहेबराव आडनावजीसाहेबजी" असली भंपक नामाभिधाने वापरताना दिसते, जे अगदी डोक्यात जाण्यासारखे आहे! त्यामुळे व्यक्तिशः मी व्यवहारात आणि इथेही एकवचनी उल्लेख करणे दीर्घकालीन फायदे लक्षात घेता अधिक बरवे मानतो. अर्थात काही बाबींमध्ये अपवाद करायलाही हरकत नसावी; परंतु ते अपवाद वाटण्याइतपत मोजके असू द्यावे हे बरे.

अर्थात हे माझे व्यक्तिगत मत झाले. यात मराठी विकिपीडियाचे अधिकृत मत असा काही प्रकार नाही. त्यातल्या त्यात व्यवहार्य व तार्किक संकेतानुसार काम करत राहणे, हेच खरे.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:३७, २० सप्टेंबर २०११ (UTC)

वर्ग:मराठी आडनावे हा वर्ग कृपया बघावा. यात बहुसंख्य मराठी आडनावे आहेत. ते बघुन आपल्या 'पानकाढा' विनंतीचा पुनर्विचार करावा ही विनंती.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ११:१८, ३० सप्टेंबर २०११ (UTC)

पानकाढा विनंती संपादन

हा साचा काढणे योग्य राहील.अन्यथा ज्याने लेख लिहीला त्याचेवर अन्याय झाल्यासारखे होईल व विनाकारण कटुता निर्माण होईल.यात मोठी व्यक्ति वा छोटी व्यक्ति असा भेदभाव करणे योग्य नव्हे.आपण फक्त आडनावापुरता विचार करतो आहे, तेही मराठी आडनावे. त्यात हे लेख बसतात.आपण म्हणता तशी यादी या वर्गात आपसुकच तयार होत आहे.आपण लावलेला साचा आपणच काढण्यात काही गैर नाही.'बदलांचा आढावा' मध्ये 'माझ्या चर्चा पानावर दि.३०/०९/२०११ रोजी झालेल्या चर्चेनुसार' असे लिहीता येईल. धन्यवाद.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १३:४४, ३० सप्टेंबर २०११ (UTC)


धन्यवाद संपादन

माझ्या विनंतीस मान देउन योग्य ते बदल केल्याबद्दल धन्यवाद.आपला लेखन-प्रपंच सुरूच ठेवा.सुरूवातीला आम्हीही नविनच होतो. आम्ही जुन्या जाणत्या सदस्यांचे मार्गदर्शन घेउनच आज ईथवर पोचलो.बिनधास्त लिहा. नाउमेद होउ नका. आपल्या पुढील लेखनास माझ्या शुभेच्छा.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १६:०७, ३० सप्टेंबर २०११ (UTC)

वादनिवारण चावडीवर ताजी चर्चा हलवल्याबद्दल धन्यवाद ! --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ११:३५, २६ नोव्हेंबर २०११ (UTC)

व्यक्ति आणि वल्ली संपादन

याबाबत अभय नातू/संकल्पशी चर्चा करावी ही विनंती. वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १५:०४, २ ऑक्टोबर २०११ (UTC)

प्रबोध, जे लेख उडवले, त्यात पुस्तकातले लेख अख्खेच्या अख्खे कॉपी-पेस्ट मारून धडधडीत प्रताधिकार-उल्लंघन केले होते. त्यामुळे ते उडवणेच योग्य.
बाकी, तुम्हांला व्यक्ती आणि वल्ली लेखात प्रत्येक व्यक्तिरेखेविषयी लिहायचे असल्यास ३-४ वाक्यांमध्ये संक्षेपाने व तुमच्या स्वतःच्या शब्दांत लिहायला काहीच हरकत नाही. मात्र व्यक्तिरेखेविषयी लिहिताना ते लिखाण रसास्वादात्मक, लालित्यपूर्ण समीक्षेच्या ढंगात नको, तर विश्वकोशाला अभिप्रेत असलेल्या वस्तुनिष्ठ व तटस्थ दृष्टिकोनातून लिहिले जाईल, असे बघावे.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:१७, २ ऑक्टोबर २०११ (UTC)

नमस्कार! आपण या लेखनावात आवश्यक ते फेरबदल करू शकता.किंबहुना, निःसंदिग्धीकरण पानही बनविता येईल. धन्यवाद.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १०:५७, ५ ऑक्टोबर २०११ (UTC)

सॉरी, ते कसे वापरतात याची कल्पना नाही, मलाही शिकण्याची इच्छा आहे मराठी विकिपीडियावर सध्या अभय, संकल्प, आणि संतोष दहिवळांनाच कल्पना आहे. या विषयावर कोणी पुण्यात शिकवणी घेतल्यास मलाही जॉईन होणे आवडेल संतोषांना विचारून पहातो. माहितगार १४:०६, १२ ऑक्टोबर २०११ (UTC)

तत्त्वज्ञान हेच शुद्धलेखन संपादन

नमस्कार प्रबोध !

मी उपलब्ध असलेले काही संदर्भग्रंथ पडताळून 'तत्त्वज्ञान' (त+त+व = त्त्व) हेच शुद्धलेखन असल्याची खात्री करून घेतली. त्यातल्या काही महत्त्वपूर्ण नोंदी अश्या आहेत :

  1. तत्त्व : (नपुंसकलिंगी) मूळ, सत्य. Truth, reality. [व्युत्पत्ती: संस्कृत. तत् + त्व (भाववाचक प्रत्यय)] उद्भवलेले शब्द: तत्त्ववाद, तत्त्वज्ञान. (कुलकर्णी, कृ.पां. Missing or empty |title= (सहाय्य))
  2. तत्त्वज्ञान : नाम, नपुंसकलिंगी. (प्रा. यास्मिन शेख. Missing or empty |title= (सहाय्य))

विशेषकरून मराठी व्युत्पत्ति कोशातली तत् + त्व ही व्युत्पत्ती महत्त्वाची आहे. तत्त्वाविषयीचे ज्ञान अभ्यासणारी शाखा म्हणजे तत्त्वज्ञान, अशी सामासिक योजना असल्यामुळे 'तत्त्वज्ञान' (त+त+व = त्त्व) हे लेखन योग्य ठरते.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:२१, १३ ऑक्टोबर २०११ (UTC)

एडब्ल्यूबी संपादन

प्रबोध, नमस्कार.

आपण एडब्ल्यूबी्/बॉट बाबत शिकण्याची उत्सुकता दाखवली आहे. आपणास जशी उत्सुकता आहे तशीच मलाही सांगकाम्या ही काय भानगड आहे या उत्सुकतेतून मी वापरून पाहण्यास सुरूवात केली (अर्थात हे सगळे स्वयंअध्ययनच होते/आहे. अभय, संकल्प यांनी माझ्यावर विश्वास टाकून प्रयोग करून पाहण्याची संधी दिली म्हणूनच हे स्वयंअध्यन चालू आहे.) ही माझी सुरूवातच आहे मला वाटते १ टक्काच मला त्यातली माहिती झाली आहे. त्यामुळे मलाच पूर्ण माहिती नसल्याने सध्या तरी मी हे ज्ञान इतरांना देऊ शकेन असे वाटत नाही. पण आपणास माझ्यासारख्याच स्वयंअध्ययन करताना काही अडचणी आल्यास जरूर कळवा त्याला उत्तरे देण्याचा प्रयत्न करीन. (तुम्हाला आलेली अडचण मला आली असेल तर) आशा आहे आपल्या अडचणी मला विचाराल. संतोष दहिवळ १७:३४, १३ ऑक्टोबर २०११ (UTC)


hi, i want to attach some my recipe snaps to my article but i am not getting any option like UPLOAD.what to do?

नमस्कार,

तुम्ही सांगकाम्या चालवून बदल करीत असल्याचे पाहिले. शक्यतो सांगकाम्या चालवताना तो एखाद्या वेगळ्या सदस्यनामाखाली चालवावा म्हणजे तुम्ही हाताने केलेले बदल आणि स्वयंचलित बदल यात फरक करता येतो. अशा सांगकाम्यासाठी नवीन नावाखाली सदस्यत्व घ्यावे, उदा. संकल्पचा सांगकाम्या आहे सांगकाम्या संकल्प, तर संतोष दहिवळांचा आहे सांगकाम्या संतोष, इ.

अभय नातू ०४:२१, २२ ऑक्टोबर २०११ (UTC)

मी अजून AWB explore करतो आहे (AWB द्वारे केलेला प्रत्येक बदल मी तपासून पाहतो आहे). म्हणून अजून तरी नवीन सदस्य खाते तयार केले नाही
Ok. मदत लागल्यास किंवा AWB बद्दल काही शंका असल्यास कळवालच.
अभय नातू ०४:५२, २२ ऑक्टोबर २०११ (UTC)

सदस्य स्वागत संपादन

हिंदीप्रमाणे नवीन सदस्याचे आपोआप स्वागत करण्यासाठीच्या तेथील सदस्य खात्यावर काही दिसले नाही. तेथील एखाद्या प्रचालकास विचारावे लागेल. Abuse filter वर काही करामत करुन ही सोय करता येईल पण त्याआधी तेथे विचारलेले बरे.

१६:४७, २२ ऑक्टोबर २०११ (UTC)

अनेक दिवसांपासून मनात रेंगाळणारा विषय काढलात या बद्दल धन्यवाद. इंग्रजी विकिपीडियावरील नवीन खाते उघडणार्‍या लोकांना en:MediaWiki:Welcomecreation या मिडियाविकी संदेशाने स्वागत होते. तेथे नवीन सदस्यांना जसे मार्गदर्शन उपलब्ध होते तसे मराठी विकिपीडियावर मिडियाविकी:Welcomecreation च्या माध्यमातून उपलब्ध करून देता येईल. त्यात मराठी विकिपीडीयावरील सध्याच्या स्वागत साचातील माहिती सुयोग्य पद्धतीने आंतर्भूत करून द्यावी असा मानस आहे.
स्वागत बॉट सुद्धा उपयोगात आणण्यास हरकत नाही, त्यावर काम करून ठेवावे , पण कदाचित मिडियाविकी:Welcomecreation मधील बदल अधिक उपयूक्त ठरल्यास , बॉट दहा आणि पन्नास संपादने पार पाडणार्‍या संपादकांना टप्पेवार सहाय्य साचे लावण्याकरता सुद्धा वापरता आला तर दुधात साखर घातल्या सारखे असेल.
en:MediaWiki:Welcomecreation आणि साचा:स्वागत ला अनुसरून मिडियाविकी:Welcomecreation करिता सुधारणा करण्यात आपण, मंदार कुलकर्णी आणि अजून एक दोन सदस्य मिळून हे काम तडीस नेण्यास सवड देउ शकाल का ते पहावे हि नम्र विनंती माहितगार ०८:२३, २३ ऑक्टोबर २०११ (UTC)

काही बदल संपादन

प्रबोधजी AWB च्या सहाय्याने काम चांगले चालू आहे त्या बद्दल शुभेच्छा, आपण पुण्यात AWB बद्दल कार्यशाळा घेऊ शकाल किंवा कसे ?

अजून एका बाबीकडे लक्ष वेधावयाचे आहे हा आपण केलेला बदल तपासून पहावा. विकिपीडिया:विकिसंज्ञा , विकिपीडिया:जादुई शब्द इत्यादी हे म्हणजे हे असे सांगणारे उल्लेखातील बदल टाळून इतरही नवीन बॉट्सकडून हे कसे टाळता येईल हे पहावयास हवे असे वाटते.माहितगार ०४:३२, २५ ऑक्टोबर २०११ (UTC)

हॉट कॅट संपादन

हॉट कॅट संदर्भात एक bug report बगझिलावर submit केला आहे. त्यामध्ये काही बदल सुचवायचा असल्यास खाली दिलेल्या दुव्यावर टिचकी द्यावी ही विनंती.

संतोष दहिवळ १४:३३, १२ नोव्हेंबर २०११ (UTC)

Commons Helper Token संपादन

Token Added in Summary- प्रबोध (चर्चा) १४:४७, २१ नोव्हेंबर २०११ (UTC)


एर, एअर वगैरे संपादन

कोणत्याही भाषेचे लिखाण प्रमाण असते, उच्चार नाहीत असे माझे मत आहे. उच्चार दर बारा कोसावर बदलतात असे मानले जाते. इंग्रजी शब्दांचे आयरिश, अमेरिकन, कॅनेडियन, ऑस्ट्रेलियन, पंजाबी, तामीळ, बंगाली उच्चार भिन्न असले तरी लिखाण समान असते. Stores चा मराठी उच्चार स्टोअर्स. पंजाबी माणूस त्याचा इस्टोर्स ‍असा तर बिहारी सटोर्स करतो. फ़ास्टचा अमेरिकन उच्चार फ़ॅस्ट. Victory हा शब्द बंगालीभाषक भिक्टरी असाच, तर एम्‌ ए चा उच्चार तामिळी यमए असाच करणार. अप्रमाण असले तरी कोणतेही उच्चार चुकीचे नसतात. ऑक्सफ़र्ड इंग्रजी शब्दकोशाच्या प्रस्तावनेत "या शब्दकोशातले उच्चार लंडन शहराच्या दक्षिण भागातील शिक्षणसंस्थांच्या परिसरात जसे उच्चारले जातात तसे आहेत." असे लिहिलेले असते. याचा अर्थ असा की लंडनच्या किंवा इंग्लंडच्या अन्य भागात केले जाणारे उच्च्चार वेगळे असू शकतील.

मराठी भाषा ही उच्चारानुसारी लिहिल्या जाणार्‍या देवनागरी लिपीत लिहिली जात असल्याने परभाषेतले शब्द मराठीत लिहिताना ते, मराठी विद्वान माणसे आजवर जसे लिहीत आलेले आहेत तसेच लिहिले गेले पाहिजेत, भले ते लिखाण अप्रमाण का असेना. त्यामुळे Air, Fair, Oar, Oven, Bowl आदी शब्द मराठीत एअर, फेअर, ओव्हन, बाउल असे लिहिणे क्रमप्राप्त आहे. शब्दांचे हे प्रचलित लिखाण बदलून विकीवरील काही जण, ज्यादा शुद्ध उच्चार लिहिण्याचा आग्रह धरीत आहेत, त्याला माझा विरोध आहे. Air हा शब्द मराठीत आजतागायत जसा लिहीत आलेला आहे तसाच म्हणजे एअर असाच लिहिला जावा, असे मला वाटते. काही कोशांत उच्चार वेगळा असावा असे, ज्याअर्थी लोक एर असे लिखाण करतात त्यावरून वाटते.

परकीय भाषेतले शब्द मराठीभाषक जसे उच्चारतो आणि लिहितो तसेच लिहिले गेले पाहिजेत, निदान मराठी विकिपीडियावर तरी!.

एर-एअरच्या वादाचा हा थोडक्यात इतिहास...J १०:५१, २५ नोव्हेंबर २०११ (UTC)

माझे मत संपादन

प्रबोध,

तुमचा माझ्या चर्चापानारील संदेश मिळाला.

http://airindia.in वरील एअर इंडिया चा लोगो पहावा.

पुन्हा एकदा सांगू इच्छितो की आपण एर इंडियाने त्यांच्या लोगोवर हिंदीमध्ये लिहिलेले आहे. त्यां त्यांनी air या इंग्लिश शब्दाचा हिंदी उच्चार लिहिलेला आहे. हिंदी आणि मराठी उच्चारांतच नव्हे तर लिखाणातही मोठे फरक आहेत. आपण इंग्लिश शब्दांच्या हिंदी उच्चारांचे अंधानुकरण करू नये असे वाटते. हिंदी भाषेतील शब्द हिंदी उच्चारांनुसारच केले पाहिजे हा याचा दुसरा पैलू (आणि चर्चेचा वेगळाच विषय).

एर इंडिया हे लिखाण अमेरिकन accent नुसार बरोबर वाटते, परंतु भारतीय accent नुसार हे एअर इंडिया लिखाण बरोबर वाटते.

येथे प्रश्न accentचा नसून मूळ उच्चारांशी प्रामाणिक राहण्याचा आहे. अमेरिकन accentमध्ये सुद्धा airचा उच्चार दीर्घ ए करूनच केला जातो. J यांनी वर या चर्चेचा थोडक्यात इतिहास दिला आहे पण ते देताना ते त्यातील एका (माझ्या मते) अतिमहत्वाचा मुद्दा विसरले. इंग्लिश भाषेत ए या वर्णाचे अनेक उच्चार आहेत आणि ते लिहिण्यासाठी त्यांच्याकडे शुद्धलेखनाचे नियमही आहेत. सोपे उदाहरण म्हणजे एकाच शब्दाचे विविध उच्चार -- get, gate, gait, इ. देवनागरी लिपीतून मराठीत हे शब्द लिहिताना (प्रमाण) देवनागरीतील उणीव तीव्रपणे दिसून येते. हे गेट, गेअट, गैट, असे लिहावे का? (fare, fair, faire <--अतिदीर्घ )कानडी भाषेत दीर्घ ए (आणि दीर्घ ओ)ची सोय आहे. अशी असती तर मराठीतून air लिहिताना गोंधळ झाला नसता.

प्रस्तुत मुद्दा आहे की हे शब्द (दीर्घोच्चार असलेले) आहे तसेच ठेवावेत आणि वाचकाला contextप्रमाणे त्याचे उच्चार ठरवू द्यावे. नसलेले वर्ण (एअर, गेअट, इ शब्दांमध्ये) उगीचच घुसडू नयेत, नाहीतर इतर भाषांतील शब्दांचे उच्चार मराठी भाषेत (आहेत त्यापेक्षा) चुकीचे रूढ होतील.

मला एअर इंडिया पटते (मराठी लेखांचा शोध घेणारी मंडळी देखील type करताना एअर इंडिया असेच type करतील - स्वतःच्या अनुभवावरून).

शोध घेताना कोणतेही शुद्धलेखन वापरले तरी विकिपीडियावरील पुनर्निर्देशनाच्या सुंदर सोयीमुळे ते इच्छित त्या पानावर आपोआपच पोचतील, तरी त्याबद्दल काळजी नाही.

मराठी भाषा ही उच्चारानुसारी लिहिल्या जाणार्‍या देवनागरी लिपीत लिहिली जात असल्याने परभाषेतले शब्द मराठीत लिहिताना ते, मराठी विद्वान माणसे आजवर जसे लिहीत आलेले आहेत तसेच लिहिले गेले पाहिजेत, भले ते लिखाण अप्रमाण का असेना.

मी याच्याशी अगदी असहमत आहे. विद्वानांनी काय लिहिले यामागे जर कारणमीमांसा उपलब्ध असेल तर ती पाहून धोरण ठरवणे हा सुज्ञपणा. उगीचच मागून चालत आले म्हणून चुकीचेच पुढे चालवणे हे बाबा वाक्यम् प्रमाणम् असे धोरण आपल्याला आणि आपल्या भाषेला हितावह मुळीच नाही. तितकेच महत्वाचे म्हणजे हे विद्वान कोण? जर अद्यकालीन पत्रकार, जाहिरातकार आणि दूरचित्रवाणी-बातमी-लेखक यांना विद्वान मानले तर मात्र मराठी भाषेचे खरे नाही. यांतील बहुतांश विद्वान लिहिताना/बोलताना/वाचताना किमान आठवीपर्यंत मराठी शिकलेले नसावे हे अगदी स्पष्ट दिसून येते. त्यांचा नादी लागून आपली सुंदर भाषा खड्ड्यात घालू नये ही माझी कळकळीची विनंती आहे.

असो. वर स्पष्टीकरण देताना उणेअधिक लिहिले असेल तर त्यासाठी आधीच क्षमा मागतो. ते मुद्दा मांडण्यासाठीच लिहिले आहे. व्यक्तिगत टीका मुळीच नाही हे स्पष्ट करू इच्छतो. आपले तसेच इतरही विद्वानांचे मत अपेक्षित आहेच.

क.लो.अ.

अभय नातू ०५:०६, २७ नोव्हेंबर २०११ (UTC)

मराठी भाषा ही उच्चारानुसारी लिहिल्या जाणार्‍या देवनागरी लिपीत लिहिली जात असल्याने परभाषेतले शब्द मराठीत लिहिताना ते मराठी उच्चाराप्रमाणे लिहिले जावेत. भले ते लिखाण अप्रमाण का असेना.
मला हे काही अंशी पटते पण हे convincing argument नाही. पूर्वीच्या चुका सुधारण्याची संधी असताना ती केवळ पूर्वापार आम्ही असेच करतो या कारणाने चुका करीत राहणे हे पटत नाही. शिवाय, हे धोरण स्वीकारल्यास इतरभाषकांनी बंबई, डेल्ही, बॉम्बे, पूना हे उच्चार त्यांच्या भाषेत लिहिले तर त्याला उपाय नाही.
प्रमाण लेखनाच्या लेख नावांचे आपण पुनर्निर्देशन पाने तयार करू शकतोच!
पण हाच मुद्दा उलट लावला तर ते जास्त बरोबर नाही का वाटणार? चुकीचे रूढ करण्याऐवजी केलेल्या चुका सुधारल्या तर केल्याचा (अधिकच) उपयोग.
एखादा मराठी भाषिक एर वाचून त्याचा मूळ उच्चार उच्चारू शकेल का, याची मला शंका आहे! -
हो, नक्की करेल. चुकीचे उच्चारही वाचूनच आले ना? ए-अ-र वाचून जर एSर असा गृहीत धरलेला उच्चार करता येतो तर मग एर वाचून तेच करणे का नाही जमणार? सवयीचा भाग आहे. इतर उच्चारही जमतीलच.
आणि आजही आपण gate, cate, rate, mate, fate लिहिताना गेट, केट, रेट, मेट, फेट लिहून ही व्यवस्थित दीर्घ उच्चार करतोच की?! तेथे आपल्याला गेअट, केअट, रेअट, मेअट, फेअट लिहिण्याची गरज वाटत नाही.
आणि fair, fare, bear, bareचे काय करणार? दोन्ही दीर्घोच्चार, मग त्यात वेगळेपण कसे दाखवणार?
एअर, फेअर हे उच्चार इंग्लिशमधून व्हाया हिंदी आला असल्याचे माझे ठाम मत आहे. आणि ते असू नये. परभाषेतील शब्द थेट शक्य तितक्या अचूकपणे देवनागरीत ट्रान्स्क्राइब करावे आणि वापरावे हे माझे आग्रहाचे मत आहे.
असो, मघाशी उत्तर लिहित असताना मध्येच अर्धवट टाकावे लागले म्हणून क्षमस्व.
अभय नातू २१:३६, ५ डिसेंबर २०११ (UTC)

हॉट कॅट संपादन

एक दोन तासात हॉट कॅट मराठी विपीवर कसा वापरावा याची माहीती विकिपीडिया:Gadget-HotCat.js येथे देण्याचा प्रयत्न करतो म्हणजे ज्यांना याचा वापर करायचा आहे त्यांनाही नंतर सोपे जाईल. बाकी अडचण आल्यावर कळवालच. संतोष दहिवळ १४:२८, २ डिसेंबर २०११ (UTC)

ता.क. विकिपीडिया:हॉटकॅट येथे हॉटकॅट वापरण्यासंबंधित सविस्तर खुलासा केला आहे. संतोष दहिवळ १९:०८, २ डिसेंबर २०११ (UTC)
मराठी विकिपीडियावर script import करुन अजून तरी हॉटकॅट वापरता येत नाही. त्यासाठी मी बगझिलावर त्याविषयीचा बग रिपोर्टही दिला होता पण मराठी विकिपीडियाच्या admin ने बदल करेपर्यंत तरी आपल्याला script import करुन हॉटकॅट वापरता येणार नाही. त्यासाठी विकिपीडिया:हॉटकॅट प्रमाणेच तो वापरावा लागेल. संतोष दहिवळ १८:०३, ४ डिसेंबर २०११ (UTC)

नमस्कार,

मध्यंतरी विकी संमेलन आणि मग तेथे दिलेल्या जाहीरनाम्यातील घोषणांना कार्यान्वित करण्याचा हालचालीत जसे मोबाई अ‍ॅप, विपी सी डी, मराठी फॉन्ट सुलभीकरण, मिडिया विकिसाठी मराठमोळी सर्वेक्षण पुरवणी तसेच मराठी विकीस्त्रोत सुरु करण्यासाठी भाषांतर, स्रोत साठी मुखपृष्ठ आणि सुचालन, आधारभूत साचे आदी कामात व्यस्त असल्याने इकडे फिराकण्याचे टाळले.

माझ्या माघारीच मला प्रचालक पदाची जबाबदारी आपण देऊ केलीत. माझ्यावर टाकलेल्या विश्वासाबद्दल मी आपला आभारी आहे. दिलेल्या जबाबदारीस मी माझ्या परीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन. भविष्यातही आपल्या अशाच सहकार्याची अपेक्षा.

धन्यवाद

राहुल देशमुख ०५:५६, ४ डिसेंबर २०११ (UTC)

सांगकाम्या संपादन

सांगकाम्या चालवताना काहितरी घोटाळा होताना दिसतो आहे. पानावरील references निघून जात आहेत. अडचण कळवा. संतोष दहिवळ १८:२१, ४ डिसेंबर २०११ (UTC)

अवधि, अवधी ignored from the auto correct list. निनावी

Reference wordlist: http://hunspell-marathi-dictionary.googlecode.com/files/shabdasampada_version9_3.sql.zip. प्रती/प्रति/अवधि/अवधी issue fixed in the list. निनावी

Test edit

तो बदल मीच केला होता. तिथे जांभळ्या सुर्यापाक्षासाठी, सुर्यापाक्षाचे लिंकs दिले होते(इतर भाषांचे)

 

.  

  विकीपत्रिका सभासद नोंदणी ....!  
नमस्कार, Prabodh1987

मराठी विकिपीडियाचा वाढत असलेला व्याप, म्हणजे कामाच्या आघाड्या आणि विपी परिवार यामध्ये उत्तम समन्वय रहावा, वेगवेगळ्या दिशांनी होणार्‍या कामांची सर्वाना माहिती व्हावी आणि सद्द घटनांबद्दल आढावा ह्या उद्देशाने मराठी विकिपीडिया विकीपत्रिका दि. १ जानेवारी २०१२ पासून सुरू करीत आहोत.

पत्रिका इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये सदस्यांना त्यांच्या चर्चापानावर पोहचविण्यात येईल.

मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.

आपल्या माहिती आणि पुढील योग्य कार्यवाहीसाठी सादर.

कळावे - खबर्या (विकीपत्रिका)


चित्रे नियोजन आणि वर्गीकरण संपादन

नमस्कार प्रबोध,

मराठी विकिपिडीयावर चित्रे हा विभाग दुर्लक्षित असल्याचे जाणवते. प्रताधिकार बाबतच्या समस्या आणि युक्तिवाद हे पण त्यास काही प्रमाणात जबाबदार आहेत. तेव्हा ह्या दुर्लक्षित आणि नाजूक विभागास मी हात घालतो आहे, कोणीतरी ते करावेच लागेल कारण गार्बेज वाढत आहे.

आज आपल्या कडे अवर्गीकृत- 2323 चित्रे आहेत/होती. त्याची गम्मत म्हणजे १८०० चित्रे रोमन नावाने २५० चित्रे देवनागरी नावाने तर २०० चित्रे हि अंक नावाने (डिजिटल क्यामेरा देतो तेच फाईल नेम) चढवली आहेत. चित्रांची नवे हा वेगळा चर्चेचा विषय होऊ शकतो. (आपल्याला त्याचे पण मापदंड ठरवावे लागतीलच) मुख्यतः चित्रांचे ढोबळ वर्गिकरण करणे, डूल्पिकेट चित्रांना वगळणे, कॉमन्सवर पहिलेच उपलब्ध चित्रास वगळणे/ट्याग करणे, प्रताधिकाराचे प्रमाणपत्र जोडणे, प्रताधिकारित चित्रांना, फेअर टू युस, अप्रताधीकरीत वैगरे प्रमाणित करणे ......

आस प्रवास जसा जसा वेळ मिळेल तसा तसा निपटण्याचा प्रयत्न असेल.

आता हा सारा नाजूक मामला आहे तेव्हा प्रथमतः नियोजनाच्या दृष्टीने वर्गीकरण करावे, जसे प्रमाणपत्रा नुसार वर्ग करावे , वर्गा प्रमाणे प्रमाणित करावे आणि त्यास रीव्हीव करून मग मेटा डेटा, कि वर्डस वैगरे घालून विषया नुसार वर्गाकडे वळते करावे असे वाटते. सरळ विषया नुसार वर्गीकरण केले तर प्रताधिकाराचे प्रश्न मागे राहतात तेव्हा प्राथम प्रमाणित करून मगच विषयवार वर्गीकरण करावेसे वाटते.

तेव्हा ह्याकामात काही ढोबळ निकष घेऊन सुरुवात करावी लागेल आणि त्यास कालांतराने सटीक करता येईल म्हणून प्रथम वर्गीकरण करू त्यात २०-३० टक्के बदल रिव्हिजन दरम्यान होईल आणि मग पुढे पाहू. आजच प्रताधिकार आणि कायदे विषयक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे ठरवले तर काम मागे पडेल आणि लोक वादावाद करत बसतात.

  • चित्रांच्या नियोजन करण्याच्या कामी अधिक काही चागला आप्रोच असल्यास किंवा काही सुधारणा करावयाच्या असल्यास जरूर कळवावे.

राहुल देशमुख ०७:३१, २३ डिसेंबर २०११ (UTC)

सदस्य नावातील बदल संपादन

सदस्य नावातील बदल संबधीत गोष्टी ब्यूरोक्रॅट या नात्याने अभय नातूंच्या क्षेत्रात येतात ,त्यांना विनंती करावीमाहितगार १६:१४, २४ डिसेंबर २०११ (UTC)

तुमची सदस्यनावबदलाची विनंती पाहिली आणि सदस्यनाम बदलून टाकलेले आहे. ते करीत असताना एक ताकीद आली होती --
ताकीद: सदस्य सांगकाम्याप्रबोध याने एकीकृत प्रणालीद्वारे प्रवेशाचा मार्ग निवडला आहे.खात्याचे पुनर्नामाभिधान सदस्यास वैश्विक पातळीवरचा प्रवेश रोखण्यास कारणीभूत होइल.
याचा अर्थ हाच की तुम्हाला इतर विकी प्रकल्पांवरही अशीच विनंती करुन नाव बदलून घ्यावे लागेल.
अभय नातू १८:०९, २४ डिसेंबर २०११ (UTC)

आपल्या सूचनेवरून येथे टिपणी टाकली आहे. संतोष दहिवळ १६:४९, २४ डिसेंबर २०११ (UTC)

एन.बी.ए. वर्ग संपादन

आपण recently काही एन.बी.ए. संघांचा वर्ग वर्ग:नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन वरून वर्ग:बास्केटबॉल संघला बदलल्याचे पाहिले. ह्याचे कारण कळेल काय? हे बास्केटबॉल संघ आहेत हे खरे परंतु more specifically ते एन.बी.ए. संघ आहेत त्यामुळे वर्ग:नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन हाच वर्ग जास्त योग्य आहे असे वाटते. - Abhijitsathe १६:१०, २५ डिसेंबर २०११ (UTC)

येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयी संपादन

नमस्कार ! चावडीवर येथे येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयी काही प्रस्ताव मांडले आहेत. त्याविषयी कृपया आपली मते/कल्पना मांडावीत, अशी विनंती.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:१०, १ जानेवारी २०१२ (UTC)

विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी संपादन

नमस्कार, मागे चावडीवर कळवले होते त्या प्रमाणे "विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी" याची प्रकल्प पाने आणि अंतर्गत पाने मराठी विकिपीडिया वर आजच बनवली आहेत. आपला सहभाग आणि पाठिंबा यासाठी आहेच. तेंव्हा या प्रकल्पांतर्गत मराठी रंगभूमीची अधिकाधिक माहिती मराठी विकिपीडिया वर आपण सारे टाकूया.... मंदार कुलकर्णी (चर्चा) २२:४७, ११ मार्च २०१२ (IST)Reply

नमस्कार, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर "विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी" वर प्रकल्प प्रस्ताव मांडला आहे आणि कामाला सुरुवात केली आहे. तसेच विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी/चालू कामे यात थोडी भर घालून काही लाल दुवे तयार केले आहेत. जशी सवड मिळेल तसे नवीन लेख तयार करून त्यात भर घालायला सुरुवात करूया. तसेच आहे त्या लेखातही बरीच भर घालायची आहे. नाटकांची सूची, नाटककारांची सूची, नाट्य कलावंतांची सूची, नाट्य निर्माते, नाट्य दिग्दर्शक अशा सूच्या बनवून त्यात माहिती लिहायची आहे. आपले अनमोल सहकार्य यामध्ये अपेक्षित आणि आवश्यक आहे.मंदार कुलकर्णी (चर्चा) २१:५१, २७ मार्च २०१२ (IST)Reply

एअर इंडिया संपादन

पुन्हा एकदा सांगू इच्छितो की आपण एर इंडियाने त्यांच्या लोगोवर हिंदीमध्ये लिहिलेले आहे. त्यांनी air या इंग्लिश शब्दाचा हिंदी उच्चार लिहिलेला आहे...अभय नातू

साफ चूक. हिंदीत Air, Fare, Care आदी शब्द अनुक्रमे एयर, फ़ेयर, केयर असे लिहितात. एअर इंडिया ही मूळ टाटांची कंपनी मुंबईत स्थापन झाली होती. त्यांनी अर्थातच मराठी लिखाणाचे नियम स्वीकारले. अगदी स्थापनेच्या दिवसापासून आजपर्यंत कंपनीचे नाव हिंदी, मराठी आणि अन्य भारतीय लिप्यांमध्ये 'एअर' असेच लिहिले जात आले आहे....J

मराठी भाषा ही उच्चारानुसारी लिहिल्या जाणाऱ्या देवनागरी लिपीत लिहिली जात असल्याने परभाषेतले शब्द मराठीत लिहिताना ते, मराठी विद्वान माणसे आजवर जसे लिहीत आलेले आहेत तसेच लिहिले गेले पाहिजेत, भले ते लिखाण अप्रमाण का असेना....प्रबोध

संस्कृत सोडली तर जगातली कुठलीही भाषा उच्चाराप्रमाणे लिहिली जात नाही. संस्कृतमध्ये 'अ', 'इ', 'उ', 'ऋ' आदी स्वरांचे प्रत्येकी १८ आणि बाकीच्या (ए, ऐ, ओ, औ, ऌ) स्वरांचे प्रत्येकी १२ उच्चार आहेत, हे सर्व उच्चार स्वतंत्रपणे लिहून दाखवण्याची परिपूर्ण सोय संस्कृत लिपीत आहे. याचा अर्थ एवढाच की, संस्कृत लिपीत लिहिलेल्या प्रत्येक संस्कृत शब्दाचा एकमेव उच्चार होतो, आणि एका उच्चाराचे एकमेव रीतीचे लिखाण होते.. . तरीसुद्धा, संस्कृत लिपीत उर्दू शब्द लिहिता येतीलच असे नाही, अर्थात इंग्रजीही नाही.

मराठी लिपीचे तसेच आहे. मराठी भाषा (अगदी)उच्चारानुसारी लिहिली जाते असे म्हणणे तितकेसे योग्य नाही. गवsत् हा बोली शब्द मराठीत गवत असा लिहिला जातो, हौंस हा शब्द हंस असा, संय्यम हा शब्द संयम असा, तर उत्छ़व् (छ़ चा उच्चार दंततालव्य-- च़छ़ज़झ़ञ या मालिकेप्रमाणे) हा बोली शब्द, उत्सव असा लिहिला जातो. केलs गेलs मेलs हे शब्द, केलं, गेलं, मेलं असे लिहिले जातात. आराsम् हा उच्चार लिहिताना आराम असा लिहितात. वगैरे वगैरे. तरीसुद्धा, मराठी आणि अन्यभाषी शब्द मराठी लिपीत कसे लिहावेत याबद्दल रूढ संकेत आहेत. त्यामुळे Air हा शब्द मराठीत लिहिताना एअर असाच लिहिला गेला पाहिजे, कारण तसा संकेत आहे..

महाराष्ट्रात इंग्रजी शब्दांच्या मराठी उच्चारासाठी ऑक्सफर्डच्या कोशाचा आधार घेतला जातो, तर दक्षिणी भारतात केंब्रिजचा कोश प्रमाण मानला जातो. (उत्तरी भारतांत कोणता ते माहीत नाही!) साहजिकच दाक्षिणात्यांचे इंग्रजी उच्चार महाराष्ट्रीयांच्या इंग्रजी शब्दांच्या उच्चारांपेक्षा वेगळे असतात. कोण चूक कोण बरोबर हा प्रश्न उद्भवतच नाही. कॅनेडियन उच्चार आयरिशांपेक्षा आणि ऑस्ट्रेलियींपेक्षा वेगळे असणार हे गृहीत धरलेले असते. तसे ते असायला शब्दकोशांची कोणतीच आडकाठी नसते. मात्र, या सर्व लोकांचे इंग्रजी लिखाण अगदी समान आणि प्रमाण असते. मराठीतही एअर हे लिखाण प्रमाण आहे, याबद्दल कुठलीही शंका बाळगायचे कारण नाही..

ऑक्सफर्ड कोशात Air चा उच्चार एअs (eə*) असा दिला आहे. डॅनियल जोन्सच्या कोशातही तसाच..मग अमेरिकनांनी हा एर उच्चार कुठून आणला?....J

त्यामुळे air हा शब्द मराठी भाषेत कसा उच्चारला जातो ते विचारात घ्यायचे कारण नाही; तो शब्द कसा लिहिला जात आला आहे आणि सध्या कसा लिहिला जात आहे हे महत्त्वाचे. विकिपीडिया हे लिखित माध्यम आहे, येथे लिहिलेला शब्द कसा उच्चारतात याला फारसे महत्त्व नाही. ऑक्सफर्डच्या शब्दकोशात इंग्रजी शब्दांचे उच्चार ' दक्षिणी लंडनच्या शैक्षणिक संस्था असलेल्या उपविभागात जसे उच्चारले जातात तसे दिले आहेत.' अशी माहिती असते. याचा अर्थ दक्षिणी लंडनच्या अन्य उपविभागांत, किंवा इंग्लंडच्या अन्य भागांत किंवा जगात अन्य देशांत उच्चार वेगळे असू शकतात हे मान्य करण्यात आलेले आहे. इंग्लंद, इंग्लैंड, लंदन एयर, केयर, फ़ेयर हे हिंदी लिखाण मराठी विकिपीडियावर जसे चालणार नाही तसे, एर, केर्, फेर्, बेर्, टेर्, हेर, मेर असले अमेरिकी पद्धतीचे लिखाण मराठी विकीवर असता कामा नये. ..J (चर्चा) १५:५६, १४ मे २०१२ (IST)Reply

मी याच्याशी अगदी असहमत आहे. ...बहुतांश विद्वान लिहिताना/बोलताना/वाचताना किमान आठवीपर्यंत मराठी शिकलेले नसावे हे अगदी स्पष्ट दिसून येते. ...एअर, फेअर हे उच्चार इंग्लिशमधून व्हाया हिंदी आला असल्याचे माझे ठाम मत आहे...अभय नातू

एअर, फेअर हे हे हिंदी उच्चार नाहीत हे वरती स्पष्ट केलेच आहे. मराठीतले विद्वान आठवीपर्यंतही शिकलेले नसतात हे विधान आपणां सर्वांच्या बाबतीत अपमानास्पद आहे. इंग्रजी शब्द मराठी लिपीत कसे लिहावेत आणि मराठी विशेष नामांचे इंग्रजी स्पेलिंग कसे करावे याचे धडे मराठी विद्वानांना थॉमस कॅन्डीने १९या शतकांत देऊन ठेवले आहेत. दुर्दैवाने हिंदीत थॉमस कॅन्डी नव्हता, म्हणून हिंदीभाषकांना एअर हा शब्द एयर असा, आणि बँक हा शब्द बैंक असा लिहावा लागतो...J (चर्चा) १५:५६, १४ मे २०१२ (IST)Reply

विकिपीडिया दशक पूर्ती सोहळा संपादन

आपले मराठी विकिपीडिया वरील योगदान बहूमोलाचे आहे, आपण बर्‍याच वर्षांपासून कार्यरत आहात. आपणा सारख्या संपादकांकडे पाहून आमच्या सारख्या नवीन पिढीच्या संपादकांस प्रेरणा मिळते , तसेच भविष्यातील संपादकांना सुद्धा प्रेरणा मिळावी, व संपादकांचा गौरव व्हावा असे वाटते. त्या निमित्त मराठी विकिपीडिया वर दशकपूर्ती सोहळा हे पान तयार केले आहे, कृपया आपले विचार जरूर कळवावे.
आपला नम्र AbhiSuryawanshi (चर्चा) ०७:०४, ११ जून २०१२ (IST)Reply

वर्ग नाव संपादन

नमस्कार प्रबोध,
आपण तयार केलेला वर्गाच्या नाव वर्ग:मतदार सांघानुसार खासदार व्याकरणदृष्ट्या अयोग्य आहे.
योग्य नाव वर्ग:लोकसभा मतदारसंघानुसार खासदार किंवा वर्ग:मतदारसंघानुसार खासदार असे असावे.
नवीन वर्ग करून या वर्गातील पाने तिकडे टाकावीत.
मदत लागल्यास सांगा.
क्षितिज पाडळकर (चर्चा) ००:२०, १३ फेब्रुवारी २०१३ (IST)Reply

मी AWB वापरत नाही (सद्ध्यातरी).
जमेल तसे मी ते वर्ग hotcat ने बदलतो.
धन्यवाद. क्षितिज पाडळकर (चर्चा) ००:५६, १४ फेब्रुवारी २०१३ (IST)Reply

शरद उपाध्ये संपादन

सदस्य_चर्चा:Padalkar.kshitij#नाटककार इथे आपल्यासाठी संदेश ठेवला आहे. क्षितिज पाडळकर (चर्चा) ०१:५५, १९ फेब्रुवारी २०१३ (IST)Reply

सहकार्य संपादन

नमस्कार प्रबोध ,

मराठी विकिपीडियावर दर वर्षी प्रमाणे फोटोथोन सुरु झाली आहे. आपणास नम्रविनंती आहे कि ह्या दर्म्यान आपण कोणत्याही सदस्यास येथे चित्रे दान देण्या बाबत कॉमन्स, प्रताधिकार बाबत शंका किंवा इतर कारणांवरून कुपया चर्चा करणे टाळाव्यात. ह्या मुळे सदर उपक्रमात कन्फ़ुजन निर्माण होणार नाही. चढनार्या चित्रांवर नजर ठेवण्याचे काम काही लोक करीत आहेत; आणि फोटो थोन नंतर सर्व चित्रांचे मोडरेषण, प्रमाणीकरण, वर्गीकरण वैगरे बरीच ब्याक एंड कामे करावी लागतात. आताच सदस्यांशी संवाद साधल्यास विवादास्पद अथवा गोंधळाची परिस्थिती निर्माण होण्याचा धोका संभवतो. फोटोथोन नंतरच्या मोडरेषण करण्याच्या कामी आपले योगदान देण्यासाठी स्वागतच असेल. त्यात जर काही प्रताधिकारित संचिका आढळल्या तर त्या मराठी विकिपीडियातील "प्रताधिकारित संचिका", अथवा "वगळण्याच्या संचिका" ह्या वर्गात वर्गीकृत करून मग त्यावर निर्णय घेवून प्रच्यालक त्या वगळतात.

अश्या उपक्रमातून संचिका मिळवणे ह्या सोबतच नवीन सदस्यांना विकिपीडिया सोबत जोडणे, अधिका अधिक लोकांपर्यंत अश्या उपक्रमातून विकिपीडिया पोहचवणे असा असतो. विकिपीडियाच्या चौकटीच्या बाहेर जावून अनेक सदस्यांनी चालवलेल्या आऊटरिच अभियाना मधून घेतलेल्या मेहनतीने आज फोटोथोन ला प्रतिसाद मिळतो आहे. ह्यात अनेक नवगत सदस्य प्रथमच भाग घेत असतात आणि त्यामुळे त्यांना विकिपीडियाच्या गुंतागुंतीच्या अनेक गोष्टी माहित नसणे श्यक्य आहे तेव्हा आताच मोडता नसावा.

मला आशा आहे कि आपण माझी भूमिका समजावून घ्याल आणि फोटोथोन उपक्रमाच्या यशस्वी होणाच्या कामी भरीव योगदान देवून सहकार्य कराल. - ०१:४८, २६ फेब्रुवारी २०१३ (IST)


जरा इकडे लक्ष घालावे संपादन

प्रबोध नमस्कार,

तुम्ही संतोष दहीवळ ह्या तुमच्या मित्रास समजावून सांगण्याची कृपा कराल का ? संतोष दहीवळ ह्यांना प्रशासकांनी अधिकृत सांगकाम्या खाते १९ मार्च २०१२ ला दिले असतांना ते आपल्या सदस्य खात्यातून रोज सांगकाम्या चालवून संपादने करतांना दिसतात आहेत. त्याने अलीकडील बदल मध्ये सारा प्रताप दिसतो. अवैध मार्गाने संपादन संख्या वाढवण्याच्या ह्या प्रकाराने मराठी विकिपीडिया नितीमत्तेची पायमल्ली होत आहे. संतोष ह्याची हि जुनीसवय आहे असे दिसते , मंदार कुलकर्णी ह्यांनी संतोष ह्यास ह्या पूर्वी ह्या बाबत समाज दिली असता त्यांनी येथे मोठा गोंधळ घातला असल्याचे स्मरते येथे पहा

आपण संतोष याची प्रच्यालक पदा करता शिफारस केली खरी पण हे काय सुरु आहे ? ज्यांनी लोकांना नियम सांगायचे तेच जर नियमांची पायमल्ली करीत असतील तर ..... मग मराठी विकिपीडिया चे काय होणार ? - Hari.hari (चर्चा) १०:३८, ९ मार्च २०१३ (IST)Reply

Prabodh1987,

संदर्भसंहिता वापरताना काही अडचणी येत असल्यास किंवा शंका असल्यास जरुर कळवाव्यात. - संतोष दहिवळ (चर्चा) ०९:५४, २८ ऑगस्ट २०१३ (IST)Reply

मिडियाविकि मेसेजेस संपादन

सर्व साधारण बदल

  • ट्रासंसलेट विकिवर किमान दहा एक संपादने करून पहावीत मग आठवड्या भराने उर्वरीत शंका विचाराव्यात (आठवड्या भराने कारण मिडियाविकि सॉफ्टवेअर मध्ये डेव्हेलेपर्स कडून बदल आंतर्भूत केले जाण्यास काही कालावधी जातो). आणि थोडे तरी करून पाहिल्या शिवाय अंदाजा येणार नाही.

उत्तराचा विस्तृत भाग संपादन


काही विशीष्ट बदल लगेच अपेक्षीत असेल तर वेगळ्या संदेशाने कळवावे.

धन्यवाद आणि शुभेच्छा

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:३९, ३१ ऑगस्ट २०१३ (IST)Reply

आव्हान संपादन

आजरोजी २०,०००व्या लेखाचा आकार १,१०१ बाइट इतका आहे.

अभय नातू (चर्चा)

आमाआका संपादन

विकिपीडिया:मुखपृष्ठ नवीन माहिती प्रकल्प ह्या प्रकल्पात वस्तुत: सर्व प्रयोजन केलेले दिसते आहे.साचा:विकिपीडिया:नवीन माहिती/temp मध्ये नामनिर्देशन अभिप्रेत असावे असे वाटते.प्रकल्पात संबंधीत साचात साचा रचना अभ्यासल्यास उलगडा बऱ्यापैकी होईल.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:५४, ३० ऑक्टोबर २०१३ (IST)Reply

@Mahitgar:, होय, असेच वाटेते. विकिपीडिया:मुखपृष्ठ नवीन माहिती प्रकल्पाचा दुवा मुखपृष्ठावरिल साच्यात टाकवा का? - प्रबोध (चर्चा) २१:५७, ३० ऑक्टोबर २०१३ (IST)Reply

होय,मुखपृष्ठ मथळ्यात सकाळीच दुवा जोडला पण काळ्या अक्षरात तो लक्षात येणे शक्य नाही. तेव्हा साचा:मुखपृष्ठ नवीन माहिती येथे तळाशी विकिपीडिया:मुखपृष्ठ नवीन माहिती प्रकल्पाचा तसेच साचा:विकिपीडिया:नवीन माहिती/temp हा दुवा [[साचा:विकिपीडिया:नवीन माहिती/temp|'''सूचवा''']] असे लिहून जोडल्यास बरे पडेल. आपणास संबंधीत सुयोग्य बदल करता यावेत म्हणून साचा:मुखपृष्ठ नवीन माहिती चा सुरक्षास्तर तात्पुरता कमी केला आहे.
विकिपीडिया:नवीन माहिती चा ही अनुभवी जाणत्या सदस्यांकरीता सुरक्षास्तर कमी केला आहे.पण या पानास संपादन गाळणीच्या माध्यमातून सुरक्षा देण्याचा प्रयास असेल.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २३:२५, ३० ऑक्टोबर २०१३ (IST)Reply

आमाआका आकार विषयक चर्चेचा सारांश संपादन

आमाआका आकारा बद्दल अभय नातूंशी खालील प्रमाणे चर्चा झाली.मुखपृष्ठावरील उजव्या स्तंभाचा, डाव्या स्तंभाच्या लांबीशी समतोल टिकावयास हवा. हे गणिती मांडणीत बसवणे जेवढे सोपे किंवा अवघड त्यावर विकिपीडिया:नवीन माहिती पान संपादन संपादन संख्या आणि वर्षांच्या अनुभवावर जाणत्यांना मुक्त ठेवायचा का त्यातही मुखपृष्ठाच्या मांडणीचा समतोल सांभाळता येणाऱ्या निवडक सदस्यांनाच मुक्त ठेवायच हे बऱ्यापैकी अवलंबून असेल.म्हणून प्रत्येक समतोल आकार बदला सोबत आकार आणि गुणोत्तर मोजून नोंदवता आल्यास,गणिती मांडणी आणि पानाची मुक्तता तेवढीच सुकर होईल. आवश्यक नाही पण सवडी नुसार जमले तर बघावे असे वाटते.

नमस्कार, आमाआका चे सध्याचे पान विकिपीडिया:नवीन माहिती यातील मुखपृष्ठावर नीट दिसावयास हवा म्हणून कमीत कमी किती मजकुर असण्याची आवश्यकता असते , आणि अधिकतम किती मजकुर असावा या संबंधाने काही आडाखे असल्यास त्याची माहिती मार्गदर्शन करावे अशी विनंती आहे.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २१:२९, ३१ ऑक्टोबर २०१३ (IST)Reply


आमाआका विभाग मुखपृष्ठावरील उजव्या स्तंभात येतो. या पूर्ण स्तंभाची उंची दिनविशेष तसेच उदयोन्मुख लेख या सदरांवरही आधारित आहे. उदयोन्मुख लेख सारखा बदलत नसला तरी दिनविशेष सदराची उंची अनप्रेडिक्टेबल असते असे असता आमाआकाचा नेमका आकार ठरवणे कठीणच आहे. तरीही ढोबळमानाने यात कमीतकमी पाच आणि अधिकाधिक १० एंट्र्या असाव्यात. बदल केल्यावर मुखपृष्ठ एकदा नजरेखालून घालणे केव्हाही हितावहच.
अभय नातू (चर्चा) ००:१९, १ नोव्हेंबर २०१३ (IST)Reply

संपादन गाळणी विषयक शंका निरसन संपादन

नमस्कार,

आपण ऑक्टोबर महिन्यात संपादन गाळणीच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सजगता संदेशांविषयी पृच्छा केली होती पण शंका निरसनास तेव्हा वेळ नसल्या मुळे मी गाळणी तात्पुरती अकार्यान्वित केली.

आपला प्रश्न >>मला इतक्यात लेख "जतन" करताना कही warning येतात. त्या मजकुरातून नेमकी warning काय आहे हे मला कधीच कळत नाही. त्यामुळे मी त्याच्या कडे संपूर्ण दुर्लक्ष करतो. सांगण्याच मुद्दा हा, कि इतर नवे व जुने संपादकही त्याकडे दुर्लक्ष करत असणार. अशा परिस्थितीत याची खरचं गरज आहे का?<< असा होता.


१) आपण निर्देशकेलेली विशेष सजगता संदेश गाळणी मुळ अभिप्रेत उद्दीष्टांना ठरवून दिल्या प्रमाणे काम करत असली तरी गैरसमज टाळण्याच्या दृष्टीने 'तात्पुरती' अकार्यान्वित केली आहे.
२) आपणास कल्पना आहेच कि आपण ॲब्युज फिल्टर हा शब्दही वापरत नाही केवळ संपादन गाळणी शब्द वापरतो. "पुर्व/सजगता सूचना देण्यासाठी व्यवस्था संदेश" हा शब्द प्रयोग वापरतो, वॉर्नींग हा शब्द वापरणे अधिकतम टाळतो.एवढेच नाही तर आपण या गाळण्या चांगल्या कामांकरताही वापरतो म्हणून इंग्रजी टर्मिनॉलॉजी बदलावी अशी विनंती बगझीलावरही मागेच केलेली आहे.
३) उत्तर अमेरीका आणि युरोपीय संस्कृतीत घराघरात एनसायक्लोपेडीया असे त्या शिवाय संदर्भ देऊन प्रकल्प लेखन आणि संशोधनात्मक लेखनाचा त्या संस्कृतीत जसा पाया आहे तसा भारतात नाही त्यामुळे विश्वकोशीय आणि विकिपीडियातील लेखन शैली आणि संकेतांबद्दल आपल्या कडे अनभिज्ञता असते.विकिपीडियाच्या मुक्तता तत्वानुसार कोणतीही नवीन व्यक्ती सुद्धा सरळ येऊन संपादनात सहभागी होऊ शकते.
या नवागतांच्या हातात नियमांची लांब यादी हातात ठेवण्यापेक्षा योग्य वेळी योग्य माहिती पुरवण्याकरीता विवीध माध्यमांचा उपयोग करण्याचा प्रयत्न आहे आणि त्यातलाच एक भाग संपादन गाळण्यांमधील टप्पेवार संदेश व्यवस्थाही आहे.
३) युजर बिहेवीअर स्टडी आणि एकुण अनुभवावरून नवीन सदस्यांकडून सहसा संदेशांकडे दुर्लक्ष होत नाही.ते संदेशांना सहसा मन लावून वाचतात असे दिसून आले आहे.
४) जशी एखादी जाहीरात सतत दिसत राहिली तर दुर्लक्ष होते तसेच काहिसे या संदेशांचेही होते याची कल्पना आहे.म्हणूनच संदेश सतत न दिसता काही संपादने सोडून दिसावेत अशी व्यवस्था संपादन गाळणीत करून मिळावी असा बग मागेच बगझीला वर नोंदवला.तो पर्यंत आपल्याकडील संदेशातच काही संदेश ब्लॅंकराहतील अशी व्यवस्था केली.( आणि त्यामुळेच आपण संदेशाचे जे छायाचित्र दिले त्यात आपणास संदेश आढळला नव्हता).पण आपले रास्त म्हणणे लक्षात घेत वेगवेगळ्या सदस्य गटांना वेगवेगळ्या कालावधी करता अपवाद करता येईल जेणेकरून सतत संदेशांचा जाच होणार नाही. कदाचित गाळणीच अधून मधून बंद ठेवण्याचा पर्यायही सोबत वापरता येईल.
५) आपण ज्या विशिष्ट संपादन गाळणीतील संदेश फेस केले ती गाळणी विकिपीडियाच्या किमान विकिसंकेतांचा परिचय संदेशांद्वारे करवते.सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या संवेदनशील असू शकणाऱ्या लेखांमध्ये संपादन करणाऱ्या सदस्यांना हे संदेश दिसण्याची शक्यता या गाळणी करता अधिक ठेवली आहे.लेखांचा दर्जा आणि ज्ञानकोशीयता राखणे सुलभ जावे.संपादन युद्धे झाली तरी किमान पक्षी एस्कलेटहोऊ नयेत.याची प्राथमिक काळजीही हे संदेश घेतात. साधारणत: केवळ ५-६ टक्केच संपादने या गाळणीच्या कक्षेत येताना दिसतात.पण एखादी व्यक्ती अशाच लेखांमध्ये जास्त वेळ राहील्यास संदेश जास्त वेळा दिसण्याची शक्यताही असू शकते.(असे होऊ नये म्हणूनही काही एनहान्समेंट बगही बगझीलावर नोंदवले आहेत).
या गाळणीतील संदेश संख्येच्या आसपास संदेश दाखवल्या नंतर प्रचालक आणि जाणती मंडळी टप्प्या टप्प्याने या गाळणीच्या कक्षेच्या बाहेर जातील.जाणते आणि प्रचालकांनाही यातून सुरवातीपासून अपवाद न करण्याची कारणे तीन.एक बऱ्याचदा जाणत्यांनाही काही पैलूंची कल्पना नसण्याची शक्यता नसते त्या पैलुंची कल्पना करून घेण्याची संधी त्यांना मिळावी, दुसरे संवेदनशील विषयात मार्गदर्शन करताना त्यांनाही पुढेचालून सोपे जावे आणि तिसरा उद्देश संवेदनशील विषयात संदेश केवळ आम्हालाच दाखवले जातात त्यांना नाही असा प्रवाद होऊ नये म्हणूनही.
सोबतच जाणती मंडळी नवीन सुविधेच्या/गाळणीच्या उणीवा तत्परतेने नजरेस आणून देऊ शकतात. नवागतांचा फिडबॅक येण्यास तेवढा विलंब जाणत्याकडून होत नाही त्यामुळे सुविधा सटीक करणे अधिक तत्परतेने होऊ शकते.
तर त्यामुळे या विशीष्ट गाळणीतून संपादन संख्येनुसार जाणते आणि प्रचालक टप्प्या टप्प्याने अपवाद करण्याचे प्रस्तावित होते/आहे.विलंबाचे कारण एकाच संपादन संख्या गटातील सदस्य संपादन करून गेले असतील असे नव्हे
६) अशा मार्गदर्शनाची जबाबदारी जाणत्या सदस्यांनी स्वत:च का पार पाडू नये . बॉट आणि गाळण्या कशा करता ? बॉट आणि गाळण्या ही जबाबदारी पूर्णपणे पारपाडूही शकत नाहीत त्यामुले जाणत्या सदस्यांचे पूर्ण काम गाळण्या हातात घेऊ शकणार नाहीत तसा त्यांचा उद्देशही असणार नाही.
संपादन गाळणीतील संदेश काम न्यूट्रलपणे पार पाडतात. संवेदनशील विषयात तुम्ही या किंवा त्या गटाचे आहात म्हणून असे अमुक तमूक संकेत दाखवत आहात हा प्रवाद संपादन गाळणीच्या बाबतीत होण्याची शकयता कमी असते. दुसरे प्रत्येकवेळी प्रत्येक नवागताला दिर्घ मार्गदर्शन आणि उत्तरे देणे जाणत्या सदस्यांना शक्य होतेच असे नाही.संपादन गाळण्या ते काम आपसूक पणे वेळच्या वेळी निभावून नेतात.मराठी विकिपीडिया सारख्या प्रकल्पात एकुणच लेखकांची संख्या कमी असताना संपादन गाळण्या पुन्हा पुन्हा होणारे चर्चा-संदेशांचे कामही अल्पसे वाचवल्याने आपल्यालाही आपल्या लेखन/संपादनाकरता अधिक वेळ मिळत राहतो.
असा साकल्याने विचार करूनच संपादन गाळण्यांची रचना केली आहे.काम सावकाश कोणतीही घाई न करता करण्याकडे कल आहे.उत्तराच्या प्रदिर्घते करता क्षमस्व. नेहमी प्रमाणे साहाय्य पानात नंतर वापरता यावे म्हणून उत्तर मुद्दाम दिर्घ दिले आहे.
आपल्या मनमोकळ्या सूचनां या पुढेही मिळाव्यात हि नम्र विनंती.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १४:५९, ६ डिसेंबर २०१३ (IST)Reply

अनुवाद-समसमीक्षा Peer Review of translation विनंती संपादन

आपल्या सवडीनुसार मराठी विकिस्रोत प्रकल्पातील अनुवादीत लेखात अनुवाद-समसमीक्षा Peer Review of translation करून हवी आहे. मागे माझ्या चर्चा पानावर अनुवादांच्या संदर्भाने Peer Review ची संक्ल्पना आपण मांडली होती म्हणून आठवणीने विनंती करत आहे. तिथे आपल्या प्रतिसादाची प्रतिक्षा असेल.

धन्यवाद.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:४५, १० फेब्रुवारी २०१४ (IST)Reply

मराठी विकिपिडिया २०१५-१६ वार्षिक आराखडा संपादन

नमस्कार,

मला आपणास कळविण्यात आनंद होतो की, CIS-A2K नी मराठी विकीपीडियासाठी २०१५-१६ वर्षाच्या कामकाजाचा आराखडा मेटावर काही दिवसांपूर्वी सादर केला आला आहे. मी आपणास विनंती करतो की, कृपया मराठी विकिपीडियाच्या आराखाड्या बद्दल आपले विचार, शंका किंवा अभिप्राय मनमोकळेपणे चर्चा पानावर सादर करून मराठी विकिपिडियाच्या आराखड्यात सुधारणा करण्यात मदत करावी.

मराठी विकिपिडिया २०१५-१६ वार्षिक आराखडा.

धन्यवाद. --Abhinavgarule (चर्चा) १४:०४, १४ एप्रिल २०१५ (IST)Reply

संचिका परवाने अद्ययावत करा संपादन

नमस्कार Prabodh1987,

विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.


आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.


आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!

Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~

धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन संपादन

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.


मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करावेत संपादन

नमस्कार Prabodh1987,

विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.


आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.


आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!

Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

बदल संपादन

विकिपीडिया:साईट नोटीस/वाचन प्रेरणा/39 यात आपणास काय बदल करावयाचा आहे ते माहित नाही परंतु आपल्यासाठी सुरक्षास्तर उद्या संध्याकाळपर्यंत कमी केला आहे. सर्वच साइट नोटीस पाने खुली ठेवणे प्रॅक्टीकली शक्य नाही. पण आपल्याला संपादन करावयाची एकाच रेंजमधली पाच दहा पाने एका वेळी सुरक्षास्तर कमी करून देता येऊ शकतील. जसे की विकिपीडिया:साईट नोटीस/वाचन प्रेरणा साइट नोटीस पानाचा स्रोत पाहीला तर start=31|end=35 ही पाचच पाने सध्या ऑनलाईन आहेत हे लक्षात येईल उर्वरीत पाच दहा पानांची ज्यांच्यावर अनुभवी सदस्य काम करू इच्छितात ती मोकळी करून देणे शक्य आहे तसेच. अशीच नवी पाने बनवण्यासाठी नवे क्रमांकन पानांची रेंज संपादनासाठी उपलब्ध करून देता येतील.


योगा योगाने विकिपीडिया:साईट नोटीस/वाचन प्रेरणा ची ३१ ते पुढच्या पानांची सुरक्षीत करणे पूर्ण झालेले आहे १ ते तीस बहुधा अद्यापी सुरक्षीत करावयाची आहेत (ती आत्ता करणार होतो पण उद्या सकाळ पर्यंत आपल्यासाठी थांबेन परंतु उद्या दुपार नंतर ती वापरावयाची असल्याने दुपारनंतर सुरक्षीत करणे भाग असेल.)

खरेतर गेल्या १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्यदी शुभेच्छा संदेश पानांच्या अद्ययावतीकरणात इतर सदस्यांनी सहभागी करून घेण्याचा विशेष प्रयत्नही होता. असो.

धन्यवाद आणि पुलेशु (पुढील लेखनास शुभेच्छा)

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २३:२०, १३ ऑक्टोबर २०१५ (IST)Reply

रिकामी पाने संपादन

प्रबोध,

सदस्य चर्चा:सांगकाम्या येथील तुझा संदेश पाहिला. रिकामी पाने हा साचा शक्यतो फक्त मुख्य किंवा साचा नामविश्वात घालावा. पान अगदीच रिकामे असेल (फक्त शीर्षक आणि वर्गीकरण) तर हा साचा घालावा. एखादे वाक्य, चित्र किंवा नुसता साचा मुख्य नामविश्वातील पानावर असल्या रिकामी पाने साचा तेथे घालू नये.

धन्यवाद,

अभय नातू (चर्चा) ०६:४९, १४ ऑक्टोबर २०१५ (IST)Reply

दिनविशेष संपादन

नमस्कार प्रबोध,

१५ ऑक्टोबरच्या दिनविशेष मध्ये भर घातल्याबद्दल धन्यवाद!

सहसा यामध्ये ठळक घटना, जन्म आणि मृत्यू या उपविभागांतील ४-५ वेचक आणि महत्वाच्या अशा नोंदींचा समावेश असतो. सगळे उपविभाग घातल्याने मुखपृष्ठाची रचना रोज बदलली गेल्यासारखे वाटते.

वरील गोष्ट फक्त आत्तापर्यंत आपण काय करीत आलो आहोत हे कळविण्या साठी आहे, चूक दाखविण्यासाठी नाही! :-) जरी ४-५ हा आकडा रुळलेला आहे तरी तो नियम नाही. हा आकडा बदलण्यासही हरकत नाही.

पुन्हा एकदा पुढाकार घेउन हा बदल केल्याबद्दल धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) १०:०३, १५ ऑक्टोबर २०१५ (IST)Reply

उत्तर पाहिले. ऑक्टोबर १५च्या चर्चापानावरही वरीलसारखा मजकूर/उत्तर घातला आहे जेणेकरून फक्त ते पान वाचणाऱ्यासही स्पष्टीकरण दिसेल.
अभय नातू (चर्चा) १०:१३, १५ ऑक्टोबर २०१५ (IST)Reply



कृपया मला सांगा कि मी तयार केलेल्या प.पू.गुरुमाउली यांच्या नावाने व गुरुदत्त मुळे म्हणजे स्वतः मी या नावाने तयार केलेले पेज डिलीट का झाले आहेत मला कृपया यावर मार्गदर्शन करता का? कारण मला ते पेज पुन्हा दाघ्वयाचे आहे विकीपेडिया वर.....

सदस्य_चर्चा:117.218.30.105#प.पू.गुरुमाऊली श्री आण्णासाहेब मोरे येथे उत्तर लिहिले आहे. - प्रबोध (चर्चा) ०९:४४, २८ ऑक्टोबर २०१५ (IST)Reply

संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण संपादन

कृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

Your message on Mahitgar's talk page संपादन

Dear sir I have read your thoughts to make a positive change in the way of delivering information about the error in article. While if u think so that a modernization of a template is necessary you can start the same in your sandbox and then submit your creation in विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन I am sure the marathi Wikipedia team will like your creation and the necessary changes shall be made to improve the template.

As marathi is source language please consider messaging in marathi orelse it causes inconvenience to some readers they find english a shouting for them. Cheers In modernization of marathi Wikipedia --टायवीन२२४०माझ्याशी बोला ०८:५३, २७ एप्रिल २०१७ (IST)Reply

साच्यांमध्ये बदल करण्यासाठी प्रचालकांना निवेदन द्यायची गरज आहे असे वाटत नाही. साचे हे मरठी विपिचा भाग आहेत. जो पर्यंत ते संपादनासाठी खुले आहेत, तो पर्यंत त्यामध्ये कोणीही संपादन करू शकते. परंतु अश्या संपादकास विपि, साचे, विकि मार्कअप याची माहिती असावी. याच बरोबर, एखाद्या लेखात / साच्यात बदल केल्याने त्याचा परिणाम इतर कोठे होतो हे पण ठाऊक असले म्हणजे झाले.
मराठी मध्ये लिहायचे झालेच् तर माझा संदेश माहितगार यांच्यासाठी होता. इंग्रजीमध्ये लिहील्याने त्यांचा गैरसमज होणार नाही याची खात्री आहे. त्यामुळे मराठीत लिहायचा आळस केला. - प्रबोध (चर्चा) ०२:५२, २८ एप्रिल २०१७ (IST)Reply

हॅपी बिर्थडे मराठी विकिपीडिया संपादन

 --टायवीन२२४०माझ्याशी बोला २०:५१, १ मे २०१७ (IST)Reply

मराठी विकिपीडिया व्हॉट्सॲप ग्रुप संपादन

--टायवीन२२४०माझ्याशी बोला १७:५३, ५ जून २०१७ (IST)Reply

विकीडेटा कार्यशाळा - १८ व १९ सप्टेंबर २०१७,पुणे संपादन

प्रिय सदस्य, असफ बार्तोव्ह (वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी, नवोदित विकिमीडिया समाज, विकिमीडिया फाउंडेशन) हे २९ ऑगस्ट ते २० सप्टेंबर या कालावधीत भारतातील विविध भाषा समुदायांना भेट देत आहेत.अधिक माहितीसाठी हे पान पहा. या निमित्ताने सीआयएस-ए२के संस्था निवडक विकिपीडिया सदस्यांसाठी (मराठी, इंग्रजी, हिंदी, संस्कृत)पुणे येथे विकिडेटा कार्यशाळेचे आयोजन करीत आहे. यात बार्तोव्ह तांत्रिक जाणकार म्हणून भाग घेतील. महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (MKCL),ICC Trade Tower,'A' wing, 5th Floor, सेनापती बापट रोड,पुणे येथे १८ व १९ सप्टेंबर रोजी अशी एक कार्यशाळा आयोजित केली आहे.
सध्या सक्रीय असलेल्या,विकिपिडीयाचा अनुभव असलेल्या आणि विकीडेटा प्रकल्पात योगदान करू इच्छिणाऱ्या सदस्यांना या कार्यशाळेत सहभाग घेता येईल. अशा सदस्यांनी आपली इच्छा आम्हाला लवकरात लवकर कळवावी. यासाठी subodhkiran@gmail.com या पत्त्यावर मेल पाठवावी. निवड झालेल्या सदस्यांचा येण्याजाण्याचा आणि राहण्याचा खर्च सीआयएस तर्फे केला जाईल.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ०८:३६, ८ सप्टेंबर २०१७ (IST)Reply

Share your experience and feedback as a Wikimedian in this global survey संपादन

WMF Surveys, २३:४९, २९ मार्च २०१८ (IST)Reply

Reminder: Share your feedback in this Wikimedia survey संपादन

WMF Surveys, ०६:४७, १३ एप्रिल २०१८ (IST)Reply

Your feedback matters: Final reminder to take the global Wikimedia survey संपादन

WMF Surveys, ०५:५७, २० एप्रिल २०१८ (IST)Reply

विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ संपादन

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.