Sawaal Majha Aika! (en); सवाल माझा ऐका! (mr) film del 1964 diretto da Anant Govind Mane (it); 1964 film (en); film sorti en 1964 (fr); 1964 film (en); film India (id); 1964 ވަނަ އަހަރު ނެރުނު ފިލްމެއް (dv); фільм 1964 року (uk); film uit 1964 (nl)

सावल माझा ऐका! हा १९६४ मध्ये प्रदर्शीत झालेला मराठी भारतीय कृष्ण-धवल चित्रपट आहे. अनंत गोविंद माने यांनी त्यांच्या स्वतःच्या "चेतना चित्र" या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाची कथानक तमाशा या पारंपारिक लोकनाट्यावर आधारित आहे. या चित्रपटात सुलोचना चव्हाण यांनी गायलेली अनेक गाणी प्रसिद्ध आहेत.

सवाल माझा ऐका! 
1964 film
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारचलचित्र
मूळ देश
प्रमुख कलाकार
प्रकाशन तारीख
  • इ.स. १९६४
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

३१ मे १९६५ रोजी झालेल्या १२व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाने मराठीतील तिसऱ्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे प्रमाणपत्र जिंकले.[] अनंत माने यांच्या मागील दोन चित्रपट धक्ती जाऊ (१९५८) आणि मानिनी (१९६१) यांनी अनुक्रमे ६व्या आणि ९व्या सोहळ्यात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही जिंकले होते.

कथानक

संपादन

एका लोकप्रिय तमाशा गटातील ज्योतिबा हा तमाश्याच्या एका स्पर्धेत भाग घेतो आणि रघुच्या तमाशा गटाविरुद्धच्या स्पर्धा होते. स्पर्धा एक सांगीतिक प्रश्न-उत्तर आहे, आणि हरणाऱ्याने आयुष्यभर नऊवारी साडी (लुगडे) नेसावे अशी पैज आहे. ज्योतिबा ही स्पर्धा हरतो आणि त्याला अपमान सहन करावा लागला ज्यामुळे तो आणि त्याची पत्नी आत्महत्या करतात. तिच्या आई-वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्यांची लहान मुलगी अनु ह्या कला प्रकारात उत्कृष्ट काम करण्याचा निर्णय घेतला. ती रघुला पराभूत करण्यासाठी व त्याला लुगडे घालण्यास भाग पाडण्याचा प्रण घेते. अनु ही कुलकर्णी मास्टरच्या मार्गदर्शनाखाली नृत्य आणि गायन प्रशिक्षण घेते. १२ वर्षानंतर, ती एक तरुण आकर्षक स्त्री (आता जयश्री गडकर) म्हणून वाढते आणि शेवटी आपल्या कलाकारांचा संचासह स्पर्धेत प्रवेश करण्याचा निर्णय घेते.

जयवंता (अरुण सरनाईक), जो दुसऱ्या प्रतिस्पर्धी गटाचा नट आहे, तिच्यावर फिदा होते. त्याच्या कवितेवर प्रभावित होऊन, अनु त्याला आपल्या तमाश्याचा भाग बनवते. पण जेव्हा तीला हे कळते की जयवंत रघुचा मुलगा आहे ती तुटलेल्या मनाने स्पर्धेत हार मानण्याचे ठरवते. पण हार मानू नये म्हणून तिला तिची मावशीने प्रोत्साहित करते. म्हणून ती पुन्हा उभी राहते. कार्यक्रमाच्या मध्यभागी एका रात्री जयवंतचे कही सहयोगी थिएटरमधील दिवे तोडतात आणि अंधारात अनूचे अपहरण करतात. त्यानंतर अनुला असा विश्वास दिला जातो की हे अपहरण जयवंतनेच घडवून आणले होते. पण मग रघु येऊन तिला मुक्त करतो.

स्पर्धेच्या एक दिवस आधी, अनु आशीर्वाद घेण्यासाठी तिच्या शिक्षकांना भेटते. कुलकर्णी मास्टर तिला जिंकण्यासाठी शुभेच्छा देतो. कुलकर्णी मास्तरांचा जवळचा मित्र असलेला रघु याबद्दल मास्टरांवर निराश होतो. पण अनुसाठी हा विजय कसा महत्त्वाचा आहे हे मास्टर त्याला समजावून सांगतात. स्पर्धेत प्रश्नोत्तराच्या काही फेऱ्यांनंतर अनु जयवंतने विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देण्यास सक्षम ठरत नही. म्हणूनच ती विचार करण्यासाठी वेळ मागते आणि दुसऱ्या संध्याकाळी त्याला उत्तर देण्याचे सांगते. रघु प्रश्नाचे उत्तर अनुला कोणी उत्तर पाठविले हे न कळवताच पाठवते. दुसऱ्या दिवशी अनु जयवंतचा पराभव करते आणि त्याच्या वडिलांना म्हणजे रघुला लुगाडे घालण्यास बोलवते. रघु आपला पराभव स्वीकारतो. पण त्यानंतर अनुला त्याच्या महानतेतून कळले की त्यानेच तिला उत्तर सांगितले आणि तिला पुढील अपमानापासून वाचवले. अनु रघुकडे विनवणी करते आणि मग जयवंत आणि अनु पुन्हा आपले वैर मागे सोडून एकत्र येतात.

संगीत

संपादन

वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेल्या प्रसिद्ध लावणी आणि इतर गाणी जगदीश खेबुडकर यांनी लिहिली आहेत आणि बालराम, सुमन कल्याणपूर आणि सुलोचना चव्हाण यांनी गायली आहेत.

क्र. शीर्षक गायक
"सोळावा वरीस धोक्याच" सुलोचना चव्हाण
"कास काय पाटील बार हाय का" सुलोचना चव्हाण
"आगं अबला म्हणती" बालकराम, सुमन कल्याणपूर
"स्पार्श ना करिती" बालकराम
"सवाल माझा ऐका" बालकराम, सुलोचना चव्हाण
"हाती एकतारी, होउनी भिकारी" सुमन कल्याणपूर
"छुमक छुमा नाचे नार्तकी" बालकराम, सुमन कल्याणपूर
"मला वसंतसेना दिसाली" बालकराम, सुलोचना चव्हाण
"आम्ही इंद्रा घरच्य वारंगना" सुमन कल्याणपूर
१० "कसा गा बाई विडा रंगला लाल" सुमन कल्याणपूर
११ "सवाल जवाब" बालकराम, सुमन कल्याणपूर

संदर्भ

संपादन
  1. ^ "12th National Film Awards". International Film Festival of India. 25 फेब्रुवारी 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 23 मार्च 2012 रोजी पाहिले.