विकिपीडिया:सद्भावना गृहीत धरा

सद्भावना गृहीत धरणे (Assume Good Faith) हे विकिपीडिया वरील मूलभूत तत्व आहे. ही एक अशी धारणा आहे की एखाद्या संपादकाने संपादन आणि चर्चांमधे केलेल्या टिप्पण्या सद्भावनेने केल्या आहेत. बऱ्याचश्या लोकांनी विकिपीडिया या प्रकल्पाला मदत करण्याचा प्रयत्न केला आहे, दुखावण्याचा नाही. जर हे खोटे असते तर विकिपीडियासारख्या प्रकल्पाचा विनाश केंव्हाच झाला असता. या मार्गदर्शक तत्वांचा अर्थ असा नाही की संपादक स्पष्ट पुराव्याच्या उपस्थितीतपण सद्भावना गृहीत धरणे सुरू ठेवतील.उदा. विध्वंसक कृती असल्यास.