विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे/प्रचंड प्रस्ताव
मराठी विकिपीडियावर काही नवीन धोरणांची आवश्यकता वाटत आहे. त्यावर चर्चा करण्यास व कौल देण्यास मी विकीसदस्यांना आमंत्रित करत आहे.सहसा, विकिपीडियाचे प्रत्येक धोरण एक दुसऱ्याशी संलग्न आहे, त्यामुळे यावर एकदाच सर्वांचे मत घ्यावे असे वाटत आहे.
सॉकपपेट धोरण
संपादनसॉकपपेट
संपादनसॉकपपेट ही ती खाती आहेत, ज्याचे मालक/चालक एकच आहे. विकिपीडियावर 'एक सदस्य-एक खाते' असले पाहिजे असे वाटते. इतर विकिपीडियावरील धोरण पाहून मराठीत सुद्धा ते असले पाहिजे असे वाटते.
सॉकपपेटर
संपादनजे सदस्य अशा प्रकारचे खाते चालवतात त्याला 'सॉकपपेटर' असे म्हणतात. अशा सदस्याचे मूळ खाते व सर्व पाळीव खाते अनंत काळापर्यंत बंद/तडीपार केले पाहिजे.
जर आपल्याकडे अनेक खाती असली/आहेत तर?
संपादनबॉट(सांगकाम्या) चालक व प्रचालकांना याची अत्यंत गरज आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या सदस्यपानावर लिहिले पाहिजे कि सांगकाम्याचे नाव, मालक व मूळ खात्याचे नाव. इंग्लिश नाव व मराठी नाव एकच असणारे खाते प्रशासक विलीन करू शकतात व विनंती केल्यावर ते केले जाईल.
स्लीपर खाते
संपादनजे खाते जे कौल प्रक्रियेत गोंधळ घालणे किंवा फक्त कौल देण्यासाठीच ज्याचा उपयोग केला जातो, त्याला अनंत काळापर्यंत तडीपार.
चेकयुझर
संपादन(फक्त प्राथमिक चर्चा- धोरण निश्चित नंतर करूया) याचे धोरणासाठी विकिपीडिया:सदस्यत्व तपासनिस पहा. २ चेकयुझरची नियुक्ती आवश्यक वाटते. ५०% अथवा त्यापेक्षा जास्त समर्थन कौल यासाठी आवश्यक राहील. ग्लोबल चेक युझर धोरणाचे पालन करणे आवश्यक आहे. याचा गैरवापर करणाऱ्या सदस्यांना प्रतिपालक काढतीलच. अक्रियता - ६ महिने.
चर्चा
संपादनकौल
संपादनकौल प्रक्रिया
संपादनकौल धोरण
संपादनसध्या कौल हे विकिपीडिया:कौल/कौल प्रक्रिया मुदत यानुसार चालते. परंतु त्यात बदल करणे आवश्यक आहे.
कौल मुदत
संपादनमाझे मते कौल मुदत खाली प्रस्तुत प्रकारत असावी.
क्रिया | चर्चा | कौल | एकूण |
---|---|---|---|
तांत्रिक (विकीवर नवीन गॅजेट/फीचर) | ७ | inclusive | ७ |
धोरण | १०/१७* | +७ | १७/२४ |
प्रचालक | २१ | inclusive | २१ |
पान काढण्याची चर्चा/कौल | ७ | inclusive | ७ |
आपत्कालीन प्रस्ताव (कार्यशाळा/सुरक्षा) | ~२ | invlusive | २ |
_________________________ | ____ | ____ | ____ |
*परिस्थितीनुसार बदला | |||
यात दिवसाचा आकडा प्रचालक वाढवू शकतात. |
नवीन पॅरामीटर
संपादन{{कौल}} साच्यात नवीन पॅरामीटर W (withdraw nomination) ND (not done) आणि D (done) असे सुद्धा असावेत.
कौल देण्यास पात्रता
संपादनयासाठी ३० दिवसात ५० संपादने व एकूण मराठी विकिपीडियावर ५०० संपादन केलेले सदस्य फक्त कौल देतील अशी व्यवस्था असावी. याने स्लीपर खाते बंद होईल. चर्चा/मत देण्यात काहीही अडथळा/पाबंदी नसावी, याद्वारे, नवीन सदस्यांना कौल प्रक्रियेत शामिल होण्यास संधी मिळेल.
यश किंवा अपयश
संपादनचर्चा वरील नमूद केलेल्या दिवसांप्रमाणे चालेल.एखादे वेळी आवश्यकता वाटली तर, मुदत जर दिवस जास्त करायची आहे तर प्रचालक करतील. ५०% अथवा त्यापेक्षा जास्त समर्थन कौल यासाठी आवश्यक राहील.
चर्चा
संपादनकौल
संपादनसामग्रीची मालकी
संपादनविकिपीडियात असलेल्या सामग्रीचे कोणीही मालक नाही. जर आपण एक लेख तयार केला आहे तर त्याचे मालक आपण नाही. कोणीही त्यात संपादन करू शकतो. उत्पात असल्याशिवाय कोणताही मजकूर उलटवू नये अशी सर्वसाधारण धारणा आहे. जर त्या मजकूराबद्दल आपले मत वेगळे आहेत तर आपण लेखाचे चर्चापानावर त्याबद्दल चर्चा करु शकता.
सदस्य नामविश्व
संपादनसदस्य पान सोडून प्रत्येक सदस्य नामविश्वात असलेले पानात संपादन केल्या जाऊ शकते. प्रचालक व इतर संपादक फक्त गरज पडल्यावरच इतर सदस्याचे नेमस्पेस (सदस्यपान) संपादित करू शकतात. उधारण नोंद करण्यासाठी की हा सदस्यखाते तडीपार आहे किंवा चेक युझर प्रक्रियेत तडीपार केलेले सदस्य.
गाळणी १४८
संपादनगाळणी १४८ ही अनामिक सदस्यांना इतर सदस्य पानात बदल करण्यापासून अडवते.
मुख्य नामविश्व
संपादनयाच्यात सर्व सदस्य संपादन करू शकतात. एकदा लेख जर संपादन अवस्थेत असला की त्यात {{काम चालू}}/{{निर्माणाधीन}} साचा लावला पाहिजे नाहीतर त्यात इतर संपादक संपादन करू शकतात. २ दिवस हे साचे ठेवता येईल. त्यानंतर त्याला काढले जाईल. जास्त मुदत आवश्यक वाटल्यास, सदस्याने तशी नोंद करावी. यासाठी नवीन गाळणी सुद्धा तयार करण्यात येईल.
चर्चा
संपादनकौल
संपादननवीन सदस्य अधिकार
संपादननवीन पानाचे निरीक्षण करणे व स्वतःचे संपादन आपोआप निरीक्षित होण्यास हे नवीन अधिकार.
पेट्रोलर / निरीक्षक
संपादनहे अधिकार नवीन पानाचे असलेले बॅकलॉग कमी करण्यासाठी मदत करेल . या अधिकारात special:new pages मध्ये असलेले पिवळे पान जे निरीक्षित नाही त्याला निरीक्षित करेल.
लेख निरीक्षण केव्हा करायचे?
संपादन- लेखात कॉपीराईट (प्रताधिकार) उल्लंघन नसले पाहिजे.
- लेखात आवश्यक सर्व वर्ग जोडले पाहिजे.
- लेख उल्लेखनीय असला पाहिजे.
- लेख विकिडाटा कलमला जोडला असला पाहिजे.
लेख निरीक्षण केव्हा करू नये?
संपादन- ज्या पृष्ठांना आपण निश्चितपणे ओळखत नाही आणि तसे पान ठेवण्यास कोणीही इतरांना समर्थन देत नाही.
निरीक्षक कोण व कसे बनता येईल?
संपादन- मुख्य नामविश्वात किमान ५०० संपादन असणे गरजेचे.
- संपादक मागील १ महिन्यापेक्षा जास्त स्वयं-निरीक्षित असला पाहिजे
स्वयं-निरीक्षित/ ऑटो पेट्रोल
संपादनहा एक असा अधिकार आहे ज्यात विकिमधील इतरांचे क्रियांवर निरीक्षण करण्याची क्षमता नसते. त्याऐवजी, त्यांच्या स्वतःच्याच क्रियांवर निरीक्षित म्हणून खूण लागते.
अधिकार कसे मिळतील
संपादन- हे अधिकार प्रचालक विकिपीडिया:अधिकारविनंती वर केलेल्या विनंतीनुसार देतात.
- संपादकांना पूर्वी एक महिना ऑटो पेट्रोल अधिकार दिले पाहिजे नंतर अनुभवी सदस्यांना विनंती/प्रोग्रेस वर पेट्रोलर अधिकार दिले पाहिजे.
अधिकार केव्हा काढला जाईल
संपादनप्रचालक हे एकाद्या सदस्याचे अधिकार काढतील जेंव्हा:
- अधिकाराचा गैर-वापर होईल.
- सदस्य तडीपार झाला तर
- निरक्षण न करता पेट्रोल केल्यावर.