दालन:वनस्पती
वनस्पतीवनस्पतीची व्याख्या 'पुढील दहा गुणवैशिष्ट्ये असलेले उद्भिज् सृष्टीतील सजीव:(१) प्रकाशातील ऊर्जा वापरून स्वतःचे अन्न उत्पादन करण्याची क्षमता म्हणजे (२) अन्न साखर व स्टार्च या रूपात साठवणे (३) कडक पेशी भित्ती (४) पेशींमध्ये केंद्रकाचे अस्तित्व (५) बहुधा बहुपेशीय, परंतू एकपेशीयही असू शकतात (६) अमर्याद वाढीची क्षमता (७) सामान्यतः, पण नेहमीच नाही, धरून ठेवण्यासाठी मुळे, आधारासाठी खोड व अन्न तयार करण्यासाठी पाने यांचे अस्तित्व (८) प्राण्यांहून बाह्य उद्दीपनांना अतिशय हळू प्रतिसाद (९) मर्यादित हालचाली (१०) आलटून पालटून बीजाणू आणि पराग व अंडपेशी यांचे उत्पादन.' अशी करावी. वनस्पतींत शेवाळी, शैवाल, नेचे, आणि अपुष्प (उदाहरणार्थ सूचिपर्णी वृक्ष) व सपुष्प वनस्पतींचा समावेश होतो. | ||||
संक्षिप्त सूची | ||||
विशेष लेखआंबा हे विषुवृत्तीय प्रदेशात आढळणारे एक झाड व फळ आहे. अवीट गोडीच्या या फळाला कोकणचा राजा असेही संबोधले जाते. एप्रिल-जून हा या फळाचा मोसम आहे. आंब्याचा उगम नक्की कुठे झाला हे अज्ञात आहे परंतु दक्षिण आणि दक्षिणपूर्व आशियामधले मोठ्या प्रमाणातील जैववैविध्य पाहता आणि तेथील २५० ते ३०० लक्ष वर्षांचा fossils चा इतिहास पाहता आंब्याचा उगम ह्याच भागात झाला असावा असे मानण्यात येते.[१] दक्षिण आशियामधे हजारो वर्षापासून आंब्याची लागवड करण्यात येत आहे. दक्षिण आशिया तथा भारताच्या संस्कृतीमधे आंब्याला विशेष महत्व आहे. आंबा हे फिलिपाईन्सचे राष्ट्रचिन्ह आहे. आंब्याची पाने (डहाळ्या) अनेक धार्मिक हिंदू कार्यक्रमांत वापरण्यात येतात. |
|
तुम्ही काय करू शकता |