विकिपीडिया:कौल/कौल प्रक्रिया मुदत
हे पृष्ठ मराठी विकिपीडियाचे एक धोरण सादर करीत आहे. हे, सर्वसामान्यपणे स्वीकारलेल्या एका मानकाचे वर्णन करते, ज्याचे सर्व सदस्य/संपादक साधारणपणे अनुसरण करतात. या धोरणात काही बदल करावयाचा असल्या तो बदल विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे पानावर प्रस्तावित करणे व मंजूर करणे आवश्यक आहे. |
१ कोणताही कौल घेण्यासाठी विकिपीडिया:कौल येथे प्रस्ताव मांडला जावा.
- १.१ उत्पात आणि खोडसाळ प्रस्ताव प्रचालक काढून टाकतील. इतर सदस्यांनी येथे फेरफार करू नये.
२ अपूर्ण, असंबद्ध किंवा अर्थबोध न होणारे प्रस्ताव विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा येथे हलविले जातील.
- २.१ इतर सदस्यांनी प्रस्तावात फेरफार करू नये.
३ विकिपीडियावरील धोरणांशी थेट संबंध असलेल्या प्रस्तावांकडे विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे येथून दुवा असेल.
४ कौल प्रस्ताव मांडला गेल्यानंतर पुढील १४ दिवस (प्रस्ताव मांडलेला दिवस वगळून) त्यावर चर्चा करण्यात येईल. ही मुदत शेवटच्या दिवशी २३:५९:५९ वाजता संपेल. या दरम्यान सदस्य आपला कौलही नोंदवू शकतील.
- ४.१ १४ दिवसांची चर्चा मुदत संपायच्या आत प्रस्ताव मांडणारा सदस्य ७ अधिक दिवसांची मुदत एक वेळा मागू शकतो.
- ४.२ १४ किंवा २१ दिवसांच्या मुदतीअखेर चर्चेत खंड पडला नसेल आणि नवनवीन मुद्दे समोर येत असतील (असे होत आहे कि नाही यासाठी प्रचालकांचे मत अंतिम राहील) तर प्रचालक आपणहून एक वेळा ७ अधिक दिवस चर्चा पुढे चालू ठेवू शकतील.
५ चर्चाकाळ संपल्यावर पुढील ७ दिवस सदस्य कौल देतील. ही मुदत सातव्या दिवशी २३:५९:५९ वाजता संपेल. या दरम्यान शक्यतो चर्चा करू नये. पूर्वी न मांडलेले आणि मूलभूत मुद्दे असतील तर ते मांडावे परंतु मी सहमत, मी ही सहमत इ. मते किंवा मांडलेल्या मुद्द्याला अधिक बळ देणे शक्य तितके टाळावे.
६ कौल देण्याची मुदत संपल्यावर प्रचालक मते मोजून निकाल जाहीर करतील.
- ६.१ कौलमोजणीमधून मुदतीनंतर दिले गेलेले कौल आणि इतर अवैध कौल वगळले जातील.
(याबाबतचा मूळ प्रस्ताव, त्यावर झाले विचारमंथन, मतदान, निकाल व इतर माहिती येथे उपलब्ध आहे.)