मराठी भाषा दिन

१ मे महाराष्ट्र राज्य स्थापना दिवसाबरोबरच मराठी राज भाषा दिवस

मराठी राजभाषा दिन किंवा मराठी भाषा दिन हा 1 मे रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, आणि मराठी भाषिकांचे राज्य अस्तित्वात आल्यामुळे हा १ मे रोजी 'मराठी राजभाषा दिन' म्हणून सन १९६५ पासून अधिकृतपणे साजरा केला जातो.[]

अनेक वेळा सर्व सामान्य माणसा कडून 'मराठी राजभाषा दिवस' आणि 'मराठी भाषा गौरव दिन' याची गफलत केली जाते. मराठी राजभाषा दिवस आणि भाषागौरव‌ दिवस हे दोन्ही दिवस भिन्न स्वरुपाचे आहे.

'महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४' नुसार "महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा मराठी असेल" असे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी घोषित केले.[] महाराष्ट्र स्थापनेवेळी राज्यकारभार इंग्रजी भाषेतून चालत होते. मराठीला राजभाषेचा दर्जा राज्य स्थापने वेळी नव्हता. तत्कालीन वसंंतराव नाईक सरकारने मराठी राजभाषा अधिनियम पारित करून पुढे मराठी भाषा संवर्धनासाठी भरीव उपक्रम हाती घेतले. राज्यात ठिकठिकाणी मराठी भाषा शिकविण्यासाठी प्रशिक्षण वर्ग उघडण्यात आली. मराठी भाषेचा सर्वांगाने परिचय करून देण्यासाठी “राज्यभाषा परिचय” हे पुस्तक तयार केले गेले. मराठी भाषेचा राज्यातील शासन व्यवहारात वापर करण्याचे धोरण राबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार भाषा संचालनालय स्थापन झाले. १ मे मराठी भाषा दिनाला जागतिक मराठी भाषा दिन असेही म्हणतात.

मराठी भाषा गौरव दिन

संपादन

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी कवी कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण असल्याने त्यांना अभिवादन म्हणून २१ जानेवारी २०१३ रोजी महाराष्ट्र शासनाने त्यांचा जन्मदिवस "२७ फेब्रुवारी" हा "मराठी भाषा गौरव दिन" म्हणून घोषित केला.[] मराठी राजभाषा दिन आणि मराठी भाषा गौरव दिन हे दोन्ही दिवस वेगवेगळे असून मराठी भाषेसंदर्भातील महत्त्वाचे आहेत.[]

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "esakal | मराठी राजभाषा, मराठी गौरव दिनाची गल्लत नको |". www.esakal.com. 2021-11-01 रोजी पाहिले.
  2. ^ "मराठी राजभाषा अधिनियम 1964" (PDF). directorate.marathi.gov.in. १ मार्च २०२१ रोजी पाहिले.
  3. ^ "मराठी भाषा गौरव दिन शासन निर्णय" (PDF). maharashtra.gov.in/. १ मार्च २०२१ रोजी पाहिले.
  4. ^ "esakal | मराठी राजभाषा, मराठी गौरव दिनाची गल्लत नको |". www.esakal.com. 2021-11-01 रोजी पाहिले.