ब्रह्म पुराण

मध्ययुगीन काळातील संस्कृत ग्रंथ, अठरा प्रमुख पुराणांपैकी एक

ब्रह्मपुराण हे हिंदू पुराण आहे. हे १८ पुराणांपैकी प्रथम पुराण मानले जाते. दैवी भागवतात मात्र याला पाचवा क्रमांक दिला आहे. यामध्ये २४६ अध्याय व जवळजवळ १३,००० श्लोक आहेत. इ.स.सातव्या किंवा आठव्या शतकापूर्वी ब्रह्म पुराण निर्माण झाले असावे असे संशोधक म्हणतात.

स्वरूपसंपादन करा

ब्रह्म पुराणाचा सांख्य तत्त्वज्ञानवर भर आहे.. कराल जनकाने प्रश्न विचारल्यावर वसिष्ठ ऋषी त्याला काही महत्त्वाचे सांख्य सिद्धान्त समजावून सांगत आहेत. याखेरीज मनुष्याची पाप-पुण्यानुसार मरणोत्तर स्थिती, यमलोक, नरक, श्राद्धकल्प, सदाचार इत्यादी गोष्टींचे वर्णनही प्रस्तुत पुराणात आले आहे. या पुराणात जागोजागी अनेक नीतितत्त्वे सुभाषितरूपाने सांगितली आहेत. उदा०

इन्द्रियाणि वशे कृत्वा यत्र यत्र वसेन्नरः| तत्र तत्र कुरुक्षेत्रं प्रयागं पुष्करं तथा||

म्हणजे इंद्रिये स्वाधीन ठेवून मनुष्य जिथे जिथे राहील ते ते स्थान त्याच्या वाट्याचे कुरुक्षेत्र, प्रयाग किंवा पुष्कर होय.

ब्रह्म पुराणावरील मराठी पुस्तकेसंपादन करा

  • श्रीब्रह्म पुराण (संपादक - दत्ता कुलकर्णी)