रामकृष्ण परमहंस
रामकृष्ण परमहंस (बंगाली : রামকৃষ্ণ পরমহংস) (पूर्वाश्रमीचे नाव गदाधर चट्टोपाध्याय)[१] (फेब्रुवारी १८,१८३६ - ऑगस्ट १६,१८८६) हे एकोणिसाव्या शतकातील भारतात बंगालमध्ये होऊन गेलेले जगद्विख्यात गूढवादी सत्पुरुष होते.[२] स्वामी विवेकानंद हे रामकृष्ण परमहंसांचे प्रमुख शिष्य होते.[३][४][५] आधुनिक भारतीय धर्मप्रबोधनात त्यांनी कामगिरी बजावली.[६][७][८] ते त्यांच्या शिष्यांमध्ये ईश्वराचे अवतार मानले जातात.[९]
रामकृष्ण परमहंस | |
पूर्ण नाव | रामकृष्ण परमहंस (जन्मनावः गदाधर चट्टोपाध्याय) |
जन्म | फेब्रुवारी १८, १८३६ कामारपुकुर, पश्चिम बंगाल |
मृत्यू | ऑगस्ट १६, १८८६ (वयः ५०) काशीपूर, कलकत्ता |
तत्त्वप्रणाली | अद्वैत वेदान्त, भक्ती |
प्रभावित | स्वामी विवेकानंद |
वडील | क्षुदिराम चट्टोपाध्याय |
आई | चंद्रमणीदेवी |
रामकृष्ण परमहंस ग्रामीण बंगालमधील एका गरीब वैष्णव ब्राह्मण परिवारात जन्मले. कोलकात्याच्या दक्षिणेश्वर काली मंदिरात त्यांनी काही काळ पौरोहित्य केले, त्यानंतर शाक्तपंथीयांच्या प्रभावाने काली आराधना सुरू केली.[१] रामकृष्णांच्या आरंभीच्या काही प्रसिद्ध आध्यात्मिक गुरूंमध्ये भैरवी ब्राह्मणी या साध्वीचा समावेश होतो. तंत्र व वैष्णव भक्तीमध्ये भैरवीला गती होती. नंतर रामकृष्णांच्या म्हणण्यानुसार एका अद्वैत वेदान्तीच्या मार्गदर्शनाखाली त्यांना निर्विकल्प समाधी अनुभवता आली. रामकृष्णांनी इतर धर्मांबाबतही, विशेषतः इस्लाम व ख्रिश्चन धर्माबाबत प्रयोग केले आणि हे सर्व धर्म एकाच ईश्वराकडे घेऊन जातात असे म्हणले.
ग्रामीण बंगाली भाषेतील छोट्या छोट्या कथांचा तेथील जनतेवर बराच प्रभाव पडला. त्यामुळे रूढार्थाने अशिक्षित असतानाही रामकृष्ण बंगाली विद्बज्जन समाजाचे व शिक्षित मध्यमवर्गाचे लक्ष वेधण्यास यशस्वी ठरले. १८७० च्या दशकाच्या मध्यापासून पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या बुद्धिजीवींवर त्यांचा प्रभाव पडला व नंतर ते बंगालमधील हिंदू प्रबोधनाचे उद्गाते ठरले.[१०]
सर्व धर्मीयांसाठी त्यांचा “जतो मत, ततो पथ” (जितकी मते, तितके पंथ) हा उपदेश सहिष्णुतेचे प्रतीक आहे.[१] परमहंसांचे खालील उद्गार प्रसिद्ध आहेत.
“ | माझा धर्म बरोबर, दुसऱ्यांचा धर्म चूक – हे मत योग्य नाही. ईश्वर एकच आहे, त्याला वेगवेगळे लोक भिन्न भिन्न नावाने पुकारतात. कोणी म्हणते गॉड, कोणी अल्ला, कोणी म्हणते कृष्ण, कोणी म्हणते शिव, कोणी म्हणते ब्रह्म. तळ्यात पाणी असते पण कोणी त्याला पाणी म्हणते, कोणी वॉटर तर कोणी जल. हिंदू त्याला जल म्हणतात, ख्रिश्चन वॉटर, मुसलमान म्हणतात पाणी, - पण वस्तू एकच असते. एक-एका धर्माचे एक-एक मत असते, एक-एक पथ असतो - परमेश्वराकडे घेऊन जाण्यासाठी; जशी नदी नाना दिशांहून येऊन एकाच सागरात विलीन होते.[११] | ” |
चरित्र
संपादनजन्म व बालपण
संपादनपश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्याच्या आरामबाग परिसरातील कामारपुकुर ग्रामी १८३६ साली एका दरिद्री धर्मनिष्ठ ब्राह्मण परिवारात रामकृष्ण परमहंसांचा जन्म झाला. वडील क्षुदिराम चट्टोपाध्याय व आई चंद्रमणीदेवी यांचे ते चौथे अपत्य होय. त्यांच्या जन्मापूर्वी आईवडिलांनी अनुभवलेल्या अनेक अलौकिक घटना सांगितल्या जातात. उदाहरणार्थ गरोदर चंद्रमणीदेवींच्या गर्भाशयात एका शिवलिंगापासून निघालेल्या ज्योतीने प्रवेश केला होता. जन्मकाली गयेस तीर्थयात्रेस गेलेल्या क्षुदिराम यांना गदाधर विष्णूचे स्वप्नात दर्शन झाले, म्हणून या बालकाचे नाव गदाधर ठेवण्यात आले.[१२]रामकृष्ण लहानपणी गदा या नावाने ओळखले जात. मातीच्या मूर्ती बनवण्यात त्यांचा हातखंडा होता. शालेय शिक्षणात त्यांना रुची नव्हती. तत्कालीन ब्राह्मण समाजात प्रचलित असलेल्या संस्कृत शिक्षणाचा ते “चालकला-बॉंधा बिद्या” (अर्थात ब्राह्मणाची पोटभरू विद्या) असा उपहास करीत.[१३][१४] गायन, वादन, कथेचे निरूपण आदि गोष्टींमध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवले.[१५] तीर्थयात्री, संन्यासी व गावातील पुराणिकांकडून कथा ऐकून त्यांची अल्पवयातच पुराण, रामायण, महाभारत व भागवत आदी ग्रंथांशी ओळख झाली.[१६] मातृभाषा बंगाली ते वाचू शकत असत;[१७] पण संस्कृत समजत असली तरी ते बोलू शकत नसत.[१८] पुरीच्या मार्गावर असलेल्या कामारपुकुर गावात आरामासाठी थांबलेल्या संन्याशांची सेवा करून त्यांची धर्मचर्चा ते ऐकत असत.
रामकृष्णांच्या स्मृतीनुसार सहा-सात वर्षांचे असल्यापासूनच त्यांच्यात आध्यात्मिक भावतन्मयता दिसू लागली. एकदा शेतात चालता चालता आकाशातील काळ्या मेघांच्या पांढऱ्या कडेस मोहित होऊन ते बाह्यज्ञानरहित झाले, नंतर आपल्या या अवस्थेचे त्यांनी अनिर्वचनीय आनंदाची अनुभूती असे वर्णन केले आहे.[१५][१९] बाल्यकाळात त्यांची भावतन्मयता – एकदा देवी विशालाक्षीच्या पूजेच्या वेळी व एकदा शिवरात्रीच्या जत्रेत शंकराचा अभिनय करतेवेळी दिसली होती.[२०]
१८४३ साली पितृनिधनानंतर परिवाराचा भार त्यांचे थोरले भाऊ रामकुमार यांनी स्वीकारला. या घटनेचा गदाधराच्या मनावर खोल परिणाम झाला. वडिलांच्या नसण्याने ते आईच्या खूप जवळ आले. घरची कामे व देवपूजेत बहुतांश काळ मग्न राहू लागले.[२१]गदाधराच्या किशोरवयात कुटुंबावरील आर्थिक संकट गहिरे झाले. रामकुमार यांनी कोलकात्यात पुरोहिताचा पेशा पत्करला. १८५२ साली भावास मदत करण्यासाठी गदाधर कलकत्यास आले.[२२]
दक्षिणेश्वर येथे पौरोहित्य
संपादन१८५५ साली कलकत्त्याच्या अस्पृश्य कैवर्त समाजातील एका धनिक जमीनदार पत्नी राणी रासमणीने दक्षिणेश्वर मंदिराची प्रतिष्ठापना केली. रामकुमार त्या मंदिरात प्रमुख पुजारी बनले.[२३] निम्नवर्णीय स्त्रीचे प्रतिष्ठित मंदिर असले तरी गदाधर कोणताही वेगळा भाव न बाळगता तेथे जात. त्यांनी तेथे भाऊ रामकुमार यांचे सहकारी म्हणून मूर्तीच्या साजसज्जेचे दायित्व स्वीकारले. १८५६ साली रामकुमारांच्या मृत्यूनंतर गदाधरांनी त्यांची जागा घेतली. मंदिराच्या वायव्य कोपऱ्यात त्यांना एक छोटीशी खोली देण्यात आली. येथेच त्यांनी जीवनाचा बहुतांश काळ घालवला.[२४] एका अंदाजानुसार राणी रासमणीचे जावई मथुरामोहन विश्वास यांनी गदाधरास 'रामकृष्ण' असे नाव दिले.[२५] दुसऱ्या मतानुसार हे नाव त्यांचे एक गुरू तोतापुरी यांनी दिले आहे.
रामकुमारांच्या मृत्यूनंतर रामकृष्णांची भावतन्मयता आणखी वाढली.कालीस ते आई व विश्वजननीभावाने पाहू लागले. या काळात ते देवीच्या प्रत्यक्ष दर्शनासाठी व्याकूळ झाले. दगडाची मूर्ती जिवंत होऊन अन्नग्रहण करेल अशी त्यांची श्रद्धा होती. पूजा करता करता देवीचे दर्शन न मिळाल्याने बऱ्याचदा ते चित्कारत. रात्री जवळच्या जंगलात जाऊन वस्त्र आदींचा त्याग करून ध्यान करीत असत.[२६] काही लोकांना रामकृष्ण वेडे झाल्याचे तर काहींना ईश्वरभक्तीत बुडाल्याचे वाटू लागले.[२७]
एक दिवस अस्थिर मनाने त्यांनी संकल्प केला की देवीचे दर्शन न झाल्यास प्राणत्याग करीन; तेव्हा देवळातील कक्ष प्रकाशाने उजळला. रामकृष्णांनी या अनुभवाचे असे वर्णन केले आहे :
“ | अद्भुत दर्शन मिळाल्याने मी संज्ञाशून्य झालो! अंतरंगात एक अननुभूत आनंदाचा स्रोत प्रवाहित झाला. घर, द्बार, मंदिर सर्व काही कुठेतरी लुप्त झाले – कुठेही काहीही नाही! आणि बघतो तर काय - एक असीम अनंत चेतन ज्योतिःसमुद्र! – जितके दूर बघतो तितके चारी दिशांना त्याच्या उज्ज्वल लाटा तर्जन-गर्जन करत जणू मला गिळायला महावेगाने अग्रसर होताहेत. पाहता पाहता त्या माझ्यावर कोसळल्या; मी दबला गेलो. मी धापा टाकीत जाणीवशून्य होऊन पडलो.[२८][२९][३०] | ” |
उपरोक्त घटनेनंतर रामकृष्णांनी कालीस संपूर्णतः आत्मसमर्पण केले. देवीजवळ त्यांनी बालसुलभ जवळिकीने प्रार्थना करणे सुरू केले. राणी रासमणी व जावई मथुरबाबू यांना रामकृष्णांना दीर्घ ब्रह्मचर्यामुळे कुठला तरी मानसिक रोग झाला असे वाटले.[३१][३२]
विवाह
संपादनकामारपुकुर गावात दक्षिणेश्वर येथे अतिरिक्त साधनेच्या श्रमाने रामकृष्ण वेडे झाले आहेत अशी वदंता पसरली. रामकृष्णांना विवाहबंधनात अडकवावे अशी त्यांची आई व मधले भाऊ रामेश्वर यांची इच्छा होती. संसाराच्या भाराने रामकृष्ण अध्यात्म विसरतील असे त्यांना वाटे.[३३] रामकृष्णांनी विवाहाला विरोध केला नाही. त्यांचा विवाह कामारपुकुर गावापासून तीन मैल वायव्येस असलेल्या जयरामवाटी गावच्या रामचंद्र मुखोपाध्याय यांची मुलगी असलेल्या पाच वर्षांच्या शारदेसोबत १८५९ साली झाला.[३४] तेव्हा रामकृष्णांचे वय तेवीस वर्षे होते. वयाचे असे मोठेपण तत्कालीन समाजात अप्रचलित नव्हते.[३३][३४]शारदामणीशी विवाह झालेला असला तरी लौकिक अर्थाने रामकृष्णांनी वैवाहिक जीवन स्वीकारले नाही. [३५]
साधना
संपादनविवाहानंतर पुन्हा त्यांनी मंदिराचे कामकाज पाहायला सुरुवात केली. या काळात त्यांची अध्यात्माचे सखोल ज्ञान घेण्याची इच्छा वाढली. ब्राह्मणांमधील खोटा जात्यभिमान दूर करण्यासाठी ते कनिष्ठ वर्गीयांच्या हातून अन्नग्रहण करू लागले. मंदिरात सेवेकरी म्हणून अंत्यज (अस्पृश्य) लोकांची नेमणूक केली.[३६][३७] सोन्याचांदीची नाणी मातीच्या ढिगाऱ्यात मिसळून त्याला रामकृष्ण “टाका माटि, माटि टाका” (धन माती, माती धन) असे म्हणत. पैसे गंगा नदीत फेकून देत. त्यांचे हे वर्तन काही लोकांना वेडसरपणाचे वाटे.[३७] असे म्हणतात की त्यांचा देह ह्या काळात इतका संवेदनशील झाला की झोपेत कोणी स्पर्श केला तरी तो आकसत असे.[३८] याच काळात त्यांच्या शरीरास तीव्र दाह होऊ लागला. त्यामुळे त्यांची झोप उडाली. यामुळे मंदिराचे दैनंदिन कामकाज प्रभावित झाले. डॉक्टरांना पाचारण्यात आले. पराकोटीचा आध्यात्मिक भावावेग हे या अवस्थेचे कारण आहे, यावर औषध नाही असे एका डॉक्टरचे मत पडले.[३९][४०]
भैरवी ब्राह्मणी व तंत्रसाधना
संपादन१८६१ साली भैरवी ब्राह्मणी नावाच्या योगिनी दक्षिणेश्वरी आल्या. त्यांचे मूळ नाव होते योगेश्वरी. वय चाळीसच्या आसपास होते.[४१] या योगिनींच्या पूर्वायुष्याविषयी माहिती उपलब्ध नाही.[४२] त्या हिंदू शास्त्र पंडिता व तंत्र साधिका होत्या.[४३][४४]श्रीरामकृष्णांनी भैरवींना स्वतःच्या भावतन्मयतेचे व देहपीडेचे अनुभव सांगितले. हा वेडेपणा नव्हे तर आध्यात्मिक ‘महाभाव’ आहे असे म्हणून भैरवींनी त्यांना आश्वस्त केले.[४५] विभिन्न शास्त्रार्थ देऊन त्यांनी दाखवून दिले की असा भाव राधा व चैतन्य महाप्रभू यांच्यामध्येही होता.[४६] भैरवींनी त्यांना शारीरिक पीडेच्या निराकरणाचा उपायही सांगितला.[४७]भैरवींच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामकृष्णांनी तांत्रिक साधना सुरू केली. या साधनेने त्यांच्या समस्त शारीरिक व मानसिक पीडा शमल्या.[४८][४९] भैरवींच्या मदतीने तंत्रविद्येत सांगितलेल्या ६४ प्रकारच्या साधना रामकृष्णांनी अभ्यासल्या.[४५] जप व पुरश्चरणासारखी मंत्रसाधना करून चित्त शुद्ध करून पूर्ण आत्मनियंत्रण मिळवले. तंत्रसाधनेत साधारणत: वामाचारासारख्या रूढ धर्मविरोधी पंथाचा अभ्यास असतो; ज्यात मांस, मत्स्य भक्षण, मद्यपान व यौनाचार अंतर्भूत असतात.[४५] रामकृष्णांच्या आत्मचरित्रात त्यांनी शेवटचे दोन प्रकार प्रत्यक्ष केले नाहीत पण मानसचिंतेतून वांछित फल मिळविले, असे लिहिले आहे.[४५] रामकृष्ण वामाचाराचा एक ज्ञानमार्ग म्हणून उल्लेख करीत, पण इतरांना या मार्गाचा अंगिकार करण्यास परावृत्त करत.[५०] नंतर विवेकानंदांनी एकदा प्रश्न केला असता त्यांचे उत्तर होते - “(हा मार्ग) मोठा अवघड, तोल गेला म्हणजे पतन निश्चित.” [५१][५२]
भैरवींनी श्रीरामकृष्ण यांना कुमारी पूजेची दीक्षा दिली. या पूजेत कुमारिकेला देवी समजून तिची पूजा करतात.[३४] रामकृष्ण हे कुंडलिनी योगातही तयार झाले.[४५] १८६३ साली त्यांची तंत्रसाधना पूर्ण झाली.[५३] वयाच्या अठराव्या वर्षी दक्षिणेश्वरी आलेल्या शारदादेवींची जगन्माता या नात्याने रामकृष्णांनी केलेली षोडशी पूजा हा त्यांच्या आध्यात्मिक साधनेतील अखेरचा टप्पा ठरतो.[५४] रामकृष्ण भैरवींस मातृभावाने बघत असत.[५५] दुसरीकडे भैरवींना ते परमेश्वराचे अवतार वाटत. त्यांनीच रामकृष्णांस प्रथम 'अवतार' म्हणून घोषित केले.[५५] परंतु रामकृष्ण स्वतःच्या अवतारत्वाविषयी उदासीन होते. हे पर्व त्यांच्या अध्यात्म-साधनेविषयीचे एक अत्यंत महत्त्वाचे पर्व म्हणून ओळखले जाते.[१][५६][५७]
वैष्णवीय भक्तिसाधना
संपादनवैष्णव भक्तिपंथात ईश्वराबद्दलच्या प्रेमाविषयी पाच भावांचा उल्लेख आहे – शान्त, दास्य, सख्य, वात्सल्य व मधुर.[५८] श्रीरामकृष्णांनी या भावांचा अभ्यास केला.[५९]कालीदर्शन व विवाहाच्या दरम्यानच्या काळात रामकृष्णांनी दास्यभावनेने साधना केली होती. स्वतःस हनुमान मानून प्रभू रामचंद्राची त्यांनी आराधना केली. या काळात त्यांचे हावभाव मारुतीप्रमाणे झाले होते. ते कंदमुळे खात, बहुतांश वेळ फांद्यांवर राहत. रामकृष्ण म्हणाले होते की या काळात त्यांचा मणकाही लवचीक झाला होता.[६०] दास्यभावाने सेवा करून त्यांनी सीतेचे दर्शनही घेतले होते.[५९][६०]नंतरच्या काळात राधाभावाने त्यांनी कृष्णाची प्रेमिक रूपाने भावसाधना केली.[५९] नवद्वीपमधील गौडीय वैष्णव पंथाचे प्रवर्तक चैतन्य महाप्रभू व नित्यानंद यांच्या जन्मस्थानी त्यांनी भ्रमण केले.कालीदर्शनांतर त्यांना शांती मिळाल्याचे सांगितले जाते.[५९]
वैष्णव पंंडित वैष्णवचरण श्रीरामकृृष्णांंकडे नेहमी येत.ते एकदा रामकृृष्णांंना कोलूटोला येथील चैतन्य सभेत घेऊन गेले.त्या सभेत रामकृृष्ण भावाविष्ट झाले अणि चैतन्यदेवांंच्या असनावर जाऊन बसले.हा त्यांंचा ईश्वरासाठीचा प्रमदोन्माद होता.[६१]
तोतापुरी व वेदान्तिक साधना
संपादन१८६४ साली तोतापुरी नामक परिव्राजक (फिरत्या) वेदान्तिक संन्याशाकडून रामकृष्णांनी संन्यास ग्रहण केला. त्यांच्या वर्णनानुसार तोतापुरी हे जटाजुटधारी नागसंन्यासी होते.[३०] तोतापुरी ‘नेति नेति’ दृष्टिकोणातून तत्त्वज्ञान मांडत. त्यांच्या मते सर्व काही माया आहे. मूर्तिपूजेचा ते उपहास करीत.[६२] तोतापुरींनी प्रथम रामकृष्णांना संन्यासदीक्षा दिली. त्यानंतर त्यांनी अद्बैत तत्त्वज्ञानाचे शिक्षण दिले.
“ | नित्यशुद्धबुद्धमुक्तस्वभाव, देशकालादि द्बारा सर्वदा अपरिच्छिन्न एकमात्र असे ब्रह्मच नित्य सत्य आहे. माया त्यास झाकाळून टाकते. ... नामरूपी दृढ शक्तीने हे तोडून बाहेर या. तुमच्यात उपस्थित आत्मतत्वाचा शोध घेण्यास स्वतःमध्ये डुबकी मारा.[६३][६४] | ” |
त्यांच्या मार्गदर्शनाखाली रामकृष्णांनी निर्विकल्प समाधी प्राप्त केली.[६५]अद्बैताच्या नाना तत्त्वांचे शिक्षण द्यायला ते ११ महिने दक्षिणेश्वरी राहिले.[६६]
इस्लाम आणि ख्रिश्चन धर्म
संपादन१८६६ मध्ये गोविंद राय या सुफी मताच्या हिंदू गुरूने रामकृष्णांना इस्लामचा परिचय घडवून दिला. रामकृष्णांनी म्हणले आहे की, "मी अल्लाच्या नावाचा जप करू लागलो, अरब मुस्लिमांप्रमाणे वस्त्रे परिधान करू लागलो, दिवसातून पाच वेळा प्रार्थना करू लागलो, हिंदू देव-देवतांच्या प्रतिमाही पाहणे मला नकोसे वाटू लागले - पूजा करणे दूरच. माझ्या मनातच हिंदू पद्धतीने विचार करणेच निघून गेले होते." रामकृष्णांच्याच म्हणण्यानुसार तीन दिवसांनंतर त्यांना असे दर्शन झाले की, "भारदस्त मेहेरनजर व पांढरी दाढी असलेले प्रेषितासारखे एक तेजस्वी व्यक्तित्व त्यांच्या शरीरात मिसळून गेले आहे."
१८७३ च्या अखेरीस ख्रिश्चन प्रथा पाळण्यास रामकृष्णांनी सुरुवात केली. शंभुचरण मल्लिक हा त्यांचा भक्त यावेळी बायबल वाचून दाखवीत असे. अनेक दिवस ख्रिश्चन विचार त्यांच्या मनात येत राहिले आणि कालीच्या मंदिरात जाण्याचा विचारही त्यांच्या मनात आला नाही. रामकृष्ण अशा एका दर्शनाचा अनुभव सांगतात की ज्यात मॅडोना व बालयेशूचे चित्र जिवंत झाले आणि येशू त्यांच्या शरीरात येऊन मिसळला. त्यांच्या खोलीत इतर दैवी प्रतिमांसोबत ख्रिस्ताचीही प्रतिमा होती आणि सकाळ-संध्याकाळ ते त्या प्रतिमेसमोर उदबत्ती लावीत असत.
श्रीरामकृृष्णांंनी सांंगितले आहे की "ईश्वराचे दर्शन होऊ शकते." परंंतु "सर्वधर्मसमन्वय"हा त्यांंच्या जीवनाचा महान उद्देश होता.एकीकडे हिंंदु धर्मांंतर्गत येणाऱ्या सर्व संंप्रदायांंचे अंंतिम उद्दाष्ट प्राप्त करून घेउन दुसरुकडे मुस्लिम आणि ख्राश्चन या धर्मांंतील आदर्शांंचा सुद्धा साक्षात्कार त्यांंनी करून घेतला होता.[६७]
शिष्य परिवार
संपादनश्रीरामकृष्णांंचे सर्वश्रुत शिष्य म्हणजे स्वामी विवेकानंंद. त्यांंच्यासह राखाल,भवनाथ,भूपती,नित्यगोपाल,दुर्गाचरण हेही त्यांंचे साधक होते.त्यांंचा साधक परिवार मोठा आहे. रामकृष्ण मिशन ही स्वामी विवेकानंद यांनी स्थापन केलेली संस्था रामकृष्णांच्या विचारांचा प्रसार करण्याचे कार्य करते.
ग्रंथसूची
संपादन- श्रीश्रीरामकृष्णकथामृत, श्रीम कथित, उद्बोधन कार्यालय़ कलकाता, प्रथम अखण्ड संस्करण, १९८६-८७
- श्रीश्रीरामकृष्णलीलाप्रसङ्ग, प्रथम भाग, स्बामी शरदानन्द, उद्बोधन कार्यालय, कलकाता, द्बादश संस्करण, १९६०
- श्रीश्रीरामकृष्णलीलाप्रसङ्ग, द्बितीय भाग, स्बामी शरदानन्द, उद्बोधन कार्यालय, कलकाता, एकादश संस्करण, १९६३
- श्रीरामकृष्णजीबनी, स्बामी तेजसानन्द संकलित, उद्बोधन कार्यालय, कलकाता, प्रथम प्रकाश, १९६२
- स्वामीजींच्या काळातील संघाच्या कार्यशैलीपासून सद्य रामकृष्ण संघाची वाटचाल कशी झाली याबाबतचा वि.रा. करंदीकरांचा ‘रामकृष्ण संघाचा इतिहास’
- Bhattacharyya, Somnath. "Kali's Child: Psychological And Hermeneutical Problems". 2008-03-15 रोजी पाहिले.
- Chetanananda, Swami. Ramakrishna As We Saw Him. St. Louis.
- Gupta, Mahendranath. The Gospel of Sri Ramakrishna.
- Hixon, Lex. Great Swan: Meetings With Ramakrishna. Burdett, N.Y.
- Paul Hourihan. Ramakrishna & Christ, the Supermystics: New Interpretations.
- Isherwood, Christopher. Ramakrishna and His Disciples. Hollywood, Calif. (reprint, orig. 1965)
- Jeffrey J. Kripal. Kali's Child: The Mystical and the Erotic in the Life and Teachings of Ramakrishna.
- Kripal, Jeffrey J. "Kālī's Tongue and Ramakrishna: 'Biting the Tongue' of the Tantric Tradition". 2007-07-10 रोजी पाहिले.[मृत दुवा]
- Max Muller. Ramakrishna: His Life and Sayings.
- Olson, Carl. The Mysterious Play of Kālī: An Interpretive Study of Rāmakrishna.
- Rajagopalachari, Chakravarti. Sri Ramakrishna Upanishad. ASIN B0007J1DQ4.
- Ramaswamy, Krishnan. Invading the Sacred: An Analysis of Hinduism Studies in America. Delhi, India.
- Rolland, Romain. Life of Ramakrishna.
- Saradananda, Swami. Sri Ramakrishna and His Divine Play. St. Louis.
- Saradananda, Swami. Sri Ramakrishna The Great Master. ASIN B000LPWMJQ.
- Satyananda Saraswati. Ramakrishna: The Nectar of Eternal Bliss.
- Torwesten, Hans. Ramakrishna and Christ, or, The paradox of the incarnation.
- Ananyananda, Swami. Ramakrishna: a biography in pictures.
- Tyagananda, Swami. "Kali's Child Revisited or Didn't Anyone Check the Documentation?". 2008-03-15 रोजी पाहिले.
संदर्भ
संपादन- ^ a b c d Smart, Ninian The World’s Religions (1998) p.409, Cambridge
- ^ Georg, Feuerstein. The Yoga Tradition. pp. p.600.CS1 maint: extra text (link)
- ^
Clarke, Peter Bernard. New Religions in Global Perspective. pp. p.209.
The first Hindu to teach in the West and founder of the Ramakrishna Mission in 1897, Swami Vivekananda,[...] is also credited with raising Hinduism to the status of a world religion.
CS1 maint: extra text (link) - ^
Jeffrey Brodd. World Religions: A Voyage of Discovery. pp. p.275.
In 1897 Swami Vivekananda returned to India, where he founded the Ramakrishna Mission, and influential Hindu organization devoted to education, social welfare, and publication of religious texts.
CS1 maint: extra text (link) - ^ Smith, Bardwell L. Hinduism: New Essays in the History of Religions. pp. p.93.CS1 maint: extra text (link)
- ^
Miller, Timothy. America's Alternative Religions. pp. pp.174-175.
…Bengalis played a leading role in the wider Hindu renaissance, producing what can be termed the Bengali "Neo-Vedantic renaissance"
CS1 maint: extra text (link) - ^ Pelinka, Anton. Democracy Indian Style. pp. pp.40-41.
The Bengali Renaissance had numerous facets including the spiritual (Hindu) renaissance, represented by the names of Sri Ramakrishna and Swami Vivekananda, the combination of spiritual, intellectual, and political aspects…
CS1 maint: extra text (link) - ^ Bhattacharyya, Haridas. The Cultural Heritage of India. University of Michigan. pp. p.650.CS1 maint: extra text (link)
- ^ Jackson, Carl T. Vedanta for the West. pp. p.78.CS1 maint: extra text (link)
- ^ Dehsen, Christian D. Von. Philosophers and Religious Leaders. pp. p.159.CS1 maint: extra text (link)
- ^ श्रीश्रीरामकृष्णकथामृत, श्रीम कथित, उद्बोधन कार्यालय, कलकाता, प्रथम खण्ड आवृत्ती, १९८६-८७, पृष्ठ २३९
- ^ Ramakrishna and His Disciples. pp. p.13.CS1 maint: extra text (link)
- ^
Transformation of Ramakrishna. pp. p.70.
The point to be made is that we are not dealing with an uneducated or ignorant ecstatic. Rather, because of his intelligence, his interest, his own study and his subsequent contact with Hindus of all schools of thought, we should realize that we are dealing with a well versed Hindu thinker who, because of the ecstatic nature of his religious experience, refused to be bound in and restricted by what he viewed as dry, rationalistic requirements of systematic discourse.
CS1 maint: extra text (link) - ^ Bhawuk, Dharm P.S. (February 2003). "Culture's influence on creativity: the case of Indian spirituality". International Journal of Intercultural Relations. Elsevier. 27 (1): pp. 1-22.
Scholars have called him "the illiterate genius"
CS1 maint: extra text (link) - ^ a b Isherwood, Christopher. Ramakrishna and His Disciples. pp. p. 28.CS1 maint: extra text (link)
- ^ Muller, Max. Râmakrishna his Life and Sayings. pp. pp.33.CS1 maint: extra text (link)
- ^ Saradananda, Swami. The Great Master. pp. p.59.CS1 maint: extra text (link)
- ^
Nikhilananda, Swami. The Gospel of Ramakrishna.
During my boyhood I could understand what the Sadhus read at the Lahas' house at Kamarpukur, although I would miss a little here and there. If a pundit speaks to me in Sanskrit I can follow him, but I cannot speak it myself.… The realization of God is enough for me. What does it matter if I don't know Sanskrit?
- ^ Swami Nikhilananda. The Gospel of Sri Ramakrishna. pp. p. 4.CS1 maint: extra text (link)
- ^ Neevel. Transformation of Sri Ramakrishna. pp. p.70.CS1 maint: extra text (link)
- ^ Neevel. Transformation of Sri Ramakrishna. pp. p.68.CS1 maint: extra text (link)
- ^ Ramakrishna and His Disciples. pp. p.37.CS1 maint: extra text (link)
- ^ Amiya P. Sen, "Sri Ramakrishna, the Kathamrita and the Calcutta middle Classes: an old problematic revisited" Postcolonial Studies, 9: 2 p 176
- ^ Isherwood, Christopher. Ramakrishna and his Disciples. pp. pp. 55–57.CS1 maint: extra text (link)
- ^ Life of Sri Ramakrishna, Advaita Ashrama, Ninth Impression, December 1971, p. 44
- ^ Kathamrita. 2. 2008-06-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-01-25 रोजी पाहिले.
When I [Ramakrishna] was in that state, everything blew away from me as if by the cyclone of Aswin. No indication of my previous life remained! I lost external awareness! Even my dhoti fell off, so how could I care for the sacred thread? I said to him, ‘If you once experience that madness for the Lord, you will understand.’
- ^ Muller, Max. Râmakrishna his Life and Sayings. pp. pp.37.CS1 maint: extra text (link)
- ^ श्रीश्रीरामकृष्णलीलाप्रसङ्ग, प्रथम भाग, पूर्बकथा ओ बाल्यजीबन, स्बामी सारदानन्द, उद्बोधन कार्यालय़य कलकाता, द्बादश आवृत्ती, १९६०, पृष्ठ ६५
- ^ Isherwood, Christopher. Ramakrishna and his Disciples. pp. pp. 65.CS1 maint: extra text (link)
- ^ a b Nikhilananda, Swami. The Gospel of Ramakrishna.
- ^ Gupta, Mahendranath. Kathamrita. 2008-05-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-01-25 रोजी पाहिले.
I used to cry uttering, ‘Mother, Mother’ in such a way that people would stand to watch me. At this state of mine someone brought a prostitute and made her sit in my room to tempt me and to cure me of my madness. She was a pretty woman with attractive eyes. I ran out of the room uttering, ‘Mother, Mother.’ And shouting for Haladhari, I said, ‘Brother, come and see who has entered in my room.’ I told about it to Haladhari and all others. In this state I used to weep uttering, ‘Mother, Mother’ and say to Her crying, ‘Mother, save me. Mother, purify me so that my mind may not go from the right to the wrong.’
- ^ Isherwood, Christopher. Ramakrishna and his Disciples. pp. p. 66–70.CS1 maint: extra text (link)
- ^ a b Nair, K. K. Sages Through Ages. 3. pp. p.13.CS1 maint: extra text (link)
- ^ a b c Sil, Divine Dowager, p. 42
- ^ वि. रा. करंदीकर मराठी विश्वकोश खंड १४, पृष्ठ ७९५
- ^ Yale, John. What Religion Is. pp. p.219.CS1 maint: extra text (link)
- ^ a b Muller, Max. Râmakrishna his Life and Sayings. pp. pp.42.CS1 maint: extra text (link)
- ^ J. N. Farquhar. Modern Religious Movements in India. pp. pp.195.CS1 maint: extra text (link)
- ^ Isherwood, Christopher. Ramakrishna and his Disciples. pp. p. 84.CS1 maint: extra text (link)
- ^ Muller, Max. Râmakrishna his Life and Sayings. pp. pp.39.CS1 maint: extra text (link)
- ^ Isherwood, p. 89
- ^ Isherwood, p. 89–90
- ^ The Gospel of Sri Ramakrishna, Introduction
- ^ Muller, Max. Râmakrishna his Life and Sayings. pp. pp.43-44.CS1 maint: extra text (link)
- ^ a b c d e Neevel, p. 74-75
- ^ Jestice, Phyllis G. Holy People of the World: A Cross-cultural Encyclopedia. pp. p.723.CS1 maint: extra text (link)
- ^ Muller, Max. Râmakrishna his Life and Sayings. pp. pp.43.CS1 maint: extra text (link)
- ^ Romain Rolland, p. 22–37
- ^
Jean Varenne. Yoga and the Hindu Tradition. pp. p.151.
we know that certain Tantric practices, condemned as shockingly immoral, are aimed solely at enabling the adept to make use of the energy required for their realization in order to destroy desire within himself root and branch
CS1 maint: extra text (link) - ^ Isherwood, p. 76, "I tell you, this is also one of the paths -- though it's a dirty one. There are several doors leading into a house -- the main door, the back door, and the door by which the sweeper enters to clean out dirt. So, this too, is a door. No matter which door people use, they get inside the house, all right. Does that mean you should act like them, or mix with them?"
- ^ श्रीश्रीरामकृष्णकथामृत, श्रीम कथित, उद्बोधन कार्यालय, कलकाता, प्रथम अखण्ड संस्करण, १९८६-८७, पृष्ठ १०८५ (बंगाली ग्रंथ)
- ^ Kathamrita. 2. 2008-06-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-01-25 रोजी पाहिले.
- ^ Isherwood, p. 101
- ^ वि. रा. करंदीकर मराठी विश्वकोश खंड १४, पृष्ठ ७९५
- ^ a b Rolland, Romain. The Life of Ramakrishna. pp. pp.22-37.CS1 maint: extra text (link)
- ^
Richards, Glyn. A Source-book of modern Hinduism. pp. p.63.
[Ramakrishna] received instructions in yogic techniques which enabled him to control his spiritual energy.
CS1 maint: extra text (link) - ^
Transformation of Ramakrishna. pp. p.70.
Ramakrishna's practice of tantra played a important role in Ramakrishna's transformation from the uncontrollable and self-destructive madman of the early years into the saintly and relatively self-controlled—if eccentric and ecstatic—teacher of the later years.
CS1 maint: extra text (link) - ^ Nikhilananda, Swami. The Gospel of Sri Ramakrishna. pp. p.115.CS1 maint: extra text (link)
- ^ a b c d Neevel, Walter G. Hinduism: New Essays in the History of Religions. pp. p.72-83.CS1 maint: extra text (link)
- ^ a b Isherwood, p. 70–73
- ^ संंक्षिप्त श्रीरामकृृष्णवचनामृृत, गुप्त महेंंद्रनाथ,रामकृृष्ण मठ नागपूर प्रकाशन , सन २०११
- ^ Harding, Elizabeth U. Kali: The Black Goddess of Dakshineswar. pp. p.263.CS1 maint: extra text (link)
- ^ श्रीश्रीरामकृष्णलीलाप्रसङ्ग, प्रथम खण्ड, साधकभाब, उद्बोधन कार्यालय, कलकाता, द्बादश संस्करण, १९६०, पृष्ठा १६७-६८
- ^ The Great Master, p. 255.
- ^ Roland, Romain The Life of Ramakrishna (1984), Advaita Ashram
- ^ "For six months in a stretch, I [Ramakrishna] remained in that state from which ordinary men can never return; generally the body falls off, after three weeks, like a mere leaf. I was not conscious of day or night. Flies would enter my mouth and nostrils as they do a dead's body, but I did not feel them. My hair became matted with dust." Swami Nikhilananda, Ramakrishna, Prophet of New India, New York, Harper and Brothers, 1942, p. 2
- ^ गुप्त महेंंद्रनाथ, संंक्षित श्रीरामकृृष्णवचनामृृत, रामकृृष्ण मठ नागपूर प्रकाशन
बाह्य दुवे
संपादन- रामकृष्ण परमहंस यांच्या बोधकथा
- रामकृष्ण कथामृत
- Ramakrishna, His Life and Sayings by मॅक्समुलर
- माझे गुरू Archived 2013-10-21 at the Wayback Machine.- स्वामी विवेकानंदांची १८९६ची भाषणे
- रामकृष्ण व स्वामी विवेकानंद यांचे कार्य
- Official website of the Headquarters of Ramakrishna Math and रामकृष्ण मिशन संकेतस्थळ Archived 2009-11-27 at the Wayback Machine.
- "रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य". 2006-07-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-01-25 रोजी पाहिले.
- रामकृष्ण परमहंस आणि स्वामी स्वरूपानंद यांच्यातील अनुबंध