दुधाला विरजण लावून त्याचे दही तयार केले जाते. त्यानंतर ते दही एका स्वच्छ फडक्यात घट्ट बांधले जाते व टांगून ठेवले जाते.[ चित्र हवे ] हळूहळू त्या दह्यातले बरेचसे पाणी त्या फडक्यातून निघून जाते व फडक्यात घट्ट स्वरूपाचे दही शिल्लक राहते. याच दह्याला चक्का असे म्हणतात.

श्रीखंड करण्याकरता हाच चक्का वापरतात.प्रथिनांचे प्रमाण यात जास्त असते. आयुर्वेदानुसार हा पदार्थ विष्यंदी मानला जातो.