विकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा ३४

माहितीचौकट निर्माण

संपादन

नमस्कार , मराठी विकी मराठी वाचकांसाठी खूप महत्वपूर्ण आहे. लाखो लोक आणि विद्यार्थी , युवक मराठी विकी चा वापर करतात. मला इथे सुचवायचे आहे की , नवीन लेख तयार करताना माहिती चौकट शोदताना असे समजले की अनेक विषयांवर माहिती चौकट उपलभदधच नाहीत. काही विषय मी खली लिहीत आहे. ज्यासाठी माहिती चौकट असायला पाहिजे - १.माहिती चौकट खेळ २.माहिती चौकट खेळाळू ३.माहिती चौकट चित्रपट ४.माहिती चौकट गाव ५.माहिती चौकट पुस्तक / ग्रंथ / कादंबरी / वर्तमानपत्र. ६.माहिती चौकट कंपनी ७.माहिती चौकट टीव्ही चॅनल ८.माहिती चौकट दूरदर्शन कार्यक्रम ९.माहिती चौकट निर्माता कंपनी १०.माहिती चौकट तालुका ११.माहिती चौकट शाळा / महाविद्यालयं / विद्यापीठ / ओपन युनिव्हर्सिटी. १२.माहिती चौकट राज्यघटनेतील कलम / भारतीय दंड संहिता कायदा ई. १३.माहिती चौकट लेखक / लेखिका / कवी / कवित्री. १४.माहिती चौकट आमदार / खासदार / पूर्व विधानसभा सदस्य. १५.माहिती चौकट खेळ साहित्य. जर विकी लेखकानं मध्ये तुम्हाला विकी माहिती चौकट कशी तायार करतात माहीत असेल तर कृपया माहिती चौकट तयार करावी.

"उचित वापर" (फेअर यूझ) उचित आहे काय ?

संपादन

साचा:प्रताधिकारित संचिका साचाने वर्गीकृत सर्व संचिका वगळणे तो साचा वगळणे आणि व या पुढे Fair Use हे तत्व मराठी विकिपीडियातून अस्विकार्ह ठरवणे प्रस्ताव

मराठी विकिपीडियन मित्रांनो हा गंभीर पण महत्वाचा विषय आहे.आज पुन्हा एक छायाचित्र एका लेखात "उचित वापर" (फेअर यूझ) या तत्वाखाली जोडलेले पाहिले प्रत्यक्षात ते सरळ सरळ प्रताधिकार कायद्दाचे उल्लंघन ठरते. माझ्या खालील विवेचना बद्दल आपले काय मत आहे ?
खरेतर हा आक्षेप नोंदवण्यात अंमळ उशीर आधीच झालेला आहे,अपेक्षा हि होती की मराठी जनांपैकी कुणी कायदेतज्ञ उगवेल आणि मार्गदर्शन करेल कारण लंगड्या गायीने मार्गदर्शन करण्यापेक्षा सोनाराने कान टोचणे बरे असते, पण न पेक्षा दुधाची तहान ताकावर भागवण्या शिवाय मराठी विकिपीड़ियन्सना अद्दाप तरी पर्याय दिसत नाही.
काय असावे आणि काय आहे यात बर्‍याचदा तफावत असते, तशीच तफावत "योग्य उपयोग" या धारणे संदर्भात आहे.
माझ्या ज्ञानाची मर्यादा इंटरनेटवर उपलब्ध भारतीय प्रताधिकार कायद्दाची जी काही बेअर अ‍ॅक्ट आवृत्ती आणि थोडेफार ढोबळ विश्लेषण, भारतातील कडी-कपारीत रहात असणार्‍यांना भारतीय मातीवर कधी काळी पाऊल ठेवावे लागेल अशा सर्व व्य्क्तींनी भारतातील कायद्दांच्या चष्म्यातून पहावयास हवे याची जाणीव , येथ पर्यंत आहे. (ईंटरनेटवरील उपलब्ध आवृत्ती जुनी असू शकते,शिवाय भारतीय न्यायसंस्थेचे कायदा विषयक विश्लेषण अंतीम असते आणि असे विश्लेषण माझ्या वाचनात नाही याची मी प्रांजळ कबुली देतो.)
आपण जेव्हा एखादी गोष्ट भारतीय मातीवरून आकाशात(आंतर जालावर) पाठवतो, किंवा भारता बाहेरून पण भारतीय आकाश/मातीवर काही करतो तेव्हा भारतीय कायद्यांच्या परिघात येतो.सर्वर आमेरिकेत आहे का भारतात याने फरक पडत नाही, भारतीय कायदा लागू होतोच.
मला इंटरनेटवर उपलब्ध झालेल्या बेअर अ‍ॅक्ट मध्ये प्रताधिकार विषयक दिलेल्या मर्यादा पुन्हा पुन्हा चाळून(वाचून) पाहिल्या पण भारतीय कायद्दास Fair Dealing हा शब्दप्रयोग आहे Fair Use शब्दप्रयोग नाही,समजा दोन्हीचा अर्थ "योग्य उपयोग" असा जरी धरला तरी भारतीय कायद्दास परवानगी दिलेले "योग्य उपयोगांची' परवानगीचा परिघ मर्यादीत आहे., आपण विकिपीडियावर वापरताना ज्या पद्धतीने "योग्य उपयोग' या शब्द प्रयोग वापरू तो भारतीय प्रताधिकार कायद्या नुसार उपलब्ध मर्यादेत बसत नाही असे माझे साधार मत आहे.[]
भारतीय कायद्याने मुख्यत्वे खासगी उपयोगाकरिता काही मर्यादीत परवानग्या दिलेल्या दिसतात,तर विकिपीडिया हि खासगी उपयोगाची जागा नाही. ना-नफा सांस्कृतिक कार्यक्रम/समारंभात आणि शैक्षणिक संस्थांना मर्यादीत प्रमाणात मोकळीक असावी इथपर्यंतच मर्यादित आहे असे दिसते,त्यात आंतरजालाचा समावेश होत नाही.विकिपीडिया शैक्षणिक उपयोगा करता वापला जात असेल पण शैक्षणिक उपयोगाच्या पलिकडे वापरला जात नाही असे नाही.
(एखादे संकेतस्थळ पासवर्ड प्रोटेक्टेड स्वरूपात केवळ शिक्षक आणि विद्दार्थ्यांशिवाय इतर कुणास उघडत नसेल तर काही बंधने शिथील होण्याची शक्यत असू शकेल पण विकिपीडिया या परिघात येणार नाही.विकिपीडियाची कुणी केवळ शैक्षणिक उपयोगाकरिता ऑफलाईन आवृत्ती काढली तर अशा आवृत्तीत मर्यादा कुठे कुठे शिथील होऊ शकतील हा वेगळ्या अभ्यासाचा विषय आहे)
एकतर विकिपीडिया व्यक्तिगत टिका अथवा समिक्षण ओरिजीनल रिसर्च स्वरूपात,तसेच बातम्या स्विकारत नाही तसे केले तरी लिखित मजकुराबद्दल अंधूक स्वातंत्र्य लाभू शकते(कारण असे समिक्षण तेवढ्या मर्यादीत लेख/परिच्छेदापुरते मर्यादीत असेल) पण छाया/चित्रे आणि इतर माध्यम संचिका (media files) करता या परिघात स्वातंत्र्य मिळले का यबद्दल मला दाट शंका आहे कारण विकिपीडियावर चढवलेली संचिका कुणी "विशीष्ट लेख/परिच्छेदापलिकडे वापरणार नाही याची खात्री देता येत नाही तर कायद्दाने उपलब्ध मर्यादेचा लाभही घेता येत नाही.
इंग्रजी विकिपीडिया आमेरिकि कायद्याचा लाभ घेत "योग्य उपयोग" मर्यादीत स्वरूपात स्विकारते पण विकिमीडिया कॉमन्सपण वर उल्लेख केलेल्या प्रमाणे "सर्व देशात सर्व परिस्थितीत" "योग्य उपयोग" लागू होत नाही म्हणून "योग्य उपयोग" हे तत्व संचिका स्विकारताना, मुळीच ग्राह्य धरत नाही. मराठी विकिपीडियावरील बहूसंख्य सदस्य ज्या अर्थी भारतात रहाणार आहेत त्या अर्थी त्यांना भारतीय कायदे लागू होणार आहेत.जरी कायदेशीर जबाबदारी सदस्यांची व्य्क्तीगत असली तरी अनभिज्ञतेने/अनवधानाने सदस्यांकडून शक्य असलेल्या चूका टाळण्याच्या दृष्टीने विकिमीडिया कॉमन्स प्रमाणे मराठी विकिपीडियाने देखिल "योग्य उपयोग" हे तत्व अग्राह्य ठरवत या तत्वा खाली नविन संचिका सदस्यांनी टाकू नयेत, टाकल्यास वगळाव्यात,तसेच या तत्वातील उअपयोग केलेल्या सार्‍या जुन्या संचिका वगळाव्यात असे माझे आग्रहाचे मत आहे.
माझ्या आक्षेपाची शहानिशा विचार विमर्श करून मते मांडावीत त्या नंतर सुयोग्य अंमलबजावणी करावी हि सादर विनंती
माहितगार ०७:०५, १३ फेब्रुवारी २०११ (UTC)
  1. ^ बौद्धिक संपत्तीच्या मालकीबद्दलचे नियम#Limitations as per Indian Copyright act



लेख संख्या नियंत्रण आणि आशयघनता प्रस्ताव

संपादन

मराठी विकिपीडियावर आपण अनेकदा लेखसंख्या वि गुणवत्ता ही चर्चा केलेली आहे. आपल्यात या दोन्हीपैकी कोणता निकष जास्त महत्त्वाचा याबद्दल मतभेद असले तरीही दोन्ही महत्त्वाचे असल्याचे एकमत आहे.

  • साधारणतः ९०% लेखांमध्ये किमान एक परिच्छेदभर तरी लेखनाची गरज आहे.
  • ५% लेख एका वाक्यावर केवळ
  • २% काहीही न लिहिता नवनिर्मिती
  • २% भाषांतरांच्या प्रतीक्षेत अशी स्थिती असावी
  • लेखनाच्या बाबतीत फारच पिछाडीवर पडणे सयूक्तीक नाही या दृष्टीने मी माझा प्रस्ताव आहे की केवळ मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या संदर्भाने जी लेख निर्मीती कोणत्याही लेखना शिवाय होते ती होऊ द्यावी केवळ वर्गीकरण आणि इंग्रजी विकिशी आंतर विकिदूवा हे आवश्यक ठरवावेत.
  • विश्वकोशीय आणि शुद्ध लेखनात बसणारी नवशिक्यांकडून होणारी पहिली लेख निर्मिती एका दिवसात अधिकतम २० लेख ही बंधनातून वगळावी २० लेखांची निर्मितीपेक्षा अधिक झाल्यास नवलेख निर्मितीची क्षमता ७२ तासाकरिता आपोआप बंद होण्याची व ७२ तासा नंतर आपोआप सुरू होण्याची विकिसॉफ्टवेअर प्रणालीतच व्यवस्था असावी या प्रस्तावास सहमती नंतर कौलास ठेऊन नंतर तशी विनंती बगझीलावर करावी,
  • प्रचालकांनीपण वरील नियमांचे पालन करावे पण अपवादात्मक परिस्थितींच्या दृष्टीने (जसे प्रताधिकारमुक्त साहीत्याची मोठ्याप्रमाणावर उपलब्धता, विद्द्यालयील महाविद्द्यालयीन कार्यशाळेच्या द्वारे मोठ्या प्रमाणे लेखन होणार असल्याबद्दल खात्रीशीर विनंती आल्यास इत्यादी) दृष्टीने प्रचालंकाना या बंधनातून मुक्त ठेवावे.
  • इतर सर्व लेख नवनिर्मितीकरिता किमान एक परिच्छेद लेखनाचा नियम आवश्यक संकेत म्हणून मराठी विकिपीडियाने या पुढे स्विकारण्याची गरज आहे असे माझे मत आहे.

माहितगार २२:४४, ७ जानेवारी २०११ (UTC)

माहितगार यांच्या वरील मताशी सहमत. वाढदिवसाच्या माहोलनंतर गेल्या २-४ दिवसांत अनेक नवे सदस्य दाखल होताना दिसताहेत. त्यांना शिकवण्याचे,शिस्तीत बसवण्याचे काम होण्याआधी लेखनिर्मितीत प्रोत्साहन देणे येथे लेखन कसे करावे याच्या वाटा दाखवणे गरजेचे आहे. आशयघनता आली नाही तर नुसती लेखपानांची संख्या वाढवून उपयोग नाही, असे वाटते. - Manoj ०३:०६, १७ जानेवारी २०११ (UTC)

पुन्हा एकदा दर्जा!!!!!

संपादन

नमस्कार मंडळी!

गेल्या दोनेक दिवसांत बरेच नवीन आणि कोरे (एकही वाक्य नाही !) लेख बनवल्याचे दिसते. मराठी विकिपीडियावर आधीच वाचनीय आशयाच्या नावाने बोंब आहे, त्यात अश्या कोर्‍या लेखांची भर घालण्याचे प्रयोजन कळले नाही. नवे लेख बनवताना त्यात कृपया दोन-तीन वाचनीय, माहितीपूर्ण वाक्ये लिहावीत. नाहीतर आपण लिहीत असलेल्या माहितीचे, करत असलेल्या श्रमाची किंमत शून्य ठरते, हे ध्यानात घ्यावे.

मराठी विकिपीडियाची लेखसंख्येबाबत कुणाशी स्पर्धा आहे काय ? असल्यास, असली स्पर्धा करण्यात काहीही हशील नाही, कारण पन्नास-साठ भाषांतले विकिपीडिया दर्जा आणि संख्या या दोन्ही पौलूंत मराठीच्या पुढे आहेत. सगळ्यांना गाठत ऊर धपापून घेण्यापेक्षा, मराठी विकिपीडियाने अगोदर स्वतःशी स्पर्धा करत स्वतःचा दर्जा अधिकाधिक उंचावावा, "मराठी भाषकांच्या कामी पडणारा, समृद्ध आणि आशयघन ज्ञानकोश' असा लौकीक कमवावा. अन्यथा मराठी विकिपीडिया 'फुसक्या लेखांचा ढिगारा' म्हणून कुख्यात होईल, यात शंका नाही. :)

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १२:०८, ३ मे २०११ (UTC)

मी काय करू शकतो?

संपादन

मराठी विकिपीडियावरील दर्जा वाढवण्यासाठी अनेक उपाय आहेत आणि ते वेळोवेळी आपल्यातील जुन्या मंडळींनी ध्यानात आणूनही दिलेले आहेत. त्यात एक भर --

विशेष:छोटी पाने येथे सगळ्यात छोट्या पानांची यादी आहे. पहिल्या (शेवटच्या?) ५,००० लेखांचा आकार बघता संकल्पने वर म्हणल्याची खात्री पटेल. आपले ५,००० लेख २३४० बाइट पेक्षा कमी आकाराचे आहेत!! म्हणजे नुसतेच शीर्षक आणि असल्यास एखादा वर्ग आणि/किंवा इंग्लिश आंतरविकी दुवा. यातील बरेच लेख टाइमपास म्हणून तयार केले गेले असल्याचीही शक्यता आहे कारण यात काहीही मजकूर तर नाहीच आणि त्याला किंवा तेथून एकही दुवा नाही.

मी गेले अनेक महिने या यादीवर लक्ष केन्द्रित करुन हे लेख मोठे करण्याचा प्रयत्न करीत आहे पण छोट्याछोट्या नवीन लेखांचा वेग माझ्या आवाक्याबाहेर चाललेला आहे. तरी आपल्यापैकी निदान काही संपादकांनी तरी येथे लक्ष घालावे. जरी लेखाबद्दल काहीही माहिती नसेल तरी येथली बहुसंख्य लोकांना वर्गवारी आणि आंतरविकी दुवे घालण्याइतके नक्कीच ज्ञान असेल ही माझी खात्री आहे. आणि अगदीच तरंगी शीर्षक असेल तर गूगलमहाराज आहेतच मदतीला.

तरी लेखसंख्या वाढवण्याकडेच लक्ष देण्यापेक्षा थोडेसे माहिती वाढवण्याकडेही लक्ष देऊ या...

अभय नातू १२:३१, ३ मे २०११ (UTC)


Unless we work out official policy it can not be included in appropriate help and guidance pages templates and messages that is why I did put up a proposal up there , still I feel all the people need to consider it seriously माहितगार २०:४५, ३ मे २०११ (UTC)

Your proposal has my support, however, such things can not be "legislated" or enforced unless and until we have a buy-off from users. This being an open forum for crowd-sourced content, no amount of rules and regulations will stop people from doing what they're doing. Polite (and sometimes a bit stern) requests will hopefully make our editors realize the point we're trying to make.

अभय नातू ००:२०, ४ मे २०११ (UTC)

actually to solve this problem of दर्जा vs लेखसंख्या i have an idea. But i m not sure this idea will definetly work as expected but atleast it will help to simplify the problem.

Ashish Gaikwad ११:४९, १० मे २०११ (UTC)

अ‍ॅ,र्‍य,र्‍ह

संपादन

अॅ, ऍ, चौकोनी आयत, इ.

संपादन

मराठी विकिपीडियावर देवनागरीतून लिहिताना अॅ चार-पाच प्रकारे लिहिता येतो. अॅ, ऍ, अॅरिस्टोटलच्या चर्चापानावर उद्धृत केलेला चौकोनी आयत, बराहात लिहिलेला अॅ आणि "नवीन" शैलीतील अॅ (जो मला या संगणकावर काढता येत नाही पण इतर संगणकावर काढता येतो).

या सगळ्यांपैकी एकच मूळाक्षर प्रमाणित असावे. त्यासाठी युनिकोडवरील कोणत्या कोडचा वापर करावा याबद्दल चावडीवर चर्चा करावी. मला आत्तातरी खालील कोड आठवत आहेत --

  • 0904
  • 0972 - हा खास मराठीसाठी असल्याचा उल्लेख आहे आणि हाच जास्त सयुक्तिक वाटतो.
  • 090D
  • 090E

यातील सगळीच अक्षरे सगळ्याच संगणकांवर, फाँटांत किंवा ऑपरेटिंग सिस्टममध्ये नीट दिसतीलच असे नाही, तरी मला दिसते हेच बरोबर हा खाक्या सोडून प्रमाणित अक्षर वापरावे.

जे अॅ बद्दल, तेच काही अंशी ऑ बद्दल.

हा विषय धसाला लागेपर्यंत कोणतेही बदल करू नयेत, विशेषतः लेखांचे स्थानांतर करू नये, ही विनंती.

अभय नातू १९:५६, १० मे २०११ (UTC)

यावरील सदस्य आशिष गायकवाड, अभय नातू आणि माहितगार यांच्यातील संदेश

संपादन
अलिकडे युनिकोड हा लेख नवीन सदस्य Ashish Gaikwad यांनी अद्दयावत केला. त्यांच्या संपादनांवरून ते या विषयातील जाणते आहेत हे लक्षात येते. त्यांनी अ‍ॅ,र्‍य,र्‍ह चे सध्याचे मराठी विकिपीडियावरील लेखन चुकीचे होत असल्याचे नोंदवले आहे. मला या क्षेत्रातील अधीक ज्ञान नसल्यामुळे नेमका फरक लक्षात आला नाही पण कुणी जाणकार व्यक्ति तसे नोंदवते आहे म्हणजे दखल घेण्याची आवश्यकता आहे असे वाटते माहितगार ०५:४४, ६ एप्रिल २०११ (UTC)


नमस्कार,

गायकवाडांनी त्यांचे मत कोठे नोंदवले आहे? युनिकोड लेखचर्चेत किंवा चावडीवर सापडले नाही. अ‍ॅ,र्‍य,र्‍ह हे शब्द "चुकीचे" लिहिले जात असण्यासाठी लिहिणार्‍यांची संगणकप्रणाली, फाँट तसेच या दोन्हीनी युनिकोडशी कसे जुळवून घेतले आहे ही कारणे आहेत. लिनक्स/विन एक्सपी वर लिहिलेले अॅ अक्षर विन सेव्हेनवर नीट दिसत नाही आणि उलटेही खरे आहे. नेमके युनिकोड कोणते बरोबर याचे स्पष्टीकरण मिळावे.

अभय नातू १२:१३, ६ एप्रिल २०११ (UTC)

ओ सॉरी, मला वाटले तुम्ही लेख तपासाल असेल, Ashishरावांनी सरळ लेखातच कॉमेंट टाकली आहे.मला वाटते इतर सिसॉप्सपैकी सुद्धा कुणाचे लेखातील बदलांकडे लक्ष गेलेले दिसत नाही. माहितगार १९:०९, ६ एप्रिल २०११ (UTC)

नमस्कार , खरेतर हे पान आणि मराठी wiki core team/group मधील सदस्यांना शोधायला माझा खूप वेळ गेला. so according to me अभय नातू and Mahitgar are core team members. i have checked list of admins for marathi ( total 9 ). as mentioned above ॲ | ऱ्ह | ऱ्य these letters and some other issues are there in mr:wiki = मराठी विकिपीडिया . i can help you in these issues, to know about me you can visit

http://aag2011.blogspot.com also http://facebook.com/ashish.gaikwad007 ...

please contact me after 12 मे २०११ कारण १२ तारखेला माझी CETची परीक्ष आहे. Ashish Gaikwad ११:१७, १० मे २०११ (UTC)

नमस्कार , अभय नातू | हा विषय तुमच्या चर्चा या पानावर आहे. कृपया तेथे भेट द्या. मुळात अ‍ॅ हे अक्षर चुकीचे आहे. ते ॲ असे पाहिजे. कृपया पुढिल चर्चा कोणत्यातरी एकाच पानावर करा. ! धन्यवाद !!

Ashish Gaikwad ११:२७, १० मे २०११ (UTC)



नमस्कार , खरेतर हे पान आणि मराठी wiki core team/group मधील सदस्यांना शोधायला माझा खूप वेळ गेला. so according to me अभय नातू and Mahitgar are core team members. i have checked list of admins for marathi ( total 9 ). as mentioned above ॲ | ऱ्ह | ऱ्य these letters and some other issues are there in mr:wiki = मराठी विकिपीडिया . i can help you in these issues, to know about me you can visit

http://aag2011.blogspot.com also http://facebook.com/ashish.gaikwad007 ...

please contact me after 12 मे २०११ कारण १२ तारखेला माझी CETची परीक्ष आहे. Ashish Gaikwad ११:१७, १० मे २०११ (UTC)

माहितगार,
हे संदेश येथे डकवल्याबद्दल धन्यवाद.
येथे प्रमाण युनिकोड अक्षरांबद्दल सयुक्तिक चर्चा व्हावी ही अपेक्षा आहे.
अभय नातू २०:५८, १० मे २०११ (UTC)

अ‍ॅ,र्‍य,र्‍ह इत्यादी, चर्चा कशी करणार?

संपादन

>मला दिसते हेच बरोबर हा खाक्या सोडून प्रमाणित अक्षर वापरावे. येथे प्रमाण युनिकोड अक्षरांबद्दल सयुक्तिक चर्चा व्हावी ही अपेक्षा आहे.<

चर्चा कशी करणार? मला जसे दिसते आहे जर तसे इतरांना दिसत नसेल तर युनिकोड प्रमाणित अक्षर कोणते हे कसे समजावे? मी एखादे अक्षर टंकित केले आणि ते दुसर्‍याला वेगळेच दिसले तर चर्चा कशी होईल? आता गुळगुळीत झालेल्या ठकीसारखे आयताकृती अक्षर हेच मराठी अक्षर आहे असा आग्रह जर एखाद्याने धरला तर त्याची लेखणी कोण थोपवणार? एकच मार्ग आहे. प्रत्यक्ष अक्षर न लिहिता अक्षराच्या रूपाचे वर्णन करणे. ते मी आता करीत आहे. इंग्रजीतल्या cat सारख्या शब्दांत येणार्‍या a चा जो उच्चार सामान्य इंग्रजी शब्दकोशांत ă असा, किंवा IPA पद्धतीत æ असा दाखवतात त्या उच्चारासाठी मराठी बाळबोध लिपीत डोक्यावर आडवा चंद्र असलेले अ हे अक्षर लिहावे असा आदेश, कंपनी सरकारच्या लष्कराचे पुण्यातील तत्कालीन अधिकारी कॅप्टन थॉमस कॅन्डी यांनी, त्यांच्या कारकीर्दीत काढला, आणि त्याची तंतोतंत अंमलबजावणी होईल याच्याकडे लक्ष पुरवले. दुर्दैवाने (१)हिंदी प्रांतांत असला अधिकारी नव्हता (२) संस्कृतमधून घेतलेला अर्धअनुनासिक उच्चार दाखवणारा चंद्रबिंदू हिंदीने आधीच स्वीकारलेला होता आणि (३) हिंदीत cat चा उच्चार केट किंवा कैट आणि hall चा उच्चार होल होत असल्याने त्यांना या लिपीसुधारणेची गरज भासली नाही.

तोच प्रकार ह आणि य यांच्याआधी (जोडाक्षराचा मृदु उच्चार व्हावा म्हणून) जोडायला आवश्यक अशा आडव्या चंद्रकोरीच्या आकाराचा अर्ध्या र चा. हाही हिंदीने घेतला नाही. कारण तसले जोडाक्षर हिंदी भाषेत नाही. (हिंदीत ह ला, य-र-ल-व-म-ण ही अक्षरे जोडता येतात, पण उलट करता येत नाही. म्हशीतला म्ह, आणि ण्ह, ल्ह असणारे शब्द हिंदीत नाहीत. (न्ह आहे!)

म्हणूनच युनिकोडमध्ये तथाकथित देवनागरी लिपी भरताना, मराठीची काडीमात्र माहिती ज्यांना नाही अशा युनिकोड तज्‍ज्ञांनी अगोदरच्या आवृत्त्यांत हा æ व ǒ, आणि ही ’र‘ची जोडाक्षरे लिहायची सोय केली नव्हती. आणि अगदी याच कारणासाठी त्यांनी आजकालपर्यंत मराठी लिहायला आवश्यक त्या ख, श , पाऊण य, श्रतला श आणि ल या अक्षरांसाठी कोड ठेवलेले नव्हते. आता कोड आहे असे ऐकून आहे, नक्की माहीत नाही.

महाराष्ट्र सरकारने ह्या हिंदी धाटणीच्या अक्षरांना आधी दिलेली मान्यता, आता काढून घेतली आहे. तरीसुद्धा ही अक्षरे विकीवर उमटवता येत नाहीत. त्यामुळे युनिकोड फक्त हिंदीच्या देवनागरी लिपीसाठी आहे, ते अजूनतरी मराठीच्या बाळबोध लिपीसाठी नाही, असे माझे दृढ मत आहे. ...J ०९:५८, ११ मे २०११ (UTC)


पुन्हा एकदा त्याच चर्चेसाठी नमस्कार !!
" ... त्यामुळे युनिकोड फक्त हिंदीच्या देवनागरी लिपीसाठी आहे, ते अजूनतरी मराठीच्या बाळबोध लिपीसाठी नाही, असे माझे दृढ मत आहे ... " हे तुमचे दृढ मत अयोग्य आहे . युनिकोडच्या ५व्या आवृत्ती पर्यंत तुमचे मत योग्य होते, परंतु युनिकोडच्या ५.१ आवृत्तीत मोठ्याप्रमाणात बदल केल्यामुळे " मराठी " मधून उत्तम लिखान करता येते . तुम्ही युनिकोडच्या ६व्या आवृत्तीची पुस्तके वाचली तर तुमचे गैरसमज लगेच दूर होतील.
Ashish Gaikwad १०:११, ११ मे २०११ (UTC)
चर्चा करताना आपला मुद्दा व इतरांचे लिखाण हे वेगवेगळे दिसतील असे लिहावे म्हणजे संवादात सुसूत्रता येईल व विनाकारण गैरसमज होणार नाहीत.
आशिष (आणि इतरही मंडळी), तुमचे मत अयोग्य आहे, तुम्हाला कळत नाही, इ. विधाने निरर्थक कटुता निर्माण करतात. मत का अयोग्य आहे याची कारणे दिल्याशिवाय असे लिहू नये. पुस्तके वाचल्यावर नक्की काय कळेल? येथे मुद्द्याला सुसंगत अशा दोन-चार ओळी लिहिल्या तर त्याची मोठी मदत होईल. सदस्य जे किंवा इतर कोणाच्याही मुद्द्यांचे मंडन/खंडन करण्यास विरोध नाही पण नुसतीच assertions करुन चर्चा पुढे जात नाही यावर कोणाचेच दुमत नसावे.
तरी सर्व मंडळी सुज्ञच आहात. तार्किक चर्चेतून मतभेद दूर होतील आणि येथील लिपीचे प्रमाणीकरण होण्यास मदत होईल ही आशा/अपेक्षा.
अभय नातू १४:२१, ११ मे २०११ (UTC)
येथे होणार्या चर्चेतून लिपीचे प्रमाणीकरण होण्यास मदत होईल ही अपेक्षा रास्त असली तरी प्रत्येकाचे मत हे वेगळेच असणार यात शंका नाही. म्हणून येथील मतांचे जाणकार भाषातज्ञांकडून लवकरात लवकर सुसूत्रीकरण करवून घेऊन विकीपिडियाने यावर उपाय योजल्यास सदस्यांमध्ये संभाव्य कटुता निर्माण होणार नाहि.
संतोष दहिवळ १४:५४, ११ मे २०११ (UTC)
येथील सदस्यांच्या ज्ञानाचा उपयोग करुन घेउन एकवाक्यता करुन घेणे हा या प्रक्रियेतील पहिला टप्पा आहे. जरी सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत तरी प्रश्न नेमके काय आहेत आणि त्यातील कोणत्या प्रश्नांवर तज्ञांची मदत जरुरी आहे हे स्पष्ट झाल्यास प्रश्न तज्ञांपुढे मांडण्यात आणि त्यांच्याकडून नेमकी माहिती काढून घेण्यास मदत होईल.
अभय नातू १४:५९, ११ मे २०११ (UTC)


"युनिकोड फक्त हिंदीच्या देवनागरी लिपीसाठी आहे, ते मराठीच्या बाळबोध लिपीसाठी नाही असे तुमचे दृढ मत युनिकोडच्या ५व्या आवृत्ती पर्यंत योग्य होते" हे वाचून बरे वाटले. मी तरी दुसरे काय म्हटले होते? मी वर म्हटले होते की "युनिकोडवाल्यांनी अगदी आजकालपर्यंत, मराठी लिहायला आवश्यक त्या अक्षरांसाठी कोड ठेवलेले नव्हते. आता ठेवले आहे असे ऐकून आहे, नक्की माहीत नाही." माझे दृढ मत उचलून घेऊन योग्य ठरवल्याबद्दल आभारी आहे....J १८:२३, ११ मे २०११ (UTC)


केवळ वर्णनाने भागणार नाही जरूर तेथे पेंटब्रशच्या सहाय्याने चित्रे काढून नमूद करावे लागेल तसेच यूनिकोड क्रमांकन नमूद करावे लागतील तरच आणि मुद्दे तर्कशुद्ध आणि स्प्ष्ट मांडलेतरच सॉफ्टवेअर डेव्हेलपर्सना समजतील प्रणालीत सुधारणा होऊ शकतील. ज्याप्रमाणे आंधळ्यांच्या पाठीवर लंगडा बसला की लंगडा वाट दाखवितो व आंधळा त्याला पाठुंगळीस घेऊन वाटचाल करतो त्याप्रमाणे संगणकतज्ज्ञ व भाषातज्ज्ञ यांच्यात समन्वय हवा.कुणीही कुणालाही कमी लेखण्याचे टाळावे. माहितगार ०५:२७, १२ मे २०११ (UTC)


गोवा मुक्तिदिन

संपादन
  • माझे मत शंका सूचना सहाय्य विनंती:
दिनविशेष मधील माहिती चुकीची आहे . ११ मे १८८७ रोजी गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला असे लिहले आहे ते चूक आहे . १९ फेब्रुवारी १९६१ रोजी गोवा स्वतंत्र झाला आहे कुपया दुरुस्ती करावी . साल नक्की चुकीचे आहे .
धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
59.90.104.115 १४:०७, ११ मे २०११ (UTC)
  • माझे मत शंका सूचना सहाय्य विनंती:दिनविशेष मधील माहिती चुकीची आहे . ११ मे १८८७ रोजी गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला असे लिहले आहे ते चूक आहे . १९ फेब्रुवारी १९६१ रोजी गोवा स्वतंत्र झाला आहे कुपया दुरुस्ती करावी . साल नक्की चुकीचे आहे .
माझे सदस्य नाव/टोपण नाव:अरविंद मोटे

राघोजी भान्गरे

संपादन
  • माझे मत शंका सूचना सहाय्य विनंती:

राघोजी भान्गरेबाबत काही मजकुर विकिपीडियावर टाकला होता.पण काही लोक उगिच नको त्या वादाच्या चिखलात गुतुन पडलेत्त असे दिसते.कोणी नवीन माणुस घरी आल्यावर आपण पट्कन पाणी आणून देतो.नन्तर बाकी भानगडी सुरु होतात्.पण येथे घडले उलटेच्.वाईट वाट्ले.तुम्हाला शुभेच्च्आ.आता कोणाला सान्गू नये,असे वाटतेय.प्रत्येक गोस्टीला कसा देणार पुरावा? मी विश्वास वतो. आईने मला जे सान्गितले त्त्यावर. आणी आपले काम प्रमाण आहे अशी एक अडी दिसते. आम्ही खेड्यातले खेडवळ लोक. विकिपीडिया केवळ शहरातलेच् लोक वाचतात, असा समज कोणी करुन घेउ नये.हया प्रवाहाना सामिल करुन मग पुधे जाता येणार आहे.शीवाय नाही याचऐ भान असु दयअवे.धन्यवाद !

  1. ...
  2. ...





माझे सदस्य नाव/टोपण नाव:
117.199.55.88 १९:४७, १५ मे २०११ (UTC)
आपणच जर राघोजी भांगरे बाबत मजकूर विकीपिडीयावर टाकला असेल तर आपले स्वागतच आहे. आपला राग पुरावा देण्यावर दिसतो. आपण त्याची काळजी करु नका. विकिपिडीयावर अनेक सदस्य काम करतात. तुम्हाला ते पुरावे उपलब्ध करुन देतील. याचा पुरावा म्हणजे राघोजी भान्गरे हे पान. हे पान नवीन झाल्यावर जर आपण त्यात झालेले बदल पाहिले असतील तर त्यात बर्याच सदस्यांनी पुरावे घातल्याचे दिसून येत आहे. संतोष दहिवळ २०:१०, १५ मे २०११ (UTC)

हा काय प्रकार आहे?

संपादन

"मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे" हे वाक्य आजकाल फार वेळा वाचायला लागते. असे का? प्रत्येक वेळी मराठी विकीवरचे चित्र मूळ स्रोताच्या चित्रासारखेच आणि तेच का असायला हवे? याचा अर्थ मराठी विकीवर कोणतेही चित्र Original असूच नये? ...J १५:५४, १६ मे २०११ (UTC)

विकिपीडियावर चित्र दाखवायचे झाले तर ते दोन ठिकाणी चढवता येते -
१. मराठी विकिपीडियावर संचिका चढवा दुव्यावरुन - अशी चित्रे मराठी विकिपीडियावरील कोणत्याही लेखात वापरता येते पण इतर विकिपीडियांवर वापरता येत नाही.
२. विकिकॉमन्स वर चढवून - अशी चित्रे मराठीच नव्हे तर २८०पैकी कोणत्याही विकिपीडियावरील कोणत्याही लेखात वापरता येते.
सर्वसाधारणपणे #२ केलेले बरे म्हणजे आपल्या कामाचा अधिकाधिक उपयोग होऊ शकतो. त्याचप्रकारे इतरभाषिक लोकांनी चढवलेली चित्रेही मराठी विकिपीडियावर वापरता येतात.
कधीकधी सदस्यांनी कॉमन्सवर चढवलेली चित्रे प्रताधिकारभंग, औचित्यभंग, इ. अनेक कारणांनी काढली जातात. तसे केल्यास मराठी विकिपीडियावर मोडके दुवे तसेच राहतात. हे टाळण्यासाठी अनेक सांगकामे सगळ्या विकिपीडियातून फिरुन अशा चित्रांचे दुवे काढून टाकतात. त्यावेळी त्यांनी वापरायचा संदेश म्हणजेच "मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे".
अभय नातू १७:०२, १६ मे २०११ (UTC)

शब्द दुरुस्ती

संपादन

सध्या मी साम्राज्यांवर एक साचा बनवला आहे. (पहा साचा:साम्राज्ये) त्यातील बरीच नावे इंग्लिश मधून सरळ उच्चारांनुसार घेतली आहेत, परंतु अश्या बऱ्याच नावांची मराठी प्रमाण नावे आहेत. ती आपल्या कोणास माहीत असल्यास संबंधित नाव दुरुस्त करावे ही विनंती.

Aniruddha22Paranjpye १२:०९, १७ मे २०११ (UTC)

"खाते विकसक" च्या निमित्याने ...!

संपादन

"खाते विकसक" वरून सुरु असलेली चर्चा मी वाचत होतो तसेच इतक्यातच अभय नातू ह्याचे बरोबर पण मराठी विपी वर अपेक्षित (२५.०२.१२ तारखे पर्यंत (पुढचा जागतिक मराठी दिन) ४०,००० लेख,) उदिष्ठ गाठण्याचा दृष्टीने इतक्यातच चर्चा झाली होती. "खाते विकसक ..." च्या निमित्याने असे वाटते कि जर आपण खातेधारक विकासावर विचार केला तर ? आपण "खातेधारक नोंदणी" हाती द्यायला पाहिजे. नामांकित महाविद्यालयात मराठी स्नातकोत्तर विभागात विपी गट स्थापनेचा विचार करावा. ह्या मुळे विपी अधिक लोकाभिमुख होईल व तरुण पिढी आपोआप विपीशी जुळेल. मराठी विपी हि एक समाइक जबादारी समजावी त्यासाठी पदाची व बिरुदाची आवशकता नसावी. माहितीगार आपण ह्या आधीही असे प्रयत्न केले असतीलच आता खातेधारक नोंदणीचे पण उदिष्ठ ठरवूया.

राहुल देशमुख ०७:५७, १८ मे २०११ (UTC)

राहुल आपल्या सुचनेच स्वागत आहे, खर म्हणजे मी या पूर्वी असा प्रयत्न केलेला नाही ,करण्यास हरकत नाही.जो पर्यंत संबधीत पैलूंच आणि जबाबदारीच ज्ञान आहे तेव्हा मराठी विकिपीडियन्सनी नेहमीच प्रचालक विनंत्यांचा स्विकार केला आहे.सुयोग्य व्यक्तींना 'खाते विकसक' म्हणून स्विकारण्यास फारसा वेळ लागणार नाही.
नामांकित महाविद्यालयात मराठी स्नातकोत्तर विभागात विपी गट स्थापनेचा विचार करावा. हि केवळ चांगली सुचनाच नाहीतर अत्यंत गरजेची गोष्ट आहे. सध्या मी सुद्धा महाराष्ट्रात नाही. या बाबत फिल्डवर्क करता कुणी पुढाकार घ्यावयास हवा हे खरे. मराठी विपी हि एक समाइक जबादारी समजावी त्यासाठी पदाची व बिरुदाची आवशकता नसावी.या म्हणण्याशी सुद्धा सहमत आहे. माहितगार १८:५८, १८ मे २०११ (UTC)

काही सूचना

संपादन

मला काही सूचना करायच्या आहेत आणि त्यावर आपले मत जाणून घ्यायचे आहेत...

सहाय्य पानांवर केलेल्या कामा संदर्भाने बहूतांश वेळा काहीच प्रतिक्रीया सूचना मिळत नाहीत आपल्या मेहनतीचा काही उपयोग होतो आहे का नाही हे कळण्यासही मार्ग नसतो, अशा वेळी सुलभीकरणाच्या दृष्टीने तुमच्या काही सूचना दिसल्या मना पासून आनंद वाटला. धन्यवाद माहितगार

अ) परिभाषिक शब्द आणि प्रतिशब्द संबंधी सूचना
१) आपण मराठी विकीपेडियावर परिभाषिक शब्दांसाठी पाने तयार केली पाहिजेत. आणि संबंधित लेखांखाली "हे सुद्धा पाहा" ह्या विभागाखाली संबंधित परिभाषिक शब्दांचे पान जोडावे. उदा. परिभाषिक पान - गणितातील परिभाषिक शब्दे, आणि गणित ह्या लेखामध्ये "गणितातील परिभाषिक शब्दे" ह्या पानाचा दुवा "हे सुद्धा पाहा" ह्या मथळ्याखाली टाकावे. म्ह्णजे एखाद्या अननुभवी/इंग्लिशची जास्त सवय (आजकाल बरेचसे शिक्षण इंग्लिश मधून होते, त्यामूळे बऱ्याच इंग्लिशमधल्या परिभाषिक शब्दांची मराठी वाचकास सवय असते) असलेला मराठी वाचकास उपयोगी पडेल. सुरवातीलाच त्याची भंबेरी उडणार नाही.
२) गरज पडल्यास त्याकरता परिभाषिक शब्दांचे दालन बनवावे.
३) मदत आणि मार्गदर्शन ह्या दालनात परिभाषिक शब्दांच्या दालनाचा दुवा जोडावा. जेणेकरून नवीन संपादकांना नवीन लेख तयार करताना मराठी प्रतिशब्दाची गरज पडली तर ते ह्या दालनामार्फत संदर्भ घेउ शकतील.
४) काहीवेळा मराठीत प्रतिशब्द नसतात त्यासाठी ते तयार करावे लागतात. परंतु ते तयार करताना ते असंबद्ध होउ नये याची काळजी घ्यावी लागते. त्यासाठी एखादा प्रकल्प किंवा पान बनवता येइल का? जेथे प्रस्तावित प्रतिशब्द आणि त्याची व्युत्पत्ती किंवा स्पष्टीकरण (justification) दिले जावे आणि विकी सदस्यांची चर्चा करून दे वापरले जाईल, अशा पद्धतीचे काही करता येईल का? इंग्लिश मध्ये Radian ह शब्द Radius वरून Radi(us) + -an ह्या पद्धतीने तयार झाला आहे. पहा विक्शनरी दुवा.
४.१) बऱ्याचदा नवे शब्द हे संस्कृत मधल्या धातू आणि उपसर्गा पासून तयार केले जाते. त्या संदर्भात धातू, उपसर्ग (prefix and postfix) आणि त्यांचे अर्थ असे पान तयार करता येइल का? उदा. गणित ह शब्द गण् ह्या धातू पासून बनला आहे. त्वरण (acceleration) हा शब्द त्वरा(घाई) ह्या शब्दापासून साधित आहे. अशी काही यादी मिळल्यास नवीन होतकरू संपादकांस सोयीचे जाईल.
५) त्याचप्रमाणे एखादा नवीन शास्त्रासंबंधी लेख लिहीला की लगेच मराठी विक्शनरी वर संबंधित परिभाषिक शब्द तपासावे आणि असे शब्द नसल्यास ते तेथे add करावे.

आपल्या सूचना क्र अ १ ,२,३ नेमकेपणाने विकिपीडियाच्या परिघात बसत नाहीत,दीर्घ काळाकरिता विक्शनरी हा सहप्रकल्प आहेच पण मराठी विकिपीडियाचा विकास होण्याची शक्यता असलेला ०.००१ टक्के शक्यतेवर सुद्धा प्रयोग करून पहाण्यास मी तरी पाठींबा देतो "परिभाषिक शब्दांसाठी पाने/दालने" करावयाची असतील तर प्रयोग करून पहावा केव्हा कोणत्या प्रयोगास यश येईल ते सांगता येत नाही त्या दृष्टीने मीतरी या सूचने बद्दल फ्लेक्झीबल आहे.
अर्थात तांत्रीक/संगणकीय पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींनी यात अधीक रस दाखवल्यास कोणत्याही शब्दावर राईट क्लिक केल्यास विक्शनरीवरून शब्दाचा अर्थ देण्याची व्यवस्था करता येऊ शकते.पण विक्शनरीवर काम करण्याकरिता स्वयंसेवक कुठून आणायचे याच उत्तर माझ्याकडेही नाही त्यामुळेच मी तुमच्या सुचनेस हरकत घेतली नाही.
सूचना क्रमांक ४ च्या निमीत्ताने आवश्यक पाने जरूर बनवावीत.
आपल्या वरील सूचनांचा सारखे विचार मागे माझ्या मनात आले असता भाषांतर प्रकल्पांतर्गत मी काही साचे आणि पानांची निर्मिती मागे केलेली आहे ती पाने आपल्या सवडीने पहावीत.


माहितगार १९:२२, १८ मे २०११ (UTC)

माहितगार, तुमची हरकत नाही हे बघून आनंद वाटला. तरिही माझा मुद्दा मी अधिक स्पष्ट करतो. कबूल आहे की सूचना क्र अ १ ,२,३ विकिपीडियाच्या परिघात बसत नाही. परंतु मराठी भाषा अनेक परिभाषिक शब्दांसाठी अजून बाल्यावस्थेत आहे. तिचा अजून पुरेपुर विकास झाला नाहीये. जरा हिंदी कडे बघितल्यावर हे लक्षात येते की त्यांनी ruthless पणे नवे परिभाषिक शब्द तयार केले. त्याचप्रमाणे आपल्या व्यवहारात वापरले. मराठीचे तसे नाही, परंतु विकिपीडिया आणि काही छोट्या साइट्स मुळे नाचे एक भंडार खुले झाले आहे. त्यातल्यात्यात विकिपीडियाचे योगदान मोठेच आहे. (इतर साइट्स छोट्या प्रमाणावर आणि विशिष्ट शाखेसंदर्भातच माहिती पुरवतात...) अशावेळी एक अपवाद म्हणून अशी पाने बनवायला हरक्त नाही. केवळ परिघात बसत नाही म्हणून इतर पर्यायांचा विचार केला तर आपल्या पुढे एक पर्याय आहे तो म्हण्जे नवीन website बनविणे जिथे सगळ्या परिभाषिक शब्दांची यादी असेल, आनि असे खटाटोप करणे वेळ, खर्च इ. संदर्भात मूळीच परवडणारे नाही. विक्शनरी संदर्भात आपल्या सूचनेची मी सहमत आहे. पण ते generalize होइपर्यंत आणि विक्शनरीवर असे परिभाषिक शब्द वाढल्यावर विकिपीडियावर परिभाषिक शब्दांचे पान काढून टाकणे, आणि विक्शनरी वरील परिभाषिक शब्दांचे दुवे helpdesk वर जोडणे अश्या कृती करता येतील. त्याकरता मी सूचना क्र ५ केली आहे, नवे लेख बनविल्यावर जर ते परिभाषिक शब्दांची related असतील तर लगेच विक्शनरी वर अश्या शब्दांची भर घालावी, त्यासाठी फार वेळ लागत नाही...

अनिरुद्ध परांजपे ०३:२६, १९ मे २०११ (UTC)

आ) चित्रे
१) बहुधा मराठी विकीपेडिया वरील चित्रे, विषेशत: नकाशे, आकृत्या ही इंग्लिश मजकूरातील असतात. ती डाउनलोड करून त्यात बदल करून म्हणजेच इंग्लिश मजकूराच्या ठिकाणी मराठी मजकूर टाकण्यास काय हरकत आहे. असे काम सुरू करायला काय हरकत आहे? मला म्ह्णायचेय की असे काम सुरू करता येईल का? त्या साठी एखादा प्रकल्प सुरू करता येईल का?

विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे या प्रकल्पा अंतर्गतच वेगळे पान बनवता आले तर पहावे असे वाटते.माहितगार ०५:५४, १९ मे २०११ (UTC)

इ) मराठी व्यक्ती
१) मुळातच बऱ्याच मराठी गोष्टींचे digitalization झालेले नाहीये. विषेशत: मराठी व्यक्ती, चित्रपट, पुस्तके इ. त्यामुळे आपल्याला बऱ्याच लेखांचा माहिती अभावी विस्तार करता येत नाही. ह्यासंदर्भात मासिके, वृत्तपत्रे ह्यातील संदर्भ (citation) वापरायला काय हरकत आहे? असे काम करण्यास कोणी स्वयंसेवक होतील का?

नेमके लक्षात नाही आले माहितगार ०५:५४, १९ मे २०११ (UTC)

ई) शास्त्रीय लेख
१) ज्ञानशाखांचा विस्तार खूपच मोठा असल्याने, प्रत्येक जण आपापल्या ओळखीतले जे संबंधीत ज्ञानशाखेत प्रवीण आहेत त्यांना संबंधीत लेख लिहिण्यास प्रवृत्त करू शकतात किंवा त्यांच्या कडून एखादा लेख बनवून घेउन विकीपेडिया वर टाकू शकतात. प्रत्येक महिन्यामागे २ लेख झाले तरी खूप होईल.

ह्या करिता फिल्डवर्कची आवश्यकता आहे मराठी विकिपीडियाचे सध्याचे बहूतांश संपादक नौकरी कुटूंब वाली मंडळी आहेत.महाविद्यालयीन विद्द्यार्थी आणि शिक्षक प्राध्यापकांची संख्या वाढल्यास हे शक्य होईल माहितगार ०५:५४, १९ मे २०११ (UTC)

उ) गणित विकीकोड
१) इंग्लिश विकीपेडिया वर गणितासंबंधित कोड्स आहेत. आणि ते कोड्स आतमध्ये define केलेले चले घेउन त्यांचे चित्रात रुपांतर करते, तसेच संबंधित गणिती चिन्हे घेउन ते चित्र एकसंध बनविते. त्यामुळे गणिती सूत्रांना चांगला appearance मिळतो. परंतु ह्याचा एक मुख्य तोटा असा आहे की ते इंग्लिश मूळाक्षरे सोडून इतर मूळाक्षरे घेत नाहीत. आपण त्यासाठी विकीपेडीया मुख्यालयात/मुख्य सद्स्यांकडे विनंती करू शकतो का? त्यासाठी प्रथम आपणांस चित्रे, त्यात येउ शकणारा मजकूर इ. चे design करावे लागेल... तर ते करता येईल का? शक्यतो गणितातील चले इ सगळे मातृभाषेतून मांडण्याचा प्रयत्न व्हावा...

Aniruddha22Paranjpye १३:५२, १८ मे २०११ (UTC)

>>उ) गणित विकीकोड १

आपल्या या प्रश्नास मराठी विकिपीडिया सदस्य किती तांत्रीक सहाय्य पुरवू शकतील या बद्दल साशंक आहे. इंग्रजी विकिपीडियाची तांत्रीक प्रश्नाकरिता चावडी आहे तेथे प्रश्न विचारून पहावा इतर भाषी विकिपीडियातून असे काही आधीच उपलब्ध असण्याची शक्यता नाकाअरता येत नाही. आणि इंग्रजी विकिपीडिया चावडीवरून मिळालेल्या माहितीच्या आधारावर आपल्याला जसा विकि सॉफ्टवेअर बदल बनवून हवा आहे त्याची विनंती बगझीला येथे करता येते.माहितगार

आवाहन: विकिमीडिया इंडिया वृत्तपत्रिका - इ.स. २०११, जून

संपादन

विकिमीडिया इंडिया ( (इंग्लिश भाषेत) http://wiki.wikimedia.in/wiki/Main_Page. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)) हा विकिमीडिया प्रतिष्ठानाचा भारतातील अधिकृत अध्याय आहे. भारतीय भाषांतील विकिपीडियांच्या वाढीसाठी व त्या त्या भाषक समाजांमध्ये प्रसार करण्यासाठी लोकाभिमुख उपक्रम आखणे व विविध भारतीय भाषांतील विकिमीडिया प्रकल्पांमध्ये (विकिपीडिया, विक्शनर्‍या, विकिक्वोट्स, विकिस्रोत, विकिपुस्तक इत्यादी) समन्वय व सहकार्य वृद्धिंगत करणे ही विकिमीडिया इंडिया अध्यायाची प्रमुख उद्दिष्टे आहेत. या उपक्रमांचा भाग म्हणून गेल्या वर्षअखेरीपासून विकिमीडिया इंडिया अध्यायाने षण्मासिक वृत्तपत्रिकेचा (न्यूजलेटराचा) उपक्रम राबवणे आरंभले आहे. सप्टेंबर, इ.स. २०१०मध्ये विकिमीडिया इंडिया वृत्तपत्रिकेचा पहिला अंक प्रकाशित प्रकाशित झाला ( (PDF) (इंग्लिश भाषेत) http://commons.wikimedia.org/wiki/File:Wikimedia_India_Community_Newsletter_2010_September.pdf. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)). तिचा पुढील अंक, म्हणजे जून, इ.स. २०११मध्ये प्रकाशित करायचा अंक, लिहिण्यासाठी प्रत्येक भारतीय भाषेतील विकिपीडियावरील समुदायाने गेल्या सहा-सात महिन्यांतील (सप्टेंबर, इ.स. २०१०पासून आजवर) महत्त्वाच्या घडामोडींबद्दल वार्तांकन करायचे आहे. किंबहुना विकिपीडियासोबत त्या त्या भाषेतील विक्शनरी, विकिस्रोत इत्यादी अन्य सहप्रकल्पांवरील घडामोडींचे वार्तांकनही गोळा करायचे आहे. मराठी भाषेतील विकिपीडिया, विक्शनरी, विकिक्वोट्स इत्यादी प्रकल्पांवरील गेल्या सहा महिन्यांतील घडामोडींबद्दल माहिती गोळा करण्यासाठी विकिपीडिया:विकिमीडिया इंडिया वृत्तपत्रिका/इ.स. २०११, जून हे पान बनवण्यात आले आहे. सर्व मराठी विकिपीडियनांना या कामी आपले योगदान करावे.

वार्तांकनासाठी माहिती गोळा करून या पानावर नोंदवण्याची अंतिम मुदत रविवार, २२ मे, इ.स. २०११ दिवसअखेरपर्यंत आहे. विकिमीडिया इंडिया वृत्तपत्रिका इंग्लिश भाषेत प्रकाशित होत असल्यामुळे, या पानावरील वार्तांकनाचा/ आढाव्याचा इंग्लिश अनुवाद करून तो विकिपीडिया:विकिमीडिया इंडिया वृत्तपत्रिका/इ.स. २०११, जून/en या पानावर सोमवार, २३ मे, इ.स. २०११ दिवसअखेरपर्यंत प्रकाशित करायचा आहे. तेथून मग तो वृत्तपत्रिकेच्या स्वयंसेवक संपादकांद्वारे येथे संकलित करून अंतिम प्रकाशनास जाईल.

हेही पाहा

संपादन

अन्य विकिपीडिया समुदायांनी गोळा केलेली माहिती

लोकहो, कृपया मदत करा

संपादन

लोकहो,
विकिमीडिया इंडिया वृत्तपत्रिकेच्या जून अंकासाठी गेल्या सहा-सात महिन्यांतील मराठी विकिपीडियावरच्या महत्त्वाच्या घडामोडी येथे नोंदवल्या आहेत : विकिपीडिया:विकिमीडिया इंडिया वृत्तपत्रिका/इ.स. २०११, जून (व इंग्लिश अनुवाद). त्यात आपल्याकडूनही भर पडू द्या. खेरीज मराठी विकिपीडिया वगळता मराठी विक्शनरी, विकिक्वोट्स, विकिबुक्स इत्यादी सहप्रकल्पांवरील घडामोडींबद्दलदेखील संक्षिप्तपणे का होईना (किमान आजची लेखसंख्या, सर्व भाषिक प्रकल्पांमधील सापेक्ष स्थान/क्रमवारी इत्यादी), माहिती लिहायची आहे. या सहप्रकल्पांवरील समुदाय फारसे सक्रिय नाहीत; त्यामुळे या अंकासाठी मराठी विकिपीडिया-समुदायानेच जर ही जबाबदारी मोठ्या मनाने पेलली, तर खूप बरे होईल.

येत्या सोमवारी वार्तांकनाचा अनुवादित इंग्लिश मसुदा विकिमीडिया इंडिया अध्यायाच्या स्वयंसेवकांना पाठवायचा असल्यामुळे, आपल्याकडून त्वरेने सहकार्याची अपेक्षा आहे.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:५८, २१ मे २०११ (UTC)

असा वर्ग

संपादन

ही चर्चा बरेच दिवस चालू आहे. चावडीपानावरील जुने संदेश वेळोवेळी काढले जातात तशात हे हरवू नये म्हणून येथील चर्चा विकिपीडिया:चावडी/उपचर्चा/असा वर्ग, खूनाचे आरोपी येथे हलवली आहे. येथेही नजर टाकावी. अभय नातू २०:०२, ६ जून २०११ (UTC)

भ्रष्टाचाराचे आरोपी असा एक वर्ग मराठी विकिपीडियावर अलिकडेच तयार केला गेल्याचे पाहिले.ज्ञानकोशाच्या स्वरुपात असा वर्ग सयुक्तिक नाही असे वाटते.याचा अर्थ ज्ञानकोशाने याप्रकरणी संपूर्णपणे मौन पाळावे असा नक्कीच नाही. विकीपीडियावरील लेखातही - अशाअशा भ्रष्टाचाराच्या आरोपाच्या तपासासाठी यांना अमुकअमुक रोजी याया तपासयंत्रणेने ताब्यात घेतले, स्थानबद्ध केल, अटक केली.- असे प्रत्यक्ष लेखात लिहीता येईल,लिहिले जावे, लिहिले जातेही. आरोपी ही स्थिती काही काळापुरतीची असते, तिचा स्थायी असा वर्ग असू नये, एवढाच हा मुद्दा आहे. माहितगार आणि इतर जाणकारांनी यावर प्रकाश टाकला तर बरे.-Manoj ०५:४४, २१ मे २०११ (UTC)

विकिपीडिया किंवा कोणताच ज्ञानकोश हा जजमेंटल(अनुमानित) असता कामा नये. विकिपीडिया सारासारविवेकबुद्धी वापरणारा कोश नसून माहितीचा कोश आहे. त्यादृष्टीने भ्रष्टाचाराचे आरोपी हा वर्ग भ्रष्टाचारी व्यक्ती यापेक्षा नक्कीच उजवा आहे पण वर मनोजने म्हणल्याप्रमाणे हे आरोपी दोषी ठरतीलच असे नाही. हे आरोपही खरे असतीलच असे नाही त्यांची शहानिशा झाल्यावर अशा व्यक्तींना या वर्गातून वेळीच काढले नाही तर ते त्यांच्या चरित्रावर शिंतोडे असल्याचा दावा नाकारता येणार नाही. याकारणांस्तव माझा या वर्गाला विरोध आहे.
 
हा वर्ग असू नये. अभय नातू ०६:२६, २१ मे २०११ (UTC)

मनोज व अभय यांच्या मताशी अगदी सहमत. मराठी विकिपीडिया सदस्यांनी फुकाची न्यायाधीशगिरी करणे अपेक्षित नाही. आरोप असतील किंवा खटले चालू असतील, तर त्यासंबंधाने माहिती व संबंधित संदर्भ/ स्रोत बातम्या नोंदवाव्यात, मात्र स्थायी वर्ग नक्कीच असू नयेत.

 
हा वर्ग असू नये. --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:३६, २१ मे २०११ (UTC)
 
हा वर्ग असू दे. [१] -- . Shlok talk . ०७:०८, २१ मे २०११ (UTC)


भ्रष्टाचाराचे आरोपी असा एक वर्ग मराठी विकिपीडियावर तयार करणे म्हणजे " फुकाची न्यायाधीशगिरी करणे " हे कसे? जाणकार सदस्यांनी यावर प्रकाश टाकला तर बरे होइल तसेच भ्रष्टाचाराचे आरोपी हा वादग्रस्त मुद्दा कसा ? ह्या व्यक्ती आरोपी आहेत गुन्हेगार नाहीत. . Shlok talk . १२:२८, २३ मे २०११ (UTC)
 
हा वर्ग असू नये. User:Sachinvenga यांनी दाखवलेला दुवा ज्यांना तुरूंगात डांबलेले आहे किंवा होते त्या संबधी आहे. आरोपींविषयी न्यायदान होत नाही तो पर्यंत हा वादग्रस्त मुद्दा टाळावा.
Dr.sachin23 १८:०८, २१ मे २०११ (UTC)
अभयचे मुद्दे पटतात खरे; पण या विषयावर प्रदिर्घ सखोल चर्चेस वाव आहे अस वाटते. अर्थात असा वर्ग बनवणे/नबनवणेचा निर्णय लेखात ससंदर्भ वस्तुनिष्ठ माहितीची नोंद घेण्याच्या आडही येऊ नये.सध्या तरी तटस्थ. माहितगार १६:५९, २२ मे २०११ (UTC)
माहितीच्या कोशात "भ्रष्टाचाराचे आरोपी "अशा माहितीची वा विषयांची खरच गरज आहे का याचा शांतपणे आपण सारेजण विचार करू या. त्या पेक्षा असे असंख्य विषय आहेत ज्यावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी काम करायला हवे. आपण काही वार्ताहर नाही आणि त्यामुळे अशा बातम्या वजा घटना वा माहिती मराठी विकिपीडिया मध्ये का भरत राहावी?
 
हा वर्ग असू नये. मंदार कुलकर्णी
ह्या मुद्द्याची विश्वकोशीय उल्लेखनीयतेच्या अंगाने चर्चा व्हावयास हवी, चोरीच्या सर्व आरोपींची किंवा आरोप सिद्ध झालेल्या सर्व चोरांची यादी तयार करणे हा विश्वकोशाचा उद्देश असू शकत नाही पण जी व्यक्ती/संस्था इतर मुद्दांद्वारे उल्लेखनीय ठरते त्या व्यक्तीच यश हे जस उल्लेखनीय आहे तसेच त्याच्यावर झालेल्या आरोपांची ससंदर्भ वस्तुनीष्ठ दखल घेण्यात वस्तुतः काही वावगे आढळत नाही. पण यात इतर संबधीत मुद्द्यांचा साकल्याने विचार व्हावयास हवा
जे घडेल त्याची त्या-त्या लेखात संदर्भानुसार दखल तर घेतली गेली पाहिजे. मुद्दा दखल घेण्याचा किंवा न घेण्याचा नाही, हंगामी बाबीच्या नावाने स्थायी वर्ग तयार करण्याबद्दलचा आहे. -मनोज २२:२२, २४ मे २०११ (UTC)
  1. सर्वच माध्यमांची एक उणीव असते आरोप होताना मोठी प्रसिद्धी दिली जाते पण आरोप सिद्ध न होता व्यक्ती निर्दोष ठरल्यास त्याची उचीत दखल माध्यमे घेतातच असे नाही. विकिपीडिया हे सुद्धा एक माध्यम आहे. आरोप सिद्ध न झालेल्यांना अशा वर्गवारीतून वगळण्याबद्दल आपण पुरेसे सजग आहोत का , असलो तरी त्यासाठी पुरेसा वेळ देतो का ? हा फार महत्वाचा मुद्दा आहे. प्रताधिकार उल्लंघनाबद्दल मी मराठी विकिपीडिय्न्समध्ये सार्वत्रीक उदासिनता पहातो. हिच उदासिनता अशा यादीतून नाव वगळले न जाण्याबाबत राहणे हा एक निश्चित चिंतेचा मुद्दा असणार आहे आणि या अनुषंगाने "त्यांची शहानिशा झाल्यावर अशा व्यक्तींना या वर्गातून वेळीच काढले नाही तर ते त्यांच्या चरित्रावर शिंतोडे असल्याचा दावा नाकारता येणार नाही. " अभय नातूंचे मत महत्वाचे ठरते. माहितगार ०६:१५, २४ मे २०११ (UTC)
  • " भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध न झालेल्या व्यक्तीं " असा वर्ग त्यासाठी बनवता येइल. -- . Shlok talk . ०४:१०, २५ मे २०११ (UTC)
श्लोक प्रश्न प्रॅक्टिकॅलीटीचा आहे,एक कॅटेगरी मॅनेज करण्याची मारामार असताना तीन तीन कॅटेगरी मॅनेज करायच्या त्यात पून्हा बर्‍याच कोर्टकेसेस वृत्तमाध्यमे कालौघात विसरून जातात तुम्ही डोळ्यात तेल घालून कॅटेगरी मधून नावे वगळण्या आणि बदलतो म्हणाल पण तुमच्या पर्यंत बातमीच पोहोचली नाही तर कोर्टात निकाल लागलेला आसेल आणि कायदेशीर दृष्ट्या तुम्ही दिलेली माहिती चुकीची म्हणून निर्दोष ठरलेली व्यक्ती मात्र तुमच्यावर उलटेल.सत्यमच्या राजूचे काय झाले आता तो बातम्यातून सध्यातरी गायब दिसतोय त्याची केस मोठीतरी आहे छोटे बाजारबुणगे तर हजारोंनी असतात त्यांच्या बातम्या नंतर वृत्तमाध्यमे देतच नाहीत.
एक कॅटेगरी मॅनेज करण्याची मारामार म्हणण्याचे दुसरेही कारण आहे आज भरपूर काम करणारा सदस्य पुन्हा विकिपीडियावर वापस येऊन काम करून जाण्याची गॅरंटी नाही.अजून एक साधे उदाहरण द्यायचे झालेतर "कामचालू" नावाच्या साचात स्पष्ट लिहिले आहे कि तुमचा तुम्हाला साचा काढणे होत नसेल तर लावूही नका पण काम झाल्यानंतर साचा काढण्याची कुणीही तसदी घेतनाही दुसरे इंग्रजी विकिपीडियाच्या तुलनेत आपल्याकडे स्वयंसेवकाच्या सख्येचा आकडा किती व्यस्त आहे उपलब्ध लोकांचा वेळ फालतू गुन्हेगारांच्या कॅटेगर्‍या बदलण्यात वाया घालवायचा का ?
त्या पेक्षा अगदी केस चालू असतानाही " भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध न झालेल्या व्यक्तीं " हि एकच कॅटेगरी हबेतर वापरावी कायदेशीर त्रास नाही, कारण अप्रत्यक्षरीत्या भ्रष्टाचाराचा आरोप झाला होता असेही कळते, आणि सिद्ध न झालेला म्हटल्यामुळे तुमच्यावर कायद्दाचे किटाळही नाही.
अगदी सर्वोच्चन्यायालयाने अंतीम निकालात आरोपीस गुन्हेगार म्हणून जाहीर केल्याचे संदर्भासहीत कळाले त्यावेळी तुम्हाला वेळ असला तर सर्वोच्च न्यायालयातून आरोप सिद्ध झालेले अशा कॅटेगरीत टाकावे. म्हणजे सदस्यांच्या कामाचा फापटपसारा वाढणार नाही.

माहितगार ०५:४७, २ जून २०११ (UTC)

सुरेश कलमाडी , ए. राजा etc. हे फालतू गुन्हेगार आहेत का? बर गुन्हेगार असेही आपण म्हटले नाही आहे.-- . Shlok talk . ०६:५७, २ जून २०११ (UTC)
श्लोक मी सुरेश कलमाडी , ए. राजा यांच्याबद्दल कुठेही तुम्ही म्हणता तसा उल्लेख केलेला नाही.विश्वकोशीय दृष्ट्या त्या उल्लेखनीय व्यक्ती आहेत,या महनीय व्यक्तींबद्दल लोक काय बोलतात त्याची मला साधी कल्पनाही नाही त्यांच्या विरूद्ध सर्वोच्च न्यायालयात काही सिद्ध झाल्याचे अद्याप तरी माझ्या ऐकीवात नाही. मी राजांबद्दल अलिकडे काही वाचण्यात नाही एवढेच म्हणालो. कुणालाही गुन्हेगार ठरवण्याचा अधिकार माननीय न्यायालयाचा आहे माझा नव्हे.
गुन्हेगार फालतू नसूही शकतात ,उगाच त्यांचा राग का बा ओढवून घ्या, पण एकुणच संशयीत, आरोपी, सिद्ध झालेले न झालेले अथवा गुन्हेगारीविश्वाची बाकीच्या मराठी विकिपीडियाच्या इतर ज्ञान साधनांच्या दृष्टीने महत्ता किती ? आपण पुजा-अर्चा मंत्र-श्लोक म्हणतो त्यात समाजातील नकारात्मक गोष्टींना महत्व देतो काय ? नाही ना तसेच, यावरही मत-मतांतरे असू शकतात मी माझे मत व्यक्त केले एवढेच माहितगार १९:०१, २ जून २०११ (UTC)
  • सर्वोच्च न्यायालयाच्या देख्ररीखी खाली सुरु आसलेल्या चौकशीत सदर व्यक्तीना आरोपी केले आसताना व अटक करुन तुरुंगात घातले आसताना माराठी वीकीपिडीकात त्यांना भ्रष्टाचाराचे आरोपी या वर्गात घालण्येवरुन वाद व्हावा हे फार खेदजनक वाटते.-- . Shlok talk . १९:५०, २ जून २०११ (UTC)
श्लोक खेद नका करू, वाद कुणालाही आत घालण्याबद्दल नाही न्यायालयाने तथाकथीत सदरांनाबाहेर काढल्यानंतर विकिपीड्यावर्गाच्या पिंजर्‍यातून बाहेर काढण्याची प्रक्रीया राबवली जाईल याची शाश्वती कुणासही वाटत नाही ही वस्तुस्थिती आहे.माहितगार २०:००, २ जून २०११ (UTC)

वर असलेल्या दोन्ही मतांत थोडेथोडे तथ्य आहेच आहे. माझेही मत वर मी नोंदवले आहेच परंतु --

सर्वोच्च न्यायालयाच्या देख्ररीखी खाली सुरु आसलेल्या चौकशीत सदर व्यक्तीना आरोपी केले आसताना व अटक करुन तुरुंगात घातले आसताना माराठी वीकीपिडीकात त्यांना भ्रष्टाचाराचे आरोपी या वर्गात घालण्येवरुन वाद व्हावा हे फार खेदजनक वाटते.

यावरुन मला येथे एक बाब आवर्जून स्पष्ट करावीशी वाटते - विकिपीडिया हे समाजप्रबोधनाचे उपकरण नसून समाजउद्बोधनाचे आहे. विकिपीडिया म्हणजे ब्लॉग नव्हे. भ्रष्टाचारविरोध, नीतीमत्ता, सद्गुण, चालीरीती, इ. बाबत विकिपीडिया निष्पक्षपाती आहे/असायला हवा. असलेली तथ्ये जगासमोर आणणे हा विकिपीडियाचा मुख्य उद्देश आहे. त्याद्वारे समाजसेवा होत असेल (नव्हे, होतेच) तर उत्तम पण त्यामागे धावणे हे आपले (येथे) काम नव्हे. याचा अर्थ विकिपीडिया भ्रष्टाचाराला खतपाणी घालत आहे असे नव्हे तर तो भ्रष्टाचार, इ.च्या बाबतीत पूर्णपणे agnostic[मराठी शब्द सुचवा] आहे इतकेच.

येथे हा वर्ग असू नये असे म्हणणार्‍यांपैकी अनेक लेखक स्वतःची अनुदिनी, सोशल मीडिया संपर्कस्थळे राखून आहेत आणि त्यावरुन भ्रष्टाचाराविरुद्ध कंठशोष (किंवा कळपटशोष :-}) होईपर्यंत त्याबद्दल लिहीत असतात, तरी त्यांच्याबद्दल असे उद्गार काढणे हे बरोबर नव्हे.

येथे चर्चा थांबवण्याचा उद्देश नाही.....फक्त व्यक्तिगत इशारे होण्याआधीच थोडासा हस्तक्षेप करावासा वाटला. असो. इंग्लिश विकिपीडियावरही याबद्दल चर्चा सुरू आहे. त्यातून काही इतर मुद्दे निघतात का ते ही बघूयात.

अभय नातू २२:१८, २ जून २०११ (UTC)

agnostic =अज्ञेयवादी (नाम): एखाद्या गोष्टीच (उदाहरणार्थ देवाच) अस्तीत्व आहे का ? माहित नाही, स्विकारतही नाहीत किंवा नाकारतही नाहीत अशी तटस्थ भूमिका []
उद्बोधन - शिकवण देण्याची क्रिया "समाजाचे उद्बोधन करण्यासाठी संस्थेने चर्चासत्राचे आयोजन केले.[]
प्रबोधन - उपदेश, शिकवण इत्यादींच्या माध्यमातून विशिष्ट गोष्टीचे भान आणून देण्याची क्रिया[]

" खुनाच्या खट्ल्यातील आरोपी "

संपादन

" खुनाच्या खट्ल्यातील आरोपी " असा वर्ग बनवावा का.? -- . Shlok talk . १२:५१, ४ जून २०११ (UTC)

यात मदनलाल धिंग्रा, भगतसिंग, इ.चा समावेश होईल?
अभय नातू १७:५२, ४ जून २०११ (UTC)
नाही. स्वतंत्र्य भारतातील, भारतीय दंड संहिता कलम ३०२ आणि १२० ब नुसार खून-खुनाचा कट रचल्याचे आरोपी आपेक्षीत आहेत तसेच या वर्गा साठी योग्य नाव काय असावे.?-- . Shlok talk . १८:२४, ४ जून २०११ (UTC)
का नको व्हायला ? एखाद्या देशात क्रांतिकारक म्हणून मानले गेलेले लोक अन्य देशात हत्येच्या खटल्यातले आरोपी असण्याची उदाहरणे जगभर आढळतात. या वस्तुनिष्ठतेला डावलून मराठी विकिपीडियावरील वर्गांची व्याख्या एखाद्या राष्ट्राच्या दंडसंहितेनुसार करणे हा ढळढळीत पक्षपातीपणा ठरेल. मराठी विकिपीडियासारख्या मुक्त ज्ञानकोशाकडून विशिष्ट देशाच्याच दंडसंहितेला झुकते माप देणे अपेक्षित नाही. मुळात मराठी विकिपीडिया भारतकेंद्रित दृष्टिकोनातून घडवला जाऊ नये, ही गोष्ट ध्यानात राखायला हवी.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:५३, ५ जून २०११ (UTC)
म्हणजे " खुनाच्या खट्ल्यातील आरोपी " आसा वर्ग तयार करुन त्यात मदनलाल धिंग्रा, भगतसिंग, राज ठाकरे इ.चा समावेश करावा असे आपल्याला सुचवायाचे आहे कां?- . Shlok talk . १८:२१, ५ जून २०११ (UTC)
http://www.indialawjournal.com/volume1/issue_3/bhagat_singh.html नुसार भगतसिंग यांना ही Indian Penal Code ३०७ नुसार शिक्षा झाली होती.
Dr.sachin23 १६:२१, ५ जून २०११ (UTC)

श्रेयस तलपडे असे शीर्षक बदलावे काय ?

संपादन

गेले काही महिने, मी या लेखाचा विषय असलेल्या अभिनेत्याच्या तोंडून विविध वाहिन्यांवर बोलताना त्याचे स्वतःचे नाव "श्रेयस तलपडे" असे ऐकत आहे. तसे असेल, आणि त्या अभिनेत्याने "श्रेयस तलपडे" हेच नाव धारण केले असेल, तर या लेखाचे नाव बदलून श्रेयस तलपडे असे लिहावे लागेल. कुणाला काही खात्रीशीर माहिती आहे का ?

संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:५९, २० मे २०११ (UTC)
श्रेयस हा त्याचे आडनाव जर 'तलपडे' असे सांगत असेल तर (मी हिंदी वाहिनी संदर्भात बोलत आहे) तर ते फारसे योग्य नाही. हिंदी मध्ये "ळ" हे अक्षरच नाही म्हणून आपण ह्यातून काही मार्ग काढू शकतो का? आपण हिंदी बोलताना किंवा लिहिताना "ळ" असेच वापरले तर काय होईल? भाषा तज्ञांचे या बाबतीत काय मत आहे? 'लोकमान्य तिलक' हे लहानपणा पासून वाचताना मला फार त्रास होतो. जी गोष्ट हिंदी ची तीच इंग्रजीची. तेथे पण "ळ" नाहीच. मग "ळ" आणि "ल" मधला फरक कसा ओळखायचा? काही वर्षांपूर्वी एका वर्तमानपत्रात मी या विषयावर लेख लिहिला होता. या बाबतीत आपण काही करू शकतो का? आपण "L" च्या मध्ये एक टिंब दिला अमी त्याचा "ळ" म्हणून वापर करायचा ठरवला तर चालणार नाही का? तसेच "श" आणि "ष" हा फरक इतर भाषात कसा दाखवायचा? "ण" साठी पण असे काही करता येईल काय? (माझे आडनाव 'कुलकर्णी' असल्याने मला हा प्रश्न जन्मापासूनच आहे !!!
मला असे वाटते की, आपली मराठी भाषा आणि संस्कृत भाषा या इतक्या अतोनात समृद्ध आहेत की जगातील कोणत्याही भाषेतील कोणतेही शब्द वा उच्चार आपल्याला या दोन भाषांमध्ये करता येतात (हे 'सामान्यतः' मी म्हणत आहे). पण इतर भाषांमध्ये जर अशी काही अक्षरे नसतील तर ते आणण्यासाठी आपण प्रयंत्न करू शकतो का? मला या विषयावर "चांगली चर्चा" करायला आवडेल.....
मंदार कुलकर्णी
हिंदी आणि मराठी
हिंदी बोलताना आणि हिंदी चित्रपटांत काम करताना तो तलपडे असतो, मराठीत तळपदे. मराठीतली भक्ती बर्वे हिंदी-गुजराथीत भक्ति बर्वे असायची. कनिमोळी ही हिंदी-मराठीत कन्निमोझी किंवा कनिमोड़ी आहे. इंग्रजीत श्रेयस तळपदे हा श्रेयअ‍ॅज़्‌ टॅल्पेऽड्‌ होणारच. ...J १८:१०, २० मे २०११ (UTC)
कळ्हिमोनिचा कझिमोनी हा फक्त इंग्रजीवरच विसंबलेल्या मराठी माध्यमांतल्या मंडळींनी केला आहे, तो त्या स्पेलिंगमधल्या झेडचा झ असा उच्चार करून. वास्तविक त्यांच्या पूर्वसूरींनी कळ्हघम या पक्षाच्या नावाच्या शब्दातल्या स्पेलिंगमध्ये झेड असतानाही त्याचा योग्य मराठी उच्चार लिहीलेला आहे. - Manoj ०६:०५, २१ मे २०११ (UTC)

[संपादन] मराठी उच्चार योग्य?

मराठी उच्चार योग्य आहे असे म्हणणे धार्ष्ट्याचे आहे. तमिऴमधल्या ऴ चा उच्चार मराठीत लिहिणे कठीण आहे. इंग्रजीत तर अशक्य आहे. केवळ त्याला पर्याय म्हणून इंग्रजीने zh असे लिहिले, तर काही चुकीचे नाही. जे अक्षर त्यांच्या लिपीत नाही त्यासाठी त्यांना काहीतरी लिहिणे भाग आहे. ऴ साठी λ लिहिले असते तरी कुणीतरी विरोध केलाच असता. मराठीभाषकांनी zh चा उच्चार झ केला हा त्यांचा दोष, हे आपले म्हणणे पटले.

तमिऴमध्ये दोन ण आहेत, आपण वेगळे लिहू शकू? त्यामुळे इतर भाषेतले शब्द मराठी लिपीत आणताना त्यांचे मराठीकरण करावे आणि या उलट, हाच एकमेव मार्ग.

एकूण काय? तर, मराठी विकिपीडियावर श्रेयस तळपदे, हिंदीवर तलपदे आणि इंग्रजीवर टॅल्पेऽड असे लिहिल्याशिवाय गत्यंतर नाही.‌.J १०:४७, २१ मे २०११ (UTC)

पण हिंदीत मुळातला प्रॉब्लेम "ळ" नसण्याचा आहे, त्यांच्याकडे "द" तर आहे ना ? मग प्रस्तुत अभिनेत्याला हिंदी भाषेच्या उच्चारमर्यादांमध्ये अडकूनही स्वतःचे आडनाव "तलपदे" असे सांगावेसे वाटायला हवे. पण "तलपदे" असे न सांगता प्रस्तुत अभिनेता जर "तलपडे" असे आडनाव सांगत हिंडत असेल, तर त्याचे अधिकृत नाव बदलले गेले आहे किंवा कसे, याबद्दल शंका वाटायला लागते. म्हणूनच या चर्चेच्या सुरुवातीला मी याबद्दल काही विश्वसनीय माहिती आहे काय, असे विचारले.

संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:२६, २१ मे २०११ (UTC)

या विषयावर अजून काही तज्ञांची मते हवी आहेत. म्हणूनच हि चर्चा चावडीवर टाकली आहे.....

--मंदार कुलकर्णी
वृत्तनिवेदकाने एखाद्या व्यक्तीच्या नावाचे उच्चारण नेमके कसे करावे ? हा बीबीसी वर्ल्डसर्वीस सारख्या वृत्तवाहिनीवर चिरंतन चर्चेचा मुद्दा आहे, पण वृत्तवाहिनीची अधिकृत भूमिका/उच्चारण संकेत पटणारा आहे कि व्यक्ती स्वतःचे नाव स्वतः नेमके कसे उच्चारते/लिहिते हे कल्पना असल्यास तेच उच्चारण प्रमाण मानावे, उच्चारण लेखन माहिती नसल्यास त्याच्या मातृभाषेशी शक्यतो प्रमाण असावे , मार्गदर्शनास मातृभाषी न मिळाल्यास तो ज्या प्रदेशातून आहे त्या प्रदेशातील उच्चारणांशी प्रमाण असावे अशी उतरती भाजणी आहे.
यशवंतराव चव्हाणांचे यशवंतराव चौहान आणि माधवराव सिंदीयांचे माधवराव शिंदे करू नये

>>माधवराव सिंदीयांचे माधवराव शिंदे करू नये<< याला थोडासा विरोध आहे. शिंदे या शब्दाचे इंग्रजी स्पेलिंग Shinde असे केले तर त्याचा उच्चार शाइन्ड असा आणि असाच होतो. शिंदे या शब्दाचे प्रत्ययापूर्वीचे सामान्यरूप शिंद्या असे होते. शिंद्यांची छत्री वगैरेवरून हे लक्षात येईल. साहजिकच शिंद्या हेच नाव असावे असे इंग्रजांना वाटणे साहजिकच होते. त्यामुळे त्यांनी केलेले शिंदे या मराठी शब्दाचे Scindia हे सर्वात योग्य स्पेलिंग आहे. त्यामुळे हिंदीत आणि अन्य जागतिक भाषांत ते जरी सिन्दिया असले तरी मराठीत ते शिंदेच आहेत, आणि तसेच लिखाण करावे, आणि केले जातेही. महाराष्ट्रीय चव्हाणचे मात्र चौहान करू नये तसेच, हिंदीभाषक चौहानचे चव्हाणही करू नये. ...J १०:३२, ३० मे २०११ (UTC)


अर्थात विकिपीडिया हे लिखीत माध्यम असल्याने ती व्य्क्ती नाव कसे लिहिते त्यास प्रमाण मानावे.परदेशात गेल्यानंतर बर्‍याच व्यक्ती स्वतःच्या नाम उच्चारणाचे इतरांनी लक्तरे करण्या पेक्षा उच्चारण स्वत:हूनही वेगळे करतात असे आढळून येते.
गूगल शोधात तळपदे हे आडनाव इतरही महाराष्ट्रीय व्यक्तीचे आहे इतर मराठी माध्यमेही तळपदे असे लेखन करताना आढळतात तेव्हा तळपदे राहू द्यावे असे वाटते माहितगार १७:३०, २२ मे २०११ (UTC)


स्वत: तळपदे जरी हिंदी बोलताना किंवा अन्य काही प्रसंगी तल्पदे असे म्हणत असतील तरी ते प्रमाण मानू नये. त्यांच्या माध्यमिक शालान्त परीक्षा प्रमाणपत्रावर जे नाव असेल आणि त्यांनी जर ते अधिकृतरीत्या नंतरच्या काळात बदलले नसेल, तर तेच नाव( म्हणजे बहुधा तळपदे) प्रमाण समजावे. एखाद्याचे दात पडल्यामुळे किंवा अन्य काही कारणाने त्याला आपले नाव नीट उच्चारता आले नाही तरी मूळ लिखाणात असलेले कायमच प्रमाण असते. प्रतिभा पाटील हिंदीत ‘पाटिल’ असतात, आणि पाटिल असेच उच्चारतात, पण मराठी लिहिताना तसे चालणार नाही..... J १७:५१, २२ मे २०११ (UTC)


>>एखाद्याचे दात पडल्यामुळे किंवा अन्य काही कारणाने त्याला आपले नाव नीट उच्चारता आले नाही तरी.....

:) माहितगार २०:०२, २२ मे २०११ (UTC)
>>स्वत: तळपदे जरी हिंदी बोलताना किंवा अन्य काही प्रसंगी तल्पदे असे म्हणत असतील तरी ते प्रमाण मानू नये. <<
जे, तुम्ही तपशील चुकताय बहुधा ... तो अभिनेता हिंदीत "तलपडे" असे नाव सांगत आहे (हिंदीत ळ नसल्यामुळे त्याने "तलपदे" असे सांगणे अधिक तार्किक ठरले असते). त्यातला "डे" कुठून आला, हे मला उमजत नाही. म्हणूनच त्याचे नाव "श्रेयस तलपडे" आहे किंवा कसे ही चर्चा उद्भवली. चर्चा हिंदीतल्या उच्चारमर्यादांवर केंद्रित नव्हतीच मुळी!
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०१:१७, २३ मे २०११ (UTC)
परंतु तो स्वत: मराठीत काय उच्चारतो/लिहीतो ते महत्त्वाचे. जर तो मराठीत तळपदे म्हणत असेल तर तेच राहू द्यावे. त्यासाठी कुठल्यातरी मार्गाने खात्री करून घ्यावी..
अनिरुद्ध परांजपे ०१:५४, २३ मे २०११ (UTC)

वैगुण्यावर चर्चा ऐवजी बदल करावा अशी अपेक्षा

संपादन
  1. सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो
  2. डोंगरयात्रा - आनंद पाळंदे
  3. दुर्गदर्शन - गो. नी. दांडेकर
  4. किल्ले - गो. नी. दांडेकर
  5. दुर्गभ्रमणगाथा - गो. नी. दांडेकर
  6. Trek the Sahyadries - Harish Kapadia
  7. सह्याद्री - स. आ. जोगळेकर
  8. दुर्गकथा - निनाद बेडेकर
  9. दुर्गवैभव - निनाद बेडेकर
  10. इतिहास दुर्गांचा - निनाद बेडेकर
  11. महारास्त्रातील दुर्ग - निनाद बेडेकर

या लेखांच्या चर्चा सदरात केलेले खालील

" महाराष्ट्रातील दुर्ग हे यांनी मराठी भाषेत किल्ल्यांच्या संदर्भात लिहिलेले पुस्तक आहे. "
- यांनी म्हणजे कोणी, पान लेखकाचे की पुस्तकाचे?-- 

विधाना ऐवजी जर संबधीत लेखात बदलाची तसदी घेतली असती तर फार बरे झाले असते. चर्चा वर नोंदनी पेक्षा कमी वेळात हे वैगुन्य दूर झाले असते.

Dr.sachin23 १०:२१, २३ मे २०११ (UTC)

मित्रा , जाउ दे रे. ती माझी छोटीशी चूक होती.... जी मी नंतर दुरुस्त केली. मला असे अनुभव या पूर्वी आले आहेत. ....
मंदार कुलकर्णी ०९:१३, २४ मे २०११ (UTC)

"ळ", "ण", "श" आणि "ष"

संपादन

या विषयावर योग्य व्याकरण संदर्भात चर्चा हवी आहे म्हणून परत एकदा चावडीवर टाकत आहे....

हिंदी मध्ये "ळ" हे अक्षरच नाही म्हणून ळ असलेले शब्द हिंदी मधे कसे लिहायचे? आपण ह्यातून काही मार्ग काढू शकतो का? आपण हिंदी बोलताना किंवा लिहिताना "ळ" असेच वापरले तर काय होईल? भाषा तज्ञांचे या बाबतीत काय मत आहे? 'लोकमान्य तिलक' हे लहानपणा पासून वाचताना मला फार त्रास होतो. जी गोष्ट हिंदी ची तीच इंग्रजीची. तेथे पण "ळ" नाहीच. मग "ळ" आणि "ल" मधला फरक कसा ओळखायचा? काही वर्षांपूर्वी एका वर्तमानपत्रात मी या विषयावर लेख लिहिला होता. या बाबतीत आपण काही करू शकतो का? आपण "L" च्या मध्ये एक टिंब दिला आणि त्याचा "ळ" म्हणून वापर करायचा ठरवला तर चालणार नाही का? तसेच "श" आणि "ष" हा फरक इतर भाषात कसा दाखवायचा? "ण" साठी पण असे काही करता येईल काय? (माझे आडनाव 'कुलकर्णी' असल्याने मला हा प्रश्न जन्मापासूनच आहे !!! मला असे वाटते की, आपली मराठी भाषा आणि संस्कृत भाषा या इतक्या अतोनात समृद्ध आहेत की जगातील कोणत्याही भाषेतील कोणतेही शब्द वा उच्चार आपल्याला या दोन भाषांमध्ये करता येतात (हे 'सामान्यतः' मी म्हणत आहे). पण इतर भाषांमध्ये जर अशी काही अक्षरे नसतील तर ते आणण्यासाठी आपण प्रयंत्न करू शकतो का? मला या विषयावर "चांगली चर्चा" करायला आवडेल.....

धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव: मंदार कुलकर्णी
मंदार कुलकर्णी ०९:२४, २४ मे २०११ (UTC)

इतर भाषेतली अक्षरे

संपादन

>>पण इतर भाषांमध्ये जर अशी काही अक्षरे नसतील तर ते आणण्यासाठी आपण प्रयंत्न करू शकतो का?<< फारसी म्हणजे उर्दू लिपीत ५ ज, ३ स, २ त , २ ह, २ अ आणि २ क-ख-ग-ड-फ आहेत. आपण आपल्या लिपीत तसले उच्चार नसणारे शब्द नसले तरी, ही अक्षरे लिहिण्याची सोय करावी का? हे फक्त एका भाषेचे झाले. जगातल्या प्रत्येक भाषेत मराठीपेक्षा वेगळ्या उच्चाराचे एक तरी अक्षर असतेच...J १०:३९, ३० मे २०११ (UTC)


"L"च्या मध्ये टिंब

संपादन

>>आपण "L" च्या मध्ये एक टिंब दिला आणि त्याचा "ळ" म्हणून वापर करायचा ठरवला तर चालणार नाही का?<< टिंब कसे द्यायचे?..J ०९:५१, ३० मे २०११ (UTC)

हे शक्य नसेल तर नुसता कॅपिटल L काढला तरी तो "ळ" म्हणून वापरु शकतो... मंदार कुलकर्णी १७:४५, ३१ मे २०११ (UTC)


मराठी भाषेतून रोमन लिपीत लिहिण्यासाठी अनेक कन्व्हेन्शन[मराठी शब्द सुचवा] आहेत. माझ्या आवडत्या प्रकारात --
१. स्वर पूर्णपणे उच्चारित होतील असे लिहावे, स्वरांसाठी एकच रोमन स्वर निवडावा - उ = u, ऊ = uu; इ=i, ई=ii; आ=aa
२. शब्दांती अकार अध्याह्रत मानावा - अभय = abhay; abhaya नव्हे. शब्दांती आकार स्पष्ट करावा - कर्ता = kartaa
३. अनुस्वार वेगळा स्पष्ट करावा, त्यासाठी योग्य तोच अनुनासिक वर्ण वापरावा - कंस = ka.nsa; पंप = pa.mp
४. कठोर व्यंजनांसाठी कॅपिटल अक्षरे वापरावी - टट्टू = TaTTuu
५. अतिकठोर व्यंजनांसाठी कॅपिटल अक्षरांना ह् लावावा - ढेकर = Dhekar; माठ = maaTh;
६. वाक्याची सुरुवात कॅपिटल अक्षराने करू नये.
७. इतर
याशिवाय इतरही पद्धती प्रचलित आहेत.
आपली मराठी भाषा आणि संस्कृत भाषा या इतक्या अतोनात समृद्ध आहेत की जगातील कोणत्याही भाषेतील कोणतेही शब्द वा उच्चार आपल्याला या दोन भाषांमध्ये करता येतात
हे चूक आहे. अनेक भाषांत अनेक उच्चार आहेत जे आत्ताच्या प्रमाण देवनागरी लिपीत लिहिता येत नाहीत. काही उच्चार मराठी किंवा संस्कृतमध्ये नाहीतच. यावर अनेकदा चर्चा झालेली आहे. मासला म्हणून - इंग्लिश get, gate, gait, gatt यांना देवनागरीत वेगवेगळे लिहता येत नाही. xhosa भाषेचे नाव सुद्धा जगातील बहुतांश लिप्यांमध्ये बिनचूक लिहिता येत नाही. प्रमाण मराठीत (आणि पर्यायाने त्या फ्लेवरच्या लिपीत) नुक्ता नाही म्हणून जरा (थोडेसे) आणि जरा (वार्धक्य) यांत फरक करता येत नाही. अशी अनेक उदाहरणे आहेत.

अभय नातू १४:०८, २४ मे २०११ (UTC)


उ, ऊ वगैरे.

संपादन

>स्वरांसाठी एकच रोमन स्वर निवडावा - उ = u, ऊ = uu; इ=i, ई=ii; आ=aa<<

मला जर उउ, इइ किंवा अ‍अ लिहायचे असेल तर कसे लिहायचे?

>>अनुस्वार वेगळा स्पष्ट करावा, त्यासाठी योग्य तोच अनुनासिक वर्ण वापरावा - कंस = ka.nsa; पंप = pa.mp<<

कंक, चिंच रोमन लिपीत कसे लिहायचे? kaŋk आणि chiɲch ?त्यासाठी लागणारी ŋ आणि ɲ ही अक्षरे कुठून आणायची? ...J ०९:५१, ३० मे २०११ (UTC)

अभय, तुम्ही सांगितलेले 'मराठी भाषेतून रोमन लिपीत लिहिण्यासाठी कन्व्हेन्शन' आवडले. प्रश्न हाच आहे की असे कन्व्हेन्शन 'सर्वमान्य' असायला हवेत. म्हणजेच ते सर्वांनी वापरायला हवेत. जसे, कमळ हे इंग्रजीतून लिहिताना 'kamaL' असा लिहिला तर समजायला सोपा जातो. मराठी विकिपीडिया तर्फे काही करू शकतो का? माहितगार म्हणतात तसे हिंदीत 'ळ' लिहिता येईल का? हिंदी पाठ्यपुस्तकात तसा बदल करता येऊ शकतो का? हिंदीत/ इंग्रजीत 'ळ'आणि 'ण' उच्चार करण्यासाठी काय करावे लागेल? 'टिळक' हे उदाहरण सोडून दिले तरी असे अनंत शब्द आहेत की ज्याचे सर्व भाषांमध्ये सुयोग्य उच्चारण व्हायला हवे.

जरा (थोडेसे) आणि जरा (वार्धक्य) यांत फरक कसा करायचा याचाही विचार व्हायला हवा कारण मराठी न जाणणाऱ्या मंडळींना त्याचा खूपच त्रास होतो. हा प्रश्न मराठीतील च, ज, झ या तीनही अक्षरांसाठी येतो.

मंदार कुलकर्णी , २९ मे २०११ (UTC)

च आणि च़, ज आणि ज़, झ आणि झ़, फ आणि फ़ ही अक्षरे नुक्ता देऊन वेगवेगळी लिहिता येतात. मराठीच्या चांगल्या उच्चारकोशांत असे लिहिलेले सापडावे. युनिकोड देवनागरीत मराठ्येतर लिप्यांना आवश्यक अशी य़, ऴ आणि ऱ ही अक्षरे आहेत, नाहीत ती फक्त अ‍ॅ, च़ आणि झ़.,,J ०९:५१, ३० मे २०११ (UTC)


>>>मराठी विकिपीडिया तर्फे काही करू शकतो का? <<< मंदार, मराठी विकिपीडियावर विकिपीडिया:Marathi language support tools असे एक प्रकल्प पान आहे ,त्याचा उद्देश Lingustic Resources for Non Marathi and People with Marathi as Second language असा आहे .दुसरे विकिमीडिया कॉमन्सच्या माध्यमातून प्रत्येक अक्षर आणि शब्दाच्या उच्चारणांच्या ऑडीओ फाईल्स चढवून त्या विक्शनरीतील शब्द लेखांना जोडता येतील.
जसे इंग्रजी आणि इतर श्रीमंत देशातील बर्‍याच भाषात लिखीत मजकूर सॉफ्टवेअरच्या सहाय्याने वाचूनदाखवण्याची सुविधा आजकाल उपलब्ध असते (मुख्यत्वे अंधव्यक्तींच्या दॄष्टीने तसेच अलिकडे दुरध्वनीवरून आणि इतर अनाऊन्समेंटच्या क्षेत्रात यास सोयीचे समजले जाते) अशा सुविधेचा विकासाची तांत्रीक पायरी मराठी भाषेने चढावयास हवी.अशी सुविधा भविष्यात उपलब्ध झाल्यास मराठी विकिपीडियाने गरजे नुसार सहयोग द्यावा पण तांत्रीक संशोधन आणि विकास मराठी विकिपीडियाच्या परिघात येणार नाही.
माहितगार २१:४१, २९ मे २०११ (UTC)


रोमन लिपीत देवनागरी अक्षरे(उच्चार) कशी लिहावीत या संदर्भात en:Devanagari_transliteration आणि en:International Phonetic Alphabet हे लेख पहावेत त्या शिवाय अशा प्रणाली अस्तीत्वात असल्याची कल्पना नसल्यामुळे मध्यंतरी कुणी गोगटे नावाचे गृहस्थही या विषयात स्वतःची काही पद्धती प्रचलीत करण्याच्या प्रयत्नात होते असे आठवते.

गोगटे

संपादन

गोगटे नावाचे गृहस्थही या विषयात स्वतःची काही पद्धती प्रचलित करण्याच्या प्रयत्नात होते असे आठवते.

संपादन

अशा प्रणाली अस्तित्वात असल्याची कल्पना नसल्यामुळे गोगटे प्रयत्न करत आहेत? श्री. म.ना.गोगटे गेली सुमारे ३० वर्षे रोमन मराठीचा प्रसार करीत आहेत. त्यांचे संकेतस्थळ www.mngogate,com हे आहे. ते आज अनेक वर्षे या विषयावर व्याख्याने देतात, लेख लिहितात आणि दर महिन्याला रोमनलिपीतले एक मराठी पत्र सभासदांना पाठवतात, ....J ०९:५१, ३० मे २०११ (UTC)


या वाक्याबद्दल क्षमा असावी पण; हिंदीत ळ कसा लिहिता येईल याचे उत्तर अत्यंत सोपे आहे ते ळ हे अक्षर ळ असे लिहावे कारण ळ हे अक्षर देवनागरीच आहे आणि हिंदी भाषा देवनागरी लिपीतच लिहिली जाते. देवनागरीत ळ आहे कि नाही असा प्रश्न नाही ळ आणि ण हे उच्चारण हिंदी भाषी करत नाहीत आणि ज्ञ चे उच्चारण ग्य असे करतात.बरेच उत्तर आणि पूर्व भारतीय लोक वचे उच्चारण ब असे करतात पण तीच मंडळी संस्कृत वापरताना उच्चारणे शुद्ध स्वरूपातच करताना आढळतात.
टिळक या विशीष्ट शब्दातील ळच्या उच्चारणा बद्दल म्हणावयाचे झाले तर "तीलक" या मूळ शब्दातील त चा ट करणे आणि ल चा ळ करणे हा गुन्हा मराठी भाषीकांचा आहे. हिंदी लोकांनी त्याचे 'तीलक' केले तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही केवळ तुमच्या स्वतःच्या सवयीमुळे टिळक हे उच्चारण तुम्हाला अधिक बरोबर वाटते एवढेच माहितगार १८:३४, २४ मे २०११ (UTC)

गुन्हा मराठीभाषकांचा नाही

संपादन

भारतातलेच नाही तर जगातले सर्व भाषा बोलणारे लोक मराठी नावे इंग्रजीतून वाचतात. आपणही बंगाली, तामीळ, फ़्रेन्च वगैरे नावे इंग्रजीतून वाचतो आणि तसाच उच्चार करतो. इंग्रजी ही बहुधा एकमेव सर्वात लोकप्रिय अशी जागतिक भाषा आहे, त्यामुळे असे होणारच. टिळक हे इंग्रजीत Tilak असेच लिहिले जाणार साहजिकच त्याचा उच्चार आणि त्याचे लिखाण अन्यभाषक तिलक असेच करणार. (तीलक असे लिखाण मी अजून पाहिले नाही, जर असेलच तर तसा शब्द त्यांच्या भाषेत असावा!) शुभलक्ष्मीचे चे स्पेलिंग Subbalaxmi होते म्हणून आपण शुभलक्ष्मींना सुब्बलक्ष्मी म्हणतो. तमीळमध्ये स-श ब-भ हा भेद नाही त्याला इंग्रजांनी काय करावे? गोवे या राज्याला आपण गोवा म्हणतो, कारण इंग्रजी स्पेलिंग Goa हे आहे. त्यामुळे हिंदीत तिलक म्हणतात त्याला विरोध करायचे कारण नाही. आपणही त्यांची शुक्ल, मिश्र, गोविंद(हिंदी चित्रपट-अभिनेता) यांना शुक्ला, मिश्रा, गोविंदा म्हणून ओळखतो, जया भादुड़ीला जया भादुरी म्हणतो. कारण मूळ नावातल्या ड़ी चे स्पेलिंग री होते हे आपल्याला माहीतच नसते...J १०:२०, ३० मे २०११ (UTC)

शब्द हवा!

संपादन
  • Defence Intelligence Agency (India) -
  • Directorate of Military Intelligence (India) - संरक्षण गुप्तचर निदेशालय
  • Intelligence Bureau (India) -
  • Research and Analysis Wing -
  • National Security Council (India) - राष्ट्रीय सुरक्षा समिती (भारत)
  • National Investigation Agency (India) -
  • Internal security -
  • External intelligence -
  • Defence intelligence -
  • Economic intelligence -
  • Directorate of Naval Intelligence (India) - आरमारी गुप्तचर निदेशालय. येथे Intelligence हा शब्द बुद्धिमत्ता अर्थाने वापरलेला नसून हेरगिरी संबंधित अर्थाने वापरलेला आहे.
  • Central Economic Intelligence Bureau - केन्द्रीय वाणिज्य गुप्तचर संस्था

नागरिकशास्त्राचे लेख छोटे किंवा मोकळे?

संपादन

नागरिकशास्त्राचे लेख छोटे किंवा मोकळे आहेत. त्यातील राष्ट्रपती, विधानमंडळ, विधेयक, पंचायत राज, खासदार, इत्यादी पाने छोटी का आहेत.

लेख संख्या वाढण्या बरोबर यावर सदस्यांनी लक्ष केंद्रित करावे.

Dr.sachin23 १५:५९, २६ मे २०११ (UTC)

दहावी बारावीचे निकाल आणि मराठी विकिपीडिया

संपादन
तसे पहाता दहावी बारावीच्या निकालाचा आणि मराठी विकिपीडियाच्या प्रगतीचा संबंध नाही तरी पण मराठी विकिपीडियाचे सध्याचे नोकरदार संपादक संख्येकडून तरूण विद्दार्थीवर्गाकडे संख्याबळ वाढण्याच्या दृष्टीने विश्लेषण करावयाचे झाल्यास दहावी बारावीच्या निकालाची सांख्यिकी उद्बोधक ठरू शकते माहितगार १८:४१, २८ मे २०११ (UTC)

मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या

संपादन

मोक्षगुंडम विश्वेश्वरय्यामोक्षगुंडम विश्वेश्वरैया हे दोन लेख एकत्र करण्याबाबत विचार व्हावा.-- . Shlok talk . ०४:०४, ३१ मे २०११ (UTC)

Template:Taxobox

संपादन

Template:Taxobox [२] मराठीत आणता येइल का? -- . Shlok talk . १३:५७, ३१ मे २०११ (UTC)

त्या माहितीचौकटीसारखा एक साचा आपल्याकडेही आहे - साचा:जीवचौकट. या साच्यात कदाचित काही दुरुस्ती करावी/भर टाकावी लागेल.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:२९, ३१ मे २०११ (UTC)

गायक माहिती चौकट आणि भारतीय शास्त्रीय गायक

संपादन

"गायक माहिती चौकट" आणि "भारतीय शास्त्रीय गायक" या चौकटी खूपच छोटी/त्रोटक आहेत असे वाटते. "माहितीचौकट व्यक्ती"सारखी मोठी करण्यास मदत हवी आहे. तसेच पार्श्वगायिका नावाची चौकट हवी आहे.

धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव: मंदार कुलकर्णी
मंदार कुलकर्णी १६:३९, २ जून २०११ (UTC)
माहितीचे कोणते रकाने वाढवून हवे आहेत किंवा काय सुधारणा अपेक्षित आहेत, त्याविषयी संबंधित चर्चापानांवर संदेश लिहावेत. मी येत्या वीकेंडाला 'साचा:माहितीचौकट गायक' या सर्वसाधारण साच्यावर काम करायचा प्रयत्न करेन.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:४७, २ जून २०११ (UTC)


गोडवा हवा

संपादन

भाषांतर करत असताना मी इंग्रजी suggestion ह्या शब्दाचे मराठीत अनुवाद करताना थोड आडखळलो. तसे सजेशन हा विनंती वजा प्रकारात मोडावा असे मला वाटते. पण मराठीत आपल्या कडे असलेल्या "सुचवणे... सूचना" हा थोडासा आधिकारिक स्वरूपाचा शब्द आहे तो इंग्रजी Notice च्या जवळ जातो (उदा. suggestion committee सूचना समिति). दुसरा पारिभाषिक शब्द "प्रस्ताव" आहे पण तो ही खूप औपचारिक वाटतो आणि इंग्रजी Propose च्या जवळ जातो. suggest ला जसा हिंदी मध्ये "सुझाव " हा मधुर शब्द आहे तसा मराठीत कोणता शब्द वापरावा जो मधुर, नम्र, सोपा आणि जवळीक साधणारा असेल ?

धन्यवाद

राहुल देशमुख ०३:२६, ३ जून २०११ (UTC)

सूचना शब्दा अलिकडे कंसात गोड शब्द लिहून पहावा :) , सुचवणी हा शब्द नम्र वाटतो किंवा कसे ? बाकी शुद्धीकरणगटात नसलेली भाषातज्ज्ञ मंडळी अर्थछटा उपलब्ध नसल्यास परभाषिय शब्द आपल्या भाषेत स्विकारावेत अशा मताची असल्याचे मी ऐकुन आहे.
जाता जाता सहज suggestion शब्दाची etymology[] पाहिली आणि कदाचित सूचना शब्द हा अधिक गोड का सजेशन असा प्रश्न पडला हे खरे !
माहितगार १७:१४, ४ जून २०११ (UTC)

सुचवणी

संपादन

शब्द स्त्रीलिंगी केला की तो गोड वाटतो. ‘सुचवणे’ऐवजी ‘सुचवणी’ म्हटले की ‘सुझाव’ची गोडी येईल. ‘सूचना’ स्त्रीलिंगी असला तरी कायद्याच्या भाषेतला असल्याने थोडासा कठोर आहे...59.95.3.28 ०८:०९, ६ जून २०११ (UTC)


साचा:माहितीचौकट क्षेपणास्त्र

संपादन

साचा:माहितीचौकट क्षेपणास्त्र हा साचा अग्नी, क्षेपणास्त्र या पानाला लावल्यानंतर अपेक्षित माहिती पटलावर येत नाही, उपाय सुचवा.

साचा:माहितीचौकट मध्ये समाजसेवक यावर काही साचा करुन मिळेल काय?

Dr.sachin23 १५:५६, ५ जून २०११ (UTC)

अपेक्षित माहिती म्हणजे काय अपेक्षित आहे? माहिती त्या साच्यात भरल्यावर दिसायला हवी. समाजसेवक साठी तुम्हाला हव्या असलेल्या साच्यासदृष साचा शोधा आणि त्यातील माहिती हवी तशी बदलून घ्या. बदललेला साचा नवीन नावाने सेव्ह करा. निनाद ०१:१९, ९ जून २०११ (UTC)
असा प्रयत्न साचा:माहितीचौकट समाजसेवक येथे केला आहे. हा साचा लेखक साच्यावरून घेतला आहे. त्यामुळे यात अजून समाजसेवा विषयातील माहिती असायला हवी असे वाटते. कळावे निनाद ०१:२८, ९ जून २०११ (UTC)
  • त्या साच्यात भरलेले चित्र, चाचणी दिनांक, पल्ला, मार्गदर्शक यंत्रणा, उड्डाण यंत्रणा या लेखात माहिती पटलावर उमटत नाहीत. साच्यातील बदल मला अवगत नाहीत म्हणून मी मदत मागवली होती. सचिन


साचे हा बहुतेक लेखांचा  अनिवार्य भाग होत चालला आहे. आपणास विषयानरुप वेगवेगळे साचे नेहमीच लागत असतात किंवा असलेल्या साच्यान  मध्ये काही जुजबी बदल करावे लागतात.
   साचे बनवनण्याचे/ बदलवण्याचे मर्गदर्शक (ट्युटर) जर आपण विपी वर उपलब्ध करून दिलेत तर असंख्य विपी संपादक  त्याचा लाभ घेऊ शकतील. 

राहुल देशमुख ०५:१२, ९ जून २०११ (UTC)

साचा:माहितीचौकट व्यक्ती हा साचा बराचसा अष्टपैलू साचा आहे. त्यामुळे समाजसेवकांवरील लेखांत त्याचा वापर करून काम भागत असेल, तर बघा. नाहीतर विशिष्ट चळवळ उभारणार्‍या व्यक्तींसाठी साचा:माहितीचौकट चळवळ चरित्र देखील आहे. तोही उपयोगी पडत आहे का, ते तपासावे. याहून काही वेगळ्या आवश्यकता असतील, तर त्यानुसार सध्याच्या साच्यांत बदल करता येतील किंवा नवीन साचा बनवता येईल. (हे लिहिण्यामागे प्रयोजन असे, की विद्यमान साच्यांमध्ये काम भागत असल्यास, वेगळे साचे बनवण्याचे व त्यांची देखभाल करण्याचे कष्ट वाचतील.)
राहुल, तुमची सूचना चांगली आहे. साचे बनवणे किंवा तत्सम अनेक विषयांवर सहाय्य पाने बनवणे हे उद्दिष्ट डोळ्यांपुढे आहेच; आणि तशी सहाय्य पाने बनवण्याबद्दल काही संपादक अधूनमधून काम करतच असतात. पण आपण जेवढे काही मोजके लोक नियमित येतो, त्यांना पुरून उरतील, एवढी कामे शिल्लक आहेत. किम्बहुना काही वेळा असलेल्या संपादकांवर ताण येण्याइतपत कामे व बॅकलॉग शिल्लक आहे. त्यामुळे वास्तविक पातळीवर हे काम मंदगतीने चालणार हे उघड आहे.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०६:२४, ९ जून २०११ (UTC)


लेखाविषयी अधिक माहिती

संपादन

इंग्रजी विकिपीडिया मध्ये "View History " या पानावर खालील माहिती उपलब्ध आहे

For any version listed below, click on its date to view it. For more help, see Help:Page history and Help:Edit summary. External tools: Revision history statistics · Contributors · Revision history search · Number of watchers · Page view statistics

तशी मराठी वर पण आणता येईल का? यातील "Revision history statistics " आणि "Page view statistics " हे तर फारच छान आणि उपयोगी आहे.

धन्यवाद!
मंदार कुलकर्णी १४:२२, ६ जून २०११ (UTC)

विकिपत्रिका जून, इ.स. २०११

संपादन

नमस्कार मंडळी!

विकिमीडिया इंडिया अध्यायाच्या वृत्तपत्रिकेचा - अर्थात विकिपत्रिकेचा - जून, इ.स. २०११मधील अंक प्रकाशित झाला आहे. संपूर्ण अंक ऑनलाइन उपलब्ध येथे उपलब्ध आहे : http://wiki.wikimedia.in/WikiPatrika

अन्य भारतीय भाषांमध्ईल विकिपीडिया, विक्शनरी, विकिस्रोत वगैरे प्रकल्पांवर काय काय घडामोडी घडत आहेत, आपापल्या भाषांमधील विकिउपक्रम वाढीस लागण्यासाठी कार्यशाळा, विकिअकादम्या इत्यादी उपक्रम अन्य विकिसमुदाय असे आयोजित करत आहेत, यांबद्दल (विचार करण्याजोगे) वार्तांकन या ताज्या अंकात आहे.

या अंकातील मुद्द्यांच्या/बातम्यांच्या अनुषंगाने मराठी विकिपीडियावर चर्चा घडावी, अशी आशा आहे.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:३३, ९ जून २०११ (UTC)


संकल्प धन्यवाद ..!

विकिपत्रिकेचा आढावा घेतला असता प्रथम दर्शनी असे निदर्शनास येते की बरेचशे उपक्रम हे संघटनात्मक धर्तीचे आहेत. मराठी विपी संघटनात्मक पातळीवर कितपत व कोठे आकारास येत आहे हे जर समजले तर विधायक कार्यासाठी त्यांना योग्य दिशादेणे बाबत योजना आखता येतील.

ज्याप्रमाणे गावा गावात LUG (Linux User Group) आणि JUG (Java User Group) तयार झाले आहेत त्याच धर्तीवर मराठी विपीचे पण गट तयार व्हावेत. विपी गटाला ज्यास्त मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळू शकतो कारण जावा अथवा लिनक्स प्रमणे हा गट केवळ तांत्रिक क्षेत्राशी निगडीत व्यक्तीन पुरताच मर्यादित नराहता तो जनसामान्याचा होऊ शकतो.

ह्यासंबंधी घटनात्मक रूपरेषा तयार असेलच, नसेल तर इतर विपी कडून ती घेउन त्यात योग्य ते बदल करून आपण मराठी विपी वरून व इतरही प्रसार माधमातून आवाहन केले तर चांगला प्रतिसाद मिळेल असे वाटते. मराठी विपी वरील इतरही जेष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी आपले विचार व अनुभव मांडून ह्या कार्यास दिशा देण्यास मदत करतीलच.

राहुल देशमुख ०४:३५, १० जून २०११ (UTC)

संकलन

संपादन

हे पान आता बरेच मोठे झाले आहे व नित्याप्रमाणे यातील मजकूर उपपानावर हलविला जाईल. गेल्या काही आठवड्यात येथे बरीच चांगली माहिती, सूचना, इ. गोळा झाल्या आहेत त्या उपपानांत हरवून जाऊ नये म्हणून त्याचे संकलन करावे व त्या पानाचा दुवा येथे द्यावा असे वाटते. तरी या कामासाठी उमेदवार पाहिजेत.

अभय नातू १५:०२, १० जून २०११ (UTC)

मी तयार आहे.....

मंदार कुलकर्णी १५:५०, १० जून २०११ (UTC)

मग सुरू...१..२...साडे..माडे.. :-)
हे करण्यासाठी -
१. वरील मजकूरातून ज्या मुद्द्यांवरील चर्चा अर्धवट वाटते त्याची यादी करावी
२. तेथील सुसंबद्ध मजकूर गोळा करुन विकिपीडिया:चावडी/चालू चर्चा १ येथे घालावा
३. येथे जुन्या पण चालू चर्चा (किंवा तत्सम) विभाग करुन त्यात वरील प्रत्येक विभागाबद्दल उपविभाग घालावा.
४. या प्रत्येक उपविभागात एका वाक्यात त्या चर्चाविषयाची मांडणी करुन नवीन पानाचा दुवा, उदा. विकिपीडिया:चावडी/चालू चर्चा १#विषय १ द्यावा.
५. हा विभाग सोडून या पानावरील इतर मजकूर संग्रहित करावा.
अभय नातू १६:१८, १० जून २०११ (UTC)
मी काय केले ...
चावडी वरील सर्व मजकूर विकिपीडिया:चावडी/चालू चर्चा १ च्या चर्चा विभागात कॉपी केला.
विकिपीडिया:चावडी/चालू चर्चा १ तयार करून योग्य वाटणाऱ्या अपूर्ण चर्चा त्यात घातल्या.
शक्य तेवढे योग्य दुवे देण्याचा प्रयत्न केला.

माझे काम किती योग्य वा अयोग्य हे तुम्ही पाहून राहिलेले बदल करावे हि विनंती. त्यानंतर "चावडी" वरील मजकूर वगळावा...मंदार कुलकर्णी ०५:५९, १२ जून २०११ (UTC)

अभय, मी काम योग्य केले कि नाही का तुम्ही परत तेच काम केले हे मला कळेल काय?......मंदार कुलकर्णी ०६:२४, २४ जून २०११ (UTC)

मुखपृष्ठ

संपादन
आता तरी मुखपृष्ठातील सदरे बदलावी असे कोणाला वाटत नाही काय?
किंवा सदरास योग्य असे लेख नाहीत असी बाब आहे का? असे असेल तर काहीजणांनी त्या दृष्टीने काही लेख व्यवस्थित तयार करावेत, काही लेख उदयोन्मुख अवस्थेत आणावे/ठेवावे... जून संपायला अजूनतरी आठवड्याहून अधिक दिवस आहेत... ह्या काळात एखादा लेख विकसित केल्यास जुलैच्या सदरात टाकता येईल.
आणि भविष्यात ह्या दृष्टीने प्रत्येक महिन्यात कमीतकमी एखादा लेख चांगल्या तर्‍हेने लिहून तो मुखपृष्ठ सदरात टाकावा.....
आता appearance च्या बाबतीत मागे राहून चालणार नाही. आपण ३४,००० लेखसंख्या ओलांडली असताना २-३ महिने तेचतेच मुखपृष्ठ पाहून वाचकांस काय वाटेल? कोणासही स्पर्धेत अथवा काळाच्या रेट्यात टिकायचे असेल तर प्रत्येक गोष्टींत अद्यावत रहायले पाहिजे. प्रक्रिया चालूच ठेवली पाहिजे. थांबला तो संपला म्हणण्याचा प्रघातही आहे....
आपण लेख आदी बाबतींत प्रगती करत असलो तरी एखाद्या गोष्टींचे काम करत असताना त्या गोष्टीसंबंधित एखादा बुरुज ढासळला की एकामागोमाग सगळा डालोरा कोसळतो..... माझ्या मते मुखपृष्ठांच्या सदराच्या बाबतीत ही वेळ आली आहे.... वेळीच डागडुजी व्हायला हवी....
(अर्थात सगळ्याच बाबी सांभाळणे अवघड आहे परंतु त्यास पर्याय नाही....)
ह्या दृष्टीने एखादा लेखाचे प्रगल्भीकरण करण्यास सुरू केले तर अधिक उत्तम!
अनिरुद्ध परांजपे १६:५१, २१ जून २०११ (UTC)

मुखपृष्ठ सदर

संपादन

अनिरुद्ध,

मुखपृष्ठ सदर हे दर महिन्याला बदलले जावे अशी अपेक्षा आहे परंतु त्यासाठी योग्य लेख मिळणे अवघड होते. तुम्ही म्हणल्याप्रमाणे appearance महत्वाचा आहेच. त्यासाठी मुखपृष्ठ बदलत राहणे हा मोठा उपाय आहे परंतु मुखपृष्ठावर गचाळ लेखन असण्यापेक्षा मुखपृष्ठ न बदलेले बरे. तुम्ही म्हणता त्यातील जवळजवळ सगळ्या उपाय केले गेलेले आहेत. विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन येथे आपल्याला चांगले वाटणारे लेख नामनिर्देशित केले जातात. पैकी सगळे मिळून एखाद्यावर काम करुन त्यातील शुद्धलेखन, व्याकरण सुधारतात आणि माहितीत भर घालतात. त्यानंतरच्या महिन्याच्या सुरुवातीस तो लेख सदर केला जातो. याशिवाय विकिपीडिया:उदयोन्मुख लेख नामनिर्देशन येथे छोट्या लेखांना बाळसे आणण्याचा प्रयत्न केला जातो. असे अनेक उपाय/प्रयत्न केले गेलेले आहेत. याबद्दल मूठभर लेखक सोडता उदासीनताच दिसून येते. आशा आहे यात फरक पडेल आणि मराठी विकिपीडिया अधिक vibrant होण्यास सुरुवात होईल.

तुमच्या कल्पना येथे मांडालच.

अभय नातू १७:०५, २१ जून २०११ (UTC)

>>याबद्दल मूठभर लेखक सोडता उदासीनताच दिसून येते.
ही तर चिंताजनक बाब आहे.... कार्यरत सदस्यसंख्या पाहिल्यावर आपले म्हणणे पटते... पण तरीही.... अपरिहार्य गोष्टींना तोंड दिले पाहिजे (आणि हेच महत्त्वाचेच आहे!) असे आपली संस्कृतीत ऋषी-मुनींपासून अनेक साधू-संत-फकिरांनी सांगितलेले आहेच.... एकाने जर एखाद्या गोष्टीचा संकल्प सोडल्यास हळूहळू अनेक लोक सामील होतात... हिंदू धर्माच्या पुनर्जीवनासाठी कोणीतरी प्रयत्न केल्याचे आठवते, आणि लोकांचा उदासीनतेमुळे त्यांनी आत्मबलिदान केले. पुढे शंकराचार्यांनी हे काम सिद्धीस नेले आणि आज त्या बलिदानाच्या स्मृतीनिमित्ताने कुंभमेळा चालू आहे... परत आफ्रिकेत कोणीतरी अदिवासी जमातीतील एक मुलगा एका कागदाच्या कपटावर अमेरिकेचे नाव वाचतो काय, तिथे जाण्याचा हट्ट धरतो काय, मग अनेक जणांनी देणग्या दिल्या मग अमेरिकेत जाउन शिकून प्रसिद्ध पावला. गांधींच्या दांडी यात्रेचे उदाहरण आहे. तुम्ही म्हणता तशी आशा आहेच.. पण तरीही... प्रयत्न तोकडे पडत असले तरी चालूच ठेवावे... एखादा लेख प्रगल्भीत करायला तर १ महिन्याचा अवधी असतोच! म्हणून मी म्हटले ५ जण मिळून आणि इतर जण सूचना करून हातभार लावू शकतील...........
अनिरुद्ध परांजपे १७:२४, २१ जून २०११ (UTC)
तुम्ही दिलेल्या वरील उदाहरणांत मराठी विकिपीडियाचे नाव शामिल करायलाच पाहिजे. अनेक वर्षे ५-७ लेखकांनी उचलून धरलेल्या या निशाणाभोवती आता शिबंदी जमू लागली आहे. या मांदियाळीची दिंडी होण्यास अजून वेळ आहे पण केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे याचे मराठी विकिपीडिया म्हणजे मूर्तिमंत उदाहरण आहे यात शंका नाही. असाच चिवटपणा धरून वाटचाल करुयात आणि मराठी विकिपीडियाला आणि पर्यायाने मराठी भाषेला तिचे मानाचे स्थान मिळवून देउयात.
अभय नातू १७:३४, २१ जून २०११ (UTC)
  1. ^ http://www.google.com.ng/search?hl=en&client=firefox-a&hs=ppN&rls=org.mozilla:en-US:official&q=agnostic&tbs=dfn:1&tbo=u&sa=X&ei=2nDoTYyMDsaLhQfI15i3AQ&ved=0CBcQkQ4&biw=1366&bih=629
  2. ^ http://www.cfilt.iitb.ac.in/wordnet/webmwn/wn.php
  3. ^ http://www.cfilt.iitb.ac.in/wordnet/webmwn/wn.php
  4. ^ http://www.etymonline.com/index.php?term=suggestion