महाशिवरात्री

(महाशिवरात्र या पानावरून पुनर्निर्देशित)

माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला हिंदू समाजात महाशिवरात्र म्हणतात. [१] प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते. मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा मोठा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात,[२] भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास संपवतात. [३][४]उत्तर भारतात हाच दिवस फाल्गुन महिन्यात गणला जातो, तर इंग्रजी महिन्याप्रमाणे हा दिवस फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येतो.

पुणे येथील मंदिरात महाशिवरात्री उत्सव

प्राचीनता आणि महत्त्वसंपादन करा

 
महाशिवरात्रीनिमित्त चक्क्याची विशेष पूजा

संस्कृत पुराण साहित्यापैकी अग्नी पुराण, शिव पुराण, पद्म पुराण या ग्रंथांमध्ये महाशिवरात्री व्रताचे महत्त्व सांगितले आहे.[५] या दिवशी बेलाची पाने वाहून शिवाची पूजा करावी असे या व्रताचे स्वरूप आहे.[६]

आख्यायिकासंपादन करा


 • एक शिकारी होता. तो शिकार करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवीत असे. एके रात्री तो शिकारीला गेला आणि झाडावर चढून बसला. ते झाड बेलाचे होते आणि त्याखाली शिवलिंग होते. सावज नीट दिसावे म्हणून शिकारी झाडाची पाने खुडून खाली टाकू लागला. नेमकी ती बेलाची पाने त्याच्या नकळत खालच्या शिवलिंगावर पडत राहिली. पहाटे एक हरीण तिथे आले. शिकारी त्यावर बाण मारणार तोवर हरीण म्हणाले मी माझ्या कुटुंबाला भेटून येतो.त्यानंतर हरणाचे सर्व कुटुंब तिथे आले आणि सगळीच म्हणू लागली- "मला मार पण इतराना सोडून दे." हे पाहून त्याला आश्चर्य वाटले. त्याने त्या कुटुंबाला निघून जाऊ दिले आणि नंतर त्याने शिकार करणे सोडून दिले. त्याच्या नकळत त्याला त्या रात्री उपवास घडला, पूजा झाली आणि व्रत झाले त्यामुळे तो पावन झाला. हा व्याध आजही आकाशात दिसून येतो असे मानले जाते.[८][९]
 
कोटेश्वर महादेव मंदिर महाशिवरात्री पूजा

पूजापद्धतीसंपादन करा

महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा होते. पंचगव्य म्हणजे गायीचे दूध, तूप, शेण, गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक करतात. त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखर या पंचामृताने शिवलिंगावर लेप देतात.[१०]. त्यानंतर धोत्रा आणि बेलाची पाने तसेच पांढरी फुले वाहून पूजा करतात.[११] शिवलिंगावर चक्का थापण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. [१२]

 • उपवास-

महाशिवरात्रीच्या निमित्ताने भाविक उपवास करतात. काही भक्त दूध आणि फळे असा आहार घेतात.[१३]

भारताच्या विविध राज्यातसंपादन करा

दक्षिण भारतात आदल्या दिवशी एकभुक्त व्रत केले जाते. म्हणजे आदल्या दिवशी एक भोजन केले जाते. रात्री पवित्र जागी झोप घेतली जाते. नदीत स्नान करून शिवाचे दर्शन घेतले जाते.[१४] शिवाला कमल अर्पण करून तांदुळाच्या खिरीचा नैवेद्य दाखविला जातो. ऋग्वेदातील सूक्ते म्हटली जातात. तुळशीची पाने आणि पायसाचा (खिरीचा) नैवेद्य आणि यजुर्वेदाचे पठण, बेलाची पाने आणि तीळ घातलेला भाताचा नैवेद्य आणि सामवेदाचे पठण, निळी कमळे वाहून साध्या अन्नाचा नैवेद्य आणि अथर्ववेदाचे पठण केले जाते.[१०]

काश्मीरमध्ये महाशिवरात्री दरम्यान होणारी बर्फवृष्टी ही पवित्र मानली जाते. शंकराचार्य टेकडी येथील मंदिरात भक्त दिवसभर दर्शनासाठी जातात. पूजेचे पदार्थ, अक्रोड, कमळाची फुले यांची विक्री करणारी दुकाने मंदिर परिसरात थाटली जातात.[१५]

यात्रासंपादन करा

महाशिवरात्रीच्या निमित्ताने भारतभरात विविध तीर्थक्षेत्रे, तसेच प्रामुख्याने बारा ज्योतिर्लिंगांच्या स्थानी विशेष यात्रा भरतात.[१६][१७]

 
महाशिवरात्री यात्रा

महाशिवरात्रीच्या दिवशी भरणाऱ्या महाराष्ट्रातील यात्रासंपादन करा

 • श्री अगस्ती मंदिर, ता: अकोले, जिल्हा : अहमदनगर
 • अंबरनाथ जिल्हा ठाणे, येथील पुरातन शिव मंदिर.
 • आरमोरी तालुक्याच्या मुख्यालयाजवळच्या पहाडीवरील महादेवगड मंदिर येथे
 • औरंगाबादपासून ३५ किलोमीटरवर असलेल्या वेरूळ लेण्यांच्या जवळचे गरुडेश्वर मंदिर येथे.
 • आष्टीनजीकच्या चपराळा येथील हनुमान मंदिर प्रशांतधाम परिसरातील यात्रा
 • औंढा नागनाथ येथील यात्रा
 • कोल्हापूरपासून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या कणेरी येथील यात्रा
 • खडकेश्वर, (औरंगाबाद)
 • गडचांदूर (चंद्रपूर जिल्हा)
 • गडचिरोली जिल्ह्यातल्या कुरखेडा तालुक्‍यातील खोब्रामेंढा येथील मंदिर परिसरातील यात्रा
 • गडचिरोली जिल्ह्यातल्या कुरखेडा तालुक्यातील अरततोंडी येथील मंदिर परिसरातील यात्रा
 • घारापुरी लेण्यांजवळ (मुंबई) येथील यात्रा
 • घृष्णेश्वर, दौलताबाद-मराठवाडा[१८]
 • चामोर्शी तालुक्‍यातील मार्कंडादेव येथील मार्कंडेश्‍वर मंदिर परिसरातील यात्रा
 • ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा रेल्वे स्टेशनानजीकचे गंगा गोरजेश्वर देवस्थान परिसरातील यात्रा
 • देवगडजवळची कुणकेश्वरची यात्रा
 • परळी वैजनाथ, बीड जिल्हा
 • पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यातील आंबिस्ते गावात असलेल्या नागनाथ मंदिर परिसरात. हे गाव वाडा तालुक्यातील खनिवलीपासून दोन कि.मी.अंतरावर आहे.
 • बनेश्वर (पुणे जिल्ह्यातील नसरापूर) येथे.
 • भीमाशंकरची यात्रा
 • राजापूर शहरानजीक असलेल्या मौजे धोपेश्वर गावातील धूतपापेश्वर देवस्थानाच्या परिसरातली यात्रा.
 • वैरागडचे भंडारेश्‍वर मंदिर परिसरातील यात्रा
 • शिवणी-डोंगरगावजवळील चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपुरी तालुक्‍याच्या आवळगाव येथील सुप्रसिद्ध गुरुबाबा देवस्थान परिसरातील यात्रा
 • सांगली जिल्हा कवठे महांकाळ येथे
 • सातारा जिल्ह्यातील लिंब गोवे येथील कोटेश्‍वर मंदिराच्या परिसरात
 • श्री सिद्धेश्वर रत्नेश्र्वर देवस्थान (लातूर) येथील यात्रा[१९]

हे ही पहासंपादन करा

शिव

बाह्यदुवेसंपादन करा

 • "महाशिवरात्रीची कथा आणि महत्त्व".

चित्रदालनसंपादन करा

संदर्भसंपादन करा

 1. ^ Marāṭhī viśvakośa. Mahārāshṭra Rājya Sāhitya Sāskr̥ti Maṇḍaḷa. 1973.
 2. ^ "Maha Shivratri 2020: कब है महाशिवरात्रि? जानें इस पर्व का महत्त्व". अमर उजाला. ३.२.२०२०. १०. २. २०२० रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 3. ^ Shandilya, Rajeshwari (2009-01-01). Bharatiya Parva Evam Tyohar (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 9788173156175.
 4. ^ Deśiṃgakara, Viṭhṭhala Śrīnivāsa (1977). Vrata-siromani. Sha. Vi. Desingakara.
 5. ^ Khole, Gajānana Śã (1991). Kuḷadharma-kulācāra-kuladaivate. Indrāyaṇī Sāhitya.
 6. ^ Shandilya, Rajeshwari (2009-01-01). Bharatiya Parva Evam Tyohar (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 9788173156175.
 7. ^ "Maha Shivaratri 2020: Puja Samagri, Vidhi, Vrat Katha, Aarti and Muhurta". english jagran. 20. 2. 2020. 20. 2. 2020 रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 8. ^ जोशी, महादेवशास्त्री (२०००). भारतीय संस्कृती कोश खंड सातवा. पुणे: भारतीय संस्कृती कोश मंडळ प्रकाशन. pp. २५०.
 9. ^ Kulkarni, Shridhar Rangnath (1970). Prācīna Marāṭhī gadya. Sindhū Pablikeśansa.
 10. a b "महाशिवरात्रि: शिवरात्रि में प्रात: एवं रात्रि में चार प्रहर शिव पूजन का है विशेष महत्त्व". live hindustan. १. ३. २०१९. १०. २. २०२० रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 11. ^ Bhāratīya sãskr̥tikośa. Bhāratīya Sā̃skr̥tikośa Maṇḍaḷa. 1962.
 12. ^ USA, IBP (2012-03-03). India Country Study Guide Volume 1 Strategic Information and Developments (इंग्रजी भाषेत). Lulu.com. ISBN 9781438774602.
 13. ^ "Maha Shivratri". www.mahashivratri.org. 20.2.2020 रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 14. ^ Sohonī, Govinda Prabhākara (1965). Dakshiṇa Bhāratāce darśana. Jagannātha Prakāśana.
 15. ^ "Rain, snow fail to dampen Shivratri festivities in Kashmir". outlook india. 20. 2. 2020. 20. 2. 2020 रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 16. ^ Yatra 2 Yatra (इंग्रजी भाषेत). Yatra2Yatra. 2009.
 17. ^ Yangalwar, Pro Vijay (2014-02-27). Shree Kshetra Markandadev / Nachiket Prakashan: श्री क्षेत्र मार्कंडादेव. Nachiket Prakashan.
 18. ^ Gaḍakarī, Mādhava (1965). Asā hā Mahārāshṭra. Mojesṭika Buka Sṭola.
 19. ^ Bhāratīya sãskr̥tikośa. Bhāratīya Sā̃skr̥tikośa Maṇḍaḷa. 1962.