विकिपीडिया:चावडी/विकिसंमेलन भारत २०११

(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा)
चावडी विभागवार:

चर्चा
(विपी इतर चर्चा)

इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा

वादनिवारण
वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा

साहाय्य | मदतकेंद्र
नवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा

दूतावास
(Embassy)

नवी चर्चा जोडा
(Start new discussion)

प्रचालकांना निवेदन
प्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा


प्रचालकांचे मूल्यांकन
प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा


तांत्रिक
तांत्रिक मुद्दयांवर चर्चा.
विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा.
नवीचर्चा जोडा | वाचा

ध्येय आणि धोरणे
सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा

प्रगती
मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा
नवीचर्चा जोडा | वाचा


सोशल मीडिया
मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा
चावडी (सुचालन)

स्थापना
___

स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चा








सुस्वागतम्

विकीसंमेलन भारत २०११ ह्या भारतात होणार्या अशा तर्हेच्या प्रथम संमेलनाच्या चर्चा आणि माहिती पानावर आपले स्वागत आहे. ह्या संमेलनाच्या निमित्याने तमाम भारतीय विकिमीडीयंन्सला एक सार्वजनिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. हे संमेलन महाराष्ट्रात होत असल्याने संमेलना दर्म्यान मराठी विकिपिडीयन्स साठी विशेष वेगळी मराठी सत्रे आयेजित करण्यात आली आहेत. ह्या मराठी सत्रांन विषयीची सर्व माहिती येथे उपलब्ध करण्याचा आमचा प्रयत्न असेल. आपल्या इतर शंका अथवा सुचना/माहिती/मदतीसाठी ह्या पानावर लिहा अथवा marathiwikipedia@gmail.com येथ विपत्रा द्वारे संपर्क करा. मराठी विकिपीडिया - विकिसंमेलन भारत २०११ पानास भेट दिल्याबद्दल धन्यवाद !
विकिसम्मेलन भारत २०११, मुम्बई साठी नोंदणी सुरु झाली आहे. नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.



मराठी विकिपीडियाचा झेंडा - मुंबई विकिकॉन्फरन्स मध्ये..

संपादन

नमस्कार मंडळी, दिनांक १८ ते २० नोव्हे. २०११ या काळात मुंबई येथे "WikiConference India 2011" भरवली जात आहे. याची माहिती आपणापर्यंत आत्तापर्यंत पोहोचली असेलच. अधिक माहिती http://meta.wikimedia.org/wiki/WikiConference_India_2011 येथे आहेच. या कॉन्फरन्सच्या संयोजन समितीकडून काही दिवसापूर्वी एक निवेदन आपल्याला आले आहे. कॉन्फरन्स "मुंबई" (महाराष्ट्रात) मध्ये असल्यामुळे साहजिकच मराठी मंडळीचा भरणा येथे असेलच. त्याच बरोबर "मराठी विकिपीडिया" च्या सदस्यांना आणि "मराठी विकिपीडिया" संदर्भातील विषयाला येथे निश्चितच प्राधान्य मिळेल असे त्यांच्याकडून सूचित करण्यात आले आहे. या विषयी मी आणि राहुल देशमुख यांनी कॉन्फरन्सच्या संयोजन समितीशी चर्चा सुरू केली असून "मराठी विकिपीडिया" साठी वेगळा Track देण्याला त्यांची मान्यता आहे.

या कॉन्फरन्स मध्ये "मराठी विकिपीडिया" चा झेंडा पुढे नेण्याचे मला सुचलेले काही निश्चित उद्देश असे:

  1. आपण सारे "मराठी विकिपीडिया" मधेच भेटतो, भांडतो, चर्चा करतो पण प्रत्यक्ष भेटीचा आनंद काही औरच.
  2. "मराठी विकिपीडिया" जास्तीत जास्त नवीन लोकांपर्यंत पोहोचवणे.
  3. "मराठी विकिपीडिया"च्या प्रगतीसाठी दिलेल्या वेळात काही साधक बाधक चर्चा करणे.
  4. "मराठी विकिपीडिया"मध्ये असलेल्या मंडळींच्या अडचणींची चर्चा करून उपाय योजना तयार करणे.
  5. काही विशिष्ठ विषय घेऊन परिसंवाद घडवून विचारांना चालना देणे

.# बाकीच्या भारतीय भाषांबरोबर आपली नाळ जोडून काही चांगल्या गोष्टींचे आदान प्रदान करून सर्व भारतीय भाषा "विकिपीडिया" वर समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करणे... इत्यादी इत्यादी.

यासाठी आपणा सर्वांचा सहभाग नुसता आवश्यकच नव्हे तर अत्यावश्यक आहे. येत्या काही काळात संयोजन समितीशी विस्ताराने चर्चा करून निश्चित आराखडा तयार होईल. तेव्हा आपल्या मौल्यवान सूचना आणि त्याहीपेक्षा मौल्यवान वेळ या कॉन्फरन्ससाठी बाजूला काढून ठेवूया.

या विषयी अधिक माहिती आम्ही आपणापर्यंत पोहोचवूच. धन्यवाद..... मंदार कुलकर्णी १८:४०, २३ सप्टेंबर २०११ (UTC)

मंदार,राहुल, चांगली बातमी दिल्याबद्दल धन्यवाद ! विकिपरिषदेसाठी प्रत्यक्ष येऊ शकणार्‍यांसाठी व प्रत्यक्ष येऊ न शकणार्‍यांसाठी काय काय करणे शक्य आहे, याबद्दल काही मार्गदर्शक सूचना लिहू शकाल काय ?
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:१६, २४ सप्टेंबर २०११ (UTC)

. सादरीकरणासाठी निमंत्रण .

संपादन

नमस्कार मंडळी,

मुंबई विकिकॉन्फरन्स चे दर्म्यान मराठी विकिपीडियाच्या मंचाकावरून आपले विचार मांडण्यासाठी, मराठी विकिपीडिया समुदायास मार्गदर्शन करण्यासाठी, प्रशिक्षण देण्यासाठी किंवा तत्सम सादरीकरणासाठी आणि तांत्रिक कार्यशाळेसाठी प्रस्ताव देण्यास सदस्यांना नम्र आव्हाहन.

आपण आपले सादरीकरणाचे प्रस्ताव खालिल आराखड्यात marathiwikipedia@gmail.com वर १५ ऑक्टोबर २०११ पर्यत इमेल द्वारे इमेल विषयाच्या रकान्यात speaker -2011 असे नमूद करून सादर करावीत. निवडक प्रस्तावास सादरीकरणास निमंत्रित करण्यात येईल. ज्यास्तीत ज्यास्त सभासदांना सामाऊन घेण्याचे धोरण ठरवण्यात आले असल्याने शक्य तितक्या लवकर प्रतिसाद द्यावा. निमंत्रित सदस्यांच्या भाडे आणि मुंबईतील वास्तव्याचा आर्थिकभार आयोजकांतर्फे उचलण्याचा प्रयत्न आहे . आपल्या भरीव सहभागाची अपेक्षा. राहुल देशमुख १९:५२, २३ सप्टेंबर २०११ (UTC)



 १  सदरीकरणाचे शीर्षक   

 २  सदस्याचेनाव      
 
 ३  विपत्र (इमेल) पत्ता 
 
 ४  सदस्य नाव (मराठी विपी वरील )
 
 ५  संपूर्ण पत्ता 

 ६  दूरध्वनी/भ्रमण दूरध्वनी 

 ७  संस्था 

 ८  आपल्या सादरीकरणाचा 
    ५०० शब्दात सारांश

 ९  सादरीकरण (वैकल्पिक)
  • राहुल,

गेल्या काही तासात बऱ्याच मंडळींनी वरील विषयावर मत प्रदर्शन करण्यास सुरुवात केली आहे. या सर्वांचा धागा सुटून जाऊ नये म्हणून मला एक गोष्ट सुचवावीशी वाटते. या चावडीवरच "मुंबई विकिकॉन्फरन्स- मराठी विकिपीडिया" असे पान किंवा तत्सम पान बनवून त्यात चर्चा करता येतील काय? म्हणजे बाकी संपादकांना विनासंकोच त्यावर मत प्रदर्शन करता येईल आणि त्यांच्या सूचनांचा मुंबई विकिकॉन्फरन्सला उपयोगही होईल.....मंदार कुलकर्णी १७:३०, २४ सप्टेंबर २०११ (UTC)

आनंदाने सहभाग घ्यायला

संपादन
  • आनंदाने सहभाग घ्यायला आवडेल. सध्या मी विकिपीडिया इंडिया एड्युकेशन प्रोग्राम मध्ये, मराठी विकिपीडिया प्रसारित करत आहे. अनुभव मांडण्यास संधी मिळाली तर उत्तम. AbhiSuryawanshi १७:४१, २४ सप्टेंबर २०११ (UTC)

विकिसंमेलनातील मराठी सत्रे

संपादन

नमस्कार,

आपणांस ठाउक असेलच की मुंबईत होणार्‍या या विकिसंमेलनात मराठी विकिपीडियावर तीन दिवसांची सत्रे घेण्याचा प्रस्ताव आपण मांडला होता. तो मंजूरही झाला.

आपण ही सत्रे विनानोंदणी विनाशुल्क ठेवण्याचाही प्रस्ताव ठेवला होता. विकिसंमेलन मुंबईत होत असल्यामुळे तेथे मराठी लिहिण्या/वाचणार्‍यांचा मुबलक राबता असणार आणि येताजाता नजरेस पडले म्हणून बघावे असा विचार करणार्‍या मराठी माणसांना नोंदणी करण्याचे आणि शुल्क (१,५०० रु) भरण्याचे बंधन न घालता मुक्तपणे या मुक्तप्रकल्पाबद्दल माहिती घेता यावी हा यामागचा हेतू होता.

दुर्दैवाने हा दुसरा प्रस्ताव नामंजूर करण्यात आलेला आहे. मोफत असल्याने झालेल्या गर्दीस सामावून घेण्यासाठी पुरेशी जागा नाहीसुरक्षा ही दोन कारणे यासाठी दिली गेली आहेत. तसेच बाकीच्या सत्रांना शुल्क लागते तर मराठीला का नाही असेही कारण असावे असे वाटते. यांना आपल्याकडे समर्पक उत्तरे नाहीत.

याशिवाय इतर, विकिपीडियाशी संबंध नसलेले एक कारण पुढे करुन सत्रे रद्द करण्याचाही प्रस्ताव होता. आपले प्रतिनिधीत्व करणार्‍या चमूने यासाठी आपला वेळ खर्च करुन त्याचे निरसन केले आहे.

जर मराठी सत्रे हवीच असतील तर ती मुख्य संमेलनापासून दूर (वेगळ्या इमारतीत) किंवा इतर दिवशी (१ ते ७ दिवस अंतरावर) भरवावी अशी योजना आयोजकांनी आपल्यासमोर ठेवली. अर्थातच आपल्या चमूने याला विरोध केला. बर्‍याच चर्चेनंतर आता मराठी विकिपीडियाला १-२ तास मिळाले आहेत व ते सुद्धा फक्त नोंदणी केलेल्यांसाठीच. हे जरी आपल्याला हवे तसे नसले तरी वरील सर्व कथानक पाहता हेही नसे थोडके. हे पदरात पाडून घेण्यासाठी झटलेल्या सदस्यांचे आभार! त्याच बरोबर बिशाखा दत्त या विकिमीडिया फाउंडेशनच्या विश्वस्तांनी आपले मत प्रकट केल्याबद्दल शक्य झाल्यास त्यांनाही आभार कळवा.

तर मग आता जे आहे त्याचे सोने करुन घेणे हे आपले कर्तव्य ठरते. जे काही दोन तास आपल्याला मिळतील त्यांमध्ये --

१. शक्य तितक्या प्रेक्षक/श्रोत्यांना तेथे ओढून आणणे. यासाठी --

  1. नोंदणीकृत सदस्यांना मराठी विकिपीडियाबद्दल (ऑनलाइन, ऑफलाइन) कळवणे
  2. त्यांस या दोन व्याख्यानांना हजेरी लावण्यास उद्युक्त करणे
  3. शक्य असल्यास आपण स्वतः तेथे जाणे व व्याख्यानाआधी तेथे आलेल्या लोकांना त्याबद्दल सांगणे/प्रचार करणे
  4. आपल्या शाळा/कॉलेज/व्यवसायांमध्ये याची जाहिरात करणे

मराठी विकिपीडियावरील व्याख्याने ओसंडून वाहत होती असे दिसले पाहिजे. याने आपले (मराठी विकिपीडियाचे) वजन इतर भारतीय भाषांसमोर तर वाढेलच पण पुढच्या संमेलनांमध्ये आपल्याला अधिकधिक संधी मिळेल.

२. दिलेली व्याख्याने नितांतसुंदर झाली पाहिजेत. यात मराठी विकिपीडियाचा आवाका, ध्येय, धोरणे तसेच दूरगामी परिणाम यांचे प्रदर्शन झाले पाहिजे.

३. आज मराठी विकिपीडियाचा भाग नसलेल्यांना हे कसे करावे याचे मार्गदर्शन हवे (देवनागरी टंकलेखन, सदस्यत्व, ऑफलाइन मदत, प्रचार, इ.)

४. व्याख्याने होण्याआधी, होत असताना (ट्विटर, फोरस्क्वेर, लॅटिट्यूड, इ) आणि नंतर त्यांना शक्य तितकी प्रसिद्धी दिली पाहिजे.

यासाठी मी काही गोष्टी सुचवू पाहतो --

१. सर्वप्रथम आपले भांडण-तंटे मिटवून (शक्यच नसल्यास पॉझ करुन) आपण सगळे या एका उद्दिष्टामागे लागूयात. आपले सगळ्या गोष्टींवर एकमत नाही. होणे शक्यही नाही पण इतरांसमोर आपण एकजूट दाखवणे नितांतगरजेचे आहे.

२. या व्याख्यानांचे विषय (दोन) लगेचच ठरवू (१-३ दिवसांत).

३. त्यांचा आराखडा ठरवू.

४. आजचपासून यांची जाहिरात करणे सुरू करू. या व्याख्यानांची नेमकी तारीख/वेळ अजून कळलेली नाही पण ती कळेपर्यंत थांबण्याचे कारण नाही असे मला वाटते.

५. आपली संपादनक्षमता या कामाकडे जास्त (सगळी नव्हे) वळवू.

६. मने मोकळी ठेवून हे कार्य पार पाडू.

७. (ऑप्शनल) पुन्हा आपली भांडणे उकरून काढू  :-D

पुन्हा एकदा अखिल भारतीय संमेलनात ही सत्रे घडवून आणणे शक्य करणार्‍यांचे आभार आणि या आपण सगळ्यांनीच या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन.

अभय नातू २०:२१, ९ ऑक्टोबर २०११ (UTC)

http://wiki.wikimedia.in/In_the_news press@wikimedia.in


  1. IANS/ Indo Asian News Service  : "Mumbai to host first WikiConference in India"
  2. Deccan Herald http://www.deccanherald.com/content/203594/mumbai-host-first-wikiconference-india.html
  3. The Week : http://week.manoramaonline.com/cgi-bin/MMOnline.dll/portal/ep/theWeekContent.do?contentId=10400717&programId=1073754912&tabId=13
  4. Two Circles : http://twocircles.net/2011nov09/mumbai_host_first_wikiconference_india.html
  5. Northern Voices : http://nvonews.com/2011/11/09/wikipedia-conference-comes-to-india-set-for-nov-18/
  6. Yahoo! News : http://in.news.yahoo.com/mumbai-host-first-wikiconference-india-115959239.html
  7. Sulekha.com : http://newshopper.sulekha.com/mumbai-to-host-first-wikiconference-in-india_news_1367253.htm
  8. Indiacurrentaffairs.org : http://indiacurrentaffairs.org/mumbai-to-host-first-wikiconference-in-india/
  9. Webindia123.com http://news.webindia123.com/news/Articles/India/20111109/1868620.html
  10. Hamaraphotos http://hamaraphotos.com/news/art/mumbai-to-host-first-wikiconference-in-india.html
  11. Onionlive.com http://onionlive.com/2011/11/09/first-wikiconference-in-india/
  12. The Hindustan Times : "Wikipedia plumbs for more Marathi articles" http://epaper.hindustantimes.com/PUBLICATIONS/HT/HM/2011/11/10/ArticleHtmls/Wikipedia-plumbs-for-more-Marathi-articles-10112011004008.shtml?Mode=1
  13. Oneindia.in : "Mumbai to witness 1st Wikipedia conference on Nov 18" English : http://news.oneindia.in/2011/11/09/mumbai-to-witness-1st-wikipedia-conference-on-nov-18.html Tamil : http://tamil.oneindia.in/news/2011/11/10/mumbai-to-witness-1st-wikipedia-conference-on-nov-18-aid0090.html
  14. AFP: "Wikipedia eyes India for language growth" http://www.google.com/hostednews/afp/article/ALeqM5j6M8i-wPgsg3vT7wjlHyEokOPltQ?docId=CNG.e77e4a807cd98d224ecb7444f69b8e62.321
  15. The Economist : " Wikipedia’s fund-raising : Free but not easy " http://www.economist.com/node/21536580
  16. Medianama : Size Zero: Wikipedia Looks To Telcos & Handset Co’s For Free Mobile Access http://www.medianama.com/2011/10/223-size-zero-wikipedia-looks-to-telcos-handset-cos-for-free-mobile-access/

उल्लेखनीय विकिमीडियन गौरव इ.स. २०११ (विकिपरिषद भारत इ.स. २०११)

संपादन

मंडळी, मुंबईतील विकिमीडिया इंडिया विकिपरिषदेत "अभय नातू" यांना उल्लेखनीय विकिमीडियन गौरव (इ.स. २०११) लाभला, त्यानिमित्त त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन ! (संदर्भ : NWR 2011 and Jury mention V1.0.pdf) ही घटना सर्व मराठी विकिसमुदायासाठीदेखील अभिनंदनीय आहे.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १२:१५, २६ नोव्हेंबर २०११ (UTC)