विकिपीडिया:प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धा २०१९/Submissions

परीक्षकाला विरोध

संपादन

@सुबोध कुलकर्णी, आर्या जोशी, आणि Tiven2240: जर या लेखन स्पर्धेत सदस्य:QueerEcofeminist हा "परीक्षक" म्हणून कार्य करणार असेल तर मी स्पर्धेत भाग घेण्याचा कोणताच अर्थ मला दिसत नाही. सदस्य:QueerEcofeminist "परीक्षक" बनण्याला माझा विरोध आहे/राहील, कारण परीक्षक बनण्याची "नैतिक योग्यता" या सदस्यात नाही. हा सदस्य माझ्या बाबतीत पूर्वग्रह बाळगतो व तो तटस्थपणे कार्य करू शकणार नाही हेही मी जानतो. याचा अनुभव मला पूर्वी आलेला आहे (येथे पाहू शकता). हा सदस्य (सदस्य:sureshkhole) पूर्वी परीक्षक म्हणून कार्य करत असताना त्याने अण्णा भाऊ साठे, रामचंद्र गुहा, नैराश्य या तीनही लेखांना "चूकीची कारणे" देत अस्वीकारले होते. मी वरील लेखांना "विश्वसनीय संदर्भ" दिलेले होते, त्यात कॉपीपेस्टही नव्हते, मात्र तरीही "विश्वसनीय संदर्भांचा अभाव" व "कॉपीपेस्ट मजकूर" हीच कारणे या परीक्षकाने दिली, जी पूर्णतः चूकीची व खोटी होती. इतर अनुभवी सदस्य लेख इतिहास व संदर्भ आजही तपासून याची खात्री करू शकतात. या स्पर्धेत मी कितीही चांगले योगदान दिले तरी काहीनाकाही चूकीचे कारण देऊन लेख अस्वीकारच करेल यात मला अजिबात शंका नाही. परीक्षक बनण्यास योग्यतेचे बरेच सदस्य मराठी विकि समुदायात आहेत, परीक्षक बनण्यास अयोग्य असलेल्या सदस्यांना परीक्षक बनवून विकिपीडियाचे नुकसान करू नये. संयोजकांनी माझ्या मुद्दयांवर जरूर विचार करून योग्य निर्णय घ्यावा, ही विनंती. --संदेश हिवाळेचर्चा १५:००, ९ ऑक्टोबर २०१९ (IST)[reply]

@संदेश हिवाळे:, मी आपला सहकारी या नात्याने प्रतिसाद नोंदवत आहे. आपण कितीही मतभेद असले तरी एकेरी उल्लेख करणे, योग्यतेबद्दल विधाने करणे गैर आहे असे मला वाटते. परीक्षकांमध्ये मतभेद असू शकतात. अशा वेळी सर्व बाजू तपासून समन्वयाने योग्य तो निर्णय घेतला जाईल याची खात्री बाळगावी. आपणही चुकीचेच घडेल असा ग्रह सोडून उत्साहाने या स्पर्धेत योगदान करावे ही विनंती. स्थानिक विषयांशी संबंधित लेखांच्या यादीत अवश्य भर घालावी. आपण सद्य घडामोडी या विभागात चांगली भर घालू शकाल असे मला वाटते. स्पर्धेसाठी शुभेच्छा!
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १९:३५, १७ ऑक्टोबर २०१९ (IST)[reply]

मी केवळ "सदस्य" या शब्दाला अनुसरुन एकेरी उल्लेख केलेले आहेत. मागील स्पर्धेत मी सादर केलेले अनेक लेख परीक्षकांनी मला न सांगताच परस्पररित्या काढून टाकले होते, अर्थात हेही कृत्य तत्कालीन परीक्षक सुरेश खोले यांनीच केलेले असावे (याचीही माहिती काढावी). यात माझ्याद्वारे सादर केलेल्या लेखांची संख्या शेवटी नि्म्म्या पेक्षा कमी झालेली होती. अशा गोष्टीमुळे माझा योगदान देण्याचा उत्साह मावळतोय. खोलेंच्या तटस्थपणाच्या अभावाची मला पूर्ण खात्री आहे; सर्व बाजू तपासून समन्वयाने घेतलेल्या योग्य निर्णयाच्या प्रतिक्षेत... धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा २२:५६, १७ ऑक्टोबर २०१९ (IST)[reply]

मूल्यांकन

संपादन

@QueerEcofeminist: लेख अस्विकार करताना तेथे कारणे द्या. सगळ्या सदस्यांना ती जाणुन घ्यायची आहे. @Vikrantkorde, ज्ञानदा गद्रे-फडके, आर्या जोशी, Komal Sambhudas, आणि कल्याणी कोतकर: @Rujuta5879, अरविंद धरेप्पा बगले, सुबोध कुलकर्णी, जाधव प्रियांका, आणि संदेश हिवाळे: @Pooja Jadhav, संगीता व्यंकटराव मोरे, Sandesh9822, माधवी नाईक, आणि Mahajandeepakv: @विकास कांबळे: धर्माध्यक्ष (चर्चा) ०८:२१, १३ जानेवारी २०२० (IST)[reply]

हो. कोणत्या नियमाच्या आधारे लेख नाकारला गेला हे नोंदविणे आवश्यक. धन्यवाद.--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ०८:४८, १३ जानेवारी २०२० (IST)[reply]
@Dharmadhyaksha:, मी गेली तीन वर्षे हेच काम करतोय, आपल्याला ज्या तक्रारी असतील त्या निकाल जाहिर झाल्यावर मेटावर टाकाव्यात, मी योग्यती कारणे निकाल देताना नेहमीच देतो. आणि आम्ही तुमच्यासारखेच स्वयंसेवक आहोत, किंबहुना बक्षीस तुम्हांला मिळणार आहे, तेव्हा थोडी सबुरी राखा. सतत प्रक्रियेबद्दल प्रश्न विचारून तुम्हांला नक्की काय साध्य करायचे आहे? आता निकाल जाहिर होई पर्यंत प्रक्रियेबद्दल उगाच सगळ्यांना त्रस्त करू नये ही विनंती. सगळे मिळून 18 लेखकांचे 220 लेख आहेत, त्याच्या गुणगणनेला वेळ लागतो आणि तो पर्यंत थोडासा धीर ठेवण्यास आपण हरकत नसावी असे मला वाटते, आपल्या प्रश्नांना उत्तरे देण्यात वेळ वाया जातो आणि काम अर्धवट रहाते. धन्यवाद QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!![they/them/their] ०९:५२, १३ जानेवारी २०२० (IST)[reply]
@Dharmadhyaksha:, सदस्य:QueerEcofeminist यांना सादर केलेले लेख अस्वीकार करायला वेळ लागत नाही, परंतु त्यावर स्पष्टीकरण देण्यात वेळ वाया जातो त्यांचा. मागच्या वेळेच्या स्पर्धेत माझेही १०+ लेख न सांगताच सदस्य:QueerEcofeminist यांनी परस्पर वगळूनच टाकली होती (अस्वीकाराचा तर प्रश्नच नाही)!! त्यामुळे मी ही नवी स्पर्धा सुरु झाल्यापासूनच ह्याही बाबीकडे @सुबोध कुलकर्णी आणि आर्या जोशी: यांचे लक्ष वेधले होते; परंतु त्यास दुलर्क्षित केले गेले. ज्युरी म्हणजे हवी तशी मनमानी नसावी. लेख अस्वीकाराच्या कारणांची खरी वास्तविकता काय हे त्या त्या लेखकांनाही ठरवू/मांडू द्यावे. म्हणून सदस्य:सुबोध कुलकर्णीसदस्य:आर्या जोशी, "कृपया" सदस्य:Dharmadhyaksha यांचे व इतर सर्व सदस्यांचे लेख अस्वीकार करण्याची कारणे उपलब्ध करून द्यावीत, धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा १३:१९, १३ जानेवारी २०२० (IST)[reply]
@आर्या जोशी आणि QueerEcofeminist:तीन वर्षे हेच काम करतोय याचा आर्थ असा होत नाही की तूम्ही ते चांगल करता. मेटावर पण मी नक्की जाणार. पहिला प्रयत्न हा इथे संवाद साधाण्याचा असेल. योग्यती कारणे निकाल देताना दिली नाहीत म्हणूनच इथे बोलत. उगाच "तूमचा मौल्यवान" वेळ वाया का घालवू?! सतत प्रक्रियेबद्दल प्रश्न विचारून तुमच्यात सुधार व्हावा ही इच्छा आहे. बरेच लेख असे आहेत ज्यात काही कारण दिलेले नाही. किंवा काही मध्ये तर नियमाबाहेरची कारणे दिली आहेत. मी तुम्हा दोघांनाही फक्त माझ्याच नव्हे तर इतरांच्या लेखांचे मूल्यांकन बदलण्यासाठी आणखी वेळ देतो. ते संपल्यानंतर कृपया आम्हाला कळवा आणि मग मी ते आपल्यास बरोबर एक-एक मुद्दे घेऊन चर्चा करू इच्छितो. धर्माध्यक्ष (चर्चा) १३:१०, १३ जानेवारी २०२० (IST)[reply]


QueerEcofemist यांनी माझे अस्वीकार केलेले लेख, त्याची दिलेली कारणे आणि त्याची वास्तविक स्थिती. बहुतेकांना प्रताधिकार भंगाचे कारण दिलेय, मात्र हे कारण खोटे आहे. एखाद्या मजकूराला बातमीचा संदर्भ दिला तर काही शब्द मॅच होतीलच. तुम्ही यालाही प्रताधिकार भंग म्हणाल काय? यासाठी लेखातील मजकूराशी काहीएक संबंध नसलेल्या बातम्या संदर्भ म्हणून वापराव्यात का? खालील अहवाल बघावे, तेथे बातम्यांचा अख्खा किंवा मोठा भाग कॉपीपेस्ट करून लेखात भरला गेला नाही, पण तरीही त्यांना कॉपीपेस्ट ठरवत अस्वीकार केले गेले.

  • धम्मचक्र प्रवर्तन दिन – हा लेख "प्रताधिकार उल्लंघन" कारण देत रद्द केला. याचा अहवाल पहावा, लेखात टाकलेल्या मजकूराला जी बातमी संदर्भ म्हणून दिली, तिचा ३०% भाग नकलडवक दाखवते, खूपच कमी ओळी. हे पूर्णतः चूकीचे कारण आहे.
  • नैराश्य, वरील प्रमाणे सारखेच कारण देत हा लेख काढला, हा प्रताधिकार अहवाल २६% दाखवते. खूपच शुल्लक ओळी, मात्र तरीही याला प्रताधिकार भंग घोषित केले गेले.
  • वंचित बहुजन आघाडीअहवाल ३४%. संदर्भ जोडून मजकूर लिहिणे म्हणजे तरीही घोळच म्हणताय.
  • महापरिनिर्वाण दिन – येथे तर कहरच केलाय. या प्रताधिकार भंगाच्या अहवालात फेसबुकच्या लिंक्स जोडलेल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात विकिपीडिया मधून फेसबुकवर तो मजकूर गेला आहे, फेसबुकवरून विकिपीडियावर आणला गेला नाही. येथे तर प्रताधिकार भंग नाहीच.

बाकीच्या लेखात पण हेच प्रोब्लेम आहेत. @सुबोध कुलकर्णी आणि आर्या जोशी: हा सारा प्रकार अत्यंत चूकीचा आहे. असली चूकीची कारणे देत लेख अस्वीकार करू नये. --संदेश हिवाळेचर्चा १४:०९, १३ जानेवारी २०२० (IST)[reply]

महापरिनिर्वाण दिन या लेखा बद्दलचे @Sandesh9822: चे म्हणणे बरोबर आहे. फेसबुक वर पोस्ट ६ डिसेंबरची आहे तर हा मजकूर त्यांनी आधिच विकिपीडिया वर टाकला होता. धर्माध्यक्ष (चर्चा) १०:३२, १४ जानेवारी २०२० (IST)[reply]
धर्माध्यक्ष, आंबेडकर जयंती हा लेख अस्वीकार करण्याचे कारण म्हणून @आर्या जोशी: यांनी हा प्रताधिकार भंगाचा अहवाल दिलाय, पहावा. आता तर ज्युरीच्या मूल्यांकनांवर विश्वास नाही राहिला. --संदेश हिवाळेचर्चा २०:०१, १४ जानेवारी २०२० (IST)[reply]

माझा दृष्टीकोन

संपादन

माझा एकच दृष्टीकोन आहे कि सध्या मराठी विकिपीडिया ८९ व्या स्थानावर आहे. त्याला शक्य तितक्या लवकर पहिल्या क्रमांकावर पोहचवणे. या स्पर्धेत भाग घेऊन बक्षीस जिंकण्याचा उद्देश कधीच नव्हता. जरी बक्षीस मिळाले तरी ते सर्व पैसे आर्मी फंडातच (https://indianarmy.nic.in/Site/FormTemplete/frmTempSimple.aspx?MnId=LrP2I+qYcpLLafkqh0xIxg==&ParentID=n7rCejHbUH+/t8vGwu6sng==) जमा होतील. मराठी विकिपीडियात सर्वच जण स्वयंप्रेरित काम करतात असा माझा कयास आहे. स्वतःचा वेळ काढून मराठी भाषा वाढावी म्हनूनच सगळे येथे कामे करत असावीत. हेवेदावे न ठेवता कामे करण्याचा उद्देश सर्वांचा असावा. लेख सुधारण्यासाठी कारणे दिली तर लेखकाला नंतरच्या लेखात त्या चुका सुधारता येतील. विक्रांत कोरडे (चर्चा)

प्रश्न फक्त बक्षिसाचा नाही; परंतु नव्या स्पर्धकांना अशा स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी परीक्षक किती चांगले उदाहरण उभे करणार आहेत याबद्दल देखील आहे. धर्माध्यक्ष (चर्चा) १८:४६, १३ जानेवारी २०२० (IST)[reply]
@Vikrantkorde:, मराठी विकिपीडियाला समृद्ध करणे हाच उद्देश सर्व सदस्यांचा आहे. हेवेदावे ठेवण्यांचा उद्देश नाही. येथे परीक्षकांच्या लेख अस्वीकाराच्या मुल्यांकनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.--संदेश हिवाळेचर्चा २१:३०, १४ जानेवारी २०२० (IST)[reply]

विनंती सूचना

संपादन

आपण सर्वजण गेली तीन महिने फार परिश्रमपूर्वक काम करीत आहात हे लेखांचे परीक्षण करताना आम्हला नक्की जाणवले आहे, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन करते. मी मागील वर्षी या स्पर्धेत स्पर्धक म्हणून सहभागी होते त्यामुळे आपल्या कामाचे मोल मला समजते आहे. आपल्या सर्वांची मते वाचल्यावर या अभियानाची परीक्षक म्हणून काही नोंदविण्याची संधी घेते आहे. लेखाचे परीक्षण याविषयीचे अनुभव मी नंतर सविस्तर नोंदविणार आहेच जेणेकरून सर्व संपादक बंधू भगिनी यांना मते कळतील. तूर्त इतकेच नोंदविले कि आपण एक ज्ञानकोश समृद्ध करीत आहोत याचे भान आपण प्रत्येकाने ठेवणे आवश्यक आहे. आपण ज्या चुरशीची मांडणी करीत आहात ते आपण सगळेजण शालेय वयात करीत असतो; पण आता प्रगल्भ संपादक या नात्याने आपण थोडे सिंहावलोकन केले तर बरे पडेल. आम्हाला tool मदत करतेच पण त्याला मानवी हस्तक्षेप सुद्धा लागतो जेणेकरून योग्य तो निकाल दिला जाईल. यात आम्ही आपण संपादित केलेल्या लेखाचे मूल्यांकन केले आहे, व्यक्तीचे नाही हे लक्षात घ्या. लेख ज्ञानकोशीय आहे आणि त्याचे नमूद केलेले निकष आपण लेख संपादित करताना पाळले आहेत कि नाही हे काम परिक्षकांचे असते, मला वाटतं कि तेच आम्ही करीत आहोत. पारितोषिक हि उत्तम कामाची घेतलेली दखल असते. इथे तर आपण त्यासाठीच पारितोषिक देत आहोत हे हि लक्षात घ्या आणि साहाय्य करा. आपल्या प्रगल्भ आणि समंजस प्रतिसादाच्या अपेक्षेत आणि शुभेच्छासह!--आर्या जोशी (चर्चा) १९:००, १३ जानेवारी २०२० (IST)[reply]

आर्या जोशी, मी वर मांडलेल्या तुमच्या सर्व विचारांशी सहमत आहे. आम्ही आपण संपादित केलेल्या लेखाचे मूल्यांकन केले आहे, व्यक्तीचे नाही हे लक्षात घ्या हे तुमचे विधान वाचले. मला तुमच्या मूल्यांकनावर आपत्ती नाही, तुम्ही दिलेली कारणे पाहता ते मूल्यांकन योग्य आहे. मी लेखांच्या इतर मूल्यांकनाबद्दलच बोलत आहे. मी संपादित केलेल्या काही लेखांचे मूल्यांकन चूकीचे केले गेले आहे. ज्या (मी संपादिलेल्या) ४ लेखांत प्रताधिकार भंगच नाही त्याला प्रताधिकार भंग असल्याचे कारण देत अस्वीकारले आहे [ धम्मचक्र प्रवर्तन दिन, नैराश्य, वंचित बहुजन आघाडी, महापरिनिर्वाण दिन ]. माझे बाकीचे लेख अस्वीकार केले त्यावर माझी काही हरकत नाही, कारण अद्याप त्यांना सुधारणे झाले नाही. सर्व सदस्यांच्या लेखांचे मूल्यांकन योग्य व्हावे, हीच इच्छा आहे. --संदेश हिवाळेचर्चा २१:१७, १३ जानेवारी २०२० (IST)[reply]
@आर्या जोशी: लेख स्वीकारताना/नाकारताना मी तुमची नंतरची विविध मुल्यांकने पाहिली. तुम्ही लेखांचे मुल्यांकन करताना सर्वांसाठी समान न्याय पद्धती वापरु शकला नाही, यावरुन तुमच्या मुल्यांकनाचा गोंधळ लक्षात येतो. एक परीक्षक म्हणून तुम्ही QueerEcofeminist यांचे पेक्षाही अधिक चूकीची मुल्यांकने केलेली आहेत. --संदेश हिवाळेचर्चा १५:३१, १६ जानेवारी २०२० (IST)[reply]

न पटलेली कारणे

संपादन
नक्की कश्यासाठी संदर्भ हवा आहे? "Incomplete Article" काय असत? किंवा "complete Article" काय आहे ते दाखवा आणि त्यातल्या तृट्या काढून दाखवतो. "Non Encyclopedic Writing" म्हणजे काय? असं काय Non Encyclopedic आहे ह्या लेखात? "No References quoted in article" पाच तर आहेत!!
नक्की कश्यासाठी संदर्भ हवा आहे? "Incomplete Article" काय असत? किंवा "complete Article" काय आहे ते दाखवा आणि त्यातल्या तृट्या काढून दाखवतो. "Less References quoted" किमान एवढे संदर्भ हवे असे कुठे वाचाले नाही.
  • अंधाधुन - "untranslated content" आणि "Incomplete Article Non Encyclopedic Writing apt References not quoted in Article".
लेखात काय अ-मराठी आहे? "Incomplete Article" काय असत? किंवा "complete Article" काय आहे ते दाखवा आणि त्यातल्या तृट्या काढून दाखवतो. "Non Encyclopedic Writing" म्हणजे काय? असं काय Non Encyclopedic आहे ह्या लेखात? "apt References not quoted in Article" कोणता संदर्भ अयोग्य आहे?
लेखात काय अ-मराठी आहे? "poorly sourced" नक्की कश्यासाठी संदर्भ हवा आहे?
नक्की कश्यासाठी संदर्भ हवा आहे? "Incomplete Article" काय असत? किंवा "complete Article" काय आहे ते दाखवा आणि त्यातल्या तृट्या काढून दाखवतो. "Less References quoted" किमान एवढे संदर्भ हवे असे कुठे वाचाले नाही.
नक्की कश्यासाठी संदर्भ हवा आहे?
नक्की कश्यासाठी संदर्भ हवा आहे? "Less References quoted" किमान एवढे संदर्भ हवे असे कुठे वाचाले नाही.

@आर्या जोशी आणि QueerEcofeminist: अधिक प्रश्न येणे आहे... धर्माध्यक्ष (चर्चा) ०८:४२, १४ जानेवारी २०२० (IST)[reply]


@आर्या जोशी: आपण चुकीची मुल्यांकने करत अनेक लेख अस्वीकार केलेत, त्यापैकी काही खालील लेख.

तुम्हाला खरेच या लेखात प्रताधिकार भंग दिसला का (लेख अस्वीकार करण्याइतपत)? लेखातील प्रताधिकार भंगाच्या ५% प्रमाणालाही तुम्ही "प्रताधिकार उल्लंघन" समजता का?
या लेखात प्रताधिकार भंग असल्याची खात्री तुम्ही नीट केली आहे का? तुम्ही तारीखा तपासल्या का?
हा @Rujuta5879: यांचा लेख अस्वीकरताना दिलेल्या कारणावर तुम्ही ठाम आहात का? प्रताधिकार भंगाच्या १३% प्रमाणालाही तुम्ही "प्रताधिकार उल्लंघन" समजता का?

कृपया प्रश्नांची उत्तरे द्यावीत, विकिसमाज प्रतिक्षेत आहे. --संदेश हिवाळेचर्चा ००:४६, १५ जानेवारी २०२० (IST)[reply]

@आर्या जोशी आणि QueerEcofeminist: सक्रिय असूनही आपण आमच्या प्रश्नांची उत्तरे का देत नाही? धर्माध्यक्ष (चर्चा) १३:४४, २१ जानेवारी २०२० (IST)[reply]

परीक्षकांच्या लेखांचे परीक्षकांद्वारे मुल्यांकन(!)

संपादन

@आर्या जोशी: या परीक्षकांनी सादर केलेल्या लेखांचे परीक्षकांनी (आर्या जोशी व @QueerEcofeminist: ) केलेली मुल्यांकन. विनंती, खालील मुद्दे व्यक्तिगत घेऊ नये, ते केवळ तुम्ही परीक्षक म्हणून केलेल्या मुल्यांकनाच्या गोंधळाबद्दल आहे.

परीक्षक आर्या जोशी यांनी या स्पर्धेत एकूण ९ लेख सादर केले आहेत, त्यापैकी सर्वच्या सर्व लेख (९) परीक्षक QueerEcofeminist यांनी स्वीकारले तर परीक्षक आर्या जोशी यांनी ७ लेख स्वीकारले व २ लेख अस्वीकारले.

@आर्या जोशी आणि QueerEcofeminist: तुम्हा दोघांस प्रताधिकार भंग चालत नाही, मग खालील प्रताधिकार भंग असलेले लेख कसे चालवून घेतले? कृपया कळवावे.

  • भोंडला – आर्या जोशी व QueerEcofeminist या लेखात २४.८% प्रताधिकार भंग असताना तुम्हा दोघांद्वारे हा लेख का स्वीकारला गेला?
  • मकरसंक्रांत — QueerEcofeminist या लेखात तब्बल ७३.२% प्रताधिकार भंग असताना सुद्धा हा लेख आपण का स्वीकारला? तुम्हाला येथील प्रताधिकार भंग शोधण्यासाठी थोडा वेळ का खर्च करावा वाटला नाही?
  • अभ्यंगस्नान – आर्या जोशी, आपण आंबेडकर जयंती लेखात ५% प्रताधिकार भंग असल्यामुळे तो लेख स्वीकारला नाही, मग असे कोणते कारण आहे तुम्ही की स्वतःचा ५.७% प्रताधिकार भंग असलेला हा लेख स्वीकारला?
  • कोजागरी पौर्णिमा – QueerEcofeminist या लेखात तब्बल ७२.५% तसेच ३२%, २१% व १८% प्रताधिकार भंग असताना आपण लेख का स्वीकारला? एक परीक्षक आहात म्हणून दुसऱ्या परीक्षकास ढील देत आहात काय की परीक्षकांच्या लेखांचा प्रताधिकार भंग शोधण्यात औचित्य वाटत नाही? आर्या जोशी, आपण हा लेख अस्वीकार करताना "Article created by Jury" असे संदिग्धः कारण का दिले? तुमच्यामते "परीक्षकाद्वारे लेख निर्मिती" हेच जर लेख अस्वीकाराचे योग्य कारण ठरत असेल तर मग तुम्ही निर्मिलेल्या/सादर केलेल्या ७ लेखांना तुम्ही का स्वीकारले? स्वतःच्या लेखात "प्रताधिकार भंग" आहे हे लेख अस्वीकाराचे योग्य कारण आपण का नाही सांगू शकलात?

आर्या जोशी व QueerEcofeminist, आपण परीक्षक नात्याने सर्व सहभागी सदस्यांनी सादर केलेल्या लेख मुल्यांकनाच्या बाबतीत खरेच निपक्ष किंवा तटस्थ आहात असे मला तरी दिसत नाही, धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा ००:२६, १५ जानेवारी २०२० (IST)[reply]