पुराणे

(पुराण या पानावरून पुनर्निर्देशित)


पुराणे हे संस्कृत भाषेतील प्राचीन भारतीय ग्रंथ होत. मुख्य पुराणे हे एकूण १८ असून ती मह‍र्षी व्यास मुनी यांनी लिहिली असे मत प्रचलित आहे. भक्तीबरोबरच ज्ञान, कर्मकांड, योगविषयक तसेच भौतिक विषयांचे स्पष्टीकरण यांत आढळते. पुराणांचा लिहिण्याचा काळ वेदांच्या नंतरचा मानला जातो.

भारतीय पुराणे
हिंदू धर्मग्रंथावरील लेखमालेचा भाग
aum symbol
वेद
ऋग्वेद · यजुर्वेद
सामवेद · अथर्ववेद
वेद-विभाग
संहिता · ब्राह्मणे
आरण्यके  · उपनिषदे
उपनिषदे
ऐतरेय  · बृहदारण्यक
ईश  · तैत्तरिय · छांदोग्य
केन  · मुंडक
मांडुक्य  ·प्रश्न
श्वेतश्वतर  ·नारायण
कठ
वेदांग
शिक्षा · छंद
व्याकरण · निरुक्त
ज्योतिष · कल्प
महाकाव्य
रामायण · महाभारत
इतर ग्रंथ
स्मृती · पुराणे
भगवद्गीता · ज्ञानेश्वरी · गीताई
पंचतंत्र · तंत्र
स्तोत्रे ·सूक्ते
मनाचे श्लोक · रामचरितमानस
शिक्षापत्री · वचनामृत

पुरा नवंं भवति इति पुराणम् । जे प्राचीन असूनही नित्यनूतन भासते ते पुराण अशी याची व्याख्या केली जाते.

नारद पुराणामध्ये पुराणांचे महत्त्व सांगताना वरील पंक्ती आली आहे. पुराणांमध्ये वेद प्रतिष्ठित आहेत म्हणजेच वेदोक्त बाबींच्या आधारावरच पुराणांची रचना होते . त्यामुळे सर्व पुराणे ही वेदमूलकच असतात अशी धारणा आहे.

स्वरूप संपादन

महाभारताप्रमाणे पुराणे ही देव व सिद्ध पुरुष यांच्या कथा होत. एकूण १८ पुराणे व १८ उपपुराणे आहेत. पुराणांमध्ये राजधर्म, न्यायव्यवस्था, धर्मशास्र, देवतांंच्या स्तुतिपर कथा, आयुर्वेद, रत्नशास्र, विविध तीर्थक्षेत्रांंचे वर्णन इत्यादी विषयांंचे वैपुल्य आढळते. पुराणे हा एक प्रकारचा इतिहास आहे.

लक्षणे संपादन

पुराण कशाला म्हणावे याची व्याख्या मत्स्यपुराणात केलेली आहे ती पुढीलप्रमाणे

सर्गश्च प्रतिसर्गश्च वंशो मन्वंतराणि च।
वंशानुचरितं चैव पुराणं पंचलक्षणम् ॥
 • १) सर्ग - सृष्टीची निर्मिती
 • २) प्रतिसर्ग - सृष्टीचा लय
 • ३) वंश - विविध वंशांची उत्पत्ती व वृद्धी
 • ४) मन्वंतर - प्रत्येक मन्वंतराचे वैशिष्ट्य
 • ५) वंशानुचरित -

या पाच लक्षणांनी युक्त संहितेला पुराण म्हणतात. भारतीय पुराणे म्हणजे इतिहास आहे असे मानले जाते. पण प्रत्यक्षात पुराणांत इतिहास आहे.

अठरा पुराणांची नावे संपादन

मद्वयं भद्वयं चैव ब्रत्रयं वचतुष्टयम्।
अनापलिंगकूस्कानि पुराणानि पृथक्पृथक् ॥​​या श्लोकानुसार खालीलप्रमाणे एकूण अठरा पुराणे आहेत.
अष्टादशपुराणानामस्मरणं कर्तुम् एकं सामान्यमश्लोकमस्ति‚ येन एतेषां पुराणानां नामानि सरलतया स्मर्तुं शक्यते ।
म–द्वयं भ–द्वयं चैव ब्र–त्रयं व–चतुष्टयम् । अ–ना–प–लिं–ग–कू–स्कानि पुराणानि प्रचक्षते ।।[१]
 1. अग्नि पुराण
 2. कूर्म पुराण
 3. गरुड पुराण
 4. नारद पुराण
 5. पद्म पुराण
 6. ब्रह्म पुराण
 7. ब्रह्मवैवर्त पुराण
 8. ब्रह्मांड पुराण
 9. भविष्य पुराण
 10. भागवत पुराण (देवीभागवत पुराण )
 11. मत्स्य पुराण
 12. मार्कंडेय पुराण
 13. लिंग पुराण
 14. वराह पुराण
 15. वामन पुराण
 16. वायु पुराण (शिव पुराण) [२]
 17. विष्णु पुराण
 18. स्कंद पुराण
इति एतानि अष्टादशपुराणानि सन्ति ।।

उपपुराणे संपादन

[३]

महर्षि वेदव्यासांने लिहिलेल्या १८ पुराणांच्या काही उपपुराण रचना आहेत. उपपुराणे ही पुराणांचे संक्षिप्त रूप होय. उपपुराणाची संख्या बहुधा २७ आहे.[४]

 • आदित्यपुराण
 • आचार्य पुराण
 • एकाम्र पुराण
 • औशनस पुराण ( उशनः पुराण,उशनस् पुराण, उश्ना पुराण)
 • कपिलपुराण
 • कल्कि पुराण
 • कालिकापुराण
 • गणेश पुराण
 • दत्त पुराण
 • दुर्वास पुराण
 • नंदीकृत पुराण
 • नीलमत पुराण
 • नृसिंहपुराण (नरसिंह पुराण)
 • पराशरपुराण
 • प्रज्ञा पुराण
 • भार्गवपुराण
 • मनुपुराण
 • मरीच पुराण
 • माहेश्वरपुराण
 • मुद्गल पुराण
 • वारुणपुराण
 • वाशिष्ठपुराण
 • विष्णूधर्मोत्तर पुराण
 • शिवधर्म पुराण
 • सनत्कुमार पुराण
 • सांबपुराण
 • साळीमाहात्म्य पुराण
 • सिद्धाराम पुराण
 • सौरपुराण
 • हरिवंश पुराण .
 १. ‘इतिहासपुराणाभ्यां वेदं समुपबृंह्येत् |’
 श्रुतिस्मृती उभे नेत्रे पुराणं ह्रदयं स्मृतम् |
 एतत्त्रयोक्त एव स्याद् धर्मो नान्यत्र कुत्रचित् ||’
            देवी भागवत ११/१/२१
 २ नाद्पुराण २ / १४ / १७

संदर्भ यादी संपादन

 1. ^ "अष्टादश पुराणानि ।". संस्‍कृतजगत्. Archived from the original on 2018-10-08. 2019-09-13 रोजी पाहिले.
 2. ^ "उपपुराण - भारतखोज". bharatkhoj.org. 2019-09-13 रोजी पाहिले.
 3. ^ "उपपुराण - भारतकोश, ज्ञान का हिंदी महासागर". stage.bharatdiscovery.org. 2019-09-13 रोजी पाहिले.[permanent dead link]
 4. ^ "जानिए 18 पुराण के बारे में अद्भुत जानकारी". Nai Dunia (हिंदी भाषेत). 2019-09-13 रोजी पाहिले.