विकिपीडिया:विकिमीडिया इंडिया वृत्तपत्रिका/इ.स. २०११, जून

विकिमीडिया इंडिया ( (इंग्लिश भाषेत) http://wiki.wikimedia.in/wiki/Main_Page. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)) हा विकिमीडिया प्रतिष्ठानाचा भारतातील अधिकृत अध्याय आहे. भारतीय भाषांतील विकिपीडियांच्या वाढीसाठी व त्या त्या भाषक समाजांमध्ये प्रसार करण्यासाठी लोकाभिमुख उपक्रम आखणे व विविध भारतीय भाषांतील विकिमीडिया प्रकल्पांमध्ये (विकिपीडिया, विक्शनर्‍या, विकिक्वोट्स, विकिस्रोत, विकिपुस्तक इत्यादी) समन्वय व सहकार्य वृद्धिंगत करणे ही विकिमीडिया इंडिया अध्यायाची प्रमुख उद्दिष्टे आहेत. या उपक्रमांचा भाग म्हणून गेल्या वर्षअखेरीपासून विकिमीडिया इंडिया अध्यायाने षण्मासिक वृत्तपत्रिकेचा (न्यूजलेटराचा) उपक्रम राबवणे आरंभले आहे. सप्टेंबर, इ.स. २०१०मध्ये विकिमीडिया इंडिया वृत्तपत्रिकेचा पहिला अंक प्रकाशित प्रकाशित झाला ( (PDF) (इंग्लिश भाषेत) http://commons.wikimedia.org/wiki/File:Wikimedia_India_Community_Newsletter_2010_September.pdf. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)). तिचा पुढील अंक, म्हणजे जून, इ.स. २०११मध्ये प्रकाशित करायचा अंक, लिहिण्यासाठी प्रत्येक भारतीय भाषेतील विकिपीडियावरील समुदायाने गेल्या सहा-सात महिन्यांतील (सप्टेंबर, इ.स. २०१०पासून आजवर) महत्त्वाच्या घडामोडींबद्दल वार्तांकन करायचे आहे. किंबहुना विकिपीडियासोबत त्या त्या भाषेतील विक्शनरी, विकिस्रोत इत्यादी अन्य सहप्रकल्पांवरील घडामोडींचे वार्तांकनही गोळा करायचे आहे. मराठी भाषेतील विकिपीडिया, विक्शनरी, विकिक्वोट्स इत्यादी प्रकल्पांवरील गेल्या सहा महिन्यांतील घडामोडींबद्दल माहिती गोळा करण्यासाठी हे पान बनवण्यात आले आहे. सर्व मराठी विकिपीडियनांना या कामी आपले योगदान करावे.

वार्तांकनासाठी माहिती गोळा करून या पानावर नोंदवण्याची अंतिम मुदत रविवार, २२ मे, इ.स. २०११ दिवसअखेरपर्यंत आहे. विकिमीडिया इंडिया वृत्तपत्रिका इंग्लिश भाषेत प्रकाशित होत असल्यामुळे, या पानावरील वार्तांकनाचा/ आढाव्याचा इंग्लिश अनुवाद करून तो विकिपीडिया:विकिमीडिया इंडिया वृत्तपत्रिका/इ.स. २०११, जून/en या पानावर सोमवार, २३ मे, इ.स. २०११ दिवसअखेरपर्यंत प्रकाशित करायचा आहे. तेथून मग तो वृत्तपत्रिकेच्या स्वयंसेवक संपादकांद्वारे येथे संकलित करून अंतिम प्रकाशनास जाईल.

वार्तांकनासाठी खालील उपविभागांमध्ये संबंधित माहिती लिहावी :

सर्वसाधारण वार्तांकन

संपादन

<< माहिती भरायची आहे >>

मराठी विकिपीडियाबद्दल वार्तांकन

संपादन
  • २३ डिसेंबर, इ.स. २०१० रोजी मराठी विकिपीडियाने ३२,००० लेखसंख्येचा आकडा ओलांडला. मराठी विकिपीडियाने ३३,३३३ लेखसंख्येचा टप्पा २४ एप्रिल, इ.स. २०११ रोजी गाठला.
  • २७ फेब्रुवारी रोजी प्रतिवर्षी पाळल्या जाणार्‍या मराठी भाषा दिनानिमित्ताने या वर्षी २६ फेब्रुवारी व २७ फेब्रुवारी, इ.स. २०११ रोजी मराठी विकिपीडियाने पहिली संपादनेथॉन आयोजित केली. दोन दिवस चाललेल्या या संपादनेथॉनेत सुमारे १४००+ संपादने झाली. त्याआधीच्या प्रतिदिन ५०० संपादनांच्या सरासरीपेक्षा या दोन दिवसांत सुमारे १.५पट वाढ दिसून आली. संपादनेथॉनेमुळे मराठी विकिपीडियावरील सक्रिय सदस्यसंख्येत वाढ झाली व परस्पर-सहयोगाने लेखांची आशयसमृद्धी वाढवण्याच्या प्रक्रियेस चालना मिळाली.
  • गेल्या दोन महिन्यांत अनेक जुन्या तसेच नवीन विषयांवर लेखन सुरू आहे. यात महाराष्ट्रातील किल्ले, हिंदुस्तानी संगीत, मराठी नाट्यसंगीत, फॉर्म्युला वन हंगाम, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, इ. अनेकविध विषयांवर नेटाने लेखन चालू आहे.
  • लेखसंख्येबरोबरच मुद्दामहून आशयघनता वाढवण्याचा प्रयत्न नेहमीप्रमाणे चालू आहे.
  • सदस्यांतील परस्परसंवाद वाढीस लागला आहे.

मराठी विक्शनरीबद्दल वार्तांकन

संपादन

<< माहिती भरायची आहे >>

मराठी विकिक्वोट्स प्रकल्पाबद्दल वार्तांकन

संपादन

<< माहिती भरायची आहे >>

मराठी विकिस्रोत प्रकल्पाबद्दल वार्तांकन

संपादन

<< माहिती भरायची आहे >>


हेही पाहा

संपादन

अन्य विकिपीडिया समुदायांनी गोळा केलेली माहिती