वसंत पवार हे मराठी संगीतकार होते. बहिणाबाईंच्या कविता मराठी चित्रपटांमध्ये जेंव्हा वापरल्यागेल्या तेंव्हा सुरुवातीला अनेक कवितांना संगीत देण्याची संधी पवारांना मिळाली. गदिमांबरोबर देखील त्यांनी खुप काम केले आहे असे दिसते.

जन्म वसंत पवार
इ.स. १९२०
मृत्यू ऑगस्ट ६, इ.स. १९६५
मिरज
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र संगीतकार
कारकीर्दीचा काळ इ.स. १९५० – १९६५
भाषा मराठी

मराठी बरोबर त्यांनी काही हिंदी चित्रपटांना देखील संगीत दिले.

कारकीर्द संपादन

मुळत: ते एक उत्कृष्ट सतारवादक होते. संगीताचा वारसा त्यांनी वडिलांकडून घेतला. त्यांचे वडील वादकवृंदाचे निर्देशन करत. ह्या शिवाय त्यांनी पार्श्वगायन देखील केले आहे.

तमाशाचा उल्लेख ते 'आमच्याकडे' हा शब्द वापरून करत [१]. त्यांनी पुढच पाऊल चित्रपटासाठी हंसा वाडकरांना नाच शिकवला होता.

१९५० साली आलेला चित्रपट केतकीच्या बनात हा त्यांनी संगीतबद्ध केलेला पहिला चित्रपट होता. हिंदी चित्रपटांत शिवलीला (१९५२) तर राम वढावकरांबरोबर महात्मा (१९५३) आणि नन्हे मुन्हे ह्या चित्रपटांना देखील संगीत दिले आहे.

अशा महान कलाकाराला त्याच्या आयुष्यात कधीच योग्य दर्जा किंवा मान्यता दिली गेली नव्हती याबद्दल काही संगीत प्रेमींना आजपर्यंत खेद आहे.

काही लोकप्रिय गाणी संपादन

छोट्या कारकिर्दीत देखील पवरांनी उल्लेखनिय आणि मधुर गाण्यांना संगीत दिले आहे. खाली काही मोजक्या गाण्यांची यादी दिली आहे.

मुखडा स्वर गीतकार चित्रपट
एकवार पंखावरूनी फिरो सुधीर फडके ग.दि. माडगूळकर वरदक्षिणा
अरे संसार संसार सुमन कल्याणपूर बहिणाबाई चौधरी मानिनी
कसं काय पाटील बरं हाय का? सुलोचना चव्हाण जगदीश खेबुडकर सवाल माझा ऐका
चांदण्या रात्रीतले ते स्वप्‍न तू विसरून जा माणिक वर्मा शांता शेळके
झुक झुक झुक झुक अगीनगाडी आशा भोसले ग.दि. माडगूळकर तू सुखी रहा
दिवा लाविते दिवा आशा भोसले ग.दि. माडगूळकर तू सुखी रहा
पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा सुलोचना चव्हाण ग.दि. माडगूळकर मल्हारी मार्तंड
बाळा जो जो रे आशा भोसले ग.दि. माडगूळकर बाळा जो जो रे
मला हो म्हणतात लवंगी मिरची सुलोचना चव्हाण जगदीश खेबुडकर रंगल्या रात्री अशा
सप्रेम नमस्कार विनंती विशेष ! वसंतराव देशपांडे, मधुबाला जव्हेरी ग.दि. माडगूळकर वैजयंता

संदर्भ व नोंदी संपादन

  1. ^ गुण गाईन आवडी (पुस्तक), लेखक पु.ल. देशपांडे, मौज प्रकाशन, आयएसबीएन ८१-७४८६-०४१-X

नोंदी संपादन

बाह्य दुवे संपादन