धूतपापेश्वर हे रत्‍नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील धोपेश्वर गावामधील प्रसिद्ध शिवमंदिर आहे.[१][२] राजापूर शहरापासून सुमारे ५ किलोमीटरवर अंतरावर हे गाव लागते. सोमवारी आणि महाशिवरात्रीला येथे प्रचंड गर्दी होते.

चित्र:धूतपापेश्वर मंदिर राजापूर जिल्हा रत्‍नागिरी.jpg
धूतपापेश्वर मंदिर राजापूर (रत्‍नागिरी जिल्हा)

पाप धुऊन काढणारा ईश्वर म्हणून धूतपापेश्वर. सभोवतालचा परिसर अतिशय रम्य असून मंदिरही प्राचीन आहे. प्रशस्त असा सभामंडप, अंतर्गृह, गर्भगृह अशी रचना असलेल्या या मंदिरात येताक्षणी मन प्रसन्न होते. प्रवेशद्वारावर नगारखाना व आवारात दीपमाळा आहेत.

मंदिराशेजारी काळ्या कातळावरून खाली झोकून देणारा मृडानी नदीचा प्रवाह आहे. कोसळणाऱ्या पाण्याचा एक नितांत सुंदर धबधबा होतो. धबधब्याची खरी शोभा ऐन पावसाळ्यात दिसते.वरून खाली पाणी जेथे कोसळते तेथे एक डोह बनला आहे. त्याला “कोटितीर्थ" म्हणतात.

धूतपापेश्वर मंदिरासंबंधी आख्यायिका संपादन

राजापूरच्या परिसरात निळोबा भट नावाचा एक गरीब माणूस राहत होता. परिस्थितीने गरीब असूनही जे काही मिळेल त्यावर तो समाधानी होता. काशीविश्वेवर दर्शन आणि गंगास्नान करण्यास हे शिवभक्त दरवर्षी काशीला जात असत. परंतु वृद्धापकाळामुळे पुढे इतक्या दूर जाववेना.

त्यांच्याकडे एक गाय होती. तिने अचानक दूध देणे बंद केल्यामुळे त्यांनी तिच्यावर पाळत ठेवली. रानात जाऊन एके ठिकाणी ती गाय झाडाखाली पान्हा सोडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. गायीच्या गुराख्याने रागातच त्या खडकावर कुऱ्हाडीचा घाव घातला. त्या खडकाचा एक खडपा उडून विशालगडजवळच्या कासर्डे गावी जाऊन पडला, आणि त्याचे 'कपालेश्वर' लिंग झाले. मूळ खडक त्याच स्थानी राहिला. निळो भटांना त्या खडकात तुटलेले शिवलिंग आढळले. त्यांना खूप वाईट वाटले कारण शिवलिग भंग झाले त्याला आपणच कारणीभूत आहोत असे त्यांना वाटले.आजही ते स्वयंभू शिवलिगं तुटलेलेच आहे.

खडक फोडल्यावर ती गाय पळू लागली. तिने मंदिराच्या शेजारील डोहात उडी घेतली (कोटीतीर्थात). निसीम्म शिव भक्त असलेले निळोबा भटांना खुप वाईट वाटले शिवलिगं भंग आणि पवित्र गाईचा मृत्यू यास आपणच जबाबदार आहोत असे म्हणून पापाचे प्रायश्चित म्हणून निळोबाही धावले आणि त्यांनीही कोटीतीर्थात देहविसर्जन केले. अशी ही भावपूर्ण आख्यायिका आहे.

धूतपापेश्वर मंदिराची काही खास वैशिष्ट्ये संपादन

१) मंदिराशेजारून वाहणारी मृडानी नदी आणि या नदीवरील आकर्षक छोटे छोटे धबधबे. पावसाळ्यात त्याचे सौंदर्य अधिकच खुलते.

२) संपूर्ण मंदिर परिसरावर निसर्गाने मुक्त हस्ते सौंदर्याची उधळण केली आहे. गर्द झाडीत हे मंदिर वसलेले आहे.

३) मंदिराच्या सभामंडप आणि गर्भगृहावरील छतावर, खाबांवर,तुळयांवर ज्या प्राण्यांची,वनस्पतींची, फुलांची चित्रे काढून शिल्पकला केली आहे ते प्राणी वगैरे त्या मंदिर परिसरात आढळनारेच आहेत. उदाहरणार्थ - शंकराला वाह्याला जाणाऱ्यारा कैलासचाफा या आकर्षक फुलाचे झाड हे या एकमेव ठिकाणी पहायला मिळते.

४) मंदिर परिसरातील खांबांवर आणि भिंतीवर चित्रांसाठी व शिल्पकलेवर वापरलेले रंग पूर्णत नैसर्गिक म्हणजे पाने, फुले झाडाची साल यांपासून तयार केलेले रंग आहेत.

५) दररोजच्या पूजेत मांडलेल्या समयांवर इ.स.तारीख आहे त्यामुळे हे मंदिर किती प्राचीन असणार आहे याची कल्पना येते.

६) दररोज रात्री शेवटची महापूजा होते आणि शंकर-पार्वती यांच्यासाठी सारीपाटाचा (सोंगट्यांचा) खेळ मांडला जातो, . आणि गर्भगृहाचा दरवाजा बंद केला जातो. दुसऱ्या दिवशी पहाटे आरतीसाठी दरवाजे उघडतात तेव्हा ह्या सोंगट्या विखुरलेल्याले आढळतात. असे दररोज होत नाही आणि होईलच असे नाही शक्यतो (सोमवार, गुरुवार, अमावास्या, महाशिवरात्र, श्रावण सोमवार) यावेळी जास्त होते. येथील भाविकांची श्रद्धा आहे की भगवान शंकर-पार्वती येते येऊन सारीपाट खेळून जातात.

७) राजापूरची गंगा ज्यावेळी प्रकट होते त्यावेळी लोक प्रथम उन्हाळे येथे जाऊन गरम पाण्याच्या प्रवाहात आंघोळ करतात, नंतर राजापूरच्या गंगेत स्नान करतात. आणि राजापूरच्या अर्जुना नदीपात्रातील पुंडलिकाचे दर्शन घेऊन धूतपापेश्वरला अभिषेक करतात. असे केल्यावर कशीविश्वेश्वराचे दर्शन पूर्ण होते अशी भावना राजापूर आणि आसपासच्या गावातील भाविकांची श्रद्धा आहे.

८) धूतपापेश्वर मंदिराच्या बरोबर मागे कामेश्वराचे मंदिर आहे राजापूर व आसपासच्या गावातील एखादे जनावर आजारी पडले किंवा दूध देत नसेल तर या मंदिरात नवस केला जातो. त्यांचे जनावर ठणठणीत बरे होते. असा अनुभव ग्रामस्थांना आहे.

९) धोपेश्वर गावात नखे वाढवण्याचा जागतिक वर्ड रेकाॅर्ड मध्ये दुसऱ्या क्रमांकवर असणारी वसंत ठाकूर ही व्यक्ती राहते. त्यांचा पत्ता विचारल्यावर येथील मंदिरातील पुजारी किंवा ग्रामस्थ सांगतात.

१०) थोरल्या माधवराव पेशव्यांनी या मंदिराला भेट दिली होती त्यांनी मंदिरासाठी शाळिग्राम भेट दिला होता.तो आजही धोपेश्वर गावातील ग्रामस्थं धोंडूमामा करंबळकर यांच्या घरात पहायला मिळतो.

११) तसेच पेशवेकाळातील सरदार बिनीवाले यांनी भगवान शंकराच्या पिंडीवर सोन्याचा मुकूट भेट दिला होता.जो आजही पुजेत वापरतात.

१२) महाराष्ट्र शासनाने youtube वर www.ratnagiri.tourisam.in या वेबसाईटवर रत्‍नागिरी जिल्हयातील मुख्य पर्यटन स्थळांची फोटो व video सहीत माहिती दिली आहे. यात धूतपापेश्वर मंदिराला अग्रस्थान दिले आहे. धूतपापेश्वर मंदिर, मृडानी नदी आणि धबधबा यांचे ड्रोन कॅमेरामधून टिपलेले विहंगम दृश्य पहायला मिळते.

तसेच ABP माझा या वृत्त वाहिनीने "ग्रामदैवता" या त्यांच्या विशेष कार्यक्रमात धूतपापेश्वर मंदिरावर एक उत्तम माहितीपट दाखवला आहे. (youtube) वर उपलब्ध आहे.

मंदिर स्थापत्य संपादन

 
राजापूरच्या धूतपापेश्वर मंदिराचा मोरपंखी स्तंभ

या मंदिराचा लाकडी सभामंडप आणि त्यावरील नक्षीकाम हे या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणून सांगता येते. मारुती, कमळ, मासे, मोरपीस असे लाकडातील कोरीवकाम येथे पहायला मिळते.

प्रसिद्ध धबधबा संपादन

मृडानी नदीच्या काठावर असले हे मंदिर नदीच्या दोन्ही बाजूंच्या मोठ्या डोंगरांमध्ये आहे. मृडानी नदी डोंगरावरून खाली येताना मंदिराजवळच एक धबधबा तयार झाला आहे. जुलै ते नोव्हेंबर या काळात या धबधब्याला भरपूर पाणी असते.[३] पावसाळ्यात येथे भाविक आणि पर्यटक यांची गर्दी असते.[४]

पहा : धूतपापेश्वर आयुर्वेद औषधी कारखाना

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper,Marathi News Paper in Mumbai". www.loksatta.com. 2018-09-25 रोजी पाहिले.
  2. ^ "धूतपापेश्वर मंदिर,राजापूर". Archived from the original on 2018-05-26.
  3. ^ "चला निसर्ग वाचू या (१४.८. २०१६)".
  4. ^ "शतजल धारा (३०/६/२०१५)".[permanent dead link]