राधा

भगवान श्रीकृष्ण यांच्याशी संबंधित हिंदू देवता

राधा राधिका,राधे अशा नावांनी प्रसिद्ध असलेलीही भारतीय पौराणिक साहित्यातील महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे. श्रीकृष्णाची सखी अशा संदर्भाने ती भारतीय संस्कृतीत प्रसिद्ध पावली आहे.[१] त्याच जोडीने लक्ष्मीचा एक अवतार म्हणूनही वैष्णव संप्रदायात तिला आदराचे स्थान आहे. वैष्णव संप्रदायाशी संबंधित असल्याने प्रामुख्याने राधारानी अशा संबोधनाने ती पश्चिम बंगाल, मणिपूर, ओरिसा या प्रांतात विशेष पूजनीय आहे. भारतीय संस्कृतीत निंबाक संप्रदाय [२]आणि चैतन्य महाप्रभूंचा संप्रदाय यांच्याशी तिचा संबंध जोडलेला दिसतो.[३] कालांतराने राधा ही लक्ष्मी किंवा अशा रूपात पूजनीय देवता म्हणून मान्यता पावली.[४]

राधा
Radhamadhava.JPG
मायापूर मंदिरात कृष्णा आणि राधा

लक्ष्मी, माधवप्रिया, वृंदावनेश्वरी , कृष्णाचे प्रेम आणि भक्तीचे रासेश्वरी रूप - इत्यादींची अधिपती देवता

निवासस्थान बरसाना, वृंदावन, ब्रज धाम,
लोक गोलोक, वैकुंठ
वडील वृषभानु
आई कीर्तिदेवी वा रत्नगर्भा देवी
अन्य नावे/ नामांतरे राधिका
या अवताराची मुख्य देवता लक्ष्मी
मंत्र ॐ वृषभानुज्यै विद्महे कृष्णप्रियायै धीमहि तन्नो राधा प्रचोदयात॥
नामोल्लेख भागवत पुराण,ब्रह्मवैवर्त पुराण,

देवी भागवतपुराण,गीत गोविन्द,पद्म पुराण,ब्रह्माण्ड पुराण

राधा 
भगवान श्रीकृष्ण यांच्याशी संबंधित हिंदू देवता
Radharani3.jpg
माध्यमे अपभारण करा
प्रकार देवी
अधिकार नियंत्रण
Blue pencil.svg
Radha (es); રાધા (gu); Радха (ru); राधा (mai); رادا (fa); 拉達 (zh); राधा (ne); ラーダー (ja); Radha (sv); Радга (uk); राधा (sa); राधा (hi); రాధ (te); 라다 (ko); ৰাধা (as); Radhao (eo); ராதா (ta); Rādhā (it); রাধা (bn); Radha (fr); Radha (gom-latn); Radha (fi); رادھا (ur); Radha (de); राधा (mr); राधा (gom-deva); Radha (vi); რადჰა (ka); Radha (pt); Radha (ca); Radha (lt); Radha (oc); Radha (nl); രാധ (ml); Radha (id); พระแม่ราธา (th); Radha (pl); Radha (nb); Rada (su); ਰਾਧਾ (pa); ରାଧା (or); ರಾಧೆ (kn); राधा (bho); Radha (en); رادها (ar); Radha (gom); රාධා (si) divinità induista (it); प्रेम की देवी (hi); déesse hindoue (fr); ਭਗਵਾਨ ਸ੍ਰੀ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਦੀ ਪਿਆਰੀ (pa); Hindu goddess linked to Krishna (en); deessa hindú consort del déu Krixna (ca); भगवान श्रीकृष्ण यांच्याशी संबंधित हिंदू देवता (mr) Radha (it); राधे, राधारानी (hi); ਰਾਧਾਰਾਣੀ (pa); Radhika, Radhe, Radharani, Rādhā, Kanupriya (en); राधिका (mr)

कीर्तिदादेवी वा रत्नगर्भा देवी आणि महाराज वृषभानु यांची कन्या [५][६]

व्युत्पत्तीसंपादन करा

राधा या नावांमध्ये 'राध' असा संस्कृत धातू आहे , ज्याचा अर्थ "प्रसन्न करणे " असा होतो. समृद्धी किंवा यशस्विता असाही राधा या शब्दाचा अर्थ आहे. [७]

वैष्णव संप्रदायातील स्थानसंपादन करा

भारतीय धर्मशास्त्राच्या परिभाषेत शृंगारभक्ती अशी संकल्पना प्रचलित आहे. राधा ही व्यक्तिरेखा या संकल्पनेशी संबंधित आहे. गौडीय वैष्णव आणि पुष्टीमार्गी वैष्णव या उपसंप्रदायांतील अद्वैत तत्त्वज्ञानाला अनुसरून राधा ही नायिका म्हणून प्रसिद्ध पावली आहे. मूलतः गोपी असलेली राधा या साहित्यात कामिनी आणि रमणी अशा रूपांमध्ये भगवान श्रीकृष्णाशी जोडली गेलेली आहे. [८]

साहित्यातील स्थानसंपादन करा

हरिवंश पुराण किंवा महाभारत या ग्रंथात राधा ही व्यक्तिरेखा आढळत नाही. देवी भागवत या ग्रंथात तिचा उल्लेख आढळतो. तेथे श्रीकृष्णाची रासलीला आणि त्यातील त्याची प्रमुख सहचरी म्हणून राधेचा उल्लेख आढळतो.[४] वैष्णव संप्रदायाच्या भागवत पुराणात राधा ही कृष्णाची परमभक्त असल्याचा केवळ उल्लेख आहे. बाराव्या शतकात जयदेवाच्या गीत गोविंद काव्यातील राधेच्या वर्णनानंतर तिची देवी म्हणून लोकप्रियता अधिक वाढली असे अभ्यासक सांगतात.[९] कवी जयदेवाच्या "गीत-गोविंद" या संस्कृत काव्यात राधेच्या प्रेमी नायिका रूपाचे वर्णन आढळते. श्रीकृष्ण आणि राधेच्या शृंगाराचे वर्णन या काव्यात प्रामुख्याने आलेले आहे.[३] बंगाली लोककथा या राधा कृष्णाच्या प्रेमाचे वर्णन करतात. त्याचजोडीने दास्य भक्तीचे उदाहरण म्हणूनही या लोकसाहित्यात राधेची व्यक्तिरेखा मान्यता पावली आहे.[१०][९]

ब्रह्मवैवर्त पुराण आणि पद्म पुराण यांनी मात्र राधा आणि कृष्णाच्या उत्कट प्रेमाचे वर्णनच अधिक केलेले दिसते. [९]

शिल्पशास्त्रातसंपादन करा

प्रामुख्याने महाराष्ट्रात आढळणाऱ्या-या अर्धनारीनटेश्वर शिल्प अंकनात राधा आणि कृष्ण यांचे अद्वैत प्रतिबिंबित होते आणि त्यातून त्यांचे प्रेम आणि भक्तीही अधोरेखित होते असे अभ्यासक मानतात.[११]

रासलीलासंपादन करा

राधा आणि कृष्ण यांच्या उत्कट प्रेमाचा आविष्कार हा रासलीला या नृत्यप्रकारातून अभव्यक्त होते असे मानले जाते.गोपीच्या समवेत कृष्ण आणि राधा यांचे नृत्य असे या रासक्रीडेचे स्वरूप मानले जाते. मणिपुरी नृत्याच्या शास्त्रीय प्रकारात या रासनृत्याला विशेष महत्व आहे.भागवत पुराण,जयदेवाचे गीत-गोविंद यातील काव्य संकल्पना वापरून हे नृत्य केले जाते.[१२]

व्यक्तिरेखेचे स्वरूपसंपादन करा

वैष्णव संप्रदायाच्या जोडीने राधा ही शाक्त संप्रदायाशी निगडित देवताही मानली जाते. प्रांताप्रांतानुसार तिच्या संकल्पनेच्या छटा आणि त्यांचा आशय बदलताना दिसतो. भक्तिसंप्रदाय हा भारतात लोकप्रिय होण्याच्या काळात मधुरा भक्तीचे प्रतीक म्हणून राधा ही देवता म्हणून अधिक मान्यता पावलेली दिसते.[१३]

तत्त्वज्ञानातील संकल्पनासंपादन करा

भारतीय तत्त्वज्ञानाची महत्त्त्वाची संकल्पना म्हणजे परमेश्वर चराचर व्यापून राहिला आहे. या तत्त्वाला अनुसरून राधा ही जणू काही कृष्णच आहे अशा परिभाषेत राधा आणि कृष्ण यांचे ऐक्य दाखविले जाते. [१४]

श्रीकृष्ण हा ऊर्जेचा स्रोत असून राधा ही संपूर्ण ऊर्जामय आहे. राधा आणि कृष्ण हे देवत्वाचे स्त्रीतत्त्व आणि पुरुषतत्त्व आहेत. अग्नी आणि त्याची धग किंवा कस्तुरी आणि तिचा सुगंध हे जसे एकमेकांपासून अलग होत नाहीत तेच राधा आणि कृष्णाचे नाते आहे.[९]

राधा आणि अनयसंपादन करा

राधा ही कृष्णापेक्षा वयाने खूप मोठी होती. जेव्हा कृष्ण साताठ वर्षांचा होता तॆेव्हा राधा ही पंचवीसएक वर्षे वयाची महिला होती. तिच्या नवऱ्याचे नाव अनय. श्रीकृष्ण मथुरा सोडून जेव्हा द्वारकेला आला त्यानंतरच्या राधेची काहीच माहिती मिळत नाही. .

मंदिरेसंपादन करा

राधा आणि कृष्ण हे वैष्णव संप्रदायाचे देवता युगुल असल्याने त्यांची मंदिरेही स्थापन झाली आहेत. मथुरेतील वृंदावन येथे तसेच बनारस येथे अशी मंदिरे आहेत. [१५]राधावल्लभ हे त्यातीलच एक मंदिर आहे. दिल्लीस्थित श्री राधा पार्थसारथी मंदिर हेही त्यांपैकीच एक मंदिर आहे. परदेशांतही या देवता युगुलाची मंदिरातून आदराने पूजा केली जाते.[१६]

चित्रदालनसंपादन करा


हे सुद्धा पहासंपादन करा

संदर्भसंपादन करा

 1. ^ The Divine consort : Rādhā and the goddesses of India. Hawley, John Stratton, 1941-, Wulff, Donna Marie, 1943-, Harvard University. Center for the Study of World Religions. [Berkeley, Calif.]: Berkeley Religious Studies Series. 1982. OCLC 7948036. आय.एस.बी.एन. 0895811022. 
 2. ^ Sociology of religion in India. Robinson, Rowena, 1967-. New Delhi: Sage Publications. 2004. OCLC 554567843. आय.एस.बी.एन. 9788132103868. 
 3. a b Mukherjee, Prabhat (1981). The History of Medieval Vaishnavism in Orissa (en मजकूर). Asian Educational Services. आय.एस.बी.एन. 9788120602298. 
 4. a b Varma, Keshav Prasad (2015-10-28). The Children of the Immortal: A Quest into the Hindu Identity (en मजकूर). Notion Press. आय.एस.बी.एन. 9789352061921. 
 5. ^ "Radhashtami - ISKCON Kolkata". www.iskconkolkata.com. 2019-09-05 रोजी पाहिले. 
 6. ^ "Radha". Wikipedia (en मजकूर). 2019-08-30. 
 7. ^ Monier Monier-Williams, Rādhā, Sanskrit-English Dictionary with Etymology, Oxford University Press, page 876
 8. ^ Dehejia, Harsha V. (2014). Radha: From Gopi to Goddess (en मजकूर). Niyogi Books. आय.एस.बी.एन. 9789383098064. 
 9. a b c d Rosen, Steven J. (2012-06). The Agni and the Ecstasy (en मजकूर). Arktos. आय.एस.बी.एन. 9781907166792. 
 10. ^ Banerjee, Sumanta; Study, Indian Institute of Advanced (1993). [https://books.google.co.in/books? id=gPJEAQAAIAAJ&q=radha+in+Vaishnavism&dq=radha+in+Vaishnavism&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiNipXJ3dzaAhVKsY8KHTQ6D8AQ6AEILDAB Appropriation of a folk-heroine: Radha in medieval Bengali Vaishnavite culture] (en मजकूर). Indian Institute of Advanced Study. आय.एस.बी.एन. 9788185952086. 
 11. ^ Shrikant Pradhan (2008), A UNIQUE IMAGE OF "ARDHARADHAVENUDHARAMURTI: OR "ARDHANARI KRISHNA", Bulletin of the Deccan College Research Institute, Vol. 68/69 (2008-2009), pp. 207-213 भाषा=इंग्लिश
 12. ^ Sinha, Aakriti (2006). Let's Know Dances of India (en मजकूर). Star Publications. आय.एस.बी.एन. 9788176500975. 
 13. ^ Pauwels, Heidi R.M. The Great Goddess and Fulfilment in Love: Rādhā Seen Through a Sixteenth-Century Lens,. 
 14. ^ Vroom, H. M. (1989). Religions and the Truth: Philosophical Reflections and Perspectives (en मजकूर). Rodopi. आय.एस.बी.एन. 0802805027. 
 15. ^ Brooks, Charles R. (2014-07-14). The Hare Krishnas in India (en मजकूर). Princeton University Press. आय.एस.बी.एन. 9781400859894. 
 16. ^ Mugno, M. & Rafferty, R.R. 1998. Texas Monthly Guidebook to Texas. Gulf Pub. Co.