कल्प हे वेदांमधील म्हणजेच संहितांमधील विविध संकल्पना समजावून सांगण्यासाठी रचले गेलेले सूत्रग्रंथां होय. शिक्षा, कल्प.व्याकरण,निरुक्त,छन्द आणि ज्योतिष अशी शा वेदांगे आहेत. त्यातील कल्प हे दुसरे वेदांग आहे.कल्पो वेद विहितानां कर्मणामानुपूर्व्येण कल्पना शास्त्रम | कल्प म्हणजे वेदविहित कर्माची क्रमबद्ध मांडणी किंवा शास्त्र होय.[१]

हिंदू धर्मग्रंथावरील लेखमालेचा भाग
aum symbol
वेद
ऋग्वेद · यजुर्वेद
सामवेद · अथर्ववेद
वेद-विभाग
संहिता · ब्राह्मणे
आरण्यके  · उपनिषदे
उपनिषदे
ऐतरेय  · बृहदारण्यक
ईश  · तैत्तरिय · छांदोग्य
केन  · मुंडक
मांडुक्य  ·प्रश्न
श्वेतश्वतर  ·नारायण
कठ
वेदांग
शिक्षा · छंद
व्याकरण · निरुक्त
ज्योतिष · कल्प
महाकाव्य
रामायण · महाभारत
इतर ग्रंथ
स्मृती · पुराणे
भगवद्गीता · ज्ञानेश्वरी · गीताई
पंचतंत्र · तंत्र
स्तोत्रे ·सूक्ते
मनाचे श्लोक · रामचरितमानस
शिक्षापत्री · वचनामृत


सद्यस्थितीत ४० कल्पसूत्रे उबलब्ध असून १४ श्रौतयज्ञ,७ गृहयज्ञ, ५ महायज्ञ व १६ संस्कार अहा एकून ४२ कर्माबद्दलचे प्रतिपादन आहे.

यज्ञप्रयोगांची सुव्यवस्थित मांडणी करण्याच्या हेतूने वैदिक आचार्यांनी ब्राह्मण ग्रंथातील उपयुक्त असा भाग घेऊन कल्पसूत्रे तयार केली.कर्मकांडविषयक सर्व विधि-नियम कल्पसूत्रे सांगतात.वैदिक धर्मातील सर्व कर्म,सर्व संस्कार,अनुष्ठाने,प्राचीन हिंदूंच्या जीवनाची नित्य -नैमित्तेक कर्मे,धार्मिक क्रिया,संस्कृती या सर्वांचा मूळ आधार कल्पसूत्रात सापडतो.कमीत कमी शब्दांमध्ये अधिकाधिक भाव व्यक्त करणे हे सूत्रांचे वैशिष्ट्य आहे.संक्षिप्तपणामुळे वेदोक्त विधी पाठ करणे सोपे जाते.[२]

विभाग

संपादन
  • श्रौतसूत्रे - यांत विविध यज्ञांची माहिती या ग्रंथात सूत्ररूपात दिलेली आहे. वैदिक हवि,तसेच सोमयज्ञासंबंधी धार्मिक अनुष्ठाने यांचे प्रतिपादन करणे हे त्यांचे मुख्य काम आहे. आश्वलायन,शांखायन,मानव,बौधायन,आपस्तम्ब,हिरण्यकेशी,कात्यायन,लाट्यायन,द्राह्यायण,जैमेनीय,वैतान ही मुख्य श्रौतसूत्रे आहेत.
  • गृह्यसूत्रे - गृहस्थाने करावयाच्या विविध आचारांची माहिती या सूत्रग्रंथात आहे.आश्वलायन,शांखायन,मानव,बौधायन,आपस्तम्ब,हिरण्यकेशी,भारद्वाज,कात्यायन,द्राह्यायण,गोभिल,खदिर,कौशिक ही मुख्य गृह्यसूत्रे आहेत
  • धर्मसूत्रे - आचरणाचे विविध नियम आणि धर्मकृत्यांची माहिती यामध्ये दिएलेली आहे.सामाजिक रीतिरिवाज,प्रथा यांच्या अनुषंगाने समाजातील घटकांच्या परस्परांशी आलेल्या संबंधावर ही सूत्रे भाष्य करतात.वसिष्ठ,मानव,बौधायन,आपस्तम्ब,गौतम ही मुख्य धर्मसूत्रे होत.
    [३]

संदर्भ

संपादन
  1. ^ भारतीय संस्कृती कोश खंड दुसरा
  2. ^ डॉ.पांडे सुरुचि,संस्कृत साहित्याचा इतिहास भाग १,ज्ञान प्रबोधिनी प्रकाशन
  3. ^ डॉ.पांडे सुरुचि,संस्कृत साहित्याचा इतिहास भाग १,ज्ञान प्रबोधिनी प्रकाशन