कालिका
(काली (देवता) या पानावरून पुनर्निर्देशित)
कालिका ही सप्तमातृकांपैकी एक मातृका आहे.ती काळ्या मेघासारख्या रंगाची, केस मोकळे सोडलेली व विवस्त्र अशी आहे.तिला तीन नेत्र आहेत व तिचा चेहरा रागाने लाल झालेला आहे.तिच्या सभोवताल प्रेतांचा खच पडलेला आढळतो. ती शिवाच्या शरीरावर आरूढ असलेली आहे. गळ्यात व कानात नरमुंड व तिच्या वरचे बाजूस असलेल्या डाव्या हातात नुकतेच कापलेले नरमुण्ड असून त्यातील वाहणारे रक्त खालच्या बाजूस डाव्या हातात असलेल्या कपालात जमा होत असते. तिचे वरील बाजूचे उजव्या हातात रक्त लागलेले खड्ग आहे. तिचा खालचा उजवा हात अभयमुद्रेत आहे. अशाप्रकारे हिचे वर्णन आहे.[१]
हेही बघा
संपादनसंदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ डॉ. रमा गोळवलकर. तरुण भारत, नागपूर. आसमंत पुरवणी पान क्र. ८ http://tarunbharat.net/stepaper.aspx?lang=3&NB=2017-10-22&spage=Asmpage&SB=2016-09-11#Asmpage_8 तरुण भारत, नागपूर. आसमंत पुरवणी पान क्र. ८ Check
|दुवा=
value (सहाय्य). २३ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले. Missing or empty|title=
(सहाय्य)