नीलमत पुराण
नीलमत पुराण हा इसवी सनाच्या ६व्या ते ८व्या शतकात लिहिला गेलेला एक प्राचीन ग्रंथ आहे. या ग्रंथात काश्मीरचा इतिहास, भूगोल, धर्म आणि लोकगीते यांच्या बाबतीतली माहिती आहे.
कल्हणाने काश्मीरच्या इतिहासावरचा राजतरंगिणी नावाचा ग्रंथ लिहिताना नीलमत पुराणाचा आधार घेतला आहे.