विकिपीडिया:संपादनेथॉन/संपादनेथॉन १

२६ फेब्रुवारी (शनिवार) व २७ फेब्रुवारी (रविवार), इ.स. २०११ रोजी झालेल्या विकिपीडिया संपादनेथॉनेविषयीच्या माहितीच्या संकलनासाठी हे पान आहे.

वेळ व ठिकाण

संपादन

वेळ : शनिवार, २६ फेब्रुवारी, इ.स २०११ व रविवार, २७ फेब्रुवारी, इ.स. २०११ - स्थानिक कालविभागांनुसार पूर्ण दोन दिवस
ठिकाण : मराठी विकिपीडिया
औचित्य : मराठी भाषा दिवस

म्हणजे काय ?

संपादन

संपादनेथॉन हा विकिपीडियावरील सदस्यांनी ठराविक दिवशी सर्वसाधारण सहमती झालेल्या उद्दिष्टांसाठी नियोजित विषयांवर अथवा नियोजित आराखड्यांनुसार संपादनांची मॅरेथॉन राबवण्याचा उपक्रम असतो. २६ फेब्रुवारी (शनिवार) व २७ फेब्रुवारी (रविवार), इ.स. २०११ रोजी होणार्‍या संपादनेथॉनेत खाली नोंदवलेल्या रूपरेषांनुसार नियोजित उद्दिष्टांसाठी संपादने करणे अपेक्षित आहे (अर्थात तसे बंधन पाळता, मनपसंत विषयांवर अथवा व्यक्तिगत प्राधान्यांनुसार संपादने करण्यास कोणतीही आडकाठी नाही).

पूर्वतयारी

संपादन

या संपादनेथॉनेस विशेष पूर्वतयारीची आवश्यकता नाही. मराठी विकिपीडिया अ‍ॅक्सेस करू शकणार्‍या कोणत्याही संगणकावरून सदस्यांना या संपादनेथॉनेत सहभाग घेता येईल.

उद्दिष्टे

संपादन

या संपादनेथॉनेची प्रमुख उद्दिष्टे खालीलप्रमाणे :

  • मराठी विकिपीडियन सदस्यांनी एका दिवसात शक्य तितकी संपादने करायची व यातून एका दिवसात आपण मराठी विकिपीडियाच्या प्रगतीला आपल्या सर्व ताकदीनिशी शक्य तितका मोठ्ठा रेटा द्यायचा हे प्रमुख उद्दिष्ट आहे.
  • मराठी विकिपीडियनांनी पूर्ण ताकदीनिशी संपादनेथॉनेच्या कालावधीत केलेल्या संपादनांची संख्या व अन्य आकडेवारी मोजून मराठी विकिपीडियाच्या (सध्याच्या क्षमतेनुसार) कमाल कामगिरीचे मूल्यमापन करणे.
  • या संपादनेथॉनेच्या औचित्याने विविध ऑनलाइन (फेसबूक, ट्विटर, ब्लॉग/अनुदिनी, इ) व छापील माध्यमांमधून या कार्यक्रमाचे वार्तांकन घडवून आणून मराठी विकिपीडिया प्रकल्पाची जाहिरात करणे.

नियोजित रूपरेषा

संपादन

या संपादनेथॉनेत सदस्य खाली सुचवलेल्या आराखड्यानुसार संपादने करू शकतात (अर्थात तसे बंधन पाळता, मनपसंत विषयांवर अथवा व्यक्तिगत प्राधान्यांनुसार संपादने करण्यास कोणतीही आडकाठी नाही) :

  • अस्तित्वात असलेल्या लेखांमध्ये भर घालून त्यांना पुष्ट करणे
मराठी विकिपीडियावरील सगळ्यात छोटी पाने
सगळ्या विकिपीडियांवर अपेक्षित अशा १,००० लेखांची यादी - या लेखाचे भाषांतर हवे आहे. तसेच या यादीमधील लेखांपैकी मराठी विकिपीडियावर असलेल्या लेखांत भर घालून हवी आहे.
  • लेखांचे वर्गीकरण करणे, नवीन वर्ग बनवणे
पाहिजे असलेले वर्ग
  • लेखांमध्ये विकिमीडिया कॉमन्स येथून विषयाला सुसंगत चित्रे शोधून चिकटवणे
कॉमन्सचे मुख्य पान
  • किमान तीन-चार ओळींसह नवीन लेख बनवणे
सगळ्या विकिपीडियांवर अपेक्षित अशा १,००० लेखांची यादी - या लेखाचे भाषांतर हवे आहे. तसेच या यादीमधील लेखांपैकी मराठी विकिपीडियावर नसलेले लेख बनवून हवे आहेत.
  • शुद्धलेखन व व्याकरण दृष्ट्या लेख सुधारणे
व्याकरण, शुद्धलेखन, माहितीची अचूकता, इ. अनुसार बदल करण्याजोगे लेख
वसंतपंचमी या मराठी विकिपीडियावरील आद्य लेखात बदल करून हा लेख दर्शनीय बनवणे.
  • विकिपीडियाविषयी सहायक पाने (मदत, धोरणे, प्रकल्प, दालने इत्यादी) बनवणे

कार्यक्रमाची पूर्वप्रसिद्धी / जाहिरात

संपादन

या संपादनेथॉनेची पूर्वप्रसिद्धी / जाहिरात आपल्या मित्रमंडळींपर्यंत पोचवण्यासाठी आपण विकिपीडिया:संपादनेथॉन/संपादनेथॉन १/जाहिरातीचे ईमेल १ या पानावर दिलेल्या नमुना पत्राचा वापर करू शकता.

सहभाग

संपादन

संपादनेथॉनात सहभागी होऊ इच्छिणारे सदस्य त्यांच्या सहभागाची घोषणा करण्यासाठी येथे टोकन नोंदणी करू शकतात. अर्थात येथे नोंदणी करणे संपादनेथॉनातील सहभागासाठी अजिबात आवश्यक नाही. सहभागी सदस्यांना एकमेकांसोबत समन्वयाने काम करणे सुकर करणे, एवढाच या नोंदणीचा हेतू आहे.

सहभागी होणार

संपादन

उत्सुक, मात्र सहभागाची हमी नाही

संपादन
  • हिमांशु कुलकर्णी - शक्य झाल्यास नवीन पाने तयार करण्यास मदत.

मराठीतून लिहिता येत नाही, पण इतर मदत करु शकेन

संपादन

बिगर-मराठी विकिपीडियांवरील मित्रांनी येथे आपल्या प्रकल्पासह आपले नाव (उदा-इंग्लिश विकिपीडिया - en:User Talk:अमितआडनावे) लिहावे.

Can not read/write Marathi, but will offer technical/other help

संपादन

Add your User name, including your home project, e.g. en:User Talk:MyNameIsAnthonyGonsalves

  • Weak in Marathi but will participate. AshLin ०६:३९, २२ फेब्रुवारी २०११ (UTC)

आढावा

संपादन

संपादनेथॉन अपेक्षेनुसार यशस्वीपणे पार पडली. तीन दिवसांतील घडामोडींचा आढावा येथे घेतला आहे :

माध्यम प्रसिद्धी, वृत्तांत, अन्य वार्तांकने

संपादन

माध्यम प्रसिद्धी

संपादन
  • http://onlinenews1.lokmat.com/php/detailednews.php?id=NashikEdition-6-1-20-02-2011-13f0c&ndate=2011-02-21&editionname=nashik. ०६-०३-२०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
    "नाशिक, दि. १९ (प्रतिनिधी) - माहितीचे मायाजाल असलेल्या विकिपीडियावर बहुविध प्रकारची माहिती उपलब्ध असली तरी त्यातील मराठी लेखांची संख्या अगदीच अल्प आहे. ही संख्या वाढविण्याची उत्तम संधी विकिपीडियाने उपलब्ध करुन दिली आहे. त्यासाठी निमित्त आहे २७ फेब्रुवारी रोजी असलेल्या मराठी राजभाषादिनाचे. ... विकिपीडियासारखा संदर्भ किवा माहितीकोष अधिक समृद्ध व्हावा यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यासाठीच विकिपीडियाने संपादनेथॉन हा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. २७ फेब्रुवारी ला असलेल्या मराठी राजभाषा दिनानिमित्ताने २६ व २७ फेब्रुवारी रोजी विकिपीडियावरील माहितीत भर घालण्याची संधी इंटरनेटधारकांना मिळणार आहे."

हेही पाहा

संपादन