सुमन कल्याणपूर (जन्म जानेवारी २८, इ.स. १९३७ भवानीपूर, फाळणीपूर्व बंगाल) या गायिका असून त्यांनी हिंदी, मराठी चित्रपटगीतांबरोबरच अनेक मराठी भावगीतेही गायली आहेत. गुजराती, बंगाली, पंजाबी, ओडिसी या भाषांतही त्यांनी गाणी गायिलेली आहेत.

सुमन कल्याणपूर

जीवनसंपादन करा

सुमन कल्याणपूर यांच्या वडिलांचे नाव शंकरराव हेमाडी तर आईचे नाव सीताबाई होते. २७ एप्रिल १९५८ ला रामानंद कल्याणपूर यांच्याशी विवाहबद्ध.

सुमन कल्याणपूर यांची मराठी भावगीत गायनाची सुरुवात ग दि. माडगुळ्करांच्या गीतापासून झाली.नुकताच त्यांना पुलस्मृती पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

पुरस्कारसंपादन करा

  • गदिमा प्रतिष्ठानचा गदिमा पुरस्कार

सुमन कल्याणपूर यांची काही मराठी भावगीतेसंपादन करा

अ.क्र. गीत गीतकार संगीतकार
अक्रुरा नको नेऊ माधवा योगेश्वर अभ्यंकर दशरथ पुजारी
आकाश पांघरूनी मधुकर जोशी दशरथ पुजारी
उठा उठा चिऊताई कुसुमाग्रज कमलाकर भागवत
केतकीच्या बनी तिथे अशोकजी परांजपे अशोक पत्की
केशवा माधवा रमेश अणावकर दशरथ पुजारी
जुळल्या सुरेल तारा श्रीकांत पुरोहित दशरथ पुजारी
जेथे जातो तेथे संत तुकाराम कमलाकर भागवत
नकळत सारे घडले रमेश अणावकर दशरथ पुजारी
नाविका रे अशोकजी परांजपे अशोक पत्की
वाट इथे स्वप्नातिल अशोकजी परांजपे अशोक पत्की
शब्द शब्द जपुनि ठेव मंगेश पाडगावकर विश्वनाथ मोरेकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.